Post views: counter

माहिती तंत्रज्ञान




                                 माहिती तंत्रज्ञान म्हणजे माहितीची निर्मिती, एकत्रीकरण, माहितीवर केलेली प्रक्रिया, साठा, माहितीची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी केलेली देवाणघेवाण या प्रक्रिया. माहिती तंत्रज्ञानामध्ये संगणक महत्त्वाची भूमिका पार पाडतो. माहिती तंत्रज्ञानामध्ये कच्च्या माहितीचे रूपांतर उपयोगी माहितीमध्ये केलेले असते. प्रक्रिया केलेल्या माहितीचे पुनर्चक्रीकरण केले जाते.
या माहितीचा संचय करून तिचा उपयोग दुसऱ्या प्रक्रियेसाठी केला जातो तसेच प्रक्रिया केलेली माहिती दुसऱ्या माहितीसाठी एकत्रित करून तिचा परिणाम वाढवता येतो. संचय केलेली माहिती नव्या स्वरूपात मिळू शकते. माहितीचे हे नवे स्वरूप समजण्यास सोपे असते.

आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका -

  1. व्हच्र्युअल रिअॅलिटी (आभासी सत्य) :  प्रत्यक्ष असावे तसे संगणकाच्या मदतीने तयार केलेले आणि वस्तुत: कृत्रिम असलेले सभोवतालचे वातावरण म्हणजेच आभासी सत्य. संगणकीय खेळांमध्ये याचा मोठय़ा प्रमाणावर उपयोग केला जातो. वैद्यक क्षेत्रातील संशोधनासाठी तसेच शिक्षण क्षेत्रातही याचा प्रभावी उपयोग केला जातो. जाहिरात क्षेत्रात ग्राहकांना आकर्षति करण्यासाठी याचा प्रभावीपणे उपयोग केला जातो.
  2. टेलिमेडिसिन : संपर्क तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, जैव-वैद्यक अभियांत्रिकी आणि वैद्यकशास्त्र यांच्या एकत्रीकरणातून टेलिमेडिसिन विकसित झाले आहे. साधारणत: या तंत्रानुसार रुग्णाचा वैद्यकीय अहवाल तज्ज्ञ डॉक्टरांकडे पाठवला जातो. तज्ज्ञ डॉक्टर हा अहवाल अभ्यासून स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने रुग्णावर योग्य उपचार करतात. ग्रामीण आणि शहरी भागातील वैद्यकीय सुविधांमध्ये असलेली तफावत दूर करण्यासाठी टेलिमेडिसिन हा एक प्रभावी मार्ग आहे.
  3. इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन : IPTV ही परस्पर संपर्काची सुविधा असलेली डिजिटल टेलिव्हिजन सेवा असून यामध्ये केवळ टेलिव्हिजन या पारंपरिक प्रसारणाखेरीज इंटरनेटद्वारेही प्रक्षेपण करण्यात येते. या सेवेमुळे ग्राहकांना मागणीनुसार चित्रफीत ही सुविधादेखील उपलब्ध होते. 

संगणकाचा उपयोग:

नेटवर्किंग - दोन किंवा दोनपेक्षा अधिक संगणक एकत्र जोडणाऱ्या संदेशवहन प्रणालीला संगणक
नेटवर्क असे म्हणतात. नेटवर्किंगमुळे हवी ती माहिती कोणत्याही संगणकावर मिळू शकते. यामुळे व्यवस्थापनाचा खर्च कमी होतो. एखाद्या संस्थेसाठी किंवा विभागासाठी केलेल्या नेटवर्किंगला इंट्रानेट असे म्हणतात. याउलट जगातील संगणक परस्परांना ज्या नेटवर्कने जोडलेले असतात, त्यास इंटरनेट असे म्हणतात.

नेटवर्कचे प्रकार:


अ) लोकल एरिया नेटवर्क (LAN) - एका इमारतीच्या कार्यालयातील किंवा मर्यादित अशा भौगोलिक क्षेत्रातील नेटवर्क 'लॅन' या नावाने ओळखले जाते. लॅनला मर्यादित भौगोलिक क्षेत्रामुळे टेलिकॉम सेवेची गरज नसते. गेटवे नेटवर्कद्वारे लॅन मोठय़ा नेटवर्कला जोडता येते. लॅनची मालकी खासगी असते. अनेक व्यक्ती एकाच वेळेस माहितीवर प्रक्रिया करू शकतात. व्यक्तिगत संगणकाचा पर्याप्त वापर तसेच मध्यवर्ती केंद्रीय संगणकाची अनावश्यकता ही लॅनची वैशिष्टय़े सांगता येतील.

ब) मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क (MAN) - संपूर्ण शहर व्यापून टाकणारे असे हे नेटवर्क असते. यामध्ये लॅन तंत्रज्ञानाचा वापर केलेला असतो.

क) वाइड एरिया नेटवर्क (WAN) : जेव्हा भौगोलिकदृष्टय़ा विविध ठिकाणी असलेले संगणक नेटवर्कमध्ये जोडले जातात, तेव्हा त्यास 'वाइड एरिया नेटवर्क' असे म्हणतात. यासाठी टेलिफोन लाइन, दूरसंचार उपग्रह व मायक्रोवेव्ह िलक्सचा उपयोग केला जातो.

ड) क्लाऊड कॉम्प्युटिंग : क्लाऊड कॉम्प्युटिंग ही लॅन व वॅन यांच्या पुढची पायरी आहे. जेव्हा मोठा समूह माहितीची प्रचंड प्रमाणात देवाणघेवाण करतो, तेव्हा नेटवर्कचा समतोल बिघडण्याची शक्यता असते. या समस्येवर मात करण्यासाठीच क्लाऊड कॉम्प्युटिंगचा उदय झाला. यामध्ये वेगवेगळ्या प्रणालींना एकाच वेळी कामाला लावले जाते. एक माहितीची साठवणूक करतो, दुसरा या माहितीच्या साठय़ावर प्रक्रिया करतो, तिसरा या प्रक्रियायुक्त माहितीचा परिणामकारक वापर करण्यासाठी नेटवर्क तयार करतो अणि चौथा या नेटवर्कची सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देतो.

बहुविध प्रसारमाध्यमे - मल्टिमीडिया हे सर्व प्रकारच्या माध्यमांच्या एकत्रीकरणाचे एक प्रभावी सादरीकरण असून यात व्हिडीओ दृश्य, संगीत, आवाज, चित्रलेख आणि मजकूर इ.चा समावेश होतो. याचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे यात उपयोगकर्त्यांचा सहभाग किंवा परस्परसंपर्क असतो. या माध्यमाद्वारे माहितीचे संस्करण, संकलन आणि जतन करता येते. या माध्यमात माहितीवर विविध प्रकारच्या तांत्रिक प्रक्रिया करताना दृक्श्राव्य तंत्राचा वापर करता येतो.

उपयोग : करमणूक क्षेत्रात अॅनिमेशन, स्पेशल इफेक्ट्स, व्हिडिओ गेम्स इ.मध्ये पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनकरिता शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक्रम,प्रशिक्षण, कोशनिर्मिती, माहितीपत्रके, संदर्भग्रंथ इ.साठी, वेब तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जाहिरात, विक्री, शेअर बाजार इ. माहिती होण्यासाठी.

इंटरनेट - इंटरनेट म्हणजे संगणकीय जाळ्यांचे जाळे. यामध्ये वेगवेगळे सव्र्हर व ग्राहक एकमेकांशी दूरध्वनी तसेच उपग्रह यामार्फत जोडलेले असतात. या जाळ्यातील कोणत्याही दोन संगणकांमध्ये माहितीचे संप्रेषण होऊ शकते.

वेब तंत्रज्ञान - इंटरनेट तंत्रज्ञानाच्या प्रगतीतील प्रथम अवस्थेस वेब १.० तंत्रज्ञान म्हणून ओळखले जाते. एकापेक्षा अनेक ब्राउझर्सची उपलब्धता, विविध सर्च इंजिन्सची उपलब्धता, विविध संकेतस्थळे व पोर्टल्सची उपलब्धता, इ-स्वरूपातील संकेतस्थळे ही याची वैशिष्टय़े सांगता येतील.

वेब १.० तंत्रज्ञानाची पुढची पायरी म्हणजे वेब २.०
हे तंत्रज्ञान होय. हे इंटरनेटवर आधारित
सेवांची प्रगत पिढी असून यामध्ये खालील
तंत्रज्ञानाच्या समूहांचा समावेश होतो.

  1. वैयक्तिक लेखांसाठी ब्लॉग - या माध्यमातून अनेक व्यक्ती परस्परांशी वैचारिक संबंध प्रस्थापित करून विचारांची देवाणघेवाण करतात.
  2. रिच साइट समरी किंवा रिअली सिम्पल सिंडिकेशन या माध्यमातून वाचकांच्या गरजेशी निगडित माहिती स्वयंचलित पद्धतीने एकत्र केली जाते. यामुळे विविध विषयांची नवीन माहिती प्राप्त करण्यासाठी वेगवेगळ्या संकेतस्थळांचा वापर करण्याची गरज नसते.
  3. विकीज - वेब पानांचा संग्रह म्हणजेच विकीज. यामधील माहिती मार्कअप लँग्वेजचा उपयोग करून संपादित करता येते.


ई- प्रशासन:
संगणकीय प्रणाली व इंटरनेटचा प्रभावी वापर करून प्रशासनात सुसूत्रता व शीघ्रता आणण्याची प्रक्रिया म्हणजे ई-प्रशासन होय. यामध्ये उपलब्ध माहितीचे योग्यरीत्या संस्करण करून त्या माहितीचे प्रशासनिक वहन व उपयोजन केले जाते. ई-प्रशासनात माहितीचा संपर्क व वहन ही प्रक्रिया संगणक / इंटरनेटच्या माध्यमातून होते. भारतामध्ये ई-प्रशासन ही योजना ऑक्टोबर २००६ मध्ये जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत सामूहिक सुविधा केंद्राची व्यापक स्तरावर उभारणी करण्यात येत आहे.



  1. ई- बँकिंग - कोणत्याही वित्तीय संस्थेशी इंटरनेटच्या माध्यमातून होणारा व्यवहार म्हणजे ई-बँकिंग. असे व्यवहार हे त्या वित्तीय संस्थेच्या विशिष्ट अशा वेबसाइटद्वारे केले जातात. ई-बँकिंगची सुरुवात १९८१ मध्ये न्यूयॉर्कच्या सिटी बँकेपासून झाली. ई-बँकिंग सेवेमध्ये सुरक्षितता अतिशय महत्त्वाची असते आणि यासाठी सुरक्षित वेबसाइटचा उपयोग करणे हा सर्वोत्तम उपाय असतो.
  2. ई-कॉमर्स : इंटरनेटच्या माध्यमातून घरबसल्या वाणिज्यसंबंधित व्यवहार (आíथक व्यवहार) करणे म्हणजेच ई-कॉमर्स होय. ई-कॉमर्समध्ये वस्तू किंवा सेवांची खरेदी-विक्री, चलनाची देवाणघेवाण, विपणन व्यवस्थापन, माहितीची देवाणघेवाण इ. काय्रे घरबसल्या व खूप कमी वेळेत पार पाडता येतात.
सोशल नेटवर्किंग:
सोशल नेटवर्किंग ही इंटरनेटने समाजाला दिलेली एक अद्भुत अशी देणगी आहे. या पृथ्वीतलावर जे जे विषय
चच्रेला येऊ शकतात, त्या सगळ्यावर इंटरनेटच्या माध्यमातून चर्चा करणे म्हणजेच सोशल नेटवर्किंग होय. सोशल नेटवर्किंग वेबसाइट्सच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीला अनेकांशी संपर्क साधून खऱ्या अर्थाने ग्लोबल होता येते. यामुळे विचारांची, माहितीची देवाणघेवाण होते. शिवाय जगाच्या कानाकोपऱ्यात आपण कोठेही संपर्क साधू शकतो. सध्या ऑर्कुट, फेसबुक, ट्विटर या लोकप्रिय अशा सोशल नेटवर्किंग साइट्स आहेत.


  1. फेसबुक - सुरुवात ४ फेब्रुवारी २००४. संस्थापक- मार्क झुकरबर्ग, मुख्यालय- कॅलिफॉíनया, अमेरिका.
  2.  िलकेडिन - सुरुवात ५ मे, २००३. संस्थापक- रिड हॉफमन, मुख्यालय- कॅलिफॉíनया, अमेरिका.
  3. ट्विटर - सुरुवात १५ जुल २००६. संस्थापक- जॅक डॉरसी, नोह ग्लास, इव्हॉन विल्यम, बिझ स्टोन, मुख्यालय- सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका.
  4. ऑर्कुट - सुरुवात २४ जानेवारी २००४. संस्थापक- आर्कुट बुयुकोकतेन, मुख्यालय- कॅलिफॉíनया, अमेरिका.


सायबर गुन्हे: -




  1. हॅकिंग - यामध्ये संगणक संयंत्रणेची अथवा वेबसाइटची सुरक्षा भेदली जाते व त्यामधील माहिती बदलली किंवा चोरली जाते. तसेच संगणक प्रणालीमध्ये बिघाड केला जातो. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांना हॅकर्स असे म्हटले जाते.
  2. फििशग - यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक मेल पाठवले जातात. या मेलला उत्तर देताना कधी कधी चुकीने किंवा हलगर्जीपणामुळे बँक खाते नंबर, पासवर्ड यांसारखी गोपनीय माहिती मिळवून फसवणूक केली जाते.
  3. स्कििमग - यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा ए.टी.एम. कार्डमध्ये असलेल्या मायक्रोचिप (चुंबकीय पट्टी) मधील माहिती चोरून आíथक गुन्हे केले जातात.
  4. सायबर स्टॉकिंग - यामध्ये एखाद्याची माहिती मिळवून त्याला मेल पाठवून धमक्या देऊन त्रास दिला जातो.


मीडिया लॅब एशिया :-



सर्वसामान्य लोकांपर्यत माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार करणे व या तंत्रज्ञानाचा लाभ या लोकांपर्यंत पोहाचविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने या प्रकल्पाची स्थापना केली. या प्रकल्पासाठी मुंबई, चेन्नई, कानपूर, दिल्ली व खडगपूर या आय.आय.टी. चे सहकार्य घेण्यात आले आहे. नवीन तंत्रज्ञानाचा लाभ जनसामान्यांना व्हावा, यासाठी राष्ट्रीय प्रयोगशाळेच्या माध्यमातून या प्रकल्पाअंतर्गत विविध प्रकल्प आखण्यात आले आहेत. त्यात आरोग्य सेवा, शिक्षण, अपंगांचे सबलीकरण, ग्रामीण भागात उपजीविकेची निर्मिती, ग्रामीण भागात दळणवळणाची साधने उपलब्ध करणे या क्षेत्रांवर भर देण्याचा प्रयत्न आहे.


तंतू प्रकाशशास्त्र ऑप्टिकल फायबर म्हणजे अत्यंत शुद्ध काचेचा तंतू. या तंतूचा व्यास अतिशय लहान असतो. अशा एक हजार तंतूंच्या जुडग्याचा व्यास एका मिलिमीटरपेक्षाही कमी असतो. सर्वसाधारणपणे एखाद्या संदेशाचे वहन करण्यासाठी त्याचे रूपांतर इलेक्ट्रिकल इम्पल्सेसमध्ये करून ते तांब्याच्या तारांमधून वहन केले जाते, जेव्हा अशा संदेशांचे रूपांतर प्रकाश लहरीमंध्ये करून त्यांचे वहन काच किंवा प्लॅस्टिकच्या तंतूमधून केले जाते, तेव्हा त्या तंत्रज्ञानाला 'तंतू प्रकाशशास्त्र' असे म्हणतात. प्रकाशीय तंतूमधून प्रकाशाचे वहन संपूर्ण अंतर्गत परावर्तन या तत्त्वांच्या आधारे होते. परंपरागत संदेशवहन व्यवस्थेपेक्षा फायबर ऑप्टिकल्सचा महत्त्वाचा फायदा म्हणजे हे तंतू केसाच्या आकाराचे असल्याने एका केबलमध्ये हजारो तंतू बसवता येतात व अनेक पटींनी माहिती साठवता येते. यात विद्युत चुंबकीय कोणताही व्यत्यय येत नाही. 

व्यावहारिक उपयोग

  1. दूरसंचार क्षेत्र - फायबर ऑप्टिकल्समुळे दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती घडून आली आहे. टेलिफोन, टेलिव्हिजन, इंटरनेट इ.मध्ये याचा वापर केला जातो.
  2. वैद्यक शास्त्र - फायबर ऑप्टिक्समुळे शरीराच्या आतील भागाचे फोटो घेणे शक्य झाले आहे. त्यामुळे रोगाचे निदान करून उपचार करणे शक्य झाले आहे. आधुनिक एन्डोस्कोप ही ऑप्टिकल फायबरची किमया आहे.
  3. लेझर तंत्रज्ञान - १६ मे १९६० रोजी अमेरिकन शास्त्रज्ञ थिऑडोर हेरॉल्ड मॅमन यांनी सर्वप्रथम लेझर शलाका बनवली व तिचा पहिला प्रयोग १९६१ मध्ये करण्यात आला. लेझर म्हणजे Light Amplification by stimulated Emission of Radiation. लेझर हे असे साधन असते, ज्यातून एकच वारंवारता व तरंगलांबी असलेला प्रकाशाचा प्रखर आणि एकाच दिशेने जाणारा झोत निर्माण होतो. सामान्य प्रकाश हा विस्कळीत स्वरूपाचा असल्याने, त्यातील ऊर्जा एकत्रित राहू शकत नाही. मात्र, लेझर हा एकत्रित व विवíतत प्रकाश असल्याने त्यातील ऊर्जेचा ऱ्हास होत नाही. उपयोग
  4. वैद्यकशास्त्र - शरीराच्या खोलवर असलेल्या गाठी नष्ट करण्यासाठी, हृदयासंबंधी काही गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत, चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होतो.
  5. संरक्षण - शस्त्रास्त्रांमध्ये वापर केला जातो. उदा. शत्रूचे रणगाडे शोधणे, त्यांचे अंतर मोजणे यासाठी उपयोग होतो.
  6. पिंट्रिंग - लेझर कम्प्युटर िपट्रर्समध्ये लेझरचा वापर करतात.
  7. बार कोड - वस्तूंवरील त्यांच्या किमतीचे बार कोड वाचण्यासाठी लेझर स्कॅनर्सचा वापर करतात.
  8. बांधकाम क्षेत्र - बांधकाम क्षेत्रात बोगदे, रेल्वेचे रूळ सरळ रेषेत आहेत किंवा नाही हे शोधण्यासाठी. मेसर तंत्रज्ञान (MASER Technology) मेसरचा शोध चार्ल्स हार्ड टाऊन्स याने लावला. मेसर म्हणजे Microwave Amplification by stimulated Emission of Radiation. मेसर या एकच वारंवारता व तरंगलांबी असलेल्या एकत्रित विवíधत व शक्तिशाली अशा मायक्रोवेव्ह्ज असतात. यांचा उपयोग अंतरिक्ष व समुदायामध्ये संदेश वाढवण्यासाठी होतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा