Post views: counter

Current Affairs Dec 2015 part - 5


  • सर्वोत्तम खेळाडू जाहीर :

आयसीसीने 18 सप्टेंबर 2014 ते 13 सप्टेंबर 2015 या कालावधीतील कामगिरीनुसार सर्वोत्तम खेळाडू जाहीर केले. ऑस्ट्रेलियासाठी रन मशिन ठरलेला त्यांचा कर्णधार स्टिव स्मिथ कसोटीसह सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरला, तर एबी डिव्हिलियर्स सलग दुसऱ्यांदा एकदिवसीय क्रिकेटमध्ये अग्रेसर ठरला.

आयसीसी पुरस्कार विजेते

सर्वोत्तम क्रिकेटपटू : स्टिव स्मिथकसोटीपटू : स्टिव स्मिथवन डे खेळाडू : एबी डिव्हिलियर्सटी-20 खेळाडू : फाफ डु प्लेसिसखिलाडूवृत्ती : ब्रॅडम्‌ मॅकल्‌मउदयोन्मुख खेळाडू : जोश हेझलवूडमहिला वन डे खेळाडू : मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया)महिला टी-20 खेळाडू : स्टॅफिन टेलर (विंडीज)पंच : रिचर्ड कॅटलबग

  • "व्हॉट्‌सऍप" मेसेंजर ऍपवर लवकरच व्हिडिओ कॉलिंग सुविधा :

व्हॉईस कॉलिंगसुविधेप्रमाणे "व्हॉट्‌सऍप" या लोकप्रिय मेसेंजर ऍपवर लवकरच व्हिडिओ कॉलिंग सुविधा मिळणार असल्याचे वृत्त जर्मनीतील एका ब्लॉगवर देण्यात आले आहे.
 या पूर्वी "व्हॉट्‌सऍप"ने आपल्या यूजर्ससाठी व्हॉईस कॉलिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जगभरात ती लोकप्रियही ठरली आहे. त्यानंतर आता "स्काइप" या व्हिडिओ सुविधा पुरविणाऱ्या संकेतस्थळाची तीव्र स्पर्धा असतानाही "व्हॉट्‌सऍप" व्हिडिओ कॉलिंग सुविधा सादर करणार आहे.

 व्हॉईस कॉलिंगप्रमाणेच व्हिडिओ कॉलिंगचे डिझाइन ठेवले आहे. एकाच वेळी अनेकांशी व्हिडिओ कॉलिंग, कॉलदरम्यान मोबाईलचा कॅमेरा फिरविण्याची तसेच माईक बंद करण्याची सुविधाही देण्यात आल्याचे ब्लॉगवर म्हटले आहे. व्हिडिओ कॉल सुरू असताना दोन विंडो दिसत असून त्यामध्ये कॉल करणाऱ्याची मोठी, तर कॉल स्वीकारणाऱ्याची छोटी अशा दोन विंडो दिसत असल्याचेही त्यात म्हटले आहे. येत्या काही आठवड्यांत अशी सुविधा सर्व यूजर्सना उपलब्ध होण्याची शक्‍यताही वर्तविण्यात आली आहे.

  • राष्ट्रगीताविनाच परिषद संस्थगित :

विधान परिषदेच्या इतिहासात बुधवारचा दिवस कायमस्वरूपी लक्षात राहण्यासारखा ठरला. सभापती रामराजे-नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रगीताविनाच परिषद संस्थगित करून मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पी अधिवेशनाची घोषणा केली. चूक लक्षात आल्यावर पुन्हा सभागृह बोलावून राष्ट्रगीत घेण्यात आले.

  • झिंबाब्वे हा युआन हे चीनचे चलन राष्ट्रीय चलन म्हणून स्वीकारणार :

झिंबाब्वे हा देश युआन हे चीनचे चलन राष्ट्रीय चलन म्हणून स्वीकारणार असल्याचे वृत्त सूत्रांनी दिले.
 या निर्णयाच्या बदल्यात चीन झिंबाब्वेला दिलेले सुमारे 4 कोटी डॉलर्सचे कर्ज रद्द करणार असल्याची माहिती आहे. चीन हा झिंबाब्वेमधील सर्वांत मोठा गुंतवणुकदार देश आहे. झिंबाब्वे देशात 1999-2008 या काळात आलेल्या महामंदीमधून सावरण्याचा प्रयत्न अद्याप करत असून येथील राजवट मानवाधिकारांना पायदळी तुडवत असल्यामुळे पाश्‍चिमात्य देशांनी झिंबाब्वे अघोषित आर्थिक बहिष्कार टाकला आहे.
 गेल्या पाच वर्षांच्या काळात झिम्बाब्वेने 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किंमतीची सवलतीच्या दरातील कर्जे चीनकडून घेतली आहेत. चीन हा झिम्बाब्वेचा दुसरा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार देश आहे. अर्थात गेल्या दोन वर्षांपासून युआन हे झिम्ब्वाब्वेच्या चलन व्यवस्थेचा एक भाग असत्ताना नव्याने करण्यात आलेली ही घोषणा अतार्किक असल्याची टीका झिम्बाब्वेसंदर्भातील एक प्रसिद्ध विश्‍लेषक असलेल्या जॉन रॉबर्टसन यांनी केली आहे.

  • ग्रीसच्या संसदेमध्ये समलैंगिक विवाहास अनुमती ;

ग्रीसच्या संसदेमध्ये समलैंगिक विवाहास (गे) अनुमती देणारे विधेयक संमत करण्यात आले आहे.
 "सामाजिक भागीदारी"चे फायदे समलैंगिक जोडप्यांनाही देण्यासंदर्भातील हे विधेयक संसदेमध्ये 193-56 अशा मतदानानंतर मंजूर झाले. मात्र या विधेयकामधील दत्तकविधानास परवानगी देणारे कौटुंबिक कायद्यासंदर्भातील कलम मतदानाआधी विधेयकाच्या प्रस्तावामधून गाळण्यात आले. ग्रीसमधील प्रभावशाली ऑर्थोडॉक्‍स चर्चमधील परंपरावादी बिशपनी या विधेयकास तीव्र विरोध केला होता. या विधेयकामुळे कुटूंब संस्था धोक्‍यात येईल, अशी टीका ऑर्थोडॉक्‍स चर्चने केली होती.

  • ‘मेक इन इंडिया‘अंतर्गत मोठा संरक्षण करार :

‘मेक इन इंडिया‘अंतर्गत रशिया भारतात कामोव्ह 226 ही हेलिकॉप्टर तयार करण्याबाबतचा मोठा करार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यात झाला आहे. या मोहिमेअंतर्गत झालेला हा आतापर्यंत सर्वांत मोठा संरक्षण करार आहे. तसेच, विविध क्षेत्रांशी निगडित सोळा करारांवरही या वेळी स्वाक्षरी झाली.
 मोदी यांच्या रशिया दौऱ्यामध्ये अपेक्षेप्रमाणेच हा संरक्षण करार झाला आहे. यानुसार, भारत आणि रशिया हे संयुक्तरित्या हेलिकॉप्टर तयार करणार आहेत. करार झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. या वेळी मोदी म्हणाले, ‘रशिया हा भारताचा सर्वांत विश्‍वासू मित्र आहे. दोन्ही देशांमधील अणुऊर्जा क्षेत्रांतील सहकार्य वाढत आहे. दोन प्रकल्पांमध्ये रशियाच्या बारा अणुभट्ट्यांबाबत बरीच प्रगती झाली आहे. तसेच, दोन्ही देशांमधील खासगी उद्योगांनाही सहकार्य वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. आमचे चांगले संबंध हेच संरक्षण आणि राजनिती सहकार्याचा स्रोत आहे.‘‘ पुतीन हे भारत आणि रशियाच्या धोरणात्मक संबंधांचे शिल्पकार आहेत, अशी स्तुतीही मोदी यांनी केली. भारताच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्यामध्ये रशियाचा मोठा सहभाग असेल, असेही ते म्हणाले. दोन्ही देशांमधील संबंधांचे वर्णन करताना मोदी यांनी "हे संबंध हायड्रोकार्बनपासून हिऱ्यापर्यंत प्रगत झाले आहे,‘ असे वर्णन केले आहे.

  • न्यूझीलंडचा कर्णधार निवृत्त होणार :

न्यूझीलंडचा कर्णधार ब्रँडन मॅक्‌लम येत्या फेब्रुवारीत क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्त होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन कसोटी-सामान्यांच्या मालिकेनंतर आपण निवृत्ती पत्करणार असल्याची घोषणा मॅकलम याने आज केली. त्याच्या या निवृत्तीच्या निर्णयामुळे मार्चमध्ये होणाऱ्या ट्वेंटी-20 विश्वकरंडक स्पर्धेचे नेतृत्व केन विल्यम्सन याच्याकडे सोपवण्यात आले आहे. मॅकलमने सलग दोन वर्ष न्युझीलंडचे कर्णधारपद यशस्वीरित्या भूषवले. त्याच्या नेतृत्वाखाली खेळण्यात आलेल्या 29 पैकी 11 सामन्यात न्युझीलंडने विजय मिळवला. सलग 100 कसोटी सामने खेळणारा मॅकलम हा एकमेव खेळाडू असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 फ्रेबुवारीपासून ख्राईस्टचर्च येथे होणारी कसोटी म्हणजे त्याचा अखेरचा सामना असेल.
 मॅकलमने 99 कसोटीत 6,273 धावा केल्या असून 11 शतके व 31 अर्धशतके ठोकली आहेत. तर 254 एकदिवसीय सामन्यात 5 शतके व 31 अर्धशतकांसह 5909 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक करणारा मॅकलम हा एकमेव फलंदाज असून त्याने गेल्यावर्षी वेलिंग्टन येथे भारताविरुद्धच्या कसोटीत 302 धावांची खेळी केली होती.

  • ‘सी. के. नायडू जीवन गौरव पुरस्कारा’ने सन्मानित :

भारतीय क्रिकेट संघाचे माजी यष्टिरक्षक सय्यद किरमाणी यांना भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय) यंदा ‘सी. के. नायडू जीवन गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करणार आहे. भारतीय संघाचे पहिले कर्णधार कर्नल कोटारी कंकय्या नायडू यांची जन्मशताब्दी बीसीसीआय साजरी करीत असून, त्यानिमित्त मैदानावर आणि मैदानाबाहेर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या एका व्यक्तीचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. यंदा हा पुरस्कार किरमाणी यांना जाहीर झाला असून, पुरस्कार स्वरूपात ट्रॉफी, प्रशस्तिपत्र आणि 25 लाख रुपये रोख दिले जातील. बीसीसीआयच्या मुंबई मुख्यालयात पुरस्कार समितीची बैठक झाली. या समितीत बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर, सचिव अनुराग ठाकूर आणि ‘द हिंदू’चे संपादक एन. राम यांचा समावेश आहे. गावसकर यांनी विंडीजविरुद्ध नाबाद 236 धावांची खेळी केली, तेव्हा किरमाणी यांनी त्यांच्यासोबत नवव्या गड्यासाठी 143 धावांची भागीदारी केली होती. क्रिकेटमधील सेवेसाठी भारत सरकारने 1982 मध्ये त्यांचा ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मान केला. किरमाणी हे कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष राहिले आहेत.

  • सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आणि कसोटी क्रिकेटपटू, असा दुहेरी सन्मान :

लेग स्पिनर या नात्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून हा प्रवास अनेक चढ-उतारांनी गाजला. पाच वर्षांआधी तळाच्या स्थानाला फलंदाजी करीत असताना इतक्या मोठ्या स्थानावर झेप घेईल, असा विचार मनातही डोकावला नसल्याची प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने गुरुवारी व्यक्त केली.
 आयसीसीकडून एकाचवेळी सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आणि कसोटी क्रिकेटपटू, असा दुहेरी सन्मान मिळविणारा 26 वर्षांचा स्मिथ सर्वांत कमी वयाचा खेळाडू बनला आहे. त्याने सप्टेंबर 2014 ते सप्टेंबर 2015 या काळात 25 डावांत 1734 धावा काढल्या. सचिन तेंडुलकरपाठोपाठ अशी कामगिरी करणारा तो सर्वांत कमी वयाचा खेळाडू आहे. तो म्हणाला,‘अशा पुरस्कारांच्या सन्मानाबद्दल विचारही करू शकत नाही. मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करीत, संघाला अधिकाधिक विजय मिळवून देण्यासाठी आपण झटत असतो.
 अविश्वसनीय कामगिरीच्या बळावर सर्वोत्कृष्ट खेळाडू बनणे सुखद आहे. ’ स्टीव्हने अलीकडे फलंदाजीत शानदार कामगिरी केली; पण पाच वर्षांआधी 2010 मध्ये पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर त्याला लेग स्पिनरच्या रूपात पदार्पणाच्या कसोटीत खेळविण्यात आले होते. तळाच्या स्थानावर त्याला फलंदाजीही करावी लागली.





  • चित्रपटसृष्टीवर शोककळा :

‘मेरा साया‘, "वक्त‘, "मेरे मेहबूब‘, "परख‘, "इंतकाम‘, "एक मुसाफीर एक हसीना‘ आदी चित्रपटांत विविध भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री साधना शिवदासानी (वय 74) यांचे शुक्रवारी हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (ता. 26) सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण केशरचनेमुळे एकेकाळी "फॅशन आयकॉन‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका गुणी अभिनेत्रीला चित्रपटसृष्टी मुकली आहे, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
 साधना काही वर्षे कर्करोगाने आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू होते. वार्धक्‍यामुळे त्यांचे शरीर उपचारांना साथ देत नव्हते. प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात काही दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.
 त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली. अभिनेत्री शबाना आझमी, वहिदा रेहमान आणि हेलन यांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. अंत्यदर्शन घेण्यासाठी चित्रपटसृष्टीतील काही मंडळी तिथे जमली होती.

  • दहशतवादविरोधी कायदा :

वादग्रस्त दहशतवादविरोधी कायदा उद्या (ता. 27) चीनच्या संसदेत मंजूर होण्याची दाट शक्‍यता आहे. या कायद्याला चीन कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीत मान्यता मिळाली असल्याने संसदेत मंजूर होणे, ही केवळ औपचारिकता असणार आहे.
 नव्या दहशतवादविरोधी कायद्यातील सायबर गुन्हेगारीसंदर्भातच्या काही तरतुदींना अमेरिकेचा विरोध आहे. तसेच, या कायद्यामुळे मानवाधिकारांवरही गदा येणार असणार असल्याचे अमेरिकी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नव्या कायद्यातील तरतुदीनुसार, तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना "इन्क्रीप्शन कोड‘सह सर्व संवेदनशील माहिती चीन सरकारला देणे बंधनकारक असणार आहे. या तरतुदीला बहुतेक पाश्‍चात्त्य कंपन्यांचा विरोध आहे.
 अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांच्याशी थेट चर्चा करत याबाबत काळजीही व्यक्त केली होती. नव्या कायद्यामुळे कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम होणार असून, तपासणीच्या नावाखाली पाश्‍चात्त्य कंपन्यांना लक्ष्य केले जाण्याची शक्‍यताही व्यक्त होत आहे. अनेक मानवाधिकार संघटनांनी मात्र चीन सरकारच्या हेतूंविषयीच शंका उपस्थित केली आहे. मुस्लिमबहुल असलेल्या चीनच्या शिनजिआंग प्रांतात दहशतवादाचे प्रमाण अधिक असले तरी चीन सरकारने त्यांच्या हक्कांवर आणि संस्कृतीवर निर्बंध आणल्याचाच हा परिणाम असल्याचे विविध संघटनांचे म्हणणे आहे.
 चीनने मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हा कायदा केवळ देशाच्या सुरक्षेसाठी असून, कंपन्यांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, इतर कोणत्याही देशाला आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, असे सांगत त्यांनी अमेरिकेलाही अप्रत्यक्षपणे फटकारले आहे.

  • पुन्हा पुन्हा वापरता येणारा अग्निबाण विकसित :

अमेरिकेच्या स्पेस एक्स कंपनीने फाल्कन -9 अग्निबाण अवकाशात सोडून तो परत जमिनीवर पूर्ववत उतरविण्यात मंगळवारी यश प्राप्त केले आहे. विमानांसारखा पुन्हा वापरता येण्याजोगा अग्निबाण बनविण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्यामुळे ऐतिहासिक मानला जात आहे. पृथ्वीवर परतण्यापूर्वी 11 संदेश दळणवळण उपग्रह या अग्निबाणाने सुरक्षित अवकाश प्रक्षेपित केले.
 कॅलिफोर्नियाच्या हॉथ्रोन येथील कंपनीच्या मुख्यालयात उत्साहित व आनंदी वातावरणात एकत्र जमलेल्या सहकाऱ्यांसमोर प्रवक्त्याने ‘फाल्कन जमिनीवर सुखरूप परतले’ असे जाहीर करताच एकच जल्लोष झाला.
 स्पेस एक्सच्या बेव प्रसारणात अग्निबाण केप कनेवेराल तळावर यशस्वीरीत्या उतरत असल्याचे दाखविण्यात आले. कंपनीने टष्ट्वीट करूनही ही बातमी दिली. त्यात म्हटले आहे की, फाल्कनने पहिला टप्पा पार पाडला आहे. अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासाने कंपनीला अभिनंदनाचा संदेश धाडला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे अवकाश संशोधनात एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. अग्निबाण पुन्हा पुन्हा वापरात आल्याने खर्चात कपात होईल. यापूर्वी जूनमध्ये झालेला प्रयोग फसला होता.
 फाल्कनचे तुकडे तुकडे होऊन तो पेटला होता. यावेळी सुधारित असा 23 मजली उंच अग्निबाण केप कनेवेराल हवाई तळावरून अवकाशात झेपावला व अवघ्या 10 मिनिटात आपली कामगिरी पार पाडून तळाच्या दक्षिणेकडील 9 कि.मी. अंतरावरील तळावर परतला.

  • पंतप्रधान आजपासून रशिया भेटीवर :

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी दोन दिवसांच्या रशिया भेटीवर जात आहेत. वार्षिक शिखर बैठकीत ते रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतीन यांच्याशी चर्चा करतील. अणुऊर्जा, हायड्रोकार्बन, संरक्षण आणि व्यापार या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करतानाच सामरिक संबंध बळकट करण्याचा या भेटीमागे उद्देश आहे.
 जुने मित्र अशी ओळख असलेल्या या दोन देशांचे नेते गुरुवारी चर्चेनंतर अणुऊर्जा आणि संरक्षणासह विविध करारांवर स्वाक्षऱ्या करतील. या करारांना अंतिम आकार दिला जात असल्याचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पत्रकारांना सांगितले. मॉस्को आणि नवी दिल्ली येथे 2000 पासून या दोन देशांमध्ये उच्च स्तरावर आलटून-पालटून चर्चा केली जात आहे.
 आर्थिक संबंधाच्या विस्ताराला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून पुढील 10 वर्षांत द्विपक्षीय व्यापार सध्याच्या 10 अब्ज अमेरिकन डॉलरवरून 30 अमेरिकन डॉलरवर नेण्यावर भर असेल. सिरियातील परिस्थिती आणि दहशतवादासारख्या जागतिक मुद्यांवरही दोन नेते चर्चा करतील, ही निश्चितच आमच्यासाठी मोठी कटिबद्धता असेल, असे जयशंकर यांनी म्हटले.


  • पाकिस्तान दौरा करणारे भारताचे चौथे पंतप्रधान :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी टि्वटरवरुन पाकिस्तान भेटीचा कार्यक्रम जाहीर करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मोदींच्या आधी त्यांच्याच पक्षाचे अटलबिहारी वाजपेयी पाकिस्तान दौ-यावर जाणारे शेवटचे भारतीय पंतप्रधान होते. अकरावर्षापूर्वी वाजपेयी पाकिस्तान दौ-यावर गेले होते.
 त्यानंतर आज मोदींनी पाकिस्तानला धावती भेट दिली. योगायोग म्हणजे अटलबिहारी वाजपेयी यांचा आज 91 वा वाढदिवस आहे आणि आजच नवाझ शरीफ यांचाही वाढदिवस आहे.  वाजपेयी 2004 साली 12 व्या शिखर परिषदेसाठी इस्लामाबादला गेले होते. वाजपेयी यांच्यानंतर पंतप्रधान बनलेले मनमोहन सिंग पाकिस्तान दौ-यावर जातील अशी शक्यता होती. मात्र 2008 साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यकाळात पाकिस्तान दौरा केला नाही.
 भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर सहावर्षांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी 1953 साली पाकिस्तान दौरा केला. सप्टेंबर 1960 मध्ये नेहरु एक करार करण्यासाठी पुन्हा पाकिस्तान दौ-यावर गेले होते. त्यानंतर नेहरु यांचे नातू दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी दोनवेळा पाकिस्तान दौ-यावर गेले.
 नेहरु यांच्यानंतर 28 वर्षांनी राजीव गांधी यांनी डिसेंबर 1988 आणि जुलै 1989 मध्ये पाकिस्तान दौरा केला. राजीव गांधी यांनी त्यांच्या पाकिस्तान दौ-यामध्ये पाकिस्तानच्या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्याबरोबर परस्परांच्या अणूऊर्जा प्रकल्पांवर हल्ला न करण्याचा महत्वपूर्ण करार केला होता.





  • दहशतवाद नष्ट करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन :

अफगाणिस्ताची सुरक्षा, विकास आणि प्रशासन यांची क्षमता वाढविण्यासाठी भारत अफगाणिस्तान सरकारला मदत करेल, असे आश्‍वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे दिले.
अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित होऊन प्रत्येक अफगाण नागरिकाला उज्ज्वल भविष्य निर्माण करण्याचा हक्क आहे, असेही मोदींनी या वेळी सांगितले.
रशियाचा दौरा आटोपून पंतप्रधान मोदी आज पहाटे काबूलमध्ये दाखल झाले.
तसेच मोदी यांनी अफगाणिस्तान संसदेच्या नव्या इमारतीचे उद्‌घाटन करून त्यांनी संयुक्त अधिवेशनात संबोधित केले. ही इमारत भारतानेच बांधून दिली असून, यासाठी 9 कोटी डॉलर खर्च आला आहे.
अफगाणिस्तानच्या मृत सैनिकांच्या मुलांसाठी पाचशे शिष्यवृत्त्या देत असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी या वेळी केली. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांच्याशी विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा झाल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली.
तसेच अफगाण विद्यार्थ्यांसाठी भारतातर्फे सुरू असलेली शिष्यवृत्तीही सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

  • एअर इंडियाच्या विमानात मांसाहारी अन्न दिले जाणार नाही :

येत्या 1 जानेवारीपासून एअर इंडियाच्या कुठल्याही विमानात इकॉनॉमी वर्गातील प्रवाशांना 90 मिनिटांचा हवाई प्रवास असेल तर मांसाहारी अन्न दिले जाणार नाही असे सांगण्यात आले.
एअर इंडिया ही राष्ट्रीय हवाई वाहतूक कंपनी असून त्यांनी दुपारच्या जेवणातून चहा व कॉफी काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत एअर इंडियात 90 मिनिटांच्या प्रवासात मांसाहारी व शाकाही अन्न तसेत केक दिला जात असे. आता जानेवारीपासून त्यात बदल करण्यात आले आहेत.
सर्व देशांतर्गत विमानात 61 ते 90 मिनिटांच्या प्रवासात शाकाहारी अन्न दिले जाईल व हा निर्णय 1 जानेवारी 2016 पासून अमलात येईल.

  • चिनी वृत्तवाहिन्यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या रोबोटला दिले माहिती सादरकर्त्यांचे काम :

चीनमधील प्रयोग जगात प्रथमच चिनी वृत्तवाहिन्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या रोबोट म्हणजे यंत्रमानवांना हवामानविषयक माहिती सादरकर्त्यांचे काम दिले आहे.
'लाइव्ह ब्रेकफास्ट' शोमध्ये हा प्रयोग करण्यात आला असून, आता टीव्ही अँकर म्हणजे सादरकर्त्यांचे काम यंत्रमानव सहज करू शकतील अशी आताची बातमी आहे. बातम्या व लेख लिहिणारे यंत्रमानव चीनने आधीच विकसित केले आहेत, पण ते दिलेल्या माहितीच्या आधारे बातमी किंवा लेख लिहून दाखवतात.
बातमीची रचना यंत्रमानवाला व्यवस्थित शिकवता येते व वार्ताहराने आणलेली माहिती त्याला दिली तर तो बातमी तयार करून देणार यात शंका नाही, कारण तो उपलब्ध माहितीच्या आधारे लेख लिहू शकतो हे सिद्ध झाले आहे.

  • जन्म-मृत्यू दाखल्यासह सर्व सरकारी सेवांसाठी योजना :

कार्मिक मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती जन्म-मृत्यू दाखल्यासह सर्व सरकारी सेवांसाठी आता एक पानी सुटसुटीत अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहेत असे सरकारने आज जाहीर केले.
आतापर्यंत वेगवेगळ्या सेवांसाठी जास्त पानांचे अर्ज होते ते आता एक पानाचे करण्यात येत आहेत केंद्रीय कार्मिक मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, जन्म-मृत्यू दाखल्यासह वेगवेगळ्या कामांसाठी मोठे अर्ज भरावे लागतात. आता आम्ही एकच पानांचा अर्ज उपलब्ध करून देत आहोत.
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस हा सुप्रशासन दिन म्हणून साजरा करण्यात आला.त्यानिमित्ताने हा अर्ज जारी करण्यात आला.

  • भारत आणि रशिया यांनी संयुक्तरित्या हेलिकॉप्टर्सची बांधणी करण्याचे ठरवले :

भारत आणि रशिया यांनी संयुक्तरित्या हेलिकॉप्टर्सची बांधणी करण्याचे ठरवले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर जाहीर केले.
कामोव्ह-226 टी हेलिकॉप्टर दोन्ही देशांनी मिळून तयार करण्यासही रशिया तयार असल्याचे संकेत दोन्ही नेत्यांच्या चर्चेत मिळाले होते.
भारतातील दोन ठिकाणी 12 अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याकरिता रशियाशी बोलणी सुरू असल्याचेही मोदी यांनी सांगितले.
  • लोकसभेतील 543 पैकी 15 खासदार अब्जाधीश, तर 443 कोट्यधीश :-

* लोकसभेतील 543 खासदारांपैकी 443 खासदार कोट्यधीश आहेत. यातील 15 खासदार अब्जाधीश आहेत. या अब्जाधीश खासदारांच्या यादीत महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे आणि पूनम महाजन या खासदारांचाही नंबर लागतो
* एडीआर (असोसिएशन डेमोक्रेटिक रिफॉर्म) या संस्थेच्या अहवालानुसार सर्वाधिक श्रीमंत खासदार आंध्र प्रदेशातील आहेत. तेलगू देसम पक्षाचे सीमांध्रच्या गुंटूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार जयदेव गल्ला हे अब्जाधीश खासदारांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहेत.
* एडीआरच्या अहवालानुसार, संसदेत कोट्यधीश खासदारांचं प्रमाण 82 टक्के आहे, तर 18.11 टक्के म्हणजेच 92 खासदार लखपती आहेत
* राजस्थानच्या सीकर मतदारसंघाचे भाजप खासदार सुमेधानंद सरस्वती हे सर्वात गरीब खासदार आहेत यांची वैयक्तित संपत्ती 50 हजार रुपयांहून कमी आहे. सुमेधानंद यांच्या नावे केवळ 34 हजार 311 रुपयांची एकूण संपत्ती आहे
* हे आहेत देशातील १० अब्जाधीश खासदार:
१) जयदेव गल्ला, टीडीपी (गुंटूर, आंध्रप्रदेश) – 683 कोटीहून अधिक संपत्ती
२) कोंडा विश्वेश्वर रेड्डी, टीआरएस (चेवेल्ला, आंध्रप्रदेश) – 528 कोटींहून अधिक संपत्ती
३) गोकारजू गंगा राजू, भाजप (नरसापुरम, आंध्रप्रदेश) – 288 कोटींहून अधिक संपत्ती
४) बुट्टा रेनुका, वायएसआर काँग्रेस (करनूल, आंध्रप्रदेश) – 242 कोटींहून अधिक संपत्ती
५) कमलनाथ, काँग्रेस (छिंदवाडा, मध्यप्रदेश) – 206 कोटींहून अधिक संपत्ती
६) कंवर सिंह तंवर, भाजप (अमरोहा, उत्तरप्रदेश) -178 कोटींची संपत्ती
७) हेमा मालिनी देओल, भाजप (मथुरा, उत्तरप्रदेश) – 178 कोटींची संपत्ती
८) माला राज्यलक्ष्मी शाह, भाजप (टिहरी गढवाल, उत्तराखंड) – 166 कोटींची संपत्ती
९) पिनाकी मिश्रा, बीजेडी (पुरी, ओडिशा) – 137 कोटींची संपत्ती
१०) शत्रुघ्न सिन्हा, भाजप (पटना साहिब, बिहार) – 131 कोटींची संपत्ती
[28/12 11:10 am] VisHaL ThoRaT: 📚चालू घडामोडी (28 डिसेंबर 2015)📚

  • स्टार्ट अप इंडिया"ची अंमलबजावणी 16 जानेवारीपासून :

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी "मन की बात" कार्यक्रमामध्ये नवीन वर्षात "स्टार्ट अप इंडिया"ची अंमलबजावणी 16 जानेवारीपासून सुरू करण्याची घोषणा केली.
 "स्टार्ट अप इंडिया- स्टॅंड अप इंडिया" या योजनेची घोषणा मोदींनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरील भाषणामध्ये केली होती.
 16 जानेवारीपर्यंत स्टार्ट अप- स्टॅंड अप इंडिया या योजनेचा आराखडा पूर्ण केला जाईल. यामध्ये आयआयटी, आयआयएमसारख्या संस्थांमधील तज्ज्ञांचेही योगदान असेल. हे स्टार्ट अप केवळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रासाठीच नसेल, तर प्रत्येक क्षेत्रामध्ये स्टार्ट अप सुरू केले जाऊ शकते. देशाच्या प्रत्येक भागामध्ये हा कार्यक्रम सुरू केला जावा. राज्यांनीही हा कार्यक्रम केवळ काही शहरांपुरता मर्यादित राहणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन केले.
 तसेच "मन की बात" या कार्यक्रमामध्ये, टीका सुरू असलेल्या मुद्‌द्‌यांवर नेहमीप्रमाणे बोलण्याचे टाळून पंतप्रधान मोदींनी पर्यटन व्यवसायाच्या प्रोत्साहनासाठी पर्यटनस्थळांच्या स्वच्छतेचेही आवाहन केले.

  • चीन संसदेत दहशतवादविरोधी कायदा मंजूर :

चीन संसदेने दहशतवादविरोधी कायदा अपेक्षेप्रमाणे मंजूर केला.
 नव्या कायद्यानुसार चीनमध्ये व्यवसाय करत असलेल्या विदेशी कंपन्यांना चीन सरकारला सर्व गोपनीय माहिती देणे बंधनकारक असणार आहे. तसेच माध्यमांवरील बंधनेही कडक होणार आहेत. यामुळे या कायद्याला बराच विरोध होत होता.
 सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत या विधेयकाला मान्यता देण्यात आली होती. पक्षाच्या निर्णयाला संसदेत विरोध होत नसल्याने हा कायदा आज अधिकृतरीत्या संमत करण्यात आला.

  • आधार कार्ड नोंदणी प्रक्रियेत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर :

रेशनिंग, रॉकेल आणि गॅस अनुदानासाठी सक्ती असलेल्या आधार कार्ड नोंदणी प्रक्रियेत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर असून, उत्तर प्रदेशात सर्वाधिक नोंदणीची नोंद करण्यात आली आहे.
 नोव्हेंबर 2015 पर्यंत झालेल्या नोंदणी प्रक्रियेत राज्यात 10 कोटी 14 लाख 26 हजार 370 लोकांनी नोंदणी केल्याचे निदर्शनास आले आहे.
 सर्वाधिक नोंदणी करणाऱ्या राज्यात उत्तर प्रदेशचे नाव पहिले असून यूपीमध्ये एकूण 13 कोटी 32 लाख 51 हजार 914 लोकांनी नोंदणी केल्याचा माहिती आहे.

  • ब्रिटनकडून पुणे शहराला अर्थसाह्य देण्याची घोषणा :

स्मार्ट पुण्याच्या दिशेने एक चांगले पाऊल पडले असून, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी पुणे शहराला दीड कोटी रुपयांचे अर्थसाह्य देण्याची घोषणा ब्रिटनकडून करण्यात आली आहे. पुढील 3 महिन्यांत हा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
 पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनच्या दौऱ्यावर असताना भारतातील पुणे, अमरावती (आंध्र प्रदेश), इंदूर ही तीन शहरे स्मार्ट करण्यासाठी मदतीची घोषणा ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी केली. त्याबाबतचे करारही त्या वेळी करण्यात आले.
 पुणे शहरातील वाहतुकीचा प्रश्न जटिल असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मदतीची तयारी ब्रिटनने दर्शविली आहे.
 ब्रिटन राबवित असलेल्या नावीन्यपूर्ण योजनांची माहिती महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांना देण्यासाठी, ब्रिटनचे शिष्टमंडळ लवकरच पुण्यात येणार आहे.

  • एकाच मुलाचे धोरण आता चीनमध्ये बदलले :

गत तीन दशकांपासून सुरू असलेले एकाच मुलाचे धोरण आता चीनमध्ये बदलले आहे. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या या निर्णयावर सरकारने अधिकृतपणे शिक्कामोर्तब केले आहे.
 सत्तारूढ सरकारने ‘हम दो, हमारे दो’ अर्थात दोन अपत्यांच्या धोरणास आज अधिकृतपणे मान्यता दिली.
 जगातील सर्वांत मोठी दुसरी अर्थव्यवस्था असलेल्या चीनमध्ये एक मूल धोरणामुळे अलीकडच्या काळात काही समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यावर तोडगा म्हणून सरकारने हे धोरणच बदलण्याचा निर्णय घेतला.
 एक जानेवारीपासून नवे धोरण अमलात येणार आहे. गत तीन दशकांपासूनचे जुने धोरण यामुळे संपुष्टात येईल.
 नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीत 159 सदस्यांच्या अनुमतीने याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
 सध्या चीनची लोकसंख्या 1 अब्ज 37 कोटी एवढी आहे.

  • सलमानच्या केकची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद :

वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी सलमानसाठी 400 फूट लांबीचा केक तयार केला आहे. या केकची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात येणार असल्याचं वृत आहे. त्यामुळे सलमानच्या नावावर अजून एक रेकॉर्ड होणार आहे.

  • लेगस्पिनर यासिर शहाला आयसीसीने केले निलंबित :

पाकिस्तानचा फॉर्ममध्ये असलेला लेगस्पिनर यासिर शहाचा डोपिंग चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे आयसीसीने त्याला निलंबित केले आहे. आयसीसीने टि्वटरवरुन यासिर शहाच्या निलंबनाची माहिती दिली.
 यासिरने 13 नोव्हेंबरला 2015 रोजी डोपिंग चाचणीसाठी नमुने दिले होते. वाडाने प्रतिबंधित केलेल्या पदार्थाचे घटक यासिरच्या नमुन्यांमध्ये सापडल्यामुळे यासिरला अनिश्चित काळासाठी निलंबित करण्यात आले.

  • रेल्वे नियामक प्राधिकरणाचे नाव आता रेल्वे विकास प्राधिकरण करण्यात येणार :

रेल्वे खात्यातील विविध विकासकामे करणाऱ्या रेल्वे नियामक प्राधिकरणाचे नाव आता रेल्वे विकास प्राधिकरण करण्यात येणार आहे.
 हे प्राधिकरण मालवाहतूक व प्रवासी वाहतुकीचे दर निश्चित करणार असून त्याच्या जोडीला विकास कामेही करणार आहे. रेल्वे सुधारणांसाठी स्वतंत्र रेल्वे प्राधिकरण स्थापन करण्याची सूचना अनेक समित्यांनी यापूर्वी केली होती.
 आता रेल्वे नियामक प्राधिकरणाचे नाव रेल्वे विकास प्राधिकरण असे केले जाणार असून त्याची भूमिका व्यापक करणार आहे, असे रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.



  • १० हजार कॉलेजांत होणार ‘कौशल्य विकास’


‘स्किल इंडिया’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या देशभरातील १० हजार महाविद्यालयांना यात सहभागी करून घेण्याची योजना केंद्र सरकारने तयार केली आहे. त्यानुसार स्थानिक बेरोजगार तरुणांसाठी सुयोग्य असे रोजगाराभिमुख कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करण्याचे निर्देश अ.भा. तंत्रशिक्षण परिषदेशी (एआयसीटीई) संलग्न १० हजार महाविद्यालयांना देण्यात आले आहेत.‘एआयसीटीई’चे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी सांगितले की, या योजनेची आखणी बरेच दिवसांपासून सुरू होती. मात्र आता सर्व महाविद्यालयांना कौशल्यविकासाचे अभ्यासक्रम सुरू करण्याचे औपचारिक निर्देश देण्यात आले आहेत.
  • वार्षिक १० लाखाचं उत्पन्न असणाऱ्यांना गॅस सबसिडी नाही
वार्षिक १० लाखाचं किंवा त्यापेक्षा अधिक  उत्पन्न असणाऱ्यांना गॅसचे अनुदान नाही मिळनार नाही, हा नियम १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात येईल. नोंदणी असणाऱ्या ग्राहकाचे किंवा त्याच्या पती किंवा पत्नीचे वार्षिक उत्पन्न दहा लाखांवर असेल, तर जानेवारी महिन्यापासून अशा ग्राहकांना बाजारभावाने गॅस सिलिंडर खरेदी करावे लागणार आहेत.  केंद्र सरकारने आज हा महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. लवकरच ह्या योजनेचं परिपत्रक लवकरच निघेल.   यापूर्वी सरकारकारने स्वताच्या  इच्छेने एलपीजी गॅस वर मिळणारे अनुदान दुसऱ्यानां देण्याच अव्हान केले होते. आतापर्यंत ५७ लाख ग्राहकांनी स्वेच्छेने गॅस सिलिंडरवरील अनुदान बंद करण्याचा निर्णय स्वेच्छेने घेतला आह

  • काश्‍मीरमधील शाळा होणार "स्मार्ट' :

तंत्रज्ञानातील भविष्यातील आव्हान पेलविण्यासाठी जम्मू-काश्‍मीरमधील शाळांमध्ये संगणकाद्वारे शिक्षण देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने राज्यातील 220 शाळा "स्मार्ट‘ होणार असून, 132 शाळांमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचा निर्णय सरकारने आज जाहीर केला. पुढील वर्षी मार्च महिन्यापासून हा निर्णय लागू होणार आहे.
 राज्याच्या शिक्षण व सांस्कृतिकमंत्री प्रिया सेठी यांनी याबाबत माहिती दिली. संपूर्ण राज्यातील शाळांमधील अध्यापन व अध्ययन संगणकाद्वारे होणार आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात 220 शाळांमध्ये "ई-लर्निंग‘ सुरू होणार आहे. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण मोहीम आणि माहिती व दळणवळण तंत्रज्ञानांतर्गत केंद्र सरकारने संगणक कक्षासह "स्मार्ट क्‍लासरुम‘साठी मंजुरी दिली आहे. याची पूर्वतयारी झाली असून, "नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजी‘ आणि राष्ट्रीय शिक्षण मोहिमेच्या राज्य प्रकल्प अधिकाऱ्यांमध्ये समझोता करार होणार आहे, असे सेठी यांनी सांगितले.
 राज्यातील 132 शाळांमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट असून, माहिती तंत्रज्ञान, पर्यटन, आरोग्य व रिटेल व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येईल. यासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाशी करार करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 440 शाळांमध्ये ही योजना सुरू करण्यात येणार आहे, असे सेठी म्हणाल्या.
  • 'जीएसटी' पुढील वर्षी :

‘बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित वस्तू आणि सेवा कर विधेयक (जीएसटी) 2016 मध्येच लागू होईल,‘ याचा पुनरुच्चार केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला. राज्यसभेत हे विधेयक मंजूर होण्यासाठी ‘कॉंग्रेसच्या सतत संपर्कात‘ असल्याचेही जेटली यांनी सांगितले.
 "संसदेच्या पुढील अधिवेशनामध्ये ‘जीएसटी‘ मंजूर होईल, अशी आशा आहे. शेवटी, हे विधेयक कॉंग्रेसनेच मांडले होते. राजकीय हेतूंमुळे त्यांनी आता या विधेयकाची अडवणूक सुरू केली आहे; पण हे धोरण कॉंग्रेस अनंतकाळ राबवू शकत नाही. मी सतत त्यांच्या (कॉंग्रेसचे नेते) संपर्कात आहे. विधेयक मंजूर करण्यासाठी कॉंग्रेसच्या संपर्कात राहणे, हे माझे काम आहे आणि ते मी करत राहीन,‘‘ असे जेटली यांनी सांगितले.
 देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने फायदेशीर आणि करप्रणालीचा किचकटपणा दूर करणारे ‘जीएसटी‘ विधेयक गेली अनेक वर्षे राजकीय विरोधामुळे संसदेत प्रलंबित आहे. कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘यूपीए‘ सरकारच्या काळात तत्कालीन विरोधक भाजप आणि इतर पक्षांनी या विधेयकास विरोध केला होता. आता केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर ‘एनडीए‘ सरकारने मांडलेल्या स्वरूपात या विधेयकास मंजुरी न देण्याचे धोरण कॉंग्रेसने स्वीकारले आहे.
 येत्या 1 एप्रिलपासून देशभरात ‘जीएसटी‘ लागू करण्याचा केंद्र सरकारचा मानस होता. मात्र, हिवाळी अधिवेशनामध्येही कॉंग्रेसने कामकाज न होऊ दिल्याने राज्यसभेत हे विधेयक मंजूर होऊ शकले नाही. त्यामुळे या विधेयकाच्या भवितव्याविषयी विचारले असता जेटली म्हणाले, "हे विधेयक प्राप्तिकरासारखे नाही. त्यामुळे नव्या आर्थिक वर्षाच्या सुरवातीपासूनच ते लागू केले पाहिजे, असे बंधन नाही. हा व्यवहारांवरील कर आहे. तो आर्थिक वर्षात कधीही सुरू करता येऊ शकतो.‘‘

  • आंध्र प्रदेश सरकारचा "मायक्रोसॉफ्ट'बरोबर करार :

आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टबरोबर आंध्र प्रदेश सरकारने सामंजस्य करार केला असून, या माध्यमातून मायक्रोसॉफ्ट कंपनी विशाखापट्टणम येथे मोठी गुंतवणूक करणार आहे. विशाखापट्टणम येथे मायक्रोसॉफ्टतर्फे "सेंटर ऑफ एक्‍सलन्स‘ सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आंध्र प्रदेश सरकारतर्फे आज देण्यात आली. यासाठी "मायक्रोसॉफ्ट‘चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्य नाडेला भारतात दाखल झाले असून, त्यांनी आज आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांची हैदराबाद येथे भेट घेतली.
 मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये आंध्र प्रदेश सरकार आणि "मायक्रोसॉफ्ट‘मध्ये सामंजस्य करार झाला. मुख्यमंत्री नायडू आणि नाडेला यांची बैठक जवळपास 80 मिनिटे चालली. राज्य सरकारच्या विविध सेवा आणि योजनांच्या अंमलबजावणीसाठी साह्य करण्याचेही "मायक्रोसॉफ्ट‘ने या वेळी मान्य केले. या सामंजस्य करारानुसार शिक्षण, शेती आणि ई-सिटिझन या क्षेत्रामधील विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी "मायक्रोसॉफ्ट इंडिया‘ सहकार्य करणार आहे. याशिवाय, उत्पादकता वाढविण्यासाठी प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना "मायक्रोसॉफ्ट‘कडून प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

  • मार्टिन गप्टीलच्या 30 चेंडूत 93 धावा :

मार्टिन गप्टीलच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने श्रीलंकेचे 117 धावांचे लक्ष्य अवघ्या 8.2 षटकात पूर्ण केले आणि दहागडी राखून दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या श्रीलंकेचा डाव न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर अवघ्या 117 धावात संपुष्टात आला. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या सलामीवीर गप्टीलने श्रीलंकन गोलंदाजांचा अक्षरक्ष पालापाचोळा केला.
 पहिल्या चेंडूपासून गप्टील श्रीलंकन गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने 30 चेंडून नाबाद 93 धावा तडकवल्या. या त्याच्या खेळीत नऊ चौकार आणि आठ षटकाराचा समावेश होता. समोरच्या टोकाकडून फलंदाजी करणा-या लॅथमने नाबाद 17 धावा केल्या. त्यावरुन गप्टीलच्या वादळी खेळीची कल्पना येते.
 गप्टीलने 13 चेंडूत 46 धावा फटकावल्या. तेव्हा तो दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिविलियर्सचा 16 चेंडूतील अर्धशतकाचा विक्रम मोडण्याच्या जवळ होता. मात्र त्याने नुवान कुलसेखराचे दोन यॉर्कर खेळून काढले. गप्टीलला तो अर्धशतकाच्या विक्रमाच्याजवळ आहे याची कल्पनाच नव्हती. माझ्या विक्रमापेक्षा संघ जिंकला याचा आनंद आहे असे गप्टीलने सांगितले.

  • महिला स्मोकर्समध्ये भारत दुस-या स्थानावर :

भारतात सिगारेट ओढणा-यांची संख्या झपाटयाने कमी होत असली तरी, महिलांचे धुम्रपान करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. धुम्रपान करणा-या महिलांमध्ये अमेरिकेपाठोपाठ भारत दुस-या स्थानावर आहे.
 धुम्रपानासंबंधी आरोग्य मंत्रालयाने संसदेत दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार 2014-15 मध्ये 93.2 अब्ज सिगारेटची विक्री झाली. 2012-13 च्या तुलनेत सिगारेट विक्रीमध्ये 10 अब्जने घट झाली आहे. 2014-15 मध्ये सिगारेटच्या उत्पादनातही 117 अब्जवरुन 105.3 अब्जपर्यंत घसरण झाली आहे.
 भारतात धुम्रपान करणा-यांचे प्रमाण कमी होत आहे ही समाधानाची बाब असली तरी, दुसरी गंभीर बाब म्हणजे भारतात महिला धुम्रपानाची संख्या वाढली आहे. 1980 मध्ये भारतात धुम्रपान करणा-या महिलांचे प्रमाण 53 लाख होते. 2012 मध्ये हेच प्रमाण 1 कोटी 27 लाख झाले आहे. जागतिक तंबाखू सेवनाच्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.
  • 10 वे विश्‍व हिंदी संम्मेलन :-

*विश्‍व हिंदी संम्मेलन हिंदी भाषेतील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय संम्मेलन आहे. यामध्ये जगातील हिंदी विचारवंत, साहित्यकार, पत्रकार, भाषा वैज्ञानिक तसेच हिंदी प्रेमी या संम्मेलनात सहभागी होत असतात.

*नुकतेच 10 वे जागतिक हिंदी संम्मेलन भारतातील मध्यप्रदेश राज्यातील भोपाळ येथे पार पडले या संम्मेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.


*हे संम्मेलन मध्यप्रदेशातील पहिले व भारतातील 32 वर्षांनी आयोजीत केलेले 3 रे संम्मेलन आहे.

*या संम्मेलनाचे आयोजन मध्यप्रदेश राज्य सरकार व परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांनी केले.

*10 जानेवारी 1975 पासून जागतीक हिंदी संम्मेलनाचे आयोजन केले जात आहे.

*पहिले विश्‍व हिंदी संम्मेलन नागपूर येथे पार पडले तेव्हापासूनच 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो.

*9 वे विश्‍व हिंदी संम्मेलन दक्षिण आफ्रिकेत 2012 मध्ये पार पडले.

  • न्या. तीर्थसिंग ठाकूर भारताचे 43 वे सरन्यायधिश -

*सर्वोच्च न्यायालयाचे 43 वे सरन्यायधिश म्हणून न्या.टी.एस.ठाकूर यांनी 3 डिसेंबर 2015 ला राष्ट्रपतीकडून पद व गोपनियतेची शपथ घेतली.

*63 वर्षीय न्या.टी.एस.ठाकूर यांनी 42 वे सरन्यायधिश न्या.एच.एल दतू यांच्याकडून पदभार स्विकारला असून ते 4 जाने 2017 पर्यंन्त सरन्यायधिश म्हणून कार्यरथ राहतील.

*4 जानेवारी 1952 मध्ये पंजाबी काश्मिर कुटुंबात जन्मलेले इंग्लंडमधून (1972) वकीलीची पदवी घेऊन विविध उच्च न्यायालयात मुख्य न्यायधीश म्हणून काम केले आहे.

*2009 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायधिश झाल्यानंतर 2010 मध्ये लिव्हइन रिलेशनशिप, 2014 मध्ये गंगा शुद्धीकरण, BCCI सार्वजनिक स्वरुपाची संस्था आहे असे अनेक महत्त्वाचे न्यायालयीन निर्णय घेतले आहे.

*टि.एस.ठाकूर यांना न्यायीक वारसा वडीलाकडून मिळाला होता. त्यांचे वडील जम्मू काश्मिर न्यायालयात न्यायाधिश होते. नंतर ते सोडून जम्मू काश्मिरचे उपमुख्यमंत्री झाले.

भारतीय सरन्यायधिशासंबंधी थोडक्यात -

* भारताचे पहिले सरन्यायधिश - एच.के. कानिया

*सर्वाधिक काळ राहिलेले सरन्यायधिश - वाय.व्हि.चंद्रचुड (फ्रेबु- 1978 - जूलै 1985)

* सर्वात कमी काळ राहिलेले सरन्यायधिश - के.एन.सिंग (17 दिवस)

*भारताचे पहिले दलीत सरन्यायधिश - न्या.के.जी.बाळकृष्णन

*भारताचे सरन्यायधिश होणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती - पी.बी. गजेन्द्रगडकर

* स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले सरन्यायधिस - एस.एच.कपाडिया

  • राज्यातील पहिले निर्भया केंद्र पुण्यात स्थापन -

*केंद्रसरकारच्या महिला व बालकल्याण मंत्र्यालयाच्या वतीने पीडीत महिलांना मदत करण्यासाठी राज्यतील पहिले निर्भया केंद्र पुण्यात सुरू होणार आहे.

*दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर पीडीत महिलांना मदत करण्यासाठी अर्थसंकल्पात एक हजार कोटी रूपयाची तरतूद केली होती.

*त्या निधीतून प्रत्येक राज्यात एक निर्भया केंद्र (वन स्टॉप सेंटर) निर्माण करण्याचे धोरण ठरविले होते. त्यानुसार या केंद्राला मान्यता देण्यात आली आहे.

*हे केंद्र मुंढवा येथे स्थापन होणार असून या केंद्रासाठी माहेर या मुलीच्या राज्यगृहातील जागा आयुक्तलयाने सुचविली आहे.



  • फॉर्च्युन इंडीयाच्या यादीत अरूंधती भट्टाचार्य प्रथम -

*फॉर्च्यून इंडीयाच्या यादीत भारतीय उद्योग क्षेत्रातून बँक ऑफ इंडीयाच्या पहिल्या महिला अध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य यांना पहिला क्रमांकमिळाला आहे.

*या यादीत आयसीआयसीआयच्या चंद्रा कोचर यांना दुसरा तर अ‍ॅक्सीस बॅकेच्या शिखा शर्मा यांना तिसरा क्रमांक मिळाला आहे.

* तर निशी वासुदेव चौथे, झिया मोदी व अरुणा जयंती यांना पाचवे स्थान मिळाले आहे.

*फॉर्च्यून इंडीयाने बॅकिंग, वितपुरवठा, उर्जा, आरोग्यसेवा, माध्यमे, मनोरंजन, फॅशन अशा विविध क्षेत्रात प्रतिनिधीत्व करणार्‍या महिलांचा आपल्या यादीत समावेश केला आहे.

  • आयसीसी क्रिकेट पुरस्कार - 2015

*आंतरराष्ट्रीय क्रिकेट परीषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या वार्षीक पुरस्कार यादीत ऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्टीव्ह स्मिथ हा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आणि कसोटीपटू ठरला आहे.

*या पुरस्कारात ऑस्टेलिया द आफ्रिकेच्या खेळाडूंनी पुरस्कारात आघाडी घेतली पण भारतातील एकही खेळाडूला स्थान मिळाले नाही.

*यावर्षाचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी पटकाविणारा स्टीव्ह स्मिथ हा ऑस्ट्रेलियाचा चौथा तर जगातील 11 वा खेळाडूठरला आहे.

*याआधी रिकी पाँटींग (2006,7) मिशेल जॉन्सन (2009, 14), मायकेल क्लार्क (2013), राहूल द्रविड (2004) अ‍ॅण्डयू फिन्टॉफ आणि जॅक कालीस (2005) शिवनारायण चंद्रपाल (2008) सचिन तेंडूलकर (2010) जोनाथन ट्रॉट (2011) कुमार संघकारा (2012) यांना हा मान मिळाला आहे.

*द.आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलियर्स याला सलग दुसर्‍यांदा वर्षाखालील सर्वोत्कृष्ट वनडे खेळाडूंचा मान मिळाला आहे.

आयसीसीचे इतर पुरस्कार विजेते-

*सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू - स्टीव्ह स्मिथ (ऑस्टेलिया)

*सर्वोत्कृष्ट कसोटीपटू - स्टीव्ह स्मिथ (ऑस्टेलिया)

*सर्वोत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेटपटू -ए.बी.डिव्हिलिअर्स (द.आफ्रिका)

*सर्वोत्कृष्ट टी -20 खेळाडू - फाफ डुप्लेसिस (द.आफ्रिका)

*सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू - मेग लेनिंग (ऑस्टेलिया)

*सर्वोत्कृष्ट महिला टी - 20 क्रिकेटपटू - स्पेफनी टेलर (वेस्ट इंडीज)

* सर्वोत्कृष्ट प्रतिभावन खेळाडू - जोश हेजलवूड (ऑस्टेलिया)

*स्पिरीट ऑफ क्रिकेट पुरस्कार - ब्रेन्डन मॅक्यूलम (न्यूझीलंड)

* आयसीसी सर्वोत्कृष्ट अंपायर - रिचर्ड केटलवरी (सलग तिसर्‍यांदा)


  • ‘टॉप टेन’ वृत्तपत्रांत ‘सकाळ’च्या पुणे आवृत्तीने स्थान पटकावले :

‘रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स इन इंडिया’च्या (आरएनआय) ताज्या अहवालानुसार देशातील सर्वाधिक खप असणाऱ्या ‘टॉप टेन’ वृत्तपत्रांत ‘सकाळ’च्या पुणे आवृत्तीने स्थान पटकावले आहे.
 मराठी भाषिक वृत्तपत्रांमध्ये तर ‘सकाळ’ पुणे अव्वल स्थानीच आहे; तर देशातल्या प्रांतीय भाषिक वृत्तपत्रांत ‘सकाळ’ तिसऱ्या स्थानावर आहे.
 देशात वृत्तपत्रांची वाढ 5.8 टक्के या वेगाने होत असल्याचेही या अहवालामध्ये म्हटले आहे.
 देशातील वृत्तपत्रांच्या नोंदणीची सर्वोच्च संस्था असलेल्या ‘आरएनआय’च्या ‘प्रेस इन इंडिया’ या ताज्या अहवालानुसार, एका आवृत्तीच्या सर्वाधिक खपाच्या भाषिक वृत्तपत्रांच्या (हिंदी, इंग्रजी वगळून उर्वरित) भारतातील ‘टॉप टेन’च्या यादीत स्थान पटकावण्याचा मान मराठी वृत्तपत्रांमध्ये केवळ ‘सकाळ’च्या पुणे आवृत्तीला मिळाला आहे.
 या श्रेणीत पश्‍चिम बंगालमधील ‘आनंदबझार पत्रिका’ आणि ‘बर्तमान’ या दैनिकांबरोबरच तीन हिंदी आणि चार इंग्रजी भाषिक दैनिकांचा समावेश आहे.
 तसेच दुसऱ्या क्रमांकावरील इंग्रजी दैनिकांचा खप 11.40 टक्के आहे. मराठी दैनिके उर्दू व तेलगू भाषांनंतर पाचव्या स्थानी आहेत.

  • केंद्र सरकारची 3050 कोटी रुपयांच्या अर्थसाह्याची घोषणा :

दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला केंद्र सरकारने 3050 कोटी रुपयांच्या अर्थसाह्याची घोषणा केली आहे. नैसर्गिक आपत्तीग्रस्त राज्यांच्या मदतीसाठी असलेल्या उच्चस्तरीय समितीची बैठक होऊन त्यात मदतीचा निर्णय झाला.
 राष्ट्रीय आपत्तीनिवारण निधीतून (एनडीआरएफ) ही मदत मिळणार असून, मध्य प्रदेशलाही 2033 कोटी रुपयांचे अर्थसाह्य दिले जाईल.
 महाराष्ट्रात 21 जिल्ह्यांमधील 15747 गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती असून, राज्य सरकारने केंद्राकडे चार हजार कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केली होती.

  • लेखक रघुवीर चौधरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर :

थोर स्वातंत्र्यसेनानी जयप्रकाश नारायण यांच्या नवनिर्माण आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याबरोबरच "आणीबाणी‘ला कडाडून विरोध करणारे आणि विपुल साहित्यसंपदा निर्माण करणारे ज्येष्ठ गुजराती लेखक रघुवीर चौधरी यांना यंदाचा साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला.
 साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या लेखक, कवींना दरवर्षी या पुरस्काराने गौरविले जाते.
 गतवर्षी मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
 ज्ञानपीठ मिळविणारे चौधरी हे चौथे गुजराती लेखक आहेत. यापूर्वी उमा शंकर जोशी (1967), पन्नालाल पटेल (1985) आणि राजेंद्र शाह (2001) यांना हा पुरस्कार मिळाला होता.
 सरस्वतीची प्रतिमा, प्रशस्तिपुस्तक आणि रोख 11 लाख रुपये, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
 चौधरी यांचा जन्म 5 डिसेंबर 1938 मध्ये गुजरातमधील गांधीनगरजवळील बापुपुरा खेड्यात शेतकरी कुटुंबात झाला.
 गुजरात विद्यापीठातच ते 1977 मध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले आणि प्रोफेसर म्हणून 1998 मध्ये निवृत्त झाले.
 हाडाचे शिक्षक म्हणून चौधरी यांची ओळख आहे. एकीकडे ज्ञानदान करतानाच गुजराती साहित्यात त्यांनी विविध विषयांवर विपुल लिखाण केले आहे.

  • नीति आयोगाचे सीईओ म्हणून अमिताभ कांत यांची निवड :

नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून वरिष्ठ आयएएस अधिकारी अमिताभ कांत यांची केंद्र सरकारने निवड केली आहे.
 केरळ केडर्स आयएएसचे ते 1980च्या तुकडीचे ते अधिकारी असून, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्याही उद्योग धोरण विभागाच्या सचिवपदाची अतिरिक्त जबाबदारीही त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
 कांत यांनी अनेक खात्यांचे सचिव म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव म्हणून संजय मित्रा यांची निवड करण्यात आली आहे. सरकारने अन्य खात्यांच्याही सचिवांची निवड केली आहे.

  • प्रसिद्ध गायक सुबीर सेन यांचे निधन :

प्रसिद्ध गायक सुबीर सेन (वय 81) यांचे आज एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले.
 आ जा रे नैन द्वारे (रूप की रानी चोरों का राजा), गोरी तेरे नटखट नैना वार करे चुप जाये (हम भी इन्सान है) यांसह त्यांच असंख्य गाणी गाजलेली आहेत. बंगालीमधील गाणी लोकप्रिय ठरली आहेत.

  • पत्रकारांसाठी भारतच अधिक धोकादायक :

आशियामध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये दहशतवादाचा बळी ठरलेल्या नागरिकांची संख्या अधिक असली, तरी पत्रकारांसाठी मात्र भारतच अधिक धोकादायक असल्याचे एका संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.
 सरत्या वर्षांत विविध हल्ल्यांमध्ये भारतातील नऊ पत्रकारांना जीव गमवावा लागला आहे.
 "रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर" या संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, या वर्षांत जगभरातील विविध घटनांमध्ये 110 माध्यम प्रतिनिधींचा बळी गेला आहे. यापैकी 43 पत्रकारांच्या हत्येचे कारण समजलेले नाही.
 भारतात मारल्या गेलेल्या पत्रकारांची संख्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात मारल्या गेलेल्या पत्रकारांच्या संख्यपेक्षा अधिक आहे.

  • इस्राईलच्या माजी पंतप्रधानांना तुरुंगवासाची शिक्षा :

इस्राईलच्या माजी पंतप्रधानांना येथील सर्वोच्च न्यायालयाने दीड वर्षे तुरुंगवासाची शिक्षा
 लाच घेतल्याप्रकरणी इस्राईलच्या माजी पंतप्रधानांना येथील सर्वोच्च न्यायालयाने दीड वर्षे तुरुंगवासाची शिक्षा आज (मंगळवार) सुनावली. तुरुंगवास भोगावा लागणारे एहुद ओल्मर्ट हे इस्राईलचे पहिलेच माजी पंतप्रधान आहेत. ओल्मर्ट यांच्यावर 1,28,500 डॉलरची लाच घेतल्याचा आरोप होता.एहुद ओल्मर्ट हे आता 70 वर्षांचे आहेत. 2006 ते 2009 या कालावधीमध्ये ते इस्राईलचे पंतप्रधान होते.
 गेल्या दशकाच्या सुरवातीस विविध कामांसाठी लाच स्वीकारल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता.
 या प्रकरणी 2014 च्या मेमध्ये ओल्मर्ट यांना दोन प्रकरणांमध्ये मिळून एकूण सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
 सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात ओल्मर्ट यांना दोषमुक्त केले आणि त्यांची शिक्षा कमी करून दीड वर्षांचा तुरुंगवास भोगण्याचा आदेश दिला. या शिक्षेच्या अंमलबजावणीची सुरवात 15 फेब्रुवारी 2016 पासून होईल.

  • खासगी क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांना 26 आठवड्यांची प्रसूती रजा :

खासगी क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांना 26 आठवड्यांची प्रसूती रजा देण्याबाबत केंद्र सरकार विचार करत असल्याची माहिती महिला आणि बालविकासमंत्री मेनका गांधी यांनी दिली आहे.
 नवजात बालकाची जन्मानंतर काळजी घेण्यासाठी प्रसूती रजेच्या कालावधीत वाढ करण्याची मागणी गांधी यांनी कामगार मंत्रालयाला लिहिलेल्या पत्राद्वारे केली आहे.

  • केरळमध्ये फक्त पंचतारांकित हॉटेल्सनाच बारचा परवाना :

सुप्रीम कोर्टाने केरळमध्ये फक्त पंचतारांकित हॉटेल्सनाच बारचा परवाना देण्याच्या राज्य सरकारच्या मद्य धोरणावर शिक्कामोर्तब केले.
 यामुळे आता पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण असलेल्या आणि ‘गॉड्स ओन कन्ट्री’ अशी ओळख असलेल्या केरळमध्ये मद्यशौकिनांना पंचतारांकित हॉटेल्समधील फक्त 24 बारमध्येच आपली तल्लफ भागविता येईल.

  • गिनी देश इबोला व्हायरसमुक्त झाल्याचे जाहीर :

जागतिक आरोग्य संघटनेने गिनी देश इबोला व्हायरसमुक्त झाल्याचे जाहीर केले.
 गेली दोन वर्षे देशात इबोलाने 2500 लोकांचे प्राण घेतले.

  • ‘आयफेल टॉवर’ बनला‘ट्विटर’चा अधिकृत सदस्य :

जगप्रसिद्ध ताजमहाल व स्टॅच्यू ऑफ लिबर्टीने 126 वर्षे जुन्या आयफेल टॉवरचे ट्विटरवर स्वागत केले आहे. जगात सर्वाधिक पर्यटक आकर्षित करणारा ‘आयफेल टॉवर’ गेल्या आठवड्यात ‘ट्विटर’चा अधिकृत सदस्य बनला.
 आयफेल टॉवरने आपल्या अकाऊंटवर पहिले ट्विट फ्रेंच आणि इंग्रजी भाषेत केले आहे.

  • नवीन चित्रफीत जारी :

अवकाशातील कचरा खूप मोठय़ा प्रमाणात वाढला असून त्याबाबतची एक व्हिडिओ नुकतीच जारी करण्यात आला आहे.
 युनिव्हर्सटिी कॉलेज लंडन या संस्थेचे स्टुअर्ट ग्रे यांनी अवकाशातील कचऱ्याबाबतचा व्हिडिओ तयार केला असून त्यात 1957 पासून 2015 पर्यंत अवकाशातील कचरा कसा वाढत गेला हे दाखवले आहे. रशियाने 1957 मध्ये स्पुटनिक हा पहिला उपग्रह अवकाशात सोडला तेव्हापासून अवकाशात कचरा निर्माण होण्यास सुरुवात झाली होती.
 अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार अवकाश कचऱ्याचे वीस हजार तुकडे असून त्यात अग्निबाणांचे सुटे भाग, निकामी उपग्रह व इतर वस्तूंचा समावेश आहे त्यांचा आकार सॉफ्टबॉलपेक्षा जास्त आहे.

  • महिलांना मदतीसाठी संपूर्ण भारतभरात एकच क्रमांक :

मोबाइल फोनमध्ये स्त्रियांच्या सुरक्षितेतेसाठी इशारा देणारी यंत्रणा बसवण्यास मोबाइल कंपन्यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या महिला आता मोबाइलवरील संकटमोचक बटण दाबून मदत मागू शकतील, असे केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी सांगितले.
 पुढील वर्षांत मार्चपासून असे मोबाइलमध्ये अशी यंत्रणा उपलब्ध केली जाणार आहे. याबाबत अनिवार्य र्निबध दूरसंचार खाते लागू करणार आहे.
 मोबाइल उत्पादकांशी चर्चा करून ही यंत्रणा बसवण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेसाठी आम्हाल एक वर्ष लागले व आता नवीन व जुन्या फोनमध्येही ही सुविधा देता येणार आहे.
 महिला संकटात असेल तर तिने हे बटण दाबल्यास पोलिसांना संदेश जाणार आहे. हे बटण असलेले नवीन फोन मिळणे सुरू झाल्यावर जुन्या फोनमध्येही ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
 त्यासाठी किमान 10 हजार केंद्रे सुरू केली जातील.
 तसेच मोबाइलमध्ये या बटणाची सुविधा देण्यात येईल. नवीन व जुन्या फोनमध्ये ही सुविधा करण्यासाठी कंपन्या तांत्रिक पातळीवर प्रयत्न करीत आहेत.
 महिलांना मदतीसाठी संपूर्ण भारतभरात एकच क्रमांक उपलब्ध केला जाणार आहे, त्यामुळे पोलिस, विधी, वैद्यकीय व समुपदेशन केंद्रांना हिंसापीडित महिलेचा संदेश जाणार आहे.



  • ज्ञानपीठ पुरस्कार 2015:-
------------------------------------------------------------------------------------------------
* उपरवास’ कादंबरीसाठी १९७७ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळविणारे गुजरातचे ज्येष्ठ कादंबरीकार, कवी, समीक्षक रघुवीर चौधरी यांना प्रतिष्ठेचा ५१ वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला

* गुजरातमध्ये बापुपुरा येथे ५ डिसेंबर १९३८ रोजी जन्मलेल्या चौधरी यांनी कादंबरी, कविता, नाटक अशा विविध साहित्यांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ‘संदेश’, ‘जन्मभूमी’, ‘निरीक्षक’ आणि ‘दिव्य भास्कर’ अशा विविध दैनिकांमध्ये स्तंभलेखक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे.

* चौधरी यांनी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य म्हणूनही काम केले आहे. २००२ ते २००४ या कालावधीत ते भारतीय चित्रपट महोत्सवात निवड समिती सदस्य म्हणून कार्यरत होते.

* हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळविणारे ते चौथे गुजराती साहित्यिक ठरले आहेत. याआधी उमा शंकर (१९६७), पन्नालाल पटेल (१९८५) आणि राजेंद्र शाह (२००१) या गुजराती साहित्यिकांना हा पुरस्कार देण्यात आला आहे

* रघुवीर चौधरी यांची साहित्यसंपदा
‘तमाशा’ (१९६५) ‘वृक्ष पतन्मा’ (१९८५) या कवितासंग्रहांच्या माध्यमातून चौधरी यांनी मांडलेल्या विविध कल्पना मानवी मनाला परिस्पर्श करणाऱ्या आहेत. ‘अर्मिता’ (१९६५) ही कादंबरी अस्तित्ववादाच्या संकल्पना मांडणारी आहे. ‘रुद्रमहालया’ (१९७८) आणि ‘सोमतीर्थ’ (१९९६) या कादंबऱ्याही ऐतिहासिक आणि लोकप्रिय ठरल्या. त्याचप्रमाणे ‘वेणू वात्सल’ (१९६७), ‘पूर्वरंग’, ‘लागणी’ (१९७६), ‘एक दाग अगल बे दाग पच्छल’ (२००९) या अन्य कादंबऱ्याही खूप प्रसिद्ध ठरल्या.

#पुरस्कराविषयी:-
* भारतीय सहित्य क्षेत्रातील हा सर्वोच्य मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जातो

* सहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल १९६५सालापासून हा पुरस्कारदिला जातो

* ११लाख रु रोख स्मृतीचिन्ह मानपत्र व वाग्देवीची प्रतिमा प्रदान केली जाते.

* १९६५ साली जी .शंकर कुरूप (मल्याळम ) यांना हा पुरस्कारदेण्यात आला होता
२०१३:- श्री केदारनाथ सिंह (हिंदी )
२०१४:- भालचंद्र नेमाडे (मराठी )

* भालचंद्र नेमाडे यांना हिंदू या चर्चित कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला होता हा पुरस्कार मिळवणारे नेमाडे हे चौथे मराठी सहित्यीक ठरले होते
ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे मराठी सहित्यीक
१९७४:- वि. स . खांडेकर (ययाती)
१९८७:- वि.वा शिरवाडकर (विशाखा)
२००३:- वि. दा. करंदीकर (अष्टदर्शन)
२०१४:- भालचंद्र नेमाडे (हिंदू)


  • राज्यातील 18 अतिरिक्त "सीईओं'ना पदोन्नती :

राज्यातील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पदोन्नती (निवडश्रेणी) देण्याचा गेल्या वीस वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्‍न राज्याच्या ग्रामविकास व जलसंधारणमंत्री पंकजा मुंडे यांनी अखेरीस मार्गी लावला. नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांनी राज्यातील 18 अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवडश्रेणीत घेऊन पदोन्नती दिली आहे.
 महाराष्ट्र विकास सेवेतील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गात पदोन्नतीच्या संधी कमी प्रमाणात असल्यामुळे या संवर्गात निर्माण झालेली कठीणता दूर करण्यासाठी दिवंगत माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनीही पाठिंबा दिला होता. पंकजा मुंडे यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गातील काही पदे निवड श्रेणीत रूपांतरित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

  • अरबी समुद्रात नौदलाने घेतली यशस्वी चाचणी :

जहाजाच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करण्याची क्षमता असलेल्या बराक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी आज "आयएनएस कोलकता‘ या विनाशिकेवरून घेण्यात आली. बराक क्षेपणास्त्रामुळे आता भारतीय नौदलाच्या संहारक शक्तीमध्ये वाढ झाल्याचे मानले जाते.
 नौदलाच्या जहाजाच्या पृष्ठभागावरून हवेतील लक्ष्याचा वेध घेणाऱ्या बराक क्षेपणास्त्राची मारक क्षमता सुमारे 70 किलोमीटर एवढी आहे. नौदलाकडे असलेल्या क्षेपणास्त्रांच्या ताफ्यात लवकरच "बराक‘चा समावेश केला जाणार आहे. नौदलाच्या "आयएनएस कोलकता‘ या विनाशिकेवरून काल आणि आज दोन बराक क्षेपणास्त्रे हवेतील अतिवेगवान लक्ष्याच्या दिशेने डागण्यात आली. दोन्ही क्षेपणास्त्रांनी अचूक लक्ष्यभेद केल्याची माहिती नौदलाने जारी केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे.
 अरबी समुद्रात सध्या नौदलाचा सराव सुरू आहे. या सरावादरम्यान "बराक‘ची चाचणी घेण्यात आली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि भारतीय नौदलाने इस्राईलच्या मदतीने ही चाचणी घेतली. बराकच्या यशस्वी चाचणीनंतर अवकाशातील मोठ्या अंतरावरील लक्ष्याचा भेद घेण्याची भारतीय नौदलाची क्षमता वाढली असल्याचे सांगण्यात आले. इस्राईल एरोस्पेस इंडस्ट्रीज आणि हैदराबाद येथील "डीआरडीओ‘च्या प्रयोगशाळेने संयुक्तपणे "बराक‘ची निर्मिती केली आहे.

  • जीवनगाणे शिकवणारे कवी मंगेश पाडगावकर यांचे निधन :

‘येणार असेल, मरण तर येऊ द्यावं; जमलंच तर लाडानं जवळ घ्यावं,‘ असे सांगताना लहानग्यांपासून आबालवृद्धांपर्यंत सर्वांनाच जगण्यावर शतदा प्रेम करायला शिकवणारे प्रेमकवी आणि महाराष्ट्र भूषण मंगेश पाडगावकर (वय 86) यांचे बुधवारी शीव येथील घरी दीर्घ आजाराने निधन झाले. नववर्षाचा सूर्य उगवायला अवघा एक दिवस बाकी असताना या साहित्यसूर्याच्या सकाळीच झालेल्या अस्तामुळे साहित्यविश्‍वावर शोककळा पसरली.
 शीव येथील "साईप्रसाद‘ इमारतीतील घरात त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अत्यवस्थ होती. "अखेरचा श्‍वास मी माझ्या घरात घेणार‘ या त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या खोलीतच "आयसीयू‘ कक्ष तयार करण्यात आला होता. मंगळवारी रात्रीपासून त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
 "लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती‘, असे म्हणत त्यांच्या स्मृती रसिकांच्या मनात कायमच्या ठेवून कवितेच्या विश्‍वातली ही प्रेमकहाणी अधुरी सोडून मंगेश पाडगावकर गेले. काही वर्षांपासून त्यांना नागीण झाली होती. या आजाराने त्यांचा पिच्छा सोडला नव्हता. असह्य वेदना होत असतानाही "या नागिणीच्या मिठी‘बाबत ते मिश्‍कीलपणे बोलत असत.
 साहित्यविश्‍वाचा श्‍वास असलेल्या या महान कवीच्या निधनाची वार्ता समजताच शीव येथील त्यांच्या निवासस्थानी चाहत्यांनी गर्दी केली होती. कवितेच्या या तेजस्वी ताऱ्याला अखेरचा सलाम करण्यासाठी राहत्या घरी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी यशोदा, मुलगा अजित, अभय व मुलगी अंजली कुलकर्णी व तनुश्री, तनय, रूपक ही नातवंडे असा परिवार आहे.

  • वहिदा रेहमान यांना विशेष पुरस्कार :

सहाव्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री वहिदा रेहमान यांना विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला. चित्रपट महोत्सवाच्या उद्‌घाटन सोहळ्यात म्हणजेच 22 जानेवारीला सायंकाळी चार वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरच्या मुख्य सभागृहात शरद पवार यांच्या हस्ते त्यांना तो प्रदान करण्यात येणार आहे. हा चित्रपट महोत्सव 22 ते 28 जानेवारीदरम्यान चव्हाण सेंटरमध्ये होणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे संचालक जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 जब्बार पटेल म्हणाले की, वहिदा रेहमान यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यांनी मोठमोठ्या दिग्दर्शकांसोबत काम केले असून त्या अष्टपैलू अभिनेत्री आहेत. चित्रपटसृष्टीतील भरीव योगदानाबद्दल यंदाचा विशेष पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना देण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने हा चित्रपट महोत्सव होणार आहे. चव्हाण सेंटरच्या इमारतीत मुख्य सभागृह, रंगस्वर व सांस्कृतिक सभागृह या तिन्ही सभागृहात दररोज पाच चित्रपटांचे प्रदर्शन केले जाईल. डीसीपी, ब्ल्यूरे, डीव्हीडी, डीजीबीटाचा वापर त्यासाठी केला जाईल. पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळालेला चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर मुख्य सभागृहात दाखवला जाणार आहे.
 महोत्सवांतर्गत एकूण 75 चित्रपट प्रदर्शित केले जातील. त्यात ग्लोबल सिनेमा विभागात 40, रिट्रॉस्पेक्‍टिव्ह विभागात 5, कंट्री फोकस विभागात 7, इंडियन सिनेमा विभागात 5, मराठी सिनेमा विभागात 5, स्टुडंट कॉम्पिटिशन विभागात 10 चित्रपटांचा समावेश असेल. महोत्सवाच्या काळात दररोज सकाळी साडेदहा वाजता चित्रपटांचे प्रदर्शन सुरू होईल.

  • ओडिशाचे 'ऑपरेशन स्माइल-2' :

हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी तसेच त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी ओडिशा सरकारने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन स्माइल‘ या मोहिमेला पहिल्या टप्प्यात चांगले यश आल्याने या मोहिमेचा दुसरा टप्पा नव्या वर्षात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 गुन्हे शाखेच्या कटक येथील मुख्यालयामध्ये झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीस विविध जिल्ह्यांमधील शंभर पोलिस अधिकारी उपस्थित होते. या मोहिमेसाठी दहा पोलिसांची पथके स्थापन करण्यात आली आहेत.

  • अणु कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी :

ऑस्ट्रेलियासोबतच्या नागरी अणु सहकार्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. यामुळे भारतातील अणुभट्ट्यांसाठी ऑस्ट्रेलियाकडून युरेनिअम पुरवठ्याचा मार्ग सुकर झाला आहे. गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियाचे तत्कालिन पंतप्रधान टोनी अबॉट यांच्यासोबत हा करार करण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाचे सध्याचे पंतप्रधान माल्कर टर्नबुल यांनी 15 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या करारासाठीचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले असून, त्याची अंमलबजावणी केली जाऊ शकते, असे स्पष्ट केले होते.
 सध्या ऑस्ट्रेलियाकडे युरेनिअमचा मोठा साठा आहे. युरेनिअमच्या साठ्याच्या दृष्टीने जगात ऑस्ट्रेलियाचा तिसरा क्रमांक लागतो, असे जागतिक अणु संघटनेने आणि आस्ट्रेलियातील सरकारने म्हटले आहे. ऑस्ट्रेलिया अणुऊर्जेचा वापर करीत नसल्यामुळे त्यांच्याकडील युरेनिअमची जास्तीत जास्त निर्यातच केली जाते.
 अणुऊर्जेचा विस्तार करण्याची योजना आखल्यामुळे भारतासाठी युरेनिअमचा पुरवठा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीने या कराराला अत्यंत महत्त्व आहे.

  • मुंबईच्या आयुक्तपदी दत्ता पडसलगीकर :

अहमद जावेद यांच्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तपदाची धुरा दत्ता पडसलगीकर यांच्याकडे सोपविली जाण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. ‘आयबी’मध्ये कार्यरत असलेल्या पडसलगीकर यांना पुन्हा ‘होम केडर’ म्हणजेच महाराष्ट्रासाठी रिलिव्ह करावे, असे पत्र राज्य सरकारकडून केंद्रीय गृहविभागाला पाठविण्यात आले आहे.
 पडसलगीकर यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून मुंबईत परतण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे त्यांची निवड निश्चित असल्याचे गृहविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. आयुक्तपदासाठी त्यांच्या स्पर्धेत असलेल्या संजय बर्वे यांचे नाव मागे पडले आहे. विद्यमान आयुक्त अहमद जावेद यांची सौदी अरेबियाच्या राजदूतपदी नियुक्ती जाहीर झाली. तथापि, 31 जानेवारीपर्यंत ते सेवेत असतील. राज्य सरकारने गेल्या आठ सप्टेंबरला आकस्मिकपणे राकेश मारिया यांची पदोन्नती करून, आयुक्तपदाची धुरा अहमद जावेद यांच्याकडे सोपवली. जावेद यांना जेमतेम पावणेपाच महिन्यांचा कालावधी मिळणार, हे निश्चित होते.
 20 दिवसांपूर्वी त्यांची सौदी अरेबियाच्या राजदूतपदी नियुक्ती केल्याचे केंद्रीय गृहविभागाने जाहीर केले, तसेच जावेद यांच्यासाठी ‘अपग्रेड’ केलेले आयुक्तपद पुन्हा ‘डाउन ग्रेड’ करून अप्पर महासंचालक दर्जाचे करण्याचा निर्णय झालाआहे. त्यानुसार, आयबीत कार्यरत असलेले दत्ता पडसलगीकर व संजय बर्वे यांची नावे चर्चेत होती.त्यात पडसलगीकर यांना पसंती देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यानुसार, गृहविभागाने केंद्रीय गृहविभागाला पत्र पाठवून त्यांना ‘होम केडर’साठी रिलीव्ह करावे,

1 टिप्पणी: