Post views: counter

Current Affairs Dec 2015 Part - 2

  • "बाईक ऍम्ब्युलन्स" सुरू करण्याचा निर्णय :
चौकाचौकांत होणाऱ्या वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या रुग्णवाहिकांना पर्याय म्हणून पुण्यात "बाईक ऍम्ब्युलन्स" सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
 पुण्यात हा प्रयोग यशस्वी झाल्यावर नागपूर येथे तो राबविण्यात येईल. त्यामुळे प्रत्येक अत्यवस्थ रुग्णाला "गोल्डन अवर"मध्ये उपचार मिळेल, असा विश्‍वास आरोग्य खात्याने व्यक्त केला आहे.
 तसेच राज्यात सध्या 108 ही आपत्कालीन रुग्णसेवा कार्यान्वित आहे. 
  • बुलेट ट्रेनसाठी जपान सरकार भारताला मदत करणार :
देशातील पहिल्या बुलेट ट्रेनसाठी जपान सरकार भारताला मदत करणार असून, या आठवड्यामध्ये भारत-जपान दरम्यान करार होणे अपेक्षित आहे.  मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी जपान सरकार 8 अब्ज डॉलरचे कर्ज भारताला देणार असल्याचे जपानमधील "निक्केई" या आघाडीच्या दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे. जपानचे पंतप्रधान शिंझो ऍबे हे भारत दौऱ्यावर येत असून, ते याअनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहेत, या चर्चेनंतर संयुक्त निवेदनही प्रसिद्ध केले जाईल.
 तसेच या रेल्वे प्रकल्पासाठी एकूण 14.6 अब्ज डॉलर एवढा
खर्च केला जाणार असून, त्यातील अर्ध्यापेक्षाही अधिक रक्कम जपान सरकारकडून मिळणाऱ्या मदतीतून उभारली जाणार आहे.  या बुलेट ट्रेनसाठी मुंबई-अहमदाबाद दरम्यान 505 किलोमीटर लांबीचा लोहमार्ग उभारण्यात येईल. सध्या दोन्ही देशांमध्ये आर्थिक मदतीसंबंधीच्या अटींवर चर्चा सुरू असून, यातून दीर्घमुदतीच्या अर्थपुरवठ्यासाठी शंभर अब्ज येनचा आराखडा निश्‍चित केला जाईल.  तसेच जपान सरकारने याआधीही अनेक देशांना बुलेट ट्रेन तंत्रज्ञानाची निर्यात केली आहे, 2007 मध्ये हे तंत्रज्ञान तैवानला देण्यात आले होते, इंडोनेशियामध्येही हा प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता; पण तो चीनमुळे यशस्वी होऊ शकला नाही.  जपान सरकारकडून आर्थिक मदत मिळवणाऱ्यांच्या यादीमध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंत भारताने जपानकडून 4.45 ट्रिलियन येन एवढे कर्ज घेतले आहे. आता बुलेट ट्रेनसाठी भारताला कर्जाऊ दिली जाणारी रक्कमही मोठी आहे, इंडोनेशियाला यासाठी 4.72 ट्रिलियन येन एवढी रक्कम देण्यात आली होती.  एकदा भारताने बुलेट ट्रेनसाठी जपानी तंत्रज्ञान घ्यायचे ठरविल्यास त्यासाठी स्वतंत्र निविदा काढल्या जातील. यामध्ये प्रक्रियेमध्ये जे. आर. ईस्ट, कवास्की हेवी इंडस्ट्रीज आणि हिताची या कंपन्या सहभागी होण्याची शक्‍यता आहे. तसेच "जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी" आणि रेल्वे मंत्रालय यासाठी स्वतंत्र अभ्यास करणार आहे. भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्पास 2017 मध्ये सुरवात होणार असून, 2023 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे.
  • लोकायुक्त व न्यायमूर्ती भास्कर राव यांचा पदाचा राजीनामा :
लोकायुक्त संस्थेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरून लोकायुक्त व न्यायमूर्ती भास्कर राव यांनी पदाचा राजीनामा दिला.  राज्यपाल वजुभाई वाला यांनी हा राजीनामा स्वीकारला आहे. कायदामंत्री टी. बी. जयचंद्र यांनी राव यांच्या राजीनाम्याची अधिकृत घोषणा केली.  अलीकडेच भ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्यांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सादर करण्यात आला होता. त्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्यापूर्वीच लोकायुक्तांनी राजीनामा दिला.  भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर लोकायुक्त भास्कर राव दीर्घ काळ रजेवर गेले होते. 135 दिवसांच्या रजेनंतर त्यांनी राजीनामा दिला. 
  • मोनालिसाच्या चित्राबाबत नवा दावा :
जगभरातील चित्रकारांना भुरळ घालणाऱ्या आणि एक गूढ बनून राहिलेल्या मोनालिसाच्या चित्राबाबत नवा दावा करण्यात आला आहे.  या चित्राच्या मागे अन्य एक चित्र असल्याचे फ्रान्सचे वैज्ञानिक पास्कल कोटे यांचे म्हणणे आहे. दहा वर्षांच्या संशोधनातून त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे. संशोधक पास्कल यांनी रिफ्लेक्टिव्ह लाईट टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हा अभ्यास केला आहे. लियोनार्डो दा विंसीचे हे चित्र अनेक शतकांनंतरही एक उत्सुकता बनून राहिलेले आहे.  मोनालिसाच्या या चित्रामध्ये हास्याचे भाव नाहीत अथवा नजरही थेट समोर पाहणारी नाही, असे पास्कल यांचे म्हणणे आहे. या चित्राचा 782 अब्ज डॉलरचा विमा आहे. दरम्यान, पास्कल यांचा हा दावा मोनालिसाचे छायाचित्र असणाऱ्या लुवरे संग्रहालयाने फेटाळला आहे.  संग्रहालयाने त्यांना फक्त संशोधनासाठी सहकार्य केले आहे. त्यातील निष्कर्षाशी संग्रहालय सहमत नाही. जगातील सर्वोत्कृष्ट चित्रांपैकी एक असणारे आणि सर्वाधिक चर्चेतील हे लियोनार्डो दा विंसी यांचे चित्र 1503 ते 1506 च्या काळातील आहे.  मोनालिसाचे हास्य रहस्यमय असून यापूर्वीही अनेक दावे प्रतिदावे करण्यात आलेले आहेत. फ्रान्सच्या लुवरे संग्रहालयात सध्या हे चित्र आहे. संशोधक पास्कल यांच्या दाव्यानुसार या चित्रात रिफ्लेक्टिव्ह लाईट टेक्नॉलॉजी (प्रतिबिंबित करणारा प्रकाश) वापरण्यात आली आहे. एका पेंटिंगवर दुसरे पेंटिंग असल्याने यातील हास्य रहस्यमय वाटते.
  • दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन :
दक्षिण आफ्रिकन संघाच्या भारता विरुध्दच्या सुमार प्रदर्शनानंतर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत.  दक्षिण आफ्रिकन संघाची सध्याची खालावलेली कामगिरी पाहता माझा पुनरागमनाचा विचार सुरु असल्याचे स्मिथने सांगितले.  स्मिथ मास्टर्स चॅम्पियन्स लीगमध्ये वीरगो सुपर किंग्ज संघाकडून खेळणार आहे.  एमसीएल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा मंच ठरु शकतो असे स्मिथने म्हटले आहे.  नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत भारताने दक्षिण आफ्रिकेचा अत्यंत दारुण पराभव केला. 
  • नेट न्यूट्रॅलिटीचा फैसला करणाऱ्यांत भारतीय न्यायाधीश
न्यूट्रॅलिटीचे नियम कायदेशीर आहेत का? याचा फैसला करणाऱ्या तीन न्यायाधीशांत श्री श्रीनिवासन हे भारतीय वंशाचे एक न्यायाधीश आहेत.अमेरिकेच्या न्यायालयात ४ डिसेंबर रोजी यावर सुनावणी होणार आहे. या निकालाकडे जगाचे लक्ष लागले आहे. या तीन न्यायाधीशांमध्ये प्रामुख्याने स्टिफन एफ विल्यम्स व डेव्हिड एस टेटल यांचा समावेश आहे. अमेरिकेतील उच्चपदस्थ न्यायाधीशांपैकी श्रीनिवासन हे एक न्यायाधीश आहेत. श्रीनिवासन यांची नियुक्ती २०१३ मध्ये उच्च न्यायालयात झाली आहे. तथापि, मोफत आणि खुले इंटरनेटही ओबामा यांची निवडणूक प्रचारातील एक प्रमुख घोषणा होती; मात्र याबाबत आता श्रीनिवासन आणि अन्य दोन न्यायाधीश काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. श्रीनिवासन हे मूळचे चंदीगडचे रहिवासी असून माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या निकटवर्तीयांपैकी ते एक आहेत. स्टॅनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी पदवी संपादन केलेली आहे. अतिशय मेहनती आणि विनम्र अशी श्रीनिवासन यांची ख्याती आहे.
  • हवामान बदल परिषद कराराला अंतिम रूप देणार?

जागतिक जलवायू परिषदेत सहभागी देशांच्या परस्परविरोधी प्रस्तावांच्या मसुद्यातून निश्चित असा करार आकाराला आणण्याचा प्रयत्न या आठवड्यात केला जाईल.भारताने या चर्चेत सकारात्मक भूमिका बजवायची तयारी दर्शविल्यानंतर हा प्रयत्न केला जाईल. ४८ पानांच्या या मसुद्यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर न समजणारे पर्याय उपलब्ध आहेत.या मसुद्याच्या आधारावरच भारतासह जगातील सगळे देश बंधनकारक अशा कराराला अंतिम रूप देण्याचा प्रयत्न करतील.
  • बेस रेट’ दिशानिर्देश लवकरच : रिझव्र्ह बँक

बँकांची समस्या दूर करण्यासाठी ‘एसडीआर’बाबतच्या उपाययोजना लवकरच केल्या जातील असे मुंद्रा यांनीसांगितल बँकधोरणात्मक कर्ज पुनर्बाधणीच्या (एसडीआर) माध्यमातून वाढत्या बुडीत कर्जाचा तिढा सुटेल तसेच व्याजदर निश्चिततेचा ऋण दर (बेस रेट) याबाबतदिशानिर्देश लवकरच देण्याचे सूतोवाच रिझव्र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंद्रा यांनी मंगळवारी येथे केले.बुडीत कर्ज पुनर्बाधणी (सीडीआर) व धोरणात्मक कर्ज पुनर्बाधणी (एसडीआर) या पर्यायाद्वारे बँकांना कर्ज थकीत ठेवणाऱ्या कंपन्यांबाबत निर्णय घेता येतो. पैकी ‘सीडीआर’मध्ये बँकांना माफक आर्थिक तरतूद करावी लागते; तर ‘एसडीआर’मध्ये अधिक तरतुदीबरोबरच संबंधित कंपन्यांवर मालकी येते व समभाग हिश्शाचा भारही असतो.बँकांची ही समस्या दूर करण्यासाठी ‘एसडीआर’बाबतच्या उपाययोजना लवकरच स्पष्ट केल्याजातील, असे मुंद्रा यांनी सांगितले. तसेच बँकांच्या ऋण दराबाबत रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी पाचव्या द्विमासिक पतधोरणादरम्यान दिलेले आश्वासन निश्चितच पाळले जाईल, असेही ते म्हणाले.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुढच्या वर्षी पाकिस्तानचा दौरा :
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या वर्षी पाकिस्तानचा दौरा करतील, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली. 'हार्ट ऑफ एशिया' या परिषदेत स्वराज सहभागी झाल्या आहेत. पत्रकारांशी बोलताना स्वराज म्हणाल्या, 'मोदी दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य शिखर परिषदेत (सार्क) सहभागी होणार असून, पुढील वर्षी ते पाकिस्तानचा दौरा करणार आहेत.  सन 2012 नंतर प्रथमच भारताच्या परराष्ट्र मंत्री पाकिस्तान दौऱयावर गेल्या आहेत तर एस. एम. कृष्णा यांनी 2012 मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. 
  • बेकायदेशीर मार्गाने पैसा बाहेर जाणाऱ्या देशांच्या क्रमवारीत भारत चौथा :
बेकायदेशीर मार्गाने पैसा बाहेर जाणाऱ्या देशांच्या क्रमवारीत जगात भारताचा क्रमांक चौथा आहे.
 भारतातून 2004 ते 2013 दरम्यान दरवर्षी 51 अब्ज डॉलर रकमेचा ओघ बाहेर पडला आहे, अशी माहिती एका थिंक टँकच्या अहवालानुसार समोर आली आहे.   अमेरिकेतील ग्लोबल फायनान्शिअल इंटिग्रिटी या थिंक टँकच्या अहवालानुसार, बेकायदेशीररित्या पैसा बाहेर जाणाऱ्या देशांच्या यादीत चीनचा पहिला क्रमांक लागतो.  चीनमधून 2004 पासून 2013 पर्यंत दर वर्षाला 139 अब्ज डॉलरची रक्कम बाहेर गेली आहे. त्यापाठोपाठ रशिया (104 अब्ज डॉलर) व मेक्सिको (52.8 अब्ज डॉलर) या देशांमधून मोठ्या प्रमाणावर काळा पैसा परदेशात पाठवण्यात आला आहे. 
  • साठे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार पीयूष सिंग यांच्याकडे :
385 कोटी रुपयांच्या महाघोटाळ्यात अडकलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार आयएएस अधिकारी पीयूष सिंग यांच्याकडे सोपविण्यात आला.
 महामंडळात पहिल्यांदाच आयएएस अधिकाऱ्याला बसविण्यात आले आहे.
  • MPSC मुख्य परीक्षेकरिता मराठी व इंग्रजी विषयांचे पेपर बहुपर्यायी, वस्तुनिष्ठ स्वरूपाचे करण्याचा निर्णय :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेकरिता मराठी व इंग्रजी विषयांचे पेपर पारंपरिक ऐवजी बहुपर्यायी, वस्तुनिष्ठ स्वरूपाचे करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीविधानपरिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.  सदर निर्णय अंमलात आणण्यापूर्वी आयोगाच्या संकेतस्थळावर 20 जून 2015 रोजी घोषणा प्रसिद्ध करून या निर्णयाबाबत उमेदवारांच्या सूचना मागविण्यात आल्या होत्या.या संदर्भात लोकप्रतिनिधींचे निवेदन प्राप्त झाले आहे.  आयोगाच्या सदर घोषणेच्या अनुषंगाने प्राप्त सूचना विचारात घेऊ न याबाबत राज्य लोकसेवा आयोगाकडे विचारविनिमय सुरू असल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. 
  • एच 1 बी व्हिसाचे प्रमाण पंधरा हजारांनी कमी करण्याचे विधेयक :
एच 1 बी व्हिसाचे प्रमाण पंधरा हजारांनी कमी करण्याचे विधेयक अमेरिकेच्या दोन सिनेटर्सनी मांडले आहे. हे विधेयक संमत झाल्यास भारतालाही फटका बसू शकतो.  डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेटर बिल नेल्सन व रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर जेफ सेशन्स यांनी हे विधेयक मांडले आहे.  दरवर्षी दिल्या जाणाऱ्या एच 1 बी व्हिसात कपात करण्याची मागणी करणारे विधेयक त्यांनी मांडले आहे. पात्र अमेरिकी कर्मचारी उपलब्ध असताना अनेकदा बाहेरच्या देशातून कर्मचारी आणले जातात व त्यांच्याकडून कमी वेतनात काम करून घेतले जाते. सध्या कमाल 85,000 एच 1 बी व्हिसा दिले जातात त्यात वीस हजार व्हिसा विज्ञान व तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणिताचे  अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना दिले जातात. भारतातून येणाऱ्या माहिती तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांना जास्त प्रमाणात व्हिसा दिला जातो. विधेयकात असे म्हटले आहे की, एच 1बी व्हिसाचे प्रमाण 15 हजारांनी कमी करावे, त्याचबरोबर 70 हजार व्हिसा वाटप करताना जास्त वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना तो द्यावा. त्यामुळे  अमेरिकी कंपन्यांना प्रथम हे सिद्ध करावे लागेल की, त्यांनी आधी अमेरिकी कर्मचाऱ्यांना संधी दिली होती. अमेरिकी कर्मचाऱ्याला काढून एच 1 बी व्हिसा असलेल्या कर्मचाऱ्याला घेता येणार नाही.
  • चेन्नईत चोवीस तासात गेल्या शंभर वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद :
चेन्नईत 1-2 डिसेंबर रोजी चोवीस तासात गेल्या शंभर वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद झाली. 1901 पासून चोवीस तासात एवढा म्हणजे 20 इंच पाऊस पडण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेने म्हटले आहे. नासाने चेन्नईच्या पावसाबाबत एक नकाशास्वरूपातील चित्रही जारी केले असून ते उपग्रहाने आग्नेय भारतात 1-2 डिसेंबर रोजी झालेल्या पावसाबाबतचे आहे. दर तीस मिनिटाला उपग्रहाने नोंदलेल्या माहितीच्या आधारे हे चित्र तयार केले आहे.  मान्सूननंतर ईशान्य मान्सूनमुळे चेन्नईत पावसाने थैमान घातले होते. तामिळनाडूत सरासरीपेक्षा खूप अधिक पाऊस झाला होता, असे नासाच्या अर्थ ऑब्झर्वेटरीने म्हटले आहे.
 
  • टाइम पर्सन ऑफ द ईयर'
* टाइम नियतकालिकाने जर्मनीच्या चांसलर अन्जेला मर्केल यांना २०१५ च्या टाइम पर्सन ऑफ द ईयर या पुरस्कारासाठी निवड केली
* २९ वर्षानी प्रथमच एखाद्या महिलेची यासाठी निवड केली
* मर्केल यांच्या अगोदर 1986 मध्ये फिलीपींस च्या पहिल्या महिला प्रेसिडेंट कोराजन एक्वीनो यांना या पुरस्कारासाठी निवडले होते एक्वीनो च्या अगोदर ब्रिटेन ची राणी क्वीन एलिजाबेथ-2 (1952) आणी विंडसर ची राजकुमारी वैलीज सिम्प्सन (1936) मध्ये त्यांना हा पुरस्कार मिळाला होता
* युरोपातील हजारो निर्वासीतासाठी राष्ट्राच्या सीमा खुल्या केल्याबद्दल मर्कल यांना हा सन्मान देण्यात आला.तसेच निर्वासितांना सामावून घेणे हाच या संकटावरील उपाय असल्याची भूमिका यांनी मांडली होती
* आयएसचा म्होरक्या अबू बकर अल बगदादी यादीत दुसर्या क्रमांकावर राहिला
* पुरस्काराची सुरुवात:- १९२७
या अगोदर हा पुरस्कार
२०१२:- बराक ओबामा
२०१३:-पोप फ्रांसिस
२०१४:-Ebola fighter
* महात्मा गांधीना हा पुरस्कार १९३० मध्ये मिळाला होता
  • माझी कन्या भाग्यश्री योजना
मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी चालू केली आहे वैशिष्ट्य एकुलती एक मुलगी असलेल्या आणी कुटुंब नियोजन केलेल्या कुटुंबातील मुलीचा जन्मदिन साजरा करन्यासाठी 5 हजार रू मुलगी 5 वर्षाची होइपर्यंत दर्जेदार पोषण आहार देण्यासाठी प्रत्येक वर्षी 2 हजार रू दिले जानार आहेत.

  • एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प संवेदनशील म्हणून घोषित :
नाशिक आयुक्तालयाच्या अंतर्गत अमरावती, नाशिक, ठाणे, नागपूर असे चार अप्पर आयुक्त आणि एकूण 24 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी असे कार्यक्षेत्र विभागले आहे. त्यापैकी धारणी, नाशिक, कळवण, तळोदा, जव्हार, डहाणू, किनवट, पांढरकवडा, गडचिरोली,अहेरी व भामरागड हे 11 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अत्यंत संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले. आदिवासी विद्यार्थी स्पर्धेत टिकावे म्हणून त्यांना इंग्रजी माध्यमाच्या खाजगी निवासी आश्रमशाळांमध्ये पाठविले जाते. त्यासाठी शासन प्रत्येक विद्यार्थ्यामागे 50 ते 60 हजार रुपये खर्च करते. सन 2015-16 या शैक्षणिक वर्षासाठी प्रत्येक प्रकल्पामधून किमान हजार आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या खासगी आश्रमशाळेत पाठविण्याचा निर्णय झाला होता. 25 हजार विद्यार्थ्यांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवण्यात आले होते. तसेच हे उद्दिष्टही केवळ पन्नास टक्‍क्‍यांपर्यंतच पूर्ण झाले. कोट्यवधी रुपये खर्चून हा प्रयोग करण्याऐवजी शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न झाला नाही.
  • गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख रेहमतुल्ला नबील यांचा राजीनामा :
तालिबानसारख्या दहशतवादी संघटनांशी चर्चा करण्यासाठी पाकिस्तानशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी उचललेल्या पावलांमुळे नाराज असलेले गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख रेहमतुल्ला नबील यांनी राजीनामा दिला. तालिबानशी शांततेच्या चर्चा केल्या जाऊ नयेत, असे नबील यांचे ठाम मत आहे. याच आठवड्यामध्ये तालिबानी दहशतवाद्यांनी कंदाहार विमानतळावर केलेल्या भीषण हल्ल्यात किमान 50 जणांचा मृत्यू झाला. हा हल्ला आणि त्यानंतरची चकमक तब्बल 27 तास सुरू होती. अध्यक्ष अश्रफ घनी यांनी काही दिवसांपूर्वी एका बैठकीनिमित्त पाकिस्तानला भेट दिली होती. दोन्ही देशांतील शांततेची दीर्घकाळ प्रलंबित असलेली चर्चा सुरू करणे, हादेखील त्यांच्या भेटीचा एक उद्देश होता. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये शांततेच्या चर्चेची पहिली फेरी जुलैमध्ये झाली होती. अफगाणिस्तानमधील सध्याच्या अशांततेला पाकिस्तान जबाबदार असल्याची स्थानिक प्रशासनातील काही घटकांची भावना आहे. पाकिस्तान आणि तालिबानशी चर्चेचा विरोध करत नबील यांनी दिलेला राजीनामा हा याच अस्वस्थतेतून आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
  • "इसिस"ने तयार केले मॅंडारिन भाषेमध्ये गाणे :
जिहादमध्ये सहभाग घेण्यासाठी चिनी युवकांना प्रेरित करण्यासाठी "इसिस"ने मॅंडारिन भाषेमध्ये एक गाणे तयार केले असून हे गाणे पाकिस्तानमध्ये तयार केले गेले आहे.
 दोन आठवड्यांपूर्वीच "इसिस‘ने चीनच्या नागरिकाची हत्या केली होती. आता त्या देशातील मुस्लिमांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी त्यांनी त्यांच्याच भाषेत हे गाणे तयार केले आहे. "इसिस"ने जागतिक स्तरावर सुरू केलेल्या जिहादमध्ये चीनमधील मुस्लिमांनी सहभाग घ्यावा, असा आग्रह या गाण्यामध्ये केला आहे. तसेच "इसिस"ने तयार केलेल्या "सैतानाचे राज्य" असलेल्या साठ देशांच्या यादीत चीन आहे.
  • अभिनेता सलमान खान याची निर्दोष सुटका :
दारूच्या नशेत सुसाट गाडी चालवून पदपथावर झोपलेल्या मजुरांना चिरडल्याच्या आरोपातून अखेर 13 वर्षांनंतर अभिनेता सलमान खान याची मुंबई उच्च न्यायालयाने पुरेशा पुराव्यांअभावी सर्व आरोपांमधून निर्दोष सुटका केली. सलमानविरोधातील आरोप निर्विवादपणे सिद्ध करण्यात अभियोग पक्ष सपशेल अपयशी ठरला, अशी टीका न्यायालयाने केली आहे.
 सात महिन्यांपूर्वी सलमानला सत्र न्यायालयाने याच आरोपांखाली पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती.या शिक्षेविरोधात त्याने केलेल्या अपील याचिकेवर न्या. ए. आर. जोशी यांनी निकालपत्र दिले.
  • फेसबुकवर पंतप्रधान 'नरेंद्र मोदी' हा विषय सर्वाधिक लोकप्रिय :
लवकर 'बाय बाय' करण्यात येणाऱ्या 2015 या वर्षांत फेसबुकवर लोकप्रिय ठरलेले विषय जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये भारतात पंतप्रधान 'नरेंद्र मोदी' हा विषय सर्वाधिक लोकप्रिय ठरल्याचे समोर आले आहे. जानेवारी ते डिसेंबर 2015 मध्ये फेसबुकवर पोस्ट, कमेंट, लाईक आणि अन्य माध्यमातून चर्चेत राहिलेल्या विषयांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये भारतात 'नरेंद्र मोदी' हा विषय सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे आढळून आले आहे. जगातील 'टॉप 10' राजकीय नेत्यांमध्ये बराक ओबामा यांनी सर्वोच्च स्थान तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववे स्थान पटकावले आहे. मोदींनंतर भारतामध्ये ई-कॉमर्स बूम, ए.पी.जे.अब्दुल कलाम, बाहुबली, नेपाळचा भूकंप आदी विषय सर्वाधिक चर्चेत राहिले आहेत.
  • गंगानदीच्या काठासह गोमुखापासून हरिद्वारपर्यंत प्लस्टिक बंदी :
गंगानदीच्या काठासह गोमुखापासून हरिद्वारपर्यंत संपूर्ण प्लस्टिक बंदीचे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. 1 फेब्रुवारी 2016 पासून या निर्देशाची अंमलबजावणी सुरु होणार आहे.
 गंगा नदीला प्रदूषित करणारे परिसरातील उद्योगही बंद करण्याचे आदेश लवादाने दिले आहेत. तसेच गंगा नदीची उपनदी असलेल्या रामगंगा नदीतील पाण्याचे नमुने लवादाने तपासणीसाठी मागविले आहेत.
 तसेच नोव्हेंबरमध्ये लवादाने उत्तराखंडमधील गंगा नदीच्या परिसरात 200 मीटर अंतरावर बांधकामावर बंदी आणली आहे.
  • पीएफवरील व्याजदराबाबत जानेवारीमध्ये निर्णय घेतला जाणार :
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (ईपीएफओ) वतीने चालू आर्थिक वर्ष 2015-16 साठीच्या पीएफवरील व्याजदराबाबत जानेवारीमध्ये निर्णय घेतला जाणार आहे, असे केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी सांगितले. ईपीएफओसाठी जानेवारीमध्ये बैठक होणार आहे. त्यात 2015-16 वर्षासाठीचे व्याजदर निश्चित करण्यात येणार आहे. तसेच ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची (सीबीटी) पुढील बैठक जानेवारीमध्ये होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून पीएफवर 8.75 टक्के व्याजदर मिळते आहे. चालू आर्थिक वर्षात यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सीबीटीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीतच हा निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
  • अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीला विधिमंडळात मान्यता :
अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीला विधिमंडळात एकमताने मान्यता मिळाली. त्यामुळे आता अ‍ॅक्युपंक्चर तज्ज्ञांना या चिकित्सा पद्धतीचा व्यावसायिक (प्रॅक्टिस) वापर करता येणार आहे.
 अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीचे विधेयक वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभा आणि विधान परिषदेत मांडले. ते दोन्ही सभागृहांत एकमताने मंजूर केले. अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धती ही महाराष्ट्रातील एक लोकप्रिय चिकित्सा पद्धत आहे. या चिकित्सा पद्धतीला तिच्या विकासासाठी योग्य ती संधी निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच या चिकित्सा पद्धतीचे अध्यापन व व्यवसाय यांचे विनियमन करणे आवश्यक आहे. यादृष्टीने महाराष्ट्रात ही पद्धती लागू करण्यात आल्याची प्रक्रिया सुरू करत आहोत, असे विनोद तावडे यांनी सांगितले. अ‍ॅक्युपंक्चर ही शरीरावरील विशिष्ट बिंदूवर त्वचेमध्ये बारीक बारीक सुया टोचून त्याद्वारे वेदनामुक्त करणारी किंवा आजारपण बरी करणारी एक चिकित्सा पद्धत आहे. ही एक महत्त्वाची प्राकृतिक स्वरूपाची चिनी पारंपरिक चिकित्सा पद्धती आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीच्या वापरास सुमारे 2500 हून अधिक वर्षांपूर्वी सुरुवात झाली असावी. या चिकित्सा पद्धतीची संकल्पना ही अतिप्राचीन काळी विकसित झाली असावी.
  • ३ री भारत आफ्रिका फोरम समीट:-
• २६ ते ३० ऑक्टो २०१५ या कालावधीत नवी दिल्ली येथे पार पडली
• ३ री भारत आफ्रिका फोरम समीट ही २०१४ मध्ये आफ्रिका खंडात भरणार होती. परंतु इबोला रोगाच्या प्रसारामुळे ती रद्द करण्यात आली
• या परिषदेस भारताने प्रथमच आफ्रिका खंडातील ५४ देशांना आमंत्रित केले होते
• उद्घाटन:- सुषमा स्वराज यांनी केले
• समारोप:-नरेंद्र मोदी
• ही परिषद यापूर्वी दर तीन वर्षानी आयोजित केली जात होती. परंतु या पुढे ती दर पाच वर्षानी आयोजित करण्याचा निर्णय या परिषदेत घेण्यात आला
• दुसरी परिषद २०११ मध्ये इथीओपियाची राजधानी आदीसआबाबा येथे पार पडली होती या परिषदेस १५ देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते तर पहिली परिषद २०१८ मध्ये संपन्न झाली त्यास १४ १५ देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते
  •   फोर्ब्ज'च्या यादीत शाहरुख खान प्रथम:-
• फोर्ब्ज‘ने तयार केलेल्या देशातील यंदाच्या ‘टॉप 100 सेलिब्रेटीं‘च्या यादीमध्ये ‘शाहरुख खानने अव्वल स्थान पटकाविले आहे.
• अभिनेता सलमान खान दुसऱ्या क्रमांकावर आहे. ‘
• बिग बी‘ अमिताभ बच्चन तिसऱ्या स्थानी आहेत.
• एखाद्या सेलिब्रेटीची ‘ब्रॅंड व्हॅल्यू‘ आणि त्याचे वर्षभरातील उत्पन्न असे या यादीचे निकष आहेत.
• बहुतांश सेलिब्रेटींच्या मानांकनामध्ये त्यांच्या उत्पन्नाचा मोठा वाटा असला, तरीही काही जणांच्या मानांकनामध्ये उत्पन्नापेक्षा लोकप्रियता हा अधिक महत्त्वाचा निकष मानण्यात आला आहे.
उदाहरणार्थ: क्रिकेटपटू रोहित शर्मा, वीरेंद्र सेहवाग, हरभजनसिंग, ईशांत शर्मा, गौतम गंभीर, गायक यो यो हनीसिंग, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, सनी लिऑन इत्यादींच्या मानांकनामध्ये लोकप्रियता हा अधिक महत्त्वाचा निकष आहे.
त्याआधारे ‘फोर्ब्ज‘च्या यादीतील पहिले पाच सेलिब्रेटी पुढीलप्रमाणे :
1) शाहरुख खान : (257.50)
2) सलमान खान : (202.75)
3) अमिताभ बच्चन : (112)
4) महेंद्रसिंह धोनी : (119.33)
5) आमीर खान : (104.25)
(* उत्पन्न कोटी रुपयांत)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा