Post views: counter

महत्वाच्या नियुक्त्या

महत्वाच्या नियुक्त्या
  • विदेश दौऱ्याहून परतताच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केंद्रीय दक्षता आयुक्त (सीव्हीसी) आणि मुख्य माहिती आयुक्त (सीआयसी) या दोन महत्त्वपूर्ण पदांवरील नियुक्तींना मंजुरी दिली आहे.
  • केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे माजीप्रमुख के. व्ही. चौधरी हे नवे सीव्हीसी तर विजय शर्मा हे मुख्य माहिती आयुक्त असतील.
  • एक आठवड्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्रमोदी आणि काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या समितीने या नावांनामंजुरी दिली होती.
  • चौधरी यांची सीव्हीसीपदी झालेलीनियुक्ती ही परंपरेला छेद देणारी आहे.आजवर आयएएस अधिकाऱ्यांचीच या पदी नियुक्ती होत आली आहे.

  • १९६४ मध्ये सीव्हीसी ही भ्रष्टाचार प्रतिबंधक शाखा स्थापनझाल्यापासून पहिल्यांदाच महसूल विभागातील एखाद्या अधिकाऱ्याकडे हे पद सोपविण्यात आले आहे.
  • प्रसिद्ध वकील राम जेठमलानी, प्रशांतभूषण आणि इतरांनी चौधरींच्यानियुक्तीला विरोध केला होता; मात्र सरकार निर्णयावर ठाम राहिले.
  • चौधरी हे काळ्या पैशाच्या तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्याविशेष तपास चमूचे (एसआयटी)सल्लागार म्हणून कार्यरत होते.
  • विजय शर्मा यांना अवघे सहामहिने विजय शर्मा हे २०१२ पासून केंद्रीयमाहिती आयुक्त म्हणून कार्यरत होते. ते यावर्षी १ डिसेंबर रोजी ६५ वर्षांचे होत असून, त्यांना मुख्य माहिती आयुक्तपदासाठी केवळसहा महिन्यांचा काळ लाभेल.
  • सर्वात ज्येष्ठ माहिती आयुक्तांकडेच हे पद देण्याची परंपरा कायम राखत सरकारने त्यांची नियुक्ती केली आहे.