Post views: counter

Current Affairs : May 2015

चालू घडामोडी:- जून २०१५ • सेवाकर वाढ:- ०१ जून २०१५ 
  =>सेवाकराच्या दरात १२.३६ टक्क्यांवरून १४ टक्के इतकी वाढ
  =>रेल्वेचा प्रथमवर्ग आणि वातानुकूलित डब्यांचे शुल्क वाढले असून, मालवाहतूकही महागली आहे. ही वाढ ०.५ टक्के आहे. रेल्वेच्या एसी, प्रथम वर्ग आणि मालवाहतुकीवर सध्या ३.७ टक्के सेवाकर आकारला जातो. तो आता ४.२ टक्के झाला आहे. त्यामुळे ही वाढ ०.५ टक्के आहे.
 • विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी ५० लाखांची लाच देताना भ्रष्टाचार विरोधी पथकाने तेलुगु देसम पक्षाचे (टीडीपी) आमदार असलेल्या  ए. रेवनाथ रेड्डी या नेत्यास अटक केली. रेड्डी यांनी स्टिफन्सन यांना पाच कोटींची ऑफर दिली होती. ५० लाख हे मतदानापूर्वी आणि उरलेले साडेचार कोटी मतदानानंतर देणार होतेतेलंगणा विधान परिषदेच्या निवडणुकीत टीडीपीच्या उमेदवारास मतदान करावे यासाठी रेड्डी यांनी अँगो-इंडियन आमदार एल्विस स्टिफन्सन यांना लाच देऊ केली होती.
 • कोलकाताहून अगलतला, व्हाया बांगलादेश बस सेवा ०१ जून २०१५ सुरु करण्यात येणार आहे. 
 • २७व्यांदा कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धा  बार्सिलोना संघाने जिंकली. कँप नोऊमध्ये झालेल्या अंतिम लढतीत अॅ थ्लेटिक बिल्बाओचा ३-१ असा पराभव करत बार्सिलोनाने २७व्यांदा कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धा जिंकली.
 • दरवर्षी अवघे १२ रुपये देऊन दोन लाख रुपयांचा अपघात विमा देणाऱ्या 'प्रधानमंत्री बीमा सुरक्षा योजना' ही सामजिक सुरक्षा योजना खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय लॉम्बार्ड, बजाज अलियान्झ, रिलायन्स जनरल, युनिव्हर्सल सॉम्पो, इफ्को टोकियो आणि फ्युचर जनराली कंपन्यांनी स्वीकारली आहे. 
 • नर्गिस दत्त
  =>नर्गिस यांचे ०३ मे १९८१ रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले.
  =>सरकारतर्फे मानाचा पद्यश्री पुरस्कार मिळालेल्या नर्गिस दत्त या पहिल्या अभिनेत्री आहेत.
  =>पहिल्या अभिनेत्री होत्या ज्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्रींच्या श्रेणीमध्ये राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला.
  =>दरवर्षी होणा-या राष्ट्रीय फिल्म पुरस्कारांमध्ये राष्ट्रीय एकतेवर बनलेल्या सर्वश्रेष्ठ सिनेमाला ‘द नर्गिस   दत्त अवॉर्ड‘ दिला जातो.
  =>नर्गिस दत्त १९८० मध्ये राज्यसभेच्या खासदार झाल्या होत्या.
  =>‘तलाश-ए-इश्क’ या सिनेमातून १९३५ साली नर्गिस यांनी बालकलाकार म्हणून हिंदी सिनेसृष्टीत पहिलं पाऊल ठेवले होते.
 • संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेचा प्रसिद्ध झालेला अहवालानुसार देशातले १९ कोटी कोटी लोक उपाशी आहेत. म्हणजे जवळपास युरोपमधील किमान १० राष्ट्रांच्या लोकसंख्येएवढी ही संख्या आहे.
 • बेकायदा बाळगलेले प्राणी, पक्षी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना अमानवी वागणूक मिळू नये, त्यांची व्यवस्थित सांभाळण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करावीत अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्याचे सुप्रीम कोर्टाने मान्य केले आहे.ही याचिका  पेट लव्हर्स असोसिएशन संस्थेने मांडली होती.
  =>न्या. ए. के. सिकरी आणि न्या. यू. यू. ललित यांच्या सुट्टीतील खंडपीठापुढे 'पेट लव्हर्स असोसिएशन' या संस्थेने ही याचिका सादर केली होती.
  =>संस्थेतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ व माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी अन्य याचिकाकर्त्यांसह संस्थेची बाजू मांडली.
  =>संस्थेने गुजरात हायकोर्टाने नुकत्याच दिलेल्या 'पक्ष्यांनाही मूलभूत हक्क असतात,' या स्वरूपाच्या निकालाच्या विरोधात ही याचिका दाखल केली आहे.
 • लष्करातील निवृत्त जवान, कर्मचारी यांच्यासाठी समान श्रेणी, समान पेन्शन' (वन रँक, वन पेन्शन)योजना लागू करण्याची मागणी केली जात आहे. भारतीय लष्करातून निवृत्त झालेल्या सुमारे २० लाख कर्मचाऱ्यांची ही दीर्घ काळची मागणी आहे. समान श्रेणीवर असताना व समान सेवाकालावधी पूर्ण करून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना समान पेन्शन मिळावे. कर्मचाऱ्याच्या निवृत्तीच्या तारखेचा त्यात विचार करू नये, अशी निवृत्त कर्मचाऱ्यांची भूमिका आहे.
 • चेहरा ओळखणारे तंत्रज्ञान असलेले ऑटोमेटेड टेलर मशिन (एटीएम) विकसित करण्यात  चीन  देशामधील शास्त्रज्ञांना यश आले आहे.
  =>चिली, कोलंबिया यांसारख्या काही देशांत एटीएममधून पैसे काढण्यासाठी बोटाचे ठसे द्यावे लागतात. ते जुळले तरच पैसे काढता येतात. अमेरिकेसारखे अनेक देश गुप्तता, तसेच अधिक खर्चाच्या कारणामु‍ळे हे तंत्रज्ञान वापरत नाहीत.त्सिंघुआ विद्यापीठ आणि पूर्व चीनच्या झेजिअँग प्रांतातील त्झेक्वान टेक्नॉलॉजी या दोन संस्थांतील शास्त्रज्ञांनी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्झेक्वान टेक्नॉलॉजी ही संस्था आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्थांना सुरक्षा पुरवण्याचे काम करते.
 • 'काळा पैसा (अघोषित परकीय उत्पन्न व संपत्ती) विधेयक २०१५'ला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंजुरी दिली असून,१ एप्रिल २०१६ पासून हा कायदा अंमलात येणार आहे. अघोषित परकीय उत्पन्न आणि संपत्तीच्या समस्येचा मुकाबला करण्यासाठी आणलेले हे विधेयक १३ मे रोजी राज्यसभेत मंजूर करण्यात आले होते. त्यापूर्वी दोन दिवस लोकसभेने हे विधेयक संमत केले होते.
  थोडक्यात:-
  माहिती न देणाऱ्यास कमीत कमी ५० हजार रुपये व जास्तीत जास्त दोन लाख रुपये दंड ठोठावण्यात येईल.
  =>कर अधिकाऱ्यांकडून कोणत्याही व्यक्तीला विदेशात काळा पैसा जमा असल्याच्या संशयावरून समन्स, नोटीस हे पोस्ट किंवा कुरिअर सेवा किंवा ई-मेल, फॅक्स अशा स्वरूपात पाठविण्यात येईल.
  =>हे विधेयक लागू होण्यापूर्वी नागरिकांना विदेशात असलेली अघोषित संपत्तीबाबत खुलासा करण्यासाठी अल्पावधी देण्यात येईल. या कालावधीत ते ३० टक्के कर आणि ३० टक्के दंड भरून संपत्तीबाबतची स्थिती स्पष्ट करू शकतात.
 • आय-लीग फुटबॉल स्पर्धेचे प्रथमच विजेतेपद मोहन बागान क्लब संघाने पटकावले. 
आय-लीगमधील विजेते

 1. २००७-०८ डेम्पो क्लब
 2. २००८-०९ चर्चिल ब्रदर्स
 3. २००९-१० डेम्पो क्लब
 4. २०१०-११ साळगावकर क्लब
 5. २०११-१२ डेम्पो क्लब
 6. २०१२-१३ चर्चिल ब्रदर्स
 7. २०१३-१४ बेंगळुरू क्लब
 • आयआयटी मद्रासच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी आंबेडकर-पेरियार स्टुडंट सर्कल (एपीएससी) नामक फोरमची स्थापना १४ एप्रिल २०१४ रोजी केली होती ?

1 टिप्पणी:

 1. नर्गिस यांचे ०३ मे १९८१ रोजी वयाच्या 51 व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले - See more at:

  उत्तर द्याहटवा