Post views: counter

Current Affairs Feb 2016 part- 4


  •  सहवीज निर्मितीमधून 777 कोटींचे उत्पन्न
➡ राज्यातील साखर कारखान्यांना सहवीज निर्मितीमधून गेल्या वर्षी तब्बल 777 कोटी रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाल्याची माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
➡ तसेच त्यामुळे शेतकऱ्यांना एफआरपीनुसार दर देताना कारखान्यांना मोठी मदत होत आहे.
➡ महावितरण साखर कारखान्यांकडून सर्वाधिक 6 रुपये 59 पैसे प्रति युनिट या दराप्रमाणे वीज खरेदी करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
➡ देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात या कारखान्यांकडील वीज खरेदी दरात प्रति युनिट 78 पैसे इतकी वाढ केली आहे.
➡ देशात अशाप्रकारे सर्वांत जास्त दराने वीज खरेदी करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे.
➡ राज्य सरकारने उसाच्या चिपाडापासून तसेच कृषी अवशेषांपासून सहवीज निर्मिती प्रकल्पांसाठीचे धोरण जाहीर केले आहे.
➡ राज्यातील साखर कारखान्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात दोन हजार मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे.
➡ सध्या राज्यात सहवीज निर्मितीचे 101 प्रकल्प कार्यान्वित आहेत. त्यामधून 1 हजार 743 मेगावॅट वीज निर्मिती होते.
➡ गेल्यावर्षी महावितरणने साखर कारखान्यांकडून एक हजार 195 मेगावॅट वीज खरेदी केली, त्यावेळी कारखान्यांना 777 कोटी रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे.
  •  राज्यात आठ लाख कोटींचे करार
➡ मेक इन इंडिया सप्ताहात (दि.17) पाचव्या दिवशी आठ लाख कोटींची गुंतवणूक आणण्यात राज्य सरकारला यश आले.
➡ स्मार्ट सिटी, हवाई वाहतूक, किरकोळ उद्योग, लघू व मध्यम उद्योग (एसएमई), परवडणारी घरे आदी क्षेत्रांत 18 सामंजस्य करार करण्यात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
➡ आधुनिक स्मार्ट शहर संकल्पनेच्या निर्मितीसाठी 11 गावांचे एकत्रित प्रतिनिधित्व करणाऱ्या खालापूर नगर पंचायत, कलोटे मोकाशी ग्रामपंचायत, नादोडे ग्रामपंचायत यांनी एकूण 3550 हेक्‍टर जमिनीच्या लॅण्ड पुलिंगसाठी स्वेच्छेने पुढाकार घेतला आहे.

➡ नैना योजनेच्या धर्तीवर करण्यात खालापूर स्मार्ट सिटीचा विकास करण्यात येणार यासंबंधीचा करार मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत करण्यात आला.
➡ ग्रामस्थांनी पुढाकार घेतलेला हा देशातील पहिलाच प्रकल्प असून त्याच्या पूर्णत्वासाठी राज्य शासनातर्फे आवश्‍यक ते सर्व सहकार्य केले जाईल.
➡ देशांतर्गत व परदेशातून रुग्णांची ने-आण करणाऱ्या पहिल्या हवाई रुग्णवाहिकेसंदर्भात राज्य शासन व मॅब एव्हिएशन यांच्यात सामंजस्य करार झाला.
  •  केंद्र सरकारची नवे लोहमार्ग उभारण्याची घोषणा
➡ रेल्वे अर्थसंकल्पाला अवघे काही आठवडे शिल्लक असताना केंद्र सरकारने नवे लोहमार्ग उभारण्याची घोषणा केली आहे.
➡ दहा हजार 700 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पांतर्गत वर्धा (सेवाग्राम)-बल्लारशहासह सहा नवे मार्ग बांधले जातील.
➡ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला.
➡ तसेच यासोबत आरोग्य, कृषी, विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रांशी संबंधित महत्त्वाच्या निर्णयांवरही मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले.
➡ रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि माहिती व तंत्रज्ञानमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली. 
➡ या प्रकल्पात, हुबळी-चिकाजूर मार्गाचे दुहेरीकरण केले जाणार आहे. सव्वाचार वर्षांत हा मार्ग पूर्ण होणे अपेक्षित असून, त्यासाठी 1294.13 कोटी रुपये खर्च येईल.
➡ संपूर्ण पुणे-मिरज-हुबळी-बंगळूर हा मार्ग दुहेरीकरणासाठी निश्‍चित करण्यात आला असून, मुंबई-बंगळूर या मार्गावरील प्रवासी व मालवाहतूक सुरळीत करण्याची ही योजना आहे.
➡ वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना जोडणारा वर्धा (सेवाग्राम)-बल्लारशाह असा 132 किलोमीटर लांबीचा तिसरा लोहमार्ग उभारला जाणार आहे.
  •  विश्वचषक फुटबॉल स्पर्धा नवी मुंबईमध्ये होणार
➡ जगातील फुटबॉलप्रेमीसांठी पर्वणी असणार्या फिफा (फेडरेशन इंटरनॅशनल ऑफ फुटबॉल असोशिएशन) 2017 ला होणा-या वर्ल्डकपचे सामने नेरुळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळविले जाणार आहेत.
➡ फीफा चे संचालक जेवीयर सेप्पी यांनी (दि.17) डी.वाय पाटील स्टेडियमची पाहणी केली. फुटबॉल हा खेळ जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ मानला जातो.
➡ प्रत्येक चार वर्षांनी 17 वर्षांखालील खेळाडूंसाठी होणारी विश्वचषक स्पर्धा भरवण्याचा मान यंदा भारताला मिळाला आहे.
➡ 2017 च्या फूटबॉल विश्वचषक सामन्यांकरिता झालेली निवडीने नवी मुंबई शहराच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला आहे.
➡ तसेच या स्पर्धेतील प्रमुख सामने नेरूळच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळले जाणार आहेत, या स्टेडियमची 65 हजार प्रेक्षक सामावून घेण्याची क्षमता आहे.
➡ अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दूरचित्रवाहिन्या या खेळांचे थेट प्रक्षेपण करणार आहेत.
➡ फिफा पथकाने विश्वचषकासाठी कोलकाता, नवी दिल्ली, कोच्ची, गुवाहाटी, नवी मुंबई आणि गोवा या सहा अस्थायी आयोजन स्थळांपैकी नवी मुंबईची निवड केली आहे.
  •  अलोक वर्मा दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त होणार
➡ वरिष्ठ आयपीएस अधिकारी अलोक वर्मा दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त होणार आहेत.
➡ 1979 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या अलोक वर्मा यांचे नाव निश्चित करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.
➡ तसेच, सध्याचे दिल्ली पोलीस आयुक्त बी एस बस्सी येत्या 29 फेब्रुवारीला निवृत्त होत असून त्यांच्या जागी येत्या 1 मार्चपासून दिल्ली पोलीस आयुक्तपदाची धुरा अलोक वर्मा सांभाऴणार आहेत.
➡ दिल्ली पोलीस आयुक्तपदाच्या शर्यतीत अलोक वर्मा यांच्यासह 1984 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी धर्मेद्र कुमार यांचेही नाव चर्चेत होते. 
➡ सध्या अलोक वर्मा तिहार जेलच्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत. 
  • गोव्यात 21 वर्षांखालील व्यक्तींना कॅसिनोबंदी
➡ गोव्यातील कॅसिनोमध्ये यापुढे 21 वर्षांखालील व्यक्तींना प्रवेश देण्यावर बंदी घालण्यात येणार आहे.
➡ गोव्याच्या गृहमंत्रालयाने अशा प्रकारची बंदी घालण्याबाबतच्या नियमांचा मसुदा तयार केला आहे.
➡ पुढील आर्थिक वर्षांपासून नवे नियम लागू होणार आहेत, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
नियमांचा मसुदा विधि विभागाकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आला आहे.
➡ कॅसिनोंसाठी नियामक प्राधिकरण म्हणून आयुक्तांची नियुक्ती करणे नियमानुसार बंधनकारक करण्यात आले असून ते मान्यतेसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवावे लागणार आहेत.
➡ नवे नियम लागू झाले की, कॅसिनोमध्ये जाण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीला तो 21 वर्षांहून अधिक वयाचा आहे हे सिद्ध करणारा दस्तऐवज स्वत:जवळ ठेवावा लागणार आहे.
  • ५८ वा ग्रॅमी पुरस्कार :
  1.  सर्वोत्कृष्ट अल्बम:-1989 (टेलस स्विफ्ट )(दोनदा ग्रॅमी पुरस्कार मिळवणारी टेलर स्विफ्ट ही पहिली महिला आहे)
  2.  रिकॉर्ड ऑफ द ईअर: Uptown Funk (ब्रुनो मार्स आणि निर्माता मार्क रॉन्सन
  3.  सॉन्ग ऑफ द ईअर: थिकिंग आउट लाउड‘ (एड शिरीन )
  4.  सर्वोत्कृष्ट रॅप अल्बम: टू पिंप अ बटरफ्लाय’ (क्रेंडिक लेमर)
  5.  सर्वोत्कृष्ट म्यूझिक थिएटर अल्बम: हॅमिलटन
  6.  बेस्ट डान्स रेकॉर्ड :-रस्क्रिलेक्सर, डिप्लो आणि जस्टिन बायबर
  7. बेस्ट न्यूज आर्टिस्ट :-ट्रेनॉर
  8. बेस्ट पॉप :-मार्क रॅन्सन फिट
  9.  बेस्ट अल्टनेटिव्ह म्युझिक अल्बम;-सिराइस, गोस्ट
  10.  भारतीय-ब्रिटिश दिग्दर्शक असीफ कपाडिया यांना चित्रपट-माहितीपट प्रवर्गात उत्कृष्ट संगीतासाठी ‘अॅकमी’ या माहितीपटाकरिता संगीताचा पुरस्कार मिळाला.
  • प्रॉव्हिडन्ट फंडावर यंदा ८.८० टक्के व्याज; कामगार संघटनांची नाराजी
: संघटित क्षेत्रातील आठ कोटींहून अधिक नोकरदारांच्या भविष्य निर्वाह निधीचे (प्रॉव्हिडन्ट फंड) व्यवस्थापन करणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) केंद्रीय विश्वस्त मंडळाने सन २०१५-१६ या चालू वर्षासाठी सदस्यांना त्यांच्या खात्यांत जमा असलेल्या रकमेवर ८.८० टक्के दराने व्याज देण्याची शिफारस केली आहे. विश्वस्त मंडळावरील कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी मात्र हा याहून जास्त व्याज देणे शक्य होते, असे म्हणून झालेल्या निर्णयाचा निषेध केला आहे. केंद्रीय श्रम राज्यमंत्री बंडारु दत्तात्रेय यांच्या अध्यक्षतेखाली येथे झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निणय घेण्यात आला. यंदासाठी शिफारस केलेला हा व्याजदर गेल्या वित्तीय वर्षात दिल्या गेलेल्या ८.७५ टक्के या दराहून थोडासा जास्त आहे. याआधी केंद्रीय श्रम मंत्रलयाने ८.९० टक्के दराने व्याज देण्याचा प्रस्ताव वित्त मंत्रालयाकडे स्वीकृतीसाठी पाठविण्याचे ठरविले होते. तसेच ‘ईपीएफओ’च्या वित्तीय, गुंतवणूक व लेखा परीक्षण समितीनेही ८.९५ टक्के व्याज देण्याची शिफारस केली होती. परंतु अल्प बचतीच्या एकूणच सर्व योजनांचे व्याजाचे दर आवाक्यात ठेवण्याच्या कल्पनेनुसार प्रॉ. फंडाचा व्याजदरही माफक वाढविण्याचे सुचविले होते.
  • ‘सॅग’वर भारताची मोहोर
यजमान भारताने दक्षिण आशियाई विभागात खेळातील वर्चस्व कायम राखताना विक्रमी ३०८ पदकांसह मंगळवारी संपलेल्या १२ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदाचा मान मिळवला. महिला बॉक्सर्सनी तिन्ही सुवर्णपदके पटकावली, तर ज्यूदोपटूंनी अखेरच्या दिवशी दोन सुवर्ण व दोन रौप्यपदकांची कमाई केली. भारताने एकूण १८८ सुवर्ण, ९९ रौप्य व ३० कांस्यपदके पटकावली. भारताने पदकाचे त्रिशतक ओलांडले. यापूर्वी २०१० मध्ये झालेल्या स्पर्धेत भारताने ९० सुवर्णपदकांसह एकूण १७५ पदके पटकावली होती. श्रीलंका एकूण १८६ पदकांसह (२५ सुवर्ण, ६३ रौप्य, ९८ कांस्य) दुसऱ्या स्थानी राहिला. पाकिस्तानला १०६ पदकांसह (१२ सुवर्ण, ३७ रौप्य, ५७ कांस्य) तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. अफगाणिस्तानने सात सुवर्णपदकांसह एकूण ३५ पदके पटकावताना चौथे स्थान मिळवले. बांगलादेशने चार सुवर्णपदकांसह एकूण ७५ पदके पटकावत पाचवे, तर नेपाळने तीन सुवर्णपदकांसह एकूण ६० पदकांची कमाई करताना सहावे स्थान पटकावले. मालदीव व भूतान यांना सुवर्णपदक पटकावता आले नाही. मालदीवने दोन रौप्यपदकांसह एकूण तीन पदके पटकावली. मालदीव सातव्या, तर एक रौप्य व १५ कांस्यपदके पटकावणारा भूतान एकूण १६ पदकांसह आठव्या स्थानी आहे.
  • नवी मुंबईमध्ये होणार विश्वचषक फुटबॉल स्पर्धा
जगातील फुटबॉलप्रेमीसांठी पर्वणी असणार्या फिफा (फेडरेशन इंटरनॅशनल आॅफ फुटबॉल असोशिएशन) २०१७ला होणा-या वर्ल्डकपचे सामने नेरु ळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळविले जाणार आहेत. फीफा चे संचालक जेवीयर सेप्पी यांनी बुधवारी डी.वाय पाटील स्टेडियमची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. फुटबॉल हा खेळ जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ मानला जातो. प्रत्येक चार वर्षांनी १७ वर्षांखालील खेळाडूंसाठी होणारी विश्वचषक स्पर्धा भरवण्याचा मान यंदा भारताला मिळाला आहे.
निवड:-
  • सेबीच्या अध्यक्षपदी यू.के.सिन्हा यांची पुन्हा निवड:
* केंद्र सरकार ने सेबी चे सध्याचे अध्यक्ष यू के सिन्हा यांचा कार्यकाल एक वर्षाने वाढवला .
* ते आता १ मार्च २०१७ पर्यंत सेबीचे अध्यक्ष राहतील. सिन्हा यांचाकार्यकाल दि. १७ फेब्रुवारी रोजी संपणार होता. ते १८ फेब्रुवारी २०११ पासून सेबी चे अध्यक्ष होते त्याची निवड युपीए सरकारने तीन वर्षासाठी केली होती. परंतु तीन वर्षाचा कार्यकाळ संपल्यानतर त्यांना दोन वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती
* केंद्र सरकार ने ऑगस्ट २०१५ या वर्षी सिन्हा यांच्या जागेवर योग्य व्यक्तीची निवड करण्यासाठी कैबिनेट सेक्रेटरी यांच्या अध्यक्षते खाली एका समितीची स्थापना केली होती. या अध्यक्षपदाच्या शर्यतीत एसबीआई च्या चेअरमन अरुधंति भट्टाचार्य, पूर्व एफएमसी चेयरमैन रमेश अभिषेक आणी थॉमस मैथ्यू यांच्या नावाचा समावेश होता
* सिन्हा १९७६ च्या बच चे बिहार कैडर चे आयएएस अधिकारी होत
  • पुरस्कार:-
#तमाशा #जीवनगौरव #पुरस्कार:
• तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या तमाशा जीवनगौरव पुरस्कारासाठी गंगाराम कवठेकर याची निवड करण्यात आली
• राज्य सरकारच्या सास्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी लोकनाट्य क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेया जेष्ठ कलावंतास तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या स्मरणार्थ तमाशा जीवनगौरव पुरस्कार देवून गौरविण्यात येते.
• पाच लाख रु, मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे
• कवठेकर हे उत्कृष्ट ढोलकीपटू असून सोगाडया म्हणून लोकप्रिय आहे.त्यांना लोकनाट्य क्षेत्रातील सर्व कला अवगत आह

  • सलमानला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
 सर्वोच्च न्यायालयाने अभिनेता सलमान खानला हिट अँड रन प्रकरणी नोटीस पाठवली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने २००२च्या हिट अँड रन प्रकरणी सलमानची निर्दोष मुक्तता केली होती. त्याविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सलमानला नोटीस पाठवली आहे.सर्वोच्च न्यायालयामध्ये सलमानची बाजू या सुनावणीवेळी काँग्रेस नेते आणि वकिल कपिल सिब्बल यांनी मांडली. तर महाराष्ट्र सरकारकडून मुकुल रोहातगी यांनी राज्य सरकारची बाजू मांडली. हिट अँड रन प्रकरण घडले तेव्हा सलमानच गाडी चालवत होता, याचे सबळ पुरावे आमच्याकडे आहेत, अशी बाजू राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात मांडण्यात आली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सलमानला नोटीस पाठवली आहे.
  • ‘लिम्का बुक’मध्ये सचिनच्या ‘प्लेइंग इट माय वे’ची नोंद
क्रिकेटमधून जरी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने निवृत्ती घेतली असली तरी त्याची नवनवे विक्रम प्रस्थापित करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. फिक्शन आणि नॉन-फिक्शन वर्गवारीतील सर्वाधिक विक्रीचे पुस्तक सचिनचे ‘प्लेइंग इट माय वे’ हे आत्मचरित्र ठरले आहे. ६ नोव्हेंबर २०१४ साली सचिनचे ‘प्लेइंग इट माय वे’ हे आत्मचरित्र ‘हॅचे इंडिया’ने प्रकाशित केले होते. आजवर त्याच्या १,५०,२८९ प्रत विकल्या गेल्या आहेत. ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. ‘प्लेइंग इट माय वे हे’ सचिनचे आत्मचरित्र प्री-बुकिंग नोंदणी, प्रकाशनाच्या पहिल्या दिवशीची विक्री आणि एकूण विक्री अशा तिनही वर्गवारीत सर्वाधिक खप झालेले पुस्तक ठरले आहे. याशिवाय, डॅन ब्राऊन यांच्या ‘इनफर्नो’, वॉल्टर आयसेक्सन यांचे ‘स्टीव्ह जॉब्स’ आणि जे.के.रौलिंग्स याचे ‘कॅज्युअल व्हॅकेन्सी’ या पुस्तकांनीही सचिनच्या ‘प्लेइंग इट माय वे’ने मागे टाकले आहे.
  • पाकिस्तानात पठाणकोट हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गुंजरावाला पोलिस चौकीमध्ये भारतातील पठाणकोट येथे हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली आहे.तेथील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दहशतवादी हल्ला करणारे व त्यांना भडकून देणा-यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विविध पोलिस पथके तयार करण्यात आली आहेत. दरम्यान, पठाणकोट येथील हल्ल्यावेळी सात जवान हुतात्मा झाले होते तर चार दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. त्यांच्याजवळ पाकिस्तानातील वस्तू आढळून आल्या होत्या. या हल्ल्याला भारताने जैश-ए-मोहम्मद या संघटनेला जबाबदार धरले आहे. पाकिस्तानने या संघटनेच्या कार्यालयांवर छापे टाकून ते बंद केले आहेत. शिवाय, काहींना ताब्यात घेतले आहे.
  • संगीतकार खय्याम करणार १० कोटींचे दान
 ९० व्या वाढदिवसानिमित्त दहा कोटींची संपत्ती दान करण्याचा निर्णय बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार खय्याम यांनी घेतला आहे. खय्याम यांनी कुटुंबीयांसह वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले. दहा कोटींची संपत्ती दान करणार असल्याचे यावेळी आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी जाहीर केले. जगजीत कौर केपीजी चॅरिटेबल ट्रस्टची खय्याम यांनी स्थापना केली आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रातील गरजू कलाकार आणि तांत्रिक साहाय्य करणाऱ्यांना आर्थिक मदद केली जाणार आहे. खय्याम यांच्या या दानशूरपणाचे चित्रपटसृष्टीत कौतुक होत आहे.आंतरराष्ट्रीय
  • चीनने वादग्रस्त बेटावर केली क्षेपणास्त्र तैनात
चीनने दक्षिण चीन समुद्रातील एका वादग्रस्त बेटावर जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र तैनात केली असून एका रडार यंत्रणेचा सेटअप देखील बनविला आहे. चीनने हे पाऊल अमेरिका आणि भारताच्या संयुक्त नाविक गस्तीच्या चर्चेदरम्यान उचलले आहे. चीन दक्षिण चीन समुद्रावर आपला हक्क दर्शवितो.पेंटागॉनच्या हवाल्यानुसार या वादग्रस्त चीनने सागरी क्षेत्रात ८ क्षेपणास्त्र तैनात केली आहेत. वूडी आयलँडवर एक रडार सिस्टिमदेखील उभी केली आहे. वुडीवर तैवान आणि व्हिएतनाम देखील आपला अधिकार दर्शवितात. चीनचे हे कृत्य सिव्हिलियन सॅटेलाईट इमेजरी आणि इमेजसेट इंटरनॅशनलने उघडकीस आणले. ही क्षेपणास्त्र १४ फेब्रुवारीला वूडी आयलँडवर आणली गेली. छायाचित्रांमध्ये एचएक्यू-९ डिफेन्स मिसाईल सिस्टिम दिसत आहे.याची कक्षा २०० किलोमीटरपर्यंत आहे. पेंटागॉन प्रवक्ते बिल अरबन यांच्यानुसार अमेरिका यावर नजर ठेवून आहे. चीनच्या या पावलाला अमेरिकेसाठी आव्हानाच्या रूपात पाहिले जात आहे.अमेरिका आणि भारत वादग्रत दक्षिण चीन समुद्रात संयुक्त नाविक गस्त करण्याची शक्यता आहे. दोन्ही देश यावर चर्चा करत आहेत. भारत दक्षिण चीन समुद्रातदेखील मोठी भूमिका बजावू शकतो. या वादग्रस्त क्षेत्रात चीनविरोधात अधिकाधिक आशियाई देशांचा पाठिंबा मिळविण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. याआधी भारताने कोणत्याही संयुक्त गस्तीत भाग घेतलेला नाही. तसेच याविषयीच्या भारताच्या धोरणात कोणताही बदल देखील झालेला नाही. परंतु अमेरिकेच्या नेतृत्वाखाली कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोहिमेत भारत भाग घेऊ शकतो.
  • जगातील सर्वात मोठा स्कूटर कारखाना गुजराथेत सुरू
होंडा स्कूटरचा जगातील सर्वात मोठा कारखाना अहमदाबादजवळच्या विठ्ठलपूर येथे सुरू झाला असून त्याचे उद्घाटन गुजराथच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. यावेळी या कारखान्यात तयार झालेली पहिली स्कूटर आनंदीबेन यांना भेट म्हणून देण्यात आली. आनंदीबेन यांनी यावेळी बोलताना ही स्कूटर मेडिकलचे शिक्षण घेण्याची तयारी करत असलेल्या वंचित समाजातील मुलीला देणार असल्याचे जाहीर केले.या कारखान्यातून दरवर्षी १२ लाख स्कूटरचे उत्पादन केले जाणार आहे. त्यासाठी ११०० कोटींची गुंतवणूक केली गेली असून ३ हजार लोकांना येथे रोजगार मिळाला आहे. या कारखान्याचे भूमिपूजन झाल्यानंतर अवघ्या १५ महिन्यात येथे उत्पादन सुरू करण्यात व्यवस्थापनाला यश आले आहे. या कारखान्यामुळे आसपासच्या भागातील अन्य विकासकामांनाही गती मिळाल्याचे सांगितले जात आहे. अर्थ 
  • युनायटेड ब्रेवरीज ‘डिफॉल्टर’ म्हणून जाहीर
उद्योगपती विजय माल्ल्या यांच्या बुडीत युनायटेड ब्रेवरीज होल्डिंग (युबीएचएल) ला जाणूनबुजून चूक करणारी म्हणजे ‘विलफूल डिफॉल्टर’ म्हणून पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) जाहीर केले आहे. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी वकिलांशी सल्लामसलत सुरू असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.११ फेबुवारीला पीएनबीने पाठविलेल्या पत्रामध्ये कंपनीला डिफॉल्टर म्हणून जाहीर केले आहे, अशी माहिती युबीएचएलने मुंबई शेअरबाजाराला पाठविलेल्या सूचनेमध्ये केली आहे. पीएनबीचे पत्र आम्हाला सोमवारी उपलब्ध झाल्यामुळे या निर्णयाला आव्हान देण्यासाठी वकिलांशी चर्चा सुरू असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.मल्ल्या, किंगफिशर एअरलाइन्स आणि त्यांची होल्डिंग कंपनी युनायटेड ब्रेवरीजला याच्या अगोदर भारतीय स्टेट बँकेने जाणूनबुजून चूक करणारे म्हणून घोषित केले आहे. एसबीआयच्या नेतृत्वाखाली बँकांनी मुंबईमध्ये किंगफिशर हाऊसचा १७ मार्चला लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. किंगफिशर एअरलाइन्सकडून ९,९६३ कोटी रुपयांच्या थकित कर्जापैकी काही वसुली करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे
  • एफ १६ विमानांचे भारतात उत्पादन करण्याची तयारी
अमेरिकन लढावू विमाने एफ १६ चे मेक इन इंडिया अंतर्गत उत्पादन करण्याची तयारी लॉकहीड मार्टिन कंपनीने दर्शविली आहे. सिंगापूर येथे पार पडलेल्या एअरशो मध्ये पत्रकारांशी बोलताना लॉकहीड मार्टिन इंडिया प्रा.लिमि.चे मुख्य अधिकारी फिल शॉ यांनी ही माहिती दिली.शॉ म्हणाले मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत दोन्ही देशात उत्पादन प्रकल्पांसंदर्भात जी चर्चा सुरू आहे त्याचे आम्ही समर्थन करतो. एफ सोळा विमाने भारतात उत्पादन करण्याची आमची तयारी असून या उपक्रमाअंतर्गत होत असलेल्या योजनेतील ही सर्वात मोठी योजना असू शकते. या प्रकल्प किती काळात उभारला जाईल याविषयी मात्र त्यांनी माहिती दिली नाही.कंपनीच्या अमेरिकन प्लँटमध्ये महिन्याला १ जेट विमान बनविले जाते. लॉकहिड मार्टिनने भारताला ६ सुपर हक्र्यूलस सी १३० ही मालवाहू विमाने दिली आहेत आणि पुढच्या वर्षी सहा हेलिकॉप्टर्सही दिली जाणार आहेत.
  • २० लाख गाड्या परत मागवणार टोयोटा
जगभरातून २०.८७ लाख कार प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी टोयोटा माघारी (रिकॉल) बोलविणार आहे. टोयोटाच्या आरएव्ही-४ स्पोर्ट्स युटिलिटी वाहन (एसयूव्ही)ला रिकॉल करण्यात येत असून जुलै २००५पासून ऑगस्ट २०१४पर्यंत आणि ऑक्टोबर २००५ते जानेवारी २०१६या दरम्यानच्या कारला कंपनी रिकॉल करत आहे. या कारमध्ये मागील सीटबेल्ट सदोष आढळल्याने क्रॅश आणि अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता या कार माघारी बोलविण्यात येत आहेत.एक ई-मेल जारी करून टोयोटाने याची माहिती दिली आहे. काही ठिकाणी कार क्रॅश होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. याला सीटबेल्ट सदोष असल्याचे कारण देण्यात येत होते. मेटल सीट कुशन प्रेमचा काही भाग सीटमधून बाहेर निघत आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता असून, त्यामुळे जखमी होण्याची शक्यता जास्त आहे, असे कंपनीकडून ई-मेलने कळविले आहे.
  • ब्रँडन मॅक्युलमचा वेगवान शतकाचा विक्रम :
न्यूझीलंडचा कप्तानब्रँडन मॅक्युलमने कसोटी क्रिकेटमधल्यावेगवान शतकाचा विक्रम (दि.19)केला आहे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटीतमॅकयुलमने अवघ्या54 चेंडूंमध्ये शतकझळकावले आहे.कारकिर्दीतलं बारावं शतक झळकावताना मॅक्युलमने16 चौकार व 4 षटकारफटकावले, मॅक्युलमची ही101वीव शेवटची कसोटी आहे.तसेच या आधीचा विक्रमविवियन रिचर्डवमिसबाह उल हकच्या नावावर होता.रिचर्डने इंग्लंडविरुद्ध अँटिग्वामध्ये खेळताना तर मिसबाहने ऑस्ट्रेलिविरुद्ध अबुधाबीमध्य खेळताना56चेंडूंमध्ये शतक झळकावले होते.  कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही केला असून त्याने101 षटकारआत्तापर्यंत मारले आहेत, हा विक्रम याआधी100षटकार मारणा-या अॅडम गिलख्रिस्टच्या नावावर होता.
  • पोलीस भरतीतील धाव ‘चिप’वर :
महाराष्ट्र पोलीस दलात भरतीसाठी आलेल्या तरुणांची शारीरिक क्षमता चाचणीत भलतीच दमछाक होऊन काही जणांना जीव गमावावा लागला होता.त्यामुळे आता भरतीतील धावांचे अंतर कमी करण्यात आले असून, यापुढे5किलोमीटरऐवजी1600मीटरचे तर महिलांना800मीटरचे अंतर धावावे लागेल.तसेच उमेदवाराच्या अंगालाएक चिपचिकटविली जाणार असून, या चिपवर त्याने किती अंतर किती वेळेत कापले याची नोंद होईल.पोलीस खात्यात भरती होण्यासाठी धावण्याची चाचणी घेतली जाते, यासाठी आता अत्याधुनिकतंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.इच्छुक उमेदवाराला पूर्ण20 गुणमिळविण्यासाठी पुरुषांना हे अंतर4 मिनिटे 50सेकंदांतव महिलांना2 मिनिटे 30 सेकंदांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करावे लागेल.त्याशिवाय गोळाफेक, लांबउडी, जोरबैठका व100 मीटरवेगाने धावणे या प्रत्येकाला20 गुणआहेत.किमान10जोरबैठका उमेदवाराला काढाव्या लागतात, परंतु पूर्ण20गुणमिळविण्यासाठी100मीटरचे अंतर12 सेकंदांतत्याला पार करावे लागते.तसेच या सगळ्या अटी महिलांनाही लागू आहेत असे भारतीय पोलीस सेवेतील(आयपीएस)वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.....
  • नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचे भारतात आगमन :
नेपाळचे पंतप्रधानके. पी. शर्मा ओलीयांचे(दि.19)सहा दिवसांच्या भारतभेटीसाठीयेथे आगमन झाले.पदावर आल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा असून, नव्या घटनेमुळे नेपाळमध्ये निर्माण झालेल्या प्रश्नांसह अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर ते भारतीय नेत्यांबरोबर चर्चा करतील.ओलीयांच्याबरोबर77सदस्यांचे एक शिष्टमंडळही असून, परराष्ट्रमंत्रीसुषमा स्वराजयांनी या सर्वांचे विमानतळावर स्वागत करून भारत या भेटीला किती महत्त्व देतो हे दाखवून दिले.  भारतीय वंशाच्या मधेशी समाजाला सामावून घेण्यासाठी नेपाळने घटनेत तसे बदल करण्याचासल्ला ओली यांना भारताकडून दिला जाणार आहे.
  • पाच नवीन बाह्य़ग्रहांचा शोध :
आपल्या सौरमालेतील गुरू या ग्रहाशी मिळतेजुळते गुणधर्म असलेलेपाच नवीन ग्रहवैज्ञानिकांनी शोधून काढले आहेत, गुरू हा आपल्या सौरमालेतील मोठा ग्रह आहे.तसेच हे ग्रहसुद्धा त्यांच्या मातृताऱ्याभोवती फिरत असून तेही गुरूसारख्याच आकारमानाचे आहेत.ब्रिटनमधीलकिली विद्यापीठातीलवैज्ञानिकांनी‘वास्प साऊथ’म्हणजेवाइड अँगल फॉर प्लॅनेटस-साऊथया उपकरणाचा वापर यात केला असून या यंत्रणेत आठ कॅमेरे आहेत.दक्षिणेकडील ठरावीक भागाचे निरीक्षण करण्यात आले असता पाच ताऱ्यांभोवती प्रकाशाचा वक्राकार दिसला; प्रत्यक्षात ते या ग्रहांचे अधिक्रमण होते.नव्याने शोधलेल्या ग्रहांची नावेवास्प 119 बी, वास्प 124 बी, वास्प 126 बी, वास्प 129 बी, वास्प 133 बीअशी आहेत, असे‘फिजिक्स डॉट ओआरजी’या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.या ग्रहांचा कक्षीय काळ हा2.17 ते 5.75दिवस असून त्यांचे वस्तुमान गुरूच्या0.3 ते 1.2पट आहे.तर त्रिज्या गुरूच्या त्रिज्येपेक्षा1 ते 1.5पटींनी अधिक आहे.
  • भारतीय संशोधकांचा ओबामांच्या हस्ते सत्कार :
स्वतंत्रपणे संशोधन करणाऱ्या 106 युवा शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते सत्कार होणार असून, यामध्ये सहा भारतीय वंशाच्या नागरिकांचा समावेश आहे.
 तसेच या सर्वांना 'अर्ली करियर ऍवॉर्ड' मिळणार असून, हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो.
 मिलिंद कुलकर्णी (पर्ड्यू विद्यापीठ), किरण मुसुनुरू (हार्वर्ड विद्यापीठ), सचिन पटेल (वॅंडरबिल्ट विद्यापीठ), विक्रम श्‍याम (नासा), राहुल मंगारम (पेनसिल्वानिया विद्यापीठ) आणि श्‍वेतक पटेल (वॉशिंग्टन विद्यापीठ) अशी या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांची नावे आहेत.
 युवावस्थेतच संशोधन क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या अमेरिकी नागरिकांना दरवर्षी हा मानाचा पुरस्कार दिला जातो. तसेच या युवा संशोधकांमुळे आपल्याला जगासमोरील आव्हानांचे आकलन होण्यास आणि त्यांची सोडवणूक करण्यास मदत होते.
  • भारताची पदकांची संख्या एकूण पाच :
पॅन्टॅथलॉन खेळाडू स्वप्ना बर्मन हिला इराणी संघाकडून विरोध (प्रेटेस) दर्शविला गेल्यामुळे बाद करण्यात आल्याने आशियाई इनडोअर अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाला धक्का बसला.
 दुसरीकडे रंजित महेश्वरीने तिहेरी उडीत रौप्य पदक जिंकून आपल्या संघाला दिलासा दिला.
 भारताची पदकांची संख्या आता एकूण पाच झाली आहे.
 रंजितने (दि.21) तिहेरी उडीत 16-16 मीटरचे अंत कापून रौप्य आपल्या नावावर केले.
 कजाकिस्तानच्या रोमन वालियेव्हने 16.69 मीटर उडी मारून सुवर्ण पदकावर आपला हक्क प्रस्थापित केला.
 कतारच्या राशिद अहमद अल मनाईला (15.97 मी.) कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
 महिलांच्या 60 मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या गायत्री गोविंदराजने 8.38  सेकंदांची वेळ नोंदवून व्यक्तिगत सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले.
  • बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिपमध्ये चीनला विजेतेपद :
चीनने (दि.21) येथे गाचीबावली इनडोअर स्टेडियममध्ये बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिपच्या महिला गटातील फायनलमध्ये जपानचा 3-2 असा पराभव करीत विजेतेपद पटकावले.
 जपानच्या नोजोमी ओकुहाराने चीनच्या शिजियान वाँगचा 17-21, 21-16, 21-15 असा पराभव करीत विजयाने सुरुवात केली.
 मिसाकी मातसुतोमो-अयाका ताकाहाशी या दुहेरी जोडीने चीनच्या यिंग लुओ आणि किंग टियान यांच्यावर 21-12, 21-16 अशी मात करीत संघाची विजयी लय कायम ठेवली; परंतु चीनच्या यू सून हिने एकेरीत आपल्या संघाचे नशीब बदलले, तिने जपानच्या सयाका सातो हिचा 22-20, 21-19 असा पराभव केला.
 दुसऱ्या दुहेरी लढतीत चीनच्या यू लुओ आणि युआनटिंग टांग या जोडीने नाओको फुकुमॅन आणि कुरुमी यानाओ यांचा 21-11, 21-10 असा पराभव करीत संघाला बरोबरी साधून दिली.
 निर्णायक एकेरीत चीनच्या बिंगजियाओ ही हिने जपानच्या युई हाशिमोटो हिचा पराभव करीत संघाला विजय मिळवून दिला.
 तसेच या स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला होता.
  • जेब बुश यांची निवडणुकीतून माघार :
रिपब्लिकन पक्षाचे उत्सुक उमेदवार जेब बुश यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे.
 दक्षिण कॅरोलिनामध्ये स्वीकाराव्या लागलेल्या मोठ्या पराभवामुळे त्यांनी माघार घेतली आहे.
 जेब बुश हे अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज डब्लू. बुश यांचे भाऊ आहेत, तसेच ते फ्लोरिडाचे गव्हर्नरही होते.
 अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षातर्फे उमेदवारी मिळविण्यासाठी उत्सुक असलेल्या हिलरी क्‍लिंटन यांनी बर्नी सँडर्स यांना मागे टाकून नेवाडामध्ये विजय मिळविला.
 तसेच वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असलेले रिपब्लिकन पक्षाचे इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रंप यांनी दक्षिण कॅरोलिनामध्ये विजय मिळविला.
  • उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रपती पोलीसपदक :
उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रपती पोलीसपदक घोषित करण्यात आलेल्या राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष सन्मानित करण्याला राज्य सरकारने जाहीर केले.
 सुमारे अडीच वर्षांपूर्वी जाहीर झालेल्या 80 हून अधिक शौर्यवान पोलीस अधिकाऱ्यांचा (दि.22) राज्यापाल सी.विद्यासागर यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.
 सीआयडीचे प्रमुख संजयकुमार, तुरुंग विभागाचे महानिरीक्षक डॉ.भूषणकुमार उपाध्याय, केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेले सदानंद दाते आदी अधिकाऱ्यांचा या सोहळ्यात सन्मान होणार आहे.
  • वाहन परवान्यांसाठी यापुढे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक :
वाहन परवान्यांसाठी यापुढे मराठी भाषेचे ज्ञान असणे महत्वाचे असल्याचे परिवहन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 तसेच त्यानुसार ऑटोरिक्षा परवान्यांच्या यशस्वी अर्जदारांची मराठी भाषेच्या ज्ञानाची परीक्षा परिवहन विभागाकडून घेण्यात येणार आहे.
 राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र व पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नागपूर, नाशिक व औरंगाबाद महापालिका क्षेत्रात 12 जानेवारी रोजी 42 हजार 798 ऑटोरिक्षा परवान्यांचे लॉटरी पध्दतीने वाटप करण्यात आले होते.
 लॉटरी वाटपानंतर मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 24 अन्वये शासनाने घालून देण्यात आलेल्या अटीप्रमाणे अर्जदारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असल्याची माहीती देण्यात आली होती.
 तसेच त्यानुसार 29 फेब्रुवारी ते 6 मार्च या कालावधीत उमेदवारांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची चाचणी घेण्यात येईल.
 चाचणीचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार असून यशस्वी उमेदवारांना त्याचदिवशी इरादापत्राचे वाटप केले जाईल.
  • भारतीय वंशाच्या सहा वैज्ञानिकांना पुरस्कार :
भारतीय वंशाच्या सहा वैज्ञानिकांसह एकूण 106 वैज्ञानिकांची अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी युवा वैज्ञानिक व अभियंत्यांसाठी असलेल्या सर्वोच्च पुरस्कारासाठी निवड केली आहे.
 वॉशिंग्टन येथे पुरस्कार वितरण समारंभ लवकरच होणार आहे. तरूण संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात, त्यात नवप्रवर्तनात्मक शोधांना प्राधान्य दिले जाते, त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते असे व्हाइट हाऊसने म्हटले आहे. या पुरस्काराच्या मानकऱ्यांमध्ये सहा भारतीय वंशाच्या वैज्ञानिकांचा समावेश असून परडय़ू विद्यापीठाचे संगणक अभियांत्रिकीचे प्राध्यापक मिलिंद कुलकर्णी यांचा समावेश आहे, त्यांचे संशोधन संगणक आज्ञावलीच्या भाषांशी निगडित आहे. हार्वर्ड विद्यापीठात मूळपेशी क्षेत्रात संशोधनात काम करणारे किरण मसुनुरू यांचाही समावेश असून त्यांचे संशोधन हृदयाच्या जनुकीय व चयापचय क्रियांशी निगडित आहे.
 मॉलीक्युलर फिजिऑलॉजी अँड बायोफिजिक्स व्हॅडरबिल्ट युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरचे सचिन पटेल यांचाही गौरव होत असून त्यांनी न्यूरॉनमधील कॅनाबिनॉइडचे मेंदूतील कार्य समजून घेण्यात मोठे काम केले आहे त्यामुळे मानसिक रोगांवर उपचार शक्य आहे.
 नासाच्या ग्लेन रीसर्च सेंटरचे विक्रम श्याम यांचे संशोधन इंजिन फ्लो फिजिक्स, बायोमिमेटिक याच्याशी संबंधित आहे. राहुल मंघाराम हे पेनसिल्वानिया विद्यापीठात सहायक प्राध्यापक असून त्यांनी ऊर्जाक्षम इमारती, स्वयंचलित यंत्रे व औद्योगिक बिनतारी यंत्रणा यावर संशोधन केले. वॉशिंग्टन विद्यापीठातील संगणक विज्ञान व अभियांत्रिकीचे प्राध्यापक श्वेताक पटेल यांना संगणक-मानव संबंध, संवेदक नियंत्रित प्रणाली यासाठी गौरवण्यात येत आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या कारकीर्दीत 1996 मध्ये हे पुरस्कार सुरू करण्यात आले.
  • राज्य सरकारचा कालबाह्य कायदे रद्द करण्याचा निर्णय :
स्वातंत्र्यपूर्व काळात अमलात आलेले आणि आता कालबाह्य ठरलेले कायदे रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.तसेच त्या अनुषंगाने राज्याच्या विधी व न्याय विभागाने महाराष्ट्र कोडअंतर्गत सध्या वापरात नसलेल्या सुमारे 170 कायद्यांची यादी बनवली आहे.याविषयी संबंधित विभागांचे अभिप्राय घेऊन हा प्रस्ताव विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात मांडण्याच्या हालचालींना वेग आला आहे.राज्य विधी आयोगाच्या एका अहवालानुसार महाराष्ट्र कोडमधील वापरात नसलेले जुने कायदे रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
महाराष्ट्र कोडमधील 370 कायद्यांचा विधी व न्याय विभागातील विशेष समितीने वर्षभर अभ्यास केला.
तसेच यापूर्वी 1983 मध्ये काही निरुपयोगी कायदे रद्द करण्यात आले होते.
राज्यात 'ऍडव्होकेट ऍक्‍ट 1961' अस्तित्वात आल्यानंतर 'प्लीडर्स ऍक्‍ट' निरुपयोगी ठरला.
'बॉम्बे रिफ्युजी ऍक्‍ट 1947', 'बॉम्बे स्मोक न्यूसन्स ऍक्‍ट 1912', ब्रिटिशकालीन 'फोरफिटेड लॅंड ऍक्‍ट' अशी कालबाह्य ठरलेल्या सुमारे 170 कायद्यांची यादी तयार करण्यात आली आहे.
तसेच हे कायदे रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास 'महाराष्ट्र कोड' मधील निम्मे कायदे रद्द होतील.

  • केंद्रीय अर्थसंकल्पात कार्ड व्यवहारांसाठी करात विशेष सूट :
प्रत्यक्ष रोखीने होणाऱ्या व्यवहारांचे प्रमाण कमी करतानाच वित्तीय व्यवहार डेबिट अथवा क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने केंद्रीय अर्थसंकल्पात कार्ड व्यवहारांसाठी करात विशेष सूट देण्यात येणार आहे. कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या देशातील व्यापाऱ्यांच्या अग्रगण्य संस्थेने या संदर्भात सरकारला आपला अहवाल सादर केला असून करात सूट देण्याची मागणी करण्यात आली आहे.सध्या कोणत्याही दुकानात जिथे डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वीकारले जाते अशा ठिकाणी संबंधित दुकानदारास डेबिट कार्डावरून व्यवहार झाल्यास 0.75 टक्के ते एक टक्का तर क्रेडिट कार्डावरून व्यवहारा झाल्यास दोन टक्के कर आकारणी केली जाते.बहुतांशवेळा हा संबंधित दुकानदार हा कर ग्राहकाच्याच खिशातून वसूल करतो, परिणामी, अनेक लोकांचा कल हा रोखीने व्यवहार करण्याकडे असतो.परंतु, रोखीने होणाऱ्या व्यवहारांचा खर्चही जास्त आहे आणि रोखीने होणाऱ्या व्यवहारामुळे काळ्या पैशाचा प्रसार होण्याची भीती असते.इलेक्ट्रॉनिक अथवा डेबिट अथवा क्रेडिट कार्डाद्वारे व्यवहार वाढावेत, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
  • पोलीस भरतीसाठी वयोमर्यादेत वाढ :
राज्यातील आगामी पोलीस भरतीसाठी वयाची मर्यादा वाढविण्यात आली आहे.
गृहमंत्रालयाने संबंधित आदेश जारी केले असून ते पोलीस मुख्यालयाला प्राप्त झाले आहेत,
त्यांच्याकडून आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
सर्वसाधारण उमेदवारांसाठी वयाची मर्यादा आता 25 वरून 28 वर्षे करण्यात आली आहे तर मागासवर्ग प्रवर्गासाठीची वयोमर्यादा 30 वरून 33 वर्षे करण्यात आली आहे.
मार्च महिन्यात पोलीस कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
तसेच त्यासाठी पुरूष उमेदवारांची पाच किलोमीटरऐवजी 1,600 मीटर अंतर धावण्याची स्पर्धा होईल, तर महिलांना तीन किलोमीटरऐवजी 800 मीटर अंतर धावावे लागेल, दहा दिवस ही भरती प्रक्रिया चालेल.
  • ‘विंदा करंदीकर जीवनगौरव’ पुरस्कार :
राज्य शासनातर्फे देण्यात येणारा 2015 वर्षासाठीचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्रा. रा. ग. जाधव यांना जाहीर करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केली आहे.
पाच लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप आहे.
फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या पुरस्कारार्थींची निवड केली आहे.
मराठी भाषा गौरवदिनी म्हणजेच येत्या 27 फेब्रुवारी रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येण्याची शक्यता आहे. 
साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकास 2010 या वर्षापासून विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येत असून, 2015 या वर्षासाठी ज्येष्ठ साहित्यीक प्रा. रा. ग. जाधव यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने यापूर्वी ज्येष्ठ साहित्यिक विजया राजाध्यक्ष, श्री. के. ज. पुरोहित, प्रा. द. मा. मिरासदार, श्री. ना. धों. महानोर, वसंत आबाजी डहाके यांना गौरविण्यात आले आहे.
  • चीनच्या शस्त्र निर्यातीत वाढ :
चीनने मागील पाच वर्षांमध्ये आपल्या शस्त्रनिर्यातीत दुपटीने वाढ केल्याचे एका अहवालात म्हटले आहे.
अत्याधुनिक शस्त्रे विकसित करण्यासाठी चीनने प्रचंड पैसा गुंतविला असल्याचेही दिसून आले आहे.
चीनची शस्त्र आयात 2011 ते 2015 या काळात 25 टक्‍क्‍यांनी कमी झाली, यामुळे स्वदेशी बनावटीच्या शस्त्रांवरील चीनचा विश्‍वास वाढल्याचेही दिसून येत आहे.तसेच गेल्या पाच वर्षांमध्ये चीनची मोठ्या शस्त्रांची निर्यात तब्बल 88 टक्‍क्‍यांनी वाढली आहे.जगातील एकूण शस्त्रनिर्यातीत चीनचा वाटा 5.9 टक्के इतका आहे, हा वाटा रशिया आणि अमेरिकेच्या तुलनेत फारच कमी असला तरी, त्यात आता वाढ होत आहे.दक्षिण चीन समुद्रातील वादामुळे आणि हिंदी महासागरात वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेमुळे चीनने ही गुंतवणूक केली आहे.अमेरिका आणि रशिया यांची शस्त्रनिर्यात अनुक्रमे 27 आणि 28 टक्‍क्‍यांनी वाढली आहे.
  1.   क्लब फुटबॉलविश्वात सातत्यपूर्ण गोल करण्याच्या क्षमतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या लिओनेल मेस्सीने ‘ला लिगा’ स्पर्धेत तीनशेव्या गोल केला ला लिगा स्पर्धेत तीनशे गोल करणारा मेस्सी पहिला खेळाडू ठरलामेस्सी ३०१ गोलांसह अव्वल स्थानी आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो (२४६) तिसऱ्या स्थानी आहे.
  2. एकत्र खेळताना अद्भुत सूर गवसलेल्या सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस जोडीने सेंट पीटर्सबर्ग स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला. या विजयासह या जोडीने सलग ४० लढतीत अपराजित राहण्याची किमयाही साधली. एकत्र खेळायला सुरुवात केल्यापासूनचे या जोडीचे हे १३वे तर नव्या हंगामातील चौथे जेतेपद आहे
  3.  ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना जिंकून न्यूझीलंड संघाने कर्णधार ब्रेंडन मॅकल्‌मला अखेरच्या एकदिवसीय सामन्यात विजयी निरोप दिला. न्यूझीलंडने तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली
  4. विदर्भाने यावर्षी पहिल्यांदाच रणजी करंडक चारदिवसीय, विजय हजारे करंडक एकदिवसीय आणि सैयद मुश्ताखक अली चषक टी-20 या तिन्ही स्पर्धांच्या बादफेरीत प्रवेश करण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला
  5. भारतात होणाऱ्या ट्वेंटी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदी स्टिव्ह स्मिथची निवड करण्यात आली आहे. ऍरॉन फिंचला कर्णधारपदावरून हटविण्यात आले
  6. गुजरात लायन्सने आगामी आयपीएलसाठी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून झिंबाब्वेचा माजी अष्टपैलू हिथ स्ट्रीक याची नियुक्ती केली आहे. तो सध्या बांगलादेशचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे
  7. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पंचगिरीसाठी बाद करण्यात आलेले पाकिस्तानी पंच असद रौफ यांनी 2013 मधील आयपीएलमध्ये गैरव्यवहार केल्या प्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्यांच्यावर पाच वर्षांच्या बंदीची कारवाई केली. 59 वर्षीय असद रौफ हे आयसीसीच्या एलिट पॅनेलमधील पंच होते. वादग्रस्त ठरलेल्या 2013 मधील आयपीएलमध्ये सट्टेबाजी करण्यासाठी बुकींकडून किमती भेटवस्तू घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. शशांक मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली ज्योतिरादित्य शिंदे आणि निरंजन शहा यांच्या शिस्तपालन समितीने हा निर्णय बैठकीत घेतला
  8.  दक्षिण आशियाई (सॅग) स्पर्धेत भारतीय संघ आपले वर्चस्व टिकवून राहिला. द्विशतकापर्यंत सुवर्णपदकाची वाटचाल करत भारताने पदकांचे दिमाखदार त्रिशतक ठोकून सलग बाराव्या स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. भारताने या स्पर्धेत १८८ सुवर्णष,९० रौप्य आणि ३० ब्राँझ अशी एकूण ३०८ पदके मिळविली.
  9. टपाल विभागाकडून चालविण्यात येणाऱ्या अल्पबचत योजनांवर मिळणाऱ्या व्याजदरात सरकारने पाव टक्क्य़ांची कपात केली
  10. भारतातील माहिती आणि तंत्रज्ञान (इंन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी) क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सर्वात जास्त पगार मिळत असल्याची माहिती ‘मॉन्स्टर सॅलरी इंडेक्स रिपोर्ट’मध्ये नोंदविण्यात आली आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सरासरी पगार ३४६.४२ रुपये प्रती तास इतका आहे. तर निर्माण (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रातील कर्माचाऱ्यांना सर्वात कमी वेतन मिळत आहे’
  11. गुजरातमधील विमान उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने अहमदाबादमध्ये देशातील पहिली विमान उद्योग नगरी स्थापन करण्याची योजना आखली
  12. गेल्या आर्थिक वर्षांतील भारतीय अर्थव्यवस्थेचा ७.६ टक्के हा वेग पाच वर्षांतील वरच्या टप्प्यावर पोहोचला आहे. निर्मिती आणि कृषी क्षेत्रातील प्रगतीच्या जोरावर देशाने याबाबत चीनलाही मागे टाकले आहे, तर चालू आर्थिक वर्षांतील तिसऱ्या तिमाहीतील दर हा ७.३ टक्के नोंदला गेला आहे. वर्षभरापूर्वीच्या ६.६ टक्क्यांपेक्षा तोयंदा सुधारला आहे
  13.  राज्यातील शैक्षणिक संस्थांतील शिक्षकांच्या भरतीवरील बंदी उठवण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली
  14.  मुंबईत नव्या वाहनांच्या विक्रीवर बंदी आणावी, अथवा नव्या वाहनांच्या विक्रीवर निर्बंध आणावेत, अशी शिफारस मुंबई महानगरपालिकेच्या वाहतूक विभागाने आणि खासगी सल्लागाराने तयार केलेल्या अहवालात केली
  15.  दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) नऊ फेब्रुवारीच्या रात्री पाकिस्तानच्या घोषणा दिल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व म्हणजे 46 केंद्रीय विद्यापीठांत रोज तिरंगाफडकावण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.
  16.  तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास योजनेची घोषणा केली.राज्यातील 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक सरकारी बससेवेचा मोफत लाभ घेऊ शकणार आहे. जयललिता यांनी सांगितले. 2011 च्या निवडणूक जाहीरनाम्यात राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत बससेवेची घोषणा करण्यात आली होती.
  17. वर्षेनुवर्षे भाडेपट्‌टा, कब्जे हक्क अथवा भोगवटा असलेल्या जमिनी आता मालकी हक्काने करण्याची संधी राज्यभरातल्या नागरिकांना उपलब्ध होणार. राज्य मंत्रिमंडळाने महसूल विभागाच्या या धोरणाला हिरवा कंदील दाखवत, महसूलसंहिता कायद्यात बदल करण्यास मान्यता दिली. यासाठी महसूल विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती
  18. राज्यात औद्योगिक विकासाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी पश्चिम पंजाबमध्ये तब्बल अडीच एकर जमीन (लॅंड बॅंक) तयार केली असून व्हॅट,इलेक्ट्रिक ड्यूटी, स्टॅम्प ड्युटी, मालमत्ता करात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय पंजाब सरकारने जाहीर केला.
  19. बॉलिवूडमधील किंग खान अभिनेता शाहरुख खानने दिल्ली विद्यापीठातील हंसराज महाविद्यालयातून28 वर्षानंतर वाणिज्य शाखेची पदवी घेतली.
  20. महात्मा गांधी यांचा सन्मान करण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या कोलोरॅडो राज्यातील लोकप्रतिनिधींनीएकमताने मंजूर केला आहे. आपले सर्व आयुष्य अहिंसा आणि शांततापूर्ण प्रतिकार करत अन्यायाविरुद्ध लढण्यात कारणी लावल्याबद्दल गांधीजींचा सन्मान केला जाणार
  21. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारमध्ये नितीश कुमार यांचे सल्लागार असलेले प्रशांत किशोर आता पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत काम करणार आहेत* आगामी तमिळवाडू विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि द्रमुकने (डीएमके) आघाडी करण्याचा निर्णय घेतला
  22. नवउद्योजकांमधीलनावीन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने "मेक इन इंडिया' सप्ताहात "स्टार्ट अप' योजनांसाठी स्पर्धा जाहीर केली* भारतीय वंशाच्या मुत्सद्दी हरिंदर सिद्धू यांची ऑस्ट्रेलियन सरकारने भारताच्या उच्चायुक्तपदी नियुक्ती केली. या पदावर निवड झालेल्या पाच वर्षांतील त्या दुसऱ्या भारतीय वंशाच्या अधिकारी आहेत
  23. मुंबई: कांदिवली येथील सार्वजनिक शौचालयात पहिले सॅनिटरी नॅपकीन वेडिंग मशीन बसवण्यात आले सर्व पालिका शाळांमध्ये सॅनिटरीनॅपकीन वेडिंग मशीन बसवणार, अर्थसंकल्पात १० कोटी रूपयांची तरतूद
  24. अरुणाचल प्रदेशमधील नव्या सरकारच्या स्थापनेला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील* सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते अब्दुल रशीद खान (वय - १०८) यांचे निधन
  25. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते 'इंडिया २०१६' आणि'भारत २०१६' या संदर्भ पुस्तिकांचे प्रकाशन* यंदाच्या विश्वचषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत श्रीलंका संघाच्या कप्तानपदी मलिंगा राहणार
  26.  केंद्र सरकार तेलंगण, बिहार, मिझोरम, राजस्थान, झारखंड आणि प.बंगाल या सात राज्यातील गरिबांसाठी ८०,००० घरे बांधणार आहे.
  27.  महाराष्ट्राला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी अभिनेते, उद्योगपती व काही संस्थांनी पुढाकार घेतला असून, त्यासाठी 'पाणी फाऊंडेशन'ची स्थापना करण्यात आल्याची घोषणा अभिनेता आमिर खानने केली. सत्यमेव जयते'च्या माध्यमातून जलसंधारणासाठी काम करणार- आमीर खान'सत्यमेव जयते वॉटर कप': जल संवर्धनासाठी जी गावे चांगली काम करतील त्यांना पुरस्कार
  28. दुष्काळग्रस्त भागातील सर्व विद्यार्थ्यांनासरसकट परीक्षा फी माफी देण्याचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय·
  29. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र कॉलेज उभारणार; अकरावीपासून जिल्ह्यातील ८० विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतील - शिक्षणमंत्री विनोद तावडे
  30. भविष्य निर्वाह निधीवरील (पब्लिक प्रॉव्हिंडंट फंड) व्याजर २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी ८.७५ टक्क्यांवरून वाढवून ८.८० टक्के करण्यात आल्याची घोषणा कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी केली आहे.
  31. पालघर विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचे अमित घोडा सुमारे २२ हजार मतांनी विजयी, काँग्रेसच्या राजेंद्र गावित यांचा पराभव
  32.  'बेटी बचाओ अभियाना'च्या संस्थापक डॉ. सुधा कांकरिया, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे, ज्येष्ठ अंतराळशास्त्रज्ञ डॉ. प्रमोद काळे, डॉ. नीलिमा पवार, भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा यांचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मान

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा