Post views: counter

रेल्वे अर्थसंकल्प 2016                                रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी २०१५-१६ आर्थिक वर्षासाठीचा रेल्वे अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. मोदी सरकारचा पूर्ण वेळेसाठीचा हा पहिलाच रेल्वे अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात रेल्वेच्या प्रवासी आणि मालवाहतुकीच्या भाड्यात कोणतीही वाढ करणार नसल्याचे प्रभू यांनी स्पष्ट केले. त्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे…

रेल्वे बजेट २०१६
* कोणत्याही आकर्षक आणि भल्यामोठ्या घोषणा न करता पायाभूत सुविधांचा विकासावर भर देणारा २०१६-१७ साठीचा रेल्वे अर्थसंकल्प रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आपला दुसरा  अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला
* यामध्ये प्रवाशांची सुरक्षा, रेल्वेतील स्वच्छता, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करतानाच लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचाच विचार सुरेश प्रभू यांनी अर्थसंकल्पात केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी प्रवासी किंवा मालवाहतुकीच्या भाड्यात कोणतीही वाढ सुचविलेली नाही.
* रेल्वे अर्थसंकल्पातील महत्वाचे' वैशिष्ट्ये -
 1. - रेल्वेला विकासाचा कणा बनवण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न
 2. - भारतीय रेल्वे हे आर्थिक विकासाचे इंजिन
 3. - रेल्वे अर्थसंकल्पात सर्वसामान्यांच्या अपेक्षांची पूर्तता
 4. - रेल्वे देशाला जोडण्याचे काम करते
 5. - हा अर्थसंकल्प संपूर्भाण रताचे प्रतिनिधित्व करणारा आहे
 6. - भाडेवाढ न करता उत्पन्नाचे नवीन स्रोत आणण्याचे प्रय़त्न करणार
 7. - जगभरात मंदीचा काळ सुरु असताना रेल्वे नफ्यात आणण्याचा प्रय़त्न
 8. - मालवाहतूक दरात वाढ करून प्रवासी दरातील तूट कमी करण्याचा प्रयत्न
 9. - 2015-19 या काळात सुमारे 8.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट
 10. - सर्वांनी मिळवून नवनिर्मितीची गरज
 11. - रेल्वेच्या प्रगतीसाठी पारंपरिक मार्ग बंद करणार
 12. - मानवरहित रेल्वे फाटक इतिहासजमा करण्याचा प्रयत्न
 13. - यंदा रेल्वेतील गुंतवणूक दुप्पट होईल, कामाच्या पद्धतीत बदल
 14. - येत्या वर्षात 1 लाख 84 हजार 820 कोटींचं लक्ष्य, 8 टक्के उत्पन्न वाढवणार
 15. - रेल्वेची कर्मचारी संख्या 13,07109
 16. - 2016 मध्ये 8 हजार 720 कोटींची बचत अपेक्षित
 17. - एक्स्प्रेस गाड्यांचा वेग वाढविला जाईल
 18. - गेल्यावर्षी करण्यात आलेल्या 139 घोषणांवर कार्यवाही करण्यात येत आहे
 19. - 2020 पर्यंत मालगाड्यांची सरासरी वेग 50 किमी प्रती तास आणि एक्स्प्रेस गाड्यांचा वेग ताशी 80 किमी करण्याचा उद्देश
 20. - प्रत्येकाला रेल्वे आरक्षण मिळणार. प्रतीक्षा यादी बंद होणार
 21. - 2020 पर्यंत सर्व रेल्वे गाड्या वेळापत्रकानुसार चालविण्याचे लक्ष्य
 22. - रेल्वे उत्पन्नासाठी अन्य पर्यायांचा विचार
 23. - येत्या काळात दररोज 19 किमी रेल्वे मार्ग. पुढील वर्षात 2500 किमी नवे मार्ग
 24. - गाड्यांमधून मलमूत्र विसर्जन थांबविणार
 25. - कामात पारदर्शकता आणण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर करणार
 26. - एलआयसी पुढील वर्षी रेल्वेत दीड लाख कोटी रुपये गुंतवणार
 27. - रेल्वेच्या विद्युतीकरणावर येत्या दोन वर्षांत भर देणार
 28. - रेल्वेतील सर्व पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने भरती
 29. - मुंबई उपनगरी सेवा दररोज 74 लाख प्रवाशांची वाहतूक
 30. - रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 5 वर्षांत 8.5 लाख कोटी खर्च करणार
 31. - 124 खासदारांकडून सुधारणांसाठी निधी
 32. - मेक इन इंडिया अंतर्गत रेल्वेचे दोन कारखाने सुरु करणार
 33. - जनरल डब्यातही मोबाईल चार्जरची सुविधा देणार
 34. - 400 रेल्वे स्थानके पीपीपी तत्वानुसार विकसित करणार
 35. - रेल्वे स्थानकांवर 2500 पाणी व्हेंडिंग यंत्र उभारणार
 36. - रेल्वेसंबंधी तक्रारींसाठी फोनलाईन्स उपलब्ध करणार
 37. - बिहारसह पूर्वेकडील राज्यांना रोजगार देणार
 38. - वाराणसी-दिल्ली नवी रेल्वेसेवा सुरू होणार
 39. - ई तिकीटासाठी संकेतस्थळाची क्षमता वाढविली, आता 7 हजार तिकीटे काढता येणार
 40. - महिलांच्या सुरक्षेसाठी 24 तास हेल्पलाईन सुरु होणार
 41. - 182 हा महिला प्रवाशांसाठी हेल्पलाईन नंबर
 42. - दोन वर्षांत 400 रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय सुविधा पुरविणार
 43. - रेल्वे आणि सामान्य प्रवाशांमध्ये संवादासाठी गेल्या वर्षभरात विशेष प्रयत्न केले
 44. - महिला आणि ज्येष्ठांसाठी लोअर बर्थसाठी विशेष कोटा
 45. - 92 हजार 714 कोटी रुपयांचे नवे प्रकल्प हाती घेणार
 46. - मार्चअखेर 17 हजार बायोटॉयलेट्स स्थानके आणि गाड्यांमध्ये बसवणार
 47. - श्रीनगरला रेल्वेमार्गांनी जोडण्याचे काम लवकरच पूर्ण करणार
 48. - ब्रॉडगेज सेवा 36 टक्के वाढवण्याचे लक्ष्य
 49. - मणिपूर आणि मिझोरमला लवकरच ब्रॉड गेजनं जोडलं जाईलः
 50. - सर्व रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही लावण्यात येतील
 51. - बडोद्यात रेल्वे विद्यापीठ उभारणार
 52. - दृष्टीहिन प्रवाशांसाठी रेल्वे डब्यांमध्ये ब्रेल लिपीतील सूचनांची सोय करणार
 53. - 2016-17 मध्ये संपूर्णपणे पेपरलेस कॉन्ट्रॅक्ट पद्धती राबवणार
 54. - अपंगांना जाता येईल अशी स्वच्छतागृहे स्थानकांवर उभारणार
 55. - 10 मार्गावर अनारक्षित अंत्योदय एक्स्प्रेस चालणार
 56. - बोगीत कचरा दिसल्यास तातडीने स्वच्छतेची मागणी करु शकणार
 57. - रेल्वे प्रवासादरम्यान विमा उतरविण्याची सोय उपलब्ध करणार
 58. - गरम दूध, पाणी आणि नवजात अर्भकांसाठी खाद्यपदार्थ रेल्वे स्टेशनांवर आणि ट्रेनमध्ये उपलब्ध होणार
 59. - लहान मुलांसाठी वेगळे जेवण उपलब्ध असेल
 60. - मुंबईकरांचा प्रवास वेगवान करण्याच्या दिशेने पाऊल
 61. - चर्चगेट ते विरार, सीएसटी ते पनवेल एलिव्हेटेड कॉरिडॉरचे लक्ष्य
 62. - एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम लवकर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
 63. - मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला सुरवात
 64. - हमसफर, तेजस आणि उदय या तीन नव्या आरक्षित गाड्यांची घोषणा
 65. - तेजस रेल्वेचा वेग ताशी 130 किमी असेल
 66. - हमालांना आता कुलीऐवजी सहाय्यक या नव्या नावाने ओळखले जाणार, ड्रेसकोड बदलणार
 67. - 139 क्रमांकावर रेल्वे तिकीट रद्द करता येणार
 68. - दिल्लीत रिंग रेलच्या माध्यमातून 21 स्थानके जोडण्यात येणार
 69. - तिर्थक्षेत्रांना जोडण्यासाठी आस्था योजना राबविण्यात येणार
 70. - मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी जपानची मदत घेणार
 71. - केरळ ते दिल्ली प्रवास सहा तासांहून कमी करण्याचा प्रयत्न
 72. - वृद्धांना प्रवासात मदत करण्यासाठी सारथी सेवा
 73. - रेल्वेला महसूल मिळवून देणाऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार
 74. - पत्रकारांसाठी विशेष आरक्षण सेवा देणार
 75. - गरीब रथ आता दीनदयाळ रथ नावाने ओळखणार
 76. - डब्यांची क्षमता वाढविण्यासाठी अभ्यास करुन निर्णय घेणार
 77. - प्रवाशांच्या मनोरंजनासाठी एफएम रेडिओ स्टेशनसोबत बोलणी सुरु
 78. - मुंबईत प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे काम वेगाने करणार
 79. - तात्काळ तिकीटांच्या खिडक्यांवर सीसीटीव्ही बसविणार
 80. - रेल्वेच्या प्रकल्पांवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन आणि जीपीएस सिस्टीमचा वापर करणार
 81. - मोठ्या स्टेशनवर स्थानिक खादयपदार्थ उपलब्ध करण्याची सोय
 82. - महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवर तिकीटांना बार कोड देणार
 83. - रेल्वेची समोरासमोर धडक रोखण्यासाठी परदेशी तंत्रज्ञानाचा वापर करणार
 84. - लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये स्वच्छतेसाठी ‘क्लिन माय कोच‘ ही नवी एसएमएस सेवा सुरू करणार
 85. - रेल्वेचा पहिला ऑटो हब चेन्नईमध्ये उभारणार
 86. अजमेर, अमृतसर, मथुरा, नांदेड, नाशिक रेल्वे स्टेशनच्या सुशोभिकरणाला प्राधान्य
 87.  - अर्थसंकल्पीय तूट भरुन काढण्यावर भर
 88. - सरासरीपेक्षा दुप्पट गुंतवणूक करणार
 89. - खर्च कमी करण्याचा प्रयत्न करणार
 90. - जुन्या अनेक पद्धती बदलण्याची गरज
 91. - राज्यांसोबत एकत्र येऊन नवे प्रकल्प
 92. - रेल्वे कर्मचाऱ्यांना ११.६७ टक्के ज्यादा वेतन
 93. - योग्य नियोजन करुन रेल्वेचा विकास करणार
 94. - वेतन आयोग शिफारसींचा रेल्वेवर परिणाम
 95. - लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारं बजेट असेल
 96. - राज्यांसोबत PPP मॉडेल राबवणार
 97. - उत्पन्नाचे इतर स्त्रोत शोधण्याचा प्रयत्न
 98. - पॅसेंजर ट्रेनमध्ये बायोटॉयलेट करणार
 99. - वेग, कार्यक्षमता, पारदर्शकतेवर भर
 100. - रेल्वेमध्ये गुंतवणूक वाढवणार
 101. - मालगाड्यांची गती वाढवणार
 102. -  २०२० पर्यंत 'मागेल तेव्हा तिकीट'
 103. - अधिक फ्रेट कॉरिडॉरचा प्रस्ताव
 104. - तीन वर्षात रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण करणार
 105. - मेक इन इंडियांतर्गत लोको फॅक्टरीज
 106. - उधमरपूर - श्रीगनर मार्गाचे काम समाधानकारक
 107. - मिझोरम-मणिपूर ब्रॉडगेज नकाशावर
 108. - बोगदे, पुलांचे काम प्रगतीपथावर
 109. - दोन नव्या कारखान्यांची घोषणा
 110. - पुढच्या तीन-चार वर्षात प्रकल्प पूर्ण होणार
 111. - पेपरलेस मॅनेजमेंट सिस्टीमची सुरुवात
 112. - कामकाजात १०० टक्के पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न
 113. - २०२० पर्यंत मानवरहित फाटक बंद करणार
 114. - प्रवाशांसाठी सोशल मीडियाचा वापर
 115. - शताब्दी, राजधानीच्या डब्यांचा विकास कऱणार
 116. - तक्रारी ऐकण्यासाठी स्वतंत्र फोनलाईन
 117. - रेल्वेगाड्यांचा वेग ताशी ८० किमी करण्यावर भर दिला जाईल
 118. - लोअर बर्थसाठी आता जास्त कोटा
 119. - ई-तिकीटांची क्षमता वाढवणार
 120. - रेल्वे नव्या ४० योजना सुरु करणार
 121. - नॉन एसी कोचची संख्या वाढवणार
 122. - सर्व स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार
 123. - रेल्वे अपघात कमी कऱण्यासाठी प्रयत्न मानवरहित क्रॉसिंग कमी करणार
 124. - पुढील २ वर्षात ४०० स्टेशन्सवर वायफाय
 125. - जनरल डब्यांमध्ये मोबाईल चार्जिंगची सुविधा
 126. - 'एटीएम'द्वारे तिकीट मिळवण्याच्या सुविधेवर भर
 127. - वाराणसी ते दिल्ली नवी रेल्वेसेवा सुरु होणार
 128. - पुढील वर्षात ३९ नवी इंजिन्स
 129. - शून्य रेल्वे दुर्घटना करण्याचे लक्ष्य
 130. - अनारक्षित तिकीटांसाठी 'दिन दयालू कोचेस'
 131. - गाड्यांमध्ये अनारक्षित डबे वाढवणार
 132. - मोबाईल अॅप, ऑनलाईन सुविधांवर भर देणार
 133. - रेल्वेतील महिला सुरक्षेवर अधिक भर देणार
 134. - मोबाईल खिडक्यांवर तिकीट मिळणार
 135. - पत्रकारांसाठी ई-तिकीट बुकिंगची सुविधा
 136. - तात्काळ काउंटर्सवर सीसीटीव्ही लावणार
 137. - 'क्लीन माय कोच' सेवा सुविधा करणार
 138. - रेल्वेमध्ये हायजेनिक पदार्थ देण्यावर भर
 139. - रेल्वेतील अन्नपदार्थांचा दर्जा सुधारण्यावर भर
 140. - १० नवे आयआरसीटीसी ऑपरेटर्स
 141. - कोकण रेल्वेमध्ये सारथी योजना सुरु करणार
 142. - बेबी फूड, दुधाची गाड्यांमध्ये व्यवस्था
 143. - ऑनलाईन प्रक्रियेवर भर देणार
 144. – रेल्वेमध्ये स्वच्छतेसाठी नवा विभाग
 145. – स्थानके आणि रेल्वेगाड्यांना कंपन्यांची नावे देऊन निधीची उभारणी
 146. – ज्येष्ठ नागरिकांना व्हिलचेअर ऑनलाईन आरक्षित करता येणार
 147. – रेल्वेच्या नव्या डब्यांमध्ये ब्रेल लिपीतही सूचना लिहिल्या जाणार
 148. – शारीरिकदृष्ट्या दुर्बल प्रवाशांना डब्यामध्ये पटकन चढता यावे, यासाठी नव्या डब्यांमध्ये दरवाजांची रुंदी वाढविणार
 149. – रेल्वे कर्मचाऱय़ांना कामगिरीवर आधारित बोनस
 150. – रेल्वेमध्येही सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर
 151. – रेल्वेत नोकरीसाठी ऑनलाईन अर्जभरती
 152. – नव्या रेल्वेगाड्यांची अर्थसंकल्पीय अधिवेशनात नंतर घोषणा
 153. – प्रवाशांच्या सूचनांचा अर्थसंकल्पात विचार करणार
 154. – रेल्वेच्या विकासासाठी ११ कलमी कार्यक्रम
 155. – रेल्वेरूळ वाढविण्याला प्राधान्य
 156. – रेल्वेमध्ये खासगी कंपन्यांची गुंतवणूक
 157. – रेल्वेत बायोटॉयलेट उभारणार
 158. – ‘अ’ श्रेणीतील सुमारे ४०० स्थानकांवर वाय-फाय सुविधा
 159. – सर्व स्थानकांवर लॉकर उपलब्ध करून देणार
 160. – काही रेल्वेगाड्यांमध्ये आणि लोकलमधील महिलांसाठी राखीव डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे
 161. – मुंबईत एसी लोकल लवकरच सुरू करणार
 162. – स्वच्छ रेल, स्वच्छ भारत हे रेल्वेचे नवे ब्रीदवाक्य
 163. – रेल्वेडब्यांमध्ये शिडीची सोय करणार
 164. – रेल्वेच्या वेळापत्रकाची माहिती देणारे एसएमएस अलर्ट
 165. – प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी १८२ हा क्रमांक असलेली हेल्पलाईन
 166. – १३८ हा क्रमांक असलेली हेल्पलाईन देशपातळीवर सुरू करणार
 167. – खासदार निधीतून रेल्वेसाठी निधी देण्याची मागणी
 168. – पाच मिनिटांत विनाआरक्षण तिकीट मिळणार
 169. – रेल्वे ही राष्ट्रीय संपती आणि प्रवाशांचे धावते घर
 170. – महिला सुरक्षेसाठी निर्भया निधीची तरतूद
 171. – ईशान्य भारत रेल्वेचे जाळे विस्तारणार
 172. – जम्मू-काश्मीरमध्ये रेल्वेचे जाळे विस्तारणार
 173. – १०८ रेल्वेंमध्ये ई-केटरिंग सुविधा मिळणार
 174. – दिल्ली-कोलकाता, दिल्ली-मुंबई या मार्गावरील रेल्वेगाड्यांचा वेग वाढविणार
 175. – मुंबई-अहमदाबाद मार्गासाठी हायस्पीड ट्रेनचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात
 176. – नऊ मार्गांवर हायस्पीड रेल्वे धावणार
 177. – चार महिनेआधी रेल्वे आरक्षण करता येणार
 178. – मानवरहित रेल्वेक्रॉसिंगवर रेडिओवेव्हच्या साह्याने सूचना देण्यासाठी आयआयटी कानपूरसोबत करार
 179. – रेल्वेतील इनोव्हेशन्ससाठी ‘कायाकल्प’ कार्यक्रम
 180. – निवडक स्थानकांवर प्रवाशांना पिक-ड्रॉपची सुविधा
 181. – रेल्वेडब्यांमध्ये मोबाईल चार्जिंगसाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देणार
 182. – रेल्वेच्या सद्यस्थितीवर आधारित श्वेतपत्रिका लोकसभेत सादर करणार
 183. – पर्यावरणासाठी रेल्वेमध्ये गुंतवणूक आवश्यक
 184. – पुढील काळात अधिक रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार
 185. – रेल्वेरुळांवरील विद्युतीकरणावर भर
 186. – रेल्वे वेळेवर धावाव्यात यादृष्टीने नियोजन - 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा