Post views: counter

Current Affairs Jan 2016 Part- 5


  • ज्येष्ठ समीक्षक द. भि. कुलकर्णी यांचे निधन :-

  ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी (वय 82) यांचे निधन झाले. ते पुण्यात झालेल्या 83 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
अल्पपरिचय -
- दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी (जन्म 25जुलै 1934)
- मराठी कवी व साहित्य समीक्षक
- नागपूर विद्यापीठात पीएच.डी.
- विदर्भ साहित्य संघाचे ते साहित्य वाचस्पती (डी.लिट.समकक्ष पदवी)
- नागपूर, पुणे व उस्मानिया विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत त्यांच्या अनेक ग्रंथांचा संदर्भग्रंथ म्हणून समावेश
- द.भि. कुलकर्णी यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विविध चर्चासत्रांत आणि परिसंवादांत भाग

मान-सन्मान :
- महाराष्ट्र शासन पुरस्कार, दीनानाथ प्रतिष्ठानचा वाग्विलासिनी पुरस्कार
- नागपूर विद्यापीठाचे ना. के. बेहेरे सुवर्णपदक
- अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन (पुणे)
- न्यूयॉर्कच्या हेरल्ड ट्रिब्युनच उत्कृष्ट कथा पुरस्कार
- महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार
- स्वरूप व समीक्षा"ला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ज्येष्ठता ग्रंथ पुरस्कार
- पुरुषोत्तम भास्कर भावे पुरस्कार

- ‘अंतरिक्ष फिरलो पण‘ ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्‌मय पुरस्कार.

प्रकाशित साहित्य
- अंतरिक्ष फिरलो पण..
- अन्यनता मर्ढेकरांची
- अपार्थिवाचा यात्री
- अपार्थिवाचे चांदणे (आठवणी)
- स्वरूप व समीक्षा, चौदावे रत्न
- जीएंची महाकथा
- जुने दिवे
- नवे दिवे (ललित लेख)
- दुसरी परंपरा
- देवदास आणि कोसला
- द्विदल
- पस्तुरी
- पहिली परंपरा
- पहिल्यांदा रणांगण
- पार्थिवतेचे उदयास्त
- पोएट बोरकर
- प्रतीतिभेद
- बालकांचा बगीचा (बालवाङ्‌मय)
- मराठी वाङ्‌मयाचा इतिहास
- मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र पुनस्थापन
- महाकाव्य : स्वरूप व समीक्षा
- मेरसोलचा सूर्य
- युगास्त्र
- समीक्षेची चित्रलिपी
- समीक्षेची वल्कले
- समीक्षेची सरहद्द
- सुरेश भट- नवे आकलन
- स्फटिकगृहीचे दीप
- बालकांचा बगीचा
- हिमवंतीची सरोवरे
- हिमवंतीची शिखरे
- ज्ञानेश्वरांची प्रतीतिविश्रांती
- ज्ञानेश्वरांचे श्रोतृसंवाद

  • महत्वाचे खगोल-अंतराळ-तंत्रज्ञान :
  महत्वाचे खगोल-अंतराळ-तंत्रज्ञान :
  1. जी सॅट-6 हा दूरसंचार उपग्रह हा उपग्रह 27 ऑगस्ट 2015 रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोट्टा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून सोडण्यात आला.
     जी सॅट मालिकेतील हा 12 वा उपग्रह आहे. या उपग्रहाचा कार्यकाल 9 वर्षाचा आहे.
     या उपग्रहाचे वजन 2117 किलो आहे.
     या उपग्रहाच्या उड्डाणासाठी क्रायोजेनिक इंजिनचा वापर दुसर्‍यांदा करण्यात आला यापूर्वी 5 जानेवारी 2014 रोजी जी सॅट-5 या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यासाठी प्रथम क्रायोजेनिक इंजिनचा वापर केला होता.
     2 टनापेक्षा जास्त वजनाचा उपग्रह अवकाशात पाठविण्यासाठी क्रायोजेनिक इंजिनचा वापर केला जातो.
     स्वदेशी बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनचा वापर करून उपग्रह अवकाशात सोडणारा भारत हा अमेरिका, रशिया, जपान, चीन, फ्रान्स,या देशानंतर जगातील 6 वा देश ठरला.
     25 व भूस्थिर दूरसंचार उपग्रह म्हणून जी सॅट-6 ओळखला जातो.
  2. इंटरनॅशनल अॅस्त्रोमिकल युनियन चे उपाध्यक्ष आहेत- डॉ. अजित केंभावी
  3. अमेरिकेतील हॉवर्ड स्मित सॉनियन येथील खगोल भौतिकी केंद्रात चंद्रा क्ष-किरण दुर्बिण उभारलेली आहे. या दुर्बिणीला सुब्रमण्यम चंद्रशेखर यांचे नाव दिले आहे.
  4. तामिळनाडूत श्री पेरांबदूर जवळ अंतराळनगरी/एअरोस्पेस पार्क उभरला जात आहे.
  5. पहिला खगोलशास्त्रीय उपग्रह - अॅस्ट्रोसॅट चे 28 सप्टेंबर 2015 रोजी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.या उपग्रहाचे वजन 1513 किलो. हा उपग्रह 650 किमी च्या कक्षेत फिरणार आहे. श्रीहरीकोट्टा येथे सतीश धवन स्पेस सेंटर येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. हे प्रक्षेपण पपीएसएलव्ही-सी30 च्या माध्यमातून करण्यात आले.
     या अॅस्ट्रोसॅटसह इंडोनेशिया व कॅनडाचा प्रत्येकी 1 उपग्रह आणि अमेरिकेचे 4 उपग्रह प्रथमच पाठविण्यात आले.
     अॅस्ट्रोसॅट या उपग्रहात सॉफ्ट एक्स रे टेलिस्कोप, लार्ज एरिया एक्स रे, प्रोपशनल काउंटर, कॅडमीयम झेनीक टेल्यूराईट इमेजर ही उपकरणे पाठविण्यात आली.
     अवकाशातून पृथ्वीवर येणार्‍या किरणांच्या उगमाचा अभ्यास कॅडमीयम झेनीक टेल्यूराईट इमेजर या मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेने विकसित केलेल्या उपकरणाव्दारे करण्यात येईल.
     या उपग्रहाला 2.7 कोटी डॉलर खर्च आला असून या उपग्रहाचा कार्यकाल 5 वर्षाचा आहे.
     अॅस्ट्रोसॅटसह एकूण 6 विदेशी उपग्रह असे एकूण 7 उपग्रहाचे एकत्रित प्रक्षेपण करण्यात आले.
     अॅस्ट्रोसॅट प्रकल्पाचे संचालक - शास्त्रज्ञ के.एस. सरमा.
     खगोलिय उपग्रह/वेधशाळा अवकाशात पाठविणारा भारत हा जगातील पाचवा देश ठरला. यापूर्वी अमेरिका, युरोपीय यूनियन, रशिया, जपान या चार देशांनी स्वत:च्या वेधशाळा अवकाशात पाठविल्या आहेत.
  6. आदित्य-1 हा उपग्रह/मोहीम इस्त्रो सूर्याच्या संशोधनासाठी पाठविणार आहे.
     ही मोहीम सन 2017-18 मध्ये यशस्वी केली जाईल.
  7. 28 सप्टेंबर 2015 रोजी भारतात सूपर मून आणि खग्रास चंद्रग्रहण 33 वर्षांनंतर दिसले.यापूर्वी सूपर मून आणि खग्रास चंद्रग्रहण 1982 साली दिसले होते.
  8. अरसॅट-2 हा दळणवळण उपग्रह यशस्वीपणे अवकाशात सोडणारा देश-अर्जेटीना
  9. मंगळ ग्रहाच्या संशोधनासाठी आतापर्यंत पाठविलेल्या मोहिमा - मरिनर, व्हायकिंग, मार्स गलोबन सर्व्हेइअर, पाथ फाइंडर, ओडिसी, फिनिक्स, स्पिरीट, क्युरीऑसिटी, अपॉर्च्यूनिटी, मार्स रिकोनेसन्स ऑर्बिटर
  10. भारताच्या इस्त्रो संस्थेने 5 नोव्हेंबर 2013 रोजी मंगळयान मंगळ ग्रहाच्या संशोधनासाठी प्रक्षेपित केले होते. हे मंगळ यान 24 सप्टेंबर 2014 रोजी मंगळ ग्रहाच्या कक्षेत पोहोचले.
  11. अमेरिकेच्या नासा संस्थेने अवकाशात सोडलेला नॅनो उपग्रह - क्युब सॅट
  12. 68 पी-चुरायु मोव्ह गेरासिमेंको धुमकेतू-या घुमकेतुवर यूरोपियन युनियनचे फिनीलंडर हे यान जुलै 2015 मध्ये उतरले आहे.
  13. अमेरिकेच्या नासा या संस्थेने प्लूटो या सूर्यमालेतील शेवटच्या लघूग्रहाकडे पाठविलेले न्यू होरायझन्स हे यान 14 जुलै 2015 रोजी प्लूटो ग्रहाच्या जवळ पोहोचले.
  14.  ब्रेक थ्रु लिसन प्रकल्प/मोहीम -ही मोहीम पर ग्रहातील सजीवांचा शोध घेण्यासाठी जेष्ठ भौतिकशास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग आणि रशियातील श्रीमंत व्यक्ती युरी मिलनेर यांनी हाती 10 जुलै 2015 रोजी घेतली, या प्रकल्पाचे नाव सर्च फॉर एक्स्ट्रा टेरिस्ट्रीएल इंटेलिजन्स/सेटी असे आहे.
     इंग्लंडमधील प्रसिद्ध विश्वरचना वैज्ञानिक स्टिफन हॉकिंग हे वयाच्या 21 व्या वर्षापासून मोटार न्यूरॉन डिसीज या आजाराने ग्रस्त आहेत.
  15. भारतीय अंतराळ संशोधन संस्था/इस्त्रो चे अध्यक्ष - डॉ.ए.एस. किरणकुमार
  16. चांद्रयान-1 मोहीम - भारताच्या या मोहिमेचे शिल्पकार/जनक आहेत - शास्त्रज्ञ डॉ. एम./मयलस्वामी अण्णा दुराई
  17. इस्त्रोच्या बंगळुरू येथील उपग्रह केंद्राचे नवे संचालक बनले - डॉ. एम. अण्णा दुराई (यांच्यापुर्वी एस.के. शिवकुमार होते.)
  • महत्वाच्या मोहिमा व अभियान :
महत्वाच्या मोहिमा व अभियान :
  • महाराष्ट्र शासन कौशल्य विकासाचे शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्रात प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान राबवत आहे. सहावा भारत आणि मालदिव या दोन देशांदरम्यान संयुक्त लष्करी सराव केरळमधील तिरूअनंतपुरम येथे 30 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर 2015 दरम्यान आयोजीत केला होता.
  •  या लष्करी सरावात भारताची बिहार रेजिमेंट सामिल झाली होती.
  •  25 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर 2015 दरम्यान स्वच्छता पंढरवाडा देशभर पाळण्यात आला.
  •  अमृत/अटल मिशन फॉर रिजिव्हानेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन अभियान
  •  हे अभियान केंद्र सरकार देशातील 500 शहरांमध्ये राबविण्यात येणार असून केंद्र सरकार 1003 कोटी रुपये या योजनेत सहभागी शहराला देणार आहे.
  •  या योजेतून पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, मलनिस्सारण, पर्जन्य जलवाहिन्या, परिवहन व्यवस्थेत सुधारणा इ. सुविधा शहरात राबविणे बंधनकारक आहे.
  •  या योजनेत महाराष्ट्रातील 43 शहरांची निवड झाली.
  •  हे अभियान सन 2015-16 ते सन 2019-20 या पाच वर्षाच्या कालखंडात राबविले जाणार आहे.
  •  या योजनेत ज्या शहराची लोकसंख्या 10 लाखांच्या आत आहे अशा शहरांची निवड केली गेली.
  •  ही योजना राबविताना केंद्र सरकार 50 टक्के, राज्य सरकार 25 टक्के व संबंधित शहराची स्थानिक संस्था 25 टक्के असा आहे.
  •  ही योजना अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने केंद्र सरकारने सुरू केली.
  •  मलबार युद्ध सराव सन 2015 - यामध्ये संयुक्तपणे तीन देशांच्या नौदलांनी सहभाग घेतला - भारत, अमेरिका, जपान.
  •  सुगम्य भारत अभियान - हे विकलांग व्यक्तींच्या विकासासाठी आखण्यात आले आहे.
  •  मित्रशक्ति लष्करी संयुक्त कवायत - हा संयुक्त लष्करी सराव सप्टें.- ऑक्टो. 2015 मध्ये औंध, पुणे येथे भारत व श्रीलंका या दोन देशांच्या दरम्यान संपन्न झाला.
  •  पोलीस मित्र अभियान - या अभियानाची संकल्पना महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दिक्षित यांची आहे.
  •  प्रवीण दिक्षित यांनी नागपूर चे पोलीस आयुक्त असताना पोलीस मित्र ही संकल्पना राबविली होती. ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात राबविली जात आहे.
  •  पोलीस मित्र अभियान ची संकल्पना ही एका पोलीसासोबत पाच मित्र अशी आहे.
  •  ऑपरेशन वात्सल्य - ही मोहीम हरवलेल्या मुलांसाठी केरळ राज्य सरकारने राबविली.
  •  ऑपरेशन मुस्कान मोहीम - केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण देशभरात गेल्या 5 वर्षात हरवलेल्या/बेपत्ता झालेल्या लहान बालकांच्या शोधासाठी ही मोहीम सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार 1 जुलै 2015 पासून राबविली.
  •  मिलन नौदल कवायत - सन 2014 मध्ये हिन्दी महासागरात 17 देशातील नौदलांच्या एकत्रित कवायत भारतीय नौदलाने घेतली होती.
  •  ऑरेशन राहत - युद्धग्रस्त येमेन देशातून तेथील भारतीय नागरीकांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन राहत मार्च-एप्रिल 2015 मध्ये यशस्वी राबविले.
  •  उडाण अभियान - जम्मू काश्मिरमध्ये युवकांना रोजगार निर्मितीसाठी हे अभियान केंद्र सरकारने सुरू केले आहे.
  •   आगामी २०१६-१७ सालच्या अर्थसंकल्प सादर केल्या जाण्याआधी कर प्रणालीच्या सुलभीकरणासाठी पार्थसारथी शोम यांच्या अध्यक्षतेखालील समितींनी केलेल्या शिफारशी स्विकारण्याचे संकेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले
  • इंग्लंडच्या मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर मार्क कार्नी यांच्यासह भारतीय रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासह एक विशेष कार्यदलात सामील झाले आहेत. जागतिक आर्थिक मंच(डब्ल्यूईएफ)ने जगभरातील वित्तीय व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी या कार्यदलाची स्थापना केली
  • एडेलविस टोकियो लाईफ इन्शुरन्स कंपनीला विदेशी भागीदारीचा हिस्सा वाढविण्यासाठी ‘आयआरडीएआय’ची परवानगी मिळाली आहे. यानुसार जपानी टोकियो मरिन हा हिस्सा ४९ टक्क्य़ांपर्यंत वाढविणार आहे. याकरिता ५२५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार
  • अर्थमंत्रालयातील महसूल सचिवाचे पद रद्द केले जावे, पॅनच्या वापराच्या व्याप्ती वाढ, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) आणि केंद्रीय अबकारी व सीमाशुल्क मंडळ (सीबीएसई) यांचे विलीनीकरणाची शिफारस आह
  • चहा व्यवसायातील नवउद्यमी टीबॉक्समध्ये रतन टाटा यांनी आपली नवी वैयक्तिक गुंतवणूक केली

  • महत्वाची व्यक्तिमत्वे :
1. हार्दिक पटेल -
गुजरातमधील पाटीदार/पटेल समाजाला नोकरी व शिक्षणामध्ये आरक्षण मिळवून देण्याच्या हेतूने 22 वर्षीय हार्दिक पटेल यांनी 25 ऑगस्ट 2015 रोजी अहमदाबाद येथे आरक्षण मेळावा घेतला.
 हार्दिक पटेल हे अनामत आंदोलन समितीचे समन्वयक आहेत.
 सध्या हार्दिक पटेल यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.
 हार्दिक पटेल हे बी.कॉम पदवीधर आहेत.


2. न्या. एम.एल./मदनलाल लक्ष्मणदास तहलियानी -
महाराष्ट्राचे नवे लोकायुक्त म्हणून 25 ऑगस्ट 2015 रोजी त्यांची नियुक्ती राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी या पदाची शपथ देऊन केली.
 त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधिश म्हणून काम केले आहे. ते मूळ चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील रहिवाशी आहेत.
 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील जिवंत पकडलेल्या अतिरेकी अजमल कसाबला फाशीची शिक्षा एम.एल. तहलियानी यांनीच सुनावली होती.

3. अयलान कुर्दी (बालक) -
हे बालक सिरिया देशातील दहशतवादी युद्धग्रस्त स्थितीमुळे सिरियातून बाहेर पडून तुर्कस्तानमधून बोटीव्दारे ग्रीसच्या कोस बेटाकडे स्थलांतर करीत असताना त्यांनी बोट उलटून हा 3 वर्षाचा बालक समुद्रात बुडून मृत्यू पावला नंतर त्याचा मृतदेह तुर्कस्तानच्या समुद्रकिनारी आढळला त्याचा हा फोटो सोशल मीडियावरून व्हायरल झाला होता.
 हे छायाचित्र नोलोफर देनीर या छायाचित्रकाराने घेतले होते.

4. श्रीमती प्रिती पटेल-
सध्या इंग्लंड च्या कामगार मंत्री म्हणून काम करणार्‍या भारतीय वंशीय महिला
 
5.  भानुप्रकाश राचा -
एका तासात 1800 पेक्षा जास्त सेल्फी काढण्याचा गिनीज बुकमध्ये नोंद करणारा भारतीय व्यक्ति
 
6. आंगसांग स्यु की -
5 वर्षापासून नजरकैदेत असणार्‍या म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या आणि म्यानमार संसदेच्या विरोधी पक्षनेत्या
 
7. अशोक श्रीधरण -
जर्मनीतील बॉन या शहराचे महापौर बनणारे पहिले भारतीय वंशीय व्यक्ति
 
8. समिर विष्णू गायकवाड -
16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापूर येथे पुरोगामी नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी 16 सप्टेंबर 2015 रोजी सांगली येथील सनातन प्रभात संस्थेच्या साधक समिर विष्णू गायकवाड यांना संशयीत म्हणून अटक केली.
 
10.  निशा देसाई-बिस्वाल (भारतीय वंशीय) -
अमेरिकेच्या दक्षिण आणि मध्य आशियाच्या परराष्ट्र राज्यमंत्री
 
11. नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे -
अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी व आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्यासाठी निधी गोळा करण्याच्या हेतूने स्थापन केलेली संस्था - नाम फाउंडेशन - नाम फाउंडेशन धोंडलगाव जि. औरंगाबाद हे गाव विकासासाठी दत्तक घेतले.
 
12. मुकबधिर मुलगी गीता -
15 वर्षापूर्वी भारतीय हद्दीतून चुकीने पाकिस्तानच्या हद्दीत गेलेली ही मुलगी पाकिस्तानमध्ये लाहोर रेल्वे स्टेशनवर समझोता एक्सप्रेस रेल्वे गाडीमध्ये पाकिस्तानी रेंजर्स च्या जवानांना सापडली होती. ही मुलगी तेव्हा 7 वर्षाची होती तिला पाकिस्तान सरकारने कराची येथे इधी फाउंडेशनकडे सुपूर्द केले होते.
 या मुलीला पाकिस्तानी सरकारने 26 ऑक्टोबर 2015 रोजी भारताकडे सुपूर्द केले. तिचे पालनपोषण कराची येथील इधी फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने केले होते. बिल्किस इधी यांनी गीताला दत्तक घेतले होते.
 गीताच्या डीएनए चाचणीनंतर तिच्या पालकांची ओळख पटल्यानंतर तिला पलकांकडे सुपूर्द केले जाईल. ती सध्या इंदौर तेथील संस्थेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फाउंडेशनला घोषित केलेली 1 कोटी रुपयांची देणगी इधी फाउंडेशनने नम्रपणे नाकारली. 
  • महत्वाच्या संशोधन संस्था :
  1. आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी केंद्र/आयुका - पुणे चे नवे संचालक बनले - प्रा. सोमक रायचौधरी (31 ऑगस्ट 2015 पासुन) (यांच्यापुर्वी अजित केंभावी हे होते.)
  2.  आयुका संस्थेचे संस्थापक व पहिले संचालक होते - डॉ. जयंत नारळीकर.
  3.  नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट - बंगळूर येथे आहे.
  4.  द हिमालयीन माऊंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट -दार्जलिंग (पश्चिम बंगाल) येथे आहे.
  5.  नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स -बंगळूर
  6.  सेंट्रल सॉल्ट अँड मरिन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूट - भावनगर (गुजरात) येथे आहे.
    .
  7. राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्र - हैद्राबाद येथे आहे.
  8.  इंडियन साईन लँग्वेज रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर नवी दिल्ली येथे उभारले जाणार आहे.
  9.  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रूरल डेव्हलपमेंट अँड पंचायती राज - हैद्राबाद
  10.  सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मायनिंग अँड फ्यूअल रिसर्च/सीआयएमएफआर - नागपूर येथे आहे.
  11.  सेंटर ऑर सेल्यूलर अँड मॉलिक्यूलर बायोलॉजी, हैद्राबाद या संस्थेचे संस्थापक संचालक आहेत - शास्त्रज्ञ पी. एम. भार्गव.
  12.  दि इंजिनिअरिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट/टेरी चे नवे महासंचालक बनले - अजय माथूर (23 जुलै 2015 पासुन) (यांच्यापूर्वीचे महासंचालक आर.के. पचौरी यांची आपल्या सहकारी महिला कर्मचार्‍याची लैंगिक छळ केल्याचा आरोप असल्यावरून सरकारने त्यांची हकालपट्टी केली.)
  13.  टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च/टाटा मुलभूत संशोधन संस्था मुंबई चे नवे संचालक बनले - प्रा. संदीप त्रिवेदी

  • फ्रान्स करणार नागपूर स्मार्ट :
नागपूरच्या स्मार्ट सिटी योजनेला फ्रान्स विविध प्रकारे तांत्रिक तज्ज्ञांचे सहकार्य देणार असून, यासाठी फ्रेंच सरकार व महाराष्ट्र सरकारमध्ये (दि. 24) सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकॉई ओलांद यांचे येथे आगमन झाले.चंदिगड, नागपूर व पुद्दुचेरी या तीन शहरांच्या स्मार्ट सिटीसाठी फ्रान्सकडून तांत्रिक सहकार्य घेण्याबाबत करार झाले
नरेंद्र मोदी फ्रान्सला गेले होते तेव्हाच ओलांद यांनी मोदी सरकारच्या स्मार्ट सिटी या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी फ्रान्स सरकारकडून 2.25 अब्ज डॉलरचे वित्तसाह्य उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती.फ्रान्सची ‘एजन्से फ्रॅकाईस डी डेव्हलपमेंट’ ही संस्था या तीन शहरांच्या स्मार्ट सिटी योजना राबविण्यासाठी पाणीपुरवठा, मलनि:सारण, नागरी परिवहन आणि घनकचरा व्यवस्थापन या क्षेत्रांत प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध करून देईल.
  • चीनमध्ये 'ऑरेंज अलर्ट' :
चीनमध्येही गेल्या काही दशकांतील विक्रमी हिमवर्षाव होत असल्याने बहुतांश भाग गारठला आहे.
अमेरिकेप्रमाणे येथेही विमान उड्डाणे रद्द झाली असून, जनजीवन ठप्प झाले आहे.
देशातील काही भागांत तापमान उणे तीस अंशाच्या खाली जाण्याचा वेधशाळेचा अंदाज असल्याने त्या भागांमध्ये 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
चीनच्या प्रमाणानुसार थंडीसाठी देण्यात येणारा हा इशारा दुसऱ्या क्रमांकाचा धोक्‍याचा इशारा आहे.
  • सोमनाथ बनला ब्रँड अ‍ॅम्बेसिडर :
चहाची टपरी चालवून चार्टड अकाउटंट (सी.ए.) ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सोमनाथ गिरम याची राज्य शासनाच्या कमवा व शिका योजनेचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर करण्यात येत असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी (दि.24) केली.आजवर स्वत:च्या कमाईवर शिक्षण पूर्ण करणारा सोमनाथ आता इतर विद्यार्थ्यांनाही धडे देणार आहे.डीएसके इंटरनॅशनल कॅम्पस - रुबिकाच्या पदवी प्रदान समारंभात तावडे यांच्या हस्ते सोमनाथचा सत्कार करण्यात आला.
  • भारताकडून एल निनोचीही माहिती : 
मान्सून, तापमान यांच्या अंदाजाबरोबरच आता भारताने दक्षिण आशियायी देशांना एल निनोच्या स्थितीबाबतही माहिती देण्यास सुरुवात केली आहे.भारतीय हवामान खात्याकडून वेळोवेळी एल निनोची स्थिती सांगितली जात असून, ती माहिती आता श्रीलंका, मालदीव, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, नेपाळ व म्यानमार या देशांनाही उपलब्ध झाली आहे.पृथ्वी विज्ञान खात्याचे सचिव राजीवन यांनी सांगितले की, दक्षिण आशियायी देशांना एल निनोबाबत माहिती देण्यास आम्ही सुरुवात केली आहे.दर महिन्याला एल निनोच्या स्थितीबाबत सुधारित माहिती दिली जाईल, असे हवामान वैज्ञानिक एस.पै यांनी स्पष्ट केले.जागतिक हवामान संघटनेने भारताला प्रादेशिक हवामान केंद्र म्हणून जाहीर केले आहे.
  • भारत आशियाई टी-20 ‘चॅम्पियन’ :
प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 44 धावांनी पराभव करून यजमान भारताने अंधांच्या पहिल्या टी-20 आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले विशेष म्हणजे संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या पाकिस्तानने साखळी फेरीत भारताला पराभूत केले होते.
  • मलेशिया मास्टर्स स्पर्धेत विजेतेपद :
भारताची हरहुन्नरी बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूने मलेशिया मास्टर्स ग्रांपी सुवर्ण बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले या वर्षातील पहिले विजेतेपद मिळविताना सिंधूने अंतिम फेरीत किर्से ग्लिमोरचा 21-15, 21-9 असा सहज पराभव केला.सिंधूने उपांत्य फेरीत अव्वल मानांकित कोरियाच्या जि ह्यून सुंगचा चुरशीच्या सामन्यात पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली होती.जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत दोनदा ब्रॉंझपदकाची कमाई करणारी सिंधू जागतिक क्रमवारीत 12 व्या स्थानी आहे. या विजयामुळे सिंधूचे ग्रांपी सुवर्ण स्पर्धेतील हे पाचवे विजेतेपद ठरले आहे.तसेच या अगोदर तिने मलेशियातील ही स्पर्धा 2013 मध्ये जिंकली होती, तर मकाऊ स्पर्धेत 2013 ते 15 अशी हॅटट्रिक केली आहे.
  • सानिया मिर्झा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत  विजयी :
जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू भारताच्या सानिया मिर्झाने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत आपला विजयी लय कायम राखताना महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीच्या उप उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली.
महिला दुहेरीतील सामन्यात सानियाने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीससह खेळताना लुडमिया किचनोक आणि नादिया किचनोक या युक्रेनच्या खेळाडूंवर 6-2, 6-3 अशी मात करीत अंतिम 16 खेळाडूंमध्ये आपली जागा पक्की केली.मिश्र दुहेरीत अव्वल मानांकनप्राप्त सानिया मिर्झा व क्रोएशियाचा जोडीदार इवान डोडिग या जोडीने जबरदस्त खेळ करताना अजला टोमालानोविच व निक किर्गीयोस या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना 7-5, 6-1 अशा फरकाने पराभूत करून विजय मिळविला.
  • देशातील सर्वांत मोठा तिरंगा ध्वज :
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे निमित्त साधून (दि.23) रांचीमध्ये इतिहास घडला.
येथील पहाडी मंदिर परिसरात देशातील सर्वांत उंचावर तिरंगा ध्वज फडकविण्यात आला.
संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सकाळी बटन दाबून ध्वजवंदन केले, तिरंगा फडकताच पुष्पवृष्टी करण्यात आली.पहाडी मंदिरपासून एक किलोमीटर अंतरावर तिरंगा झेंडा फडकल्यानंतर बिरसा मुंडा फुटबॉल स्टेडियमवर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, या वेळी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, राज्यपाल द्रोपदी मुर्मू अणि मुख्यमंत्री रघुवरदास यांनी मार्गदर्शन केले.
  •   सामनानिश्चितीची कबुली देणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या गुलाम बोदीवर दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने २० वर्षांची बंदी घातली आहे. दक्षिण आफ्रिकेतील रॅम स्लॅम स्थानिक ट्वेन्टी-२० स्पर्धेदरम्यान लढतींचे निकाल निश्चित केल्याप्रकरणी दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने केलेल्या चौकशीत बोदी दोषी असल्याचे स्पष्ट झाले. बोदीवरील बंदी तात्काळ लागू झाली असून, त्याला कोणत्याही आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच स्थानिक लढतीत सहभागी होता येणार नाही
  • चीन आणि दक्षिण चिनी समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी भारत आता दक्षिण व्हिएतनाममध्ये उपग्रह केंद्र उभारणार आहे. या सॅटेलाइट ट्रॅकिंग आणि इमॅजिंग सेंटरद्वारे भारताला छायाचित्रे मिळण्यास मदत होणार आहे. हो ची मिन्ह या शहरात हे केंद्र उभारण्यासाठी "इस्रो‘ निधी देणार आहे
  • ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धा २०१६:- सानिया-मार्टिना अजिंक्य:-
 मार्टिना हिंगिससह खेळतानाची अद्भुत कामगिरी कायम राखत सानिया मिर्झाने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत जेतेपदाची कमाई केली. 
• सानिया-मार्टिना जोडीने आंद्रेआ लाव्हाकोव्हा आणि ल्युसी राडेका जोडीवर ७-६ (१), ६-३ असा विजय मिळवला. 
• या जोडीचे हे सलग तिसरे ग्रँड स्लॅम जेतेपद आहे. 
• जेतेपदासह सानिया-मार्टिना जोडीने सलग ३६ लढतीत अपराजित राहण्याचा विक्रमही प्रस्थापित केला आहे. 
• या लढती जिंकताना या जोडीने सलग आठ जेतेपदांवर नाव कोरले आहे. 
• ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे सानियाचे दुसरे जेतेपद आहे.२००९ मध्ये सानियाने महेश भूपतीच्या साथीने खेळताना मिश्र दुहेरी प्रकारात जेतेपद पटकावले होते
 सानियाचे हे कारकिर्दीमधील सहावे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद ठरले
  •   अर्थमंत्रालयातील महसूल सचिवाचे पद रद्द केले जावे, पॅनच्या वापराच्या व्याप्ती वाढ, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) आणि केंद्रीय अबकारी व सीमाशुल्क मंडळ (सीबीएसई) यांचे विलीनीकरणाची शिफारस आह
  • एडेलविस टोकियो लाईफ इन्शुरन्स कंपनीला विदेशी भागीदारीचा हिस्सा वाढविण्यासाठी ‘आयआरडीएआय’ची परवानगी मिळाली आहे. यानुसार जपानी टोकियो मरिन हा हिस्सा ४९ टक्क्य़ांपर्यंत वाढविणार आहे. याकरिता ५२५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार
  • १४० वर्षांनी ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियातच व्हाईट वॉश, सिडनी टी-20 सामन्यात भारताचा ७ गडी राखून विजय
  तिस-या व शेवटच्या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ७ गडी राखून ही मालिका ३-० अशी जिंकली. असून भारतीय संघाने १४० वर्षांनी ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियातच व्हाईट वॉश देण्याचा पराक्रम केला आहे.
रोहित शर्मा (५२), विराट कोहली (५०), सुरेश रैना नाबाद ४९ यांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर ७ गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने वॉटसनच्या नाबाद १२४ धावांच्या शानदार खेळीमुळे तिस-या टी - २० सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी १९८ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने सुरवातीपासुनच कांगारुच्या गोलंदाजावर हल्लाबोल केला. शिखर धवनने ९ चेंडूत एक षटकार आणि आणि ४ चौकाराच्या मदतीने २६ धावांचे योगदान दिले. रोहित आणि शिखर यांनी पहिल्या विकेटसाठी ३.२ षटकात ४६ धावांची सलामी दिली. धवन बाद झाल्यांतर रोहित शर्माने विराटच्या साथीने धावसंख्या हलती ठेवली रोहित-विराट जोडीने दमदार फलंदाजी करत दुसऱ्या विकेट साठी ७८ धावांची भागीदारी केली. रोहितने ३८ चेंडूत १ षटकार आणि ५ चौकाऱ्याच्या मदतीने ५२ धावा केल्या. विराट कोहलीने ३८ चेंडूत ५० भावांचे योगदान दिले. तर सुरेश रैनाने ३० चेंडूत झटपट ४९ धावा केल्या. शेवटच्या षटकात १७ धावा हव्या असताना युवराजने एक चौकार आणि षटकार लावत विजय समिप आणला तर रैनाने एक चेंडूच २ धावा करायच्या असताना खनखनीत चौकार लावत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियातर्फे कॅमेरून बायसने २ तर कर्णधार शेन वॉटसनने १ बळी टिपला.तत्पूर्वी, वॉटसनच्या नाबाद १२४ धावांच्या शानदार खेळीमुळे तिस-या टी - २० सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी १९८ धावांचे आव्हान ठेवले. वॉटसनची टी-२० सामन्यातील ही पहिलीच सेंच्युरी.. ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ५ गडी गमावून १९७ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाने नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली मात्र ख्वाजा (१४), शॉन मार्श (९) आणि मॅक्सवेल (३) पटापट बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाची स्थिती बिकट झाली. पण शेन वॉटसनने एका हाती डाव सावरत शानदार शतक तर झळकावलेच पण ऑस्ट्रेलियाला १९८ धावांचा टप्पा गाठून दिला. त्यानंतर हेड २६ आणि ल्यान १३ धावांवर बाद झाले.  भारतातर्फे नेहरा, अश्विन, युवराज, भुमरा आणि जडेजाने प्रत्येकी १ बळी टिपला.
तीन सामन्यांची मालिका भारताने आधीच २-० अशी जिकंली असून आजचा सामनाही जिंकून निर्भेळ यश मिळवण्याचा धोनी व संघाचा इरादा आहे. विराट कोहलीला मालिकावीर तर शेन वॉटसन सामनावीर पुरस्कार देण्यात आला,भारतार्फे आज रोहित शर्माने टी२० मध्ये १००० धावांचा टप्पा पार केला.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा