Post views: counter

Current Affairs May 2016 Part - 4

  • भारत-ओमानमध्ये संरक्षणविषयक करार :

भारत आणि ओमान यांनी (दि.22) द्विपक्षीय संरक्षण संबंध आणखी बळकट करण्याच्या दिशेने पावले टाकली.
 दोन्ही देशांनी लष्करी सहकार्याला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करताना चार महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.
 संरक्षण सहकार्य, समुद्रातील गुन्ह्यांना प्रतिबंध, समुद्राशी संबंधित मुद्दे आणि उड्डाण सुरक्षा माहितीची देवाणघेवाण यासंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.
 संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर पहिल्यांदाच मध्य पूर्वेतील जवळचा देश असलेल्या ओमानच्या दौऱ्यावर पोचल्यानंतर हे करार झाले.
 ओमानमधील नेतृत्वाशी झालेल्या चर्चेदरम्यान द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या सर्व मुद्यांवर बोलणी झाली.
 परस्पर हिताच्या दृष्टीने प्रादेशिक विकासावर दोन्ही देशांनी आपली मते मांडली, असे निवेदन संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्धीस दिले आहे.
 संरक्षण सहकार्य हा द्विपक्षीय रणनीती भागीदारीचा महत्त्वाचा पैलू असल्याची नोंद दोन्ही देशांनी घेतली.
  • ‘नॅक’कडून मूल्यांकनासाठी नवीन पद्धत :

विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या मुल्यांकनासाठी ‘नॅक’ने (नॅशनल असेसमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्रेडिटेशन कौन्सिल) नवीन आठ श्रेणी पद्धती (ग्रेडेशन) जाहीर केली असून, त्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून करण्यात येणार आहे.
 नव्या धोरणानुसार आता ‘ए’ ग्रेडमध्ये सुधारणा करून ‘ए ए प्लस’ आणि ‘ए प्लस प्लस’ असे ग्रेड राहणार आहेत. बंगळुरू येथील ‘नॅक’ संस्थेचे संचालक डी. पी. सिंग यांनी यासंदर्भातील आदेश नुकतेच जाहीर केले आहेत.
 प्रचलित पद्धतीमध्ये ‘नॅक’तर्फे डी (1 ते 1.5 सीजीपीए), सी (1.51 ते 2.00 सीजीपीए), बी (2.01 ते 3.00 सीजीपीए) आणि ए (3.01 ते 4.00 सीजीपीए) असे ग्रेड देण्यात येतात.

 मात्र आता बी आणि ए ग्रेडअंतर्गत प्रत्येकी तीन श्रेणी समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
 नव्या पद्धतीनुसार डी आणि सी ग्रेड कायम राहणार आहेत. बी ग्रेडअंतर्गत ‘बी बी प्लस’ आणि ‘बी प्लस प्लस’, असे तीन ग्रेड राहतील.
 पूर्वी ज्या महाविद्यालय किंवा विद्यापीठांची एकत्रित श्रेणी बिंदू सरासरी (सीजीपीए) 3.01 पासून ते 4 पर्यंत होती.
 30 जूनपर्यंत ज्या संस्थांचे ‘नॅक’चे मूल्यांकन होणार आहे, त्या संस्थांना मात्र सध्या प्रचलित असलेली चार ग्रेडेशन पद्धत लागू राहणार असल्याचेही नॅकच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
  • पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदी किरण बेदी :

माजी आयपीएस अधिकारी आणि भाजपच्या नेत्या किरण बेदी यांची पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 मागील जवळपास दोन वर्षांपासून या राज्याचा अतिरिक्त भार अंदमान आणि निकोबारच्या नायब राज्यपालांकडे होता.
 किरण बेदी यांची पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आल्याचे राष्ट्रपती भवनातर्फे (दि.22) प्रसिद्ध करण्यात आले.
 तसेच या पदाची सूत्रे त्या स्वीकारल्याच्या दिवसापासून त्यांचा कार्यकाल सुरू होणार आहे.
 नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुद्दुचेरीमध्ये कॉंग्रेस आघाडीचा विजय झाला असून, त्या पार्श्‍वभूमीवर भाजप नेत्या असलेल्या बेदी यांची नायब राज्यपाल पदावर नियुक्ती होणे महत्त्वपूर्ण मानले जाते.
 तसेच यानंतर अंदमान आणि निकोबारचे नायब राज्यपाल ले. जन. अजयसिंह यांना पुद्दुचेरीची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली होती.
  • विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी सर्वानंद सोनोवाल :

आसाम विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी सर्वानंद सोनोवाल यांची (दि.22) एकमताने निवड झाली.
 निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर भाजपा आमदारांच्या पहिल्या बैठकीत आमदार हेमंत विश्वशर्मा यांनी सोनोवाल यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला.
 आमदार पी. फुकन, अतुल बोरा, अंगुरलता डेला, भाबेश कलिटा आणि ए.सी. जैन यांनी सोनोवाल यांच्या नावाला समर्थन दिले.
 केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत हे भाजपाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून उपस्थित होते. त्यांनीच सोनोवाल यांच्या निवडीची घोषणा केली.
  • प्रथमच स्वदेशी बनावटीच्या अवकाशयानाचे यशस्वी उड्डाण :

भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) प्रथमच तयार केलेले स्वदेशी बनावटीचे रियूझेबल लॉंच व्हेइकल (आरएलव्ही) या अवकाशयानाचे (दि.23) सकाळी श्रीहरीकोटा येथून यशस्वी उड्डाण झाले.
 उड्डाणासाठी वातावरण सोयीचे असल्याने आज सकाळी स्वदेशी अवकाशयानाचे उड्डाण घेण्यात आले.
 'आरएलव्ही टेक्‍नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर'चा उद्देश पृथ्वीभोवतीच्या कक्षेत उपग्रहांना प्रस्थापित करून पुन्हा पृथ्वीवर परत येणे हा आहे.
 तसेच हे उड्डाण घन इंधनाचा वापर केलेल्या रॉकेटच्या साह्याने केले जाणार आहे. या रॉकेटची लांबी नऊ मीटर असून वजन अकरा टन आहे, असे विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक के. सिवन यांनी सांगितले.
 या पंख असलेल्या अवकाशयानासाठी कोणत्याही प्रकारे विदेशी मदत घेतली गेली नसल्याने भारताच्या अवकाश क्षेत्रातील यशात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
 एखाद्या 'एसयूव्ही' मोटारइतका आकार आणि वजन असलेले 'आरएलव्ही-टीडी' अवकाशयान अंतिम उद्दिष्ट असलेल्या अवकाशयानाचे प्रारूप आहे.
  • कसोटी क्रिकेट मध्ये जेम्स अँडरसनचा नवा विक्रम :

पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेची दाणादाण उडवलेल्या जेम्स अँडरसन याने 5 बळी मिळविताना कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या नावावर नवा विक्रम नोंदविला.
 तसेच या शानदार कामगिरीसह अँडरसनने भारताचे माजी दिग्गज वेगवान गोलंदाज कपिल देव यांचा सर्वाधिक 434 बळींचा विक्रम मागे टाकून सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या क्रमवारीत सहावे स्थान पटकावले.
 लंकेविरुद्ध पहिल्या डावात 5 बळी घेताना अँडरसनने आपल्या बळींची संख्या 438 इतकी केली.
 सामन्यात कौशल सिल्वाला बाद करून अँडरसनने कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी केली, तर यानंतर अँजेलो मॅथ्यूजला बाद करून ही विक्रमी कामगिरी नोंदवली.
 अँडरसनने आतापर्यंत 114 कसोटी सामन्यांत 29.18च्या सरासरीने 438 बळी घेतले आहेत.
 कपिल देव यांनी 227 डावांमध्ये 434 बळी घेतले होते, तर अँडरसनने हीच कामगिरी 213 डावांमध्ये केली.
 तसेच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अव्वल स्थानी श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन असून, त्याने 133 कसोटी सामन्यात तब्बल 800 बळी घेतले आहेत.
 तर, भारताचा माजी दिग्गज लेगस्पिनर अनिल कुंबळे 619 बळींसह तिसऱ्या स्थानी आहे.
  • गोराई हे ठिकाण पर्यटन हब म्हणून जाहीर :

  * गोराई खाडीच्या पलीकडे असलेल्या *19.32* किलोमीटर क्षेत्रफळावर वसलेल्या *गोराई*
    आणि येथील *कुलवेम* व *मनोरी* या ठिकाणी मुख्यमंत्री*देवेंद्र फडणवीस* यांनी*पर्यटन
    हब म्हणून जाहीर* करून येथील विकास आराखड्याला मंजुरी दिली.
  * बोरीवली पश्चिमेच्या पलीकडे असलेल्या *गोराई, कुलवेम* आणि*मनोरी* ही सुमारे *20*
    हजार लोकसंख्या असलेली तीन गावे आणि ठाणे जिल्ह्यातील *मीरा-भाईंदर* पालिकेच्या
    हद्दीतील उत्तनसह इतर चार गावे ही स्वातंत्र्यानंतरही विकासापासून वंचित आहेत.
  * उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री *राम नाईक* यांच्या
    प्रयत्नाने *2000* साली या तीन गावांना सुमुद्राखालून जलवाहिनी टाकून पिण्याचे
    पाणी उपलब्ध करून देण्यात आले..
  • महेंद्रसिंग धोनीकडे युवा संघाचे नेतृत्व :

  * आगामी झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली
    असून झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या युवा खेळाडूंच्या संघाची धुरा *महेंद्रसिंह
    धोनी*कडे सोपविण्यात आली आहे.
  * तर वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भरवशाच्या *अजिंक्य रहाणे*कडे
    उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
  * सोमवारी*(दि.23)* मुंबईत दोन्ही दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या *भारतीय संघाची
    घोषणा* करण्यात आली.
  * विदर्भचा युवा फलंदाज फैझ फझलची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघात निवड झाली आहे, तर
    मुंबईकर शार्दुलला विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे.
  * जून महिन्यात *टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यात तीन एकदिवसीय* व*तीन टी-20*
    सामन्यांची मालिका खेळणार आहे..
  • सुशीला चानूकडे भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व :

  * ऑस्ट्रेलियातील *डार्विन* येथे*30* मेपासून सुरू होणाऱ्या चार देशांच्या हॉकी
    स्पर्धेसाठी डिफेंडर *सुशीला चानू* हिच्याकडे भारतीय महिला संघाची धुरा सोपविण्यात
    आली आहे.
  * *रिओ ऑलिम्पिकची पूर्वतयारी* म्हणून पाहण्यात येत असलेल्या या चौरंगी स्पर्धेत यजमान
    व जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलिया, चौथ्या क्रमांकाच्या
    न्यूझीलंड आणि दहाव्या क्रमांकावरील जपानचा सहभाग आहे.
  * तसेच या स्पर्धेसाठी संघाची नियमित कर्णधार रितूराणीला विश्रांती देण्यात आल्याने
    कर्णधारपदासाठी सुशीलाला संधी मिळाली.
  * त्याचवेळी दीपिकाकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
  * भारतीय संघात पूनम रानी आणि वंदना कटारिया या अनुभवी खेळाडूंचा समावेश असून
    डिफेंडर निक्की प्रधान आणि *18* वर्षीय मिडफिल्डर प्रीती दुबे यांसारख्या युवा
    खेळाडूंचाही संघात समावेश करण्यात आला आहे...
  • किनारपट्ट्यांच्या संरक्षणासाठी सर्वंकष धोरण :

  * मुंबईसह भारतच नव्हे; तर साऱ्या जगातच समुद्राची पाणीपातळी वाढत चालली आहे.
  * *‘सीआरझेड’* कायद्याद्वारे किनारपट्ट्यांवरील शहरांचे रक्षण करण्याबाबत मोदी
    सरकारने सर्वंकष धोरण आखले आहे.
  * सध्याच्या धोरणाचा वरचेवर फेरआढावा घेऊन आणखी व्यवहार्य व पारदर्शक बदल करण्याचे
    आम्ही ठरविले आहे, असे वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
  * पर्यावरण मंत्रालयाचे*‘ई नियतकालिक’* सुरू करण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याचेही
    त्यांनी नमूद केले.
  * देशातील*600* जंगले *इको सेन्सेटिव्ह झोन* म्हणून जाहीर केली आहेत.
  * गेल्या दोन वर्षांत जंगलक्षेत्र वाढून *21* टक्‍क्‍यांवर गेले आहे. ते *33* टक्‍क्‍यांवर
    नेण्याचे उद्दिष्ट आहे.
  * हवेचे प्रदूषण मोजणारी क्वालिटी इंडेक्‍स यंत्रणा *35* शहरांत बसविली आहे.
  * देशात प्रथमच केलेल्या बांधकाम राडारोडा नियामवलीसह सहा प्रकारच्या कचऱ्यांच्या
    विल्हेवाटीचे व फेरवापराबाबतचे नियम या वर्षअखेरपर्यंत अमलात येतील...
  • जयललितांची दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी निवड :

  * अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा*जे. जयललिता* यांनी सोमवारी एका वर्षाच्या आत दुसऱ्यांदा
    एकाच तारखेला तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ ग्रहण केली.
  * बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याच्या आरोपात कर्नाटक उच्च न्यायालयाने निर्दोष सुटका
    केल्यानंतर *जयललिता* यांनी एक वर्षाआधी *23 मे 2015* रोजी *पाचव्यांदा*
    राज्याच्या*मुख्यमंत्रिपदाची शपथ* घेतली होती.
  * *16* मे रोजी पारपडलेल्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर
    *68* वर्षीय *जयललिता* यांनी एक वर्षानंतर*(दि.23)* पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ
    ग्रहण केली.
  * अण्णाद्रमुकने विधानसभेच्या*134* जागा जिंकल्या आहेत.
  * *जयललिता* यांच्यासोबत त्यांच्या *28* मंत्र्यांनीही पद व गोपनीयतेची शपथ ग्रहण
    केली. राज्यपाल के. रोसय्या यांनी त्यांना शपथ दिली.
  * जयललितांनी आपल्या पूर्वीच्या मंत्रिमंडळातील *15* मंत्र्यांना या नव्या मंत्रिमंडळात
    स्थान दिले आहे तर *13* मंत्री नवे आहेत...
  • भारत, थायलंड, म्यानमार महामार्गाने जोडणार :

  * *भारत, थायलंड* आणि *म्यानमार* हे एकत्रितपणे *1400* किलोमीटरचा *महामार्ग*
    तयार करीत असून, त्यामुळे भारत आणि आग्नेय आशिया या रस्त्याने जोडले जाणार आहे.
  * तीनही देशांच्या व्यापार, सांस्कृती यांच्या आदानप्रदानाला चालना मिळणार आहे.
  * थायलंडमधील भारताचे राजदूत *भागवतसिंग बिश्‍नोई* यांनी सांगितले की,
    म्यानमारमधील सात पूल हे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बांधले गेले असून, या पुलांच्या
    पुनर्निमितीसाठी भारताने आर्थिक मदत केली आहे. त्यामुळे या महामार्गावरून वाहतूक
    सुरक्षितपणे होऊ शकेल.
  * आगामी दीड वर्षात या पुलाचे काम पूर्ण होईल त्यानंतर तीनही देशांसाठी हा महामार्ग
    खुला करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
  * तसेच या महामार्गाची सुरवात भारताच्या पूर्वेकडील मोरेह येथून सुरवात होऊन तो
    म्यानमारच्या तामू शहरापर्यंत असेल.
  * तीन देशांतील हा महामार्ग म्हणजे भारताच्या *‘ॲक्‍ट ईस्ट’* या धोरणाचा भाग आहे...
  • व्हेंचर सेंटर’ला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित :

  * राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील *‘व्हेंचर सेंटर’*ला नुकतेच सर्वोत्कृष्ट
    *‘टेक्‍नॉलॉजी बिझनेस इनक्‍युबेशन’*साठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  * तसेच या सेंटरमध्ये काम करणाऱ्यांमध्ये *80* टक्के महिला आहेत, तर व्हेंचर सेंटरच्या
    मदतीने स्थापन झालेल्या *‘स्टार्ट-अप्स’*च्या संस्थापक नवउद्योजकांपैकी *30* टक्के
    महिला आहेत.
  * सायन्स *‘स्टार्ट अप्स’* आणि व्हेंचर सेंटरमध्ये काय चालते याविषयी सेंटरच्या
    महाव्यवस्थापक *डॉ. मनीषा प्रेमनाथ* यांनी माहिती दिली.
  * *स्टार्ट अप* म्हणजे*आयटी* किंवा*ई-कॉमर्सशी* संबंधित काहीतरी अशी ओळख निर्माण
    झाली आहे.
  * झटपट प्रॉडक्‍ट लाँच आणि दोन ते तीन वर्षांत कोट्यवधींची उलाढाल ही आयटी स्टार्ट
    अप्सची बाजू, तर बाजाराच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहून अपार कष्ट घेत नावीन्यपूर्ण
    तंत्रज्ञान विकसित करणे, ही सायन्स स्टार्ट अप्सची बाजू.
  * *व्हेंचर सेंटर स्थापना व उद्देश*
  * पुण्याच्या पाषाण भागात असलेल्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या *(एनसीएल)*
    इनोव्हेशन पार्कच्या जागेमध्ये*‘व्हेंचर सेंटर’* हे टेक्‍नॉलॉजी बिझनेस इनक्‍युबेटर आहे.
  * *‘नॉट फॉर प्रॉफिट’* तत्त्वावर *2008* मध्ये हे सेंटर सुरू झाले. *एनसीएल* ही
    त्याची पालक संस्था आहे.
  * संशोधन कल्पनांचे रूपांतर तंत्रज्ञानाधारित स्टार्ट अप्समध्ये करून विज्ञानाच्या
    क्षेत्रातील नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्याचा सेंटरचा उद्देश आहे.
  * तसेच त्यातही काळाच्या पुढचे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी *व्हेंचर सेंटर*
    प्रयत्नशील आहे...


  • मॅनबुकर पुरस्कार - 2016
————————————————————
✏द. कोरियाच्या लेखिका हान कांग यांना यंदाचा आंतरराष्ट्रीय मॅन बुकर पुरस्कार मिळाला आहे.
✏कांग यांच्या ' द व्हेजिटेरियन ' या कादंबरीला हा पुरस्कार मिळाला.
✏कांग यांनी नोबेल विजेते अॉरहान पामुक व एलेना फेरॉंटे यांना पिछाडीवर टाकत ५० हजार पौंडाचा हा पुरस्कार पटकावला.
✏कांग यांची इंग्रजीत अनुवादीत झालेली ही पहिली कादंबरी आहे. भाषांतरकार देबोरो स्मिथ
✏कांग 'सोल इन्स्टीट्युट अॉफ द आर्ट्स  या संस्थेत सर्जनशील विषय शिकवतात.
————————————————————
कांग यांना मिळालेले इतर पुरस्कार:
1) यी यांग साहित्य पुरस्कार
2) टुडेज यंग आर्टीस्ट पुरस्कार
3) कोरियन साहित्य पुरस्कार
————————————————————


द व्हेजिटेरियन विषयी:
✏तीन भागात आहे.
✏येअॉंग हाय या कर्तव्यदक्ष कोरियन महिलेची कथा आहे.
प्रकल्प अहवाल निविदेला मंजुरी :
शहरातील वाहतुकीची कोंडी कमी व्हावी यासाठी तब्बल 18 वर्षांपूर्वी प्रस्तावित केलेल्या उच्च क्षमता द्रुतगती मार्गाचा (एचसीएमटीआर) प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठीच्या 90 लाख रुपये खर्चाच्या कामाला स्थायी समितीने (दि.17) बैठकीत मंजुरी दिली.
मुंबईस्थित स्तुप कन्सल्टंट या कंपनीला हे काम देण्यात आले आहे.
तसेच येत्या 4 महिन्यांत त्यांनी ते पूर्ण करायचे असून, त्यानंतर अनेक वर्षे रेंगाळलेल्या या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला गती मिळणार आहे.
एकूण 35 किलोमीटर अंतराचा हा मार्ग महापालिकेच्या 17 पेठांमधून जातो.
बोपोडी, औंध, भांबुर्डा, एरंडवणा, कोथरूड, हिंगणे, सदाशिव पेठ, पर्वती, वानवडी, हडपसर, मुंढवा, वडगाव शेरी, लोहगाव, येरवडा, धानोरी व कळस असा हा भाग आहे.
तसेच या रस्त्याच्या कामाला गती मिळावी यासाठी बागुल यांच्या प्रयत्नांमधून महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी त्यासाठी महापालिकेत स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे.
  • #जागतिक प्रदूषित शहर अहवाल [WHO] २०१६

* जागतिक आरोग्य संघटना [ WHO ] यांच्या २०१४ च्या अभ्यासानुसार जगातील पहिल्या २० प्रदूषित शहरांपैकी १० शहरे हि भारतातील आहेत.
* WHO - यांच्या वेगवेगळ्या परिमाणानुसार जगातील प्रदूषित शहराची यादी प्रसिद्ध करण्यात आली.
* या अहवालानुसार पहिल्या क्रमांकाने शहरांची यादी खालील प्रमाणेआहे.
       देश शहर
१] इराण झाबोल
२] भारत ग्वाल्हेर
३] सौदी अरेबिया रियाध
४] सौदी अरेबिया अल जुबील
५] भारत पटना
६] भारत रायपुर
७] कॅमेरून बेमेंडा
८] चीन शिंगताई
९] चीन बौडींग
१०] भारत दिल्ली
११] भारत लुधियाना
१२] सौदी अरेबिया दमन
१३] चीन शिजाउन
१४] भारत कानपूर
१५] भारत खाणा
१६] भारत फिरोजाबाद
१७] भारत लखनौ
१८] चीन हडण
१९] पाकिस्तान पेशावर
  • आवर्तसारणीत 4 नवीन मूलद्रव्‍यांचा समावेश

     आवर्तसारणीत (Periodic Table) चार नवीन मूलद्रव्‍यांचा समावेश करण्‍यात आला आहे. ही नव्‍याने समावेश करण्‍यात आलेली चारही मूलद्रव्‍ये कृ्त्रिम असून, आवर्तसारणीतील सातव्‍या ओळीत त्‍यांना स्‍थान देण्‍यात आले आहे. याद्वारे सारणीतील सातवी ओळ पूर्ण झाली आहे. यापूर्वी 2011 या वर्षी 114 आणि 116व्‍या क्रमाकांचे मूलद्रव्‍य नव्‍याने समाविष्‍ट करण्‍यात आले होते.
जपान, रशिया आणि अमेरिकेच्‍या शास्‍त्रज्ञांनी या मूलद्रव्‍यांचा शोध लावला. आंतरराष्‍ट्रीय मूळ आणि उपयोजित रसायनशास्‍त्र संघटना (International Union of Pure and applied Chemistry - IUPAC) या संस्‍थेने 30 डिसेंबर 2015 रोजीच चारही मूलद्रव्‍यांची पडताळणी केली होती. सध्‍या या मूलद्रव्‍यांना त्‍यांच्‍या आवर्तसारणीतील क्रमांकानुसारच नावे देण्‍यात आली असून, त्‍यांचे येत्‍या काही दिवसांत नामकरण करण्‍यात येईल.
नव्‍याने शोधण्‍यात आलेल्‍या मूलद्रव्‍यांचे क्रमांक व सध्‍याची नावे पुढीलप्रमाणे:
1)    113 : युननट्रायम
2)    115 : युननपेंटियम
3)    117 : युननसेप्टियम
4)    118 : युननऑक्टियम
ही चारही मूलद्रव्‍ये नैसर्गिक स्थितीत अस्थिर असून, काही क्षणांतच त्‍यांचा र्‍हास होऊन त्‍यांचे इतर हलक्‍या मूलद्रव्‍यांमध्‍ये रूपांतर होते.
आवर्तसारणी :-
·        आवर्तसारणी ही जगातील मूलद्रव्‍यांची (नैसर्गिक आणि कृत्रिम दोन्‍ही) त्‍यांच्‍या अणुक्रमांकानुसार केलेली मांडणी आहे.
·        1869 मध्‍ये दिमित्री मँडेलिव (Dmitri Mendeleev) या शास्‍त्रज्ञाने सर्वप्रथम आवर्तसारणी तयार केली.
·        मूलद्रव्‍याच्‍या आवर्तसारणीतील स्‍थानावरून त्‍यांचे रासायनिक गुणधर्म, इलेक्‍ट्रॉन संरचना यांविषयीही माहिती मिळू शकते.
·        s, p, d आणि f अशा चार गटांत मूलद्रव्‍यांची विभागणी केलेली असून, सर्वसाधारणपणे प्रत्‍येक आडव्या ओळीतील डावीकडील मूलद्रव्‍ये ध

  1. १)   --------- योजनेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणी  मध्य प्रदेश चे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ३० एप्रिल २०१६ रोजी केले: उजाला
  2. २)  उत्तर प्रदेशमधील ------------ या] ठिकाणी  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने १ मे २०१६ रोजी  उज्ज्वला या योजनेचा शुभारंभ केला: बलिया
  3. ३) मे २०१६ मध्ये -------------- हे राज्य जंगलात आग लागल्याने चर्चित आले :-उत्तराखंड
  4. ४) --------- या देशाशी   हेलीकॉप्टार कंपनी ऑगस्टार वेस्टमलैंड संबंधित आहे : इटली
  5. ५) भारतीय नौसेने च्या -------------- या पाणबुडीचे 1 मे  2016 रोजी समुद्रात परीक्षण केले कलवरी
  6. ६) महाराष्ट्रातील पहिले आधेकृत इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचे केंद्र----------------- येथे सुरु झाले? :-अंधेरी
  7. ७) क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी -------------ची शिफारस करण्यात आली आहे :- विराट कोहली
  8. ८) एस अगेन्स्ट ऑडस " हे आत्मचरित्र ------------------- या खेळाडूचे आहे :-सानिया मिर्झा
  9. ९) 2015-16 याआर्थिक वर्षात रोजगारनिर्मितीत महाराष्ट्राचा क्रमांक --------------- वा लागतो :-दुसरा
  10. १०) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठच्या वतीने दिल्या जाणारया कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कारासाठी --------------- यांची निवड करण्यात आली  :-डॉ विष्णू खरे
  11. ११) भारतीय ऑलिंपिक संघटनेने (आयओए) रिओ ऑलिंपिक स्पर्धेसाठी ------------- यांची सदिच्छा दूत (गुडविल ऍम्बेसिडर) म्हणून निवड केली आहे. :- सलमान खान सचिन तेंडुलकर अभिनव बिंद्रा
  12. १२) . भारत हा वर्षांला साधारणत: १,००० टन सोने आयात करणारा चीननंतरचा जगातील ---------- वा देश आहे.:- दुसरा
  13. १३) "टाइम्स‘ या संस्थेने जगातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या विद्यापीठांची या वर्षासाठीची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत ---------- विद्यापीठाने प्रथम क्रमांक पटकाविला :-हार्वर्ड
  14. १४) पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावरील दहशतवादी हल्ल्याबद्दल चौकशी करण्यासाठी--------- यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय समितीची स्थापना केली :-पी. भट्टाचार्य
  15. १५)--------------   हे  राज्य देशातील पहिले हागणदारीमुक्त राज्य ठरणार आहे. :- आंध्र प्रदेश

  • प्रकल्प अहवाल निविदेला मंजुरी :

शहरातील वाहतुकीची कोंडी कमी व्हावी यासाठी तब्बल 18 वर्षांपूर्वी प्रस्तावित केलेल्या उच्च क्षमता द्रुतगती मार्गाचा (एचसीएमटीआर) प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठीच्या 90 लाख रुपये खर्चाच्या कामाला स्थायी समितीने (दि.17) बैठकीत मंजुरी दिली.
 मुंबईस्थित स्तुप कन्सल्टंट या कंपनीला हे काम देण्यात आले आहे.
 तसेच येत्या 4 महिन्यांत त्यांनी ते पूर्ण करायचे असून, त्यानंतर अनेक वर्षे रेंगाळलेल्या या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला गती मिळणार आहे.
 एकूण 35 किलोमीटर अंतराचा हा मार्ग महापालिकेच्या 17 पेठांमधून जातो. बोपोडी, औंध, भांबुर्डा, एरंडवणा, कोथरूड, हिंगणे, सदाशिव पेठ, पर्वती, वानवडी, हडपसर, मुंढवा, वडगाव शेरी, लोहगाव, येरवडा, धानोरी व कळस असा हा भाग आहे.
 तसेच या रस्त्याच्या कामाला गती मिळावी यासाठी बागुल यांच्या प्रयत्नांमधून महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी त्यासाठी महापालिकेत स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे.
  • भारताकडे 1964 मध्ये होती अण्वस्त्र क्षमता :

आण्विक शस्त्र बनविण्याची भारताची क्षमता असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या आता प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात म्हटल्याचे स्पष्ट झाले असून हा अहवाल 1964 मधील आहे.
 ट्रॉम्बे येथील कॅनडाने पुरविलेल्या आण्विक भट्टीमधील इंधनामध्ये त्या काळत सातत्याने करण्यात येत बदलाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेकडून अशा स्वरुपाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
 भारताने ठरविल्यास आता ते अण्वस्त्रनिर्मिती करु शकतात.
 अर्थात अण्वस्त्र कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशार्थ भारताकडून संशोधन केले जात असल्याचा कोणताही थेट पुरावा नाही, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारीखाली येणाऱ्या संशोधन व गुप्तचर विभागाने 14 मे, 1964 रोजी सादर केलेल्या अहवालामध्ये म्हटले होते.
 तसेच या अहवालासहितच इतरही काही कागदपत्रे अमेरिकेकडून नुकतीच प्रसिद्ध (डीक्‍लासीफाय) करण्यात आली.
 ट्रॉम्बेमधील आणिक इंधन दर सहा महिन्यानंतर बदलले जात असल्याची दखल घेत या अहवालामधून भारताच्या आण्विक महत्त्वाकांक्षेसंदर्भात प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.
 'सामान्य परिस्थिती'मध्ये आण्विक भट्यांमधील इंधन बदलण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी हा खूपची कमी असल्याचा इशारा या अहवालामधून देण्यात आला होता.
  • भारतीय शांतिरक्षकांना संयुक्त राष्ट्र पदक :

संयुक्त राष्ट्राच्या शांतिरक्षण अभियानात काम करताना मृत्युमुखी पडलेले चार भारतीय शांतिरक्षक व एका नागरिकासह अन्य 124 जणांना त्यांच्या साहस आणि बलिदानासाठी मरणोत्तर संयुक्त राष्ट्र पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.
 आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतिरक्षक दिवसाच्या निमित्ताने या नागरिकांना डॅग हॅमरस्कजोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
 भारतीय शांतिरक्षकात हेड कॉन्स्टेबल शुभकरण यादव, रायफलमॅन मनीष मलिक, अमल डेका, नायक राकेश कुमार यांचा सहभाग आहे. यांच्यासोबत गगन पंजाबी हेही मारले गेले होते.
 संयुक्त राष्ट्र शांतिरक्षक दिवस दरवर्षी 29 मे रोजी साजरा केला जातो; मात्र यावर्षी तो 19 मे रोजी साजरा होईल.
 संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून सर्व शहीद शांतिरक्षकांना पुष्पचक्र अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करतील.
  • डॉ. शहांचा रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग यशस्वी :

दुष्काळामुळे संपूर्ण महाराष्ट्र होरपळत आहे. पावसाळ्यातील पावसाचे बहुतांश पाणी नियोजनाअभावी वाहून जाते.
 पावसाळा येण्यापूर्वीच योग्य नियोजन केले तर पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार नाही.
 तसेच येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पावसाळ्यातील पावसाच्या पाण्याच्या वापरासाठी व पुनर्भरण करण्यासाठी येथील डॉ. हर्षद शहा यांनी स्वतःच्या नवजीवन हॉस्पिटलसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग व बोअर पुनर्भरण यंत्रणा सज्ज केली आहे.
 त्यामुळे कमी खर्चात पावसाळ्यात गाळलेले स्वच्छ पाणी मिळणार असून जमिनीतील पाणीपातळीही वाढणार आहे.
 डॉ. शहा यांनी स्वतःच्या हॉस्पिटलच्या छतावरील पाणी पाइपद्वारे खाली घेतले.
 पावसाळ्यात वापर नसेल त्या वेळी हे पाणी बोअरच्या ठिकाणी पुनर्भरण करण्यासाठी सोडले आहे.
 त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास निश्‍चितच मदत होणार आहे.
  • सातारा जिल्हात होणार 'वॉटर बॅंक' :

जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे योजनेतून जिल्ह्यात 824 शेततळी होत आहेत.
 तसेच या शेततळ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात 1648 टीसीएम पाणीसाठा होणार आहे.
 या 'वॉटर बॅंके'च्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी बागायतीसह बारमाही शेती करू शकणार आहेत. याबरोबरच दुष्काळी तालुक्‍यांचाही पाणी प्रश्‍न सहज मिटणार आहे.
 शेततळ्यांच्या माध्यमातून वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविणे हा एक उद्देश असून, या अडविलेल्या पाण्याचा उपयोग करून शेतकरी बागायती, तसेच कोरडवाहू शेतीत दोन वेळची पिके सहज घेऊ शकतो, तसेच शेततळ्यांच्या माध्यमातून काही प्रमाणात पाणी जमिनीत मुरून त्यातून पाणीपातळीतही वाढ होण्यास मदत होणार आहे, तसेच या पाण्यात मत्स्यपालन, कोळंबी पालन करू शकतो.
 तसेच त्यातून शेतीपूरक उत्पादनही घेऊ शकतो; पण सध्यातरी पावसाचे पाणी साठविण्यासाठी शेततळ्यांसारखे दुसरे माध्यम शेतकऱ्यांकडे नाही.
 जलयुक्त शिवार अभियानात जिल्ह्यात 560 शेततळी घेण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी आतापर्यंत 120 शेततळी पूर्ण झाली आहेत.
पोलीस काॅन्स्टेबल रफिक शेख याने एव्हरेस्ट शिखर सर केले. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच पोलिस काॅन्स्टेबल आहे.
 जपान तर्फे देण्यात येणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार "The Order of Rising Sun, Gold and Silver Star" ('ऑर्डर ऑफ द रायझिंग सन, गोल्ड अॅण्ड सिल्व्हर स्टार') चे या वर्षीचे परराष्ट्रीय प्राप्तकर्ता म्हणून श्री नंद किशोर सिंह यांची निवड करण्यात आली आहे.
  1. १) केंद्रीय शालेय शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) नीट या परीक्षांचेया वर्षीपासून आयोजन होत असून, ती फक्त इंग्रजी आणि हिंदी या भाषांमध्येच देणे बंधनकारक आहे. -------------यांच्या अध्यक्षतेखालीलत्रिसदस्यीय समिती या प्रवेश परीक्षांच्या आयोजनावर नियंत्रण ठेवणार आहे. :- आर. एम. लोढा
  2. २) महाराष्ट्रातील पहिले आधेकृत इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचेकेंद्र----------------- येथे सुरु झाले? :-अंधेरी
  3. ३) क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी -------------चीशिफारस करण्यात आली आहे.:-विराट कोहली
  4. ४) ------------- याने २०१६ या वर्षातील जागतिक स्नूकर चैंपियनशिप स्पर्धा जिंकली- मार्क सेल्बी
  5. ५) आईसीसी च्या टेस्ट रैंकिंग मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे :- दुसऱ्या
  6. ६) ---------------यांची राष्ट्रीय सांख्यिकी आयोग च्या अध्यक्षपदी निवड झाली :-डॉ. राधा बिनोद बर्मन
  7. ७) ----------- आयोगाच्या शिफारिशी नुसार १जून २००५ रोजी भारत सरकारने राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचीस्थापना केली :-सी रंगराजन
  8. ८) मराठवाडय़ातील दुष्काळाची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी ---------- व ------या दोन नद्या जोडण्यात येणार आहे :- भीमा व मांजरा
  9. ९) सध्याचे नौदलप्रमुख ऍडमिरल आर के धोवन हे येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. यानंतर --------- हे भारताचे नौदलप्रमुख होणार आहेत :-सुनील लांबा
  10. १०) भारतातील कोणत्या राज्याने चंद्रण्णा, विमा योजना " सुरु केली आहे :-आंध्र प्रदेश
  11. ११) आत्ताच प्रकाशित झालेली “The Slashed Canvas ही कांदबरी कोणी लिहलेली आहे ? :-देव संजय दत्ता

  • प्रकल्प अहवाल निविदेला मंजुरी :

शहरातील वाहतुकीची कोंडी कमी व्हावी यासाठी तब्बल 18 वर्षांपूर्वी प्रस्तावित केलेल्या उच्च क्षमता द्रुतगती मार्गाचा (एचसीएमटीआर) प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठीच्या 90 लाख रुपये खर्चाच्या कामाला स्थायी समितीने (दि.17) बैठकीत मंजुरी दिली.
 मुंबईस्थित स्तुप कन्सल्टंट या कंपनीला हे काम देण्यात आले आहे.
 तसेच येत्या 4 महिन्यांत त्यांनी ते पूर्ण करायचे असून, त्यानंतर अनेक वर्षे रेंगाळलेल्या या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला गती मिळणार आहे.
 एकूण 35 किलोमीटर अंतराचा हा मार्ग महापालिकेच्या 17 पेठांमधून जातो. बोपोडी, औंध, भांबुर्डा, एरंडवणा, कोथरूड, हिंगणे, सदाशिव पेठ, पर्वती, वानवडी, हडपसर, मुंढवा, वडगाव शेरी, लोहगाव, येरवडा, धानोरी व कळस असा हा भाग आहे.
 तसेच या रस्त्याच्या कामाला गती मिळावी यासाठी बागुल यांच्या प्रयत्नांमधून महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी त्यासाठी महापालिकेत स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे.
  • भारताकडे 1964 मध्ये होती अण्वस्त्र क्षमता :

आण्विक शस्त्र बनविण्याची भारताची क्षमता असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या आता प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात म्हटल्याचे स्पष्ट झाले असून हा अहवाल 1964 मधील आहे.
 ट्रॉम्बे येथील कॅनडाने पुरविलेल्या आण्विक भट्टीमधील इंधनामध्ये त्या काळत सातत्याने करण्यात येत बदलाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेकडून अशा स्वरुपाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
 भारताने ठरविल्यास आता ते अण्वस्त्रनिर्मिती करु शकतात.
 अर्थात अण्वस्त्र कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशार्थ भारताकडून संशोधन केले जात असल्याचा कोणताही थेट पुरावा नाही, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारीखाली येणाऱ्या संशोधन व गुप्तचर विभागाने 14 मे, 1964 रोजी सादर केलेल्या अहवालामध्ये म्हटले होते.
 तसेच या अहवालासहितच इतरही काही कागदपत्रे अमेरिकेकडून नुकतीच प्रसिद्ध (डीक्‍लासीफाय) करण्यात आली.
 ट्रॉम्बेमधील आणिक इंधन दर सहा महिन्यानंतर बदलले जात असल्याची दखल घेत या अहवालामधून भारताच्या आण्विक महत्त्वाकांक्षेसंदर्भात प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.
 'सामान्य परिस्थिती'मध्ये आण्विक भट्यांमधील इंधन बदलण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी हा खूपची कमी असल्याचा इशारा या अहवालामधून देण्यात आला होता.
  • भारतीय शांतिरक्षकांना संयुक्त राष्ट्र पदक :

संयुक्त राष्ट्राच्या शांतिरक्षण अभियानात काम करताना मृत्युमुखी पडलेले चार भारतीय शांतिरक्षक व एका नागरिकासह अन्य 124 जणांना त्यांच्या साहस आणि बलिदानासाठी मरणोत्तर संयुक्त राष्ट्र पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.
 आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतिरक्षक दिवसाच्या निमित्ताने या नागरिकांना डॅग हॅमरस्कजोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
 भारतीय शांतिरक्षकात हेड कॉन्स्टेबल शुभकरण यादव, रायफलमॅन मनीष मलिक, अमल डेका, नायक राकेश कुमार यांचा सहभाग आहे. यांच्यासोबत गगन पंजाबी हेही मारले गेले होते.
 संयुक्त राष्ट्र शांतिरक्षक दिवस दरवर्षी 29 मे रोजी साजरा केला जातो; मात्र यावर्षी तो 19 मे रोजी साजरा होईल.
 संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून सर्व शहीद शांतिरक्षकांना पुष्पचक्र अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करतील.
  • डॉ. शहांचा रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग यशस्वी :

दुष्काळामुळे संपूर्ण महाराष्ट्र होरपळत आहे. पावसाळ्यातील पावसाचे बहुतांश पाणी नियोजनाअभावी वाहून जाते.
 पावसाळा येण्यापूर्वीच योग्य नियोजन केले तर पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार नाही.
 तसेच येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पावसाळ्यातील पावसाच्या पाण्याच्या वापरासाठी व पुनर्भरण करण्यासाठी येथील डॉ. हर्षद शहा यांनी स्वतःच्या नवजीवन हॉस्पिटलसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग व बोअर पुनर्भरण यंत्रणा सज्ज केली आहे.
 त्यामुळे कमी खर्चात पावसाळ्यात गाळलेले स्वच्छ पाणी मिळणार असून जमिनीतील पाणीपातळीही वाढणार आहे.
 डॉ. शहा यांनी स्वतःच्या हॉस्पिटलच्या छतावरील पाणी पाइपद्वारे खाली घेतले.
 पावसाळ्यात वापर नसेल त्या वेळी हे पाणी बोअरच्या ठिकाणी पुनर्भरण करण्यासाठी सोडले आहे.
 त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास निश्‍चितच मदत होणार आहे.
  • सातारा जिल्हात होणार 'वॉटर बॅंक' :

जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे योजनेतून जिल्ह्यात 824 शेततळी होत आहेत.
 तसेच या शेततळ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात 1648 टीसीएम पाणीसाठा होणार आहे.
 या 'वॉटर बॅंके'च्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी बागायतीसह बारमाही शेती करू शकणार आहेत. याबरोबरच दुष्काळी तालुक्‍यांचाही पाणी प्रश्‍न सहज मिटणार आहे.
 शेततळ्यांच्या माध्यमातून वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविणे हा एक उद्देश असून, या अडविलेल्या पाण्याचा उपयोग करून शेतकरी बागायती, तसेच कोरडवाहू शेतीत दोन वेळची पिके सहज घेऊ शकतो, तसेच शेततळ्यांच्या माध्यमातून काही प्रमाणात पाणी जमिनीत मुरून त्यातून पाणीपातळीतही वाढ होण्यास मदत होणार आहे, तसेच या पाण्यात मत्स्यपालन, कोळंबी पालन करू शकतो.
 तसेच त्यातून शेतीपूरक उत्पादनही घेऊ शकतो; पण सध्यातरी पावसाचे पाणी साठविण्यासाठी शेततळ्यांसारखे दुसरे माध्यम शेतकऱ्यांकडे नाही.
 जलयुक्त शिवार अभियानात जिल्ह्यात 560 शेततळी घेण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी आतापर्यंत 120 शेततळी पूर्ण झाली आहेत.
  • भारतीय तरुणाकडे 'नासा'च्या मोहिमेचे नेतृत्त्व :

आपल्या सौरमालेबाहेरील ग्रहांचा शोध घेण्यासाठी नासा राबवित असलेल्या प्रकल्पातील एका मोहिमेच्या नेतृत्त्वासाठी मूळ अहमदाबादमधील भारतीय वंशाच्या सुव्रत महादेवन या तरुणाची निवड झाली आहे.
 गेल्या दोन दशकात आपल्या सौरमालेबाहेरील तीन हजार ग्रहांचा शोध लागला आहे. पण त्यापैकी एकाही ग्रहावर जीवसृष्टी आढळलेली नाही.
 अद्यापही ज्ञात आणि अज्ञात सौरमालेतील अनेक ग्रहांचा शोध घेणे बाकी आहे.
 सुव्रत हे सध्या पेनसिल्वानिया स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून काम करत आहे.
 नव्या ग्रहांचा शोध लावण्यासाठी आवश्‍यक असलेल्या 'एनईआयडी' या उपकरणाची निर्मिती करण्यासाठी सुव्रत यांच्या नेतृत्त्वाखालील समूहाची नासाने नासाने निवड केली आहे.
 सध्या भारत दौऱ्यावर असलेल्या सुव्रतने एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना याबाबत माहिती दिली.
  • राष्ट्रीय संरक्षण प्राधिकरण विधेयक मंजूर :

व्हाइट हाउसचा आक्षेप धुडकावून रिपब्लिकन पक्षाचे बहुमत असलेल्या अमेरिकी प्रतिनिधी सभेने पाकिस्तानविरोधी ‘राष्ट्रीय संरक्षण प्राधिकरण विधेयक’ (एनडीएए) संमत केले.
 हक्कानी नेटवर्कविरुद्ध कारवाई करण्यात अपयश आल्यास पाकला मिळणारी 45 कोटी डॉलरची मदत रोखण्याची तरतूद या विधेयकात आहे.
 अमेरिकी प्रतिनिधी सभेने (दि.18) 147 विरुद्ध 277 मतांनी ‘एनडीएए’-2017 (एचआर 4909) पारित केले. त्यात तीन प्रमुख दुरुस्त्याही सामील करण्यात आल्या आहेत.
 प्रतिनिधी सभेत मंजूर झालेल्या विधेयकानुसार मदत म्हणून पाकिस्तानला 45 कोटी डॉलरची रक्कम जारी करण्यापूर्वी पाकिस्तानने अटींचे पालन केल्याचे प्रमाणपत्र ओबामा प्र्रशासनाने द्यावे लागेल.
 पाकिस्तानने हक्कानी नेटवर्कच्या वरिष्ठ नेत्यांवर आणि मध्यम स्तरावरील टोळ्यांना पकडून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात प्रगती दाखविली आहे.
 खासदार डाना रोहराबाथर यांच्या दुरुस्तीत आणखी एक अतिरिक्त आवश्यक तरतूद करण्यात आली आहे.
  • महाराष्ट्रात पशुसंवर्धन दिन साजरा :

दरवर्षी 20 मे हा महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन खाते स्थापना दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
 तसेच त्यानुसार, पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती, मुरबाड यांच्या वतीने पशुधन विकास अधिकारी डॉ. सुरेश भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली तो साजरा करण्यात आला.
 या वेळी सहायक विस्तार अधिकारी डॉ. दिलीप धानके यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, मानवी जीवनाच्या दैनंदिन व्यवहारात रोज जे दूध, अंडी, चिकन, मटण, उपलब्ध होते, त्याचा निर्माता जरी शेतकरी असला तरी पशुवैद्यकांचे आणि राज्य शासकीय पशुसंवर्धन विभागाचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे.
 या खात्याचे अधिकारी, कर्मचारी पशुपालक शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पशुवैद्यकीय सेवा देतात.
 तसेच शासकीय योजनांचा प्रचार-प्रसारही या खात्याच्या वतीने केला जातो.
 या पशुसंवर्धन दिनाचे औचित्य साधून मुरबाड तालुक्याच्या पशुवैद्यकीय संस्थेमधील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना एक गुलाबपुष्प देऊन त्यांच्या शासकीय सेवेचा सन्मान करण्यात आला.
  • अमेरिकेकडून भारतीय, पाकिस्तानी शास्त्रज्ञांचा गौरव :

विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनात योगदान देणाऱ्या अमेरिकी-भारतीय आणि अमेरिकी पाकिस्तानी शास्त्रज्ञांचा (दि.20) अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
 व्हाइट हाउस येथे झालेल्या सोहळ्यात अध्यक्ष बराक ओबामा यांनी शास्त्रज्ञांच्या कार्याचे आणि संशोधनाचे कौतुक केले.
 हॉवर्ड मेडिकल स्कूल आणि मॅंचेच्युसेट्‌स जनरल हॉस्पिटल येथे कार्यरत असणारे राकेश के जैन यांना कर्करोग निदान, प्रतिबंध आणि उपचारातील संशोधनाबाबत नॅशनल मेडिकल ऑफ सायन्स या पुरस्काराने गौरविले.
 पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान डॉ. महंमद अली जिना यांची वैयक्तिक देखभाल करणाऱ्या डॉक्‍टरांचे नातू हुमायू (वय 53) यांनाही नॅशनल मेडल ऑफ टेक्‍नॉलॉजी अँड इनोव्हेशन पुरस्काराने गौरविले.
 हुमायूंचे कुटुंबीय मूळचे जालंधरचे. फाळणीनंतर ते पाकिस्तानात आणि कालांतराने 1972 मध्ये अमेरिकेत स्थलांतरित झाले.
  • विजयन केरळचे नवे मुख्यमंत्री :

माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य व धर्मदमचे आमदार पिनरयी विजयन केरळचे नवे मुख्यमंत्री असतील.
 माकपच्या वरिष्ठ नेत्यांची (दि.21) सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये विजयन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
 विशेष म्हणजे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले 93 वर्षीय व्ही. एस. अच्युतानंदन यांना पक्ष सचिवालयात बोलावून निर्णयाची कल्पना देण्यात आली.
 कन्नूर जिल्ह्य़ातील धर्मदम मतदारसंघातून 36 हजार 905 मतांनी ते विजयी झाले आहेत. माकपचे ते चौथे मुख्यमंत्री असतील.
 72 वर्षीय विजय कुशल संघटक मानले जातात. गरीब कुटुंबातून आलेले विजयन राजकीयदृष्टय़ा प्रभावी थिय्या समाजातून आले आहेत.
 केरळमधील पक्षसंघटनेवर त्यांचा प्रभाव आहे.
 1996 ते 98 या काळात ऊर्जामंत्रिपद सांभाळताना त्यांनी ठसा उमटवला होता.
  • एनटीपीसी पश्चिम विभागाला ‘पीआर पुरस्कार’ :

राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाच्या पश्चिम विभागीय-1 मुख्यालयाला राष्ट्रीय पातळीवर जनसंपर्क विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सलग तिसऱ्यांदा ‘पीआर एमओयू एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड’ मिळाला आहे.
 कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सच्या सामंजस्य करारातील उद्दिष्ट्ये वेळेत पूर्ण केल्याबाबत हा पुरस्कार दिला जातो.
 तर विभागाच्या सोलापूर प्रकल्पाला हाउस जर्नल पुरस्काराच्या कंपनी पातळीवरील दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
 नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक गुरदीप सिंग यांच्या हस्ते पश्चिम विभाग मुख्यालयाचे अतिरिक्त महाव्यवस्थापक (जनसंपर्क) के. रवींद्रन, उपव्यवस्थापक (जनसंपर्क) क्रिती दत्ता यांनी पुरस्कार स्वीकारला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा