Post views: counter

माझी कन्या भाग्यश्री’ योजना : Majhi Kanya Yojana

माझी कन्या भाग्यश्री’ योजना

मुलींच्या शिक्षण, आरोग्य व उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे, यासह बालिका भृणहत्या रोखणे, बालविवाह रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार रुजविण्यासाठी ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना राज्यात सुरु केली आहे.


वैशिष्टे 
  1.  या योजनेमध्ये ज्या मातेने एकुलत्या एका मुलीवर अंतिम कुटुंब नियोजन केलेले आहे, अशा लाभार्थ्यांना मुलीचा जन्मदिन साजरा करण्यासाठी 5 हजार रुपये, मुलगी 5 वर्षे वयाची होईपर्यंत दर्जेदार पोषण आहार देण्यासाठी 5 वर्षांकरीता 10 हजार रुपये
  2.  मुलीच्या 6वी ते 12 वी पर्यंतच्या शिक्षणादरम्यान पोषण आहार व इतर खर्चासाठी 7 वर्षांकरीता एकूण 21 हजार रुपये इतका लाभ मिळणार आहे.
  3.  ज्या मातेला एक मुलगी असून दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे, अशा परिस्थितीत जन्मदिन साजरा करण्यासाठी 2 हजार 500 रुपये, दोन्ही मुली 5 वर्षे वयाच्या होईपर्यंत दर्जेदार पोषण आहार देण्यासाठी 5 वर्षांसाठी 10 हजार रुपये,
  4.  दोन्ही मुलींना इयत्ता 1 ली ते 5 वी पर्यंत पोषण आहार व इतर खर्चासाठी 5 वर्षांसाठी 15 हजार रुपये, दोन्ही मुलींना इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंत पोषण आहार व इतर खर्चासाठी 7 वर्षांसाठी 22 हजार रुपये लाभ देण्यात येणार आहे.
  5. मात्र 1 मुलगी व 1 मुलगा असलेल्या बालकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  6.  दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात जन्मणाऱ्या मुलींसाठी विमा योजना राबविण्यात येणार असून यामध्ये मुलींच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत 21 हजार 200 रुपयांचा विमा एल.आय.सी. मध्ये शासनामार्फत काढण्यात येणार आहे.
  7. यासाठी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर एक लाख रुपयांच्या विम्याची रक्कम अदा करण्यात येणार आहे. तसेच मुलीच्या पालकांचाही विमा काढण्यात येणार असून यामध्ये मुलींच्या पालकांचा अपघात किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास पुढीलप्रमाणे विम्याची रक्कम मिळणार आहे.
  8. नैसर्गिक मृत्यु झाल्यास 30 हजार रुपये, अपघाती मृत्यू झाल्यास 75 हजार रुपये, दोन डोळे किंवा दोन अवयव निकामी झाल्यास 75 हजार रुपये, एक डोळा अथवा एक अवयव अपघातामुळे निकामी झाल्यास 37 हजार 500 रुपये विम्याचा लाभ मिळणार आहे.
  9. पहिल्या मुलीनंतर मातेने कुटुंब नियोजन केले असल्यास आजी आजोबांनाही म्हणजे मुलीच्या मातेच्या सासू सासऱ्यांना 5 हजार रुपयांपर्यंत सोन्याची नाणी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
  10. तसेच ज्या गावामध्ये मुला-मुलींचे लिंग गुणोत्तर एक हजारापेक्षा जास्त असेल अशा प्रत्येक जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीला पाच लाखाचे पारितोषिक देण्यात येणार आहे,

२ टिप्पण्या:

  1. I read information about mazi kanya yojana .all information is very good.

    उत्तर द्याहटवा
  2. RPSC is known as Rajasthan Public Service Commission. RPSC has recently issued a latest recruitment notification to fill up vacancies for Motor Vehicle Sub Inspector posts. Are you looking for the best Online Classes for RTO Inspector? to know more contact - Zone Tech +91-9462447676

    उत्तर द्याहटवा