Post views: counter

Current Affairs Aug 2016 Part - 4


महत्वाचे:-
* केरळ राज्याने देशातील प्रथमच फॅट टॅक्स लागू केलाआहे.बर्गर , पिझा. सारख्या खाद्य पदार्थावर १४.५%  फॅट टॅक्स

* सुशीला कार्की नेपाळ ची पहिली महिला मुख्य न्यायाधीश

* राधिका मेनन पुरस्कार IMO (International Meritime Organisation) जिंकणारी जगातील पहिली  महिला

* केंद्र सरकानेबिहारच्यामोतीहारी(पूर्वचम्पारण) येथे कृषी व डेअरी विकास केंद्राची स्थापना

* नीती आयोगाने पंतप्रधान कार्यालयाला एक२० पाणी दस्तऐवज सादर केला आहे ज्यानुसार रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा समाप्त करावी अशी शिफारस करण्यात आली

* जीएसटी विधेयक एकमताने मंजूर करणारे आसाम  हे देशातील पहिले राज्य ठरले

* जागतिक आर्थिक मंच च्या २०१६ या वर्षातील वार्षिक बैठकीची  चौथी औद्योगिक क्रांती  ही थीम होती

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹प्रतिष्ठित औषध कंपन्यामध्ये भारत आघाडीवर

ब्लूबाइट्स या संस्थेने टीआरए रिसर्च या संस्थेबरोबर केलेल्या सर्वेक्षणानुसार जगातील प्रतिष्ठित औषध कंपन्यामध्ये भारतीय कंपन्या आघाडीवर आहेत.
‘इंडियाज् मोस्ट रेप्युटेड ब्रँड्स’ असे या सर्वेक्षण अहवालाचे नाव आहे.
सर्वाधिक प्रतिष्ठित औषध कंपनी म्हणून १९६८पासून कार्यरत असणाऱ्या व ३०२९.५ कोटी रुपये महसूल असणाऱ्या ल्युपिन कंपनीची निवड झाली आहे.

जगातील प्रतिष्ठित औषध कंपन्यांमध्ये देशातील ५८ कंपन्यांची वर्णी लागली आहे. त्यामध्ये पहिल्या चारही कंपन्या भारतीय आहेत.
ल्युपिन खालोखाल सन फार्मा कंपनीला तर त्यानंतर सिप्लाकंपनीला लोकांची पसंती मिळाली आहे. चौथ्या क्रमांकावर डॉ. रेड्डीज् लॅबोरेटरीज् ही कंपनी आहे.
सर्वाधिक प्रतिष्ठित दहा भारतीय कंपन्या : ल्युपिन, सन फार्मा, सिप्ला, डॉ. रेड्डीज् लॅबोरेटरीज्, ग्लेनमार्क, झायडस कॅडिला, बायोकॉन, अरविंदो, पिरामल फार्मा, अजंता फार्मा.

#eMPSCkatta_Telegram_Updates


🔹अँडी मरेला कारकिर्दीतील दुसरे सुवर्णपदक

इंग्लंडचा टेनिसपटू अँडी मरेने ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीत दुसरे सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला आहे.
रोमांचक झालेल्या अंतिम फेरीत मरेने अर्जेटिनाच्या ज्युआन मार्टिन डेल पोट्रोवर ७-५, ४-६, ६-२, ७-५ असा विजय मिळवत सुवर्णपदका जिंकले.

यापूर्वी मरेने २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले होते.
कांस्यपदकाच्या लढतीत स्पेनच्या राफेल नदालला पराभूत करून केई निशिकोरीने जपानला टेनिसमधील शतकातले पहिले पदक मिळवून दिले.

 मिश्र दुहेरीमध्ये व्हीनस पराभूत

ऑलिम्पिक स्पर्धेत टेनिसमध्ये पाच सुवर्णपदके पटकावण्याचे अमेरिकेच्या व्हीनस विल्यम्सचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
अंतिम फेरीत अमेरिकेच्या बेथानी मॅटेक-सँड्स आणि जॅक सॉक यांनी व्हीनस आणि तिचा सहकारी राजीव राम यांना ७-६ (७-३), १-६, १०-७ असे पराभूत करीत सुवर्णपदक पटकावले.
व्हीनसने२००० साली सिडनी ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरीत सुवर्णपदक पटकावले होते. त्याचबरोबर बहीण सेरेनाबरोबर २०००, २००८ आणि २०१२ या तीन ऑलिम्पिक स्पर्धामध्ये सुवर्णपदक मिळवले होते.

 महिला दुहेरीमध्ये हिंगिस पराभूत

महिलांच्या टेनिस दुहेरीमध्ये मार्टिना हिंगिसलाही सुवर्णपदक पटकावण्यात अपयश आले.
महिलांच्या दुहेरीमध्ये एलेना व्हॅसनिना आणि एकातेरिना माकारोव्हा यांनी हिंगिस आणि तिची सहकारी तिमीआ बॅस्किन्सझ्की यांना ६-४, ६-४ असे सहजपणे पराभूत करीत सुवर्णपदक पटकावले.

पोटरे रिको देशाला पहिले सुवर्णपदक

मोनिका प्युगने टेनिस महिला एकेरीत जर्मनीच्या अँजेलिक कर्बरचा ६-४, ४-६, ६-१ असा पराभव करून पोटरे रिको देशाला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले.
प्युग जागतिक क्रमवारीत ३४व्या स्थानावर आहे, मात्र क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या आणि ऑस्ट्रेलियन ग्रँड स्लॅम विजेत्या कर्बरचा तिच्यापुढे निभाव लागला नाही.
प्युगने उपांत्यपूर्व फेरीत फ्रेंच ग्रँड स्लॅम विजेत्या गार्बिन मुगुरुझाला नमवले हाते.
कोणत्याही खेळात कॅरेबियन बेटांना पदक जिंकू देणारी प्युग ही पहिली खेळाडू ठरलीआहे.
प्युगने हे सुवर्णपदक मिळवून देण्यापूर्वी पोटरे रिकोच्या खात्यावर दोन रौप्य आणि सहा कांस्यपदकांसह आठ ऑलिम्पिक पदके जमा होती. सहा पदके त्यांना बॉक्सिंगमध्ये मिळालेली आहेत.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹‘आरबीआय’च्या गव्हर्नरपदी उर्जित पटेल यांची नियुक्ती

केंद्र सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदी उर्जित पटेल यांची नियुक्ती केली आहे. विद्यमान गव्हर्नर रघुराम राजन यांचा कार्यकाल ४ सप्टेंबर २०१६ रोजी संपत आहे. रघुराम राजन यांच्यानंतर उर्जित पटेल आरबीयाच्या गव्हर्गनर पदाचा कार्यभार सांभाळतील. उर्जित पटेल सध्या आरबीआच्या डेप्युटी गव्हर्नर पदावर कार्यरत आहेत. भारतीय रिझव्र्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मुदतवाढ स्विकारण्यास नकार दिल्यानंतर नव्या गव्हर्नरपदासाठी अनेक नावे चर्चेत होती.

त्यामध्ये अर्थतज्ज्ञ आणि आरबीआचे डेप्युटी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्यासह कॅगचे माजी प्रमुख विनोद राय आणि एसबीआयच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांची नावे आघाडीवर होती. तर मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम, जागतिक बॅंकेचे प्रमुख अर्थतज्ज्ञ कौशिक बसू, महसूल सचिव शक्तिकांत दास, के. व्ही. कामत, सेबीचे अध्यक्ष यू. के. सिन्हा, डेप्युटी गव्हर्नर राकेश मोहन, सुबीर गोकर्ण, अशोक लाहिरी, माजी अर्थसचिव विजय केळकर, सीसीआयचे माजी अध्यक्ष अशोक चावला, अशोक लाहिरी आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आर. वैद्यनाथन यांचीही नावे चर्चेत होती. अखेर पटेल यांच्या नावावर मोदी सरकारने आज शिक्कामोर्तब केले.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती करायची याबाबत सविस्तर चर्चा केली होती. या बैठकीतच उर्जित पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.

रघुराम राजन यांनी मुदत वाढ स्विकारण्यास नकार दिल्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी सरकार कोणाची नियुक्ती करणार याबाबत उत्सुकता होती.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹नव्या नोटा , नाण्यांना दृष्टिहीनांचा आक्षेप

नोटा आणि नाण्या- नाण्यांतील फरक डोळस व्यक्तींनाही कळत नाही . त्यामुळे त्यांतील फरक दृष्टिहीनांना ओळखता यावा , अशा प्रकारे त्यांची निर्मिती करावी , अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात सादर झाली आहे .

नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाईंड तर्फे सादर झालेल्या या याचिकेची सुनावणी लवकरच न्यायाधीश सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या . कोलाबावाला यांच्यासमोर गुरुवारी झाली . हल्लीची नाणी आणि नोटा आकाराने सारख्याच असतात , याचे प्रात्यक्षिकच अर्जदारांनी खंडपीठासमोर दाखवले . याबाबत माहिती देऊनही रिझर्व्ह बॅंकेने आणि अर्थ मंत्रालयाने काहीही केले नाही , अशी तक्रारही याचिकेत करण्यात आली आहे .

पूर्वी वेगवेगळ्या किमतीची नाणी आणि नोटा यातील फरक सहज ओळखता येत असे. दृष्टिहीनांनाही तो ओळखता यावा , यासाठी अभ्यासक्रमातही त्याचा समावेश करण्यात आला होता . तेव्हा पाच पैसे , दहा पैसे , वीस पैसे, पन्नास पैसे , एक रुपया या नाण्यांचा आकार चौकोनी, गोल , कंगोरे असलेला , लहान , मोठा असा होता . त्यामुळे त्यातला फरक सहज ओळखता येत असे; मात्र आता हे आकार जवळपास सारखेच झाल्याने दृष्टिहीन व्यक्तींना फरकच ओळखू येत नाही. त्यामुळे आता त्यांना नाणी ओळखण्यास शिकवणेही कठीण झाले आहे , असे याचिकेत म्हटले आहे .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹शुक्रासारख्या बाह्य़ग्रहावर ऑक्सिजन शक्य

शुक्रासारखा बाह्य़ग्रह पृथ्वीपासून ३९ प्रकाशवर्षे दूर अंतरावर असून तेथे ऑक्सिजनचा समावेश असलेले वातावरण असू शकते, असे नवीन अभ्यासात दिसून आले आहे.

जीजे ११३२ बी हा दूरस्थ ग्रह असून तो गेल्या वर्षी शोधला गेला होता. त्या ग्रहावर २३२ अंश सेल्सियस तापमान असले तरी तेथे वातावरण असण्याची शक्यता आहे. नवीन अभ्यासानुसार हे वातावरण विरळ असेल असा अंदाज आहे. हार्वर्ड स्मिथसॉनियन सेंटर फॉर अॅस्ट्रोफिजिक्सच्या खगोलशास्त्रज्ञ लॉरा शेफर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जलसंपृक्त वातावरणापासून सुरुवात झालेल्या ग्रहात काळानुरूप काय बदल झाले आहेत त्याचा अभ्यास केला आहे. हा ग्रह त्याच्या मातृताऱ्याभोवती १४ लाख मैल अंतरावरून फिरत असून तेथे अतिनील किरण सर्वात जास्त आहे. अतिनील किरणांमुळे पाण्याच्या रेणूचे हायड्रोजन व ऑक्सिजन यात विघटन होते. पण हायड्रोजन हलका असल्याने तो विरून जातो पण ऑक्सिजन खाली राहतो.

थंड ग्रहांवर ऑक्सिजन हा जीवसृष्टी व वसाहतयोग्यतेचा निदर्शक आहे पण जीजे ११३२ बी या ग्रहाचा विचार करता परिस्थिती उलट आहे, तेथे तापमान इतके जास्त आहे की, वसाहतयोग्यता त्यामुळे कमी होते. पाण्याची वाफ ही हरितगृह वायूत मोडते त्यामुळे ताऱ्याकडून ग्रहाला मिळालेली उष्णता अनेक पटींनी वाढते.
 मॅग्माचा थर हा वातावरणाशी क्रिया करतो त्यात एक दशांश ऑक्सिजन शोषून घेतला जातो, असे शेफर व त्यांच्या सहकाऱ्यांनी विकसित केलेल्या प्रारूपात दिसत आहे.

 उरलेला ९० टक्के ऑक्सिजन हा अवकाशात निघून जातो. खडकाळ ग्रहावर ऑक्सिजन असण्याची शक्यता प्रथमच सांगण्यात आली आहे असे हार्वर्ड पॉलसन स्कूल ऑफ इंजिनियरिंग अँड अॅप्लाईड सायन्सेस या संस्थेचे रॉबिन वर्डसवर्थ यांनी सांगितले. अजून तेथे काही ऑक्सिजन असेल तर तो मॅगेलान किंवा जेम्स वेब अवकाश दुर्बिणीच्या मदतीने ओळखता येऊ शकतो. यातून शुक्र ग्रहाची घडण कशी होत गेली असावी याचे कोडेही उलगडणार आहे. शुक्रावर आधी पृथ्वीइतकेच पाणी असावे पण नंतर त्याचे सूर्यप्रकाशामुळे विघटन झाले असावे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹हिलरी यांची जनमतात ट्रम्प यांच्यावर आघाडी

अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांची जनमतातील आघाडी आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या तुलनेत कमी झाली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार असलेल्या क्लिंटन यांना ४१ टक्के तर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना जनमतात ३७ टक्के मते आहेत. त्यामुळे क्लिंटन यांची आघाडी केवळ चार टक्क्यांची उरली आहे. १० टक्के मतदारांनी जिल जॉन्सन तर ४ टक्के मतदारांनी ग्रीन पार्टीचे उमेदवार जिल स्टेन यांना पसंती दिली आहे.

क्लिंटन यांची आघाडी आधी म्हणजे पक्षाच्या अधिवेशनाच्या वेळी ९ टक्के होती, असे प्यू रीसर्च सेंटरने म्हटले आहे.
 २७ टक्के मतदारांनी ट्रम्प हे चांगले अध्यक्ष असतील असे म्हटले आहे तर ५५ टक्के मतदारांनी ते वाईट किंवा भयानक अध्यक्ष असतील असे मत व्यक्त केले आहे. ४३ टक्के मतदारांना ते भयानक वाटतात. १५ टक्के लोकांना ते सर्वसाधारण दर्जाचे अध्यक्ष असतील असे वाटते. क्लिंटन अध्यक्ष झाल्या तर त्याबाबत काय वाटते यावर लोकांची उत्तरे नकारात्मक नाहीत.

३१ टक्के लोकांना त्या चांगल्या अध्यक्ष असतील असे वाटते तर २२ टक्के लोकांना त्या साधारण अध्यक्ष वाटतात, १२ टक्के लोकांना त्या वाईट अध्यक्ष असतील असे वाटते तर ३३ टक्के लोकांच्या मते त्या भयानक अध्यक्ष असतील. प्यू रीसर्च सेंटरने ९ ते १६ ऑगस्ट दरम्यान ही पाहणी केली होती त्यात २०१० मतदारांचा समावेश होता.

 ट्रम्प यांच्या समर्थकांच्या मते पन्नास वर्षांपूर्वी अमेरिकेतील जीवन जसे होते त्यापेक्षा आताचे जीवन वाईट आहे. किमान ८१ टक्के समर्थकांनी तसे म्हटले आहे, ६ टक्के लोकांच्या मते त्यात काही फरक पडलेला नाही तर ११ टक्के लोकांच्या मते जीवन सुधारले आहे. क्लिंटन समर्थकांपैकी ५९ टक्के मतदारांनी जीवन पन्नास वर्षांत आणखी चांगले झाल्याचे तर १९ टक्के मतदारांनी ते वाईट झाल्याचे म्हटले आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹आर्थिक अडचणीमुळे इ कॉमर्स साइट आस्क मी बंद होणार

भारतातील आघाडीची इ-कॉर्मस सर्च साइट आस्क मी आर्थिक अडचणीत सापडली आहे. त्यामुळे कंपनी लवकरच बंद होणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे सुमारे चार हजार कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.

गुरगाव येथे मुख्य कार्यालय असलेल्या कंपनीची वेबसाइट अजून सुरू असली तरी कंपनीने नवीन ऑर्डर घेणे बंद केले आहे. कंपनीचे प्रमुख गुंतवणूकदार अॅस्ट्रो होल्डिंगने अचानक माघार घेतल्याने आस्क मी अडचणीत आल्याचे सूत्रांनी सांगितले. कंपनीच्या भागधारकांसोबत झालेल्या दीर्घ वादानंतर मलेशिया स्थित अब्जाधीश आनंद कृष्णन संचलित अॅस्ट्रो होल्डिंगने गत महिन्यात सुमारे १५० कोटी रूपयांची गुंतवणूक कंपनीत केली होती. अॅस्ट्रो होल्डिंगची आस्क मी ग्रूपमध्ये ९७ टक्के भागीदारी आहे.

वार्षिक अडीच ते सहा लाख पॅकेज असलेल्या ६५० हून अधिक कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. कंपनीने व्यवसाय बंद करण्याचा अचानक निर्णय घेतल्याने सुमारे चार हजाराहून अधिक कर्मचारी, पुरवठादार व वित्तीय संस्था अडचणीत आल्या आहेत.

आस्क मी डॉट कॉमने २०१० साली क्लासिफाईड पोर्टल सुरू केले. त्यानंतर २०१२ मध्ये ऑनलाइन शॉपिंग पोर्टल आस्क मी बझार सुरू केले. २०१३ मध्ये आस्क मी ने गेटीट ही कंपनी ताब्यात घेतली होती. कंपनीचे भारतातील ७० शहरात १२ हजाराहून अधिक व्यापारी सभासद होते. आस्क मी पे व आस्क मी फिन नावाने कंपनीने आर्थिक क्षेत्रात प्रवेश केला होता. त्याचबरोबर कंपनीने वर्ष २०१५ मध्ये मेबलकार्ट या ऑनलाइन फर्निचर कंपनीत २० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली होती.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹अवाढव्य ‘एअरलॅण्डर १०’ अखेर हवेत झेपावले!

जगातील सर्वात मोठे विमान ‘एअरलॅण्डर १०’ (Airlander 10) अखेर हवेत झेपावले. या अवाढव्य विमानाच्या हवेतील यशस्वी उड्डाणासाठी गेल्या ८५ वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. १९३० साली ‘आर१०१’ नावाच्या एका विमानाने असाच प्रयत्न केला होता. परंतु, त्याला अपघात होऊन त्यात ४८ लोक मारले गेले. ‘एअरलॅण्डर १०’ने मंगळवारी इंग्लंडमधील कार्डिंगटन एअरफिल्डवरून आपले पहिले यशस्वी उड्डाण केले. सध्या विमानाची चाचणी होत असल्याने या विमानाद्वारे कमी अंतर पार करण्यात आले. काही तांत्रिक कारणांमुळे रविवारी घेण्यात येणारी विमानाची चाचणी रद्द करण्यात आली होती. मंगळवारी घेण्यात आलेल्या चाचणीदरम्यान विमान अर्धा तासापर्यंत आकाशात उडत होते. येणाऱ्या काळात ‘एअरलॅण्डर १०’ च्या आणखी चाचण्या होण्याची शक्यता आहे. हवेत उडण्यासाठी ‘एअरलॅण्डर १०’मध्ये हेलियम वायूचा वापर करण्यात येतो. जास्त उंचीवर न उडू शकणाऱ्या या विमानाचा वेगदेखील कमी असणार आहे. याचा टॉप स्पीड ९२ एमपीएच इतका असेल. सुरुवातीला सेनेचे सामान वाहून नेण्यासाठी वापरात येणारे हे विमान येणाऱ्या काळात इतर कारणांसाठीदेखील वापरात येईल. अन्य विमानांच्या तुलनेत एअरलॅण्डर १० मध्ये अधिक सामान वाहून नेण्याची क्षमता आहे. आत्तापर्यंत सर्वात मोठे विमान म्हणून नावलौकीक असलेल्या ‘ए-३८०’ विमानापेक्षा हे विमान मोठे आहे. ९२ मीटर लांब आणि २६ मीटर उंच ‘एअरलॅण्डर १०’ विमानातून जास्तीतजास्त ५० प्रवासी प्रवास करू शकतात. या विमानातून एकाच वेळी १० हजार किलो सामान वाहून नेण्यात येऊ शकते.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹राज्यातील 2, 200 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट

सरकारचा निर्णय; धोकादायक पुलांची श्रेणी ठरवणार

 सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेले सरकार राज्यातील मध्यम व मोठ्या अशा तब्बल दोन हजार 200 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे काम हाती घेणार आहे . प्रथमच पुलांच्या मजबुतीची पाहणी करताना नदीच्या पात्रात होणारे बदल , उत्खनन , औद्योगिक वसाहतींमुळे प्रदूषित होणारे हवामान , नदीच्या प्रदूषित पाण्याचे बांधकामावर होणारे परिणाम यांचाही अभ्यास केला जाणार आहे . त्यानुसार पावसाळ्यापूर्वी आणि नंतर एक महिन्यात ही तपासणी केली जाणार आहे . त्यानुसार पुलांची दुरुस्ती केली जाईल .

जवळील सावित्री नदीवरील पूल कोसळल्यानंतर राज्यातील पुलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते . त्यामुळेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या मध्यम व मोठ्या अशा जवळपास दोन हजार 200 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे . लहान पुलांची पाहणी सध्या केली जाणार नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले . सावित्री नदीवरील पुलाच्या अनुभवावरून यापूर्वी परीक्षण करताना दुर्लक्षित करण्यात येणाऱ्या घटकांचाही समावेश नव्याने केला आहे . त्यात वाळू उत्खननामुळे पुलाच्या बांधकामावर होणारा परिणाम , औद्योगिक वसाहतींमुळे होणारे प्रदूषण , नदीचे प्रदूषण यांच्या परिणामांचाही विचार केला जाणार आहे . पुलांची पाहणी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरले जाणार आहे . त्यासाठी अनेक तज्ज्ञांचा सल्ला घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले . पुलाच्या सखोल सर्वेक्षणासाठी पूल तपासणी वाहनाचा वापर करण्याबरोबरच पुलाच्या सखोल तपासणीसाठी पाण्याखालील पुलाचे बांधकाम पाहण्याबरोबरच "फोटो इमेजिंग ' या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे .

प्रत्येक पुलाची तपासणी पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर करण्याचा अध्यादेश नुकताच काढण्यात आला आहे . एका महिन्यात हे काम पूर्ण केले जाणार आहे . तसेच पाहणी करण्यासाठी निवडण्यात येणाऱ्या पुलांची श्रेणी ठरवण्यात येणार आहे . अधिक धोकादायक पुलांची दुरुस्ती सर्वांत अगोदर हाती घेतली जाणार आहे . आयुष्य संपलेले पूल किंवा पाच वर्षांपर्यंत मुदत असलेल्या पुलांची पाहणी , डागडुजी ताबडतोब हाती घेतली जाणार आहे .

जबाबदारीची विभागणी

मुख्य अभियंता : 200 मीटर व त्यापेक्षा जास्त लांबीचे पूल .

अधीक्षक अभियंता : 60 ते 200 मीटर लांबीचे पूल .

कार्यकारी अभियंता : 30 ते 60 मीटर लांबीचे पूल .

उप - अभियंता : 30 मीटर लांबीपेक्षा कमी लांबीचे पूल .

शाखा अभियंते : सर्व प्रकारच्या मोऱ्या .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹आता एकच नेटपॅक वर्षभर वापरता येणार !

नवी दिल्ली - नव्या ग्राहकांना आकर्षित करणे आणि सध्याच्या ग्राहकांना इंटरनेट वापरास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने दूरसंचार नियामक प्राधिकरणाने ( ट्राय ) नेटपॅकची वैधता 365 दिवसांपर्यंत वाढविण्यास मान्यता दिली आहे .

ट्रायच्या नियमानुसार सध्या केवळ जास्तीत जास्त 90 दिवसांपर्यंतची वैधता असलेले विविध नेटपॅक्स उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रीपेड ग्राहकांना 90 दिवसांतून किमान एकदा रिचार्ज करणे अनिवार्य होते . इंटरनेटचा नियमित वापर करणाऱ्या ग्राहकांना या समस्येला सामोरे जावे लागत होते . या जाचापासून सुटका करण्यासाठी तसेच नवीन ग्राहकांना आकर्षित करून सध्याच्या ग्राहकांना प्रोत्साहित करण्यासाठी मोबाईलवरील डेटापॅक्सची वैधता जास्तीत जास्त 365 दिवसांची करण्यात आली आहे . ट्रायने टेलिकॉम दूरसंचार ग्राहक नियमन कायद्यातील ( टीसीपीआर ) दहाव्या दुरुस्तीनुसार ही वैधता 365 दिवसांपर्यंत करण्यात आली आहे .

सध्याच्या इंटरनेट सेवा
सध्या वेगवेगळ्या दूरसंचार कंपन्यांचे किंमतीनुसार आणि सेवेनुसार डेटापॅक उपलब्ध आहेत. त्यामध्ये साधारण 50 एमबी आणि एका दिवसाच्या वैधतेपासून या पॅक्सना सुरुवात होते . तर वैधता जास्तीत जास्त 90 दिवसांपर्यंत होती . आता 365 दिवसांच्या वैधतेमुळे अधिक एमबी डेटा मिळणार असून त्याप्रमाणे किंमतही वाढणार आहे .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹चेतन भगतची आता ' वन इंडियन गर्ल '

नवी दिल्ली - प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी त्यांची नवी कादंबरी "वन इंडियन गर्ल ' ची घोषणा शुक्रवारी ट्विटरवर केली . भगत यांनी आज ट्विटरवर या कादंबरीची घोषणा करताना कादंबरीविषयीचा व्हिडिओ टिझरही दिला आहे .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹पासिघाट विमानतळ देशाला अर्पण

चीनच्या सीमेवरील भारतीय लष्कराला आणि नागरी प्रशासनाला पाठबळ
पासिघाट ( अरुणाचल प्रदेश ) - सुखोई 30 सारख्या लढाऊ विमानांसाठी योग्य असलेल्या येथील पासिघाट हा अत्याधुनिक विमानतळ केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिज्जू यांच्या हस्ते आज देशाला अर्पण करण्यात आला . चीनच्या सीमेवरील या विमानतळामुळे भारताच्या लष्कराला मोठे बळ मिळाले आहे .

भारताला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे होऊन गेली तरी विकासाच्या बाबतीत इतरांच्या तुलनेत मागे असलेल्या अरुणाचल प्रदेशमध्ये आता बदल होत असल्याचे किरण रिज्जू यांनी या वेळी केलेल्या भाषणात सांगितले . तेजपूर आणि चबुआ येथील विमानतळांप्रमाणेच येथील विमानतळावरही सर्व प्रकारची विमाने आणि हेलिकॉप्टर उतरू शकतील, असे रिज्जू यांनी सांगितले . या वेळी लष्कराच्या पूर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते . या विमातळामुळे लष्कर, निमलष्कर आणि नागरी प्रशासनाला मोठे पाठबळ मिळाल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले . या विमानतळामुळे पूर्व सीमेवरील विविध मोहिमांमध्ये कार्यक्षमता वाढणार असून , हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणा , सुरक्षेचे विविध उपाय यामुळे हवाई वाहतुकीची क्षमताही वाढणार आहे .

पासिघाटविषयी . . .
अरुणाचल प्रदेशने जून 2009 मध्ये संरक्षण मंत्रालयाबरोबर करार केल्यानुसार हवाई दलाने येथे एक हजार कोटी रुपये खर्च करून आठ अत्याधुनिक विमानतळ उभारण्याचे ठरले होते . त्यानुसार , पासिघाटसह सहा विमानतळ तयार झाले असून , उर्वरित दोन विमानतळ एका वर्षात तयार होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले . या सर्व विमानतळांवरील धावपट्ट्यांची लांबी 3500 ते 4200 फूट इतकी आहे . पासिघाट हे गाव ब्रिटिशांनी 1911 मध्ये प्रशासनाच्या सोयीसाठी वसवले होते . स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत केंद्र सरकारनेही अरुणाचल प्रदेशमधील फक्त याच गावाची निवड केली आहे .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹ट्विटरकडून 3 लाख 60 हजार खाती बंद

दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी कंपनीकडून कारवाई

सॅन फ्रान्सिस्को - सोशल मीडिया सेवा ट्विटरने दहशतवादाला प्रोत्साहन देणारी 2 लाख 35 हजारहून अधिक खाती बंद करण्याची घोषणा केली आहे . दहशतवादाला प्रोत्साहन न देण्याचे धोरण ट्विटरने स्वीकारले असून , याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली . ट्विटरकडून 2015 च्या मध्यापासून अशा प्रकारची एकूण 3 लाख 60 हजार खाती बंद करण्यात आली आहेत.

दहशतवादी कारवाया आणि त्यांना प्रोत्साहन याला आळा घालण्यासाठी हे पाऊल उपयोगी पडत आहे , असे ट्विटरने म्हटले आहे . भाषणस्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी ट्विटरवर दबाव वाढत असताना , दुसरीकडे दहशतवादी गटांकडून हिंसक संदेश देण्यासाठी ट्विटरचा वापर करणे वाढू लागले आहे . धमक्या देणारे आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणारे अशा 1 लाख 25 हजार जणांची खाती ट्विटरने फेब्रुवारीपासून बंद केली आहेत. मागील वर्षापासून एक दिवसासाठी खाते तात्पुरते बंद करण्याचे प्रमाण 80 टक्क्यांपेक्षा अधिक वाढले आहे . दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादाला प्रोत्साहन देणारी खाती तात्पुरती बंद करण्यात येतात , असे कंपनीने म्हटले आहे . यामध्ये इसिसशी संबंधित खात्यांचाही समावेश आहे

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹मेलबर्न हे राहण्यास सर्वाधिक योग्य शहर

मेलबर्न - राहण्यायोग्य शहरांच्या यादीत ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न शहराने सलग सहाव्या वर्षी प्रथम क्रमांक पटकाविला आहे . " द इकॉनॉमिस्ट ' या संस्थेने 140 देशांमधील राहणीमानाचा अभ्यास करून ही यादी प्रसिद्ध केली आहे .

शहरांचा अभ्यास करताना आरोग्यसेवा , पायाभूत सुविधा, संस्कृती, पर्यावरण आणि स्थैर्य या मुद्द्यांचा अभ्यास केला गेला . या वेळी मेलबर्नला शंभरपैकी 97. 5 गुण मिळाले . या यादीत ऑस्ट्रेलियातील अडलेड आणि पर्थ ही शहरेही पहिल्या दहामध्ये आहेत. त्यांना अनुक्रमे पाचवा आणि सातवा क्रमांक मिळाला आहे . ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना हे शहर सलग आठव्या वर्षी दुसरा क्रमांक राखण्यात यशस्वी ठरले आहे . व्हॅंकुव्हर , टोरांटो, कॅलगरी , ऑकलंड , हेलसिन्की आणि हॅम्बर्ग या शहरांनाही पहिल्या दहामध्ये स्थान मिळाले आहे .

पूर्वीच्या यादीतील काही शहरांची कामगिरी बरीच खालावली असल्याचेही या वेळी निदर्शनास आले आहे . दहशतवादाची वाढती भीती आणि त्यामुळे सामाजिक असुरक्षितता ही यामागील प्रमुख कारणे असल्याचे दिसून आले आहे . फ्रान्स , अमेरिका आणि तुर्कस्तानमधील शहरांचा या प्रकारात समावेश आहे .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹हिंदू विवाह विधेयक पाक संसदेत मांडले

इस्लामाबाद - अनेकदा वादास कारणीभूत ठरलेले आणि प्रलंबित असलेले हिंदू विवाह विधेयक आज अखेर पाकिस्तानच्या संसदेत मांडण्यात आले . देशातील अल्पसंख्य हिंदूंच्या विवाहाला कायद्याची चौकट देण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे समजले जात आहे . सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीगचा ( नवाज गट ) या विधेयकाला पाठिंबा असल्याने ते मंजूर होण्याची दाट शक्यता आहे . या विधेयकातील काही तरतुदींना हिंदू समुदायाचा विरोध आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹उसेन बोल्टची सुवर्णपदकांची हॅटट्रिकची हॅटट्रिक

रिओ - बहुधा कारकिर्दीतील ऑलिपिंकमधील शेवटची शर्यत धावणाऱ्या जमैकाच्या उसेन बोल्टने 4 बाय 100 मीटर रिले शर्यतीत आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने आणखी एक सुवर्णपदक पटकाविले . बोल्टच्या या कामगिरीमुळे त्याने गेल्या तिन्ही ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदके मिळविण्याची हॅटट्रिकची हॅटट्रिक केली . बोल्टच्या कारकिर्दीतील हे नववे ऑलिंपिक सुवर्णपदक आहे .

शुक्रवारी रात्री झालेल्या 4 बाय 100 मीटर रिले शर्यतीत बोल्टने अखेरच्या लॅपमध्ये धावताना आपल्याजवळही प्रतिस्पर्धी येऊ शकत नाही, हे सिद्ध केले. उसेन बोल्ट, योहान ब्लेक , निकेल अॅशमेडे आणि असाफा पॉवेल या जमैकाच्या धावपटूंनी 37 . 27 सेकंदांत ही शर्यत पूर्ण केली . तर , जपानच्या टीमने 37 . 60 सेकंदांत अंतर पार करत रौप्य पदकावर आपले नाव कोरले . मात्र , तिसऱ्या स्थानावर आलेल्या अमेरिकेच्या टीमला शर्यत पूर्ण झाल्यानंतर अपात्र ठऱविण्यात आल्याने कॅनडाच्या टीमला ब्राँझपदक देण्यात आले . 1995 पासून नवव्यांदा अमेरिकेचा संघ रिले शर्यतीत अपात्र ठरला आहे .
 आठ वर्षांपूर्वी ब्राँझ मिळविणाऱ्या जपानच्या संघाने यंदा रौप्य पदक जिंकले .

बोल्ट यापूर्वी 100 आणि 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदक मिळविले आहे .
 खेळाडूंचा परिचय करून देताना त्याने कॅमेऱ्याकडे पाहून इशारा केली की तुम्ही सज्ज आहात का ? इतका त्याला यशाची खात्री होती . अन्य धावपटूंच्या चेहऱ्यावर दडपण जाणवत असताना बोल्टचे हात पाय कॅरेबियन शैलीत थिरकत होते . काही क्षणांत शर्यत सुरू झाली आणि तो सुसाट धावला ते थेट सुवर्णपदक जिंकूनच थांबला. अशी ओळख असलेल्या बोल्टने पुन्हा एकदा सुवर्णपदक पटकाविले .

#eMPSCkatta_Telegram_Updates

अर्जेंटिनाला पहिले सुवर्णपदक

बेल्जियमवर एकतर्फी लढतीत सहज मात रिओ - पुरुष हॉकीत या वेळी अर्जेंटिनाने ऑलिंपिक सुवर्णपदकाचा मान मिळविला.

ऑलिंपिक समितीच्या निवडणुकीत साईना नेहवालचा पराभव

नरसिंगची हकालपट्टीच , चार वर्षांची बंदी
उत्तेजक फसवून दिले असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे कॅसचे मत मुंबई / रिओ - आपल्याविरुद्ध कट करून उत्तेजक देण्यात आले, हा नरसिंग यादवचा दावा क्रीडा लवादाने फेटाळला.

आदितीची घसरण ; तिसऱ्या फेरीअखेर संयुक्त 31 वी

भारताची गोल्फपटू आदिती अशोक हिच्या महिला गोल्फमधील पदकाच्या संधीला मोठा धक्का बसला. संयुक्त आठवरून तिची संयुक्त 31 व्या क्रमांकावर घसरण झाली . यामुळे तिच्या पदकाच्या आशा संपुष्टात आल्या आहेत

#eMPSCkatta_Telegram_Updates🔹पंतप्रधान मोदींच्या सुटाचा 4 कोटींमध्ये लिलाव, गिनीज बुकात नोंद

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तब्बल 4 कोटी 31 लाख 31 हजार 311 रुपयांना विकल्या गेलेल्या सुटाची गिनीज बुकात नोंद झाली आहे. सुटाला लिलावात मिळालेल्या किंमतीची गिनीज बुकात नोंद झाली आहे. सुरतचे व्यापारी लानजीभाई पटेल यांनी मोदींना हा सूट भेट म्हणून दिला होता.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹परराष्ट्र मंत्रालयाचे नवे फेसबुक अॅप

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने शुक्रवारी परदेशातील भारतीय नागरिकांसाठी स्वत:चे स्वतंत्र फेसबुक अॅप सुरू केले आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात परदेशस्थ भारतीयाला अचानक कोणत्याही समस्येला सामोरे जाण्याची वेळ आली तर परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडून मदतीच्या अपेक्षेबाबत त्यांना या नव्या अॅपमुळे यापुढे नाराज व्हावे लागणार नाही. त्यांना लगेच मदत मिळेल.

या फेसबुक अॅपविषयी माहिती देतांना मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप म्हणाले, फेसबुक पेजवर सर्वात वरच्या भागात असलेल्या भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अॅपवर क्लिक केल्यास जगाच्या पाठीवर आपण कोणत्याही देशात असलात तरी, सर्वप्रथम साऱ्या जगाचा नकाशा उघडेल. त्यात प्रत्येक देशातील भारतीय दूतावास अधोरेखित केले असून, संबंधित दूतावासावर क्लिक केल्यास तेथील उच्चायुक्त कार्यालये, कॉन्स्युलेटस, विदेशातील भारतीय कार्यालये इत्यादींची समग्र माहिती, दूतावासांसह अधिकाऱ्यांचे पत्ते, फोन नंबर्स आदी उपलब्ध होईल. त्याद्वारे भारतीयांना संबंधित देशातील भारतीय दूतावासावर क्लिक करून तेथील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपल्या समस्येचे निराकरण करणे शक्य होईल.
स्वरूप पुढे म्हणाले, परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज स्वत: व्टिटरच्या माध्यमातून २४ तास साऱ्या जगाच्या संपर्कात असतात. विविध देशांतून अनेक लोक ट्वीट करून आपल्या समस्या त्यांना कळवतात. प्रत्येकाला त्या उत्तर देतात आणि त्यांची समस्या संबंधित राजदूताला कळवतात. आजवर कोणालाही त्यांनी नाराज केले नाही.

तक्रार निवारणाचा भार कमी होणार

तथापि त्यातून एक महत्त्वाची बाब मंत्रालयाच्या निदर्शनाला आली की त्यातली अनेक निवेदने असतात की ज्याची उत्तरे स्वत: परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांनी देण्याची आवश्यकता नाही. संबंधित देशातील भारतीय राजदूत अथवा त्यांचे कार्यालय ते काम सहजपणे करू शकते. परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांचा तक्रार निवारणाचा भार कमी करण्यासाठी आणि परदेशातील भारतीयांच्या समस्या लवकर सोडवण्यासाठी या फेसबुक अॅपचा उपयोग होईल.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹सर्वात लांब, उंच काचेचा पूल

          चीनच्या हुनान प्रांतात बनलेला जगातील सर्वात लांब आणि उंच असा काचेचा पूल 20 ऑगस्ट रोजी पर्यटकांसाठी खुला झाला. या पुलाची लांबी 430 मीटर व रुंदी 6 मीटर आहे. या पुलावर पारदर्शक काचेचे तीन स्तर आहेत. ही काच इतकी मजबूत आहे की घणाचे घाव घातले तरी ती फुटत नाही. जमिनीपासून 300 मीटर उंचीवर हा पूल आहे.

          नॅशनल पार्कच्या दोन शिखरांना जोडणारा हा पूल आहे. त्याचे अनोखे डिझाईन आणि निर्माण कार्य यामुळे या पुलाने आधीच दहा विक्रमांची नोंद केली आहे.

          * या पुलावर एका दिवशी जास्तीत जास्त 8 हजार पर्यटक येण्यास परवानगी आहे. त्यासाठी एक दिवस आधी आरक्षण करावे लागते.

          * पुलाचे निर्माण कार्य 2015 च्या डिसेंबरमध्ये पूर्ण झाले होते. त्यानंतर त्याच्या मजबुतीच्या व सुरक्षेच्या चाचण्या सुरू होत्या.

          * जुलै 2016 मध्ये या पुलावर दोन टन वजनाचा एक ट्रकही फिरवून पाहण्यात आला.

          * पुलाचे डिझाईन इस्रायलचा आर्किटेक्ट हॅम डॉटन याने केले आहे.

          * हा पूल सर्वाधिक उंचीवरील बंजी जंपिंगसाठीही योग्य आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹हार्ट ऑफ एशिया :

स्थळ : दिल्ली

दिनांक : 27-29 एप्रिल

उद्देश - युद्धजर्जर अफगाणिस्तान मध्ये शांतता निर्माण करणे, तेथील गुंतवणूक वाढवून विकास प्रक्रिया वेगाने करणे, दहशतवाद रोखणे, अफगाणिस्तानमध्ये कायमस्वरूपी विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याच्या प्रक्रियेला वेग आणणे, त्यासाठी विविध उपाय योजना करणे.
 2011 पासून या परराष्ट्रमंत्री स्तरावरील परिषदेला सुरुवात झाली.
 सहभागी देश - अफगाणिस्तान, अझरबैजान, चीन, भारत, इराण, किरागिझीस्तान, पाकिस्तान, रशिया, सौदी अरेबिया, तजिकिस्तान, तुर्कस्तान, तुर्कमेनिस्तान, कझाकस्तान, आणि संयुक्त अरब अमिराती या चौदा देशांचा समावेश आहे.
 चर्चा : अफगाणिस्तानातील दहशतवादाचा सामना सामूहिक पद्धतीने कसा करता येईल?
 दहशतवादी संघटनांना आपले साम्राज्य वाढविण्यासाठी अंमली पदार्थाच्या व्यापारातून पैसा उपलब्ध होत असतो. हे लक्षात घेऊन अंमली पदार्थाच्या व्यापारावर निर्बंध कसे आणता येईल.
 अफगाण मधील साधनसंपत्तीचा पुन्हा विकास करण्यासाठी निधी कसा उभारता येईल.
 अफगाणचा आर्थिक विकास कसा करता येईल.
 अफगाणमध्ये आपत्ती आल्यास सामना कसा करता येईल.
 राजकीय व सामाजिक विकासासाठी शिक्षणाचा प्रसार करणे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹सागरमाला प्रकल्पास मंजुरी :

काय आहे सागर माला -

देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनार्‍यावरील सर्व बंदरे जोडून समुद्रमार्ग होणारी वाहतूक आणि व्यापाराला तसेच जलमार्गांना ऊर्जितावस्था आणण्यासाठी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सरकारने 'सागरमाला' प्रकल्पाचा निर्णय घेतला होता.
 बंदरांचा विकास हा प्रकल्पाचा केंद्रबिंदु असून, त्याव्दारे पायाभूत सुविधा निर्माण करत व्यापारात वाढ करून विकास साधने या प्रकल्पाचा उद्देश आहे.

'सागरमाला' चा परिणाम -

बंदरांना जोडण्यासाठी 'इंडियन पोर्ट' रेल कॉर्पोरेशन स्थापन.
 संरक्षण तसेच जहाज बांधणीच्या व्यवसायासाठी परवाना पद्धत सोपी.
 शिपयार्ड नाही पायाभूत सुविधांचा दर्जा मिळणार.
 देशातील 11 जलमार्ग 'राष्ट्रीय जलमार्ग-1' म्हणून घोषित.
 भारतातील 12 बंदराचा विकास, 1208 बेटांचा विकास.
 कोरिया हा देश या परिषदेचा सहआयोजक देश होय.

परिषदेची ठळक वैशिष्ट्ये -

जालना व वर्धा येथे डायपोर्ट (आधारभुत बंदरे) उभारण्यात येणार असून त्यातून संपूर्ण महाराष्ट्र बंदर विकासाशी जोडला जाईल.
 वाढवण येथे 9167 कोटी रुपयांचे बंदर उभारण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ व जेएनपीटी कंपनी यांच्यात करार करण्यात आला.
 दिघी बंदरातील 1200 कोटीचा प्रकल्प.
 मानखुर्द बंदरातील 7400 कोटीचा प्रकल्प.
 मुंबई येथे तंरगते हॉटेल उभारण्यात येणार.

🔹पंतप्रधान नरेंद्र मोदीच 'अतुल्य भारत'चे ब्रँण्ड अॅम्बेसिडर?

नवी दिल्ली: पर्यटन विभागाच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच ‘अतुल्य भारत’चा ब्रँण्ड अॅम्बेसिडर करण्याच्या हलचाली सुरु आहेत. त्यासाठी पर्यटन मंत्रालयाने ‘अतुल्य भारत’साठी कोणाच्याही नावाची घोषणा न करण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच पर्यटन विभाग यासाठी गुजरात पर्यटनच्या धर्तीवर एक डझनहून अधिक प्रमोशनल फिल्म बनवणार आहेत.नुकत्याच केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाच्या मार्केटिंग टीमने दिलेल्या आहवालात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या देशांचा दौरा केला, त्या देशांतून पर्यटकांची संख्या वाढली असल्याचे म्हटले आहे.त्यामुळे पर्यटन मंत्रालयाने आता इतर कोणाही व्यक्तीच्या नावाला ‘अतुल्य भारत’चा ब्रँण्ड अॅम्बेसिडर म्हणून घोषित न करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदीच अतुल्य भारतचा नवा चेहरा असतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹दोन पदकांसह भारत क्रमवारीत 66 व्या स्थानी


रिओ डि जानिरो : अपयशाने सुरवात झालेल्या भारताच्या रिओ ऑलिंपिक मोहिमेची सांगताही अपयशानेच झाली. अनुभवी योगेश्वर दत्त पहिल्याच फेरीत पराभूत झाल्याने यंदाच्या पदकतक्त्यामध्ये साक्षी मलिक आणि पी. व्ही . सिंधू यांच्या व्यतिरिक्त आणखी एक पदक मिळण्याची आशा संपुष्टात आली . पुरुषांची मॅरेथॉन स्पर्धा सुरू झाली असून त्यात भारताचा टी . गोपी पहिल्या 20 किलोमीटरनंतर 56 व्या स्थानी होता .

यंदाच्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये कुस्तीमध्ये साक्षी मलिक आणि बॅडमिंटनमध्ये पी. व्ही . सिंधूने पदक मिळविले . एक रौप्य आणि एक ब्रॉंझ अशा दोन पदकांसह भारतीय संघ सध्या पदकतक्त्यात 66 व्या स्थानी आहे . अमेरिकेने या स्पर्धेवर पूर्ण वर्चस्व राखले आहे . त्यांनी 43 सुवर्ण पदकांसह एकूण 116 पदके जिंकली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ब्रिटनला 27 सुवर्ण पदकांसह 66 पदके मिळाली आहेत.
चीन ( 70 पदके ) ,
रशिया ( 53 पदके ) ,
जर्मनी ( 41 पदके ) ,
जपान ( 41 पदके ) ,
फ्रान्स ( 40 पदके ) ,
दक्षिण कोरिया ( 21 पदके ) ,
ऑस्ट्रेलिया ( 29 पदके )
आणि इटली ( 26 पदके ) हे देश ' टॉप 10' मध्ये आहेत.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹पुढील तीन महिन्यांत " इस्रो' कडून चार उपग्रह

नवी दिल्ली - उपग्रह अवकाशात सोडण्याचा भारतीय अवकाश संशोधन केंद्राचा ( इस्रो) धडाका कायम असून , पुढील तीन महिन्यांमध्ये आणखी चार उपग्रह अवकाशात झेपावणार आहेत. "इस्रो ' च्या उपग्रह केंद्राचे संचालक मिलस्वामी अण्णादुराई यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली .

अण्णादुराई म्हणाले , "" ऑगस्ट 2015 पासून ऑगस्ट 2016 पर्यंत भारताने दहा उपग्रह अवकाशात सोडले आहेत. आता सप्टेंबरमध्ये इन्सॅट 3 डी आर आणि स्कॅटसॅट - 1 हे उपग्रह , तर ऑक्टोबरमध्ये जीसॅट- 18 आणि नोव्हेंबरमध्ये रिसोर्ससॅट- 2 ए हे उपग्रह सोडले जातील . पुढील तीन वर्षांत 70 उपग्रह अवकाशात सोडण्याचे "इस्रो' चे नियोजन असून , त्यानुसार काम सुरू आहे . ''

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹निर्यात संचालनालय कार्यालय बेळगावात सुरू करणार - निर्मला सीतारामन

बेळगाव - निर्यात संचालनालयाचे विभागीय कार्यालय बेळगावात सुरू केले जाईल , अशी घोषणा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी केली . तसेच पालेभाज्या आणि फळांच्या उद्योग व्यवसायासाठी स्वतंत्र मालवाहू विमानसेवा सुरू करण्यासंबंधी कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ , अशी माहितीही त्यांनी दिली .

बेळगावात आज भाजपतर्फे निघालेल्या तिरंगा यात्रेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या , ' बेळगावच्या औद्योगिक विकासाचा वेग वाढला आहे . निर्यातीसंबंधीचे व्यवहार सामान्यपणे सध्या गोवा किंवा मुंबईला जाऊन करावे लागत आहे . त्यामुळे पहिल्यांदा येथून ती शहरे गाठावे लागतात . यानंतर तेथून वस्तूंची निर्यात होत असल्याने खर्च व वेळ लागत आहे . पर्याय म्हणून बेळगावात विभागीय कार्यालय सुरू करण्याची मागणी होत आहे . लवकरच हे कार्यालय सुरू केले जाईल . ''
' फळ आणि भाजीपाल्याची बेळगावात मोठी उलाढाल आहे . शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आणि उलाढालीसाठी, शेतकऱ्यांना चालना देण्यासाठी मालवाहू विमानसेवा सुरू केली जाईल . हा विषय कृषी विभागाच्या अखत्यारीतही आहे . यासाठी या संदर्भात कृषी मंत्रालयाशी चर्चा केली जाईल . त्यांच्याकडून येणाऱ्या प्रतिक्रियेनंतर त्यावर निर्णय घेतला जाईल , '' असे त्यांनी सांगितले .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹सिंधू , साक्षीसाठीही खेलरत्नची शिफारस

नवी दिल्ली - रिओ ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळवून पी. व्ही . सिंधूने इतिहास घडविला ; त्याबरोबरच राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारांतही आता इतिहास घडण्याच्या मार्गावर आहे . इतिहासात प्रथमच यंदा या पुरस्कारासाठी सिंधू , साक्षी मलिक, जीतू राय व दीपा कर्माकर या सर्वाधिक , तब्बल चार खेळाडूंची शिफारस क्रीडा मंत्रालयाकडे पोचली आहे . राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते क्रीडादिनी 29 ऑगस्टला खेलरत्न व अर्जुन पुरस्कारांचे वितरण होणार आहे
.
दरम्यान , रिओ ऑलिंपिकच्या पदकतालिकेत कुस्तीगीर योगेश्वर दत्त ही भारताची अखेरची आशा आहे . मात्र त्याने पदक मिळविले तरी त्याला याआधीच हा सन्मान मिळाला आहे . लंडन ऑलिंपिकमध्ये ब्रॉंझपदक मिळविल्यावरच दत्त याला खेलरत्न देऊन सन्मानित करण्यात आले होते .

केंद्र सरकारने 2009 मध्ये एक विशेष नियम बनविला असून त्यानुसार ऑलिंपिक , आशियाई या स्पर्धांमध्ये देशाची मान उंचावणाऱ्या खेळाडूंना खेलरत्न देण्याबाबत संख्येचा अडसर येणार नाही . त्यानुसार सिंधूसह चौघांना यंदाचा खेलरत्न सन्मान देणे निश्चित मानले जाते. नियोजनानुसार याची फाईल आजच हलेल , असे अपेक्षित होते . मात्र दिल्लीत शनिवार - रविवार हा बाबूंच्या सुटीचा हंगाम असल्याने पुढील आठवड्यात याबाबतची अधिकृत सूचना मिळेल असे मानले जाते.

क्रीडा मंत्रालयाच्या पुरस्कार समितीने खेलरत्न पुरस्कारांसाठी आर्टिस्टिक जिमनॅस्टिकमध्ये अंतिम फेरीत चौथ्या स्थानावर राहिलेली दीपा कर्माकर व नेमबाज जीतू राय यांच्या नावांची शिफारस याआधीच पाठविली होती . त्यानंतर महिला कुस्तीगीर साक्षी मलिकने ब्रॉंझपदक पटकावले ; तर पी. गोपीचंद यांची शिष्योत्तम असलेली सिंधू हिने बॅडमिंटनमधील रौप्यपदकाला गवसणी घालून सोनेरी इतिहास घडविला .

 साहजिकच, या दोघींनाही यंदा सन्मानित करण्यासाठी थेट पंतप्रधान कार्यालयाकडून हालचाली सुरू झाल्या . त्यांची पूर्तता योगेश्वरच्या सामन्यानंतर होणे अपेक्षित आहे . 2009 मध्ये जेव्हा नियम प्रथम बदलला तेव्हा बीजिंग ऑलिंपिकमधील पदकविजेते सुशीलकुमार व मुष्टियोद्धा विजदेंजरसिंह यांची नावे सुरवातीला निश्चित झाली होती . त्यानंतर जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यवीर मेरी कोम हिच्या नावाची शिफारस खुद्द तत्कालीन क्रीडामंत्र्यांनी केली तरी क्रीडा मंत्रालयातील बाबूशाहीने प्रथम नियमांचा लाल दिवा दाखविला. त्यानंतर केंद्राने हे खेलरत्नचे नियमच बदलून आशियाई - ऑलिंपिक - जागतिक क्रीडा स्पर्धांच्या वर्षांत पुरस्कार विजेत्यांच्या संख्येची अट शिथिल केली . या पुरस्कारांच्या इतिहासात यंदा सर्वाधिक चार खेळाडू खेलरत्न सन्मानाच्या नजीक पोचले आहेत.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹Titans ला टाटा ऑटोकॉम्प सिस्टम विकत घेणार

टाटा समुहाच्या वाहनांचे पूरक वस्तु चा विभाग, टाटा ऑटोकॉम्प सिस्टम ने अग्रगण्य इंजिन कूलिंग पुरवठादार TitanX ला विकत घेणार असल्याचे जाहीर केले आहे.या संपादनातून जगभरात उपस्थित असलेल्या कूलिंग आणि उत्सर्जन नियंत्रण विभागांना बळकट करण्याचे टाटा चे धोरण आहे.TitanX हे सुमारे USD 200 मिलियन विक्री व्यवहार असलेले युरोप, चीन, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका मध्ये पसरलेल्या व्यावसायिक वाहन उद्योगांसाठी एक प्रमुख इंजिन आणि पॉवरट्रेन कूलिंग उपाय पुरवठादार आहे. TitanX ही सध्या EQT ऑपर्चुनिटी अँड फूरिएर ट्रान्सफॉर्म च्या मालकीची आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2016 प्रकाशित झाले,भारताचा त्यामध्ये 66 वा स्थान

128 राष्ट्रांच्या या ग्लोबल इनोव्हेशन निर्देशांक (2016) मध्ये भारताचे स्थान 15 स्थानांनी यावर्षी वर चढत 66 व्या क्रमांकावर आले आहे. शिवाय अहवालानुसार, भारत माहिती व संपर्क तंत्रज्ञान (Information and communication technology-ICT) सेवा मध्ये जगातील टॉप निर्यातदार ठरले आहे.GII 2016 ची संकल्पना/थीम म्हणजे 'विंनिंग वीट ग्लोबल इनोव्हेशन’ हे होते. हे निर्देशांक जीनिव्हा येथे मुख्यालय असलेल्या जागतिक बौद्धिक मालमत्ता संघटन (World Intellectual Property Organisation -WIPO), कॉर्नेल विद्यापीठ आणि INSEAD यांच्या मार्फत जाहीर करण्यात आले.GII 2016 हे राष्ट्रांच्या 7 मूलभूत बेंचमार्क वर आधारित आहे, त्यामध्ये व्यवसाय सुसंस्कृतपणा, ज्ञान आणि तंत्रज्ञानाचे परिणाम, सर्जनशील परिणाम, संस्था, मानवी भांडवल आणि संशोधन, पायाभूत सुविधा, बाजार सुसंस्कृतपणा यांचा समावेश आहे

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹भारताने एल निनो परिणामांना सामोरे जण्यासाठी झिम्बाब्वे ला USD 1 दशलक्ष ची आर्थिक मदत देणार

आफ्रिकन रिपब्लिक कडून आलेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून, भारताने एल निनो द्वारे सामोरे आलेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी झिम्बाब्वे साठी एक दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी आर्थिक मदत मंजूर केली आहे.तसेच मदतीचा दुस-या टप्प्याचा भाग म्हणून, भारत झिम्बाब्वे ला त्यांच्या पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या  कृषी क्षेत्रामुळे 500 मेट्रिक टन तांदूळ ची मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.एल निनो परिस्थिती म्हणजे विषुववृत्तीय पॅसिफिक क्षेत्राला भयंकररीत्या प्रभावित करणार्‍या हवामान बदलांच्या अनियमितपणे आढळणार्‍या आणि एक गुंतागुंतीची मालिका आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹सिंधू , साक्षी , दीपाला ' खेलरत्न ' पुरस्कार

नवी दिल्ली : रिओ ऑलिंपिकमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या पी. व्ही . सिंधू , साक्षी मलिक, दीपा कर्माकर यांच्यासह जितू राय यांना आज ( सोमवार ) प्रतिष्ठेचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला . धावपटू ललिता बाबर, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे , हॉकीपटू व्ही . आर. रघुनाथ, कुस्तीपटू विनेश फोगट यांच्यासह 15 खेळाडूंना ' अर्जुन ' पुरस्कार जाहीर झाला आहे .

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार :
पी. व्ही . सिंधू ( बॅडमिंटन )
दीपा कर्माकर ( जिम्नॅस्टिक्स )
जितू राय ( नेमबाजी )
साक्षी मलिक ( कुस्ती)

द्रोणाचार्य पुरस्कार :
नागापुरी रमेश ( ऍथलेटिक्स)
सागर दयाल ( मुष्टियुद्ध )
राजकुमार शर्मा ( क्रिकेट )
बिश्वेश्वर नंदी ( जिम्नॅस्टिक्स )
प्रदीप कुमार ( जलतरण )
महावीरसिंह ( कुस्ती)

अर्जुन पुरस्कार :
अजिंक्य रहाणे ( क्रिकेट )
ललिता बाबर ( ऍथलेटिक्स )
शिवा थापा ( मुष्टियुद्ध )
अपूर्वी चंडेला ( नेमबाजी )
रजत चौहान ( तिरंदाजी )
सौरव कोठारी ( बिलियर्डस )
सुब्रत पॉल ( फुटबॉल )
राणी ( हॉकी )
व्ही . आर. रघुनाथ ( हॉकी )
गुरप्रितसिंग ( नेमबाजी )
सौम्यजित घोष ( टेबल टेनिस )
विनेश फोगट ( कुस्ती)
अमित कुमार ( कुस्ती)
संदीपसिंग मान ( पॅरा - ऍथलेटिक्स )
वीरेंद्रसिंह ( कुस्ती)

ध्यानचंद पुरस्कार :
गीता सत्ती ( ऍथलेटिक्स )
सिल्व्हानस डुंग डुंग ( हॉकी )
राजेंद्र प्रल्हाद शेळके ( रोईंग)

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹हिमाचल प्रदेशमध्येही ' जीएसटी 'चा मार्ग मोकळा

शिमला : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित वस्तू आणि सेवा कर घटनादुरुस्ती ( जीएसटी ) विधेयकास हिमाचल प्रदेशच्या विधानसभेनेही आज ( सोमवार) मंजुरी दिली . या घटनादुरुस्ती विधेयकास मंजुरी देणारे हिमाचल प्रदेश हे चौथे राज्य ठरले आहे .

हिमाचल प्रदेशच्या विधानसभेचे एका आठवड्याच्या अधिवेशनाची आजपासून सुरवात झाली . मुख्यमंत्री वीरभद्रसिंह यांनी पहिल्याच दिवशी हे विधेयक विधानसभेत मांडले . 68 सदस्य असलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये कॉंग्रेसचे 36 , भाजपचे 28 आणि चार अपक्ष असे संख्याबळ आहे . चारही अपक्षांचा सत्ताधारी कॉंग्रेसला पाठिंबा आहे . मुख्यमंत्री वीरभद्रसिंह यांनी हे विधेयक मांडल्यानंतर लगेचच त्यावर मतदान घेण्यात आले . विशेष म्हणजे, भाजपने याआधी वेगळ्या कारणासाठी सभात्याग केला होता ; मात्र ' जीएसटी ' वरील मतदानासाठी भाजपचे सर्व आमदार पुन्हा विधानसभेत परतले . या विधेयकावर विधानसभेत चर्चा झाली नाही .

यापूर्वी बिहार , झारखंड आणि आसाम या राज्यांनीही घटनादुरुस्ती विधेयकास मंजुरी दिली आहे . छत्तीसगड आणि गुजरात या दोन्ही राज्यांमध्ये या विधेयकास मंजुरी मिळविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे . देशातील करप्रणालीमध्ये आमूलाग्र बदल घडविणारे ' जीएसटी ' प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी देशातील किमान 15 राज्यांच्या विधानसभांनी त्यास मंजुरी देणे आवश्यक आहे . राज्यसभा आणि लोकसभेने यापूर्वीच हे विधेयक मंजुर केले आहे .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹' राज्यात बाबासाहेबांची साहित्य अकादमी स्थापणार '

नागपूर - डॉ . बाबासाहेब आंबेडकर हे गाढे अभ्यासक होते . समाजातील विविध समस्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी अनेक ग्रंथ लिहिलीत . देशविदेशात बऱ्याच प्रमाणात बाबासाहेबांचे साहित्य आणि ग्रंथसंपदा असल्याने ती ग्रंथसंपदा आणि साहित्य जपणारी अकादमी राज्यात तयार करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी केली .

राज्यासह देशात डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे . या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. याच अनुषंगाने राज्यातील विद्यापीठांतर्फे राज्यस्तरीय समाजप्रबोधन विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले. या वेळी कुलगुरूंच्या शुभेच्छा संदेशात विशेष पाहुणे असलेले उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ , जळगावचे डॉ . सुधीर मेश्राम यांनी मुंबईच्या इंदू मिल येथील जागेवर बाबासाहेबांच्या नावाने साहित्य अकादमी तयार करण्यात यावी , तसेच त्यात बाबासाहेबांचे संपूर्ण साहित्य ठेवण्यात यावे अशी मागणी राजकुमार बडोले यांना केली . त्याला उत्तर देताना , त्यांनी सफाईदार पद्धतीने "इंदू मिल' च्या जागेचा संदर्भ टाळून राज्यात अशी साहित्य अकादमी तयार करण्याची घोषणा केली .

" स्टडी सेंटर ' साठी 42 कोटींचा प्रस्ताव

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विदर्भातील विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने " यशदा' च्या धर्तीवर एक अत्याधुनिक " स्टडी सेंटर ' सुरू करण्यासाठी 42 कोटींचा प्रस्ताव असल्याची माहिती कुलसचिव पुरण मेश्राम यांनी दिली . त्या केंद्राला सामाजिक न्याय विभागाने मदत करण्याचे आवाहन कुलसचिवांनी केले. त्याला प्रतिसाद देत , त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही राजकुमार बडोले यांनी दिली .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹साक्षी भारताची ध्वजधारक ; भारत 67 व्या स्थानी

रिओ - रिओ ऑलिंपिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून देणारी कुस्तीपटू साक्षी मलिकला समारोप समारंभात ध्वजधारकाचा मान देण्यात आला . साक्षीने मारकाना स्टेडियमवर भारताचा ध्वज फडकावला .

रविवारी रात्री झालेल्या समारोप सोहळ्यात सर्वच देशांचे खेळाडू आपला ध्वज घेऊन सहभागी झाले होते . उद्घाटन सोहळ्यात नेमबाज अभिनव बिंद्रा भारतीय पथकाचा ध्वजधारक होता .
 साक्षी मलिकने 58 किलो वजनी गटात भारताला ब्राँझपदक मिळवून दिले होते . साक्षीने भारतासाठी पहिले पदक मिळविल्याने समारोप सोहळ्यात तिला हा मान देण्यात आला . या ऑलिंपिकमध्ये भारताला फक्त दोन पदक मिळविण्यात यश आले . भारताला साक्षीने ब्राँझ आणि बॅडमिंटनपटू पी. व्ही . सिंधू रौप्य पदक मिळवून दिले . यामुळे दोन पदकांसह भारत पदकतालिकेत 67 व्या स्थानावर राहिला .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹लैंगिक संबंधाची मागणी करणे हा भ्रष्टाचारच प्रस्तावित नवीन कायद्यातील तरतूद

प्रस्तावित नवीन भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यात एखाद्या कामासाठी लैंगिक संबंधाची मागणी करणे हाही भ्रष्टाचार गणला गेला आहे. सध्या हा कायदा संसदीय समितीपुढे मांडला असून त्यात एखादे काम करण्यासाठी लैंगिक संबंधाची मागणी करणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. नवीन भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यावर दिलेल्या अहवालात राज्यसभेच्या समितीने कायदा आयोगाने सुचवलेल्या तरतुदींना मान्यता दिली आहे.

सरकारी सेवकांनी एखाद्या कामासाठी कायदेशीर शुल्काशिवाय लाच देणे हा तर गुन्हा आहेच शिवाय काम करण्याच्या बदल्यात लैंगिक संबंधांची मागणी करणे हाही गुन्हा आहे. खासगी क्षेत्रातही लाचखोरी हा प्रथमच गुन्हा ठरवण्यात आला आहे. त्यामुळे खासगी क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी एखाद्या कामासाठी लाच घेतली, तर त्यांनाही या कायद्यानुसार शिक्षा होणार आहे. त्यासाठी सात वर्षे तुरुंगवास व दंड अशी शिक्षा सुचवण्यात आली आहे. लाच देणाऱ्यांना शिक्षा करण्याची शिफारसही त्यात आहे.

सध्या भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अस्तित्वात आहे पण आता नवीन कायद्यात भ्रष्टाचाराच्या व्याख्येची व्याप्ती वाढवली असून त्यात खासगी क्षेत्राचाही समावेश करण्यात आला आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक (सुधारणा) विधेयक २०१३ प्रलंबित असून त्यात भ्रष्टाचार म्हणजे एखाद्या कामासाठी पैसे किंवा इतर लाभ घेणे अशी व्याख्या आहे. नोव्हेंबरमध्ये या विधेयकात काही सुधारणा सुचवण्यात आल्या असून त्यात एखाद्या कामासाठी निर्धारित केलेल्या कायदेशीर शुल्कापेक्षा अधिक पैसे घेणे शिक्षापात्र ठरवण्यात आले आहे. राज्यसभेच्या समितीने म्हटले आहे, की या विधेयकातील ‘अकारण फायदा उकळणे’ या शब्दाचा वेगळा अर्थ लावला जाऊन कायदा अंमलबजावणी संस्था गैरवापर करू शकतात अशी भीती आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹गोव्यात ब्रिक्स परिषदेसाठी 11 देशांतील 80 व्हीव्हीआयपी येणार

राज्यात येत्या ऑक्टोबरमध्ये 15 व 16 रोजी ब्रिक्स परिषद होणार असल्याने तत्पूर्वी रस्त्याच्या बाजूचे सगळे होडींग्ज आणि बॅनर्स काढून टाकावेत, असा आदेश सरकारने दिला आहे. सुरक्षेनिमित्त ही काळजी घेतली जाणार असून ब्रिक्स परिषदेच्यावेळी कुत्रे व गुरे देखील महामार्गावर येऊ नये म्हणून काळजी घेतली जाणार आहे.

संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, केंद्रीय आयुष खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक, खासदार नरेंद्र सावईकर यांच्या सहभागाने सोमवारी पर्वरी येथे उच्चस्तरीय बैठक झाली. ब्रिक्स परिषदेच्या तयारीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. तसेच काही सूचनाही विविध सरकारी खात्यांना करण्यात आल्या.

एकूण अकरा देशांतील सुमारे आठशे अतिमहनीय व्यक्ती ब्रिक्स परिषदेनिमित्त गोव्यात येणार आहेत. त्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने संरक्षण मंत्रलय, गृह मंत्रलय, नौदल, तट रक्षक दल, महाराष्ट्र पोलिस यांचीही मदत घेतली जाणार आहे. सोमवारच्या बैठकीस केंद्रीय परराष्ट्र सचिव, केंद्रीय गृह मंत्रलयाचे सचिव तसेच महाराष्ट्राचे अधिकारीही उपस्थित होते. संरक्षण मंत्रलयाकडून गोवा सरकारला ब्रिक्स परिषदेवेळी कोणती मदत व सहकार्य हवे आहे हे र्पीकर यांनी बैठकीवेळी जाणून घेतले.

ब्रिक्स परिषद दक्षिण गोव्यात होणार असून तेथील काही पंचतारांकित हॉटेल्स व दक्षिण आणि उत्तर गोव्यातील चार मोठी इस्पितळे सज्ज ठेवावी असे ठरले आहे.

हॉटेल्स आरक्षितही करण्यात आली आहेत. चीन, दक्षिण आफ्रिका, रशिया, ब्राङिाल आदी देशांतील अतिमहनीय व्यक्तींचे स्वागत करण्याची जबाबदारी गोव्यावर आहे. एकूण परिषदेच्या आयोजनाची जबाबदारी गोव्यावर असून गोव्याला या परिषदेचा मोठा लाभ होईल. पर्यटन क्षेत्रत जगभर गोव्याचे नाव होण्यास ब्रिक्स परिषद उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री पार्सेकर यांनी बैठकीनंतर लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

तीन दिवस उडती रुग्णवाहिका

ब्रिक्स परिषदेवेळी तीन दिवस उडती रुग्णवाहिका गोव्यात ठेवली जाणार आहे. अशा प्रकारची रुग्णवाहिका केवळ संरक्षण मंत्रलयाकडे आहे पण ती उपलब्ध होईलच असे नाही. त्यामुळे विदेशातून उडती विशेष रुग्णवाहिका आणण्याचा विचार आहे. ती खास रुग्णवाहिका आता आरक्षित केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ब्रिक्स परिषदेनिमित्त 14 रोजी पंतप्रधान मोदी गोव्यात दाखल होणार आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्षही ब्रिक्स परिषदेत भाग घेणार आहेत. महाराष्ट्रातील पोलिस अधिका:यांची दोन पथके परिषदेवेळी गोव्यात नियुक्त केली जातील.

#eMPSCkatta_Telegram_Updates

साक्षरतेच्या बाबतीत देशामध्ये आघाडीवर असलेल्या केरळने हागणदारीमुक्त राज्य बनण्याच्या दिशेन वाटचाल सुरू केली आहे. यावर्षी नोव्हेंबर पर्यंत राज्यातील ९४१ ग्रामपंचायतींमध्ये १.९ लाख शौचालयांची उभारणी केली जाणार आहे. यानंतर केरळ देशातील पहिले उघड्यावर शौचमुक्त राज्य ठरणार आहे.

 मातंग समाजास स्वाभिमानाने जगण्यास शिकवणारे तसेच राज्य शासन व प्रशासकीय पातळीवर मातंग समाजाचा कायमस्वरूपी ठसा उमटवणारे अखिल भारतीय मातंग संघाचे अध्यक्ष व मातंग समाजाचे नेते बाबासाहेब गोपले यांचे रविवारी मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु तथा भगवतगीतेचे गाढे अभ्यासक डॉ. भगतसिंह हणुमंतराव राजूरकर यांचे रविवारी  वृध्दापकाळाने निधन झाले.

मे, जून १९७८ मध्ये प्रभारी कुलगुरु म्हणून त्यांनी काम केले. तर १ मे १९८५ ते ६ मार्च १९८८ दरम्यान त्यांनी कुलगुरु म्हणून काम पाहिले. जुलै १९९५ मध्ये ते निवृत्त झाले.

रिओ ऑलिंपिकमध्ये भारताला साक्षीने ब्राँझ आणि बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू रौप्य पदक मिळवून दिल्यामुळे भारत पदकतालिकेत ६७ व्या स्थानावर राहिला.

अमेरिकेने १२१ [ ४६ सुवर्ण, ३७ रौप्य आणि ३८ ब्राँझपदके ] पदके जिंकून अव्वल स्थान मिळविले.

ग्रेट ब्रिटनने ६७ [ २७ सुवर्ण, २३ रौप्य आणि १७ ब्राँझ ] पदके मिळवून दुस-या स्थानावर.

चीनला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
चीनने [ २६ सुवर्ण, १८ रौप्य आणि २६ बाँझ ] अशी ७० पदके मिळविली.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹अनंत माहेश्वरी मायक्रोसॉफ्टचे भारतातील अध्यक्ष

तंत्रविशेषण अनंत माहेश्वरी यांना मायक्रोसॉफ्टचे भारतातील अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले.ते सप्टेंबर 2016 पासून आपला पदभार स्वीकारतील आणि जानेवारी 2017 पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करतील.

ते मार्च 2017 मध्ये निवृत्त होणाऱ्या भास्कर प्रामाणिक यांची जागा घेतील.
अंनत माहेश्वरी मायक्रोसॉफ्टचे भारतातील उत्पादने सेवा ,सपोर्ट इ कामे पाहतील.
अनंत माहेश्वरी यांनी बीट्स पिलानी येथून इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रोनिक मध्ये अभियांत्रिकी पदवी व अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹जगातील श्रीमंत देशांमध्ये भारत सातवा

जगभरातील श्रीमंत देशांमध्ये भारताने सातवा क्रमांक पटकावला असून , अमेरिका यात आघाडीवर आहे . भारतातील व्यक्तिगत संपत्ती 5 हजार 600 अब्ज डॉलर गेली आहे .

" न्यू वर्ल्ड वेल्थ ' ने आज व्यक्तिगत संपत्तीच्या आधारे श्रीमंत देशांचा अहवाल जाहीर केला . यातील यादीत भारत सातव्या स्थानी आहे . कॅनडातील व्यक्तिगत संपत्ती 4 हजार 700 अब्ज डॉलर , ऑस्ट्रेलियातील 4 हजार 500 अब्ज डॉलर , इटलीतील 4 हजार 400 अब्ज डॉलर असून , भारत त्यांच्यापुढे आहे . एकूण व्यक्तिगत संपत्तीचा विचार करता अमेरिका आघाडीवर असून , अमेरिकेतील व्यक्तिगत संपत्ती 48 हजार 900 अब्ज डॉलर आहे . चीन आणि जपान दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर असून , त्यांची संपत्ती अनुक्रमे 17 हजार 400 अब्ज डॉलर आणि 15 हजार 100 अब्ज डॉलर आहे . पहिल्या दहा देशांमध्ये ब्रिटन 9 हजार 200 अब्ज डॉलर संपत्तीसह चौथ्या स्थानी आहे . जर्मनी 9 हजार 100 अब्ज डॉलर संपत्तीसह पाचव्या आणि फ्रान्स 6 हजार 600 अब्ज डॉलर संपत्तीसह सहाव्या स्थानी आहे .
मागील पाच वर्षांत डॉलरच्या आधारे विचार करता सर्वाधिक वेगाने वाढणारी श्रीमंत अर्थव्यवस्था चीनची ठरली आहे . जून महिन्यात जगभरातील देशांतील संपत्तीचा अभ्यास करण्यात आला . त्याआधारे जगभरातील श्रीमंत देशांची ही यादी जाहीर करण्यात आली आहे . याला व्यक्तिगत संपत्ती आधार मानण्यात आली आहे .

भारताला लोकसंख्येचे पाठबळ
भारत या यादीत जगातील पहिल्या दहा देशांमध्ये येण्याचे प्रमुख कारण हे लोकसंख्या आहे . भारताची लोकसंख्या जास्त असल्यामुळे एकूण व्यक्तिगत संपत्ती जास्त होत आहे . ऑस्ट्रेलियाची कामगिरी चमकदार असून , या देशाची लोकसंख्या केवळ 2 . 2 कोटी आहे , असे अहवालात म्हटले आहे .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹भारताचा विकासदर 7.8 % पर्यंत जाण्याचा अंदाज

चांगल्या मॉन्सूनमुळे चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 7 . 8 टक्क्यांवर पोचेल , असा सुधारित अंदाज इंडियन रेटिंग अँड रिसर्च ( इंड - रा ) या पतमानांकन संस्थेने मंगळवारी वर्तविला. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर निर्माण झालेल्या आशादायी वातावरणानंतरही अर्थव्यवस्थेने वेग घेतला नसल्याचे संस्थेने म्हटले आहे .

" इंड - रा ' ने अर्थव्यवस्थेचा आढावा अहवाल जाहीर केला आहे . चालू आर्थिक वर्षात देशांतर्गत एकूण उत्पादन ( जीडीपी) 7 . 7 टक्क्यांवर जाईल , असा अंदाज आधी संस्थेने व्यक्त केला होता . आता यात सुधारणा करून ते 7 . 8 टक्के राहील , असे म्हटले आहे . याला मॉन्सूनची चांगली स्थिती आणि खरीप हंगामातील पेरणी या गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत . खरिपाची पेरणी सरासरी क्षेत्रापेक्षा 5 . 7 टक्के अधिक आहे . यामुळे कृषी उत्पादन 3 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे . आधी ते 2 . 8 टक्के वाढेल , असा अंदाज होता . मॉन्सून आणि खरीप हंगाम या दोन्ही सकारात्मक बाबींमुळे एकूणच जीडीपीमध्ये वाढ होईल , असे संस्थेने नमूद केले आहे .

अर्थव्यवस्थेचा व्यापक पातळीवर विचार करता वाढ सुरू आहे , मात्र तिला हवी तेवढी गती मिळताना दिसत नाही . केंद्रात 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्याने आशादायी वातावरण निर्माण झाले होते . मात्र आर्थिक विकासाचा वेग संथच आहे . चालू सरकारने यासाठी पावलेही उचलली आहेत. सरकारने उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन आणि व्यवसाय करण्याच्या वातावरणात सुधारणा करण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. सेवा क्षेत्राची वाढ प्रामुख्याने होताना दिसत असली तरी औद्योगिक पातळीवर चिंतेची परिस्थिती आहे , असे संस्थेने म्हटले आहे .
सध्याच्या सरकारने खासगी गुंतवणूक वाढीसाठी अनेक पावले उचलली आहेत. यात उत्पादन क्षेत्राला चालना देण्यात येत आहे . मात्र अर्थव्यवस्थेला मोठी गती देण्यात हे प्रयत्न फारसे यशस्वी ठरताना दिसत नाही . सरकारकडून भांडवली खर्चात वाढ होत असल्यामुळे चालू आर्थिक वर्षात गुंतवणूक पाच टक्के वाढेल , असे संस्थेने नमूद केले आहे .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹' टोरंट'चा वापर केल्यास शिक्षा ?

इंटरनेटवर टोरंट संकेतस्थळांना भेट देत त्याद्वारे मजकूर बेकायदेशीरपणे डाउनलोड केल्यास तीन लाख रुपये दंड आणि तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होण्याचा इशारा प्रसिद्ध झाल्याने इंटरनेट यूजर्सना धक्का बसला आहे . टोरंट संकेतस्थळांना केवळ भेट दिली , तरी ही शिक्षा होण्याचाही इशारा असल्याने अनेकांनी तक्रार केली आहे .

केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने इंटरनेट पुरवठादारांना टोरंट संकेतस्थळे ब्लॉक करण्याची आणि यूजर्सना इशारा देण्याची सूचना केली आहे . प्रसिद्ध झालेल्या सूचनेमध्ये शंकेला अनेक जागा असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे . तज्ज्ञांच्या मते , टोरंट संकेतस्थळांना केवळ भेट दिल्याने शिक्षा करता येणार नाही . मात्र, त्यावरून डाउनलोड केल्यास कारवाई होऊ शकते . अनेक चित्रपट प्रसिद्ध होण्यापूर्वीच ते टोरंट संकेतस्थळांवरून डाउनलोड होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलले असल्याचे समजते . याबाबत सरकारने अद्यापपर्यंत कोणतीही अधिकृत लेखी सूचना जारी केलेली नाही .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹25 वर्षांपूर्वी आज झाला इंटरनेटचा जन्म

आज तुम्ही स्वतला इंटरनेट शिवाय विचार करु शकता का ? नाही ना. 1991 मध्ये आजच्या दिवशी इंटरनेट सगळ्यासाठी खुल करण्यात आलं होत. तेव्हांपासून आजतागत इंटरनेट वापरणाऱ्यांची सख्या दिवसेदिवस वाढतच चालली आहे. आणि भविष्यातही ती संख्या वाढतच जाणार आहे. इंटरनेट हे संगणकांच्या जगभर पसरलेल्या कित्येक लाख अशा नेटवर्कस्चे चे मिळून बनलेले एक प्रचंड नेटवर्क आहे. त्यालाचं World Wide Web (WWW) असं म्हटलं जातं.

1969 मध्ये अमेरिकेने अनुदान दिलेल्या एका प्रोजेक्टरने इंटरनेशनल संगणक नेटवर्क विकसित केले . जगातील छोट्या नेटवर्कला जोडणारे नेटवर्क म्हणजे इंटरनेट होय . 1992 मध्ये स्वित्झलंड येथे सेंटर फॉर उरोपिन न्यूक्लिअर रिसर्च मधून (CERN) वेब अर्थात वर्ल्ड वाइड वेब (WWW) आपल्या पर्यंत पोहचले . ह्याच्या पूर्वी इंटरनेट म्हणजे ग्राफिक्स , एनीमेशन , ध्वनी व्हिडिओ इंटरफेस नसलेल माध्यम होते . वेब मुळे ह्या सर्व गोष्टी नेट वर पहाणे शक्य झाले . आणि इंटरनेट 21 व्या शतकातील एकमेकांच्या संपर्काचे प्रभावी साधन बनले. इंटरनेट वायर, केबल, सॅटॅलाइट यांच्याशी जोडून बनले आहे . तर वेब इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या डाटा सही जोडून देतो ते वेब .इंटरनेट चा वापर खलील गोष्टी साठी सामान्यत केला जातो.

सपर्क :- इंटरनेट द्वारे केलि जाणारी ही एक लोकप्रिय बाब आहे . तुम्ही ईमेल च्या द्वारे तुम्ही कुठल्या ही जगातील व्यक्तिशी संपर्क साधू शकता . आवडीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी भाग घेवू शकता इतकेच नाही तर तुम्ही स्वतच वेब पेज म्हणजेच वेब साईट ही बनवू शकता .

शॉपिंग :- इंटरनेट च्या माध्यमातून तुम्ही शॉपिंग करू शकता किवा एखादी वस्तु विकू ही शकता . बाजारात आलेल्या नविन वस्तुंची माहिती नेट मुळे आपणास बघायला मीळते. एलेक्ट्रोनिस्क कार्ड किवा डेबिट कार्ड वापरून तुम्ही ही खरेदी करू शकता .

सर्चिंग :- एखाद्या विषयावर माहिती शोधणे इंटरनेट मुळे सोपे झाले आहे . जगातील कुठल्या ही वस्तूची अथवा गोष्टीची माहिती हवी असल्यास ती आपणास इंटरनेट मुळे मीळू शकते . शिवाय इ-बुक मुळे कुठल्या ही ग्रंथालायाची बुक्स, पुस्तके आपणास नेट वर फ्री मध्ये वाचायला भेटतात . शिवाय ऑनलाइन न्यूज़ ही वाचायला किवा व्हीडीओ द्वारे बघायला मीळते.

मनोरंजन :- या विषयावर सांगाव तेवढ कमी आहे कारण या विषयावर इंटरनेट वर भरपूर माहितींचा खजाना आहे . संगीत , चित्रपट , मासिक तसेच आता ऑनलाइन चित्रपट ही आपण नेटवर पाहू शकतो . सध्या ऑनलाइन गेम्सही उपलब्ध आहेत .
इंटरनेटमुळे आज जरी जग जवळ आलेले असले तरी सायबर क्राईमच्या रुपातील त्याचे दुष्परिणामही भोगावे लागत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने इंटरनेटचा वापर जबाबदारीने करायला हवा.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹हत्तींसाठी 2 किलोमीटरची भिंत पाडण्याचे आदेश

 काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील हत्तींच्या मार्गात अडथळा ठरणारी तब्बल दोन किलोमीटर अंतराची एका खाजगी कंपनीची भिंत पाडण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत.

नैसर्गिकरित्या आसाममध्ये विस्थापित होणाऱ्या हत्तींच्या मार्गात एक 2. 2 किलोमीटर अंतराची भिंत अडथळा ठरत होती . नुमालिगड रिफायनरी लिमिटेड ( एनएफएल) या कंपनीची ही भिंत 2011 साली बांधण्यात आली होती . या भिंतीमुळे हत्तीचे एक पिल्लू मृत्युमुखी पडले होते. भिंत बांधल्यानंतर चार वर्षांची वन विभागाने वन संरक्षण कायद्याचा भंग करून ही भिंत बांधण्यासाठी जागा दिल्याचे म्हणत हरकत घेतली . होती . यावर हरित लवादाने परवानगी नसताना अविकसन क्षेत्रामध्ये ( नो डेव्हलपमेंट झोन ) भिंत उभारल्याने ती पाडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच एनएफएलला 25 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे .

Join your all friends @ChaluGhadamodi

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹भारताचा दीपोत्सव अमेरिकेत टपाल तिकिटावर

न्यूयॉर्क - अमेरिकेतील भारतीयांचा दिवाळीचा आनंद यंदा द्विगुणित होणार आहे . याचे कारण म्हणजे दिव्यांच्या या उत्सवाचे प्रतिबिंब टपाल तिकिटातून उमटणार आहे .

दिवाळीवर टपाल तिकीट काढावे, अशी मागणी अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिक अनेक वर्षांपासून करीत होते . अमेरिकेतील कायदेतज्ज्ञांनी त्यावर मोहोर उमटविल्याने यंदाच्या दिवाळीत हे टपाल तिकीट प्रकाशित होणार आहे . तेथील भारतीय समुदायाने या निर्णयाचे स्वागत केले आहे . सोनेरी रंगातील चमचमत्या पार्श्वभूमीवर ज्योतीने उजळलेल्या परंपरागत दिव्याचे चित्र या तिकिटावर असणार आहे . त्यावर "फॉरएव्हर यूएसए 2016 ' हे शब्द असतील. 5 ऑक्टोबरला या टपाल तिकिटाचे प्रकाशन होणार आहे .

दिव्यांचा सण असलेल्या दिवाळीच्या सन्मानार्थ अमेरिकेतील टपाल विभागातर्फे ( यूएसपीएस) हे तिकीट नोव्हेंबरमध्ये व्यवहारात आणले जाईल , असे येथील कॉंग्रेसच्या प्रतिनिधी कॅरोलिन मॅलोनी यांनी जाहीर केले. या ऐतिहासिक घोषणेप्रसंगी भारताच्या महावाणिज्यदूत रिवा गांगुली दास , दिवाळी तिकीट प्रकल्पाचे अध्यक्ष रंजू बात्रा व भारतीय वंशाचे वकील रवी बात्रा उपस्थित होते .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹' बेटी बचाओ, बेटी पढाओ ' ची साक्षी ब्रँड ऍम्बेसिडर

नवी दिल्ली - रिओ ऑलिंपिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून देणारी कुस्तीपटू साक्षी मलिक हिला हरियाना सरकारकडून बेटी बचाओ बेटी पढाओ या मोहिमेची ब्रँड ऍम्बेसिडर म्हणून घोषित करण्यात आले आहे . साक्षीला हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते अडीच कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला .

साक्षीचे आज ( बुधवार ) पहाटे भारतात आगमन झाले असून , दिल्ली विमानतळावर तिचे जोरदार स्वागत करण्यात आले . साक्षी ही हरियानातील रोहतक जिल्ह्यातील मोखरा खास गावातील रहिवाशी आहे . साक्षीचे आज पहाटे चारच्या सुमारास विमानतळावर आगमन झाल्यानंतर मोठा जल्लोष करण्यात आला . साक्षीच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री खट्टर यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते . ढोल -ताशाच्या गजरात तिचे स्वागत करण्यात आले . साक्षीने 58 किलो वजनी गटात ब्राँझपदक मिळविले होते.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹मदर तेरेसांच्या गौरवार्थ विशेष टपाल पाकीट

संत मदर तेरेसा यांना संतपद देण्याच्या समारंभाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या गौरवार्थ जगभरात तयारी सुरू झाली आहे. भारतातही त्यांना आदरांजली वाहण्यासाठी एक विशेष टपाल पाकीट जारी करण्यात येणार आहे. २ सप्टेंबरला या पाकिटाचे अनावरण करण्यात येईल.

भारतीय टपाल खात्यातर्फे जारी करण्यात येणारे हे पाकीट रेशमापासून बनवलेले असणार आहे. त्यावर २०१० मध्ये मदर तेरेसा यांच्या जन्म शताब्दीनिमित्त भारत सरकारने जारी केलेले पाच रुपयांचे नाणे कोरण्यात येणार आहे. अशी केवळ एक हजार पाकिटेच बनविण्यात येणार आहेत.

मदर तेरेसांचे जन्मस्थान असलेल्या मॅसेडोनिया प्रजासत्ताकमध्येही सोन्याचा मुलामा असलेले चांदीचे नाणे हे येथील खास आकर्षण असेल. १०० दिनार किंमतीची ५० नाणी भारतात पाठवली जणार आहेत.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹राज्याला तेलंगणची ‘ वेसण ’

गोदावरी खोरे पाणीवाटप करारात ८१ टीएमसीचे नुकसान

मुंबई - महाराष्ट्र व तेलंगणमध्ये गोदावरी खोरे पाणीवाटप करारावर आज शिक्कामोर्तब झाले . मात्र या करारातून तेलंगणचेच घोडे गंगेत न्हाले असून , कृष्णा खोऱ्यातील तीन राज्यांच्या पाणीवाटप लवादाने दिलेल्या निर्णयात तेलंगणने घातलेली खीळ काढण्यात महाराष्ट्राला अपयश आले आहे .

तेलंगण राज्यनिर्मितीच्या अगोदर महाराष्ट्र -कर्नाटक - आंध्र प्रदेश या राज्यांच्या पाणीवाटप लवादाने कृष्णा खोऱ्यातील ८१ टीएमसी पाणी महाराष्ट्राला अधिकचे दिले होते . मराठवाड्यातल्या दुष्काळी भागांत यातले काही पाणी वळवून दिलासा देणे शक्य होते . पण तेलंगणने या करारात हस्तक्षेप करून या पाण्याचे नव्याने चार राज्यांत फेरवाटप व्हावे , अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली . मुळात तीन राज्यांतील पाणीवाटप निवाडा अंतिम झाल्यानंतर तेलंगणने आंध्र प्रदेशच्या वाट्याला आलेल्या पाण्यावर हक्क सांगायला हवा होता . पण त्यांनी चार राज्यांत फेरवाटप होण्यासाठी हस्तक्षेप केल्याने कृष्णा खोऱ्यातील मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागणार आहे .

तेलंगणबरोबर आज मेडीगट्टा प्रकल्पाचा करार अंतिम करताना कृष्णा खोऱ्यातील ८१ टीएमसी पाण्याबाबतचा आक्षेप मागे घेण्याबाबत विषयपत्रिकेत स्पष्ट भूमिका घेणे राज्य सरकारला शक्य होते ; पण मागील तीन वर्षांत सतत ही भूमिका विविध स्तरांवरून सरकारसमोर मांडण्यात आल्यानंतरही आजही संधी हुकल्याचे चित्र आहे .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹सूर्यमालेबाहेरील ग्रहावर ऑक्सिजनचे अस्तित्व

अमेरिकेतील शास्त्रज्ञांचे संशोधन; मात्र पाण्याचा पुरावा नाही

नवी दिल्ली - सूर्यमालेबाहेरील आकाशगंगेत शुक्राशी साम्य असणाऱ्या ग्रहाचा शोध शास्त्रज्ञांना लागला आहे . याचे वैशिष्ट्य म्हणजे या ग्रहावर प्राणवायूचा ( ऑक्सिजन ) पातळ थर असल्याचे आढळले आहे . पृथ्वीपासून हा ग्रह 39 प्रकाशवर्षे दूर आहे . प्राणवायूचे वातावरण असलेला हा आपल्या सूर्यमालेबाहेरील पहिलाच ग्रह आहे , असा दावा संशोधकांनी केला आहे .

वैचित्र्यपूर्ण वातावरण
या ग्रहाचा शोध गेल्या वर्षी लागला. तेथील वैचित्र्यपूर्ण वातावरणामुळे संशोधकही आश्चर्यचकित झाले आहेत. तेथील तापमान 232 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे . नवीन संशोधनानुसार येथील वातावरण अस्पष्ट व विरळ असल्याचे निदर्शनास आले आहे . याचे नामकरण " जीजे 1132 बी' असे करण्यात आले आहे . अमेरिकेतील हॉवर्ड - स्मिथसोनियन सेंटर फॉर ऍस्ट्रोफिजिक ( सीएफए ) या संस्थेतील खगोलशास्त्रज्ञ लॉरा शेफर व त्यांचे सहकारी याविषयी संशोधन करीत आहे . "जीजे 1132 बी' वर वाफेसारखे व जलयुक्त वातावरण असले तर काय घडू शकते , याचा अभ्यास शेफर करीत आहेत.

ऑक्सिजन आहे , पाणी नाही !
" जीजे 1132 बी' हा ग्रह त्यांच्या सूर्यमालेतील ताऱ्याच्या अत्यंत जवळ आहे . हे अंतर 14 लाख मैल इतके आहे . या ग्रहावर अतिनील अथवा "यूव्ही ' किरण मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून आले आहे . हे किरण पाण्यातील रेणूंचे हायड्रोजन व ऑक्सिजनमध्ये विभाजन करतात . हायड्रोजन हा ऑक्सिजनपेक्षा हलका असल्याने तो अंतराळात नाहीसा होतो . त्यामुळे "जीजे 1132 बी' वर प्राणवायूचे विरळ वातावरण असल्याचे निदर्शनास आले आहे . मात्र जीवसृष्टीसाठी अनिवार्य असलेल्या पाण्याचे अस्तित्व येथे आढळलेले नाही . दोन्ही वायू अवकाशात नाहीसे होतात . ""थंड ग्रहावर असलेला ऑक्सिजन हा निवासास योग्य समजला जातो ; पण "जीजे 1132 बी' सारख्या गरम वातावरणाच्या ग्रहावर अगदी याच्या विरुद्ध स्थिती आहे , असे मत शेफर यांनी नोंदविले आहे . या ग्रहावर हरित वायूचा मोठा प्रभाव आहे . यावर आधीच गरम वातावरण असल्याने येथील पृष्ठभाग लाखो वर्षांपासून वितळत आहे , असेही त्या म्हणाल्या .

अधिक अभ्यास शक्य
या ग्रहावर आम्हाला प्रथमच ऑक्सिजनचे अस्तित्व आढळले , असे "हॉवर्ड पॉलसम स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड अप्लाइड सायन्सेस ' चे रॉबिन वर्डस्वर्थ यांनी सांगितले . " जीजे 1132बी' वर ऑक्सिजन असला तर अत्याधुनिक व शक्तिशाली "जायंट मॅग्लन' व जेम्स वेब अंतराळ दुर्बिणीतून याचा शोध घेऊन त्याचे विश्लेषण करता येईल , असे मत संशोधकांनी नोंदविले आहे .

" मॅग्मा ओशन ' ची उपयुक्तता
खगोलशास्त्रज्ञ लॉरा शेफर यांनी एक "मॅग्मा ओशन' नावाची प्रतिकृती तयार केली आहे . यातून आकाशगंगेत शुक्रासारख्या असणाऱ्या ग्रहांचा शोध घेणे शक्य होणार आहे . ग्रहांवर ऑक्सिजन का नसतो हा शास्त्रज्ञांना अनेक वर्षांपासून सतावणारा प्रश्न सोडविण्यास मदत होणार आहे . " मॅग्मा ओशन' द्वारे सूर्यमालेबाहेरील ग्रहांचा शोध घेता येणार आहे . " ट्रॅपिस्ट - 1 ' या सूर्यमालेत तीन ग्रह असून , त्यावर अधिवास करण्यायोग्य वातावरण असल्याचे आढळले आहे . हे ग्रह "जीजे 1132 बी' पेक्षा थंड असल्याने त्यावर निवासासाठी योग्य वातावरण असण्याची दाट शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹सरोगसी विधेयकाला केंद्राची मंजुरी

सरोगसी विधेयकाला केंद्राने मंजुरी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून या विधेयकासंदर्भात चर्चा करण्यात येत होती. भारतातल्या सरोगेट मातांच्या हक्कांच्या दृष्टीने हे विधेयक महत्त्वाचे आहे. तसेच या नव्या विधेयकामुळे सरोगसीच्या प्रक्रियेवर अंकुश ठेवण्यात येणार आहे. या नव्या विधेयकात अविवाहित जोडप्यांसाठी सरोगसीद्वारे अपत्य न देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच ज्यांनी याआधी अपत्य दत्तक घेतले आहेत त्यांना सरोगसीद्वारे अपत्य दत्तक घेता येणार नाही अशीही तरतूद करण्यात आली आहे. सरोगसीच्या व्यापारीकरणावर रोख लावण्यासाठी हे विधेयक अत्यंत महत्त्वाचे असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. सरोगसीद्वारे अपत्य प्राप्त करण्यासाठी अनेक परदेशी दाम्पत्य हे भारतीय मातांना प्राधान्य देतात. दरवर्षी २००० हजार विदेशी अपत्यांना भारतीय माता सरोगसीद्वारे जन्म देतात. यासाठी अनेकींना चांगले पैसे देखील मिळतात असेही सर्वेक्षणातून समोर आले आहे. परदेशी दाम्पत्याकडून भारतीय मातृत्त्व विकत घेण्यावर या विधेयकात रोख लावाण्यात आली आहे.
 या निर्णयामुळे आता फक्त मूल होऊ न शकणारे विवाहीत भारतीय दाम्पत्यच सरोगसीद्वारे मुलांना जन्म देऊ शकतात. सरोगसीद्वारे जन्म देणा-या मातांची आर्थिक स्थिती बेताची असते असेही अनेक प्रकरणात आढळून आले आहे त्यामुळे त्यांच्या भविष्यासाठी देखील यात काही तरतूदी मांडण्यात आल्या आहेत.