Post views: counter

Current Affairs April 2016 Part - 4


  • अभियान:-
उमेद:-
• मानवाचा सर्वागीण विकास करण्याच्या दृष्टीने ग्रामविकास व महिला आणी बालविकास विभागाची अत्यंत महत्वाची भूमिका आहे. गरीबी दूर करून त्यांना आत्मसन्मानाचे व प्रतिष्टेचे जीवन जगता यावे, गरीबांना सकस अन्न, अंगभर वस्रे पक्का निवारा,आरोग्याच्या उत्तम सुविधा आणी दर्जेदार शिक्षण मिळावे आणी त्यांची जीवनोंन्ती व्हावी या उद्देशाने शासनाने उमेद अभियान सुरु केले
• या अभियानात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूबातील\ महिला व युवक- युवती तसेच शेतमजूर , मजूर भूमिहीन, कामगार आणी आदिवासी आदी कुटूबातील किमानएक महीलेचा बचतगटात समावेश करण्यात येणार आहे.

 खेलो इंडिया’:-
• भारतातील क्रीडा विकास आणि प्रसार यासाठी केंद्र सरकारने आपल्या योजनेचे ‘खेलो इंडिया’ असे नव्याने नाव ठेवले यापूर्वी ही योजना ‘राजीव गांधी खेल अभियान’ या नावाने प्रचलित होती.
• यापूर्वीच्या काँग्रेस सरकारने देशातील क्रीडा विकासासाठी ‘राजीव गांधी खेल अभियान’ योजनेखाली सर्वांना एकत्र आणले होते.
• काँग्रेस सरकारने २०१४ मध्ये ही योजना पंचायत युवा क्रीडा आणि खेल अभियान या योजनेच्या जागेवर सुरू केली होती.
• या योजनेअंतर्गत ‘अर्बन स्पोर्टस इन्फ्रास्ट्रक्चरर’ आणि राष्ट्रीय क्रीडा गुणवत्ता शोध हे दोन प्रकल्प ‘खेलो इंडिया’ मध्ये वर्ग करण्यात आले आहेत.

चर्चित खेळाडू:-
* रोहिणी राऊत:-
• नागपूरची आंतरराष्ट्रीय महिला धावपटू रोहिणी राऊत उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळून आली
• राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संघटनेने (नाडा) फेब्रुवारी महिन्यात दिल्ली मॅरेथॉनदरम्यान घेतलेल्या चाचणीत रोहिणीने बंदी असलेले व कामगिरी उंचावणारे उत्तेजक घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यात रोहिणीच्या मुत्राच्या नमुन्यात नॅनड्रोलोन हे उत्तेजक असल्याचा अहवाल ‘नाडा’ने दिला

• वाडा’च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार याचे प्रमाण २.५ एनजी प्रति मिलिलिटर ठरविण्यात आले आहे. रोहिणीच्या ‘अ’ नमुन्यात हे प्रमाण १२ एनजी प्रति मिलिलिटर असल्याचे सिद्ध झाले. हे उत्तेजक दम लागू नये, स्नायू बळकट करणे यासाठी वापरले जाते. रोहिणीने ४२.१९७ कि.मी. अंतर दोन तास ५० मिनिटांत पूर्ण करून अव्वल स्थान पटकावले होते. विजेत्या रोहिणीला दोन लाख ५० हजारांचे रोख बक्षीसही मिळाले होते. त्याच स्पर्धेत रोहिणीची मध्य रेल्वेत कार्यरत असलेली जुळी बहिणी मोनिकानेही दुसरे स्थान पटकावून दोन लाखांचा रोख पुरस्कार जिंकला होता.
दीपा कर्माकर:-
• जागतिक स्पर्धेत चार दशांश गुणाने ब्रॉंझ आणि पर्यायाने रिओ ऑलिंपिक तिकीट दुरावलेल्या दीपा कर्माकरने त्याची पुरेपूर भरपाई ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत केली.
• ऑलिंपिकला पात्र ठरलेली पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट
• ऑलिंपिकच्या जिम्नॅस्टिक स्पर्धेत दीपाच्या निमित्ताने 52 वर्षांनंतर भारतीय
• 1952 च्या ऑलिंपिकमध्ये दोन, 56 च्या तीन; तर 64 च्या स्पर्धेत सहा भारतीयांचा सहभाग
• रिओ येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत दीपाने तिच्या आवडत्या व्हॉल्ट प्रकारात सर्वांत खडतर मानला जात असलेला प्रोदुनोवा प्रकारात 15.066 गुण मिळवले.
• दोन वर्षांपूर्वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ब्रॉंझपदक जिंकत दीपाने इतिहास घडवला होता. त्याचबरोबर जागतिक स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेली पहिली भारतीय स्पर्धक ठरण्याचाही मान मिळवला होता.

निवड:-
भूपेंद्र कैंथोला:-
• भारतीय माहिती सेवेचे (आयआयएस) अधिकारी भूपेंद्र कैंथोला यांची पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली
• कैंथोला हे 1989च्या तुकडीचे आयआयएस अधिकारी आहेत. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) एका आदेशाद्वारे त्यांची नियुक्ती केली असून, ती तीन वर्षांसाठी असेल.
• सध्या प्रेस इन्फर्मेशन ब्युरोचे संचालक प्रशांत पाठराबे यांच्याकडे एफटीआयआयच्या प्रभारी संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार होता

निवृत्ती:-
रंगना हेराथ:-
• श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज रंगना हेराथ याने एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्त घेतली आहे.
•हेराथ याने ७१ एकदिवसीय सामने खेळताना ७४ गडी बाद केले आहेत. त्याच वेळी तो केवळ १७ टी-२० सामने खेळला असून, यात त्याने १८ गडी बाद केले आहेत.

नवी ग्लोबल हॉकी लीग:-
• आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने आपल्या स्पर्धात्मक कार्यक्रमात आमूलाग्र बदल करत ग्लोबल हॉकी लीगची (जीएचएल) घोषणा केली.
• ही स्पर्धा २०१९पासून सुरू होईल. या लीगमध्ये सात संघ सहभागी होणार असून, ‘होम-अवे’ पद्धतीने हे सामने होणार आहेत.
• ग्लोबल हॉकी लीग मुळे या पुढे चॅंपियन्स करंडक हॉकी स्पर्धेचा होणार नाही अखेरची स्पर्धा २०१८मध्ये नेदरलॅंड्समध्ये अमस्टरडॅम येथे खेळविली जाणार आहे
•आंतरराष्ट्रीय स्तरावरील हॉकी स्पर्धांचे स्वरुप अधिक आकर्षक करण्याच्या प्रयत्नांत २०१८पासून चॅंपियन्स करंडक स्पर्धा होणार नाही

असे असेल जीएचएलचे स्वरूप
• सात देशांचे संघ या स्पर्धेत खेळणार
• मायदेशात आणि परदेशात असे लीगमधील सामने होतील
• २०२१ पासून स्पर्धेत नऊ संघ असतील
• २०२३ पासून संघाची पदोन्नती आणि पदावनती ठरणार
  • सुब्रमण्यम स्वामी, नरेंद्र जाधव राज्यसभेवर:
• भाजपचे नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी व नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वातील पूर्वीच्या राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे (एनएसी) सदस्य असलेले अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांची नरेंद्र मोदी सरकारने राज्यसभेवर नियुक्ती केली.
• राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी निरनिराळ्या क्षेत्रातील सहा व्यक्तींची राज्यसभेवर नियुक्ती केली• साहित्य, विज्ञान, क्रीडा, कला व समाजसेवा यासारख्या क्षेत्रांतील उल्लेखनीय व्यक्तींची सरकारच्या सल्ल्यावरून राष्ट्रपती राज्यसभेवर नियुक्तीसाठी शिफारस करत असतात
* मल्याळम चित्रपट अभिनेते सुरेश गोपी, पत्रकार स्वपन दासगुप्ता वमुष्टियुद्धपटू मेरी कोम यांनाही राज्यसभेचे नियुक्त सदस्य घेण्यात आले आहे.
* हार्वर्ड विद्यापीठात शिकलेले डॉ. स्वामी (६६) यांनी पूर्वी केंद्रात वाणिज्य व कायदामंत्री म्हणून काम पाहिलेले आहे. ते योजना आयोगाचे सदस्यही होते. टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील याचिकाकर्त्यांपैकी ते एक होते.
• क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर राजकारणात प्रवेशलेला नवज्योतसिंग सिद्धू (५२) हे तीनवेळा अमृतसरमधून भाजपचा खासदार म्हणून निवडून आले. त्यांनाा पंजाबच्या निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार करण्याच्या आम आदमी पक्षाच्या इराद्याला खीळ घालण्यासाठी राज्यसभेवर घेण्यात आले आहे.
• ६२ वर्षांचे डॉ. नरेंद्र जाधव हे अर्थतज्ज्ञ असून २०१० ते २०१४ या यूपीए सरकारच्या कार्यकाळात ते राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे सदस्य होते. त्यांनी नियोजन आयोगाचे सदस्य, तसेच पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही काम पाहिले आहे.
  • १ मेपासून ‘वन एम्प्लॉई, वन ईपीएफ अकाऊंट’
: एकापेक्षा जास्त खाती आणि मुदतपूर्व पैसे काढण्यापासून कर्मचाऱ्यांचे मन वळविण्यासाठी प्रॉव्हिडंट फंड विभागातर्फे लवकरच येत्या १ मेपासून ‘वन एम्प्लॉई, वन ईपीएफ अकाऊंट’ ही योजना सुरू करण्यात येणार आहे. प्रॉव्हिंडट फंड विभागाच्या २१ एप्रिल रोजी झालेल्या अंतर्गत बैठकीत ‘वन एम्प्लॉई, वन ईपीएफ अकाऊंट’ या योजनेचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकार व राज्य सरकारांच्या अखत्यारीतील स्थानिक स्वराज्य संस्थांसारख्या विविध शासकीय सेवांमधील कर्मचाऱ्यांना प्रॉव्हिंडट फंड सेवेमध्ये समाविष्ट करण्याच्या दृष्टीने विभागातर्फे अधिक सक्रियपणे काम होणार आहे. प्रॉव्हिडंट फंड विभागाचे केंद्रीय आयुक्त व्ही.पी. जॉय यांनी सांगितले की, बहुतांश वेळा लोक नोकरी बदलताना प्रॉव्हिडंट फंडातील पैसे काढून घेतात. नोकरी बदलली अथवा अन्य काही कारणासाठी मुदतपूर्व पैसे काढण्यापासून त्यांना परावृत्त करण्याच्या दृष्टीने विभागातर्फे विशेष व्यवस्था निर्माण केली जात आहे.
  • दीपाने घडविला इतिहास
: दीपा करमाकरने सोमवारी ऐतिहासिक कामगिरी करताना आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवणारी पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट होण्याचा मान मिळवला. दीपाने येथे अखेरच्या पात्रता व चाचणी स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत रिओ आॅलिम्पिकचे तिकीट मिळवले. २२ वर्षीय दीपाने एकूण ५२.६९८ गुणांची कमाई करीत आॅगस्टमध्ये होणाऱ्या आॅलिम्पिकमध्ये कलात्मक (आर्टिस्टिक) जिम्नॅस्टिकसाठी स्थान निश्चित केले. आॅलिम्पिकसाठी ५२ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जिम्नॅस्टिकमध्ये पात्रता गाठणारी दीपा पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ११ भारतीय पुरुष जिम्नॅस्टिकपटूंनी आॅलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला. त्यापैकी १९५२ मध्ये दोन, १९५६ मध्ये तीन आणि १९६४ मध्ये सहा खेळाडू सहभागी झाले होते.
  • ईपीएफवरील व्याजदरात कपात
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमधील (ईपीएफ) व्याजदरात कपात करण्यात आली आहे. 2015-16 या आर्थिक वर्षात पीएफ खाते धारकांना 8.7 टक्के एवढा व्याजदर मिळणार आहे. यापूर्वी पीएफवरील व्याजदर 8.75 टक्के होता. केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी ही माहिती दिली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे देशभरात जवळपास 5 कोटी सभासद आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर 2013-14 आणि 2014-15 मध्ये 8.75 टक्के व्याजदर देण्यात आला होता. तर 2011-12 आणि 2012-13 मध्ये हा व्याजदर 8.25 टक्के होता.
  • राज्यातील 32 हजार शाळांचे डिजिटलायझेशन :
  * जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाने लोकसहभागातून फळा आणि खडूविना सुरू केलेल्या डिजिटल स्कूल शाळेची संकल्पना ‘डिजिटल कार्यप्रेरणा व कार्यशाळेच्या माध्यमातून’ राज्यभर पसरली आहे. 
  * राज्यातील 32 हजार 342 शाळांचे डिजिटलायझेशन झाले, त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील 309 शाळांचा समावेश आहे.
  * शहापूर तालुक्यातील पष्टेपाडा या शाळेतील शिक्षक संदीप गुंड यांनी लोकसहभागातून पहिली डिजिटल शाळा सुरू करून त्याद्वारे मुलांना शिक्षण देण्याचा आगळावेगळा प्रयोग यशस्वी केला. 
  * तसेच त्यामुळे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यापासून 30 किलोमीटर दूर असलेल्या पष्टेपाडा या आदिवासी दुर्गम भागातील मुले टॅबद्वारे शिक्षण घेत आहेत. 
  * तसेच या उपक्रमाची दखल घेत राज्य सरकारने संपूर्ण राज्यातील शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. 
  * त्यानुसार, शिक्षण सचिव नंदकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल कार्यप्रेरणा व कार्यशाळेच्या माध्यमातून राज्यातील 33 जिल्ह्यांत गुंड यांनी 67 कार्यशाळांमधून तेथील शिक्षकांना डिजिटल शाळेची संकल्पना काय आहे, ती कशी राबवली जाते, त्याचे महत्त्व काय? हे पटवून दिले. 
  * त्यासाठी कसे वातावरण असावे, कोणकोणती साधने वापरावीत तसेच आपल्याकडे असलेल्या साधनसामग्रीचा प्रभावीपणे कसा वापर करता येतो, याचे मार्गदर्शन केले.
  • आंतरराष्ट्रीय सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर :
  * मराठी व बॉलीवूड इंडस्ट्री गाजविणारी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे हिला न्यूयॉर्कमधील ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये आंतरराष्ट्रीय श्रेणीतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. 
  * 'मॅडली' या शॉर्टफिल्ममधील भूमिकेसाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे. 
  * सहा दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या शॉर्ट फिल्मच्या 'मॅडली' या 20मिनिटांच्या भागात राधिका झळकली आहे. राधिकाने मराठीमध्ये लय भारी, तुकाराम, पोस्टकार्ड तर बॉलीवूडमध्ये शोर इन दि सिटी, मांझी:द माउंटन मॅन, बदलापूर, तरअहल्यासारख्या शॉर्टफिल्मने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. 
  * आंतरराष्ट्रीय स्तरावरील फिल्म फेस्टिव्हलमध्येही तिची दखल घेतली गेली. 
  * 'ट्रिबेका' फिल्म फेस्टिव्हलमध्ये एखाद्या भारतीय अभिनेत्रीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. 
  * तसेच या फिल्म फेस्टिव्हलसाठी जगभरातून हजारो फिल्म्स पाठवल्या जातात.
  • पतंजलीला 'सीआयएसएफ' चे सुरक्षा कवच :
  * योगगुरू रामदेवबाबा यांच्या मालकीच्या हरिद्वारमधील पतंजली फूड पार्कच्या सुरक्षेची जबाबदारी आता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे(सीआयएसएफ) सोपविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.  
  * रामदेव यांच्या पतंजली फूड पार्कच्या भोवती 'सीआयएसएफ'च्या सुमारे34 सशस्त्र कमांडोंचा 24 तास खडा पहारा असणार आहे.
  * देशातील इन्फोसिससारख्या अगदी बोटावर मोजता येतील येवढ्याच खासगी क्षेत्रातील उद्योगांना केंद्राकडून 'सीआयएसएफ'ची सुरक्षा पुरविण्यात येते, त्यात आता रामदेव यांच्या पतंजली फूड पार्कचा समावेश झाला आहे. 
  * सहायक कमांडंट दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली 'सीआयएसएफ'च्या 34 कमांडोंचे पथक पतंजली फूड पार्कच्या सुरक्षेसाठी 24 तास तैनात करण्यात आले आहे. 
  * केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर 22 मार्चपासून पंतजलीच्या फूड पार्कला 'सीआयएसएफ'कडून सुरक्षा पुरवली जात आहे. 
  * पतंजली फूड पार्क आणि हर्बल पार्क लिमिटेडकडून 'सीआयएसएफ'च्या सैनिकांसाठी राहण्याची सुविधा पुरविण्यात आली असून, या सुरक्षेचा खर्चही दिला जाणार आहे.
  • ‬: सलमान खान रिओ ऑलिम्पिकचा ब्रॅन्ड अॅम्बॅसिडर :
  * भारतीय ऑलिंपिक संघटनेने (आयओए) रिओ ऑलिंपिकसाठी सदिच्छा दूतम्हणून अभिनेता सलमान खान याची निवड केली. 
  * तसेच त्याचे नाव समारंभपूर्वक जाहीर करण्यात आले. अमिताभ बच्चनआणि शाहरुख खान यांच्याऐवजी सलमानला पसंती देण्यात आली.
  * या दोन अभिनेत्यांच्या तुलनेत तरुणांशी जास्त जवळचे नाते आणि क्रीडाप्रेमी अशी प्रतिमा यामुळे सलमानच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
  * सलमान 50 वर्षांचा असून, देशभरात बॉडीबिल्डिंग करणाऱ्यांसाठीही तोप्रेरणास्थान आहे. 
  * सुलतान या आगामी चित्रपटात त्याने कुस्तीपटूची भूमिका केली आहे. 
  * लहान गावातून आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळविणाऱ्या स्पर्धकाची कथा यात आहे.
  * आयओए मुख्यालयात (दि.22) झालेल्या कार्यक्रमात महिला बॉक्‍सरएम. सी. मेरी कोम, हॉकी कर्णधार सरदार सिंग, रितू राणी, नेमबाज अपूर्वी चंडेला, तिरंदाज दीपिका कुमारी, टेबल टेनिसपटू मनिका बात्रा असे नामवंत क्रीडापटू उपस्थित होते.
  • महानगरपालिकेची जीओ टॅगिंगची यंत्रणा यशस्वी :
महानगरपालिकेच्या कामांमध्ये पारदर्शकता यावी, कामांची पुनरावृत्ती टाळावी आणि सुरू असलेल्या कामांची स्थिती काय आहे, ते कोणत्या टप्प्यावर आहे, याची अद्ययावत माहिती मिळावी, यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी देशात सर्वप्रथम जीओ टॅगिंग यंत्रणा राबवण्याचा मान मिळवला होता.
 तसेच ही यंत्रणा यशस्वी झाल्याचा दावा आता पालिकेने केला आहे.
 विशेष म्हणजे इतर शासकीय यंत्रणाही जीओ टॅग यंत्रणा वापरण्याविषयी सकारात्मक विचार करीत असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. याबाबत, अलीकडेच केंद्र सरकारच्या मनुष्यबळ मंत्रालयानेही हे तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच त्यामुळे आयुक्तांनी जीओ टॅगिंगचा घेतलेला निर्णय आता अनेक शासकीय यंत्रणा राबवण्याचा विचार करीत असल्याचे दिसत आहे. महापालिकेच्या वतीने दरवर्षी करोडो रुपयांची विकासकामे करण्यात येतात. तसेच या कामांचे योग्य मूल्यमापन व्हावे, कामांमध्ये पारदर्शकता राहावी, कामांची काय प्रगती आहे, त्याचत्याच कामांची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रत्येक कामाचे जीओ टॅगिंग झाल्याशिवाय त्याचे देयक अदा करू नये, असे आदेश काढले होते.
  • अभ्यास मंडळ व तज्ज्ञ समित्या बरखास्त :
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, राज्य मंडळ आणि बालभारती या संस्थांमध्ये अस्तित्त्वात असलेली अभ्यास मंडळ, लेखन गट, कार्यगट आणि तज्ज्ञ समित्या बरखास्त करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने (दि.25) घेतला. इयत्ता पहिली ते 12 वी पर्यंतचे अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, पाठ्यसाहित्य, शिक्षक प्रशिक्षण, मूल्यमापन व लोक सहभागासाठी निर्णय घेण्याकरता विषयनिहाय तज्ज्ञ समित्या आणि अभ्यास मंडळे असतील. तसेच ती शिक्षण हक्क कायद्यांतर्गत नेमण्यात आलेल्या शैक्षणिक प्राधिकरणाच्या अखत्यारित काम करतील, या मंडळांतील सदस्यांची निवड ऑनलाइन/ जाहिरात पद्धतीने अर्ज मागवून करण्यात येणार आहे. शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी, राज्यातील अभ्यासक्रमांची काठीण्यपातळी वाढविणे व गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने संरचनात्मक बदल करण्यात येणार आहेत.
 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. ते पूर्ण कार्यक्षम होऊन काम सुरू करेपर्यंत सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने समन्वय राहावा यासाठी राज्याच्या शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली.
 पाठ्यपुस्तक छपाईचे कार्य पूर्वीप्रमाणे बालभारतीच करेल, रॉयल्टीबाबत प्रचलित धोरण कायम राहील, असे शिक्षण विभागाच्या आदेशात म्हटले आहे.
  • भारताचा नेमबाज मैराज खानला सिल्वर मेडल :
भारताचा नेमबाज मैराज अहमद खानने रिओ दि जानिरो (ब्राझील) शहरात सुरू असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकात रौप्यपदक प्राप्त केले. या स्पर्धेतील ‘स्कीट’ सामन्यातील हे भारताचे पहिले पदक आहे.
 40 वर्षीय मैराजने पुरुषांच्या स्कीट सुवर्णपदक सामन्यात स्वीडनच्या मार्कस स्वेनसनचा शूटआउट टायब्रेकरवर 2-1 ने पराभव केला. मैराजने अंतिम फेरीच्या क्वालिफाय राउंडमध्ये 125 पैकी 122 शॉट्स लगावून फायनलसाठी पात्रता मिळवली. तो 6 नेमबाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिला. अंतिम फेरीत मैराज आणि मार्कस या दोघांनी 16 पैकी 15, अशी कामगिरी करून सुवर्णपदकासाठी दावेदारी पक्की केली होती. ज्यात मार्कसने बाजी मारली. इटलीचा टमारो कसान्द्रो तिसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी सतीश माथूर :
आयपीएसच्या 1981 च्या तुकडीतील अधिकारी सतीश माथूर यांची (दि.25) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच या विभागाचे अतिरिक्त महासंचालक संजय बर्वे यांच्याकडे राज्य गुप्तचर विभागाचे आयुक्तपद सोपविण्यात आले, संजय बर्वे 1987च्या तुकडीचे अधिकारी आहेत. ‘एसीबी’चे प्रमुख होण्यापूर्वी माथूर महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण आणि कल्याण मंडळाचे महासंचालक होते. नॅशनल सिक्युरिटी गार्डमध्ये प्रशिक्षण घेतलेले सतीश माथूर हे महाराष्ट्रातील पहिले अधिकारी असून, पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्यानंतर ते सर्वात ज्येष्ठ अधिकारी आहे. महासंचालक म्हणून त्यांनी विधी व तांत्रिक तसेच पोलीस गृहनिर्माण व कल्याण या विभागाचे महासंचालक म्हणूनही काम केले आहे. त्यांनी केंद्रात प्रतिनियुक्तीवर असताना एअर इंडियामध्ये तसेच सीबीआयमध्येही काम केले. सीबीआयमध्ये असताना मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोट तपासात त्यांचा सहभागा होता. ते काही काळ पुण्याचे आयुक्त होते व मुंबईत वाहतूक पोलीस सहआयुक्त हे पदही त्यांनी भूषवले आहे.
  • भविष्य निर्वाह निधी वर 2015-16 या वर्षासाठी 8.7 टक्के व्याज :
भविष्य निर्वाह निधी (पीएफ)वर 2015-16 या वर्षासाठी 8.7 टक्के व्याज मिळणार आहे.
 भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या विश्‍वस्तांनी 8.8 टक्‍के व्याजदराची शिफारस केली होती; मात्र काटकसरीवर भर देणाऱ्या केंद्र सरकारने 8.7 टक्के व्याजाला मंजुरी दिली. तसेच गेल्या पाच वर्षांत तिसऱ्यांदा सरकारने पीएफ व्याजदराला कात्री लावल्याने जवळपास पाच कोटी पीएफधारकांची निराशा झाली आहे. भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) विश्‍वस्त मंडळाची फेब्रुवारीमध्ये व्याजदरासंबंधी बैठक झाली, या वेळी 2015-16 या वर्षासाठी 8.8 टक्के व्याजदर देण्याची शिफारस मंडळाने केली. मात्र, अर्थ खात्याने 8.7 टक्के व्याजदर निश्‍चित केल्याची माहिती केंद्रीय कामगारमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी (दि.25) लोकसभेत दिली.
 पहिल्यांदाच पीएफ विश्‍वस्त मंडळाची शिफारस सरकारकडून अमान्य करण्यात आली.
  • उमर खलिद याला जेएनयूतून निलंबित करण्यात आले :
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) कॅम्पसमध्ये अफझल गुरूच्या फाशीविरोधात कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी विद्यापीठाने उमर खलिद याच्यासह इतर दोन विद्यार्थ्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला.
 तसेच विद्यापीठाने कन्हैय्या कुमारला 10 हजारांचा दंड ठोठावला. उमरला एका सत्रासाठी, मुजीब गट्टो याला दोन सत्रांसाठी आणि अनिर्बन भट्टाचार्यला 15 जुलैपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. अनिर्बनला पुढील पाच वर्षे विद्यापीठातून कोणताही अभ्यासक्रम शिकता येणार नाही. जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार याच्यासह उमर आणि अनिर्बन यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली होती. कॅम्पसमध्ये 9 फेब्रुवारीला झालेल्या कार्यक्रमाला आक्षेप घेणारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सदस्य सौरभ शर्मा याला वाहतुकीत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी उच्चस्तरीय समितीने दोषी ठरविले आहे.
  1. क्रीडानगरी, विद्येचे माहेरघर, आयटी सिटी, स्मार्ट सिटी अशी बिरुदावली मिरविणारे पुणे लवकरच एसटीचेही माहेरघर
    होणार..
  2. महाराष्ट्रातील सोलापूरचे सुपूत्र व सध्या चंदीगडचे जिल्हाधिकारी असलेल्या अजित जोशी यांना ‘जनधन’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट जिल्हाधिका-याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  3.  प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, आॅलिम्पिक पदकविजेती खेळाडू मेरी कोम, माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू, ज्येष्ठ पत्रकार स्वपन दासगुप्ता, मल्याळम चित्रपट अभिनेते सुरेश गोपी आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांची राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नियुक्ती केली.राज्यसभेतील राष्ट्रपती नियुक्त १० पैकी सात सदस्यांच्या जागा रिक्त झाल्याने त्यापैकी सहा जागांवर ही नियुक्ती करण्यात आली.
  4.  ‘टाईम’च्या यादीत जगातील १०० प्रभावी व्यक्तींमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन, टेनिस स्टार सानिया मिर्झा, अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई, फ्लिपकार्टचे बिन्नी बंसल, सचिन बंसल यांचा समावेश करण्यात आला आहे.-- न्यूयॉर्क..गतवर्षी या यादीत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यावर्षी या यादीत समावेश
    नाही.
  5.  परकीय गुंतवणूक खेचून आणण्याच्या स्पर्धेत भारताने चीनला मागे टाकले..०१५ मध्ये भारतात विविध क्षेत्रातील ६३ अब्ज डॉलर्सच्या एफडीआय गुंतवणूकीच्या प्रकल्पांची घोषणा झाली आहे. एफडीआय प्रकल्पांची संख्या आठ टक्क्यांनी वाढून ६९७ झाली आहे. एफडीआय गुंतवणूकीमध्ये महाराष्ट्राचे ८.३ अब्ज डॉलर्स..
  6.  कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण आटोक्यात ठेवून पृथ्वीवरील वाढत्या तापमानाला आळा घालण्याच्या बांधिलकीतहत भारताने जगभरातील १७० हून अधिक देशांसोबत पॅरिस हवामान करारावर स्वाक्षरी केली ..:- संयुक्त राष्ट्रे 
  7. युनो आमसभेच्या सभागृहात संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांनी आयोजित केलेल्या एका भव्य सोहळ्यात भारताच्या वतीने पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या करारावर स्वाक्षरी केली.
  8. हवामान बदल करारावर १७१ देशांनी स्वाक्षरीनिशी एकाच दिवशी आंतरराष्ट्रीय करारावर सहमतीची मोहोर उमटवीत नवा विक्रमच केला आहे. या आधी १९८२ मध्ये ११९ देशांनी सागरी नियम करार केला होता..

  • राज्यातील 32 हजार शाळांचे डिजिटलायझेशन :
जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाने लोकसहभागातून फळा आणि खडूविना सुरू केलेल्या डिजिटल स्कूल शाळेची संकल्पना ‘डिजिटल कार्यप्रेरणा व कार्यशाळेच्या माध्यमातून’ राज्यभर पसरली आहे.राज्यातील 32 हजार 342 शाळांचे डिजिटलायझेशन झाले, त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील 309 शाळांचा समावेश आहे.शहापूर तालुक्यातील पष्टेपाडा या शाळेतील शिक्षक संदीप गुंड यांनी लोकसहभागातून पहिली डिजिटल शाळा सुरू करून त्याद्वारे मुलांना शिक्षण देण्याचा आगळावेगळा प्रयोग यशस्वी केला.तसेच त्यामुळे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यापासून 30 किलोमीटर दूर असलेल्या पष्टेपाडा या आदिवासी दुर्गम भागातील मुले टॅबद्वारे शिक्षण घेत आहेत.तसेच या उपक्रमाची दखल घेत राज्य सरकारने संपूर्ण राज्यातील शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार, शिक्षण सचिव नंदकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल कार्यप्रेरणा व कार्यशाळेच्या माध्यमातून राज्यातील 33 जिल्ह्यांत गुंड यांनी 67 कार्यशाळांमधून तेथील शिक्षकांना डिजिटल शाळेची संकल्पना काय आहे, ती कशी राबवली जाते, त्याचे महत्त्व काय? हे पटवून दिले.त्यासाठी कसे वातावरण असावे, कोणकोणती साधने वापरावीत तसेच आपल्याकडे असलेल्या साधनसामग्रीचा प्रभावीपणे कसा वापर करता येतो, याचे मार्गदर्शन केले.
  • पतंजलीला 'सीआयएसएफ' चे सुरक्षा कवच :
योगगुरू रामदेवबाबा यांच्या मालकीच्या हरिद्वारमधील पतंजली फूड पार्कच्या सुरक्षेची जबाबदारी आता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (सीआयएसएफ) सोपविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 
रामदेव यांच्या पतंजली फूड पार्कच्या भोवती 'सीआयएसएफ'च्या सुमारे 34 सशस्त्र कमांडोंचा 24 तास खडा पहारा असणार आहे.देशातील इन्फोसिससारख्या अगदी बोटावर मोजता येतील येवढ्याच खासगी क्षेत्रातील उद्योगांना केंद्राकडून 'सीआयएसएफ'ची सुरक्षा पुरविण्यात येते, त्यात आता रामदेव यांच्या पतंजली फूड पार्कचा समावेश झाला आहे.सहायक कमांडंट दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली 'सीआयएसएफ'च्या 34 कमांडोंचे पथक पतंजली फूड पार्कच्या सुरक्षेसाठी 24 तास तैनात करण्यात आले आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर 22 मार्चपासून पंतजलीच्या फूड पार्कला 'सीआयएसएफ' कडून सुरक्षा पुरवली जात आहे.पतंजली फूड पार्क आणि हर्बल पार्क लिमिटेडकडून 'सीआयएसएफ'च्या सैनिकांसाठी राहण्याची सुविधा पुरविण्यात आली असून, या सुरक्षेचा खर्चही दिला जाणार आहे.
  • जागतिक बॅंके कडून जलसंकटावर उपाययोजना :
दुष्काळाच्या झळा कायम झेलणाऱ्या मराठवाडा व पश्‍चिम विदर्भातील तब्बल 6000 गावांचा जलसंधारणाच्या माध्यमातून सर्वसमावेशक उपायांनी अक्षरशः कायापालट करण्याबाबत एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यासाठी राज्य सरकारने जागतिक बॅंकेबरोबरचा एक करार अंतिम टप्प्यात आणला आहे.
राज्याला तातडीच्या योजनेअंतर्गत जागतिक बॅंक 5000 कोटींचा कर्जपुरवठा करण्यास तयार आहे व या योजनेतून या संपूर्ण परिसरावरचे जलसंकट दूर होऊ शकते, असे माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.राज्यातील यंदाचा भीषण दुष्काळ व त्याअनुषंगाने केलेल्या उपाययोजनांबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी उजनी व जायकवाडीसह 5 मोठ्या धरणांतील प्रचंड गाळ काढणे, बेकायदा वीज कनेक्‍शनवर धडक कारवाई करणे, उसाची शेती ठिबक सिंचनावर आणण्याबाबत उत्पादकांची मानसिकता तयार करणे, पाणीचोरी रोखणे, अशा अनेक उपाययोजनाचा उल्लेख केला.राज्यात गेल्या काही वर्षांत ठेकेदारी केंद्रित व कोटीच्या कोटी उड्डाणे घेणारे मोठमोठे सिंचन प्रकल्प राबविले गेले; पण जलसंधारणाच्या अत्यंत दूरगामी पण 'छोट्या' कामांना टाळेच लावले गेले, असेही निरीक्षण त्यांनी नोंदविले.जागतिक बॅंकेच्या माध्यमातून मराठवाड्यातील निम्म्या म्हणजे 4000 गावांसाठी व पश्‍चिम विदर्भातील 2000 गावांसाठी जलसंधारणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविला जाणार असल्याचे सांगताना फडणवीस यांनी हा करार अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले.
तसेच यासाठी बॅंकेने तात्त्विक मान्यता मागेच दिली व तापमानबदल निधीतून व तुलनेने अतिशय जलद म्हणजे केवळ दीड वर्षात कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचेही ते म्हणाले.
  • 1 मेपासून ‘वन एम्प्लॉई, वन ईपीएफ अकाऊंट’ ही योजना :
एकापेक्षा जास्त खाती आणि मुदतपूर्व पैसे काढण्यापासून कर्मचाऱ्यांचे मन वळविण्यासाठी प्रॉव्हिडंट फंड विभागातर्फे लवकरच येत्या 1 मेपासून ‘वन एम्प्लॉई, वन ईपीएफ अकाऊंट’ ही योजना सुरू करण्यात येणार आहे.प्रॉव्हिंडट फंड विभागाच्या 21 एप्रिल रोजी झालेल्या अंतर्गत बैठकीत ‘वन एम्प्लॉई, वन ईपीएफ अकाऊंट’ या योजनेचा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच या योजनेंतर्गत राज्य सरकार व राज्य सरकारांच्या अखत्यारीतील स्थानिक स्वराज्य संस्थांसारख्या विविध शासकीय सेवांमधील कर्मचाऱ्यांना प्रॉव्हिंडट फंड सेवेमध्ये समाविष्ट करण्याच्या दृष्टीने विभागातर्फे अधिक सक्रियपणे काम होणार आहे.प्रॉव्हिडंट फंड विभागाचे केंद्रीय आयुक्त व्ही.पी. जॉय यांनी सांगितले की, बहुतांश वेळा लोक नोकरी बदलताना प्रॉव्हिडंट फंडातील पैसे काढून घेतात.नोकरी बदलली अथवा अन्य काही कारणासाठी मुदतपूर्व पैसे काढण्यापासून त्यांना परावृत्त करण्याच्या दृष्टीने विभागातर्फे विशेष व्यवस्था निर्माण केली जात आहे.
  • आंतरराष्ट्रीय सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर :
मराठी व बॉलीवूड इंडस्ट्री गाजविणारी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे हिला न्यूयॉर्कमधील ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये आंतरराष्ट्रीय श्रेणीतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
'मॅडली' या शॉर्टफिल्ममधील भूमिकेसाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे.सहा दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या शॉर्ट फिल्मच्या 'मॅडली' या 20 मिनिटांच्या भागात राधिका झळकली आहे.राधिकाने मराठीमध्ये लय भारी, तुकाराम, पोस्टकार्ड तर बॉलीवूडमध्ये शोर इन दि सिटी, मांझी:द माउंटन मॅन, बदलापूर, तरअहल्यासारख्या शॉर्टफिल्मने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.आंतरराष्ट्रीय स्तरावरील फिल्म फेस्टिव्हलमध्येही तिची दखल घेतली गेली.'ट्रिबेका' फिल्म फेस्टिव्हलमध्ये एखाद्या भारतीय अभिनेत्रीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
तसेच या फिल्म फेस्टिव्हलसाठी जगभरातून हजारो फिल्म्स पाठवल्या जातात.
  • अमेरिकन संशोधन प्रकल्पाला भंवरलाल जैन यांचे नाव :
जैन इरिगेशनचे संस्थापक भंवरलाल जैन यांच्या जीवनकार्याचा सन्मान म्हणून अमेरिकेतील नेब्रास्का विद्यापीठ व रॉबर्ट बी. डोहर्टी वॉटर फॉर फूड इन्स्टिट्युटने तेथील संशोधन प्रकल्पाला ‘भंवरलाल हिरालाल जैन- वॉटर फॉर फूड कोलॅबरेटिव्ह प्रोग्राम नेब्रास्का युनिव्हर्सिटी’ असे कायमस्वरूपी नाव दिले आहे.
 प्रकल्पाअंतर्गत सहभागी होणाऱ्या संशोधकांना ‘बी. एच. जैन स्कॉलर्स’ तर संशोधन पूर्ण करणाऱ्यांना ‘बी. एच. जैन फेलो’ म्हणून गौरवण्यात येणार असल्याची घोषणा विद्यापीठाने केली आहे.
 लिंकन, नेब्रास्का येथे सुरू असलेल्या ‘वॉटर फॉर फूड ग्लोबल कॉन्फरन्स’मध्ये नेब्रास्का विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. हॅन्क एम. बॉन्डस् यांनी ही घोषणा केली.जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांना त्यांनी सन्मानपत्राच्या वाचनानंतर स्मृतिचिन्ह प्रदान केले. कृषि व जल व्यवस्थापनातील अमूल्य योगदानासह लोकोपकारी, गांधीवादी, तत्त्वज्ञ, लेखक, उद्योजक, समाजसेवक व शेतकरी म्हणून भवरलालजींनी ठसा उमटविला, या शब्दांत नेब्रास्का विद्यापीठाने मानपत्रात गौरव केला आहे.
 परिषदेला जगभरातील कृषी व जलव्यवस्थापनातील तज्ज्ञ सहभागी झाले होते.
  • नासाने शोधला नवा ग्रह :
सौरकक्षेच्या बाहेर 'कुईपर बेल्ट'मध्ये 'हबल स्पेस टेलिस्कोप'ने नवीन खुजा ग्रह शोधला आहे.
 प्लुटोनंतर हा दुसरा शुभ्र, बर्फाळ ग्रह मानला जात आहे. मेकमेक ग्रहाभोवती फिरणारा चंद्र हा 13 हजार मैल अंतरावर असून, त्याचा व्यास शंभर मैल आणि 870 मैल रुंद असल्याचे सांगितले जाते, या चंद्राला एमके-2 असे टोपणनाव दिले आहे, त्याची दृश्‍यमानता मेकमेकपेक्षा 1300 पटींनी कमी आहे. इंटरनॅशनल ऍस्ट्रोनॉमिकल यूनियनने मान्यता दिलेल्या पाच खुज्या उपग्रहामालिकेपैकी मेकमेक हा एक उपग्रह आहे.
 एप्रिल 2015 पासून 'हबल'च्या दुर्बिणने या उपग्रहावर लक्ष ठेवले होते, मायनर प्लॅनेट इलेक्‍ट्रॉनिक सर्क्‍युलरने हा शोध जाहीर केला. 'हबल'च्या पथकाने यापूर्वी उपग्रह शोधण्यासाठी 2005, 2011 आणि 2012 मध्ये हेच तंत्र वापरले होते. 'मेकमेक' भोवतालची संशोधन मोहीम पूर्ण केल्यानंतर या पथकाने या चंद्रावर लक्ष केंद्रित केले. या चंद्राच्या शोधामुळे खुज्या ग्रहाच्या कक्षेतील महत्त्वपूर्ण माहिती शास्त्रज्ञांना मिळणार आहे.
  • वार्षिक महसूल वसुलीमध्ये रायगड जिल्हा सर्वप्रथम :
अलिबाग-रायगड जिल्ह्याने आपला वसुली इष्टांक पार करून 217 कोटी 50 लाख 12 हजार रुपयांचा एकूण महसूल संकलित केला आहे. तब्बल 102.25 टक्के यश साध्य करून वार्षिक महसूल वसुलीमध्ये संपूर्ण कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. कोकण विभागात सिंधुदुर्ग द्वितीय, पालघर तृतीय, रत्नागिरी चतुर्थ, मुंबई शहर पाचव्या, ठाणे सहाव्या तर मुंबई उपनगर जिल्हा सातव्या स्थानावर आहे. जमीन महसूल, गौण खनिज, करमणूक कर आणि शासकीय कर्ज वसुली यांचा 2015-16 या आर्थिक वर्षाकरिता रायगड जिल्ह्याकरिता शासनाने 212 कोटी 72 लाख 47 हजार रुपयांचा इष्टांक दिला होता. जिल्ह्यातील गौण खनिज महसुलातील सर्वात मोठी बाब असणारे रेती उत्खनन जिल्ह्यात बंद असल्याने त्यांतून प्राप्त होणारा कोट्यवधी रुपयांचा महसूल या आर्थिक वर्षात प्राप्त झाला नसला तरी जिल्ह्यातील 15 तहसीलदार कार्यालये आणि 8 उप विभागीय महसूल अधिकारी कार्यालये यांनी वर्षभरात विक्रमी महसूल वसुली करून राज्य शासनाने दिलेला इष्टांक पार करून 217 कोटी 50 लाख 12 हजार रुपयांचा महसूल संकलित करून, तब्बल 102.25 टक्के यश साध्य केले असल्याची माहिती रायगडचे निवासी उप जिल्हाधिकारी सतीश बागल यांनी दिली.
  • विद्यालयांमध्ये ऑफलाईन संचमान्यता करण्यास परवानगी :
कनिष्ठ महाविद्यालयांची 2015-16 या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता प्रचलित निकषानुसार ऑफलाइन पद्धतीने करण्याचा शासनाने आदेश काढला आहे. तसेच त्यामुळे आता संचमान्यतेबाबतचा संभ्रम संपुष्टात आला असून, शिक्षक नियुक्तीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. (दि.26) अवर सचिव स्वप्निल कापडणीस यांनी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन संचमान्यता होण्यास अधिक वेळ लागत आहे ही शक्यता गृहीत धरून राज्यातील सर्व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये संचमान्यतेच्या प्रचलित निकषानुसार ऑफलाईन संचमान्यता करण्यास परवानगी देण्यात आली आहे, असे परिपत्रक प्रसिद्धीस दिले आहे. तसेच त्यानुसार माध्यमिक शिक्षण संचालक एन. के. जरग यांनीही परिपत्रकाद्वारे ऑफलाईन संचमान्यता होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
  • भारतीय तिरंदाजकडून विश्वविक्रमाची बरोबरी :
भारतीय तिरंदाज दीपिका कुमारी हिने विश्वचषकाच्या पहिल्या टप्प्यात (दि.27) मिश्र दुहेरीत कांस्यपदक जिंकण्यासोबतच महिला रिकर्व्ह प्रकारात विश्वविक्रमाशी बरोबरी साधली. जागतिक तिरंदाजी क्रमवारीत माजी अव्वल खेळाडू राहिलेल्या दीपिकाने राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्णांची कमाई केली होती.
 तसेच तिने आज 72 नेम साधताना 686 गुण संपादन करीत लंडन ऑलिम्पिकची सुवर्ण विजेती कोरियाची किबो बाई हिच्या विक्रमाशी बरोबरी केली. किबो बाईने लंडन ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात दोन सुवर्ण जिंकले होते. 2015 साली तिने ग्वांगझृ येथे आपलीच सहकारी पार्क सूंग हून हिचा 11 वर्षे जुना 682 गुणांचा जुना विश्वविक्रम मोडीत काढला होता. दीपिकाने पहिल्या टप्प्यात 346 गुणांची कमाई करीत आश्चर्याचा धक्का दिला. कोरियाच्या खेळाडूचा विक्रम मोडीत काढण्यासाठी आणखी नऊ गुणांची गरज होती; पण दीपिकाला ही कामगिरी मात्र करता आली नाही. अव्वल मानांकित दीपिकाला आता थेट 32 खेळाडूंमध्ये तिसरी फेरी खेळण्याची संधी मिळणार आहे. भारतीय महिला संघाला स्पर्धेत चौथे मानांकन मिळाले आहे. मिश्र प्रकारात दीपिकाने अतनू दाससोबत तुर्कीच्या जोडीला 5-3 ने पराभूत केले.
  • भरारी इस्त्रोची, आता भारताची हक्काची जीपीएस यंत्रणा
28 एप्रिल : भारतीय संशोधन संस्था अर्थात इस्त्रोच्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. आता भारताची स्वतंत्र्य जीपीएस यंत्रणा असणार आहे. श्रीहरी कोटा येथून IRNSS 1G उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलंय.आज IRNSS 1G उपग्रहाचं श्रीहरी कोटामधल्या सतीश धवन उपग्रह केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. पीएसएलव्ही सी 33 या उपग्रह वाहक यानातून प्रक्षेपण झालं. दिशादर्शक मालिकेतला हा सातवा आणि शेवटचा उपग्रह आहे. अशी क्षमता असलेला भारत हा जगातला 5 वा देश ठरलाय. अवकाश संशोधनात यामुळे भारताची मान उंचावली असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केलंय. या उपग्रहाचा दळणवळण क्षेत्र, मच्छिमार आणि लष्कराला फायदा होणार आहे. या यंत्रणेला नाविक असं नाव देणार असल्याचं पंतप्रधान म्हणालेत. उपग्रहाचा सार्क देशांनाही फायदा होणार असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं.

काय आहे IRNSS 1G हा उपग्रह ?
- भारताच्या दिशादर्शक मालिकेतला शेवटचा सातवा उपग्रह
- या उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे भारताची स्वत:ची जीपीएस यंत्रणा
- अशी क्षमता असलेल्या पाच देशांमध्ये भारताचा समावेश
- एखाद्या ठिकाणाची स्थिती सांगणं, दिशा दाखवणं आणि एखाद्या भूभागाचा नकाशा तयार करणं ही मुख्य कामं
- दळणवळण, जलवाहतूक आणि लष्कराला फायदा होणार
- भारत ही सेवा शेजारच्या देशांनाही देवू शकतो
- उपग्रहासाठी 600 कोटींचा खर्च
- पृथ्वीपासून 36 हजार किमीवर उपग्रह
- गेली 17 वर्ष शास्त्रज्ज्ञ यावर काम करत होते.
  •  मध्य रेल्वेप्रमाणेच पश्चिम रेल्वेकडूनही ‘मिस्ड कॉल अलर्ट सुविधा’ सुरू करण्यात आली आहे..उपलब्ध केलेल्या मोबाइल क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास प्रवाशांना लोकलची स्थितीची माहिती एसएमएसद्वारे मिळणार आहे.यासाठी प्रवाशांना १८00२१२४५0२ या टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल.
  • राज्य निवडणूक आयोगाने तयार केलेल्या ‘निवडणूक वार्ता’च्या पहिल्या अंकाचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते प्रकाशन झाले..राज्य निवडणूक आयोगातर्फे ‘निवडणूक वार्ता’च्या स्वरुपात ‘न्यूज लेटर’ प्रकाशित करण्याचा हा प्रयोग देशभरात पहिल्यांदाच आपल्या राज्यात होत असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सांगितले.
  • भारताचा नेमबाज मैराज अहमद खानने रिओ दि जानिरो (ब्राझील) शहरात सुरू असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकात रौप्यपदक प्राप्त केले.या स्पर्धेतील ‘स्कीट’ सामन्यातील हे भारताचे पहिले पदक आहे.४० वर्षीय मैराजने पुरुषांच्या स्कीट सुवर्णपदक सामन्यात स्वीडनच्या मार्कस स्वेनसनचा शूटआउट टायब्रेकरवर २-१ने पराभव केला.
  • ध्वनी प्रदूषणात मुंबई पहिल्या क्रमांकावर..2011-14 या प्रदीर्घ कालावधीदरम्यान मुंबईतील ध्वनी प्रदूषणाने मर्यादा ओलांडल्याचे केंद्रीय पर्यावरण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) अहवालात म्हटले आहे. मुंबईनंतर लखनौ आणि हैदराबादचा क्रमांक असून दिल्ली चौथ्या स्थानावर आहे.
  •  भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोच्या अवकाश तंत्रज्ञानातून हृदयासाठी कृत्रिम पंपाची निर्मिती.. लेफ्ट व्हेनट्रिकल असिस्ट डिव्हाइस असे या छोटय़ा विद्युत उपकरणाचे नाव असून त्याच्या मदतीने मिनिटाला ३-५ लिटर रक्त पंप केले जाते असे इस्रोचे अध्यक्ष किरणकुमार यांनी सांगितले. हा पंप स्वदेशी बनावटीच्या बॅटरीवर चालणारा आहे हा पंप १०० ग्रॅम वजनाचा असून तो शरीरात बसवता येतो पण त्यासाठी बॅटरी लागते. ती शरीराबाहेर असते. टिटॅनियम पासून बनवलेले असल्याने हे उपकरण शरीरात स्वीकारले जाते असे विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक के. सिवन यांनी सांगितले. तिरूअनंतपुरम येथे हा हृदयाचा पंप सुरू करण्यात आला असून त्यात अग्निबाणात वापरलेले टिटॅनियमचे संमिश्र वापरले आहे. या पंपाची चाचणी सहा प्राण्यांवर सहा तास झालेली आहे व त्यात काही समस्या निर्माण झालेल्या नाहीत. सेंट्रीफ्युगल पंपाच्या मदतीने हे यंत्र रक्त पंप करते, त्याचे प्रत्यारोपण डुकरात केले असता हे यंत्र सलग सहा तास काम करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.हा भारतीय पंप इस्रोने सव्वा लाखात तयार केला आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा