Post views: counter

Current Affairs May 2016 Part - 3

  • आयसीसीच्या क्रिकेट समितीवर राहुल द्रविडची निवड :

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड आणि श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धने यांची क्रिकेट समितीवर निवड केली.
तसेच या समितीच्या कार्याध्यक्षपदी अनिल कुंबळेची फेरनिवड करण्यात आली.
आयसीसीने (दि.13) प्रसिद्धिपत्रकाद्वारे हे निर्णय जाहीर केले. या समितीत ऍण्ड्रयू स्ट्रॉस, केविन ओब्रायन आणि डॅरेन लीमन यांचाही समावेश आहे.
द्रविडने श्रीलंकेच्या कुमार संगकारा, तर जयवर्धने याने मार्क टेलर यांची जागा घेतली.
तीन वर्षांचा कालावधी संपल्यामुळे भारताच्या एल. शिवरामकृष्णन हेदेखील समितीतून बाहेर पडले असून, त्यांच्या जागी टीम मे यांची निवड करण्यात आली.
खेळाडूंच्या बरोबरीने रिचर्ड केटलबोरोघ आणि स्टिव्ह डेव्हिस या पंचांचीदेखील पंच प्रतिनिधी म्हणून या समितीत निवड करण्यात आली आहे.
  • देशातील पहिले बौद्धिक संपदा धोरण मंजूर : 

केंद्रीय मंत्रिमंडळाने सृजनात्मकता, नवोन्मेष आणि उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय बौद्धिक संपदा अधिकार (आयपीआर) धोरणाला मंजुरी दिली.
राष्ट्रीय बौद्धिक संपदा अधिकाराचे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक लाभ समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवत जागरूकता निर्माण करण्याचा त्यामागे उद्देश असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी (दि.12) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीबाबत माहिती देताना सांगितले.
तसेच त्यांनी या धोरणाची सात उद्दिष्ट्येही स्पष्ट केली.
2017 पर्यंत ट्रेडमार्क नोंदणीची मुदत केवळ एक महिन्यासाठी राहील.
बौद्धिक संपदेच्या प्रत्येक स्वरूपाची माहिती देतानाच त्यासंबंधी नियम आणि संस्थांमधील समन्वयाचा ताळमेळ राखण्यावर भर दिला जाईल.
तसेच या धोरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासह प्रोत्साहनासाठी कठोर आणि प्रभावी कायद्याच्या अंमलबजावणीची गरज राहील.
धोरणांचे उल्लंघन केले जात असेल तर त्याला तोंड देण्यासाठी अंमलबजावणी व न्यायप्रणालीला बळकटी देण्याचा उद्देशही समाविष्ट असेल.
  • गोव्यातील कारागृह होणार पर्यटन स्थळ :

गोव्याच्या अग्वादा येथील ऐतिहासिक मध्यवर्ती कारागृह आता केवळ कैद्यांचे घर राहणार नाही.
तसेच या कारागृहाचे पर्यटन स्थळात रूपांतर केले जाणार आहे.
राज्य पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या कारागृहात मोठा बदल केला जाणार आहे.
30 मे 2015 पासून हे कारागृह कैद्यांचे आवास राहिलेले नाही.
सर्व कैद्यांना नव्या कारागृहात स्थानांतरित करण्यात आले आहे.
तसेच या कारागृहाचे हिमाचल प्रदेशच्या धागशाई कारागृह आणि अंदमानच्या सेल्युलर कारागृहाप्रमाणेच संग्रहालयात रूपांतर केले जाईल.
धागशाई कारागृह आणि अंदमानचे सेल्युलर कारागृह ही ब्रिटिश काळातील कारागृहे आहेत.
  • दहशतवादविरोधी पथकाच्या प्रमुखपदी अतुलचंद्र कुलकर्णी :

दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) प्रमुखपदी गुन्हे शाखेचे सहआयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली.
नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी हेमंत नगराळे यांची नियुक्ती झाली.
नवी मुंबईचे विद्यमान आयुक्त प्रभात रंजन यांना पदोन्नती देऊन विधी आणि तांत्रिक विभागाचे महासंचालक म्हणून, तर पोलिस गृहनिर्माण महामंडळाच्या महासंचालकपदावर विष्णू देव मिश्रा यांना पदोन्नती देण्यात आली.
राज्य पोलिस दलातील विशेष पोलिस महानिरीक्षकांपासून महासंचालक दर्जाच्या 11 अधिकाऱ्यांच्या बदल्या गृह विभागाने (दि.13) जाहीर केल्या.
विधी आणि तांत्रिक विभागाच्या महासंचालक मीरा बोरवणकर यांच्या दिल्लीत झालेल्या प्रतिनियुक्तीनंतर पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर खांदेपालट अपेक्षित होते.
मुंबईसह राज्य पोलिस दलात काही दिवसांत आणखी काही बदल्या अपेक्षित आहेत.
'एटीएस'चे सध्याचे प्रमुख विवेक फणसळकर यांची लाचलुचपत विरोधी पथकाच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य पोलिस महासंचालक कार्यालयात कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त महासंचालक के. एल. बिष्णोई यांची पोलिस गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकपदावर नियुक्ती झाली आहे.
  • निरंकारी संप्रदायाचे प्रमुख हरदेवसिंग यांचे निधन :

आध्यात्मिक नेते व निरंकारी पंथाचे प्रमुख बाबा हरदेव सिंग (वय 62 वर्ष) यांचे कॅनडात माँट्रियल येथे (दि.13) अपघाती निधन झाले.
बाबा हरदेव सिंग हे कारने प्रवास करीत असताना (दि.13) भारतीय वेळेनुसार पहाटे 5 च्या सुमारास त्यांच्या कारला अपघात झाला. ते कॅनडामध्ये आध्यात्मिक बैठका घेण्यासाठी गेले होते.
टोरोंटोमध्ये जून महिन्यात दुसरे निरंकारी आंतरराष्ट्रीय संगम आयोजित करण्यात आले आहे.
बाबा हरदेव सिंग हे ‘निरंकारी बाबा’ या नावाने ओळखले जात. तसेच ते निरंकारी मिशनचे प्रमुख होते.
1980 मध्ये त्यांनी त्यांचे वडील गुरुबचन सिंग यांची हत्या झाल्यानंतर मिशनच्या प्रमुख पदाची जबाबदारी घेतली होती.
  • जगातील सर्वांत मोठे कार्गो विमान भारतात दाखल :

जगातील सर्वांत मोठे कार्गो विमान 'आंतोंनोव्ह एन - 225 मिर्या' भारतात दाखल झाले असून, हैदराबादेतील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याचे लॅंडिंग झाले.
अवाढव्य आकारमान असणाऱ्या या विमानाची इंजिने देखील तितकीच शक्तिशाली आहेत.
सहा टर्बोफॅन इंजिनांचा समावेश असणारे हे जगातील एकमेव विमान असून त्याचे उड्डाणाप्रसंगीचे कमाल वजन हे 640 टन एवढे आहे.
सामान्य विमानांच्या तुलनेत या कार्गो जेटच्या पंखांचा विस्तारदेखील मोठा आहे.
वजनदार वस्तू आणि माल घेऊन दूरपर्यंत प्रवास करण्यासाठी या विमानाचा वापर केला जातो.
तुर्केमिनिस्तानमधून हे विमान हैदराबादेत दाखल झाले आहे.
मध्यंतरी अनिल अंबानी यांच्या 'रिलायन्स डिफेन्स' या कंपनीने मागील महिन्यामध्ये युक्रेनमधील अँटोनिक कंपनीसोबत रणनितीक करार केला होता.
यान्वये विमानांची निर्मिती, त्यासाठी लागणाऱ्या साधनांची जुळवाजुळव, विमानांची देखभाल आणि त्यांच्या दुरुस्तीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
'रिलायन्स डिफेन्स' आणि 'आंतोंनोव्ह' या दोन कंपन्या हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स लिमिटेड (एचएएल) या कंपनीसोबत मिळून 50 ते 80 एवढी आसनक्षमता असणाऱ्या विमानांची निर्मिती करणार आहेत.
  • * जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानी असलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविक याला मद्रित ओपन मास्टर किताब हा मिळाला आहे.
  • * दूरसंचार विभाग देशातील ५६ हजार गावे टप्प्याटप्प्याने २०१९ वर्षापर्यंत मोबाईलशी जोडणार.
  • * आकाशामध्ये पृथ्वीच्या आकाराचे १०० पेक्षा अधिक ग्रहाचा शोध नासाने लावला आहे.
  • * गुगलद्वारे भारतातील उज्जेन, जयपूर,पटना, गुवाहाटी, अलाहाबाद या रेल्वेस्थानकावरहाय स्पीड वायफाय सेवा सुरु केली.
  • * नाना पाटेकर यांना चित्ररत्न पुरस्कार जाहीर.
  • * राज्यात होणार खनिज सर्वेक्षण या अंतर्गत नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, चंद्रपूर, अहमदनगर, रत्नागिरी कोल्हापूर या जिल्ह्यात खनिजाचे सर्वेक्षण होणार आहे.
  • * बँकमधील खात्यात काहीच शून्य रक्कम शिल्लक नसल्यास बँक दंड म्हणून त्याच्या खात्यावरील रक्कम उणे मायनस करू शकत नाही. असा निर्णय रिझर्व बँकेने घेतला आहे.
  • * IIC आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या चेअरमनपदी शशांक मनोहर यांची निवड करण्यात आली आहे.
  • * पंतप्रधान मोदी यांच्या कल्पनेतून [ स्टेच्यु ऑफ युनिटी ] म्हणूनसरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात मोठा पुतळा सरदार सरोवर नजीक साकारण्यात येनार आहे.
  • * गोव्याच्या अग्वादा येथील मध्यवर्ती कारागृह आता ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून जाहीर करण्यात येईल.
  • * दहशतवाद विरोधी एटीस प्रमुखपदी गुन्हे शाखेचे सहआयुक्त अतुल कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली.
  • * नवी मुंबई च्या पोलिस आयुक्तपदी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली.


  • आंतरजातीय विवाह केल्यास सरकारी नोकरीत प्राधान्य :

- समाजातील जातिभेद व असमानतेची दरी दूर करून समाज एकसंध व्हावा यासाठी माईसाहेब आंबेडकरांच्या नावे योजना प्रस्तावित समाजातील जातिभेद व असमानतेची दरी दूर करून समाज एकसंध व्हावा, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेत आता आमूलाग्र बदल करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे.
- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या द्वितीय पत्नी डॉ. माईसाहेब आंबेडकर यांच्या नावाने नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासकीय नोकरीत प्राधान्य देण्याचा विचार असून तसा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.
- राज्यात १९५८ पासून आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आली. सुरुवातीला पती-पत्नीपैकी एक व्यक्ती अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमातीची आणि दुसरी व्यक्ती सवर्ण हिंदू, लिंगायत जैन व शिख यांपैकी असल्यास तो आंतरजातीय विवाह मानला जात होता. २००४ पासून त्याची व्याप्ती पुन्हा वाढविण्यात आली. अनुसू्चित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती यांच्यातील आंतरजातीय विवाहही प्रोत्साहन योजनेत आण्यात आले. त्यानुसार आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना रोख १५ हजार रुपये दिले जात होते. २०१० मध्ये त्यात वाढ करून ही रक्कम ५० हजार रुपये करण्यात आली. आता या योजनेत आणखी बदल करण्यात येणार आहे.
# काय होणार?
* आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना संरक्षण आणि उदरनिर्वाहाची हमी म्हणून त्यांना सरकारी नोकरीत प्राधान्य देण्याचा विचार आहे.
* सुकन्या योजनेच्या धर्तीवर आंतरजातीय दाम्पत्याला जन्मलेल्या मुला-मुलींच्या नावार बँकेत एक लाख रुपये जमा केले जातील. त्यांना शिक्षणात आर्थिक सवलती देण्याचा विचार आहे.
* पती सवर्ण व पत्नी मागासवर्गीय असेल तर त्यांच्या मुलांना सवलती मिळत नाहीत. अशा दाम्पत्यांच्या अपत्यांनाही त्याला लाभ मिळाला पाहिजे, त्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे.
* त्याचबरोबर आता प्रोत्साहन म्हणून मिळणाऱ्या ५० हजार रुपयांच्या रकेमत आणखी वाढ करण्यात येणार आहे. या सर्व नव्या सवलतींचा समावेश असलेला प्रस्ताव तयार करण्यास सांगण्यात आले आहे.
  • •जपान तर्फे देण्यात येणारा *सर्वोच्च नागरी पुरस्कार "The Order of Rising Sun, Gold and Silver Star"* चे या वर्षीचे परराष्ट्रीय प्राप्तकर्ता म्हणून *नंद किशोर सिंह* यांची निवड करण्यात आली आहे.सध्या भारतीय जनता पार्टीत असणारे सिंह हे *२००८ ते २०१४ दरम्यान जनता दल (U) चे राज्यसभा खासदार* होते.या पूर्वी त्यांनी *माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी* यांचे तत्कालीन *मुख्य सचिव*, *नियोजन मंडळाचे सदस्य* म्हणून काम पहिले आहे.ते *UNGEF (United Nations Global Environment Facility) (1993–94) चे पहिले अध्यक्ष* होते.
  • वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय पातळीवर एकच सामायिक प्रवेश परीक्षा राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (National Eligibility and Entrance Test - नीट) घेण्याचा सुप्रीम कोर्टाने निर्णय कायम ठेवला.ही परीक्षा *"सीबीएसई"* द्वारे घेण्यात येते.या परीक्षेला तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि केरळ राज्य सरकारांचा खास करून विरोध होता.या परीक्षेची *सुरुवात २०१२* साली करण्यात आली होती.मात्र या परीक्षेला रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात तेव्हा याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्या वेळी (२०१३ साली) सर्वोच्च न्यायालयाने या परीक्षेद्वारे "राज्य सरकारांनी चालवलेल्या वैद्यकीय महाविद्यालयात त्यांच्या स्वतःच्या पद्धतीने प्रवेश देण्याच्या हक्काचे उल्लंघन होत असल्याचे" मत नोंदवत, या परीक्षेस असंविधानिक घोषित केले होते.या परीक्षेसाठी *केंद्र सरकार आणि Medical Council of India (MCI)* हे प्रयत्नशील होते.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी *प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे* उद्घाटन *बलिया (उत्तरप्रदेश)* येथून केले.या योजनेचे उद्दिष्ट *दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पाच कोटी एलपीजी कनेक्शन (घरगुती गॅस)* देण्याचे आहे.यासाठी येत्या ३ वर्षात ८,००० कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे.२०१६-१७ च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या योजनेसाठी २,००० कोटी रुपयांची तरतूद केली असून कोणतेही रक्कम जमा न करता गरिबांना गॅस कनेक्शन मिळणार आहे. तसेच शेगडीसुद्धा मासिक हप्त्यांवर मिळणार आहे.या योजनेंतर्गत देण्यात येणारे *कनेक्शन घरातील महिलेच्या नावावर* असणार आहे.
  • एलपीजी संदर्भातील इतर योजना:
  • पहल : लाभार्थींना थेट निधी हस्तांतरण योजना
  • GiveItUp: नागरिकांनी LPG गॅस सिलिंडरवरील अनुदान स्वतःहून त्याग करण्याची योजना
  • *नागालँडची राजधानी कोहीमा* शहर *धुम्रपान मुक्त* म्हणून घोषित करण्यात आले आहे.या निर्णयामुळे कोहीमामध्ये यापुढे धुम्रपानावर बंदी असेल.
  • *नाबार्डने जर्मन सरकारसोबत* भागीदारीने ‘Soil Protection and Rehabilitation for Food Security‘ का कार्यक्रम हाती घेतला आहे.हा कार्यक्रम जर्मन सरकारने नुकताच सुरु केलेल्या *‘One World, No Hunger’* या अभियानाचा भाग आहे.जर्मनीने या अभियानासाठी *आशिया खंडात फक्त भारताची* निवड केली आहे.या कार्यक्रमांतर्गत नाबार्ड २ अभियाने चालवणार आहे.*महाराष्ट्र* आणि मध्यप्रदेशात - *मृदा संवर्धन आणि धूप झालेल्या जमिनीचे पुनर्वसन कार्यक्रम**महाराष्ट्र*, गुजरात, राजस्थान, तेलंगाना आणि आंध्रप्रदेशात - *पाणलोट क्षेत्र विकसित* करणे आणि *बदलत्या वातावरणाचे परिणामांशी जुळवून घेण्यासाठी* योजनांची अंमलबजावणी करणेनाबार्ड - The National Bank for Agriculture and Rural Developmentयापूर्वी *१९९२मध्ये* जर्मनी आणि भारत सरकारने मिळून The Indo-German Watershed Development Programme (IGWDP) हा पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम हाती घेतला होता.
  • गुजरात सरकारने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या सवर्णांसाठी १० टक्के आरक्षणाची घोषणा केली.वार्षिक 6 लाखांपेक्षा कमी आर्थिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबालाच हे आरक्षण लागू असणार आहे.आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला आरक्षण देणारे गुजरात हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.या निर्णायाने सर्वोच्च न्यायालयाने निश्‍चित केलेल्या 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादेचे उल्लंघन होणार आहे.चीनमधील शास्त्रज्ञांनी *जगातील पहिल्या "ग्राफिन" पासून तयार केलेल्या "e-पेपर"* ची निर्मिती केली आहे.हे संशोधन The Guangzhou OED Technologies या कंपनीने केले.ग्राफिन e-पेपर बद्दल*ग्राफिन e-पेपर हे इतर e-पेपर पेक्षा जास्त लवचिक आणि पारंपारिक e-पेपर पेक्षा जास्त तीव्रतेचे असतात.त्याची पारेषणता (transmission) जास्त असल्याने ते अधिक तेजस्वी (उज्वल किंवा चकचकीत) असतात.पारंपारिक e-पेपर हे indium या महागड्या मुलाद्रव्यापासून बनविलेले असल्याने त्यांची किंमत जास्त असते तर तुलनेने ग्राफिन e-पेपर अतिशय स्वस्त असतात.LCDच्या तुलनेत ते पातळ, लवचिक आणि energy efficient असतात.

  • ग्राफिन*
  • ग्राफिन म्हणजे कार्बन अणूचे अपरुप.ग्राफिन हा जागतिल सर्वात बळकट पदार्थ आहे. तसेच कार्बन पासून मिळणारा सर्वात कमी वजनाचा पदार्थ आहे.उर्जेचा आणि विजेचा सुवाहक असणारे ग्राफिन हे सध्या नॅनो टेक्नोलॉजी संशोधनात मध्ये अतिशय महत्वाचा पदार्थ बनले आहे.
  • ५३ व्या महाराष्ट्र राज्य मराठी पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार ‘रिंगण’ या चित्रपटाला प्राप्त झाला.याच सोहळ्यात ‘रिंगण’ सिनेमाला पाच पुरस्कार, ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटाला पाच पुरस्कार, ‘डबल सीट’ सिनेमाला पाच पुरस्कार, ‘हलाल’ चित्रपटाला पाच पुरस्कार मिळालेले आहेत.तसेच सिनेसृष्टीतील कारकिर्दीसाठी राजकपूर जीवनगौरव पुरस्काराने अभिनेते जीतेंद्र यांना तर राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने अभिनेता अनिल कपूरला गौरवण्यात आले.चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने ज्येष्ठ संकलक व्ही. एन. मयेकर ह्यांना सन्मानित करण्यात आलं. आणि चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री अलका कुबलला देण्यात आला.६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात रिंकू राजगुरूला सैराट चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार प्राप्त झालाय.याच सोहळ्यात महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी *दादासाहेब फाळके यांच्या पत्नी सरस्वती फाळके यांच्या नावाने चित्रपट संग्रहालय* उभारण्याची घोषणा यावेळी केली.रिंगण (The Quest)महाराष्ट्र राज्य मराठी पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळवणाऱ्या या चित्रपटाने याआधी *६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्तम मराठी चित्रपट पुरस्कार* पटकावला आहे.हा चित्रपट *मकरंद माने यांनी दिग्दर्शित* केलेला असून शशांक शेंडे (चित्रात : डावीकडे) आणि साहिल जोशी(चित्रात : उजवीकडे) हे या चित्रपटातील मुख्य अभिनेते आहेत.या चित्रपटाचा मुख्य धागा *पितृप्रेम* हा आहे.

  • टीसीएस वर्ल्ड 10 के शर्यतीत स्वाती गाढवे प्रथम :

मोसिनेट गेरेमेव आणि पेरेस जेपचिरचिर यांनी (दि.15) येथे झालेल्या टीसीएस वर्ल्ड 10 के शर्यतीत अव्वल स्थान मिळवले.
भारतीय महिलांच्या गटात पुण्याच्या स्वाती गाढवेने पहिला क्रमांक पटकावला.
दुसऱ्या क्रमांकावर नाशिकच्या संजिवनी यादवने हक्क गाजवला.
स्वातीने सुरवातीपासूनच आघाडी कायम ठेवत दहा कि.मी.चे अंतर 34.45 मिनिटात पूर्ण केले.
संजिवनीने 36.13 मिनिटात ही शर्यत पूर्ण केली. 37018 मिनिटात शर्यत पूर्ण करणारी मिनू तिसऱ्या क्रमांकावर राहीली.
8 किलोमीटरचे अंतर गेरेमेवने 8.36 मिनिटात पार केले. ही शर्यत त्याने दुसऱ्यांदा जिंकली आहे.
ट्रॅकच्या अंतिम लॅपपर्यंत गेरेमेव केनियाच्या जॉन लँगट आणि बोंसा डिडा यांच्या मागे पडला होता.
परंतु निर्णायक क्षणी एका सेकंदाने दोघांना मागे टाकून गेरेमेवने 23 हजार डॉलर्स बक्षिसावर आपला हक्क सांगितला.
शर्यतीनंतर गेरेमेव म्हणाला की, यंदा तापमान जास्त असल्याने ही शर्यत थोडी अवघड होती, पण गेल्यावर्षापासूनच ही शर्यत जिंकण्याचा मला आत्मविश्वास होता.
विश्व हाफ मॅरेथॉन चॅम्पियन केनियाच्या जेपचिरचिरने 32.15 मिनिटात शर्यत जिंकली.
  • महेश मोहोळ याला ‘मावळ मल्लसम्राट’ किताब :

सांगवडे (मावळ) येथील भैरवनाथ उत्सवानिमित्त आयोजित निकाली कुस्त्यांच्या मैदानात नामवंत मल्लांच्या प्रेक्षणीय कुस्त्या झाल्या.
 मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रातील आशियाई पदकविजेता महेश मोहोळ व महाराष्ट्र केसरी समाधान घोडके यांच्यातील अंतिम लढत बरोबरीत सुटल्यांनतर पंच कमिटीच्या निर्णयानुसार महेश मोहोळ याला ‘मावळ मल्लसम्राट’ किताब व मानाची चांदीची गदा देण्यात आली.
 तसेच दोघांना प्रत्येकी रोख पन्नास हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
 सांगवडे ग्रामस्थ व कुस्ती संयोजन कमिटी आयोजित निकाली कुस्त्यांच्या मैदानाचे पूजन किसन कदम व राष्ट्रवादीचे देहू अध्यक्ष प्रकाश हगवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
 पुणे शहर, तसेच जिल्ह्यातील हवेली, मावळ व मुळशीतील विविध तालमींतील नामांकित मल्लांच्या उत्सवापूर्वी ठरविलेल्या निकाली कुस्त्या लक्षवेधी ठरल्या.
 सर्वसाधारणपणे उत्सवातील मैदाने (आखाडे) सायंकाळी बंद केले जातात.
 मात्र, संयोजकांनी पुरेशी प्रकाश व्यवस्था करून सायंकाळी पाच वाजता सुरु केलेल्या कुस्त्या रात्री दहापर्यंत सुरु ठेवल्या होत्या.
  • लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर :

आपल्या पाल्याने कोणता कोर्स करावा, दर्जेदार शिक्षण देणारी संस्था कोणती, सर्व शैक्षणिक संस्थांची माहिती घेण्यासाठी किती फिरावे लागणार, वर्षाला किती फी भरावी लागेल, अनुदान मिळेल काय, असे एक ना अनेक प्रश्न सध्या पालकांना भंडावून सोडत असतील.
 मात्र, आता आपल्या पाल्याच्या करिअरची चिंता करणे सोडा. कारण, खास आपल्यासाठी ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’चे आयोजन करण्यात आले आहे.
 तसेच या निमित्ताने सर्व नामांकित शैक्षणिक संस्थांची इत्थंभूत माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे.
 या उपक्र
  • महेश मोहोळ याला ‘मावळ मल्लसम्राट’ किताब :

सांगवडे (मावळ) येथील भैरवनाथ उत्सवानिमित्त आयोजित निकाली कुस्त्यांच्या मैदानात नामवंत मल्लांच्या प्रेक्षणीय कुस्त्या झाल्या.
मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रातील आशियाई पदकविजेता महेश मोहोळ व महाराष्ट्र केसरी समाधान घोडके यांच्यातील अंतिम लढत बरोबरीत सुटल्यांनतर पंच कमिटीच्या निर्णयानुसार महेश मोहोळ याला ‘मावळ मल्लसम्राट’ किताब व मानाची चांदीची गदा देण्यात आली.
तसेच दोघांना प्रत्येकी रोख पन्नास हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
सांगवडे ग्रामस्थ व कुस्ती संयोजन कमिटी आयोजित निकाली कुस्त्यांच्या मैदानाचे पूजन किसन कदम व राष्ट्रवादीचे देहू अध्यक्ष प्रकाश हगवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
पुणे शहर, तसेच जिल्ह्यातील हवेली, मावळ व मुळशीतील विविध तालमींतील नामांकित मल्लांच्या उत्सवापूर्वी ठरविलेल्या निकाली कुस्त्या लक्षवेधी ठरल्या.
सर्वसाधारणपणे उत्सवातील मैदाने (आखाडे) सायंकाळी बंद केले जातात.
मात्र, संयोजकांनी पुरेशी प्रकाश व्यवस्था करून सायंकाळी पाच वाजता सुरु केलेल्या कुस्त्या रात्री दहापर्यंत सुरु ठेवल्या होत्या.
  • चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर :

कर्णधार सरदार सिंग आणि अव्वल ड्रॅग फ्लिकर रुपदिंर पालसिंग यांना 10 ते 17 जून या कालावधीत लंडनमध्ये होणाऱ्या एफआयएच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 18 सदस्यांच्या भारतीय हॉकी संघातून विश्रांती देण्यात आली आहे.
 कर्णधारपदाची जबाबदारी गोलकीपर पी.आर. श्रीजेशवर सोपविण्यात आली आहे.
 तसेच या व्यतिरिक्त हॉकी इंडियाने स्ट्रायकर रमणदीप सिंग आणि डिफेंडर जसजीत सिंग कुलार यांनाही विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.
 रिओ ऑलिम्पिकपूर्वी भारताची ही दुसरी अंतिम स्पर्धा आहे.
 चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर भारतीय संघ वलेंसिया येथे सहा देशांचा समावेश असलेल्या स्पर्धेत सहभागी होणार आहे.
  • हान कांग यांना 'मॅन बुकर' पुरस्कार :

दक्षिण कोरियाचे लेखक हान कांग (वय 45) यांच्या 'द व्हेजिटेरियन' या पुस्तकाला साहित्य जगतातील प्रतिष्ठेचा 'मॅन बुकर' आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
 तसेच यातील नायिका मांसाहार बंद करण्याचा निर्णय घेते आणि त्यानंतर तिचा होणाऱ्या छळाचे वर्णन यात आहे.
 हान यांच्यासह इटलीच्या लेखिका एलेना फेरांट, अंगोलाचे लेखक, जोस एदुआर्दो अंगुलसा, चीनचे लेखक यान लियांके, तुर्कस्तानचे ओरहान पामुक व ऑस्ट्रेलियाचे रॉबर्ट सिटलर यांची नावे अंतिम फेरीसाठी निवडण्यात आली होती. त्यात कांग यांनी बाजी मारली.
 'द व्हेजिटेरियन'चा इंग्रजी अनुवाद ब्रिटनमधील दिबोरा स्मिथ यांनी केला आहे.
  • मुकेश अंबानी ‘ऑथमर गोल्ड मेडल’ ने सन्मानित :

उद्योगक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल आणि विशेषत: गुजरात येथील जामनगर येथे जगातील सर्वात मोठी रिफायनरी उभारल्याबद्दल विख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांना नुकतेच प्रतिष्ठेच्या ‘ऑथमर गोल्ड मेडल फॉर आन्थ्रप्रुनियल लीडरशीप’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 ‘द केमिकल हेरिटेज फाऊंडेशन’ च्या वतीने अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे झालेल्या एका शानदार कार्यक्रमात या पुरस्काराने अंबानी यांना गौरविण्यात आले.
 केमिकल हेरिटेज फाऊंडेशनचे अध्यक्ष कार्स्टन रेनहार्डट् आणि डेल्फी ऑटोमोटिव्हचे अध्यक्ष राज गुप्ता यांच्याहस्ते मुकेश अंबानी यांचा हा गौरव करण्यात आला.
 या पुरस्काराचे श्रेय आपले वडील स्व.धीरुभाई अंबानी यांना देताना मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्स केवळ वस्त्रोद्योगात होती त्यावेळी धीरूभाईंनी केमिकल इंजिनियर होण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन दिले.
 तसेच, यावेळी भारत आणि अमेरिका संबंधावरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, 21 साव्या शतकात आपल्याला दोन प्रमुख मुद्यांच्या विरोधात लढा द्यावा लागणार आहे.
येऊरमध्ये होणार वन्यजीव गणना :
ठाणे येथील येऊर परिक्षेत्रात वावर असलेल्या प्राणी - पक्ष्यांचे अस्तित्त्व आहे की नाही यासाठी वनविभागातर्फे दरवर्षीप्रमाणे करण्यात येणारी वन्यजीव गणना याही वर्षी केली जाणार आहे.
 तसेच या परिक्षेत्रातील 20 पाणवठ्यांवर ती केली जाणार असून बुद्धपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच येत्या 21 मे रोजी तिला सुरूवात होणार आहे.
 येऊर वनपरिक्षेत्र विस्तीर्ण परिसर आहे. या परिक्षेत्रांतर्गत येऊर, घोडबंदर, चेना आणि नागलाबंदर ही चार ठिकाणे येतात.
 तसेच दरवर्षी वन्यजीव गणनेच्या माध्यमातून या वन्यजीवांचे निरीक्षण आणि संख्या नोंदविली जाते.
 21 मे रोजी गणनेस सुरूवात होणार असून यासाठी वनविभाग कर्मचारी आणि स्वयंसेवक सज्ज झाले आहेत.
रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका :
राज्यातील पहिली नगरपालिका अशी ओळख असणाऱ्या पनवेलचे राज्यातील 27 व्या महानगरपालिकेत रूपांतर होणार आहे.
 नगरपालिका, सिडको विकसित क्षेत्र व 68 गावांची मिळून नवीन पालिका होणार आहे.
 शासनाच्या या निर्णयामुळे जवळपास तीन वर्षांपासूनची उत्सुकता संपली असून तालुक्याच्या रखडलेल्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
 स्वातंत्र्यपूर्व काळाज इंग्रजांनी शहरांच्या नियोजनासाठी नगरपालिका कायदा तयार केला.
 पनवेलमध्ये नगरपालिका कायदा लागू करण्याची मागणी नागरिकांनी केली होती.
 तसेच या मागणीची दखल घेऊन 1852 मध्ये पनवेलचे नगरपालिकेत रूपांतर झाले.
 राज्यातील पहिली नगरपालिका म्हणून या शहराचा लौकिक आहे.
 शासनाने मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई वसविण्याचा निर्णय घेतल्यानंतर पनवेल ग्रामीण परिसराचे झपाट्याने शहरीकरण झाले.
 परंतु येथील कारभार ग्रामपंचायतींमध्ये विभागला होता.
 सिडको, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका या चार आस्थापनांमध्ये विभागणी झाल्यामुळे तालुक्याच्या विकासामध्ये सर्वसमावेशकता येत नव्हती.
  • भारत वंशीय स्वाती दांडेकर एडीबीच्या संचालक :

अमेरिकी सिनेटने भारतीय वंशाच्या मुत्सद्दी स्वाती दांडेकर यांची आशियाई विकास बँकेच्या कार्यकारी संचालकपदी नेमणूक केली आहे. हे पद राजदूताच्या दर्जाचे आहे.
 दांडेकर या रॉबर्ट ए. ओर यांची जागा घेतील. ओर हे 2010 पासून या पदावर कार्यरत होते.
 ओबामा यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आशियाई बँकेच्या सर्वोच्च अमेरिकी पदासाठी स्वाती दांडेकर यांची नेमणूक केली होती.
 65 वर्षीय स्वाती दांडेकर 2003 ते 2009 या काळात आयोवा प्रतिनिधी सभेच्या सदस्य होत्या.
 तसेच 2009 ते 2011 या काळात त्या आयोवा सिनेटच्याही सदस्य होत्या.
  • केंद्रीय प्रदूषण संशोधन संस्था स्थापन होणार :

प्रदूषणाची वाढती पातळी चिंताजनक आहे व प्रदूषणाचे मापन करण्याबाबत देशभरात एकाच संस्थेची आवश्‍यकता निर्माण झाली आहे.
 तसेच यामुळे सरकारने केंद्रीय प्रदूषण संशोधन संस्थेची स्थापना करण्याचा प्रस्ताव राज्यांसमोर ठेवला आहे.
 सरकार याबाबत गांभीर्याने विचार करत आहे असे वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी नमूद केले.
 दिल्लीत राज्यांच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षांचे संमेलन झाले.
 अशी संमेलने दर 6 महिन्यांनी केंद्रीय व राज्य पातळ्यांवरही घेतली पाहिजेत, अशी सूचना करून जावडेकर यांनी सांगितले की, विविध प्रकारच्या प्रदूषणाबाबत देशात सातत्याने संशोधन होणे गरजेचे आहे.
 केंद्राने 6 प्रकारच्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी नव्या नियमावली मार्च 2016 मध्ये जारी केल्या असून, त्यांचे काटेकोर पालन राज्यांनी करावे, अशी सूचना त्यांनी केली.
 तसेच या नियमावलींनी राज्य सरकारांनी या संमेलनातच मान्यता दिल्याचे जाहीर केले.
 पंचमहाभूतांमधील संतुलन कायम राखणे व त्यांचे संरक्षण हे तर केंद्राचे मिशनच आहे.
  • पंतप्रधान उज्ज्वल योजनेची अंमलबजावणी :

पंतप्रधान उज्ज्वल योजनेची अंमलबजावणी करत एलईडी बल्बचे वाटप करण्यात आंध्रप्रदेश प्रथम क्रमांकावर असून, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 गुजरातमध्ये या योजनेच्या उद्घाटनप्रसंगी सरकारने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
 जानेवारी 2015 मध्ये केंद्र सरकारने ही योजना सुरू केल्यावरनंतर आंध्रप्रदेशमध्ये 1.89 कोटी एलईडी बल्बचे वाटप झाले आहे, तर महाराष्ट्रात 1.62 कोटी बल्बचे वाटप करण्यात आले आहे.
 या दोन राज्यांनंतर उत्तर प्रदेश (1.01 कोटी), झारखंड (60.59 लाख), हिमाचल प्रदेश (59.52 लाख) यांचा क्रमांक लागतो.
 पंजाब या यादीत सर्वांत शेवटी असून, तेथे केवळ 2,544 बल्बचे वाटप झाले आहे.
  • मित्सुबिशीच्या अध्यक्षांचा राजीनामा :

वाहन उत्पादन क्षेत्रातील मित्सुबिशी या कंपनीतील इंधनाच्या आकडेवारीमधील (फ्युएल डेटा स्कॅम) गैरव्यवहारप्रकरणी कंपनीचे अध्यक्ष तेत्सुरो आईकावा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
 प्रोडक्‍ट डेव्हलपमेंट विभागातून आईकावा यांनी आपल्या कारकिर्दीला प्रारंभ केला होता.
 तसेच या संपूर्ण गैरव्यवहाराची सुरुवात याच विभागातून झाल्याने आईकावा यांनी राजीनामा दिल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.
 मित्सुबिशीमधील काही कर्मचाऱ्यांनी सहा लाखांपेक्षा अधिक मोटारींच्या इंधनक्षमतेविषयी खोटी आकडेवारी ग्राहकांना सांगितली होती.
 कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना मोटारींच्या चार मॉडेल्सची इंधनक्षमता 5 ते 10 टक्‍क्‍यांनी वाढवून सांगितल्याचे कंपनीने मान्य केले आहे.
 मित्सुबिशीने तयार केलेल्या चार मॉडेल्सपैकी दोन मॉडेल्सची निसान मोटर्सच्या ब्रॅंडअंतर्गत विक्री करण्यात आली.
 शिवाय, कंपनीच्या आणखी मॉडेल्सचीदेखील खोटी आकडेवारी सांगण्यात आल्याची शक्‍यता चौकशीदरम्यान व्यक्त करण्यात आली आहे.
 सध्या आईकावा यांच्या जागी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओसामू मासुको हे प्रभारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील.
 निस्सानशी हिस्साविक्री करार पूर्ण होईपर्यंत त्यांना दोन्ही पदांचा कारभार सांभाळावा लागेल.
 काही दिवसांपुर्वी दुसरी जपानी वाहन कंपनी निस्सान मोटर्सने मित्सुबिशीतील 34 टक्के हिस्सेदारीची खरेदी करण्याची घोषणा केली आहे.
  • पृथ्वी-2 क्षेपणास्राची यशस्वी चाचणी :

लष्कराच्या वापरासाठी केल्या जाणाऱ्या परीक्षणाचा भाग म्हणून बुधवारी ओडिशाच्या चांदीपूर येथील एकात्म क्षेत्रात (आयटीआर) अण्वस्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या पृथ्वी-2 या स्वदेशनिर्मित क्षेपणास्राची चाचणी यशस्वीरीत्या पार पडली.
 (दि.18) सकाळी 9.40 वाजतादरम्यान आयटीआरमधील संकुल-3 मध्ये मोबाइल लाँचरवर पृथ्वी-2 हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्र ठेवून चाचणी पार पाडण्यात आल्याचे संरक्षण सूत्रांनी सांगितले.
 पहिली चाचणी यशस्वी पार पडताच लागोपाठ दुसरी चाचणी घेण्याची योजना तांत्रिक अडचणींमुळे सोडून द्यावी लागली.
 तसेच यापूर्वी चांदीपूर येथेच 12 ऑक्टोबर 2009 रोजी अशाच स्वरूपाच्या दोन्ही चाचण्या यशस्वीरीत्या पार पाडण्यात आल्या होत्या.
 क्षेपणास्त्राची काही वैशिष्ट्ये -
 उंची- 9 मीटर, टप्पा एकच
 मारा करण्याची क्षमता- 350 किमी.
 अस्र क्षमता - 500 ते 1000 किलो.
 इंजिन- दोन, द्रवरूप इंधन.
 अत्याधुनिक यंत्रणा- अंतर्गत मार्गदर्शक प्रणालीमुळे अचूक वेध.
 2003 मध्ये सशस्त्र दलात समावेश.
 डीआरडीओकडून विकसित केले गेलेले पहिले क्षेपणास्त्र
  • *बौद्धिक संपदा धोरण २०१६*

* केंद्रीय मंत्रिमंडळाने सृजनात्मक, नवोन्मेश, व उद्यमशिलतेला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय बौद्धिक संपदा अधिकार [ IPR ] धोरणाला मंजुरी दिली.
* राष्ट्रीय बौद्धिक संपदा अधिकाराचे आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचतील.
* २०१७ पर्यंत ट्रेडमार्क मुदत केवळ एक महिण्यासाठी राहील.
* बौद्धिक संपदेच्या प्रत्येक स्वरुपाची माहिती देताना त्यासंबंधी नियम आणि संस्थामधील समन्वयाचा ताळमेळ राखला जाईल.
* तसेच या धोरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी व प्रोत्साहनासाठीकठोर व प्रभावी कायद्याची अंमलबजावनीची गरज राहील.
* धोरणाचे उल्लघन केले जात असेल तर त्याला तोंड देण्यासाठी अंमलबजावणी व न्यायप्रणालीला बळकटी देण्याचा उद्देशही समाविष्ट असेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा