Post views: counter

Current Affairs Dec 2015 Part - 1

 • तमिळनाडू सरकार ऍडव्हेंचर पार्क उभारणार :
केरळमधील कोल्लम जिल्ह्यात अचादायमंगलम या नावानेही ओळखले जानार्‍या डोंगराळ भागामध्ये तमिळनाडू सरकार ऍडव्हेंचर पार्क उभारणार असून, त्यासाठी शंभर कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी दुबईचा पर्यटन विभागदेखील मदत करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 याच परिसरामध्ये जटायूची अवाढव्य मूर्तीही उभारण्यात येईल. महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्याबरोबरच हे पार्क देशविदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्याचे काम करेल. आघाडीचे चित्रपट निर्माते राजीव आंचल हे जटायूची महाकाय मूर्ती साकारण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ते स्वत: जटायूपुरा पर्यटन लिमिटेड या संस्थेचे अध्यक्ष आहेत. ही मूर्ती स्थापत्यशास्त्राचादेखील अप्रतिम नमुना असेल. तिची समुद्रसपाटीपासूनची उंची 1 हजार फूट एवढी आहे. खासगी आणि सरकारी भागिदारीतून बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर उभारला जाणारा हा पहिला प्रकल्प आहे. या ऍडव्हेंचर पार्कमध्ये उभारली जाणारी जटायूची मूर्ती ही एखाद्या पक्ष्याची जगातील पहिली सर्वांत उंच मूर्ती असेल. या ऍडव्हेंचर पार्कमध्ये 6-डी थिएटर, डिजिटल म्युझियम, ऍडव्हेंचर झोन, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा असणारे रिसॉर्ट असेल. या पार्कमध्ये केबल कारचा वापर करण्यात येईल.नुकतेच या पार्कच्या www.jatayunaturepark.com अधिकृत संकेतस्थळाचे उद्‌घाटनही करण्यात आले.

 • राज्यातील पत्रकारांना संरक्षण देण्यासाठीचा मसुदा तयार :
राजयातील पत्रकारांना संरक्षण देण्यासाठीचा मसुदा तयार करून त्याचे लवकरच कायद्यात रूपांतर करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
 सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या राज्य सरकारच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्यात पत्रकारांच्या निवृत्तिवेतनाचा प्रश्‍न, आरोग्य विमा आणि पत्रकारांची सामाजिक सुरक्षा याबाबतही सकारात्मक निर्णय घेणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

 • सानिया मिर्झा अव्वल स्थानावर कायम :

देशातील नंबर वन टेनिस खेळाडू युकी भांबरी याची ताज्या एटीपी मानांकनानुसार दोन स्थानांनी घसरण झाली आहे. तो 93 व्या स्थानी आहे, तर सोमदेव देववर्मन याची दोन स्थानांनी घसरण झाली असून तो आता 181 व्या स्थानावर आहे. साकेत माईनेनी हा 171 व्या स्थानी, रामकुमार रामनाथन 260 व्या स्थानी पोहोचला आहे. त्याने 13 स्थानांनी सुधारणा केली आहे. दुहेरी गटात, रोहन बोपण्णा नवव्या स्थानावर कायम आहे. लिएंडर पेस 41 व्या, तर पुरव राजा 93 व्या क्रमांकावर आहे. डब्ल्यूटीए युगुल मानांकनात सानिया मिर्झा अव्वल स्थानावर कायम आहे. तिची जोडीदार स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीससुद्धा 11355 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तसेच एकेरीत अंकिता रैना ही 255 व्या स्थानावर आहे.
 • हिंद महासागराच्या तळाशी छिद्र पाडायला सुरुवात :
पृथ्वीच्या कठीण थराच्या खाली जाण्यासाठी शास्त्रज्ञ या आठवड्यात हिंद महासागराच्या तळाशी छिद्र पाडायला सुरुवात करतील. इंटरनॅशनल ओशन डिस्कव्हरी प्रोग्रॅमच्या (आयओडीपी) मार्गदर्शनाखाली ही मोहीम चालेल. पृथ्वीच्या आच्छादनापासून (खोलवरील भाग) त्यांना खडकाचा नमुना हवा असल्यामुळे हे छिद्र पाडले जाणार आहे. या प्रक्रियेमध्ये संशोधकांना हा कठीण थर नेमका कशापासून बनलेला आहे याबद्दल त्यांची जी समज आहे ती तपासून घेता येईल अशी आशा आहे. हे छिद्र पाडणारे जहाज जॉईडस् रिझोल्युशन (जेआर) आणि समुद्राचा तळ यांच्यातील 700 मीटर पाण्याशिवाय हे छिद्र पाडले जाईल. हाच तो प्रसिद्ध खंड/व्यत्यय आहे जेथून भूकंपासंबंधीच्या लाटा या आकस्मिकपणे गती बदलतात.
 • दीर्घिकेत एक कृष्णविवर ताऱ्याला गिळत असताना वैज्ञानिकांना प्रथमच पाहता आले :
तीस कोटी प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या दीर्घिकेत एक कृष्णविवर ताऱ्याला गिळत असताना वैज्ञानिकांना प्रथमच पाहता आले व त्यातून प्रकाशाच्या वेगाने द्रव्याची ज्वाला बाहेर फेकली जात होती. सूर्याच्या आकाराइतका तारा गुरूत्वीय ओढीने अतिजास्त वस्तुमानाच्या कृष्णविवरात कोसळतो व गिळला जातो, असे अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठाचे सिजोर्ट व्हॅन व्हेलझेन यांनी सांगितले. त्यांनी हबल दुर्बिणीच्या मदतीने हे संशोधन केले आहे. त्यांनी सांगितले की, कृष्णविवराने तारा गिळताना पाहण्याची ही पहिलीच संधी आम्हाला मिळाली त्यातून शंकू आकाराच्या ज्वाळा बाहेर पडताना दिसल्या. अनेक महिने हे नाटय़ अवकाशात घडत होते. कृष्णविवरे ही अवकाशातील अशी ठिकाणे आहेत जिथे गुरूत्वाकर्षणाने द्रव्य, वायू व प्रकाशही त्यातून बाहेर पडू शकत नाही, त्यामुळे कृष्णविवरे दिसत नाहीत पण ती अवकाशात पोकळीचा परिणाम साधतात. खगोलवैज्ञानिकांच्या मते जेव्हा कृष्णविवर एखादा तारा गिळते तेव्हा त्याच्या जवळच्या भागातून चुंबकीय क्षेत्रातील मूलभूत प्लाझ्मा कण बाहेर पडतात. ते फार वेगवान असतात. हा आधी अंदाज होता पण आता तो खरा ठरला आहे. महा वस्तुमानाची कृष्णविवरे ही खूप जास्त वस्तुमानाच्या दीर्घिकांच्या मध्यावर असतात. आताचे हे कृष्णविवर शेवटच्या स्थानावर आहे व त्याचे वस्तुमान सूर्याच्या काही लक्ष पट अधिक आहे पण तरी त्याने तारा गिळला आहे. तारा गिळला जात असतानाची क्रिया गेल्या डिसेंबरमध्ये दिसली व नंतर रेडिओ दुर्बिणींनी त्याचा पाठपुरावा करण्यात आला. हे सर्व घडत असताना पृथ्वीवरील दुर्बिणींनी क्ष किरण, रेडिओ व प्रकाशीय संदेश पकडले. त्यातून या घटनेचे बहुतरंगलांबीचे चित्र तयार करता आले. तारा गिळताना या कृष्णविवरातून प्रवाह बाहेर पडले. कृष्णविवर असलेली दीर्घिका 30 कोटी प्रकाशवर्षे दूर आहे, बाकी कृष्णविवरे तीन पट दूर आहे. आंतरराष्ट्रीय पथकाने दीर्घिकेतील प्रकाश वेगळ्या कारणाने दिसत असल्याचे म्हटले होते व तारा गिळण्याशी त्याचा संबंध फेटाळला होता, पण अचानक प्रकाश वाढल्याने तारा कृष्णविवरात अडकल्याने निर्माण झाला होता. वेलझेन यांनी सांगितले की, ताऱ्याच्या अवशेषांपासून बनलेले प्रवाह या घटनेची माहिती देतात. 'जर्नल सायन्स' या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला
 • सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी टी.एस.ठाकूर यांची निवड :
न्यायाधीश एच.एल.दत्तू निवृत्त झाल्याने रिक्त झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी टी.एस.ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे.ठाकूर यांची नियुक्ती एक वर्षासाठी करण्यात आली असून ते 4 जानेवारी 2014 रोजी निवृत्त होणार आहेत. लवकरच ते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून राष्ट्रपती भवनामध्ये पदाची शपथ घेणार आहेत.जम्मू आणि काश्‍मीरच्या उच्च न्यायालयात ठाकूर यांनी आपल्या कारकिर्दीला प्रारंभ केला होता. जम्मू-काश्‍मीरच्या उच्च न्यायालयात 1990 साली त्यांची अतिरिक्त न्यायाधीश म्हणून निवड झाली होती.त्यांनी कर्नाटक आणि दिल्ली येथील उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम पाहिले होते. 2008 पासून ते दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहत होते. तर 2009 साली त्यांची निवड सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी झाली होती.आयपीएल गैरव्यवहार, तसेच स्पॉट फिक्‍सिंगप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या खंडपीठाचे ते नेतृत्त्व करत होते.
 • सिंहस्थ कुंभमेळ्याचा समावेश "युनेस्को"च्या जागतिक वारसा यादीत :
अलाहाबाद, उज्जैन, हरिद्वार व त्र्यंबकेश्‍वर-नाशिक या चार ठिकाणी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा समावेश "युनेस्को"च्या जागतिक वारसा यादीत करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे केंद्र सरकारने तत्त्वतः मान्य केले आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यास लवकरच सुरवात होईल."युनेस्को"कडे प्रस्ताव पाठविल्यानंतर त्याचा निर्णय होण्यासाठी किमान सहा महिने लागतात. सांस्कृतिक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार भारताचा प्रस्ताव अजून तयार करण्यासही सुरवात झालेली नाही. हा प्रस्ताव तयार करून "युनेस्को"कडे जूनच्या आधी पाठवावा लागतो.भारताकडून जून 2016 पर्यंत प्रस्ताव पाठविला गेला आहे.
 • ग्रंथ बाजारपेठेत भारताचा सहावा क्रमांक :
भारतात निरक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक आहे किंवा हल्ली सोशल मीडियामुळे पुस्तक वाचनाचे प्रमाण कमी झाले आहे, अशा तक्रारी कायम होत असतात. मात्र, हा सूर चुकीचा असल्याचे "नेल्सन इंडिया मार्केट"ने केलेल्या पाहणीत दिसून आले. भारतातील पुस्तक बाजाराची उलाढाल 261 अब्ज रुपये आहे, ती 2020 पर्यंत 739 अब्ज रुपयांपर्यंत पोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.जागतिक पातळीवरील ग्रंथ बाजारपेठेत भारताचा सहावा क्रमांक आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे इंग्रजी पुस्तकांबाबत भारत दुसऱ्या स्थानावर आहे."असोसिएशन ऑफ पब्लिशर्स इन इंडिया" आणि "द फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स" या दोन संघटनांनी "नेल्सन इंडिया बुक मार्केट रिपोर्ट 2015 : अंडरस्टॅंडिंग द इंडिया बुक मार्केट" हा अहवाल सादर केला आहे.
 • बीएसएनएल मोबाईलच्या वापरावर शुल्क आकारले जाणार नाही :
गेल्या काही दिवसांपासून चेन्नईसह तमिळनाडूमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) सेवांवर पुढील आठ दिवस कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिली आहे.आजपासून पुढे आठवडाभर बीएसएनएल मोबाईलच्या वापरावर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. शुल्काची तपासणी करणारी स्वयंचलित यंत्रणा पुढील आदेशापर्यंत थांबविण्यात आली आहे.
 • आरबीआय लवकरच मार्गदर्शन तत्त्वे सादर करणार :
बॅंकेचे आधारदर ठरविण्यासाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (आरबीआय) लवकरच मार्गदर्शन तत्त्वे सादर करणार असून त्यामुळे गृह आणि वाहन कर्जदरात कपात करण्यात होण्याची शक्‍यता आहे. परिणामी कर्जाचे हप्ते (ईएमआय) कमी होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.यापूर्वी व्याजदरात केलेल्या कपातीचा लाभ बॅंकांनी ग्राहकांना दिला नसल्याची दखल घेत आरबीआयने आधारदर ठरवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.ही मार्गदर्शक तत्त्वे लागू करताना कर्जांसाठी असलेला आधारदर हा निधी व्यवस्थापनासाठी येणारा खर्च गृहित धरून निश्‍चित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
 • पाकिस्तानपुढे रशियाचा वाहिनीद्वारे नैसर्गिक वायुचा पुरवठा करण्याचा प्रस्ताव :
उर्जेचा मोठा तुटवडा जाणवत असलेल्या पाकिस्तानपुढे रशियाने वाहिनीद्वारे नैसर्गिक वायुचा पुरवठा करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.बदलत्या जागतिक राजकीय समीकरणांच्या पार्श्‍वभूमीवर रशियास युरोपिअन युनियनची बाजारपेठ गमाविण्याच्या असलेल्या भीतीच्या पार्श्‍वभूमीवर हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.या भीतीच्या पार्श्‍वभूमीवर जगातील नैसर्गिक वायुचा दुसरा सर्वांत मोठा उत्पादक देश असलेला रशिया सध्या इतर पर्यायी बाजारपेठांच्या शोधामध्ये आहे. रशियाने यासंदर्भात याआधीच चीनशी अब्जावधी डॉलर्स किंमतीचा करार केला आहे.वर्षाला 2 अब्ज क्‍युबिक फुटांपेक्षाही जास्त नैसर्गिक वायुच्या तुटवड्याचा सामना करत असलेला पाकिस्तान ही रशियासाठी फार मोठी बाजारपेठ ठरण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.याच भागामध्ये भारतास नैसर्गिक वायुचा पुरवठा करण्यासाठी वायुवाहिनी (तापी) बांधण्याचा प्रस्ताव असून ही वाहिनीदेखील तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान व पाकिस्तानमार्गे भारतात प्रवेश करणार आहे.तसेच रशियाने येत्या दोन वर्षांत पाकिस्तानला द्रवरुपातील नैसर्गिक वायुचाही (एलएनजी) पुरवठा करण्याची तयारी दर्शविली आहे. कराची येथून लाहोर येथे एलएनजी पुरवठा करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये याआधीच करार झाला असून या प्रकल्पासाठी रशिया 2 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर 2017 पर्यंत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे.
 • 'टीम ऑफ द इयर'मध्ये कसोटी संघात केवळ रविचंद्रन आश्‍विनला स्थान :
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या 'टीम ऑफ द इयर'मध्ये कसोटी संघात भारताच्या केवळ रविचंद्रन आश्‍विनला स्थान मिळाले आहे.एकदिवसीय संघामध्येही महंमद शमी हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. वर्षभरातील कामगिरीच्या आधारे कसोटी आणि एकदिवसीय संघ निवडला जातो. या संघाची बुधवारी घोषणा झाली.कसोटी संघामध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि पाकिस्तानच्या प्रत्येकी तीन खेळाडूंचा समावेश आहे. न्यूझीलंडच्या दोन खेळाडूंना या संघात स्थान मिळाले. या कसोटी संघाचा कर्णधार म्हणून इंग्लंडच्या ऍलिस्टर कुकची निवड झाली.तसेच एकदिवसीय संघामध्ये निवड झालेला महंमद शमी विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर भारतीय संघातून बाहेरच आहे.अनिल कुंबळे, इयान बिशप, मार्क बाऊचर, बेलिंडा क्‍लार्क आणि गुंडाप्पा विश्‍वनाथ यांच्या समितीने या संघाची निवड केली. या संघासाठी 18 सप्टेंबर 2014 ते 13 सप्टेंबर 2015 या कालावधीतील कामगिरी लक्षात घेतली गेली.
आयसीसीचा कसोटी संघ : डेव्हिड वॉर्नर, ऍलिस्टर कुक (कर्णधार), केन विल्यम्सन, युनूस खान, स्टीव्हन स्मिथ, ज्यो रूट, सर्फराझ अहमद (यष्टिरक्षक), स्टुअर्ट ब्रॉड, ट्रेंट बोल्ट, यासीर शहा, जोश हेझलवूड, आर. आश्‍विन 
आयसीसीचा एकदिवसीय संघ : तिलकरत्ने दिल्शान, हाशिम आमला, कुमार संगाकारा (यष्टिरक्षक), एबी डिव्हिलर्स (कर्णधार), स्टीव्हन स्मिथ, रॉस टेलर, ट्रेंट बोल्ट, महंमद शमी, मिचेल स्टार्क, मुस्तफिझूर रहमान, इम्रान ताहीर, ज्यो रूट. 
 • ऑक्सफॅमचा अहवाल :
जगातील तापमानवाढीस जगातील 10 टक्के श्रीमंतच जबाबदार आहेत कारण ते जीवाश्म इंधने जाळून वातावरणात कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन करीत आहेत व ते प्रमाण कार्बन डायॉक्साईडच्या एकूण प्रमाणाच्या निम्मे आहे, असे ऑक्सफॅम या ब्रिटिश संस्थेने अहवालात म्हटले आहे.ऑक्सफॅमच्या अहवालात श्रीमंत देशांनाच तापमानवाढीस जबाबदार ठरवले आहे. पॅरिस येथील जागतिक हवामान परिषदेत पृथ्वीचे तापमान कुणामुळे वाढले याबाबत तू-तू मैं-मैं सुरू असताना हा अहवाल जाहीर करण्यात आला आहे.संयुक्त राष्ट्रांच्या पॅरिस येथील परिषदेत 195 देश सहभागी आहेत. हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाची जबाबदारी कशी वाटून घेणार, हवामान बदलांना बळी पडत असलेल्यांना देशांची मदत कशी करणार, असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत. ऑक्सफॅमच्या हवामान धोरणाचे प्रमुख टिम गोर यांनी सांगितले की, श्रीमंत लोक किंवा देशांनाच कार्बन उत्सर्जनास जबाबदार धरले पाहिजे मग ते कुठेही राहात असोत.
 • मार्क झकरबर्ग यांनी आपले 99 टक्के शेअर मानवतेच्या कार्यासाठी केले दान :
फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्ग यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. सगळे जग आपली कन्या मॅक्झिमा व इतर मुलांच्या भल्यासाठी झकरबर्ग व त्यांच्या पत्नीने कंपनीच्या त्यांच्याकडे असलेल्या समभागांपैकी 99 टक्के भाग (शेअर) मानवतेच्या कार्यासाठी दान देण्याचे ठरविले आहे. या समभागांची किंमत 45 अब्ज अमेरिकी डॉलर्स आहे.लहान मुलांसाठी हे जग आनंददायी बनावे यासाठी फेसबुकचे 99 टक्के भाग आम्ही मानवतेसाठीच्या कार्याला देत आहोत, या समभागांची किंमत 45 अब्ज डॉलर्स आहे. रोखे व विनिमय आयोगाच्या माहितीनुसार येत्या तीन वर्षांत दरवर्षी 1 अब्ज डॉलर्सचे भाग विकले किंवा देणगी म्हणून दिले जातील.पत्नी चॅन झकरबर्ग यांच्या पुढील पिढीतील मानवी क्षमता व समानता वाढीसाठी मुलांवर निधी खर्च करण्याच्या योजनेस मार्क यांनी पाठिंबा दिला असून त्यासाठी ते निधी देणार आहेत. संस्थेकडील समभागांवर मार्क यांचे मतदानाचे हक्क कायम राहणार आहेत.
 • शीतलचा आर्टीका व अंटार्टिका या दोन्ही ध्रुवांवर पॅराजम्पिंग करण्याचा पराक्रम :
शीतल महाजन या महाराष्ट्रीय महिला खेळाडूने पॅराजम्पिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखदार कामगिरी केली आहे. पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आलेल्या शीतलने आर्टीका व अंटार्टिका या दोन्ही ध्रुवांवर पॅराजम्पिंग करण्याचा पराक्रम केला आहे.पॅराजम्पिंगचा हा असा थरार करणारी ती पहिलीच भारतीय महिला आहे.शीतलच्या नावावर पाच विश्वविक्रम, 14 राष्ट्रीय विक्रमांची नोंद असून तिने आजवर 664 हून अधिक जम्प्स केले आहेत.शीतल महाजनला उत्तर ध्रुवावर तब्बल 24 हजार फूटांवरून पॅराजम्पिंग करताना सामोर आलेली आव्हानं, संपूर्ण तयारी आणि अनुभवांची चित्रफीत सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाली आहे.

