Post views: counter

Current Affairs Jan- 2016 Part - 1


  • राज्यातील 18 अतिरिक्त "सीईओं'ना पदोन्नती :
राज्यातील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पदोन्नती (निवडश्रेणी) देण्याचा गेल्या वीस वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्‍न राज्याच्या ग्रामविकास व जलसंधारणमंत्री पंकजा मुंडे यांनी अखेरीस मार्गी लावला. नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांनी राज्यातील 18 अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवडश्रेणीत घेऊन पदोन्नती दिली आहे. महाराष्ट्र विकास सेवेतील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गात पदोन्नतीच्या संधी कमी प्रमाणात असल्यामुळे या संवर्गात निर्माण झालेली कठीणता दूर करण्यासाठी दिवंगत माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनीही पाठिंबा दिला होता. पंकजा मुंडे यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गातील काही पदे निवड श्रेणीत रूपांतरित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
  • अरबी समुद्रात नौदलाने घेतली यशस्वी चाचणी :
जहाजाच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करण्याची क्षमता असलेल्या बराक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी आज "आयएनएस कोलकता‘ या विनाशिकेवरून घेण्यात आली. बराक क्षेपणास्त्रामुळे आता भारतीय नौदलाच्या संहारक शक्तीमध्ये वाढ झाल्याचे मानले जाते. नौदलाच्या जहाजाच्या पृष्ठभागावरून हवेतील लक्ष्याचा वेध घेणाऱ्या बराक क्षेपणास्त्राची मारक क्षमता सुमारे 70 किलोमीटर एवढी आहे. नौदलाकडे असलेल्या क्षेपणास्त्रांच्या ताफ्यात लवकरच "बराक‘चा
समावेश केला जाणार आहे. नौदलाच्या "आयएनएस कोलकता‘ या विनाशिकेवरून काल आणि आज दोन बराक क्षेपणास्त्रे हवेतील अतिवेगवान लक्ष्याच्या दिशेने डागण्यात आली. दोन्ही क्षेपणास्त्रांनी अचूक लक्ष्यभेद केल्याची माहिती नौदलाने जारी केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे.अरबी समुद्रात सध्या नौदलाचा सराव सुरू आहे. या सरावादरम्यान "बराक‘ची चाचणी घेण्यात आली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि भारतीय नौदलाने इस्राईलच्या मदतीने ही चाचणी घेतली. बराकच्या यशस्वी चाचणीनंतर अवकाशातील मोठ्या अंतरावरील लक्ष्याचा भेद घेण्याची भारतीय नौदलाची क्षमता वाढली असल्याचे सांगण्यात आले. इस्राईल एरोस्पेस इंडस्ट्रीज आणि हैदराबाद येथील "डीआरडीओ‘च्या प्रयोगशाळेने संयुक्तपणे "बराक‘ची निर्मिती केली आहे.
  • जीवनगाणे शिकवणारे कवी मंगेश पाडगावकर यांचे निधन :
‘येणार असेल, मरण तर येऊ द्यावं; जमलंच तर लाडानं जवळ घ्यावं,‘ असे सांगताना लहानग्यांपासून आबालवृद्धांपर्यंत सर्वांनाच जगण्यावर शतदा प्रेम करायला शिकवणारे प्रेमकवी आणि महाराष्ट्र भूषण मंगेश पाडगावकर (वय 86) यांचे बुधवारी शीव येथील घरी दीर्घ आजाराने निधन झाले. नववर्षाचा सूर्य उगवायला अवघा एक दिवस बाकी असताना या साहित्यसूर्याच्या सकाळीच झालेल्या अस्तामुळे साहित्यविश्‍वावर शोककळा पसरली. शीव येथील "साईप्रसाद‘ इमारतीतील घरात त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अत्यवस्थ होती. "अखेरचा श्‍वास मी माझ्या घरात घेणार‘ या त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या खोलीतच "आयसीयू‘ कक्ष तयार करण्यात आला होता. मंगळवारी रात्रीपासून त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
 "लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती‘, असे म्हणत त्यांच्या स्मृती रसिकांच्या मनात कायमच्या ठेवून कवितेच्या विश्‍वातली ही प्रेमकहाणी अधुरी सोडून मंगेश पाडगावकर गेले. काही वर्षांपासून त्यांना नागीण झाली होती. या आजाराने त्यांचा पिच्छा सोडला नव्हता. असह्य वेदना होत असतानाही "या नागिणीच्या मिठी‘बाबत ते मिश्‍कीलपणे बोलत असत. साहित्यविश्‍वाचा श्‍वास असलेल्या या महान कवीच्या निधनाची वार्ता समजताच शीव येथील त्यांच्या निवासस्थानी चाहत्यांनी गर्दी केली होती. कवितेच्या या तेजस्वी ताऱ्याला अखेरचा सलाम करण्यासाठी राहत्या घरी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी यशोदा, मुलगा अजित, अभय व मुलगी अंजली कुलकर्णी व तनुश्री, तनय, रूपक ही नातवंडे असा परिवार आहे.
  • वहिदा रेहमान यांना विशेष पुरस्कार :
सहाव्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री वहिदा रेहमान यांना विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला. चित्रपट महोत्सवाच्या उद्‌घाटन सोहळ्यात म्हणजेच 22 जानेवारीला सायंकाळी चार वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरच्या मुख्य सभागृहात शरद पवार यांच्या हस्ते त्यांना तो प्रदान करण्यात येणार आहे. हा चित्रपट महोत्सव 22 ते 28 जानेवारीदरम्यान चव्हाण सेंटरमध्ये होणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे संचालक जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. जब्बार पटेल म्हणाले की, वहिदा रेहमान यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यांनी मोठमोठ्या दिग्दर्शकांसोबत काम केले असून त्या अष्टपैलू अभिनेत्री आहेत. चित्रपटसृष्टीतील भरीव योगदानाबद्दल यंदाचा विशेष पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना देण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने हा चित्रपट महोत्सव होणार आहे. चव्हाण सेंटरच्या इमारतीत मुख्य सभागृह, रंगस्वर व सांस्कृतिक सभागृह या तिन्ही सभागृहात दररोज पाच चित्रपटांचे प्रदर्शन केले जाईल. डीसीपी, ब्ल्यूरे, डीव्हीडी, डीजीबीटाचा वापर त्यासाठी केला जाईल. पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळालेला चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर मुख्य सभागृहात दाखवला जाणार आहे.
 महोत्सवांतर्गत एकूण 75 चित्रपट प्रदर्शित केले जातील. त्यात ग्लोबल सिनेमा विभागात 40, रिट्रॉस्पेक्‍टिव्ह विभागात 5, कंट्री फोकस विभागात 7, इंडियन सिनेमा विभागात 5, मराठी सिनेमा विभागात 5, स्टुडंट कॉम्पिटिशन विभागात 10 चित्रपटांचा समावेश असेल. महोत्सवाच्या काळात दररोज सकाळी साडेदहा वाजता चित्रपटांचे प्रदर्शन सुरू होईल.
  • ओडिशाचे 'ऑपरेशन स्माइल-2' :
हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी तसेच त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी ओडिशा सरकारने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन स्माइल‘ या मोहिमेला पहिल्या टप्प्यात चांगले यश आल्याने या मोहिमेचा दुसरा टप्पा नव्या वर्षात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 गुन्हे शाखेच्या कटक येथील मुख्यालयामध्ये झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीस विविध जिल्ह्यांमधील शंभर पोलिस अधिकारी उपस्थित होते. या मोहिमेसाठी दहा पोलिसांची पथके स्थापन करण्यात आली आहेत.
  • अणु कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी :
ऑस्ट्रेलियासोबतच्या नागरी अणु सहकार्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. यामुळे भारतातील अणुभट्ट्यांसाठी ऑस्ट्रेलियाकडून युरेनिअम पुरवठ्याचा मार्ग सुकर झाला आहे. गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियाचे तत्कालिन पंतप्रधान टोनी अबॉट यांच्यासोबत हा करार करण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाचे सध्याचे पंतप्रधान माल्कर टर्नबुल यांनी 15 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या करारासाठीचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले असून, त्याची अंमलबजावणी केली जाऊ शकते, असे स्पष्ट केले होते.
 सध्या ऑस्ट्रेलियाकडे युरेनिअमचा मोठा साठा आहे. युरेनिअमच्या साठ्याच्या दृष्टीने जगात ऑस्ट्रेलियाचा तिसरा क्रमांक लागतो, असे जागतिक अणु संघटनेने आणि आस्ट्रेलियातील सरकारने म्हटले आहे. ऑस्ट्रेलिया अणुऊर्जेचा वापर करीत नसल्यामुळे त्यांच्याकडील युरेनिअमची जास्तीत जास्त निर्यातच केली जाते. अणुऊर्जेचा विस्तार करण्याची योजना आखल्यामुळे भारतासाठी युरेनिअमचा पुरवठा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीने या कराराला अत्यंत महत्त्व आहे.
  • मुंबईच्या आयुक्तपदी दत्ता पडसलगीकर :
अहमद जावेद यांच्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तपदाची धुरा दत्ता पडसलगीकर यांच्याकडे सोपविली जाण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. ‘आयबी’मध्ये कार्यरत असलेल्या पडसलगीकर यांना पुन्हा ‘होम केडर’ म्हणजेच महाराष्ट्रासाठी रिलिव्ह करावे, असे पत्र राज्य सरकारकडून केंद्रीय गृहविभागाला पाठविण्यात आले आहे. पडसलगीकर यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून मुंबईत परतण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे त्यांची निवड निश्चित असल्याचे गृहविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. आयुक्तपदासाठी त्यांच्या स्पर्धेत असलेल्या संजय बर्वे यांचे नाव मागे पडले आहे. विद्यमान आयुक्त अहमद जावेद यांची सौदी अरेबियाच्या राजदूतपदी नियुक्ती जाहीर झाली. तथापि, 31 जानेवारीपर्यंत ते सेवेत असतील. राज्य सरकारने गेल्या आठ सप्टेंबरला आकस्मिकपणे राकेश मारिया यांची पदोन्नती करून, आयुक्तपदाची धुरा अहमद जावेद यांच्याकडे सोपवली. जावेद यांना जेमतेम पावणेपाच महिन्यांचा कालावधी मिळणार, हे निश्चित होते. 20 दिवसांपूर्वी त्यांची सौदी अरेबियाच्या राजदूतपदी नियुक्ती केल्याचे केंद्रीय गृहविभागाने जाहीर केले, तसेच जावेद यांच्यासाठी ‘अपग्रेड’ केलेले आयुक्तपद पुन्हा ‘डाउन ग्रेड’ करून अप्पर महासंचालक दर्जाचे करण्याचा निर्णय झालाआहे. त्यानुसार, आयबीत कार्यरत असलेले दत्ता पडसलगीकर व संजय बर्वे यांची नावे चर्चेत होती.त्यात पडसलगीकर यांना पसंती देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यानुसार, गृहविभागाने केंद्रीय गृहविभागाला पत्र पाठवून त्यांना ‘होम केडर’साठी रिलीव्ह करावे,
  • चिनी लष्कराकडून नव्या तुकड्यांची निर्मिती :
लष्कराच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या चीनने आज तीन नव्या तुकड्यांची निर्मिती केली आहे. चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आधुनिकीकरणाचे सूतोवाच केल्यानंतर लगेचच त्यादृष्टीने पावले उचलण्यास सुरवात झाली होती. नव्या तीन तुकड्यांमध्ये एक तुकडी लष्करासाठी, एक क्षेपणास्त्र विभागासाठी आणि एक धोरणात्मक पाठबळासाठी असणार आहे. पूर्व चिनी समुद्रात जपानबरोबर आणि दक्षिण चिनी समुद्रात फिलिपिन्स, व्हिएतनामसह सहा देशांबरोबर बेटांचा वाद सुरू असल्याने चीनने अधिक आक्रमक धोरण स्वीकारले आहे.
  • जीवनगौरव पुरस्कार प्रदान :
ज्येष्ठ दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या ‘पिंजरा’सह विविध चित्रपटांमध्ये अभिनयाचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सरला येवलेकर यांना दादासाहेब फाळके मराठी सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीने राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे आणि किरण शांताराम यांच्या उपस्थितीत ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘कँडल मार्च’ला ‘उत्कृष्ट चित्रपटाने गौरविण्यात आले, तर अंकुश चौधरी आणि सुमित राघवन यांना उत्कृष्ट अभिनेता, तर सोनाली कुलकर्णी (सीनिअर) हिला उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • वेगाने माहितीवहन करणाऱ्या सूक्ष्मसंस्कारकाची निर्मिती :
अतिशय वेगाने माहिती वाहून नेणारा सूक्ष्ममाहितीसंस्कारक म्हणजे मायक्रोप्रोसेसर तयार करण्यात आला असून या प्रकल्पात भारतीय वंशाच्या एका संशोधकाचा समावेश आहे.
 प्रकाशाच्या मदतीने यात माहिती वाहून नेली जाते, या माहिती देवाणघेवाणीस सर्वात कमी ऊर्जा लागते.
 अधिक वेगवान व शक्तिशाली संगणनप्रणाली व पायाभूत यंत्रणेची निर्मिती यातून शक्य होणार आहे.
 प्रकाशावर आधारित समाकलित मंडले (इंटिग्रेटेड सर्किट्स) या नव्या पद्धतीमुळे संगणनात अनेक महत्त्वाचे बदल घडून येणार आहेत.
  • पॅलेस्टाइन-व्हॅटिकन कराराची अंमलबजावणी सुरू

पॅलेस्टाइन आणि व्हॅटिकन सिटी यांच्यात गेल्या वर्षी झालेला करार शनिवारपासून अंमलात आला.
पॅलेस्टाइन आणि व्हॅटिकन सिटी यांच्यात गेल्या वर्षी झालेला करार शनिवारपासून अंमलात आला. या करारानुसार व्हॅटिकनच्या रोमन कॅथॉलिक चर्चचे अधिकारक्षेत्र पॅलेस्टाइनच्या भूमीपर्यंत विस्तारणार हे. तसेच पॅलेस्टाइनमधील अल्पसंख्य ख्रिस्ती धर्मियांना संरक्षणही मिळणार आहे.या कराराचे स्वरूप बहुतांशी धार्मिक असले तरी त्याकडे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या नजरेतून पाहिले जात आहे. स्वतंत्र पॅलेस्टाइला आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळणाऱ्या वाढत्या मान्यतेचे हे प्रतीक असल्याचे सांगत इस्रायलने हा करार मध्य आशियातील शांतता बिघडवणारा असल्याचे म्हटले आहे.व्हॅटिकनच्या रोमन कॅथॉलिक चर्चने फेब्रुवारी २०१३ मध्ये स्वतंत्र पॅलेस्टाइनला मान्यता दिली.त्यानंतर २६ जून २०१५ रोजी दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
  • नेमबाजपटू फतेह सिंह शहिद
पंजाब येथील पठाणकोट येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात माजी आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू, सुभेदारमेजर (निवृत्त) फतेह सिंग (५१) यांना वीरमरण आले. लष्कराच्या सुरक्षा दलामध्ये सुभेदार म्हणून कार्यरत असलेल्या फतेह यांनी १९९५मध्ये दिल्लीत झालेल्या पहिल्या राष्ट्रकुल नेमबाज अजिंक्यपद स्पध्रेत भारताला एक सुवर्ण व एक रौप्यपदक पटकावून दिले होते. राष्ट्रीय रायफल संघटनेने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या मातृभूमीच्या संरक्षणासाठी फतेहसिंग यांनी प्राणांची आहुती दिली. फतेहसिंग हे ‘डिफेन्स सेक्युरिटी कोअर’मध्ये लष्करासाठी सेवा बजावत होते.
  • अमीष त्रिपाठींचे  ‘सायन ऑफ इक्ष्वाकू’ यंदाचे ‘बेस्ट सेलर’
सलग तिसऱ्या वर्षी भारतीय लेखक अव्वल ‘अॅमेझॉन’चा ऑनलाइन अहवाल प्रसिद्धयुवापिढीची नस ओळखून त्यांच्याच भाषेत पुराकथांची पुनर्माडणी करून अवघ्या काही कालावधीत लोकप्रिय ठरलेल्या अमीष त्रिपाठी यांचे‘स्किऑन ऑफ इक्ष्वाकू’ हे पुस्तक यंदाचे ‘बेस्ट सेलर’ ठरले. यामुळे सलग तिसऱ्या वर्षी भारतीय लेखक बेस्ट सेलरच्या यादीत झळकले आहेत.‘अॅमेझॉन’ने २०१५ च्या सर्वाधिक ऑनलाइन पुस्तक विक्रीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. यात साहित्यविश्वात नव्याने पदार्पण केलेल्या अमीष त्रिपाठी यांनी नव्या पिढी लेखक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेतन भगत यांना मागे टाकत अधिक पुस्तक विक्रीचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला. यंदाच्या वर्षांत प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये काही कालावधीत लोकप्रिय ठरलेल्या आणि प्रचंड विक्रीचे विक्रम नोंदवलेल्या पाच पुस्तकांची नावे ‘अॅमेझॉन’ या ऑनलाइन बाजारातील अग्रगण्य कंपनीने प्रसिद्ध केली आहेत. यात अमीष त्रिपाटी यांचे ‘स्किऑन ऑफ इक्ष्वाकू’ पहिल्या क्रमांकावर, चेतन भगत यांचे ‘मेकिंग इंडिया ऑसम’ हे दुसऱ्या, दुरजॉय दत्ता यांचे ‘वर्ल्ड बेस्ट बॉयफ्रेंड’ तिसऱ्या, तर सुदीप नागरकरांचे ‘यू आर ट्रेिडग इन माय ड्रम’ आणि ट्िंवकल खन्नांचे ‘मिसेस फनिबोन्स’ ही पुस्तके अनुक्रमे चौथ्या आणिपाचव्या क्रमांकांवर आहेत.

  • देशाच्या प्रगतीसाठी फाइव्ह-ई महत्त्वाचे :
शास्त्रीय संशोधन आणि विज्ञान प्रशासन अधिक सोपे झाल्यास देशाच्या प्रगतीचा मार्ग अधिक सुकर होऊ शकतो. देशातील शास्त्रज्ञांनी संशोधन करताना "पाच ई‘ म्हणजेच इकॉनॉमी, एन्व्हायर्न्मेंट, एनर्जी, एम्पथी आणि इक्विटीवर भर द्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या फाइव्ह-ईच्या माध्यमातून देशाच्या विकासाचा वेग आणखी वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. ते आज भारतीय विज्ञान परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलत होते. मानव कल्याण आणि आर्थिक विकासाचे ध्येय गाठण्यासाठी आपण शास्त्रीय दृष्टिकोनाकडे वळत आहेत.
  • दक्षिण आशियाई फुटबॉल (सॅफ) सातव्यांदा अजिंक्यपद :
कर्णधार सुनील छेत्रीने अतिरिक्त वेळेत फ्री किकवर केलेल्या गोलच्या बळावर भारताने अफगाणिस्तानला 2-1 ने नमवून दक्षिण आशियाई फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे (सॅफ) सातव्यांदा अजिंक्यपद पटकाविण्याची किमया केली.
  • महाशहरांच्या यादीत मुंबई, दिल्लीचा समावेश :
जगातील शक्तिशाली, उत्पादक व संपर्क जोडणी उत्तम असलेल्या तीस महाशहरांच्या यादीत दिल्ली व मुंबई यांचा समावेश झाला आहे. जेएलएल या इंटरनॅशनल रिअल इस्टेट कन्सलटन्सीने केलेल्या अभ्यासानुसार भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई 22 व्या तर दिल्ली 24 व्या क्रमांकावर आहे.
 यात टोकियो सर्वोच्च स्थानावर असून त्यानंतर न्यूयॉर्क, लंडन व पॅरिस यांचा समावेश आहे. या शहरांमध्ये जगातील महाशहरात असलेल्या गुंतवणुकीच्या पन्नास टक्के परदेशी भांडवलाची गुंतवणूक झालेली आहे.
  • मेट्रो स्थानकांवर विनामूल्य वाय-फाय सुविधा :
दिल्ली मेट्रोने आपल्या प्रवाशांसाठी दोन मेट्रो स्थानकांवर विनामूल्य वाय-फाय सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राजीव चौक आणि काश्‍मीरी स्थानकांवर ही सुविधा शनिवारपासून उपलब्ध झाली आहे.
 मेट्रोने अशाप्रकारची वाय-फाय सुविधा प्रथमच उपलब्ध करून दिली आहे. स्थानकांवरील प्रवासी पहिले 30 मिनिटे विनामूल्य वाय-फाय वापरू शकणर असून त्यापुढील वापरासाठी शुल्क आकारले जाणार आहे.
  • आता ग्रामपंचायती ऑफलाइन :
महाऑनलाइनच्या माध्यमातून मागील चार वर्षांपासून राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये काम करणाऱ्या संगणक ऑपरेटरचा करारनामा 31 डिसेंबरला संपला.  ग्रामपंचायतीतील दैनंदिन कामांवर याचा परिणाम होणार असून, ग्रामपंचायती ऑफलाइन झाल्या आहेत.त्यांची सेवा समाप्त झाली तरी राज्यातील सुमारे 25 हजार संगणकचालकांचे पाच महिन्यांचे 56 कोटी 25 लाख रुपयांचे मानधन थकीत आहे.
  • कसोटी इतिहासातील दुसरे वेगवान व्दिशतक :
अष्टपैलू बेन स्टोक्सने कसोटी इतिहासातील दुसरे वेगवान व्दिशतक ठोकताना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी 258 धावा काढल्या.
 डावात सर्वाधिक षट्कार मारण्याच्या यादीत स्टोक्स सयुंक्तरीत्या दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला.
  • दक्षिणपूर्व आशियातील सर्वात मोठा बोगदा :
जम्मू-काश्‍मीरमध्ये दक्षिणपूर्व आशियातील सर्वात मोठा झोझिला खिंडित 14.08 किलोमीटर लांबीचा बोगदा बांधण्यास येणार आहे. आयआरबी इन्फ्राक्‍स्ट्रचर डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीने बोगद्याचे काम हाती घेतले असून, त्याचा खर्च 10,050 कोटी इतका अपेक्षित आहे.या बोगद्यामुळे जम्मू-काश्‍मीर ते लेह-लडाखपर्यंत बारामाही वाहतूक सुरू राहणार आहे.आयआरबी इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपर्स लिमिटेडला रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नुकतेच काश्‍मीरमधील झोझिला पास टनल या बोगद्याच्या बांधकामाबाबत आणि देखभाल करण्यासंदर्भातील पत्र देण्यात आले.
  • इस्रो उभारणार स्पेस पार्क :
उपग्रहांची वाढती मागणी लक्षात घेता भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) आता दर महिन्याला उपग्रह सोडण्याचा विचार करीत आहे. त्याचप्रमाणे यामध्ये खासगी क्षेत्राच्या सहभागीसाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची योजना आखत असल्याची माहिती इस्रोच्या उपग्रह केंद्राचे संचालक एम. अण्णादुराई यांनी आज येथे पत्रकारांना सांगितले. येथे सुरू असलेल्या 103 व्या भारतीय सायन्स कॉंग्रेसमध्ये "अवकाश योजनांबद्दल‘ आयोजित चर्चासत्रानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. "मेक इन इंडिया‘ कार्यक्रम हा आमचा मुख्य भाग आहे आणि आत्तापर्यंत अनेक खासगी क्षेत्रांतील भारतीय कंपन्यांनी यात सहभाग घेतला आहे.
  • गुंतवणुकीच्या दृष्टीने भारत ‘सर्वात आकर्षक देश’ :
पूर्ण जगात मंदीचे वारे वाहत असताना गुंतवणुकीच्या दृष्टीने भारत ‘सर्वात आकर्षक देश’ ठरला.
 त्यामुळे 2015 मध्ये भारताने वेगवान आर्थिक वृद्धीचा विचार करता चीनला मागे टाकले.
 आर्थिक सुधारणा चालूच राहिल्यास आणि व्यावसायिक वातावरणात सुधारणा झाल्यास नवीन वर्षात भारताचा वृद्धीदर 7 ते 7.5 टक्के राहण्याची अपेक्षा आहे.
  • प्रणव धनावडेचा धावांचा विक्रम :
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एच. टी. भंडारी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात कल्याणच्या के. सी. गांधी स्कूलच्या प्रणव धनावडेने नाबाद 652 धावांची विक्रमी खेळी उभारली आहे.
 क्रिकेट खेळाच्या इतिहासात ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
  • चीनची दुसरी विमानवाहू युद्धनौका :
चीन सध्या आपली दुसरी विमानवाहू युद्धनौका बांधत असून, लष्करी कारवायांचे प्रशिक्षण व संरक्षण यंत्रणा सुधारण्यासाठी तंत्रज्ञानविषयक प्रयोगांवर अधिक भर देणे हा या युद्धनौकेचा उद्देश आहे. जगातील सर्वांत मोठी म्हणजे 23 लाख सैन्यसंख्या असलेल्या चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीमध्ये मोठे बदल करण्यात येत आहेत. ‘चीनची पहिली विमानवाहू युद्धनौका लियानिंगपेक्षा सध्या निर्मिती करण्यात येत असलेली युद्धनौका वेगळी आहे,‘ असे वरिष्ठ अधिकारी कॅप्टन झांग जुन्श यांनी सांगितले. पहिल्या युद्धनौकेचा उपयोग प्रशिक्षणादरम्यान क्षमतेच्या चाचण्या घेण्यासाठी करण्यात येतो. या दुसऱ्या नौकेचा उपयोग प्रत्यक्षात ही यंत्रणा कशी वापरायची यासाठी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
  • न्यायमूर्ती आर. एम. लोढा समिती:-
  विविध वादांमुळे मलिन झालेली प्रतिमा स्वच्छ करण्याच्या प्रयत्नांत असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सुधारणेसाठी न्यायमूर्ती लोढा समितीने तयार केलेला अहवाल ) सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केला
यातील महत्वाच्या शिफारसी पुढीलप्रमाणे
  1. प्रत्येक राज्यातून एकच क्रिकेट संघटना ‘बीसीसीआय‘ची पूर्ण सदस्य असेल. म्हणजेच, प्रत्येक राज्यातून एकाच संघटनेस मतदानाचा अधिकार असेल.
  2. ‘आयपीएल‘ आणि ‘बीसीसीआय‘ची प्रशासकीय यंत्रणा वेगवेगळी असेल.
  3. आयपीएल‘च्या मुख्य प्रशासकीय मंडळामध्ये एकूण नऊ सदस्य असतील. ‘बीसीसीआय‘चे खजिनदार आणि सचिव हेदेखील या प्रशासकीय मंडळाचा एक भाग असतील. पूर्णवेळ सदस्यांद्वारे दोन प्रशासकीय सदस्यांची नियुक्ती किंवा निवड होईल. उर्वरित पाच सदस्यांपैकी दोन सदस्यांची शिफारस फ्रॅंचायझी करतील. एक सदस्य खेळाडूंच्या संघटनेचा प्रतिनिधी असेल आणि महालेखापालांनी (कॅग) नियुक्त केलेल्या एका सदस्याचाही यात समावेश असेल.
  4. आयपीएल‘च्या प्रशासकीय मंडळाला मर्यादित स्वातंत्र्य असेल.
  5. खेळाडूंची संघटना स्थापन करण्याविषयी भारतीय महिला क्रिकेटच्या माजी कर्णधार डायना एडुल्जी, मोहिंदर अमरनाथ आणि अनिल कुंबळे यांची समिती अहवाल सादर करेल.
  6. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संयुक्त सचिव, खजिनदार यांच्या नियुक्तीसाठी किमान निकष निश्‍चित करणे गरजेचे आहे.
* उमेदवार भारतीय असावा
* उमेदवाराचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त नसावे
* उमेदवार दिवाळखोर नसावा
* उमेदवार मंत्रीपदी किंवा सरकारी नोकर नसावा
* उमेदवाराने एकूण नऊ वर्षांहून अधिक काळ ‘बीसीसीआय‘मधील कोणतेही पद भूषविलेले नसावे
7. प्रत्येक पदाधिकाऱ्याचा कालावधी तीन वर्षे असेल. कोणताही पदाधिकारी तीनपेक्षा अधिक वेळा पद भूषवू शकणार नाही. तसेच, प्रत्येक वेळी कालावधी संपल्यानंतर पुढील पद भूषविण्यापूर्वी किमान काही काळ ‘कूलिंग पीरिअड‘ असेल.
  • कल्याणच्या प्रणव धनावडेचा विश्वविक्रम, नाबाद १००० धावा

चौकार-षटकारांची तूफान फटकेबाजी करत अवघ्या १६ वर्षीय प्रणव धनावडेने नाबाद १००० धावा फटकावत विश्वविक्रम रचला आहे. प्रणवची ही १००० धावांची खेळी म्हणजे क्रिकेटच्या इतिहासातीलसर्वोच्च खेळी आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एच. टी. भंडारी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात कल्याणच्या के.सी. गांधी शाळेतर्फेखेळणा-या प्रणवने आर्य गुरूकूल या प्रतिस्पर्धी संघाविरोधात हा विश्वविक्रम आहे. त्याच्या या खेळीमुळे सध्या ट्विटरवरही #Pranav Dhanawadeहा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये दिसत आहे. प्रणवने ३२३ चेंडूंमध्ये १२४ चौकार आणि ५९ षटकार फटकावत हा विक्रम रचला असून त्याच्या खेळीनंतर के.सी.गांधी शाळेच्या संघाने १४६५ धावांवर डाव घोषित केला.  प्रणवच्या या झंझावाती खेळानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही ट्विटरवरून त्याचे अभिनंदन करतत्याला भविष्यातील अशा खेळींसाठी शुभेच्छा दिल्याआहेत.
  • जीवनदायी योजनेचा लाभ देण्यात नगर राज्यात अव्वल
सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या राजीव गांधी विमा योजनेत नगर जिल्हा पुन्हा राज्यात अव्वल ठरला आहे. जिल्ह्यातील ४० हजार ६९३ रु ग्णांना दोन वर्षात १३६ कोटी रुपयांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत नगर जिल्ह्यात दुसऱ्या जिल्ह्यातून येऊन उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठीआहे.
  • सेकंदांत पाणी शुद्ध करणारा नवा पॉलीमर
शास्त्रज्ञांनी काही सेकंदांत पाणी शुद्ध करू शकणारे नवे पॉलीमर विकसित केले आहे. विशेष म्हणजे या पॉलीमरचा अनेकदा पुनर्वापरही करता येतो.घरातील एअर फ्रेशनर ज्याप्रमाणे हवेतील दूषित घटक शोषून हवा ताजी करतो अगदी त्याचप्रमाणे हे पॉलीमर वाहत्या पाण्यातील घाण शोषून पाणी स्वच्छ करते. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठीही एअर फ्रेशनरमध्ये वापरण्यात येणाराच सायक्लोडेक्सट्रिन हा पदार्थ वापरण्यात आला आहे. अमेरिकेच्या कोर्नेल विद्यापीठाचे सहयोगी प्रोफेसर विल डिचेल यांच्या नेतृत्वाखालील पथकानेसायक्लोडेक्सट्रिनचा सछिद्र अवतार तयार केला आहे.
  • मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन :-
* देशातील पहिले ‘बुलेट ट्रेन’चे जाळे, नागरी अणुकरार सहकार्य सामंजस्य करारांसह दोन्ही देशांमधील संरक्षण तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीस आरंभ करणाऱ्या इतर महत्त्वाच्या करारांवर भारत आणि जपान यांच्यात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
मुंबई आणि अहमदाबाद यादरम्यान धावणाऱ्या प्रस्तावित बुलेट ट्रेनमुळे ५०५ किमीचे हे अंतर अवघ्या तीन तासांत पार करता येणार आहे.
* या प्रकल्पासाठी जपानने भारताला ५०वर्षाच्या दीर्घअवधीसाठी ७९ हजार कोटीचे कर्ज दिले. या कर्जावर ०.१% व्याज आकारण्यात येणार आहे. भारताला १५ वर्षांनतर या कर्जफेडीची सुरुवात करावयाची आहे
* प्रकल्पाची सुरुवात:- २०१७
* २०१४ सालापासून ही बुलेट ट्रेन धावू लागेल

बुलेट ट्रेनचा इतिहास:-
* १९६४ सालच्या ऑलिम्पिक्स वेळी जपानमध्ये बुलेट ट्रेनची संकल्पना अस्तित्वात आली. टोकियो आणि ओसाकादरम्यान ही सेवा सुरू केली गेली.
’* इटली देशाने १९७८ साली रोम आणि फ्लोरेन्सदरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा रेल्वे रुळांची निर्मिती केली आणि अतिवेगवान रेल्वेच्या संकल्पना अस्तित्वात आणण्याची मुहूर्तमेढ युरोपमध्ये रोवली.
* ’कोणत्या देशात बुलेट ट्रेन धावतात – ऑस्ट्रीया, बेल्जियम, चीन, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, पोलंड, पोर्तुगाल, रशिया, दक्षिण कोरीया, स्पेन, स्वीडन, तैवान, तुर्की, युनायटेड किंगडम, अमेरिका आणि उजबेकिस्तान.
’* जगातील एकमेव युरोप देशामधील अतिवेगवान रेल्वेने आंतरराष्ट्रीय सीमा पार केल्या आहेत. तर जगभरातील अतिवेगवान रेल्वेच्या जाळ्यापैकी ६० टक्के भाग चीनने व्यापला आहे.
* ’दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देशांनी आधुनिक अतिवेगवान रेल्वेसाठीचे प्रयत्न करण्यास सुरुवात झाली.

जगातील पहिल्या पाच बुलेट ट्रेन –
१. शांघाय मागलेव –
जास्तीत जास्त वेग ताशी ४३० किमी आणि कमीत कमी वेग ताशी २५१ किमी
२००४ सालापासून सुरू -शांघाय मागलेव ते शांगाय पुदोंग आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत

२. हारमोनी सीआरएच ३८० ए
ताशी ३८० किमी ह्य़ुएन ते गुंनगेजहो
३. एजीव्ही लटालो- (
ताशी ३६० किमी – युरोपमधील नापोली- रोम- फिरेन्जे- बोलोगना – मिलोना कॉरिडॉर या शहरांना जोडते.
४. सीमेन्स वेलारो ई / एव्हीएस १०३ –
वेग ताशी ३५० किमी प्रति तास – स्पेनमधील बार्सेलोना आणि मॅद्रिजदरम्यान धावते.
५. टालगो ३५० (टि ३५०)- (
ताशी ३५० किमी – २००५ सालापासून स्पेनमधील मॅद्रिद- झारागोजा-लिइदा ते मॅद्रिद बार्सेलोनादरम्यान धावते.
  • अबिद अली नीमुचवाला विप्रोचे नवे ‘सीईओ’
अबिद अली नीमुचवाला यांची विप्रो या देशातील तिसऱ्या क्रमांकाच्या आयटी कंपनीने नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. तर या पदावरील विद्यमान टी. के. कुरियन यांना कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून बढती देण्यात आली आहे.स्पर्धक माहिती तंत्रज्ञान कंपनी टीसीएसमधून आलेले व विप्रो समूहात गेल्याच वर्षी समूह उपाध्यक्ष म्हणून दाखल झालेले नीमुचवाला हे येत्या १ फेब्रुवारी रोजी नव्या पदाचा कार्यभार स्विकारतील.विप्रोने तिच्या संचालक मंडळावरील वरिष्ठ पदांमध्ये सोमवारी आमुलाग्र बदल केले. असे करताना विप्रोने टाटा समूहातील व देशातील पहिल्या क्रमांकाची आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सव्‌र्हिसेसचे नीमुचवाला यांना आपले नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केले. ते विप्रो समूहात एप्रिल २०१५ मध्ये समूह अध्यक्ष व मुख्य परिचलन अधिकारी म्हणून दाखल झाले होते.टीसीएसमधील तब्बल २३ वर्षांच्या अनुभवानंतर ते येथे आले होते. तर पुढील वर्षांत वयाची ५८ वर्षे पूर्ण करणाऱ्या कुरियन यांची विप्रोचे मुख्य कार्यकारी अधिकार म्हणून याच महिन्यात पाच वर्षेपूर्ण होत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा