Post views: counter

Current Affairs April 2016 Part - 1

 • * ज्येष्ठ नागरिक व 45 पेक्षा अधिक वयाच्या महिला, तसेच गर्भवती महिलांसाठी रेल्वेमधील आरक्षण ५० टक्क्यापर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रत्येक रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना 90 बर्थ उपलब्ध होणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून करण्यात येणार आहे
 • * होलिकोत्सवाची पर्वणी साधून केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी सहा टक्के महागाई भत्त्याचा हप्ता देण्याची घोषणा केली.
 • * मराठवाड्याच्या वेगळ्या राज्याला आपला पाठिंबा असेल, असे वादग्रस्त विधान केल्याने सरकारला अडचणीत आणणारे ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांनी आज महाधिवक्तापदाचा राजीनामा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे दिला
 • * येत्या एक एप्रिलपासून आणखी दहा राज्यांमध्ये अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांनी जाहीर केले. यामुळेया कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या राज्यांची एकूण संख्या 21 होणार आहे.
 • * राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण धोरण (एनटीसीपी) तयार करण्याची आवश्यकता असल्याची शिफारस यासंदर्भातील संसदीय समितीने केली आहे.समानता असलेले आणि सुधारणावादी राष्ट्रीय धोरण तयार करण्याची आवश्यकता असून, या धोरणात उद्दिष्ट्ये आणि ध्येय निश्चित करण्याची गरज असल्यावर संसदीय समितीने भर दिला आहे.
 • * चितळे बंधू मिठाईवाले‘चे संस्थापक भाऊसाहेब ऊर्फ रघुनाथ भास्करराव चितळे (वय 96) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे उद्योग क्षेत्रात उंच पताका फडकविणारे मराठी उद्योजक आपल्यातून गेले, अशा भावना व्यक्त होत आहेत. चितळेंची बाकरवडी असेल किंवा श्रीखंड, याची चव आणि या माध्यमातून पुण्याचे नाव त्यांनी जगाच्याकानाकोपऱ्यात पोचविले होते.
 • * बांगलादेशच्या गोलंदाजीतील हुकमी अस्त्र मानले जाणाऱ्या टस्किन अहमद याच्या गोलंदाजीची शैली संशयास्पद असल्याने त्याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास तातडीने बंदी घालण्यात आली आहे. त्याच्यासह बांगलादेशचाच फिरकी गोलंदाज अराफत सनी या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाचीही शैली संशयास्पद असल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे.
 • * आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध फॉर्च्यून या माध्यम मासिकाने जगातील 50 महान नेत्यांची यादी नुकतीच प्रसिद्ध केली असून, त्यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा समावेश आहे. आम आदमी सरकारच्या सम-विषम वाहतूक योजनेबद्दल फॉर्च्यूनने केजरीवाल यांचे विशेष कौतुक केले आहे.
 • * शासकीय जाहिरातींवर फक्त राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सरन्यायाधीश यांचेच छायाचित्र वापरण्याच्या आपल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सुधारणा करून राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री यांचेही छायाचित्र वापरण्याला मंजुरी दिली. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सरन्यायाधीशांच्या छायाचित्रांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही राजकीय नेत्यांच्या छायाचित्रांचा सरकारी जाहिरातींमध्ये यापुढे वापर करता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 13 मे 2015 रोजी दिला होता.
 • * पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दुसऱ्या वर्षी अमेरिकेतील टाइम नियतकालिकेतर्फेप्रसिद्ध करण्यात आलेल्या इंटरनेटवरील सर्वाधिक प्रभावी व्यक्तींच्या यादीत स्थान मिळविले
 • * जगभरातील 156 आनंदी देशांच्या यादीत चीन आणि पाकिस्तानने भारताला मागे टाकले आहे. भारत 118 व्या क्रमांकावर असून पाकिस्तानला 92 वा, तर चीनला 83 वा क्रमांक मिळाला
 • * आर्थिक गैरव्यवहारात अडकलेल्या विजय मल्ल्या यांनी इंडियन प्रीमिअर लीगमधील (आयपीएल) रॉयल चॅलेंजर्स स्पोर्टस या फ्रॅंचाईजीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला
 • * आगामी आर्थिक वर्षासाठी ‘एच-1 बी‘ व्हिसासाठी अर्ज स्वीकारण्यास येत्या 1 एप्रिलपासून सुरवात होणार आहे. अमेरिकी कंपन्यांकडून कुशल परदेशी कर्मचाऱ्यांच्याअमेरिकेतील नियुक्तीसाठी या व्हिसाचा वापर केला जातो. मुख्यत्वे भारतीय कर्मचाऱ्यांना या व्हिसाचा सर्वाधिक लाभ होतो.
 • * भारती एअरटेलने व्हिडिओकॉन टेलिकम्युनिकेशन्सच्या सहा परिमंडळातील (सर्कल) स्पेक्ट्रमची 4,428 कोटी रुपयांना खरेदी करण्याची घोषना
 • * रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) सर्व बॅंकांना बचत खात्यांवरील व्याजाची रक्कम दर तिमाहीत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे देशातील कोट्यवधी बचत खातेधारकांना फायदा होणार आहे.
 • * मदर तेरेसा यांना चार सप्टेंबरला अधिकृतरीत्या संतपद बहाल केले जाणार असल्याचे ख्रिस्ती धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी जाहीर केले
 • * अमेरिकी कंपनी "प्रॉक्टर अँड गॅम्बल‘ने (पी अँड जी) देशात "विक्स ऍक्शन 500 एक्स्ट्रा‘ गोळ्यांची विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. "पी अँड जी‘च्या भारतीय उपकंपनीने डोकेदुखी, सर्दी व खोकल्यावर उपाय म्हणून वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांचे उत्पादन व विक्री त्वरित थांबवली आहे. अन्न व औषध नियामक मंडळांनी या गोळीवर बंदी घातली आहे.
 • * केंद्र आणि राज्यांचे कॅबिनेट मंत्री हे सार्वजनिक अधिकारी आहेत, माहिती अधिकार कायद्यांतर्गत (आरटीआय) जनतेच्या प्रश्नांनाउत्तर देण्यासाठी ते बांधील असल्याचे केंद्रीय माहिती आयोगाने म्हटले आहे.
 • * राहण्यासाठी योग्य असलेल्या सर्वोत्कृष्ट 60 देशांच्या यादीत भारताने 22वे स्थान मिळविले आहे. जागतिक अर्थ परिषदेत याबाबतची घोषणा नुकतीच करण्यात आली.
 • * आधार‘ क्रमांकाला कायदेशीर मान्यता देऊन त्यामार्फत अंशदान आणि इतर आर्थिक लाभ पोचविण्याच्या प्रक्रियेला वैधानिक दर्जा देणारे आधार विधेयक (आधारआर्थिक व अंशदान लाभ आणि सेवांचे उद्दिष्टाधारित वितरण विधेयक) लोकसभेत मंजूर झाले.
 • * इंडिया' ऐवजी "भारत' हाच शब्द वापरण्यात यावा यासाठी दाखल करण्यात आलेली जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली
 • * काश्मीरच्या महिला मुख्यमंत्री श्रीनगर : पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी एकमताने निवड झाली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्रीपदी बनण्याचा मान मुफ्ती यांना मिळणार आहे.
 • * नव्याने निर्माण झालेल्या तेलंगण राज्याचा हैदराबाद येथील संस्थांवर पूर्ण हक्क राहणार नाही. कारण हैदराबाद या राजधानी शहरावर आंध्र प्रदेशाचाही हक्क आहे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. आंध प्रदेश व तेलंगण या राज्यांची २०१४ मध्ये विभागणी झाली. त्यावेळी दोन्ही राज्यांमध्ये मालमत्ता व उत्तरदायित्वांची विभागणी केली होती. त्यावेळी आंध प्रदेश राज्य परिषदेच्या निधीवर तेलंगणाने हक्क सांगितला होता* ब्रिटनमधील आशियाई वंशाच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत हिंदुजा बंधू सलग चौथ्यांदा अव्वल स्थानी राहिले आहेत. १६अब्ज ५०कोटी पौंड त्यांची संपत्ती आहे. आशियाई श्रीमंतांच्या यादीत ब्रिटनमधील १०१ श्रीमंत आशियाई व्यक्तींच्या संपत्तीचा आढावा घेण्यात येतो. एशियन मीडिया अँड मार्केट ही प्रकाशन संस्था ही यादी तयार करते. पोलाद सम्राट लक्ष्मी मित्तल या यादीत दुस-या स्थानावर असून इंग्लंडमधील भारताचे उच्चायुक्त नवतेज सरना यांनी ही यादी जारी केली.
 • * जमैकाचा ऑलिम्पिक व विश्वविजेता धावपटू उसेन बोल्टने यंदा रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेनंतर निवृत्त होण्याचे संकेत दिले आहेत. ही स्पर्धा आपल्या कारकीर्दीतील शेवटची ऑलिम्पिक स्पर्धा असेल, असे त्याने सांगितले. बोल्टने २००८ ते २०१२ या कालावधीत ऑलिम्पिकमध्ये सहा सुवर्णपदकांची कमाई केली आहे* भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तने शनिवारी रिओ ऑलिम्पिकमधील सहभागावर शिक्कामोर्तब केले. आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पध्रेत योगेश्वरने पुरुषांच्या ६५ किलो फ्रीस्टाइल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.
 • * हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला यांच्या जामिनासाठी ज्या व्यक्तीने हमी दिली होती त्याने ती मागे घेण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर चौताला यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी पुन्हा ताब्यात घेण्यात आले. हरयाणातील शिक्षक भरती घोटाळ्यात चौताला यांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. चौताला यांना जामीन मंजूर करताना त्यांच्यासाठी सूरजितसिंग या व्यक्तीने हमी दिली होती. मात्र वैयक्तिक कारणास्तव आपण यापुढे हमी देऊ शकत नसल्याचा त्यांनी केलेला विनंती अर्ज न्यायाधीश संजय गर्ग यांनी स्वीकारला. त्यानंतर चौताला यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिल
 • पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी रश्मी शुक्ला :
राज्य गुप्तवार्ता विभागाच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांची पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधीचे पोलिस आयुक्त तथा पोलिस महासंचालक के.के. पाठक हे (31 मार्च) निवृत्त झाले. रश्मी शुक्ला या सन 1988 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असून यापूर्वी त्यांनी राज्य गुप्तवार्ता विभागात सहआयुक्त तसेच आयुक्तपद भूषविले आहे.
मुंबई पोलिस दलातही त्यांनी वेगवेगळया पदांवर कर्तव्य बजावले असून एक शिस्तप्रिय महिला अधिकारी म्हणून त्यांची पोलिस दलामध्ये ओळख आहे.पुण्याच्या पोलिस आयुक्त होण्याचा मान मिळवणार्‍या रश्मी शुक्ला या दुसर्‍या महिला पोलिस अधिकारी आहेत.तसेच यापूर्वी पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी पुण्याचे पोलिस आयुक्तपद भूषवले.
आयुक्त रश्मी शुक्ला यांचे भूगर्भशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण झाले आहे.
 • आता रेल्वेचे आरक्षित तिकीट फोनवर रद्द करता येणार :
1 एप्रिलपासून केवळ एका फोनवर आरक्षित तिकीट रद्द करता येणे शक्य होणार आहे.
फोनद्वारे तिकीट रद्द करण्यासाठी प्रवाशांना 139 क्रमांकावर फोन करावा लागेल.तसेच त्यानंतर आरक्षित तिकिटाची संपूर्ण माहिती दिल्यानंतर प्रवाशांना एक पासवर्ड मिळेल.
पासवर्ड मिळाल्यानंतर त्याच दिवशी तिकीट काउंटरवर जाऊन तो पासवर्ड सांगितल्यानंतर तिकिटाचे पैसे परत मिळणार आहेत.रेल्वे तिकिटांचा काळा-बाजार करणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी प्रवासभाड्याच्या नियमांमध्ये बदल केले होते.मात्र गरजू प्रवाशांना अनेक अडचणींना सामना करावा लागत होता, त्यामुळेच आता रेल्वे तिकीट रद्द करण्यासाठी 139 क्रमांकाची सुविधा सुरू करण्यात आली आहे.
 • आरोग्य सुविधांसाठी टाटा ट्रस्टशी सामंजस्य करार :
दर्जेदार आरोग्य सेवा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, कुपोषण निर्मूलन, महिला सक्षमीकरण आणि प्रशासनात विशेष सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र शासन व टाटा ट्रस्ट यांच्यात (दि.31 मार्च) विविध महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांच्या उपस्थितीत विधान भवनात नऊ सामंजस्य करार करण्यात आले.वैद्यकीय क्षेत्रामध्ये राष्ट्रीय कर्करोग ग्रीड तयार करण्यात येणार असून त्यात महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून कर्करोगाचे अत्याधुनिक पद्धतीने निदान व उपचार उपलब्ध होणार आहेत.बोनमॅरो रजिस्ट्री स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल, त्यामुळे रक्ताचा कर्करोग, सिकलसेल, थॅलेसेमिया अशा स्वरूपाच्या दुर्धर आजारांच्या उपचार पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होईल.
महाराष्ट्र राज्य औषध पुरवठा महामंडळ स्थापन करण्याच्या अनुषंगाने लागणारे सर्व तांत्रिक व व्यवस्थापकीय सहाय्य टाटा ट्रस्ट उपलब्ध करून देणार आहे.
 • राष्ट्रीय आयोगाच्या कार्यकाळात वाढ :
सफाई कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय आयोगाच्या कार्यकाळात 31-03-2016 च्या पुढे तीन वर्षांची वाढ करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
तसेच वाढीव तीन वर्षाच्या कालावधीसाठी सुमारे 13.08 कोटी रुपये एकूण खर्च अपेक्षित आहे. सफाई कर्मचारी तसंच मैला वाहून नेण्याशी संबंधित व्यक्तींना या प्रस्तावाचा लाभ होणार आहे.सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी हा आयोग सरकारला शिफारसी करण्याबरोबरच सध्याच्या कल्याणकारी कार्यक्रमांचे मूल्यमापन आणि त्यांचा अभ्यासही करतो.
 • स्वच्छ भारत मोहिमेला जागतिक बॅंकेची मदत :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत मोहीम या कार्यक्रमाला चालना देण्यासाठी जागतिक बॅंक 1.5 अब्ज डॉलरची (सुमारे 10 हजार कोटी रुपये) मदत करणार आहे.जागतिक बॅंक कर्जाच्या रूपाने ही मदत करणार असून, केंद्र सरकारबरोबरच्या करारावर सह्याही झाल्या.2019 पर्यंत उघड्यावरील शौचाची समस्या संपविण्याच्या हेतूने बॅंकेने सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.जागतिक बॅंक काही राज्य सरकारांना तांत्रिक सहकार्य म्हणून 2.5 कोटी डॉलर (सुमारे 160 कोटी रुपये) देणार आहे.जागतिक बॅंकेचे भारतातील संचालक ओन रूहल व अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक विभागाचे सहसचिव राज कुमार यांनी (दि.30) या संदर्भातील करारावर सह्या केल्या.स्वच्छ भारत अंतर्गत पाच वर्षांदरम्यान ग्रामीण विकासावर ही रक्कम खर्च केली जाईल.
 • रेडीरेकनरमध्ये 7 टक्के वाढ :
राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे यंदा रेडीरेकनरच्या दरात फार वाढ न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.शहर आणि ग्रामीण भागात जागा खरेदी करण्यासाठी शासनातर्फे रेडिरेकनर दरात केवळ 7 टक्के वाढ करण्यात आल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले.राज्यातील वेगवेगळ्या भागातून रेडीरेकनरचे दर कमी करण्यासंदर्भात अनेक तक्रारी सरकारडे दाखल झाल्या आहेत. 2010 साली या दरात 14, 2011-18, 2013-27 आणि 2014-22 टक्के असा वाढविला होता.
 • पी. सुशीला मोहन यांचे नाव गिनीज बुकमध्ये:
➡प्रसिद्ध पार्श्वगायिका पी. सुशीला मोहन यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाले आहे.
➡भारतीय भाषांमध्ये सर्वाधिक जास्त गाणी गायिल्याने त्यांच्या नावाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि अशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.
➡पी. सुशीला मोहन यांनी भारतातील 12 भाषेतून 17,695 गाणी गायली असल्याचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केले आहे, तर अशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये 17,330 गाणी गायल्याचे नोंद करण्यात आले आहे.
➡रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलेली गाणी ही 1960 पासूनची आहेत.
➡तसेच गेल्या पाच दशकाच्या करिअरमध्ये पी. सुशीला मोहन यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
 • महाराष्ट्र रत्नांचा गौरव सोहळा
➡कॅन्सरसारख्या दुर्धर आजारातून रुग्णांना मुक्त करणारे टाटा कॅन्सर रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांचा ‘महाराष्ट्राचा मानबिंदू’ पुरस्काराने, जगाला आपल्या आवाजाची भुरळ पाडणाऱ्या प्रख्यात गायिका आशा भोसले यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्काराने, विविध क्षेत्रांत  कर्तृत्वाचा सोनेरी ठसा उमटवणाऱ्या नीता अंबानी यांचा ‘महाराष्ट्र युथ आयकॉन ऑफ द इयर’ पुरस्काराने तर ‘बाजीराव मस्तानी’फेम रणवीर सिंह याचा ‘लोकमत अभिमान’  पुरस्काराने गौरव करण्यात आला.
‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार विजेत्यांची यादी
➡लोकसेवा, समाजसेवा - रज्जाक जब्बारखान पठाण
➡विज्ञान तंत्रज्ञान - प्रा. दिपक फाटक (आयटी तज्ञ)
➡परफॉरमिंग आर्ट - शंकर महादेवन
➡कला - शशिकांत धोत्रे, पेन्सील स्केच
➡क्रीडा - ललिता बाबर
➡रंगभूमी - मुक्ता बर्वे
➡चित्रपट(स्त्री) - अमृता सुभाष
➡चित्रपट(पुरुष) - नाना पाटेकर
➡इन्फ्रास्ट्रक्चर -  सतीश मगर
➡बिझनेस - डॉ आनंद देशपांडे
➡प्रशासन - विभागीय - संदीप पाटील, (जिल्हा पोलिस प्रमुख, गडचिरोली)
➡प्रशासन - राज्यस्तर - अजोय मेहता, मुंबई महापालिका आयुक्त
 • सेबीला सहारा समुहाची मालमत्ता विकण्याची परवानगी
➡सर्वोच्च न्यायालयाने भांडवली बाजार नियामक मंडळ ‘सेबी‘ला सहारा समुहाच्या 86 मालमत्ता विकण्याची परवानगी दिली आहे.
➡मालमत्ता विक्रीतून मिळालेली रक्कम सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना जामीन मिळविण्यासाठीदेखील वापरण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.
➡परंतु सर्कल रेटपेक्षा 90 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दराने निविदा आल्या नाही तर या मालमत्ता विकू नयेत, असेही न्यायालयाने सांगितले आहे.
➡सुब्रतो रॉय 14 मार्च 2014 पासून तुरुंगात असून न्यायालयाने त्यांच्या जामीनासाठी 10,000 कोटी रूपये रक्कम भरण्याचा आदेश दिला आहे.
➡तसेच त्यापैकी 5,000 कोटी रोख तर उर्वरित रक्कम बँक गॅरंटीच्या माध्यमातून देणे आवश्यक आहे.
➡सर्व व्याजासह 36,000 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्याची अवघड अट कंपनीसमोर आहे.
सहारा समुहातील गुंतवणूकदारांना ही रक्कम परत केली जाणार आहे.
➡नियोजित रक्कम गोळा करण्यासाठी कंपनीच्या विदेशातील मालमत्तेची विक्री करण्याची परवानगी सहारा समूहाला मिळाली होती.
 • ग्रँट इलियटची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती
➡विश्वचषक टी-20 स्पर्धेत जबरदस्त कामगिरीनंतरही विजेतेपदाच्या शर्यतीतून बाद झालेल्या न्यूझीलंड संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्रँट इलियटने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
➡इलियटने गतवर्षी वनडे वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये आफ्रिकेच्या डेल स्टेनला षट्कार ठोकत न्यूझीलंडला अंतिम फेरीत पोहोचवण्यात निर्णायक भूमिका बजावली होती.
 • सिगारेट कंपन्यांचा ‘उत्पादन बंदी’चा निर्णय
➡सिगारेट पॅकवर आरोग्यासंबंधी चित्रात्मक इशारा प्रसिद्ध करण्याच्या नवीन नियमाचा विरोध करण्यासाठी आय.टी.सी.,गोडफ्रे फिलिप्स आणि व्हीएसटी यासारख्या बड्या कंपन्यांनी (दि.1) एक अभूतपूर्व निर्णय घेऊन आपल्या कारखान्यातील सिगारेटचे उत्पादन त्वरित थांबविले.
➡सिगारेट पॅकेवर 85 टक्के हिश्श्यावर चित्रात्मक इशारा छापणे बंधनकारक आहे.
➡टोबॅको इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या सदस्य असलेल्या या कंपन्या सिगारेटवरील कराच्या स्वरूपात 98 टक्क्यांपेक्षा जास्त योगदान करीत असतात.
➡टीआयआय ने एका निवेदनात म्हटले आहे की, तंबाखू उत्पादनांच्या पॅकेटवरील इशारा प्रसिद्ध करण्याचा नवीन नियम संशयास्पद असल्याने एप्रिल 2016 पासून सिगारेटचे उत्पादन जारी ठेवणे अशक्य आहे.
 • रिझर्व्ह बॅंकेचे नवीन सूत्रे जाहीर :
देशातील सर्व बॅंकांना कर्जदर निश्‍चित करण्यासाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने नवीन सूत्र आणले आहे.
 'मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडिंग'नुसार आता बॅंकांना किमान कर्जदर निश्‍चित करावा लागेल.
 बॅंकांना तीन वर्षांपर्यंतचे कर्ज आता 'मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडिंग'नुसार निश्‍चित करावे लागणार आहे.
 रिझर्व्ह बॅंकेचे नवीन सूत्र एक एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहे.
 तसेच नवीन सूत्रानुसार ठेवीचे दर हे रिझर्व्ह बॅंकेच्या दराशी संलग्न असतील. रिझर्व्ह बॅंकेने रेपोदरात कपात केल्यास त्याचा थेट आणि तातडीने कर्जदारांना (ग्राहकांना) लाभ मिळणार आहे.
 मात्र तीन वर्षांपेक्षा अधिकच्या निश्‍चित व्याजदर लागू असणाऱ्या कर्जावर हा नियम लागू होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
 • म्यानमारच्या अध्यक्षपदी तिन क्‍याव :
लष्करी राजवटीकडून लोकशाहीवादी राष्ट्राच्या दिशेने प्रवास करत असलेल्या म्यानमारच्या अध्यक्षपदी (दि.30) तिन क्‍याव यांनी शपथ घेतली.
 लोकशाहीवादी नेत्या आंग सान स्यू की यांचे विश्‍वासू सहकारी असले तिन क्‍याव यांनी माजी लष्करप्रमुख थेन सेन यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.
 स्यू की यांना अध्यक्षपद स्वीकारण्यास लष्करी राजवटीदरम्यान करण्यात आलेल्या कायद्यानुसार बंदी घालण्यात आली आहे.
 तसेच त्यामुळे स्यू की यांनी आपले विश्‍वासू सहकारी असलेल्या तिन क्‍याव यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिली होती.
 स्यू की यांच्या पक्षाला बहुमत असल्यामुळे तिन क्‍याव यांची बहुमताने अध्यक्षपदी निवड झाली.
 लष्करी राजवटीच्या काळात बांधण्यात आलेल्या संसदेच्या इमारतीमध्ये (दि.30) शपथविधी समारंभ झाला.
 • टाटा स्टील ब्रिटनचा व्यवसाय विकणार :
'टाटा स्टील' या भारतातील आंतराष्ट्रीय कंपनीने ब्रिटनमधील आपल्या संपूर्ण व्यवसायाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रामुख्याने स्टीलच्या घसरत्या किंमती, वाढता उत्पादन खर्च आणि चीनशी निर्माण झालेल्या स्पर्धेमुळे कंपनीला तेथील व्यवसायात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मुंबईत पार पडलेल्या दीर्घ बैठकीनंतर कंपनीने ब्रिटनमधून पुर्णपणे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनमध्ये टाटा स्टीलमध्ये 15,000 कर्मचारी कार्यरत आहेत. स्टील उद्योगाला मागणी कमी झाली असून भविष्यातदेखील सुधारणेचे कोणतेही संकेत नसल्याने कंपनीने लवकरात लवकर व्यवसायाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनने स्टीलचे उत्पादन वाढविल्यामुळे ब्रिटन तसेच जगातील इतर देशांच्या स्टील उद्योगासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. ब्रिटनच्या 'कोरस' कंपनीचे अधिग्रहण केल्यापासून टाटा स्टीलला नफा मिळणे बंद झाले आहे. कंपनीने 2007 साली कोरसचे तब्बल 8.1 अब्ज डॉलरला अधिग्रहण केले होते.
 • गुरूत्वीय भिंग तंत्राचे बाह्यग्रह शोधण्यात यश :
आपल्या आकाशगंगेच्या जवळ शनीसारखा दिसणारा एक ग्रह सापडला असून त्याचा शोध घेण्याऱ्या वैज्ञानिकात एका भारतीय वंशाच्या महिलेचा समावेश आहे. नवीन शोधलेला बाह्य़ग्रह शनी व गुरूच्या मधल्या वस्तुमानाचा असून तो सूर्याच्या निम्मे वस्तुमान असलेल्या ताऱ्याभोवती फिरत आहे.
 जर एक तारा दुसऱ्या ताऱ्याच्या समोर फिरत असेल तर त्याचा प्रकाश जवळच्या ताऱ्याच्या गुरूत्वीय बलामुळे वाकतो. संशोधकांच्या मते गुरूत्वीय सूक्ष्मभिंगाच्या तंत्राने हा ग्रह शोधला असून तो मातृताऱ्याच्या प्रकाशाआधारे शोधलेला नाही. मातृताऱ्याचे अस्तित्व माहिती नसतानाही यात ग्रह शोधता येतो, असे फिजिक्स ओआरजीच्या वृत्तात म्हटले आहे. अमेरिकेतील नोत्रेडेम विद्यापीठातील वैज्ञानिक अपर्णा भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले. हा ग्रह वायूंचा बनलेला असून तो गुरू त्वीय भिंग पद्धतीने शोधला आहे, ही गुरूत्यीय भिंगे ऑगस्ट 2014 मध्ये शोधली गेली होती; त्यांना ओजीएलइ 2014, बीएलजी 1760 अशी नावे दिली होती. ओजीएलइ हा पोलंडचा खगोल प्रकल्प असून त्यात वॉर्सा विद्यापीठातील संशोधक कृष्णद्रव्य व सौरमालेबाहेरील ग्रहांचा शोध घेत आहेत. संशोधकांच्या मते गुरूत्वीय भिंग प्रणाली 22000 प्रकाशवर्षे दूर असून ती आकाशगंगेसारखी आहे.
 • प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज उभारणार :
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) मॉडेलवर उभारण्याचा विचार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी (दि.30) विधानसभेत सांगितले. गोंदियातील वैद्यकीय महाविद्यालय 2016-17 च्या शैक्षणिक वर्षात सुरू करण्यात येईल. सरकारी दरानेच होणार उपचार गोंदियात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाची परवानगी मिळावी म्हणून आवश्यक ते निकष राज्य शासन तातडीने पूर्ण करेल.
 पीपीपी मॉडेलनुसार उभारण्यात येणाऱ्या महाविद्यालय-इस्पितळांमध्ये सरकारी दरानेच उपचार केले जातील.
 • टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत इंग्लंड :
टी-20 विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. जेसन रॉयची धडाकेबाज पाऊणशतकी खेळी व बेन स्टोक्सच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर इंग्लंडने किवींचा पराभव केला. नाणेफेक जिंकून इंग्लंडने न्यूझीलंडला फलंदाजीला आमंत्रित करीत 20 षटकांत 8 बाद 153 धावांवर रोखण्याची किमया केली. तसेच या आव्हानाला प्रत्युत्तर देताना इंग्लंडने जेसन रॉयने केवळ 44 चेंडूंत 78 धावांची फटकेबाजी करीत संघाच्या विजय निश्चित केला.   रॉय व अ‍ॅलेक्स हेल्स (20) यांनी पहिल्या विकेटसाठी 82 धावांची सलामी दिली. तसेच इंग्लंड ने 17.1 षटकांत 3 बाद 159 धावा करून विजय मिळवला.  
 • आगामी क्रीडा स्पर्धा:-

क्रिकेट:-
* विश्वचषक क्रिकेट स्पर्धा:-
२०१९:- इंग्लंड ( १२व्या)
२०२३:- भारत ( १३व्या)
२०२७:- श्रीलंका ( १४व्या)
* टी- २०विश्वचषक क्रिकेट स्पर्धा
२०१६:- भारत (६वी)
२०२०:- ऑस्ट्रेलिया (७वी)
* युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा:-
२०१६ :- बांगलादेश
२०१८:- न्युझीलंड
२०२०:- दक्षिण आफ्रिका
* आयसीसी १ ली विश्वकप टेस्ट चॅम्पीयनशीप २०१७ मध्ये इंग्लंड
येथे होणार
--------------------------------------------------------------------------------
आॅलिम्पिक;-
* आॅलिम्पिक स्पर्धा:-
२०१६:- रियो दि जानेरो (ब्राझील)
२०२०:- टोकीयो (जपान)
* शीतकालीन आॅलिम्पिक स्पर्धा:-
२०१८:- द. कोरिया
२०२२:- बीजिंग
* युवा आॅलिम्पिक स्पर्धा:-
२०१८: अंर्जेटीना
-------------------------------------------------------------------
राष्ट्कुल:-
* राष्ट्रकुल स्पर्धा:-
२०१८:- गोल्ड कास्ट (ऑस्ट्रेलिया )
२०२२:- डर्बन (द. आफ्रिका)
------------------------------------------------------------------------
फुटबॉल:-
* फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा:-
२०१८:- रशिया (२१ व्या)
२०२२:- कतार (२२व्या)
* युरोकप फुटबॉल स्पर्धा:-
२०१६:- फ्रांस
* अंडर १७ विश्वचषक फुटबॉल स्पर्धा :- २०१६ भारत
* ब्रिक्स अंडर १७ विश्वचषक फुटबॉल स्पर्धा :- नवी दिल्ली
-------------------------------------------------------------------------------
हाॅकी
* विश्वचषक हाॅकी (पुरुष) :-
२०१८:- भारत
२०१८:- लंडन
* विश्वचषक हाॅकी (महिला):-
२०१८:- लंडन
-----------------------------------------------------------------------
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा:-
२०१६:- गोवा
२०१७:- छत्तीसगड
२०१८:- प. बंगाल (कोलकत्ता)
--------------------------------------------------------------------
आशियाई क्रीडा स्पर्धा
२०१८:- जकार्ता (इंडोनीशिया)
२०२२:- हागझू (चीन)
-------------------------------------------------------------------
द. आशियाई क्रीडा स्पर्धा:-
२०१६:- गुवाहाटी (भारत)
२०१९:- काठमांडू (नेपाळ)

 • वेस्ट इंडीज 2016 चा टी-20 वर्ल्डकप विश्वविजेता :
अखेरच्या षटकात विजेतेपद निश्चित करण्यासाठी 19 धावांची आवश्यकता असताना स्ट्राइकवर असलेल्या अष्टपैलू क्रेग ब्रेथवेटने बेन स्टोक्सला पहिल्या चार चेंडूवर सलग चार षटकार ठोकले.
 इंग्लंडला 4 विकेटने नमवून वेस्ट इंडीजने दुसऱ्यांदा टी-20 विश्वविजेतेपदाला गवसणी घातली.
 विशेष म्हणजे, यासह दोन वेळा टी-20 विश्वविजेतेपद पटकाविणारा पहिला संघ म्हणून विंडीजने इतिहास रचला. विंडीज 19 वर्षांखालील मुलांच्या संघाने सुद्धा 2016 चा विश्वचषक जिंकला आहे.
 ईडन गार्डनवर झालेल्या या रोमांचक सामन्याआधी याच मैदानावर विंडीजच्या महिलांनी ऑस्ट्रेलिया पाडाव करून पहिल्यांदा विश्वविजेतेपद पटकाविले.   प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला 9 बाद 155 असा लक्ष विंडीज समोर ठेवला. तसेच वेस्ट इंडिज ने 19.4 षटकांत 6 बाद 161 धावा पूर्ण करून विश्वविजेतेपद जिंकले.  
 • जम्मू आणि काश्‍मीरच्या मुख्यमंत्री पदावर मेहबूबा मुफ्तीं :
जम्मू आणि काश्‍मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाच्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती (दि.4) शपथ घेणार आहेत. भारतीय जनता पक्ष आणि 'पीडीपी'ची राज्यात युती आहे. जम्मू आणि काश्‍मीरच्या इतिहासात मुख्यमंत्रिपदाचा मान मिळविणाऱ्या मुफ्ती या पहिल्या महिला असतील. राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी त्यांना पीडीपी-भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले होते. मेहबूबा यांचे वडील आणि मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर राज्यात राज्यपाल राजवट होती.
 • देहरजी मध्यम प्रकल्पासाठी वनजमीन देण्यास मान्यता :
प्रस्तावित देहरजी मध्यम प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने 10 वषार्नंतर 445.29 हेक्टर (1113 एकर) वनजमीन देण्यास अखेर मान्यता दिली आहे. केंद्र सरकारच्या लिंक प्रोजेक्टचा एक भाग असलेल्या असलेल्या पालघर येथील या जमिनीला पर्यावरणवाद्यांसह स्थानिकांनी केलेला विरोध डावलून सरकारने ही मान्यता दिली आहे. देहरजी धरण बांधण्यासाठी मोठ्याप्रमाणावरील वनेतर जमीन उपलब्ध नसल्याने यासाठी 531.186 हेक्टर वनजमीन मिळावी,असा प्रस्ताव कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, रायगड यांनी महाराष्ट्र शासनास पाठवला होता. शासनाने तो मान्यतेसाठी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाकडे पाठवला होता. तसेच केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने हिरवा कंदील दिल्यानंतर महाराष्ट्र शासनाने ही वनजमीन वळती करण्यास मान्यता दिली आहे.
 • राज्यातील 11 जिल्ह्यांत डिजिटल शाळा :
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यात 13 जिल्ह्यांत ज्ञानरचनावादी शाळा आणि तब्बल 11 जिल्ह्यांमध्ये संपूर्णत: डिजिटल शाळा झालेल्या आहेत. राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम जोमाने राबविण्यात येत आहेत. ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धती म्हणजे मुलांना हसत खेळत आनंददायी शिक्षण देणे होय. तसेच या पद्धतीत मुलांना शिकण्यासाठी प्रवृत्त करण्यात शिक्षकांची भूमिका मार्गदर्शकांची राहणार आहे. परिसर स्वच्छ, शाळा व वर्गाची रंगरंगोटी, वर्ग सजावट आणि सर्वात म्हणजे प्रात्यक्षिकांतून शिक्षण देणे हेच ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धती आहे. शिक्षण आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या 2 वर्षात देशातील शैक्षणिक गुणवत्तेत महाराष्ट्र पहिल्या तीनमध्ये येण्याचा संकल्प केला आहे. मात्र त्यापूर्वीच राज्यातील प्राथमिक शाळा आता डिजिटल शाळा व ज्ञानरचनावादी शाळा होणार आहेत.   अहमदनगर, सोलापूर, नंदूरबार, पालघर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, नांदेड, बुलढाणा, परभणी आणि हिंगोली हे 14 जिल्हे 100 टक्के ज्ञानरचनावादी शाळांचे झाले आहेत. तसेच नगर, नंदूरबार, पालघर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, बुलढाणा, परभणी या जिल्ह्यांमधील शाळा डिजिटल झाल्या आहेत.
 • इस्रोचा चांद्रयान 2 मोहीम स्वदेशी करण्याचा निर्णय :
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान 2 मोहीम स्वदेशी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यात रशियाची मदत घेतली जाणार नाही, अमेरिकेची किरकोळ मदत घेतली जाणार आहे. इस्रोचे अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांनी सांगितले की, चांद्रयान 2 मोहीम पूर्णपणे स्वदेशी राहील. तसेच त्यातील लँडर व रोव्हर भारतातच तयार केले जातील. डिसेंबर 2017 मध्ये किंवा 2018 च्या पूर्वार्धात भारताचे चांद्रयान 2 झेपावेल, त्यात चंद्रावरील खडक व माती गोळा करून त्यांची माहिती पृथ्थकरणानंतर पृथ्वीकडे पाठवणारी उपकरणे असतील. चांद्रयान 2 च्या आधी भारताने चांद्रयान 1 मोहीम यशस्वी केली आहे. तसेच त्यात चंद्रावर पाणी असल्याचे पुरावे मिळाले होते. 2010 मध्ये रशियाच्या ग्लावकॉसमॉस संस्थेला लँडर तयार करण्यात सहभागी करण्याचे ठरवले होते व इस्रो ऑर्बिटर तसेच रोव्हर तयार करणार होती. पण आता सगळे भारतच तयार करणार आहे, इस्रोने आता लँडर व रोव्हर, ऑर्बिटर सगळे स्वत:च तयार करण्याचे ठरवले आहे. तसेच कुठलेही यानाचे निरीक्षण एका ठिकाणाहून करून चालत नाही त्यामुळे नासाच्या डीप स्पेस नेटवर्कची मदत घेतली जाणार आहे.
 • गुरू ग्रहा सारखा नवीन ग्रहाचा शोध :
वैज्ञानिकांनी तीन तारे व त्याभोवती फिरणारा गुरूसारखा वायू असलेला ग्रह शोधून काढला आहे.
 हार्वर्ड स्मिथसॉनियन सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोफिजिक्स या अमेरिकेतील संस्थेच्या वैज्ञानिकांनी हे संशोधन केले आहे. तसेच द्वैती ताऱ्यांचा एक संच यात आढळला असून आधी तो एकच तारा वाटत होता.    द्वैती हे तारे तिसऱ्या एका ताऱ्याभोवती फिरत आहेत, या सर्व तारका प्रणालीत एक ग्रह तीन ताऱ्यांभोवती फिरत आहे. तीन ताऱ्यांभोवती फिरणारे ग्रह दुर्मीळ असतात. तीन ताऱ्यांभोवती फिरणारा ग्रह सापडण्याची ही चौथी वेळ आहे. विशेष म्हणजे हा ग्रह असलेली तारका प्रणाली पृथ्वीपासून तुलनेने जवळ आहे.   नवीन ग्रहाचे नाव केइएलटी 4 एबी असे असून तो वायू असलेला ग्रह आहे. गुरूइतक्या आकाराच्या असलेल्या या ग्रहाला परिवलनास तीन दिवस लागतात, तो केइएलटी-ए ताऱ्याभोवती फिरत आहे.   तीस वर्षांत ते एकमेकांभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतात पण केइएलटी ए ताऱ्याभोवती एक परिक्रमा पूर्ण करण्यास द्वैती ताऱ्यांना चार हजार वर्षे लागतात. केइएलटी 4 एबी हा ग्रह आपल्या सूर्याच्या चाळीस पट मोठय़ा असलेल्या केइएलटी ए ताऱ्याभोवती फिरत आहे. तसेच हे संशोधन द अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.
 • छत्तीसगडमध्ये स्फोटात सात जवान शहीद
छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्य़ांतर्गत येणाऱ्या मलेवाडाच्या जंगलात नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) सात जवान शहीद झाल्याची घटना बुधवारी घडली. स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की जवानांना नेणाऱ्या वाहनाचे चार तुकडे झाले. दंतेवाडापासून १२ किमी अंतरावर मालेवाडाच्या जंगलात सीआरपीएफ व स्थानिक पोलीस संयुक्त नक्षलविरोधी अभियान राबवित होते. नक्षल शोधमोहीम आटोपल्यावर दुपारी तीनच्या सुमारास सीआरपीएफचे जवान टाटा-४०७ या वाहनाने दंतेवाडा-सुकमा मार्गाने सीआरपीएफच्या शिबिरात जात असतानाच या मार्गावर नक्षलवाद्यांनी आधीच पेरून ठेवलेल्या भूसुरुंगाचा जोरदार स्फोट झाला.
 • पंचायतीपासून लोकसभेपर्यंत सगळ्या निवडणुका एकाचवेळी घ्या, मोदींचा प्रस्ताव
〰# ग्राम पंचायत, जिल्हा परिषदा, नगरपालिका, महापालिका, विधानसभा, लोकसभा अशा सतत कोणत्या ना कोणत्या निवडणुकीच्या कामात गुंतून राहिल्यामुळे कार्यकर्त्यांना सामाजिक कामे करण्यासाठी पुरेसा वेळच मिळत नाही. त्यामुळे या सर्वच निवडणुका वेगवेगळ्या वेळी घेण्याऐवजी एकाचवेळी घेण्यात याव्यात, असा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या एका कार्यक्रमात मांडला आहे. सातत्याने कोणत्यातरी निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये पक्षांचा आणि कार्यकर्त्यांचा वेळ अनावश्यक वाया जातो आणि पैसाही मोठ्या प्रमाणात खर्च होतो, याकडेही मोदी यांनी लक्ष वेधल्याचे सूत्रांकडून समजते.
 • बहुमत सिद्धतेच्या आदेशास स्थगिती
उत्तराखंड सरकारने आज, गुरुवारी बहुमत सिद्ध करावे या एक सदस्यीय न्यायपीठाच्या आदेशास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. बहुमत सिद्ध करण्याच्या आदेशावर केंद्राने सादर केलेल्या आव्हान याचिकेवरील सुनावणीनंतर उद्याची विधानसभेतील शक्तिपरीक्षा लांबणीवर टाकून ती ७ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचा निकाल उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे.
 • राज्य सरकार आणि टाटा ट्रस्टमध्ये नऊ सामंजस्य करार
दर्जेदार आरोग्य सेवा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, कुपोषण निर्मुलन, स्त्री सक्षमीकरण यासह अन्य उद्दिष्टांच्या पूर्ततेतून राज्याच्या सामाजिक विकासाच्या निर्देशांकासह प्रशासनात विशेष सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र शासन व टाटा ट्रस्ट यांच्यात गुरुवारी विविध महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे केली.
 • ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रा’त ११ हजारावर डिजिटल शाळा
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यात आजमितीस ११ हजार २२८ डिजिटल शाळा, १४ हजार ४०९ उपक्रमशील शाळा, तर १ हजार ३६८ डिजिटल शाळा तयार झालेल्या आहेत. २०१५-१६ या आर्थिक वर्षांत इतक्या मोठय़ा प्रमाणात आयएसओ व डिजिटल शाळांची निर्मिती झाल्याने तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुले शिकत आहेत. विशेष म्हणजे, आज विद्यार्थ्यांना पहिल्या वर्गापासूनच डिजिटल शिक्षणाचे धडे दिले जात आहेत.
 • ‘निफ्टी ईटीएफ’चे व्यवहार तैवानच्या बाजारात खुले
भारतीय भांडवली बाजाराचा जगभरात वाढत्या दबदब्याचा प्रत्यय म्हणजे निफ्टी निर्देशांकावर आधारित एक्स्चेंज ट्रेडेड फंडाचे (ईटीएफ) व्यवहार आता तैवान शेअर बाजारात सुरू झाले आहेत. उल्लेखनीय म्हणजे या बाजारात व्यवहार होत असलेली ही पहिलीच भारतीय ईटीएफ योजना आहे.
 
 • जलद इंटरनेटची ग्वाही!
रिलायन्स जिओ या नव्या आर्थिक वर्षांत प्रत्यक्षात येणाऱ्या दूरसंचार सेवा कंपनीच्या जोरावर देशातील विद्यमान वेगापेक्षा तब्बल ८० टक्के अधिक वेग देण्याचे आश्वासन रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दिले आहे. रिलायन्सची जिओ ही जगातील सर्वात मोठी ‘डिजिटल स्टार्टअप’ कंपनी ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करतानाच या उपक्रमासाठी समूहाने १.५० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचेही अंबानी यांनी बुधवारी ‘फिक्की फ्रेम्स’च्या मंचावरून जाहीर केले.
 • भारत सरकार ‘ग्राम उदय से भारत उदय’ चे उद्घाटन करणार
भारतीय सरकार 14 एप्रिल 2016 पासून एक मेगा मोहीम -‘ग्राम उदय से भारत उदय’- सुरू करणार आहे.
शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि त्यांना शेतीशी संबंधित योजनांची माहिती प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे.हा 10 दिवसीय कार्यक्रम असून मध्य प्रदेशातील महू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात येईल. हा कार्यक्रम डॉ भीमराव आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त आयोजित करण्यात येईल.
गावांमध्ये सामाजिक सुसंवाद वाढवण्यासाठी, पंचायत राज बळकट करण्यासाठी, ग्रामीण विकासाला व शेतकर्‍यांच्या प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण राष्ट्रामध्ये प्रयत्न निर्माण करण्याचा हेतू या मोहिमेचा आहे.
या पुढाकाराचा एक भाग म्हणून, गावातील ग्रामपंचायत मध्ये शेतकरी मंडळे स्थापन करण्यात येणार आहे, ज्यामधून फसल विमा योजना आणि सामाजिक आरोग्य कार्ड याची माहिती शेतक-यांना प्रदान केली जाईल.
कृषी क्षेत्रामध्ये सुधारणा आणण्यासाठी शेतकऱ्यांकडून सल्ले मागितले जाईल.
MGNREGA अंतर्गत दोन लाख वीस कोटी मनुष्य दिवस ची रेकॉर्ड करण्याजोगी संख्या गेल्या आर्थिक वर्षात निर्माण केले गेले आहे.रोजगार योजनेतून महिलांचा सहभाग 57 टक्के होते
 • जगातील पहिले 'व्हाईट टायगर सफारी' पार्क 
➡मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी (दि.3) 'व्हाईट टायगर सफारी' पार्कचे उदघाटन केले.
➡सत्ना जिल्ह्यातील मुकूंदपूरमध्ये हे व्हाईट टायगर सफारी पार्क उभारण्यात आले आहे.
➡फक्त पांढर्‍या वाघांसाठी सुरु करण्यात आलेले जगातील हे असे पहिले पार्क आहे.
➡येथील विंध्य भागामध्ये 100 वर्षापूर्वी पहिला वाघ आढळला होता.
➡तसेच या पार्कच्या उभारणीसाठी 50 कोटी रुपये खर्च आला असून, 25 हेक्टर परिसरामध्ये हे पार्क पसरले आहे.
➡व्हाईट टायगर सफारी पार्कमध्ये तीन पांढरे वाघ आहेत, हे पार्क आता अधिकृतरित्या पर्यटकांसाठी खुले झाले आहे.
 • आयकर विभागाने केले 1.17 लाख कोटी रिफंड
➡आयकर विभागाने 31 मार्च रोजी संपलेल्या मागील आर्थिक वर्षात 1.17 लाख कोटी रुपयांचा कर परत (रिफंड) केला असून यापैकी स्वयंगतिक पद्धतीने 37,870 कोटी रुपये परत करण्यात आले आहेत.
➡31 मार्च रोजी संपलेल्या 2015-16 या आर्थिक वर्षात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) करदात्यांना सेवा प्रदान करण्याकामी उल्लेखनीय यश मिळविले असून करदाता सेवेच्या दृष्टीने हे वर्ष विक्रमीच ठरले आहे. 
➡बेंगळुरूस्थित केंद्रीय प्रक्रिया केंद्राने (सीपीसी) 4.14 कोटी आयकर रिटर्नची प्रक्रिया पूर्ण केली असून मागच्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 35 टक्के अधिक आहे.
➡केंद्रीय प्रक्रिया केंद्रामार्फत स्वयंगती (ऑटोमॅटिक) पद्धतीने 37,870 कोटी रुपयांचा रिफंड जारी केला आहे.
➡विशेष म्हणजे 30 दिवसांच्या आता या पद्धतीने रिफंड करण्याचे प्रमाण 67 टक्के आहे.
 • विराट कोहली आयसीसी टी-20 संघाच्या कर्णधारपदी
➡टी-20 विश्वचषक स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू ठरलेला भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची आयसीसी टी-20 संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
➡नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर आयसीसीने आपला जागतिक संघ निवडला आणि कोहलीकडे या स्टार संघाचे नेतृत्व सोपविले.
➡अनुभवी वेगवान गोलंदाज आशिष नेहराचाही या संघात समावेश करण्यात आला आहे.
➡विशेष म्हणजे भारतीय टी-20 संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीसह इतर कोणताही भारतीय संघात स्थान मिळवू शकला नाही.
➡माजी क्रिकेटपटू आणि समालोचक यांचा समावेश असलेल्या एका समितीने यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळाडूंनी केलेल्या कामगिरीनुसार आयसीसीचा संघ निवडला.
➡आयसीसी टी-20 संघ -
जेसन रॉय (इंग्लंड), क्विंटन डीकॉक (दक्षिण आफ्रिका, यष्टिरक्षक), विराट कोहली (भारत, कर्णधार), जो रुट (इंग्लंड), जोस बटलर (इंग्लंड), शेन वॉटसन (ऑस्ट्रेलिया), आंद्रे रसेल (वेस्ट इंडीज), मिशेल सँटनर (न्यूझीलंड), डेव्हिड विले (इंग्लंड), सॅम्युअल बद्री (न्यूझीलंड), आशिष नेहरा (भारत) आणि मुस्तफिजुर रहमान (बांगलादेश, 12 वा खेळाडू)
 • कॉफी निर्यातीत 13.39 टक्के वाढ
➡मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2015-16 या आर्थिक वर्षात भारतातातून कॉफीची निर्यात 13.39 टक्क्यांनी वाढली असून या वर्षात 3,19,733 टन कॉफी भारतातून निर्यात झाली.
➡इन्स्टंट कॉफी आणि अन्य प्रकारच्या कॉफीची निर्यात वाढल्याने एकूण निर्यात वाढ झाली.
➡कॉफी बोर्डाच्या ताज्या अहवालानुसार 2014-15 या आर्थिक वर्षात भारतातून 2,81,987 टन कॉफी निर्यात झाली होती.
➡जागतिक पातळीवर भाव कमी असला तरी प्रति युनिट मिळणारे मूल्य कमी होते.
'आधार'धारकांची संख्या 100 कोटींवर
➡'आधार क्रमांका'शी जोडलेल्यांची संख्या 100 कोटींवर पोहोचली आहे.
➡केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी (दि.4) दिल्लीत ही घोषणा केली.
➡अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात आधार विधेयक सरकारने वित्तीय विधेयक म्हणून लोकसभेत मंजूर करून घेतले होते.
 • दररोज 60 लाख जण 'आधार'शी जोडले जात आहे.
➡'आधार'मध्ये बोटांचे ठसे आणि नेत्रपटल या 'कोअर बायोमेट्रिक'चा तपशील कोणालाही जाहीर करता येणार नाही.
➡तसेच त्यात राष्ट्रीय सुरक्षेचा अपवाद असला तरी मंत्रिमंडळ सचिव, विधी सचिव आणि माहिती तंत्रज्ञान सचिवांच्या समितीलाच त्याबाबतचा आढावा घेण्याचा अधिकार असल्याची कायदेशीर तरतूद आहे.
 •  आता बीएसएनएलपण देणार 4 जी सेवा 
➡बीएसएनएलनेही आता 4 जी सेवा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती (दि.4) देण्यात आली.
➡प्रतिस्पर्धी दूरसंचार कंपन्यांनी यापूर्वीच 4 जी सेवा देण्यास सुरवात केली असल्याने आता बीएसएनएलची खरी कसोटी लागणार असल्याचे मानले जात आहे.
➡सध्या चंडीगडमध्ये कंपनीने 4 जी सेवेला प्रारंभ केला असून आणखी 14 मंडळांत कंपनी लवकरच या सेवेचा शुभारंभ करणार आहे.
➡बीएसएनएलकडे 2,500 मेगाहर्टझ बॅण्डमध्ये 20 मेगाहर्टझ स्पेक्‍ट्रम आहेत, त्यामुळे कोणत्याही परवान्याशिवाय कंपनीला 4 जी सेवा देता येणार आहे.
➡बीएसएनएलने सुमारे 8313.80 कोटी रुपये भरून 2,500 मेगाव्हॅटचे स्पेक्‍ट्रम घेतले होते.
 • देशात सेमी-हायस्पीड रेल्वेचे नवे पर्व :
देशात (दि.5) सेमी-हायस्पीड रेल्वेचे नवे पर्व सुरू झाले आहे.दिल्ली ते आग्रा 200 कि.मी.चा प्रवास अवघ्या शंभर मिनिटांत पूर्ण करणाऱ्या पहिल्या ‘गतिमान’ रेल्वेला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हिरवा झेंडा दाखविला.
 तसेच रेल्वेतील होस्टेसनी (रेल्वे सुंदरी) गुलाब पुष्पांनी त्यांचे स्वागत केले.
 दिल्लीच्या निजामुद्दीन स्थानकावरून कर्णमधुर संगीताच्या साक्षीने या रेल्वेची चाके धावू लागली.
 अधिकाधिक 160 कि.मी.चा वेगही प्रवाशांना अनुभवता आला, प्रवाशांना विमान प्रवासाप्रमाणे आदरातिथ्य अनुभवता आले.
 • देशातील पहिला हरित मेट्रो प्रकल्प :
देशातील पहिला हरित मेट्रो प्रकल्प म्हणून नागपूर मेट्रो प्रकल्पाचा विकास करण्यासाठी जर्मनीच्या केएफडब्ल्यू बॅंक आणि केंद्र सरकारदरम्यान करार करण्यात आला. तसेच या करारानुसार नागपूर मेट्रोच्या कामांसाठी केएफडब्ल्यू बॅंकेने 20 वर्षे मुदतीसाठी 3,750 कोटी रुपये (500 दशलक्ष युरो) कर्ज स्वरूपात दिले आहे. या प्रकल्पांतर्गत सौर ऊर्जेच्या माध्यमातून दोन तृतीयांश ऊर्जा निर्मिती करण्यात येणार आहे. पहिल्या 5 वर्षांत एकूण रकमेवरील व्याज तर उर्वरीत 15 वर्षांत मुद्दलीसह व्याज स्वरूपात कर्ज परतावा करण्यात येणार आहे. तसेच या रकमेतून नागपूर मेट्रोचे डबे, मेट्रो मार्ग, वीजपुरवठा, ट्रॅक्शन, बांधकाम आदी कामे करण्यात येणार आहेत.
 • ऑलिम्पिक तयारीसाठी भारतीय संघ खेळणार :
जपानमध्ये (दि.6) सुरू होत असलेल्या सुलतान अझलान शाह ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारतीय संघ आगामी रिओ ऑलिम्पिकची पूर्वतयारी म्हणून उतरेल. आठ वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदकावर विजय मिळविलेल्या भारतीय संघाच्या कामगिरीवर या वेळी विशेष लक्ष असेल. तसेच या स्पर्धेद्वारे भारताला जागतिक विजेत्या ऑस्ट्रेलियासारख्या इतर बलाढ्य संघांविरुद्ध स्वत:ला अजमावण्याची संधी मिळेल. चार महिन्यांनी ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होणार असल्याने भारतीय संघ अझलन शाह स्पर्धेत चमकदार कामगिरीसह स्वत:ला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असेल. गतवर्षी डिसेंबर महिन्यात रायपूरला झालेल्या हॉकी विश्व लीग स्पर्धेत भारताला कांस्य पटकावण्यात यश आले होते. भारताने कोर ग्रुपमध्ये बहुतांश युवा खेळाडूंचा समावेश केला आहे.
 • पाक टी-20 संघाचे नवे कर्णधार सर्फराज अहमद :
आशिया आणि त्यांतर झालेल्या टी 20 विश्‍वकरंडक स्पर्धेतील अपयशाने पाकिस्तानच्या ट्वेंटी-20 संघाचे कर्णधारपद सोडलेल्या शाहिद आफ्रिदीच्या जागी यष्टीरक्षक सर्फराज अहमदची निवड करण्यात आली आहे.
 पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) (दि.5) याबाबतची घोषणा केली. आता पाकिस्तानच्या नव्या प्रशिक्षकाची निवड होणार आहे.   शाहिद आफ्रिदीने निवृत्तीस नकार देत कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. तसेच या दोन्ही स्पर्धांतील अपयशी कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने या स्पर्धेनंतर आफ्रिदी टी-20 सामन्यासाठी कर्णधार राहणार नसल्याचे स्पष्ट केले होते. अखेर आफ्रिदीने कर्णधारपद सोडल्याचे जाहीर केले होते. तसेच त्यानंतर पीसीबीने युवा यष्टीरक्षक सर्फराज अहमदच्या हातात कर्णधारपदाची जबाबादारी सोपविली आहे.
 • केंद्र सरकारकडून घनकचरा व्यवस्थापन नियमावली जारी :
घरोघरी निर्माण होणाऱ्या लाखो टन घनकचऱ्याच्या विल्हेवाटीची संस्थात्मक नियमावली केंद्राने तब्बल 16 वर्षांनंतर सुधारित व पुनरुज्जीवित केली आहे. पहिल्या टप्प्यात सध्यापेक्षा तिप्पट म्हणजे 46 कोटी लोकसंख्येला घनकचरा नियमांच्या रडारवर आणण्यात येणार आहे. सध्याच्या 4041 व अतिरिक्त 3894 नगरपालिकांसह विविध महापालिकांच्या क्षेत्रातील 981 ग्रामपंचायती, औद्योगिक वसाहती, धार्मिक ठिकाणे, छोटी-मोठी बंदरे, सात हजार रेल्वे स्थानके, मंगल कार्यालये अशा सर्व ठिकाणी नवी घनकचरा व्यवस्थापन प्रणाली लागू केली जाईल. (दि.5) जारी झालेली घनकचरा व्यवस्थापन नियमावली प्रत्यक्षात येण्यासाठी आणखी तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागेल.  देशात काही ग्रामपंचायती व महानगरांतील सोसायट्या, कॉलन्या स्वतःच कंपोस्ट खत तयार करतात; त्याच्या खरेदीची यंत्रणाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
 तसेच यानुसार ओला-सुका कचरा वेगळा करणे व कचरा एकत्र होतो तेथेच त्याचे वर्गीकरण करणे, संबंधितांवर नियमानेच बंधनकारक राहणार असून, कचरा जाळणे हाही दंडनीय गुन्हा ठरेल.
 • डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण :
दोन आठवड्यांपासून सुरू असलेली मजबुती संपुष्टात येताना (दि.5) रुपया 25 पैशांनी घसरला.
 तसेच 1 डॉलरची किंमत 66.46 रुपये झाली. बँका आणि आयातदारांकडून डॉलरची मागणी वाढल्यामुळे रुपयाची घसरण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. आंतरबँक विदेशी चलन (फॉरेक्स) बाजारात (दि.4) रुपया 66.21 वर बंद झाला होता. सत्राच्या अखेरीस तो 66.46 वर बंद झाला. 25 पैसे अथवा 0.38 टक्क्यांची घसरण त्याने नोंदविली. गेल्या दोन आठवड्यात रुपयाने 50 पैशांची वाढनोंदविली होती.