 • स्मार्ट सिटी'चा साडेतीन हजार कोटी रुपयांचा आराखडा जाहीर

'स्मार्ट सिटी'चा साडेतीन हजार कोटी रुपयांचा आराखडा मंजूर :

वाहतूक, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापन, ई-गव्हर्नन्स, पाण्याचा पुनर्वापर आदींसाठी तंत्रज्ञानाचा अंगीकार करून शहराचे रूप पालटण्यासाठी महापालिकेने तयार केलेला 'स्मार्ट सिटी'चा सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांचा आराखडा स्थायी समितीने मंजूर केला.
वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी विविध उपाययोजना करतानाच पाणीपुरवठा, मलनिस्सारण आदी सुविधांवरही भर देण्यात आला आहे. तसेच बाणेर, बालेवाडी आणि औंध क्षेत्र विकासासाठी सुमारे 1300 कोटी रुपयांच्या उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात पहिल्या टप्प्यात पुण्याची निवड झाली आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या 20 शहरांत पुण्याची निवड व्हावी, यासाठी आराखडा तयार झाला आहे.
अश्‍विनी कदम यांच्या अध्यक्षतेखालील स्थायी समितीने हा आराखडा मंजूर केला. आता सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन राज्य सरकारमार्फत येत्या 15 डिसेंबरपर्यंत केंद्र सरकारला हा आराखडा सादर करण्यात येणार आहे.

स्मार्ट सिटीचा आराखडा :

पॅन सिटी उपाययोजना  वाहतूक आणि गतिशीलतास्मार्ट सार्वजनिक वाहतूक  (आयटीएमएस व्यवस्था, बसथांब्यांची सुधारणा, वायफाय सुविधा, वाहनांची देखभाल आदी) : 140 ते 160 कोटी रुपयेवाहतूक नियंत्रण (केंद्रीय नियंत्रण कक्ष, ट्रॅफिक लाइट आदी) : 90 ते 145 कोटीस्मार्ट वाहनतळ (मल्टिलेव्हल पार्किंग) : 35 ते 40 कोटीदेखभाल-दुरुस्ती व सातत्यपूर्ण उपक्रम : 275 ते 290 कोटी

पाणीपुरवठा व मलनिस्सारण :

शहराच्या सर्व भागांत 24 तास पाणीपुरवठा करणे : 355 ते 375 कोटीसांडपाणी प्रक्रिया केंद्रातून ऊर्जानिर्मिती : 5 ते 10 कोटीदेखभाल-दुरुस्ती : 60 ते 65 कोटी

क्षेत्रनिहाय विकास योजना :

नदीसुधारणा : 120 ते 140 कोटीस्मार्ट ग्रीड व सौरऊर्जा : 260 ते 280 कोटीस्मार्ट मीटरिंग (पिण्याच्या पाण्यासाठी) : 20 ते 25 कोटीपाण्याचा पुनर्वापर व पर्जन्य जलसंचय : 80 ते 90 कोटीघनकचरा व्यवस्थापन : 10 ते 15 कोटीई-गव्हर्नन्स (आयटी कनेक्‍टिव्हिटी) : 20 ते 25 कोटीरस्त्यांचे सुसूत्रीकरण (पदपथांची संख्या वाढविणे, सायकल ट्रॅक तयार करणे आदी) : 190 ते 210 कोटीझोपडपट्टी क्षेत्रातील सामाजिक व आर्थिक विकास : 5 ते 10 कोटीवाहनतळ, बीआरटी, ई-रिक्षा, इलेक्‍ट्रिक बस आदींसाठी : 510 ते 550 कोटी

एकूण देखभाल :

दुरुस्ती व सातत्यपूर्ण उपक्रम : 1050 ते 1100 कोटीएकूण आराखडा 3225 ते 3480 कोटीकेंद्र सरकारकडून पाच वर्षे मिळणारा एकूण निधी : 500 कोटीराज्य सरकारकडून पाच वर्षांसाठी मिळणारा निधी : 250 कोटीमहापालिकेचा पाच वर्षांचा हिस्सा : 250 कोटी
 • जगातील 200 सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये भारतातील 16 विद्यापीठे :

जगातील 200 सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये भारतातील 16 विद्यापीठे आणि तंत्रसंस्थांचा समावेश आहे "इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स"नंतर अनेक आयआयटी आपले स्थान टिकवून आहेत. काही आयआयटींचा नव्याने समावेश झाला आहे. गतवर्षी 25 व्या क्रमांकावर असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे स्थान वधारले असून ते 16 व्या क्रमांकावर आले आहे.पुण्याचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ 129 व्या क्रमांकावर आहे. मुंबई विद्यापीठाचा या यादीत समावेश नाही.टाइम हायर एज्युकेशन ब्रिक्‍स आणि इमर्जिंग इकॉनॉमिक्‍स यांनी हे रॅंकिंग जाहीर केले आहे.13 निकषांवर या विद्यापीठांची गुणवत्ता ठरवली जाते. यासाठी अध्यापन, संशोधन, आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन, उद्योगांकडून येणारे उत्पन्न आदी निकष लावले जातात.परथम आणि द्वितीय क्रमांकावर असलेल्या चीनच्या अनुक्रमे पेकिंग आणि त्सिंगुहा विद्यापीठांनी आपले स्थान गतवर्षीप्रमाणेच अबाधित ठेवले आहे.इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सनंतर देशातील अनेक आयआयटींचा समावेश या रॅंकिंगमध्ये झाला आहे. मुंबई आयआयटीचे स्थान गतवर्षी 37 वे होते, ते यंदा 29 वे आहे.मद्रास आणि दिल्ली आयआयटीने यंदा अनुक्रमे 36, 37 क्रमांकांवर बाजी मारली आहे. खरगपूर आयआयटी दुसऱ्या क्रमांकावरून घसरून 45 व्या क्रमांकावर गेली आहे. पंजाब विद्यापीठ यंदा 121 व्या क्रमांकावर घसरले आहे. गतवर्षी ते 39 व्या क्रमांकावर होते.

💎ब्रिटनमधील कोहिनूर हिऱ्यावर आता पाकिस्तानकडून हक्क :

 • न्यायमूर्ती तीरथसिंह ठाकूर यांची 43वे सरन्यायाधीश म्हणून शपथ :

सर्वोच्च न्यायालतील सर्वात ज्येष्ठ असलेले न्यायमूर्ती तीरथसिंह ठाकूर यांनी 43वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली.राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये आयोजित छोटेखानी समारंभात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.सरन्यायाधीश एच. एल. दत्तू हे बुधवारी निवृत्त झाले.न्या. ठाकूर यांचा जन्म 4 जानेवारी 1952 रोजी झाला असून ते 4 जानेवारी 2017 रोजी सेवानिवृत्त होतील. त्यांच्याकडे वर्षापेक्षा थोडा जास्त काळ सरन्यायाधीशपदाचा कार्यभार राहील.न्या. ठाकूर यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने स्पॉट फिक्सिंग आणि आयपीएलमधील सट्टेबाजी आणि भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट नियामक असलेल्या बीसीसीआयमध्ये सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिला होता.

 • स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस हिने नऊ स्पर्धा जिंकल्या :
भारतीय स्टार सानिया मिर्झाच्या सोबतीने स्वित्झर्लंडची तज्ज्ञ खेळाडू मार्टिना हिंगीस हिने यंदाच्या सत्रात महिला दुहेरीत नऊ स्पर्धा जिंकल्या.बीजिंग, वुहान, ग्वांगझू, अमेरिकन ओपन, विम्बल्डन, चार्ल्सटन, मियामी तसेच इंडियन वेल्स असे पाठोपाठ जेतेपद पटकविण्यात ही जोडी यशस्वी ठरली.

 • तामिळनाडूतील पूरग्रस्ताना एक हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा :
तामिळनाडूतील पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत व पुनर्वसन कामांसाठी तातडीने एक हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली.मदतकार्य सुरू ठेवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे एक हजार कोटी रुपयांची रक्कम तत्काळ जारी करण्यात येईल. केंद्राने यापूर्वी जाहीर केलेल्या 940 कोटींच्या रकमेव्यतिरिक्तही रक्कम असेल, असे मोदी यांनी येथील 'आयएनएस अडय़ार' या नौदल तळावर सांगितले.
 • अंतराळ संशोधनात स्वीटी पाटेची झेप :
कल्पना चावला आणि सुनीता विल्यम या महिलांनी अंतराळ क्षेत्रात मोलाची कामगिरी केल्यानंतर आता त्यात भर पडली आहे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावच्या स्वीटी पाटे या तरुणीची.अंतराळ संशोधकांच्या रांगेत चाळीसगावची स्वीटी पाटे ही जगातील एकमेव महिला ठरली आहे. स्टड्ढॅटोस – २ प्लस या रॉकेट संशोधनात तिने मोलाचा वाटा उचलला आहे. स्वीटी पाटे हिच्या या संशोधनकार्यामुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे.यूरोपियन विद्यापीठाच्या एअरोस्पेस अभियंत्रिकी विद्यार्थ्यांच्या ४० जणांच्या टीमने हे रॉकेट विकसित केले असून त्यात स्वीटी ही एकमेव महिला होती. हे रॉकेट स्पेनच्या स्पॅनिश स्पेस एजन्सीतून शुक्रवारी रात्री ८ वाजता यशस्वीपणे अवकाशात झेपावले असून त्याची नोंद जगभराने घेतली आहे. या यशस्वी प्रयोगामुळे स्वीटीने जागतिक विक्रमाची नोंद केली आहे.
 • दिल्ली सरकारचे नवे मोबाईल ऍप : 
आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील सरकारने शहरातील बेघरांना शोधण्यासाठी नवे मोबाईल ऍप तयार केले असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात हे "ऍप" कार्यान्वित करण्यात आली आहे.दिल्लीतील थंडीमुळे बेघरांचा मृत्यू रोखण्यासाठी सरकारने अशा लोकांसाठी रात्रीची आश्रयस्थाने सुरु केली आहेत. अशाप्रकारची एकूण 190 आश्रयस्थाने आणि 40 तंबू उभारण्यात आले आहेत. त्याद्वारे एकूण 19 हजार जणांना रात्रीचा निवारा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच अशा लोकांचा शोध घेण्यासाठी दिल्ली नागरी निवारा सुधारणा मंडळाने (डीयुएसआयबी) ऍप तयार केले आहे.नागरिकांना आढळून येणाऱ्या बेघर व्यक्तींचे मोबाईल फोनद्वारे फोटो काढण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. नागरिकांनी काढलेले फोटो अपलोड करण्याची सुविधा ऍपमध्ये देण्यात आली आहे.हे ऍप डीयुएसआयबीच्या सर्व्हर्सना जोडलेली असल्याने संबंधित फोटो अपलोड केलेले ठिकाण स्वयंचलित यंत्रणेद्वारे नोंद होणार आहे. त्यानंतर जवळच्या बचावपथकाला संबंधित बेघर व्यक्तीला निवारा देण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत.
 • लोह खनिज उत्खनन लीजवर देण्यासाठी "ई-लिलाव" प्रक्रिया : 
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार "क" प्रतीचा लोह खनिज उत्खनन लीजवर देण्यासाठी "ई-लिलाव" प्रक्रिया राबविणारे कर्नाटक देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे.ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी राज्य सरकारने 1 फेब्रुवारी 2016 ही तारीख निश्‍चित केली आहे केंद्र सरकारने खाण आणि खनिज (विकास व नियमन) कायदा 1957 मध्ये सुधारणा केल्यानंतर लोह खनिज लीजसाठी लिलाव करण्याचा पहिला निर्णय कर्नाटकने घेतला आहे.तसेच कायद्यातील सुधारणेत नैसर्गिक स्रोतांच्या उत्खननासाठी ई-लिलाव बंधनकारक केला आहे. राज्यातील "क" प्रतीच्या लोह खनिज उत्खनन लीजचे पुनर्वाटप स्टील व तत्सम उद्योगांना करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने 31 महिन्यांपूर्वी राज्य सरकारला दिले होते. त्यानंतर आता खाण व भूगर्भशास्त्र विभागाने बळ्ळारी व चित्रदुर्गमधील अशा 51 पैकी 11 खाणींसाठी ई-लिलाव प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या 11 खाणींमध्ये एकूण 127 दशलक्ष टन लोहखनिज साठा आहे.कर्नाटकातील बेकायदा खनिज उत्खनन प्रकरणाची अंतिम सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने "क" प्रतीच्या लोह खनिजाची 51 लीज रद्द करून पारदर्शक लिलावाद्वारे पुनर्वाटप करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सरकारी मालकीची कंपनी मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन लि. 9 ते 11 फेब्रुवारीला ई-लिलाव प्रक्रिया राबविणार आहे. त्यासाठी आर्थिक व तांत्रिक निविदा ऑनलाइन भराव्या लागणार आहेत; पण मुख्य कंपन्यांच्या सहयोगी कंपन्यांना लिलावात भाग घेता येणार नाही.
 • दार्जिलिंगची "टॉय ट्रेन" पुन्हा एकदा सुरू होणार :
चहाच्या मळ्यांमधून धावणारी दार्जिलिंगची जगप्रसिद्ध "टॉय ट्रेन" पाच वर्षांच्या खंडानंतर पुन्हा एकदा सुरू होणार आहे.दार्जिलिंगची ही प्रसिद्ध "टॉय ट्रेन" तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये पाहिली असेल. मात्र, 2010 मध्ये दरड कोसळल्यामुळे कुर्सियांग ते न्यू जलपायगुडी दरम्यानची ही सेवा बंद करण्यात आली होती. या ट्रेनमधून सफर करण्याचा मोह सर्वांनाच होतो. गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेली ही ट्रेन लवकरच सुरू होणार आहे दरड कोसळल्यामुळे रेल्वे रुळांचे नुकसान झाले होते. त्यामुळे 2010 पासून कुर्सियांग ते न्यू जलपायगुडी दरम्यानची "टॉय ट्रेन"ची सेवा बंद ठेवण्यात आली होती.
 • जनलोकपाल विधेयक मंजूर :
दिल्ली विधानसभेत आज बहुचर्चित जनलोकपाल विधेयक मंजूर करण्यात आले, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुचविलेल्या दोन सुधारणांचा समावेश करत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सुधारित विधेयक सादर केल्यानंतर ते बहुमताने मंजूर करण्यात आले.या विधेयकायमुळे भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन होईल, असा विश्‍वास केजरीवाल यांनी व्यक्त केला; परंतु या विधेयकास अद्याप नायब राज्यपाल आणि संसदेचीही मंजुरी मिळणे बाकी आहे.
 • सायना नेहवालचे 'सर्वोत्कृष्ट बॅडमिंटन'पटू पुरस्काराच्या यादीत नामांकन :
स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला यंदा विश्व बॅडमिंटन महासंघाच्या वर्षातील 'सर्वोत्कृष्ट बॅडमिंटन'पटू पुरस्काराच्या यादीत नामांकन मिळाले आहे.सध्या दुसऱ्या स्थानावर असलेली सायना काही वेळ जगात अव्वल स्थानावर होती हे विशेष. या पुरस्काराच्या चढाओढीत सायनासोबत अव्वल स्थानावर विराजमान असलेली स्पेनची कॅरोलिना मारिन, चीनची झाओ युन्लेई आणि चाओ यिक्सिन यांचा समावेश आहे.विजेत्या खेळाडूच्या नावाची घोषणा 7 डिसेंबर रोजी दुबईत होणाऱ्या दुबई विश्व सुपरसिरिज फायनन्सदरम्यान केली जाईल.
 • 'स्वच्छ भारत' अभियानासाठी बिल गेट्स यांचा मदतीचा हात :
'स्वच्छ भारत' अभियानासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांनीदेखील केंद्र सरकारला मदतीचा हात देऊ केला आहे.नागरी विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांच्यासमवेत झालेल्या प्रदीर्घ चर्चेत त्यांनी देशातल्या शहरी भागांत आरोग्य सुविधा उभारण्यासाठी केंद्राला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले गेट्स यांनी स्थापन केलेल्या 'बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन'ने जानेवारीमध्ये नागरी विकास विभागाशी सहकार्य करार केला होता.
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची स्वाक्षरी लंडनमधील स्मारकात लवकरच झळकणार :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 115 वर्षांपूर्वी प्राथमिक शाळेत प्रवेश घेताना मोडी लिपीत केलेली स्वाक्षरी लंडनमध्ये होणाऱ्या त्यांच्या स्मारकात लवकरच झळकणार आहे.दि. 7 नोव्हेंबर 1900 रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा हायस्कूल (सध्याचे छ. प्रतापसिंह हायस्कूल) येथे प्रवेश घेतेवेळी मोडी लिपीत केलेली स्वाक्षरी 1 हजार 114व्या क्रमांकावर शाळेच्या रजिस्टरला आजही पाहायला मिळते.ही नोंद आज अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. याचे कारण, या स्वाक्षरीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा केवळ शाळाप्रवेशच झाला नाही, तर ती एक युगांतराची सुरुवात होती ज्या स्वाक्षरीने डॉ. आंबेडकरांचा ज्ञानाच्या अवकाशामध्ये प्रवेश झाला होता, ती स्वाक्षरी आता केवळ साताऱ्यापुरती मर्यादित राहिली नसून, सातासमुद्रापार लंडनला निघाली आहे.
 • देशातील शेतकऱ्यांना भूआरोग्यपत्रे देण्याची येतील :
जमीन अधिकाधिक कसदार करण्यास सरकार बांधील असल्याचे अधोरेखित करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, शनिवारपासून देशातील शेतकऱ्यांना भूआरोग्यपत्रे (सॉइल हेल्थ कार्ड) देण्याची येतील, असे जाहीर केले.जागतिक भूदिनानिमित्त जमीन अधिकाधिक कसदार करण्याच्या आमच्या बांधीलकीशी ठाम असल्याचा निर्धार करू या, भूआरोग्य उत्तम असल्यास शेतकऱ्यांना अधिक धन मिळेल, असे मोदी यांनी ट्वीट केले आहे.शनिवारपासून यासाठी देशव्यापी पुढाकार घेण्यात येत असून, शेतकऱ्यांना भूआरोग्यपत्रे देण्यात येणार आहेत.भूआरोग्य सुधारावे यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा एक भाग म्हणून भूआरोग्यपत्रे देण्यात येणार आहेत आणि जमिनीशी निगडित प्रश्नांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे, असेही ते म्हणाले.गेल्या फेब्रुवारी महिन्यात मोदी यांनी राजस्थानमधील सुरतगड येथे ही योजना सुरू केली. जमिनीच्या खालावलेल्या दर्जाला आळा घालणे आणि शेतमालाचे उत्पादन वाढविणे हे त्यामागील उद्दिष्ट होते. देशातील सर्वच्या सर्व म्हणजे 14.5 कोटी शेतकऱ्यांना पुढील तीन वर्षांत भूआरोग्यपत्रे दिली जाणार आहेत.
 •  नितीशकुमार बिहार चे मुख्यमंत्री

लोकसभा निवडणुकीतील जिव्हारी लागणाऱ्या पराभवातून सावरत महागठबंधन आघाडीची मोट बांधून बिहार विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळविणारे संयुक्त जनता दल पक्षाचे (JDU) नेते नितीशकुमार यांनी २० नोव्हेंबर २०१५ रोजी बिहारचे ३५ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.जीवनपट:-जन्म:-१ मार्च १९५१ रोजी बख्तियापूर (बिहार) येथे (नितीशकुमार यांचे वडील स्वतंत्र्यसेनानी होते.)- नितीशकुमार हे 'एनआयटी पटना' (पूर्वीचे बिहार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पटना) मधून विद्युत अभियांत्रीकीचे पदवीधारक आहेत. त्यांनी भारतीय अभियांत्रिकी सेवेंतर्गत (IES) बिहार राज्य विद्युत मंडळामध्ये काही काळ काम केले.- १९७४ ते ७७ दरम्यान नितीशकुमार जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात सहभागी झाले होते. १९७७ साली त्यांनी जनता पक्षाच्या तिकिटावर पहिल्यांदा बिहार विधानसभेची निवडणूक लढली. मात्र त्यांना अपयश आले. सलग दोनदा पराभवाची चव चाखल्यानंतर १९८५ मध्ये पहिल्यांदा बिहार विधानसभेचे आमदार झाले.नितीशकुमार यांनी १९८९ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर आपले लक्ष दिल्लीवर केंद्रित केले. त्यानंतर त्यांनी १९९१, १९९६, १९९८ आणि १९९९ मध्येही लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला.केंद्रीय मंत्रिपदे:-कृषिराज्यमंत्री(१९९०), रेल्वेमंत्री व रस्ते वाहतूक मंत्री (१९९८-९९) (पश्चिम बंगालमध्ये १९९९ मध्ये झालेल्या रेल्वे अपघातानंतर त्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.), कृषिमंत्री (१९९९-२००० व २०००-०१), रेल्वेमंत्री (२००१-२००४)बिहारचे मुख्यमंत्री:-२९ वे (३ मार्च ते १० मार्च २०००); ३१ वे (नोव्हेंबर २००५- नोव्हेंबर २०१०); ३२ वे ( नोव्हेंबर २०१० ते मे २०१०); ३४वे (२२ फेब्रुवारी २०१५ ते आजपर्यंत.)राजकीय प्रवास:१९९४ मध्ये लालूप्रसाद यादव यांनी पक्षाध्यक्षपदी शरद यादव यांना पुढे केल्यानंतर नितीशकुमार आणि जॉर्ज फर्नांडीस यांनी जनता दलास सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर त्यांनी समता पक्षाची स्थापना केली.याच पक्षाने १९९६ मध्ये भाजपसोबत हात मिळवणी केली होती. पुढे शरद यादव यांनी नमती भूमिका घेतल्यामुळे शरद यादव यांचा जनता दल, समता पक्ष आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांचा लोकशक्ती पक्ष एकत्र येऊन २००३ मध्ये संयुक्त जनता दलाची स्थापना करण्यात आली. पुढे भाजप आणि संयुक्त जनता दलाने एकत्र येत २००५ मध्ये लालू-राबडी यांची राजवट संपूष्टात आणली. तेव्हापासून नितीशकुमार बिहार राजकारणाचे चाणक्य समजले जाते
 • भारताला जागतिक हॉकीतील पहिले पदक जिंकण्यात यश :
भारतीय हॉकी संघाने इतिहास घडविला. भारताने मॉस्को ऑलिंपिकनंतर जागतिक हॉकीतील पहिले पदक जिंकण्यात यश मिळविले. भारताने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नेदरलॅंडस्‌ला हरवून वर्ल्ड हॉकी लीगमध्ये ब्रॉंझपदक जिंकण्याचा पराक्रम केला. रायपूरच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवरील या लढतीत भारत मध्यांतरास, अर्थात दुसऱ्या सत्रानंतर 0-2 पिछाडीवर होता; पण त्यानंतर भारताने जबरदस्त प्रतिकार करीत 3-2, 5-3 आघाडी घेतली. केवळ पाच सेकंद बाकी असताना नेदरलॅंडस्‌ने 5-5 बरोबरी साधली. मग गोलरक्षक पीआर श्रीजेशने अप्रतिम कामगिरी करताना भारतास पेनल्टी शूटआउटमध्ये 3-2 असे विजयी केले.
 • भारत-पाकिस्तान दरम्यान एनएसए पातळीवरील बोलणी :
भारत-पाकिस्तान दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या (एनएसए) पातळीवरील बोलणी थायलंडची राजधानी बॅंकॉक येथे झाली. दोन्ही देशांचे परराष्ट्र सचिवदेखील या बैठकीत सहभागी होते. बैठकीबाबत जारी केलेल्या संयुक्त प्रसिद्धिपत्रकानुसार उभय प्रतिनिधींनी विविध मुद्‌द्‌यांवर चर्चा करीत दोन्ही देशांमधील संबंध आणखी दृढ करण्यावर पॅरिस येथे दोन्ही देशांच्या पंतप्रधानांदरम्यान झालेल्या अनौपचारिक चर्चेची फलनिष्पत्ती म्हणूनच या बैठकीकडे पाहिले जात आहे. यासंदर्भातील संयुक्त प्रसिद्धिपत्रकात भेट व चर्चा सौहार्दपूर्ण आणि सहकार्याच्या वातावरणात पार पडल्याचे नमूद करण्यात आले आहे. शांततापूर्ण, स्थिर व समृद्ध दक्षिण आशियाची कल्पना बाळगणाऱ्या उभय देशांच्या नेत्यांच्या मार्गदर्शनातूनच ही बैठक झाली आणि हा सकारात्मक संपर्क यापुढेही चालू ठेवण्याचे मान्य करण्यात आल्याचे पत्रकात म्हटले आहे.
 पॅरिस येथे 30 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची हवामान बदलविषयक शिखर परिषदेच्या निमित्ताने भेट झाली होती आणि त्यानंतर त्याच मालिकेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचीही भेट झाली आहे. चर्चेतील मुद्दे : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान शांतता व सुरक्षा, दहशतवाद, जम्मू आणि काश्‍मीर आणि नियंत्रण रेषेवर शांतता-पालनासह इतरही अनेक मुद्‌द्‌यांवर चर्चा झाली.

 • एकाच योजनेतून सर्व प्रकारचे विमा संरक्षण पुरविले जाणार :
देशातील शेती व शेतकऱ्यांशी संबंधित विविध घटकांसाठी एकाच योजनेतून सर्व प्रकारचे विमा संरक्षण पुरविणारी केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना तयार झाली आहे.
 मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी ही योजना सादर करण्यात आली असून, आगामी मंत्रिमंडळ बैठकीत तिच्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. येत्या खरिपात महाराष्ट्रातील दोन, तर देशातील 45 जिल्ह्यांमध्ये ही योजना पथदर्शी स्वरूपात आणि त्यानंतर सरसकटपणे राबविण्याचे नियोजन आहे.
 देशातील सर्व कृषिमंत्री, कृषी सचिव, शेतकरी नेत्यांच्या बैठका घेऊन सर्वसमावेशक योजना तयार केली आहे. सध्याच्या विमा योजनेत फक्त दुष्काळापासून संरक्षण आहे. आग, पूर, अतिवृष्टी आदी विविध प्रकारच्या आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीचा त्यात समावेश नाही. नवीन योजनेत सर्व प्रकारच्या आपत्तींमुळे होणाऱ्या पिके, शेतकरी, शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्य, त्याची सर्व प्रकारची मालमत्ता, यंत्रे, अवजारे, गोडाऊन, जमीन या सर्वांना संरक्षण देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या विमा योजनांची गरज भासणार नाही. सर्व प्रकारचे विमा संरक्षण या एकाच योजनेतून देण्यात येईल. देशभर त्यासाठीचा विमा हप्ता सर्वसमान असेल. लहान राज्यांसाठी एका कंपनीवर, तर मोठ्या राज्यांसाठी विभागून दोन किंवा तीन कंपन्यांवर विम्याची जबाबदारी सोपविण्यात येईल. संबंधित कंपनीवर सलग किमान तीन वर्षांसाठी योजनेची जबाबदारी राहील. या काळात योजनेची जबाबदारी त्यांना टाळता येणार नाही किंवा अर्ध्यातच सोडता येणार नाही. विमा सरसकट सर्व शेतकऱ्यांसाठी बंधकारक असेल. त्याचा विमा हप्ताही अतिशय कमी ठेवण्यात आला आहे. नुकसानभरपाईसाठी आपत्तिग्रस्त भागात प्रत्यक्ष पाहणी करून व पीककापणी प्रयोगांनुसार भरपाई मिळेल. तसेच पारंपरिक पद्धत आणि हवामानाधारित विमा या दोन्हींचाही यात समावेश आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर पुढील महिन्यात या योजनेची अधिकृत घोषणा करण्यात येईल.

 • "वाय-फाय लव्हस्टोरी" या पुस्तकाचे प्रकाशन :

"स्टार विन्स पब्लिकेशन्स"तर्फे युवा लेखक चरणराज लोखंडे यांनी लिहिलेल्या "वाय-फाय लव्हस्टोरी" या पुस्तकाचे प्रकाशन कोलते यांच्या हस्ते झाले.
 • 'बुक माय स्पोर्ट्स' ही नवी वेबसाईट बनविण्यात आली :
भारतात प्रथमच खास क्रीडा क्षेत्रासाठी 'बुक माय स्पोर्ट्स' ही नवी वेबसाईट बनविण्यात आली असून, भारताचा फिरकीपटू हरभजनसिंगच्या हस्ते या वेबसाईटचे अनावरण करण्यात आले आहे.
 भारतातील क्रीडा क्षेत्रात घडत असलेल्या घडामोडींबद्दल सामान्य नागरिक अनभिज्ञ असतात. नागरिकांचे क्रीडा क्षेत्राशी नाते जोडण्याच्या उद्देशाने 'बुक माय स्पोर्ट्स' ही वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्रातील संधी, विविध स्पर्धा, माहिती असे सर्वकाही या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे. तसेच या वेबसाईटवर फुटबॉल, जलतरण, व्हॉलीबॉल, क्रिकेट, टेनिस, बास्केटबॉल या प्रमुख खेळांना महत्त्व देण्यात आले आहे. याबरोबरच 'बुक माय स्पोर्ट्स'वर खेळांसंबंधी सर्वप्रकारची माहिती उपलब्ध असणार आहे.
 • ⌚जागतिक मृदा दिनी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका वाटप :
जागतिक मृदा दिनी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका वाटप करण्यात येत आहे.
 यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर असून, 12 लाख शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका वाटप करण्यात येणार आहे. त्या पाठोपाठ आंध्रप्रदेशातील 8 लाख तसेच तामिळनाडूतील 7 लाख शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकेचे वाटप केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी उद्योगाला गती देण्यासाठी शाश्वत शेतीचा मार्ग स्वीकारला असून, यासाठीच केंद्र व राज्य शासनाच्या सहयोगाने राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत मृदा आरोग्य पत्रिका ही योजना सन 2015-16 पासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत देशातील विविध राज्यातील शेतीचे माती परीक्षण करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि दापोली कोकण कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली तालुक्यातील साखरोली येथे जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून मृदा आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले.
 • काही महत्वाचे :

 1. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने युआन या चलनाला पाचव्या राखीव चलनाचादर्जा दिला. युआन चलनास पाचवे राखीव चलन म्हणून ‘स्पेशल ड्राइंग बास्केट’मध्ये स्थान मिळाले आहे. अमेरिकेचा डॉलर, ब्रिटनचा पाउंड, युरोपीय समुदायाचा युरो, जपानचा येन ही आधीची चार राखीव चलने आहेत
 2. भारताचा माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे याने मुंबई इंडियन्सच्या मेंटॉरपदाचा राजीनामा दिला आहे. मेंटॉर म्हणून त्याच्या पहिल्या वर्षी २०१३ मध्ये मुंबईने आयपीएल आणि चॅंपियन्सलीगचे विजेतेपद मिलविले. त्यानंतर २०१५ मध्ये पुन्हा मुंबई आयपीएलचे विजेते ठरले
 3. संयुक्त अरब अमिरातीचा प्रमुख स्ट्रायकर अहमद खलील याची आशियातील या वर्षीचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून निवड करण्यात आली
 4. पहिल्यावहिल्या दिवस-रात्र कसोटी क्रिकेट सामन्याचा निकालही तीन दिवसांतच लागला. वेगवान गोलंदाजांनी वर्चस्व राखलेल्या सामन्यात अखेर पीटर सीडलने विजयी धाव घेऊन ऑस्ट्रेलियाच्याविजयावर शिक्कामोर्तब केले. तीन गडी राखून ऑस्ट्रेलियाने तिसरी कसोटी जिंकत मालिका २-० अशी जिंकली. न्यूझीलंड २००३ नंतर प्रथमच एखाद्या मालिकेत पराभूत झाले.
 5. विमा क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक मर्यादा वाढीच्या सरकारच्या धोरणाला कॅनेडियन सन लाइफ फायनान्शिअलने प्रोत्साहन देऊ केले आहे. कंपनीने तिची पूर्वीपासून भागीदार असलेल्या बिर्ला सन लाइफ इन्शुरन्समधील हिस्सा २६ वरून ४९ टक्क्यांपर्यंत नेण्याची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी १,६६४ कोटी रुपये मोजण्यात आले . बिर्ला समूहाची सन लाइफबरोबरची भागीदारी १९९९ पासून आहे. याच भागीदारीतून बिर्ला समूहाने आयुर्विमा तसेच म्युच्युअल फंड व्यवसायात २००१ मध्ये शिरकाव केला.
 6. रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षातील पाचवे द्वैमासिक पतधोरण जाहीर केले असून व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो दर ६.७५ टक्के तर रोख राखीवता प्रमाण (सीआरआर) देखील ४ टक्के असे स्थिर ठेवण्यात आले
 7.  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार "क‘ प्रतीचा लोह खनिज उत्खनन लीजवर देण्यासाठी "ई-लिलाव‘ प्रक्रिया राबविणारे कर्नाटक देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे. ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी राज्य सरकारने 1 फेब्रुवारी 2016 ही तारीख निश्चिऱत केली
 8. नेल्सन इंडिया मार्केट‘ने केलेल्या पाहणीत दिसून आले. भारतातील पुस्तक बाजाराची उलाढाल 261 अब्ज रुपये आहे, ती 2020 पर्यंत 739अब्ज रुपयांपर्यंत पोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. जागतिक पातळीवरील ग्रंथ बाजारपेठेत भारताचा सहावा क्रमांक आहे तर इंग्रजी पुस्तकांबाबत भारत दुसऱ्या स्थानावर आहे
 9. अलाहाबाद, उज्जैन, हरिद्वार व त्र्यंबकेश्व र-नाशिक या चार ठिकाणी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा समावेश "युनेस्को‘च्या जागतिक वारसा यादीत करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे केंद्र सरकारने तत्त्वतः मान्य केले
 10. देशात सहा नव्या "इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉ्लॉजी‘ (आयआयटी) सुरू करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने तत्त्वतः मान्यता दिली. गोवा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, जम्मू, केरळ आणि कर्नाटकमध्ये या"आयआयटी‘ सुरू होतील.
 11. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या ‘टीम ऑफ द इयर‘मध्ये कसोटी संघात भारताच्या केवळ रविचंद्रन आश्वि्नला स्थान मिळाले आहे. एकदिवसीय संघामध्येही महंमद शमी हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. वर्षभरातील कामगिरीच्या आधारे कसोटी आणि एकदिवसीय संघ निवडला जातो
 12. केरळ सरकार कोल्लम जिल्ह्यात चादायमंगलमया ठिकाणी जटायू पार्क साकारतंय
 13. मेगापार्क65 एकर परिसरात उद्यानाची व्याप्ती200 फूट जटायूच्या मूर्तीची लांबी150 फूट मूर्तीची रूंदी15 हजार स्क्वेअर फूट मूर्तीच्या तळव्याचा विस्तार
 14. महाराष्ट्र सरकारने कामगार कायद्यात प्रस्तावित केलेल्या बदलांना केंद्र सरकारने मंजुरी दिली यापूर्वी विद्युतपुरवठा असलेल्या कारखान्यात 10 कामगार असतील, तर तेथे कामगार कायदा लागू करण्यात येत असे, आता हा आकडा 20 वर नेण्याच्या प्रस्तावाला केंद्राने परवानगी दिली विजेचा वापर न करणाऱ्या छोट्या व मध्यम उद्योगात 20 कर्मचारी असलेल्या प्रतिष्ठानांना कायदा लागू करण्यात येत असे, आता ही मर्यादा 40 वर नेण्यात आली
 15. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारने आज दहा वर्षे पूर्ण केली. सत्तेची दशकपूर्ती करणारे चौहान हे पहिले बिगरकाँग्रेसी मुख्यमंत्री
 16. नागपूर महापालिकेने दिल्लीत अर्बन मोबिलिटी प्रदर्शनात सादर केलेल्या वाहतूक धोरणाला पहिला क्रमांक मिळाला. ग्रीन बसवर आधारित धोरणाचे सादरीकरण आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज केंद्रीय नगर विकास विभागातील अधिकारी तसेच जागतिक बॅंकेच्या प्रतिनिधींपुढे केले
 17. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्ग यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. सगळे जग आपली कन्या मॅक्झिमा व इतर मुलांच्या भल्यासाठी झकरबर्ग व त्यांच्या पत्नीने कंपनीच्या त्यांच्याकडे असलेल्या समभागांपैकी ९९ टक्के भाग (शेअर) मानवतेच्या कार्यासाठी दान देण्याचे ठरविले
 18. पंतप्रधान नरेंद्र मोदी व फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉइस ऑलाँद यांनी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी स्थापन केली असून, यात विकसित व विकसनशील देशांना एकत्र आणण्यासाठी भारताने ३ कोटी डॉलर्सची मदत देण्याचे जाहीर केल


१) वह कार निर्माता कंपनी जिसे राष्ट्रीय हरित प्राधिकरण ने नियमों का उल्लंघन करने का दोषी ठहराते हुए नोटिस जारी किया ------- फॉक्सवैगन

२) वह राजनेता जिसने लोकसभा में मृत्युदंड समाप्त करने की मांग उठाई---------------- शशि थरूर

३) वह देश जिसने 2024 के ओलंपिक और पैरालंपिक खेलों की मेज़बानी करने के विरोध में वोट दिया –---------------(शहर हैम्बर्ग) जर्मनी

४) वह देश जहाँ पहला मीडिया शिखर सम्मेलन आयोजित किया गया –-------------------- बीजिंग,

५) दिल्ली विकास प्राधिकरण (डीडीए) को जिस पुरस्कार से सम्मानित किया गया--------------- ई-इंडिया पुरस्कार

६) वह देश जिसकी कैबिनेट ने 1 दिसम्बर 2015 को आईएसआईएस के खिलाफ सैन्य सहायता देने हेतु आदेश जारी किया –---------- जर्मनी

७) वह राज्य जिसने दिसम्बर 2015 को पूरे राज्य को सूखाग्रस्त घोषित किया ---------– झारखण्ड

८) भारत के प्रसिद्ध सारंगी वादक जिनका श्वास समस्या के कारण नई दिल्ली में निधन हो गया ------------ उस्ताद सबरी खान

९) वह राज्य जिसके श्रम कानून विधेयक-2015 को राष्ट्रपति प्रणब मुखर्जी ने स्वीकृति प्रदान की –--------------गुजरात

१०) वह फिल्म जिसको सर्वश्रेष्ठ फिल्म का पुरस्कार प्रदान किया गया ----------------- एंब्रेस ऑफ द सर्पेट


१) राज्यातील पहिली जलचर प्रयोगशाळा कोठे उभारली आहे :----पालघर

२) भारतातील कोणत्या राज्याने वृक्ष लागवडीत ग्रीनीज बुकमध्ये स्थान मिळवले आहे:- उत्तरप्रदेश

३) रुपवेध प्रतिष्ठानचा तन्वीर सन्मान यंदा ज्येष्ठ रंगकर्मी ----------- यांना जाहीर :-अॅलेक पदमसी

४) लोक माझे सांगाती’ हे आत्मचरित्र कोणत्या राजकीय नेत्याचे आहे ?:-शरद पवार

५) संपूर्ण स्वदेशी पतमानांकन संस्था बिकवर्क रेटिंग्जच्या राज्यांच्या आर्थिक पाहणीचा २०१५ सालचा चौथ्या अहवालाच्या निष्कर्षांप्रमाणे सकल राज्य उत्पादन (जीएसडीपी) असलेली -----------ही आर्थिक वर्ष २०१४-१५ मधील देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. :-महाराष्ट्र

६) राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग:-
* राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना १९९२ मध्ये पारीत कायद्याअंतर्गत झाली
* केंद्र सरकारने मुस्लीम, शीख पारशी,बौद्ध,जैन, यांना अल्पसंख्याक म्हणून अधिसूचित केले आहे
* न्या. मोहम्मद सरदार अली खान हे सवैधनिक अल्पसंख्याक आयोगाचे पहिले अध्यक्ष होते

७) राष्ट्रीय हरित न्यायधिकरणाची स्थापना--------- मध्ये झाली.:- २०१०

८) लोकपाल :-
* १९६३ मध्ये डॉ. एल. एम सिंघवी यांनी सर्वप्रथम लोकपाल ही सज्ञा वापरली
* १९६० मध्ये सर्वप्रथम तत्कालीन कायदामंत्री अशोक कुमार यांनी लोकपाल बील संसदेत सादर केले
* पहिले जन लोकपाल विधेयेक शांती भूषण यांनी १९६८ मध्ये सादर केले
* आतापोवोतो लोकपाल वा जनलोकपाल बिल संसदेत 9 वेळेला प्रस्तुत केले गेले

९) लोकायुक्त :-
* लोकायुक्त संस्था स्थापन करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे
* लोकायुक्तांची नियुक्ती लोकाकडून केली जाते
* कर्नाटक लोकायुक्त संस्था संपूर्ण देशात सर्वात जास्त प्रभावशाली म्हणून ओळखलि जाते
* सध्या ओदिषा,राजस्थान,बिहार, उत्तरप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश,आंध्रप्रदेश,गुजराथ आणी दिल्लीमध्ये लोकायुक्त संबधीकायदे करण्यात आले

१०) २००० साली भारतीय संघराज्यात उत्तराखंड, छत्तीसगढ व झारखंड या तीन नवीन राज्यांची निर्मिती अधिनियम जेव्हा वास्तव्यास आले तेव्हा त्यांचा कालानुक्रम काय होता ? :- छत्तीसगढ ,उत्तराखंड, झारखंडमध्यप्रदेश मधून :-छत्तीसगढउत्तरप्रदेश मधून :-उत्तराखंड,बिहार मधून :-झारखंड

११) भारत सरकारने सक्षम शिषवृती योजना सुरु केली आहे ?:- अपंग विद्यार्थीयांनातांत्रिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी(अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची मान्यता प्राप्त असलेल्या संस्थांमध्ये २०१५-२०१६ या चालू शैक्षणिक सत्रात अभियांत्रिकीच्या पदवी अथवा पदविका अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थिनी व अपंग विद्यार्थ्यांनाही विशेष शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाते)

१२) ऑडीट ब्युरो ऑफ सरक्यूलेशनच्या अहवालानुसार जानेवारी ते जून २०१४ या काळात दै. भास्कर हे हिंदी वृत्तपत्र भारतातील सर्वाधिक वितरण असलेले वृत्तपत्र होतेदै. लोकमत हे महाराष्ट्रातील सर्वाधिक वितरण असलेले वृतपत्र आहे.

१३) आम आदमी पक्ष (आप) :-
* आपची स्थापना २६ नोव्हे २०१२ मध्ये झाली
* २०१३ च्या विधानसभा निवडणुकीतदुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून आप पुढे आला
* २०१५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपने ७० पैकी ६७ जागा जिंकल्या तर लोकसभेत त्यांच्या ४ जागा आहेतविचारधारा :- स्वराज्य

१४) बसप हा राष्ट्रीय पक्ष आहे. हत्ती हे या पक्षाचे आरक्षित चिन्हआहे मात्र कोणत्या राज्यात हत्ती हे चिन्ह बसपला वापरता येत आणी भारतीय निवडणूक आयोगाच्या खुल्या चिन्हांच्या यादीतून बसपला चिन्ह निवडावे लागले ?:-आसाम

१५) निवडणूक चिन्ह:-
* तेलंगणा राष्ट्र समितीचे निवडणूक चिन्ह मोटारगाडी आहे
* द्रविड मुन्नेत्र कझगमचे निवडणूक चिन्ह उगवता सूर्य आहे

१६) भारताचा १९ वा आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सव कोणत्या शहरात आयोजित केला होता:- हैद्राबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा