Post views: counter

Current Affairs August 2016 part - 2


#eMPSCkatta_Current_Affairs

🔹इराणच्या अणू शास्त्रज्ञाला दिली गुप्तरीत्या फाशी ?

हेरगिरी करणारा इराणचा अणू शास्त्रज्ञ शहराम अमिरी याचा गुप्तरीत्या मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने 2010मध्ये हेरगिरी करताना त्याला अटक केले होते. त्यानंतर त्याला इराणला परत पाठविण्यात आले. त्यानंतर तो रहस्यमयरीत्या गायब झाला होता. बीबीसीनं दिलेल्या वृत्तानुसार, अमिरी याला याच आठवड्यात गुप्तरीत्या फाशी दिली गेली आहे.
अमिरीच्या मृतदेहाच्या गळ्याला फास लावल्याचा खुणा होत्या. त्यामुळे त्याला फाशी देण्यात आली असावी, अशी माहिती त्याच्या आईनं दिली आहे. अमिरीचा 1977मध्ये जन्म झाला होता. त्यानंतर 2009साली गेलेल्या मक्का यात्रेत तो बेपत्ता झाला होता. तो इराणमधला नावाजलेला अणू शास्त्रज्ञ होता.
अमेरिकेच्या गुप्तचर विभागानं अटक केल्यानंतर त्यासंदर्भात एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये त्याला एका निर्जनस्थळी ठेवले असून, भूल देणारनं इंजेक्शन दिल्याचं त्यानं सांगितले होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹NSG साठी पाठिंबा देण्यास नकार देणा-या चीनला हवी आहे भारताची मदत

न्यूक्लियर सप्लायर ग्रुप (एनएसजी) देशांच्या गटात भारताच्या समावेशाला आव्हान देणा-या चीनने दक्षिण चीन समुद्राचा मालकी हक्क मिळवण्यासाठी भारताची मदत मागितली आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी तीन दिवसांच्या भारत दौ-यावर येत आहेत. 12 ऑगस्टपासून त्यांच्या दौ-याला सुरुवात होणार आहे. या दौ-यात वांग यी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असून जी20 बैठकीत भारताने दक्षिण चीन समुद्राचा मुद्दा उचलू नये यासाठी प्रयत्न करणार आहे. भारताने आपल्या बाजूने उभे राहावे अशी चीनची अपेक्षा आहे.

दक्षिण चीन समुद्रावर चीनने केलेला मालकी हक्काचा दावा अयोग्य असून त्याला कायदेशीर व ऐतिहासिक आधार नाही, असा निकाल द हेग येथील आंतरराष्ट्रीय लवादाने दिला होता. फिलिपिन्सने दाखल केलेल्या या खटल्यावरील निकाल जाहीर होताच चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि चिनी परराष्ट्र मंत्रालयाने तो मान्य करण्यास साफ नकार दिला. आंतरराष्ट्रीय लवाद बेकायदेशीर असून दक्षिण चीन समुद्रातील वाद हा त्याच्या अधिकार कक्षेतील विषय नाही, असे चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि चिनी परराष्ट्र मंत्रालय यांच्या वतीने सांगण्यात आले होते.

आंतरराष्ट्रीय लवादाने दिलेल्या या निकालानंतर अमेरिकेसह अनेक देश हा मुद्दा उचलून धरतील याची चीनला भीती वाटत आहे.

चीनने १९४७ साली प्रसिद्ध केलेल्या नकाशांमध्ये सर्वप्रथम ‘नाइन डॅश लाइन’ नावाने साधारण अर्धगोलाकार सीमा आखून दक्षिण चीन समुद्राच्या ९० टक्क्यांहून अधिक भागावर आपल्या मालकी हक्काचा दावा केला. शेकडो वर्षांपूर्वी चीनच्या सम्राटांनी या भागातील बेटांचा शोध लावला आणि तेथे पूर्वापार चीनचे मच्छीमार व्यापार करीत आहेत. त्यामुळे तो भाग आपलाच आहे, असा चीनचा दावा आहे. त्याला शेजारील फिलिपिन्स, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, तैवान, ब्रुनेई आदी देशांचा विरोध असून या सर्व देशांनीही या प्रदेशावर आपापल्या मालकी हक्काचा दावा केला आहे.

गेल्या काही वर्षांत चीनने अन्य सर्व देशांचे दावे धुडकावून संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर आपला हक्क सांगितला आहे. तसेच तेथे भराव टाकून कृत्रिम बेटे तयार करण्याचा सपाटा लावला आहे. जानेवारी २०१३ मध्ये चीनच्या नौदलाने फिलिपिन्सच्या लुझॉन बेटांजवळील स्कारबरो शोल नावाने ओळखल्या जाणाऱ्या बहुतांशी पाण्याखाली असलेल्या खडकाळ बेटांच्या रांगेचा जबरदस्तीने ताबा घेतला. तत्पूर्वी दोन्ही देशांत १७ वर्षे वाटाघाटी सुरू होत्या. पण त्यातून मार्ग न निघाल्याने फिलिपिन्सने २०१३ साली हा प्रश्न द हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेला होता. त्यावर सुनावणी होऊन मंगळवारी निकाल देण्यात आला. तो चीनने धुडकावल्याने हा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. अमेरिका, जपान आणि अन्य देशांनी या प्रदेशात चीनच्या अरेरावीला उत्तर देण्यासाठी आघाडी उघडली असून नौदलाच्या हालचाली वाढवल्या आहेत.


#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पहिल्या खासगी चांद्रवारीस हिरवा कंदील!

भारतीय वंशाच्या उद्योजकाने स्थापन केलेल्या ‘मून एक्स्प्रेस’ कंपनीला पुढील वर्षी चंद्रावर यान पाठवून तेथे उतरण्यास अमेरिकेच्या हवाई वाहतूक प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे नव्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा पृथ्वीवरील आर्थिक भरभराटीसाठी शोध घेऊन त्याचा विकास करण्याची व्यावसायिक कवाडे खासगी उद्योजकांनाही खुली झाली आहेत.

आजवर जगातील अनेक देशांनी केलेल्या चांद्रसफरी व त्याही पलीकडच्या अंतराळ वाऱ्या आणि त्यासंबंधीचे संशोधन फक्त सरकारी संस्थापुरते मर्यादित होते. काही मोजक्या खाजगी अंतराळ सफरीही याआधी केल्या गेल्या. पण त्या पृथ्वीची गुरुत्वाकर्षण कक्षा ओलांडून पुढे गेल्या नव्हत्या. या पार्श्वभूमीवर ‘मून एक्स्प्रेस’ला परवानगी देण्याचा अमेरिकी सरकारचा धोरणात्मक निर्णय ऐतिहासिक व पथदर्शी आहे. पुढील वर्षी त्यांचे यांत्रिक अंतराळयान (रोबोटिक) चंद्रावर पाठवून तेथे उतरविण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे ‘मून एक्स्प्रेस’ने एका प्रसिद्धी पत्रकान्वये जाहीर केले.

व्यापारी दृष्टीने अंतराळाचा शोध घेणे व त्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसित करणे या प्रमुख उद्देशाने ‘मून एक्स्प्रेस’ कंपनीची स्थापना झाली आहे. भारतीय
वंशाचे नवउद्योजक नवीन जैन, अंतराळ भविष्यवेत्ते डॉ. बॉब रिचर्डस आणि सतत नवनवे उद्योग काढणारे
कृत्रिम प्रज्ञा व अंतराळ तंत्रज्ञान
या क्षेत्रातील गुरु डॉ. बार्नी पेल यांनी मिळून सन २०१० मध्ये या
कंपनीची स्थापना केली.

कंपनीने पुढील वर्षाच्या चांद्रवारीसाठी ८ एप्रिल रोजी अर्ज केला होता.
अमेरिकी सरकारच्या संस्थांनी त्याची छाननी करून कंपनीला या सफरीसाठी परवानगी दिली. या सफरीसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘स्पेसशीप टू’ या अंतराळयानास परवाना दिला जाणे अपेक्षितच होते; परंतु ते चंद्रावर उतरविण्याची परवानगी मिळणे ही मोठी व्यापारी क्रांती मानली जात आहे.
पुढील वर्षी सुटकेसच्या आकाराचे लॅण्डर दोन आठवड्यांसाठी चंद्रावर पाठविण्यात येईल.

या मोहिमेद्वारे पृथ्वीच्या आर्थिक कक्षा रुंदावण्याबरोबरच अंतराळ तंत्रज्ञान, विज्ञान, संशोधन आणि विकासाची क्षितिजेही विस्तारणार आहेत, असे कंपनीने म्हटले आहे.

या परवानगीने आता इतर व्यावसायिक अंतराळ मोहिमांचा मार्गही खुला होणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹रिओमध्ये भारतासाठी पहिला दिवस निराशेचा

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी रोईग आणि हॉकी हे दोन क्रीडा प्रकार सोडले तर, पहिला दिवस निराशाजनक ठरला.
 दतू भोकनळने रोईंगमध्ये उपांत्यपूर्वफेरीत प्रवेश केला आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने आयर्लंडवर मात करुन विजयी सलामी दिली. अन्यथा पहिला दिवस भारतासाठी निराशाजनकच ठरला.

हमखास पदकाची अपेक्षा असलेल्या जीतू रायने 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात निराशा केली. जीतूने अंतिम फेरी गाठली मात्र तिथे त्याला 78.7 गुणांसह आठव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

टेनिसमध्ये पदकाचे दुसरे आशास्थान असलेले लिएंडर पेस-रोहन बोपण्णा, सानिया मिर्झा-प्रार्थना ठोंबरे यांना पहिल्या फेरीतच पराभवाचा धक्का बसला. आता मिश्र दुहेरीवर आशा जिवंत आहेत.

वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या ४८ किलो वजनी गटात भारताची मीरबाई चानूला सहा प्रयत्नात फक्त एकदाच वजन उचलता आले. २१ वर्षीय चानू जून महिन्यात पतियाळामध्ये निवड चाचणीच्यावेळी केलेल्या कामगिरीच्या जवळपासही पोहचू शकली नाही.

टेनिस पाठोपाठ टेबल टेनिसमध्येही भारताच्या पदरी निराशा आली. भारताचा अनुभवी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमलला पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला. टेबल टेनिसच्या पहिल्या फेरीत सौम्यजीत घोषही बाहेर झाला.

महिला नेमबाज आयोनिका पॉलही अपेक्षानुरुप कामगिरी करु शकली नाही.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹दिल्लीमध्ये दरदिवशी चार महिलांवर बलात्कार

राजधानी दिल्लीमध्ये 2012 ते 2015 या काळात दरदिवशी सरासरी चार महिलांवर बलात्कार आणि नऊ महिलांचा विनयभंग होत होता , अशी धक्कादायक माहिती दिल्ली पोलिसांनी तयार केलेल्या अहवालातून उघड झाली आहे . महिला अत्याचारासंबंधी हा अहवाल तयार करण्यात आला आहे .

या अहवालानुसार , 2012 ते 2015 या चार वर्षांच्या काळात बलात्काराच्या घटनांची संख्या तिपटीने वाढली . 2012 मध्ये दिल्लीमध्ये बलात्काराच्या 706 घटनांची नोंद झाली होती . हीच संख्या 2015 मध्ये 2199 इतकी झाली होती . एवढेच नाही, तर 2001 च्या तुलनेत ही संख्या पंधरा पटींनी वाढली आहे .
 महिलांना मारहाण आणि त्यांचा विनयभंग अशा घटनांची संख्या 2012 मध्ये 727 होती . 2015 मध्ये ती वाढून 5367 इतकी झाली आहे .

नवी दिल्लीतील अनेक महिला त्यांच्या घरातही सुरक्षित नसल्याची धक्कादायक माहितीही समोर येत आहे . हुंड्यासाठी छळ होणे , पती आणि सासरच्या इतर मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक त्रास होण्याच्या घटनांचीही संख्या वाढत आहे . या चार वर्षांच्या काळात 681 महिला हुंडाबळी ठरल्या आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹काश्मीरमधील " एनआयटी ' ला 100 कोटींचा निधी


श्रीनगरमधील "नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी' ( एनआयटी) या संस्थेत संशोधनात्मक कामासाठी 100 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी जाहीर केला .

जम्मूतील रुपनगर भागात " आयआयटी' चा पायाभरणी समारंभ आज सकाळी झाला . त्या प्रसंगी बोलताना जावडेकर म्हणाले , "" जम्मू -काश्मीरमधील उच्च व तंत्रशिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे . त्याशिवाय श्रीनगरमधील "एनआयटी ' या तंत्रशिक्षण संस्थेत संशोधनात्मक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल. '' सरकारच्या तंत्रशिक्षण सुधारणा कार्यक्रमांतर्गत काश्मीरमधील तंत्रशिक्षण संस्थांना बळकटी देण्यात येणार आहे , असेही त्यांनी सांगितले .
देश

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पोर्तुगालच्या माजी पंतप्रधानांची संयुक्त राष्ट्र सरचिटणीसपदासाठी आघाडी

पोर्तुगालचे माजी पंतप्रधान अँटोनियो गट्रेस हे संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसपदाच्या अनौपचारिक निवडणुकीत दुसऱ्या फेरीअखेर आघाडीवर आहेत. या पदावर महिलेची निवड होण्याची शक्यता मावळली आहे. पंधरा देशांच्या सुरक्षा मंडळाची दुसऱ्या फेरीची बैठक नुकतीच झाली त्यात गट्रेस यांना ११ उमेदवारांत प्रथम पसंतीची ११ मते मिळाली आहेत. दोन जणांनी त्यांना मते दिली नाहीत तर दोन जणांनी त्यांना मत देणार नाही असे सांगितले.

गट्रेस हे संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित कल्याण विभागाचे उच्चायुक्त होते व ते पहिल्या टप्प्यात आघाडीवर आहेत. गट्रेस यांच्या पाठोपाठ स्लोव्हेनियाचे माजी अध्यक्ष डॅनिलो तुर्क व बल्गेरियाच्या इरिना बोकोवा हे आहेत. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या युनेस्को संस्थेत महासंचालक म्हणून काम केले आहे. दुसऱ्या फेरीत सर्बियाचे माजी परराष्ट्र मंत्री जेरेमिक हे चौथ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर आले आहेत. त्यांना आठ मते पडली, चार मते विरोधात गेली, तीन जणांनी मतच दिले नाही.

अर्जेटिनाच्या परराष्ट्र मंत्री सुसाना मालकोरा या सातव्या क्रमांकावरून दुसऱ्या फेरीत तिसऱ्या क्रमांकावर आल्या आहेत. त्यांना आठ मते बाजूने, सहा विरोधात पडली, एकाने मतच दिले नाही. बोकोवा या तिसऱ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर गेल्या आहेत. न्यूझीलंडच्या माजी पंतप्रधान व संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रम प्रमुख हेलेन क्लार्क या सातव्या स्थानावर आहेत. त्यांच्या नंतर मॅसेडोनियाचे श्रायन केरीम यांचा क्रमांक लागला आहे. अकरा उमेदवारांत सहा पुरूष व पाच महिला आहेत.

क्रोशियाच्या पार्लमेंट उपसभापती वेस्ना पुसिक यांनी उमेदवारी माघारी घेतली आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करण्याचे आवाहन झुगारण्यात आले असून महिलेची निवड या पदावर होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सत्तर वर्षांच्या इतिहासात कधीही महिला सरचिटणीस झालेली नाही. पण महिलेची निवड होण्याची शक्यता मावळली आहे कारण पहिल्या दोन फेऱ्यात त्यांची आघाडी उरलेली नाही. स्थायी सदस्यांकडून नकार न येता ज्या उमेदवाराला बहुमत मिळेल त्याचे नाव आमसभेकडे पाठवले जाईल व नंतर आमसभेत सरचिटणिसांची निवड केली जाईल.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आता राज्यात सुरू होणार 15 सायबर लॅब :

ऑनलाइन गुन्ह्यांचा तातडीने शोध लावण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या सायबर लॅब निर्मितीची प्रक्रिया राज्यात वेगात सुरू आहे.
  नागपूरसह ठिकठिकाणच्या 15 सायबर लॅबचे काम अंतिम टप्प्यात असून, या स्वातंत्र्यदिनी, 15 ऑगस्टला त्या कार्यान्वित होणार आहेत.
  तसेच त्यामुळे आता पोलिसांना ‘फॉरेन्सिक लॅब’च्या अहवालांवर महिनोंमहिने अवलंबून राहावे लागणार नाही.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ग्रॅंटस इन एड' योजना सरकारकडून बंद :

वाजपेयी सरकारने सुरू केलेली आदिवासी प्राथमिक शाळांसाठी निधी देण्याची आधीच्या भाजप सरकारचीच योजना सरकारने बंद केली आहे.
  वर्षाला 16 लाख रुपये अनुदान देणारी ही 'ग्रॅंटस इन एड' योजना आदिवासी विकास मंत्रालयाने एकदम बंद केली.
  परिणामी, देशभरातील अशा शेकडो शाळा, तेथील शिक्षक- कर्मचारी व त्या वाटेवरून शिक्षणाच्या प्रवाहात येणारी आदिवासी बालके यांच्या भवितव्याचा गंभीर प्रश्‍न उपस्थित झाला आहे.
  तसेच महाराष्ट्रात अशा सुमारे 14 शाळा आहेत.
  प्राथमिक शाळा चालविण्यासाठी वनवासीबहुल भागांत निवासासाठी स्वयंसेवी संस्थांना दरवर्षी केंद्राकडून जाणारा हा निधी आहे.

@chalughadamodi

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पंतप्रधानच्या हस्ते ‘मिशन भगीरथ’चे उदघाटन :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते (दि.7) मिशन भगीरथच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले.
  राज्यात प्रत्येक घरात पिण्याचे शुद्ध पाणी पाईपलाईनद्वारे पुरविण्याचा हा तेलंगण सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.
  गजवेल विधानसभा मतदार संघातील कोमतीबांदा (जिल्हा मेदक) खेड्यात मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण झाले.
  मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव या मतदारसंघातून निवडून आले आहेत.
  तसेच यावेळी मोदी यांच्या हस्ते हैदराबाद ते करीमनगर या 152 किलोमीटर लांबीच्या मनोहराबाद-कोथापल्ली नव्या रेल्वमार्गाचा पायाभरणी समारंभ, राष्ट्रीय औष्णीक वीज महामंडळाच्या तेलंगणा सुपर थर्मल पॉवर प्रकल्पाचा (टप्पा-1), वरंगल येथील रामगुंडम, कलोजी नारायण राव युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस व रामगुंडम खत कारखान्याच्या कोनशिलेचे अनावरणही झाले.
  2014 मध्ये तेलंगण राज्याची स्थापना झाल्यानंतर मोदी यांची ही पहिलीच भेट होती.

@chalughadamodi

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹जीएसटी विधेयक लोकसभेतही मंजूर

देशाच्या अर्थव्यवस्थेला नवं वळण देण्याची क्षमता असलेलं सुधारीत वस्तू व सेवा कर विधेयक अर्थात जीएसटीला आज लोकसभेनंही मंजुरी दिली. जयललिता यांच्या अण्णा द्रमुक पक्षानं राज्यसभेप्रमाणं लोकसभेतही मतदानावर बहिष्कार घालून विधेयकाचा निषेध केला.

गेल्या अनेक वर्षांपासून लटकलेलं ऐतिहासिक जीएसटी विधेयक गेल्याच आठवड्यात राज्यसभेत मंजूर झालं होतं. वास्तविक जीएसटी घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत गेल्याच वर्षी मंजूर झालं होतं. मात्र, बुधवारी राज्यसभेत त्यात काही दुरुस्त्या सुचविण्यात आल्या होत्या. त्याला लोकसभेची मंजुरी घेणं आवश्यक होतं. त्यानुसार आज हे सुधारीत विधेयक लोकसभेत मांडण्यात आलं. लोकसेभत दोन तृतीयांश बहुमतानं ते मंजूर झालं. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या मंजुरीनंतर आता हे विधेयक देशातील किमान १६ राज्यांच्या विधीमंडळात मंजूर होणं आवश्यक आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹बेनेट विद्यापीठाला राज्यपालांची मान्यता

उत्तर प्रदेशात ग्रेटर नोएडामध्ये सुरू होणाऱ्या बेनेट विद्यापीठाला राज्यपाल राम नाईक यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे विद्यापीठात याच सत्रात प्रवेश सुरू होऊ शकतात.या सत्रात प्रवेश होण्याची आवश्यकता लक्षात घेता आपण मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाचा अभ्यास केल्यानंतरच अध्यादेशाला मंजुरी दिली, असे नाईक यांनी सांगितले. बेनेट विद्यापीठ ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेश अध्यादेश २०१६ राज्य मंत्रिमंडळात मंजूर झाल्यानंतर ५ ऑगस्टला राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते.बेनेट विद्यापीठात यंदा इंजिनीअरिंग आणि एमबीएचे अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. या विद्यापीठातील अभ्यासक्रमांची रचना संशोधनावर आधारित करण्यात आली आहे. अभ्यासक्रमची रचना करताना त्या क्षेत्रातील करिअरसंधींचाही विचार करण्यात आला आहे. बेनेट विद्यापीठात विद्यापीठीय शिक्षणाबरोबरच तरुणांमध्ये सॉफ्ट स्किल विकसित करण्यावरही भर देण्यात येणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹राजकीय जाहिरातींना पायबंद घालण्यासाठी कायमस्वरूपी अधिकार देण्याची निवडणूक आयोगाची मागणी

राजकीय जाहिरातींना पायबंद घालण्यासाठी घटनेत नमूद केलेल्या अधिकारांचा वापर करून देण्यात यावा, अशी मागणी निवडणूक आयोगाकडून केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. आगामी काळातील विधानसभा निवडणुका बघता वृत्तपत्रांतून राजकीय प्रचार होण्याची शक्यता आहे. त्याला पायबंद घालता यावा यासाठी लोकप्रतिनिधी कायद्यात ( Representation of the People Act ) सुधारणा कराव्यात. याद्वारे निवडणूक आयोगाला कायमस्वरूपी कायदेशीर अधिकार मिळावेत, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्यावेळी निवडणूक आयोगाकडून कलम ३२४ अंतर्गत वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवर बंदी घालण्यात आली होती. भाजपकडून प्रसिद्ध आलेल्या गायीच्या या जाहिराती जातीय आणि फूट पाडणाऱ्या असल्याचा आक्षेप निवडणूक आयोगाकडून नोंदविण्यात आला होता. ४ नोव्हेंबर २०१५ रोजी राज्यातील चार हिंदी वृत्तपत्रांमध्ये या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. केंद्रीय कायदेसचिव जी. नारायण राजू यांच्याबरोबर २७ मे रोजी झालेल्या बैठकीत निवडणूक आयोगाने मुद्रित माध्यमांना लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम १२६ च्या कक्षेत आणण्याची मागणी केली होती. सध्या या कलमानुसार निवडणुकीच्या ४८ तासांपूर्वी टेलिव्हिज, रेडिओ आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमवर राजकीय जाहिराती देण्यास बंदी आहे.
याशिवाय, निवडणूक आयोगाकडून बिहार निवडणुकीत भाजपकडून आरक्षणासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातींवरही आक्षेप नोंदविण्यात आला आहे. या जाहिरातींच्या माध्यमातून भाजपने नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव दलित आणि अन्य जमातींचे आरक्षण हिसकावून दुसऱ्या जातींना देत असल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून भाजपला ताकीदही देण्यात आली होती. मात्र, त्याच्याकडे दुर्लक्ष करत भाजपने स्थानिक वृत्तपत्रांत अशाच वादग्रस्त जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹जीएसटीमुळे मोबाईल, विमा व बँकिंग सेवा महागणार

वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी लागू झाल्यानंतर आलिशान मोटारी, सौंदर्यप्रसाधनांसह एफएमसीजी (फास्ट मूव्हिंग कन्झुमर गुड्स) व तयार कपडे यांच्या किमती कमी होतील, पण मोबाईल फोन, बँकिंग व विमा सेवा, दूरध्वनी सेवा, हवाई वाहतूक सेवा जास्त करामुळे महागणार आहे. नवीन अप्रत्यक्ष करप्रणाली असलेल्या जीएसटीची अंमलबजावणी १ एप्रिल २०१७ पासून होण्याची शक्यता आहे. त्यात उत्पादित वस्तूंवरील कर कमी होईल पण सेवा कराचे ओझे वाढेल. जीएसटी हा वस्तूंच्या उपभोग्यतेवर आधारित कर आहे. सामान्य लोकांना या करामुळे फायदाच होणार आहे असे सरकारचे म्हणणे आहे. कोणत्या वस्तू स्वस्त होतील कोणत्या महाग होतील हे आताच सांगता येणार नाही. जीएसटी कराची रचना ठरल्यानंतरच त्याबाबत माहिती देता येईल असे महसूल सचिव हसमुख अढिया यांनी सांगितले, करावर कर लावणे ही आताची पद्धत आहे. मूल्यवर्धित कर हा केवळ उत्पादनावर लागत नाही तर अबकारी करावर लागतो त्यामुळे वस्तू महाग होतात जीएसटीनंतर हे प्रकार कमी होतील. काही वस्तूंच्या किमती कमी होतील त्यात ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू व तयार कपडे यांच्या किमती कमी होतील. एफएमसीजी वस्तूंच्या किमती कमी होतील. छोटय़ा मोटारी (८ टक्के अबकारी कर) महागतील. एसयूव्ही व मोठय़ा गाडय़ा यांच्यावर २७ ते ३० टक्के अबकारी कर आता आहे त्यामुळे जीएसटी नंतर त्यांच्या किमती कमी होतील. रुग्णवाहिका, सांस्कृतिक कार्यक्रम, तीर्थयात्रा सेवा, क्रीडा कार्यक्रम वगळता इतर सेवांवर कर वाढेल. सध्या सेवा कर १४.५ टक्के आहे तो १८-२२ टक्के होईल. त्यामुळे हॉटेलिंग, प्रवास, दूरध्वनी सेवा, बँकिंग व विमा सेवा, कॅब सेवा, ब्रॉडबँड , चित्रपट, ब्रँडेड दागिने, आयपीएल सारख्या मोठय़ा स्पर्धा महागणार आहेत. मोबाईलचे बिल वाढण्याच्या शक्यतेबाबत अढिया यांनी सांगितले की, काही तज्ञांनी मते व्यक्त केली असली तरी कररचना ठरल्यावरच कुठल्या वस्तूंच्या किमती कमी तर कुठल्या वस्तूंच्या जास्त होणार हे ठरेल. उत्पादनाधारित करापेक्षा ग्राहक वापरावर आधारित असा जीएसटी हा कर आहे.

#Rio_Olympic_Updates

• रिओ ऑलिम्पिक : नोवाक जोकोविच पहिल्याच फेरीत पराभूत

टेनिस जगतात अव्वल स्थानावर असलेल्या नोवाक जोकोविचला रिओ ऑलिम्पिकमध्ये मात्र फारशी चमक दाखवता आलेली नसून पहिल्याच फेरीत त्याचे आव्हान संपुष्टात आले आहे. ऑलिम्पिक स्पर्धेतील पुरूष एकेरीच्या पहिल्याच फेरीत जोकोविचला पराभवाचा धक्का बसला आहे. अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन देल पोतरोने जोकोविचचा 7-6 (7/4), 7-6 (7/2) असा पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला. ऑलिम्पिकमधील जोकोविचच्या या पराभवामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹जपानचे वयोवृद्ध सम्राट पायउतार होणार ?

जपानचे वयोवृद्ध सम्राट अकिहितो यांनी "वाढते वय आणि ढासळणाऱ्या प्रकृती ' मुळे आता जपानच्या सम्राटपदाची जबाबदारी सांभाळणे कठीण जात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे . अकिहितो यांनी सम्राटपदाचा त्याग करण्यासंदर्भातील थेट उल्लेख केलेला नसला ; तरी यासंदर्भातील सूचक संकेत त्यांनी दिल्याचे मानले जात आहे .

जपानच्या सम्राटपदाची जबाबदारी आता हस्तांतरित करण्याची इच्छा अकिहितो यांनी या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या संदेशामध्ये व्यक्त केली आहे . या प्रक्रियेसाठी कराव्या लागणाऱ्या कायदेशीर बदलांसंदर्भात जपानचे सरकार गांभीर्याने चर्चा करेल , असे जपानचे पंतप्रधान शिंजो ऍबे यांनी स्पष्ट केले आहे .
" देशाचा प्रतिनिधी म्हणून मी सांभाळत असलेली जबाबदारी आता पूर्ण क्षमतेने पार पाडणे अवघड जाईल , अशी मला काळजी वाटू लागली आहे , '' असे अकिहितो यांनी सांगितले .

जपानच्या राज्यघटनेमध्ये सम्राटांना राजकीय अधिकार देण्यात आले नसले ; तरी घटनेमध्ये त्यांच्या पदावरुन पायउतार होण्यासंदर्भातील कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही . अकिहितो यांचे पिता हिरोहितो यांचे निधन झाल्यानंतर 1989 मध्ये त्यांना सम्राट म्हणून घोषित करण्यात आले होते . अकिहितो यांच्या पायउतार होण्याच्या निर्णयास जपानमध्ये मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळेल, असे याआधी करण्यात आलेल्या सर्वेक्षणांमधून स्पष्ट झाले आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹नव्या राज्यघटनेच्या बाजूने थायलंडमध्ये मतदान

बॅंकॉक - थायलंडमध्ये आज झालेल्या सार्वमतात नागरिकांनी लष्कराने तयार केलेल्या राज्यघटनेच्या बाजूने कौल दिला . थायलंडमध्ये राजकीय अस्थिरतेच्या कारणावरून दोन वर्षांपूर्वी लष्कराने सत्ता हस्तगत करत त्यांच्या मर्जीने चालणारे सरकार स्थापन केले होते .

लष्कराच्या पाठबळावरील सरकारने जुनी राज्यघटना बदलून नव्या राज्यघटनेचा मसुदा तयार केला होता . या मसुद्यात लष्कराला अनेक विशेषाधिकार दिले आहेत. आज झालेल्या मतदानात थायलंडमधील सुमारे पाच कोटी मतदारांना त्यांना मान्य असलेल्या राज्यघटनेला मतदान करायचे होते . यामध्ये नागरिकांनी लष्कराने तयार केलेल्या नव्या मसुद्याच्या बाजूने कौल दिल्याचे स्पष्ट झाले आहे . तसेच , यामुळे 2017 मध्ये नव्या राज्यघटनेनुसारच निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे .

नव्या राज्यघटनेला पाठिंबा असणाऱ्यांच्या मतानुसार , या निकालामुळे देशातील राजकीय अस्थैर्य आणि अराजकता संपणार आहे . मात्र, यामुळे लष्कराचा हस्तक्षेप वाढण्याची भीती काहींकडून व्यक्त होत आहे . नव्या राज्यघटनेच्या मसुद्याला देशातील मोठ्या पक्षांनी विरोध केला होता . सरकारने त्याविरोधात प्रचार करण्यासच बंदी घातली होती . आता या मसुद्याच्या बाजूने मतदान झाल्याने याचे राज्यघटनेत रूपांतर होणार आहे . हा निकाल थायलंडची दिशा बदलविणारा ठरण्याची शक्यता आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹' फिक्सिंग ' प्रकरणी दक्षिण आफ्रिकेच्या चौघांवर बंदी

जोहान्सबर्ग : सामना निकाल निश्चिती प्रकरणात अडकलेल्या चार खेळाडूंवर दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघटनेने 12 वर्षांची बंदी लादली . यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी यष्टिरक्षक थामी त्सोलेकिले याचा समावेश आहे . त्सोलेकिले याने 2004 - 05 मध्ये तीन कसोटींमध्ये दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले होते.

दक्षिण आफ्रिकेतील रॅम स्लॅम ट्वेंटी- 20 या देशांतर्गत स्पर्धेत निकाल निश्चिती केल्याचा आरोप त्सोलेकिले याच्यासह अन्य तीन खेळाडूंवर ठेवण्यात आला होता . चौकशीमध्ये हे चौघेही दोषी आढळले. यात प्युमेलेलो मॅट्सहिक्वे , इथी भालाटी आणि जीन सिम्स यांचा समावेश आहे . दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज गुलाम बोदी याच्याकडून निकाल निश्चितीसाठी या चौघांनी पैसे घेतल्याचे सिद्ध झाले आहे .

सामना निकाल निश्चितीच्या प्रकरणात गुलाम बोदीवर गेल्या वर्षी कारवाई करण्यात आली होती . त्याच्यावर 20 वर्षांची बंदी लादण्यात आली आहे . ' या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू आहे आणि यात आणखी काही खेळाडूही अडकण्याची शक्यता आहे , ' असे वक्तव्य दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष हरून लॉर्गट यांनी केले.

#Rio_Olympic_Updates

🔹विल्यम्स भगिनींचा महिला दुहेरीत पराभव

रिओ डी जानिरो - टेनिसमध्ये महिला दुहेरीत तीनवेळा ऑलिंपिक पदक मिळविणाऱ्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स आणि व्हिनस विल्यम्स या भगिनींना पहिल्या फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले आहे .

रिओ ऑलिंपिकमध्ये महिला दुहेरीत अव्वल मानांकन मिळालेल्या या दोघींचा चेक प्रजासत्ताकच्या बारबोरा स्ट्रेकोवा आणि लुसी साफारोवा या जोडीने 6 - 3 , 6 - 4 असा सहज पराभव केला . या पराभवामुळे या दोघींचा सलग तिसऱ्या ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळविण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे . यापूर्वी बिजिंग आणि लंडन ऑलिंपिकमध्ये दोघींनी सुवर्णपदक मिळविले होते .

महिला एकेरीत व्हिनस विल्यम्सला यापूर्वीच पराभव स्वीकारावा लागला आहे . आता महिला एकेरीत सेरेनाचे आव्हान शिल्लक आहे . सेरेनाने पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या दारिया गावरिलोवाचा 6 - 3 , 6 - 2 असा पराभव केला होता .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹जगातील सर्वात महागडा फुटबॉलपटू पॉल पोग्बा :

फ्रान्सचा फुटबॉलपटू पॉल पोग्बाने इंग्लंडच्या मॅन्चेस्टर युनायटेडशी जवळपास 815 कोटी रुपयांचा करार केला आहे.
  5 वर्षांसाठी हा करार करण्यात आला आहे. या करारासोबत पॉल पोग्बा सर्वात महागडा फुटबॉलपटू ठरला आहे.
  तसेच गेल्या चार वर्षात पॉल पोग्बाने केलेल्या कामगिरीच्या आधारे त्याच्याशी ही करार करण्यात आला आहे.
  पोग्बानं कमाईच्या बाबतीत आता गॅरेथ बेल आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांनाही मागे टाकलं आहे.
  गॅरेथ बेलनं 2013 साली रिआल माद्रिदशी 740 कोटी रुपयांचा करार केला होता.
  मॅन्चेस्टर युनायटेडमधून आपल्या करिअरची सुरुवात कऱणा-या पॉल पोग्बाने 2012 साली पोग्बा इटलीच्या युवेंटस संघात प्रवेश केला होता.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारतातील सर्वात स्वच्छ रेल्वेस्थानक बियास :

नॉर्दन रेल्वेच्या फिरोजपूर क्षेत्रात जालंधर-अमृतसर मार्गावरील बियास रेल्वेस्थानकाला भारतातील सर्वात स्वच्छ रेल्वेस्थानकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
  स्वच्छतेच्या निकषावर देशातील रेल्वस्थानकांची क्रमवारी तयार करण्यासाठी आयआरसीटीसीने देशातील मुख्य रेल्वेस्थानकांची पाहाणी केली होती.
  रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्या नेतृत्वाखालील ‘स्वच्छ रेल्वे, स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत हे सर्वेक्षण करण्यात आले होते.
  कमी वर्दळीचे अतिशय शांत अशा छोटयाशा बियास रेल्वेस्थानकाला सर्वात स्वच्छ रेल्वेस्थानकाच्या वर्गवारीत ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे.
  गांधीधाम, वास्को-दी-गामा, जामनगर आणि कुंभकोणम या रेल्वेस्थानकांना या यादीत अनुक्रमे दुसरे, तिसरे, चौथे आणि पाचवे स्थान प्राप्त झाले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹RBI ने व्याजदरात कोणतेही बदल केले नाहीत

रेपो रेट 6.5% आणि CRR 4%, सारे जैसे थे!

 पुढली क्रेडिट पॉलिसी 4 ऑक्टोबरला जाहीर होणार; रघुराम राजन नसतील गव्हर्नर नसतील, मॉनिटरी कमिटी आणेल पॉलिसी.

वेतन आयोग लागू झाल्यानंतर महागाई वाढणार; मार्च 2017 पर्यंत महागाई दर 5%

बँकांनी कमी व्याजदराचा लाभ ग्राहकांना दिला नाही, व्याजदर कमी न केल्याने राजन यांनी पुन्हा व्यक्त केली नाराजी.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आयर्न लेडी इरोम यांना व्हायचंय मणिपूरच्या मुख्यमंत्री; १६ वर्षांनी उपोषण सोडले

© 2016 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.
मुखपृष्ठ » देश-विदेश »
August 9, 2016 6:01 PM
मणिपूरच्या आयर्न लेडी म्हणून परिचित असलेल्या इरोम चानू शर्मिला यांनी गेल्या १६ वर्षांपासून सुरू असलेले उपोषण मंगळवारी सोडले. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. आजपासून मी माझे उपोषण मागे घेत आहे. गेल्या १६ वर्षांतील क्षण मी कधी विसरणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले. मधाचा एक चमचा चाटत त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.
इंफाळ स्थानिक न्यायालयात शर्मिला इरोम यांनी उपोषण सोडल्याच्या दस्ताऐवजावर १६ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर स्वाक्षरी केली. लष्करी दले विशेष अधिकार कायदा (अफ्स्पा) रद्द करण्याच्या मागणीसाठी त्यांनी गांधीजीच्या आदर्शाच्या सिद्धांतावर उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता. त्यांना जिवंत ठेवण्यासाठी २००० पासून नाकावाटे नळीने अन्न देण्यात येत होते. इरोमांना ठेवण्यात आलेल्या रुग्णालयाचे अक्षरश: तुरुंगात रूपांतर करण्यात आले होते. दरम्यान, स्थानिक न्यायालयाने त्यांना रुग्णालयातूनही सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता त्या स्वतंत्र होणार आहेत. उपोषण सोडण्याची घोषणा त्यांनी पंधरा दिवसांपूर्वीच केली होती. सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मी उपोषण सोडत असल्याचे त्यांनी म्हटले होते. अफ्स्पाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या उपोषणाला अपयश आल्यानंतर आगामी मणिपूर विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचेही शर्मिला इरोम यांनी म्हटले होते. पुढील वर्षी मणिपूरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत. भाजपने इरोम यांना आपल्या पक्षात घेण्याची तयारी दर्शविली आहे. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर इरोम राजकारणाच्या आखाड्यात प्रवेशाची त्यांची भूमिका काय असेल, याची उत्सुकता असेल. राजकारणात जाण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या ४४ वर्षीय इरोमा यांनी लग्न करण्याची इच्छासुद्धा बोलून दाखवली होती.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹देशभरात वर्षभरात तीन हजार जनऔषधी केंद्र

केंद्रीय आरोग्यमंत्री नड्डा यांची घोषणा; ३०० ‘अमृत’ची दालने उभारणार
सामान्यांना परवडणाऱ्या दरांमध्ये औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी या वर्षी देशभरात ३०० ‘अमृत’ची दालने तर तीन हजार जनऔषधी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. याबाबतची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी केली. येथे या उपक्रमांतर्गत दोन दालने सुरू करण्यात आली आहेत. त्याच्या उद्घाटनप्रसंगी नड्डा यांनी सरकारच्या आरोग्यविषयक उपक्रमांची माहिती दिली.
अमृत दालनांसाठी (अफोर्डेबल मेडिसीन अँड रिलायबल इंप्लांट्स) राज्य सरकारांना जागा उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आल्याचे नड्डा यांनी सांगितले. अशा दालनांमध्ये नामवंत कंपन्यांच्या औषधांवर ६९ टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या दालनांमध्ये आठ ते ९० टक्क्यांपर्यंत सूट दिली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत अशा दालनांमधून २३ कोटी रुपयांची उलाढाल झाली असून, रुग्णांची १६ कोटी रुपयांची बचत झाल्याचा दावा नड्डा यांनी केला.

प्रत्येक जिल्हय़ात ‘जनऔषधी’

या वर्षी प्रत्येक जिल्हय़ात सहा ते सात जनऔषधी केंद्रे सुरू केली जाणार आहेत. सामान्य जनतेला दर्जेदार औषधे मिळावीत, असा सरकारचा प्रयत्न असल्याचे नड्डा यांनी स्पष्ट केले.
तसेच १२० कोटी रुपये खर्च करून देशभरात कर्करोगावर उपचार करणारी २० केंद्रे उभी करणार असल्याची माहिती नड्डा यांनी दिली. या खेरीज बदलत्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या विविध व्याधींचा सामना करण्यासाठी आरोग्य मंत्रालय विविध उपाययोजना करत असल्याचे नड्डा यांनी स्पष्ट केले. त्यासाठी विविध समाज घटकांमध्ये समन्वय गरजेचा असल्याचे नड्डा यांनी सांगितले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹व्याजदर ‘जैसे थे’, राजन यांच्याकडून कारकिर्दीतील शेवटचे पतधोरण सादर

अपेक्षेप्रमाणे रिझर्व्ह बॅंकेने मंगळवारी द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदरात कोणतेही बदल केले नाही. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्या कारकिर्दीतील हा शेवटचा पतधोरण आढावा आहे. पुढील महिन्यात पाच तारखेला रघुराम राजन पदावरून दूर होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पतधोरण आढाव्यामध्ये काही बदल केले जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष होते. पण रेपोदर, सीआरआर यामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. रेपोदर ६.५० टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. तर सीआरआरमध्येही कसलाही बदल न करता तो ४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात देशाचा विकासदर ७.६ टक्क्यांवर राहिल, हे रिझर्व्ह बॅंकेने याआधी वर्तविलेले भाकीतही कायम ठेवण्यात आले आहे.
लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झालेल्या वस्तू व सेवा कर विधेयकातील प्रस्तावित प्रणालीमुळे किमान पाव टक्का दर कपात होऊ शकते, असा काही अर्थतज्ज्ञांचा होरा होता. पण तूर्ततरी व्याजदरात कपात करता येणार नसल्याचे राजन यांनी म्हटले आहे.

राजन येत्या ५ सप्टेंबर रोजी गव्हर्नरपदावरून दूर होत आहेत. त्यांच्या मुदतवाढीवरून राजकीय चर्चादेखील रंगली होती. या आधीचे पतधोरण जाहीर झाल्यानंतर, १८ जून रोजी राजन यांनी गव्हर्नरपदी दुसरी मुदत वाढ स्वीकारणार नसल्याचे त्यांनी रिझव्र्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांना एका ईमेल संदेशामार्फत स्पष्ट केले होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळ चौरस आहार

मुंबई - गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळ चौरस आहार देण्यासाठी "भारतरत्न डॉ . ए . पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना ' एक डिसेंबर 2015 पासून सुरू करण्यात आली होती . अनुसूचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रातील गरोदर स्त्रियांना शेवटच्या तिमाहीमध्ये व स्तनदा मातेस बाळंतपणानंतर पहिल्या तिमाहीमध्ये या योजनेद्वारे आहार देण्यात येत होता . आता यामध्ये सुधारणा करून ही योजना आदिवासी क्षेत्रातील 16 जिल्ह्यांतील 6962 गावांतील अंगणवाड्यांमध्ये राबवण्यात येत आहे .

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 2015 - 16 नुसार ग्रामीण भागामध्ये स्त्रियांमधील रक्तशयाचे प्रमाण व निकषापेक्षा शरीर द्रव्यमान सूचकांक कमी असलेल्या स्त्रियांची संख्या अधिक आहे . गरोदर स्त्रिला पहिल्या तिमाहीत उष्मांक आणी प्रथिनांची अधिक आवश्यकता असते . या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवून आदिवासी क्षेत्रातील सर्व गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळ आहार देण्यात यावा , याचा अंतर्भाव सुधारित योजनेत करण्यात आलेला आहे

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मून एक्स्प्रेसच्या मदतीने चंद्रावर अस्थिविसर्जन शक्य होणार

भारत व अमेरिका यांनी संयुक्तपणे स्थापन केलेली एक खासगी कंपनी मून एक्स्प्रेस यान चंद्रावर सोडणार असून त्यांना उड्डाणाची परवानगीही मिळाली आहे व मानवी मृतदेहांची रक्षा किंवा अवशेष किलोला ३० लाख अमेरिकी डॉलर्स दराने चंद्रावर नेऊन सोडण्याची घोषणा यात करण्यात आली आहे.

मून एक्सप्रेसची स्थापना नवीन जैन यांनी गेल्या आठवडय़ात केली असून त्यांना संघराज्य हवाई प्रशासनाने मान्यता दिली आहे व ते यान २०१७ पर्यंत चंद्रावर उतरणार आहे. अशी परवानगी मिळालेली ती पहिलीच खासगी कंपनी ठरली आहे.
 अमेरिकेने हा धोरणात्मक निर्णय घेतला असून चंद्रावर अशा प्रकारची पहिलीच मोहीम पाठवली जाणार आहे, असे कंपनीने म्हटले आहे. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने मून एक्सप्रेसबाबत दिलेल्या वृत्तानुसार यानाच्या मदतीने चंद्रावर मानवी मृतदेहांची रक्षा म्हणजे अस्थी पाठवल्या जाणार आहेत. जसे आपण अस्थिविसर्जन गंगेत किंवा गोदावरीत करतो, तसे चंद्रावरील अस्थिविसर्जनासारखा तो प्रकार आहे. यात एका किलोमागे ३० लाख डॉलर्स खर्च येणार आहे. प्रौढांच्या अस्थींचे वजन ४ ते ६ पौंड असते त्यामुळे ते चंद्रावर पाठवण्यास ५४ लाख ते ८१ लाख डॉलर्स खर्च येईल. या सेवेला खूप मागणी असणार आहे असे सांगण्यात आले.

आमच्याकडे चंद्रावर अस्थी पाठवण्यासाठी अनेकांची रांग आहे. पृथ्वीच्या कक्षेबाहेर अजून खासगी मोहिमांना परवानगी नव्हती केवळ सरकारी अवकाश मोहिमाच राबवल्या जात होत्या. मून एक्स्प्रेसला कुठल्या सीमा असणार नाहीत, आपल्या रक्षणासाठी अवकाश प्रवास हेच भविष्य असेल तेच मुलांचे सीमारहित भवितव्यही असेल, असे जैन यांनी सांगितले. आगामी काळात चंद्रावरील मौल्यवान साधने, धातू, खडक पृथ्वीवर आणण्याचा विचार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ही कंपनी २०१० मध्ये बॉब रिचर्ड्स, जैन व अवकाश तंत्रज्ञान गुरू बार्नी पेल यांनी स्थापन केली होती. अवकाश मोहिमांचा व्यावसायिक वापर करण्याचा भाग यात आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सलेम-चेन्नई एक्सप्रेसवर सर्वात मोठा दरोडा

'द ग्रेट ट्रेन रॉबरी' या गाजलेल्या इंग्रजी सिनेमाची आठवण ताजी करणारी घटना चेन्नईजवळ सोमवारी रात्री घडली. सालेमहून चेन्नईला निघालेल्या रेल्वेचा छताचा पत्रा कापून चोरट्यांनी रिझर्व्ह बँकेची ५ कोटी ८ लाख रुपयांची रक्कम लंपास केली. आत्तापर्यंत देशभरात ट्रेनमध्ये पडलेल्या दरोड्यांपैकी हा सर्वात मोठा दरोडा आहे हे विशेष.
विशेष म्हणजे पैशांच्या सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेली पोलिसांची टीम बाजुच्याच डब्यात होती. परंतु, असं काही घडलं याची साधी कुणकुण देखील या टीमला लागू शकली नाही.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं पैसे नेण्यासाठी ट्रेनचा एक डबा बूक करण्यात आला होता. या डब्यात २२६ बॉक्समध्ये ३४२ कोटी रुपये ठेवण्यात आले होते. यांपैकी ४ बॉक्स फोडले असल्याचं आढळून आले. तब्बल ५ कोटी ८ लाख रुपयांचा मोठा दरोडा कसा टाकला गेला असावा या विचाराने आरपीएफ आणि जीआरपी चक्रावून गेले आहेत. या चोरीमध्ये एखाद्या आतल्या व्यक्तीचा किंवा गटाचा हात असावा अशी तपास अधिकाऱ्यांना शंका आहे. या दरोड्याचा तपास याच दिशेनं सुरू आहे.

१९ डबे असलेली ही ट्रेन सोमवारी रात्री ९ वाजता सलेमहून चेन्नईच्या दिशेनं रवाना झाली. ज्या डब्यात पैसे ठेवण्यात आले होते, तो डबा इंजिननंतर दुसऱ्याच स्थानावर होता. विरुदाचलममध्ये इंजिनने आपले स्थान बदलले आणि रक्कम असलेला डबा शेवटच्या स्थानावर आला. ट्रेन मंगळवारी पहाटे ४ वाजता चैन्नईला पोहोचली. ट्रेन यार्डात नेल्यानंतर पुढे पार्सल ऑफिस असलेल्या एगमोर रेल्वे स्थानकात नेण्यात आली.

#Rio_Olympic_Updates

• हॉकी महिला स्पर्धेत भारताचा ऑस्ट्रेलियाकडून 6-1नं पराभव

• रिओ शूटिंगमध्ये भारताच्या जितू रायचं आव्हान संपुष्टात

• वेटलिफ्टिंगमध्येही भारतीय खेळाडूंची आजची कामगिरी खराब झाली. पुरुषांच्या 77 किलो वजनी गटामध्ये भारताच्या सतीश शिवलिंगम याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले . यामुळे पदकाच्या शर्यतीतून तो बाहेर पडला .

• भारतीय महिला तिरंदाज बोमबायला देवीने एकेरीतील पहिल्या फेरीत ऑस्ट्रिया विरुद्धच्या लढतीत विजय संपादन केला आहे.

• जलतरणातील अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळख निर्माण केलेल्या अमेरिकेच्या मायकेल फेल्प्सने काल ( मंगळवार ) आणखी दोन सुवर्ण पदके जिंकल्याने त्याच्या एकूण ऑलिंपिक पदकांची संख्या 26 झाली आहे . विशेष म्हणजे , 1900 पासून आतापर्यंतच्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये मिळून भारताने 26 पदके जिंकली आहेत.

• जलतरणातील ' आयर्न लेडी ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हंगेरीच्या कॅटनिका होजूने जलतरणात तिसरे सुवर्णपदक मिळवीत हॅट्ट्रीक केली आहे . 27 वर्षीय होजूने हंगेरीला रिओ ऑलिंपिकध्ये गेल्या चार दिवसांत तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले आहे .

• टेनिसमध्ये महिलांच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विल्यम्सला तिसऱ्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे . या पराभवामुळे सेरेनाचे ऑलिंपिकमधील आव्हान संपुष्टात आले आहे .

मंगळवारी झालेल्या महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यात सेरेनाचा युक्रेनच्या एलिना स्वितोलिनाने 6 - 4 , 6 - 3 असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला . जागतिक क्रमावारीत 20 व्या स्थानावर असलेल्या स्वितोलिनाला आता उपांत्यपूर्व फेरीत चेक प्रजासत्ताकच्या पेट्रा क्विटोवा हिच्याशी सामना करावा लागणार आहे . 22 ग्रँडस्लॅम विजेतेपदे मिळविणाऱ्या सेरेनाला पराभूत करण्यात स्वितोलिना पहिल्यांदा यशस्वी ठरली आहे .

For more updates join us @empsckatta

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹रिपाइं , एमआयएम , स्वाभिमानी आदी पक्षांची नोंदणी कायम

स्वाभिमानी पक्ष , लोकभारती , जनसुराज्य शक्ती, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ए ) , ऑल इंडिया मजलिस इत्तेहदूल मुस्लिमिन व अमळनेर तालुका विकास आघाडी या राजकीय पक्षांनी एक लाख रुपये दंड भरून आयकर विवरणपत्रे व लेखा परीक्षण लेख्याच्या प्रती सादर केल्याने त्यांची नोंदणी कायम करण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज दिली .

सहारिया यांनी सांगितले की , नोटीस बजावूनही आयकर विवरणपत्रे व लेखा परीक्षण लेख्याच्या प्रती सादर न करणाऱ्या 197 अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाने विविध टप्प्यांत रद्द केली होती . त्यापैकी आठ राजकीय पक्षांनी कागदपत्रे सादर करण्यास मुदत वाढ मागितली होती .

 त्यांना एक लाख रुपये दंड आकारून तीन महिन्यांची मुदत वाढ दिली होती . यापैकी सहा पक्षांनी वाढीव मुदतीत कागदपत्रांची पूर्तता केल्याने त्यांची नोंदणी कायम केली आहे . ताराराणी आघाडी पक्ष आणि स्वाभिमान कॉंग्रेस पक्षाला 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली असून , या मुदतीत कागदपत्रांची पूर्तता न केल्यास त्यांची नोंदणी रद्द असल्याचे समजण्यात येईल .

स्वाभिमानी पक्ष , लोकभारती , जनसुराज्य शक्ती व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ए ) या पक्षांची 15 सप्टेंबर 2015 रोजी नोंदणी रद्द करण्यात आली होती . दंड व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर स्वाभिमानी पक्षाची 4 जानेवारी 2016 , लोकभारती व जनसुराज्य शक्तीची 25 जानेवारी 2016 ; तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ए ) ची 24 मे 2016 रोजी नोंदणी कायम करण्यात आली . ऑल इंडिया मजलिस इत्तेहदुल मुस्लिमिन आणि अमळनेर तालुका विकास आघाडी या पक्षांची दंड व कायदपत्रांच्या पूर्ततेनंतर 8 ऑगस्ट 2016 रोजी नोंदणी कायम करण्यात आली . रिपब्लिकन पक्ष ( खोरिपा) आणि स्वाभिमान विकास आघाडी या दोन पक्षांनीही आता एक लाख रुपये दंड भरून मुदत वाढ मागितली आहे , असेही सहारिया यांनी सांगितले .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹IQ टेस्टमध्ये दहा वर्षाच्या मुलानं आइनस्टाइन आणि हॉकिंगला टाकले मागे

भारतीय वंशाच्या लंडनमध्ये वास्तव्याला असणा-या 10 वर्षांच्या ध्रुव तलाटी या मुलानं IQ टेस्टमध्ये सर्वाधिक म्हणजे 162 गुण मिळवले आहेत. त्याच्या देदीप्यमान यशामुळे जगभरात त्याचं नाव प्रसिद्धीच्या झोतात आलं आहे. जगातील सर्वात मोठी आणि जुनी IQ टेस्ट सोसायटीनं घेतलेल्या मेन्सा कॅटल थर्ड बी टेस्टमध्ये ध्रुवनं हे गुण प्राप्त केले आहेत. या IQ टेस्टचं वैशिष्ट्य म्हणजे ध्रुवनं बुद्धिमत्तेच्या जोरावर अल्बर्ट आइनस्टाइन आणि स्टिफन हॉकिंगलाही मागे सोडलं आहे. IQ टेस्टमध्ये 162 गुण मिळवल्यानं ध्रुव ता-यासारख्या जगभरात चमकला आहे. ध्रुवला जगभरातला सर्वाधिक बुद्धिमान व्यक्ती म्हणून किताब बहाल करण्यात आला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ई - कॉमर्स क्षेत्रातील नियमांचा सरकारकडून आढावा

जगभरात वेगाने विस्तारणाऱ्या ई - कॉमर्स क्षेत्रातील थेट परदेशी गुंतवणूकीसंबंधीचे ( एफडीआय ) नियम व संबंधित इतर काही विषयांचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने विशेष समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे .

नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात येणाऱ्या समितीत वाणिज्य उद्योग मंत्रालय , तसेच इलेक्ट्रॉनिक्स व आयटी विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे . महाराष्ट्र व कर्नाटकसह आणखी दोन राज्यांमधील प्रतिनिधींचादेखील यात समावेश आहे . ई - कॉमर्स कंपन्यांकडून होणारी औषधविक्रीदेखील हादेखील विषय चर्चेसाठी घेतला जाणार आहे .

समितीमार्फत ई - कॉमर्स क्षेत्रातील एफडीआयसह इतर सर्वच महत्त्वांच्या विषयांवर चर्चा करुन क्षेत्राच्या प्रगतीसाठी आराखडा तयार केला जाईल , अशी माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिली आहे . काही दिवसांपुर्वी सरकारने फुड प्रोसेसिंग क्षेत्रात 100 टक्के एफडीआयला मंजुरी दिली होती . या पार्श्वभूमीवर समितीच्या स्थापनेला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे .
औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन ( डीआयपीपी) विभागाने मार्च महिन्यात ' मार्केटप्लेस ' स्वरुपातील ई - कॉमर्स कंपन्यांमध्ये स्वयंचलित मार्गाने 100 टक्के एफडीआयला मंजुरी दिली होती . परंतु स्वतः माल साठवून त्याची विक्री करणाऱ्या कंपन्यांमध्ये अद्याप एफडीआयला मंजुरी नाही .

#eMPSCkatta_Current_Affairs
" आर्कुट ' च्या संस्थापकाचे नेटकरांना " हॅलो '

ऑर्कुट बुयूकोक्तेन नावाच्या गुगलच्या एका कर्मचाऱ्याने 2004 मध्ये एक सोशल नेटवर्किंग वेबसाइट आणत सोशल मीडियामध्ये क्रांती घडवून आणली . या वेबसाइटचे नावही त्याने ऑर्कुटच ठेवले . जगभरातील लाखो युवकांनी ऑर्कुटवर आपले खाते उघडत चॅटिंगच्या जगात प्रवेश केला होता . मात्र , काही काळातच फेसबुक आल्यावर ऑर्कुटचे कंबरडे मोडले आणि आता व्हॉट्सऍपमुळे तर ऑर्कुट म्हणजे काय? असाच प्रश्न सध्याची मुले विचारतात . आता मात्र त्याच ऑर्कुटने " हॅलो ' नावाचे ऍप बाजारात आणत युवकांना पुन्हा एकदा साद घातली आहे .

इंटरनेटवर आधारित असलेले हे ऍप केवळ मोबाईलवर आणि अँड्रॉइड तसेच आयओएस ऑपरेटिंग सिस्टिमवर वापरता येणार आहे . सध्या " हॅलो ' ला भारतासह अमेरिका , कॅनडा , फ्रान्स , ऑस्ट्रेलिया, ब्राझील , आयर्लंड , जर्मनी आणि मेक्सिकोमध्ये लॉंच करण्यात आले आहे . ऑर्कुटसह गुगलच्या काही माजी कर्मचाऱ्यांनी मिळून " हॅलो ' नेटवर्कची स्थापना केली आहे . या कंपनीचे मुख्यालय सॅन फ्रान्सिस्कोला आहे .

" हॅलो ' ऍप हे अधिकाधिक व्हिज्युअल्सवर आधारित आहे . समान आवड असणाऱ्यांना जोडणे हाच " हॅलो ' चा उद्देश आहे . फेसबुक आणि व्हॉट्सऍपसारख्या तगड्या ऍपना थेट आव्हान देण्याचे " हॅलो ' ने सध्या टाळले असले तरी ते आगामी काळात ते त्यांच्याशी स्पर्धा करण्याची शक्यता नाकारता येत नाही .

काय आहे " हॅलो '
समान आवड असलेल्या मित्रांचा यावर ग्रुप तयार करू शकता. उदाहरणार्थ , फोटोग्राफर्स , ट्रेकर्स अशा गटांत तुम्ही सहभागी होऊ शकता. सध्या जास्तीत जास्त पाच गटांत तुम्ही सहभागी होऊ शकता. तसेच , हे ग्रुप बदलूही शकता. आपल्या आवडीसारखी आवड असणारी माणसेही शोधू शकता. यामध्ये "स्टेटस अपडेट ' असा प्रकार नसेल .

हॅलो आपल्या सर्वांना जोडते. तुम्ही कोणत्याही भाषकाला हॅलो म्हणा , त्याला ते कळते . "ओके ' नंतर हाच सर्वाधिक बोलला जाणारा शब्द आहे . अनोळखी व्यक्तीसमोर हॅलोसारखा साधा शब्द उच्चारताच दोघांमध्ये भीती आणि द्वेष निर्माण होतच नाहीत . त्यामुळे माझ्यासोबत या आणि नवे मित्र जोडा. हॅलो म्हणा आणि जगावर प्रेम करा .
- ऑर्कुट बुयूकोक्तेन , संस्थापक , " हॅलो '

" एलो' च्या पार्श्वभूमीवर
" ऑर्कुट ' ची स्थापना झाल्यावर दहा वर्षांतच ते बंद करावे लागले . एकेकाळी "ऑर्कुट ' चे जगभरात 30 कोटी युजर्स होते . 2014 ला फेसबुकला टक्कर देण्यासाठी "एलो ' नावाचे संकेतस्थळ सुरू झाले होते . याची रचना फेसबुकसारखीच असल्याने अनेक जण त्याकडे आकर्षित झाले होते. मात्र , हे आकर्षण फार काळ टिकले नाही आणि फेसबुकची मक्तेदारी कायम राहिली . आता या पार्श्वभूमीवर "हॅलो ' ची वाटचाल कशी होते , याकडे सर्वांचे लक्ष असेल.
🔹

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹गोवामध्ये मद्यपान करणाऱ्यास बंदी :

गोवा सरकारने सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांना दहा हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
  तसेच यासाठी गोवा विधानसभेत नवीन दुरुस्ती करण्यात आलेला राज्य उत्पादन शुल्क कायदा मांडण्यात आला.
  या कायद्यानुसार गोव्यात ठिकठिकाणी मद्यपान निषेध असलेले फलक लावण्यात येणार आहेत.
  फलक लावलेल्या परिसरात मद्यपान करणाऱ्या व्यक्तीला दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
  गोव्यात येणाऱ्या पर्यटकांकडून सार्वजनिक ठिकाणी, समुद्र किनारे आणि रस्त्यांवर मद्यपान करण्याच्या अनेक तक्रारी पाहता गोवा सरकारने हा निर्णय घेतला आहे.

लोकराज्य:-
----------------------------------------------
🔹अमृत आहार;-

कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी गरोदर स्रिया आणी स्तनदा मतांच्या आहारातील उष्मांक आणी प्रथिना मध्ये वाढ करण्याबरोबरच जन्माला येणाऱ्या सदृढ बालकांचे प्रमाण वाढवण्यासाठी अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्रिया-स्तनदा मातांच्याआहारासाठी महाराष्ट्रसरकारने डॉ. ए.पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरु केली

* नाशिक जिल्ह्यातील मुंढेगाव आणी पालघर जिल्ह्यातील कंबळगाव येथे देशातील पहिले मध्यवर्ती स्वयंपाकगृह उभारण्यात आले

* राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीना आदिवासीउपाययोजनेअंतर्गत ५ टक्के निधी थेट अनुदान देणारे देशात महाराष्ट्र पहिले राज्य

* महाराष्ट्र राज्यातपेसा हा कायदा १३ जिल्हापरिषदा,२८७६ ग्रामपंचायती, ५९६९ गावे आणी पाडे यामध्येराबविला जात आहे. या कायद्यात कोणत्या पायाभूत विकासकामावर निधी खर्चकरायचा याचे मार्गदर्शन घेण्यासाठी पुणे येथील यशदा या संस्थेची प्रशिक्षनासाठी निवड तर टाटा सामाजिक विज्ञानसंस्था या संस्थेची अमलबजावणी व मूल्यमापनासाठीनिवड करण्यातआली आहे

* महाराष्ट्र राज्यातील खणीकर्म उद्योगाचा विकास होण्यासाठी सेट पिट्सबर्ग
येथील खनिकर्म विद्यापीठ आणी महाराष्ट्र सरकार दरम्यान सामंजस्य करार

* महाराष्ट्र राज्य समृद्धी महामार्ग:-

* राज्याच्या परिवहनात क्रांती घडवणारा नागपूर-मुबई राज्य समृद्धी महामार्ग, त्याचे जोडरस्ते व त्यावरीलप्रस्तावित नवनगरांच्या उभारणीसाठीआवश्यक असणाऱ्या जमिनी शेतकऱ्याकडून लॅड पुलिंग योजनेद्वारे पूर्वसमती घेऊन भागिदारी पद्धतीने प्राप्त करून घेणे

* हा महामार्ग राज्यातील नागपूर, अमरावती, औरंगाबाद वनाशिक, कोकण या पाचमहसूलविभागातील नागपूर , वर्धा, अमरावती, वाशीम, बुलढाणा, जालना,औरंगाबाद,
अहमदनगर,नाशिक व ठाणे या दहा जिल्हातील २७ तालुक्यांच्या३५० गावामधून जाणार आहे

* मुबंई डबेवाले स्वच्छता दूत:-
स्वच्छ भारत अभियानात मुबंई डबेवाले स्वच्छता दूत: म्हणून सामील झाले. जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावे,डब्यातील शिल्लक अन्न इतरत्र त टाकता ते कचरा पेटीतच टाकावे हा स्वच्छतेच संदेश २ लाख कुटूबांपर्यंत हे डबेवाले पोहोचवणार आहे.

Source: स्टडी सर्कल फेसबुक पेज

जागतिक शांतता निर्देशांक अहवाल 2015-16 (Global Peace Index) :

    ‘द इन्स्टिटय़ूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस’ या संस्थेने जागतिक शांतता निर्देशांक अहवाल 2015-16 जून 2016 रोजी जाहीर केला आहे. जागतिक शांतता निर्देशांकात भारताचा 141 वा क्रमांक लागला आहे. 2015 मध्ये हिंसाचारामुळे भारतात 680 अब्ज डॉलर्सचे (GDP च्या 9 टक्के) नुकसान झाले असेही याबाबतच्या पाहणी अहवालात म्हटले आहे. एकूण 163 देशांची शांततेच्या मुद्दय़ावर क्रमवारी ‘द इन्स्टिटय़ूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस’ या संस्थेने लावली आहे. त्यात (163) सीरिया पहिल्या क्रमांकावर आहे, त्यानंतर दक्षिण सुदान, इराक, अफगाणिस्तान व सोमालिया यांचे क्रमांक आले आहेत. (1) आइसलँड हा जगातील सर्वात शांततापूर्ण देश ठरला असून त्याखालोखाल डेन्मार्क व ऑस्ट्रिया यांचा समावेश आहे.

* जगातील सर्वात शांत देश : (1) आइसलँड, (2) डेन्मार्क, (3) ऑस्ट्रिया

* जगातील सर्वात अशांत/हिंसक देश : (163) सीरिया, (162) दक्षिण सुदान, (161) इराक

* जागतिक शांतता निर्देशांकात (2016 मध्ये) 163 देशांच्या यादीत भारताचा 141 वा क्रमांक लागला आहे. (2015 मध्ये - भारताचा 143 वा क्रमांक होता.)

* जागतिक शांतता निर्देशांकात (2016 मध्ये) 163 देशांच्या यादीत भूतान - 13 वा क्रमांक; नेपाळ - 78 वा क्रमांक; बांग्लादेश - 83 वा क्रमांक; श्रीलंका - 97 वा क्रमांक; चीन - 120 व्या क्रमांकावर आहे.

* जागतिक शांतता निर्देशांकात (2016 मध्ये) 163 देशांच्या यादीत पाकिस्तान - 153 वा क्रमांक; अफगानिस्तान - 160 व्या क्रमांकावर आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ऑस्ट्रेलियाच्या एली हिचा ऑलिंपिक विक्रम

ऑलिंपिकमधील महिला फुटबॉल स्पर्धेत सामना खेळणारी सर्वांत युवा फुटबॉलपटू हा मान मंगळवारी ऑस्ट्रेलियाच्या एली कार्पेंटर हिने पटकाविला . झिंबाब्वेविरुद्ध ऑलिंपिक पदार्पण केले तेव्हा तिचे वय 16 वर्षे, तीन महिने आणि 12 दिवस इतके होते.

या वर्षी फेब्रुवारीत एली हिची ऑलिंपिक पात्रता लढतीसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात निवड झाली होती . तेव्हा ती अवघ्या 15 वर्षांची होती . संघातील अनुभवी खेळाडू ऐवी लुईक हिच्या दुखापतीमुळे प्रशिक्षक ऍलेन स्टॅसिक यांनी एलीची संघात निवड केली होती . 28 एप्रिल 2000 रोजी न्यू साउथ वेल्समधील कॉवरा येथे जन्मलेली एली बचावपटू आहे . 2015 पासून ती वेस्टर्न सिडनी वॉंडरर्स संघातर्फे ऑस्ट्रेलियन लीग स्पर्धेत खेळते .
 ऑस्ट्रेलियातर्फे तिने गेल्या दोन मार्च रोजी व्हिएतनामविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते . एकविसाव्या शतकात जन्मलेली ती ऑस्ट्रेलियाची पहिली आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू आहे .

#Rio_Olympic_updates

• बॅडमिंटनमध्ये पी. व्ही . सिंधूपाठोपाठ ' फुलराणी' साईना नेहवालनेही पहिल्या फेरीतील सामन्यात विजय मिळवित आज ( गुरुवार) आगेकूच केली.

• जागतिक क्रमवारीमध्ये वरच्या क्रमांकावर असलेल्या प्रतिस्पर्ध्याविरुद्धही जीव तोडून खेळणाऱ्या भारताच्या शिवा थापाला मुष्टियुद्धातील पहिल्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला.

• इतर खेळांमध्ये भारताला पराभवाला सामोरे जावे लागत असताना बॅडमिंटनमध्ये पी. व्ही . सिंधूने पहिल्या फेरीत सरळ सेटमध्ये विजय मिळवित पथकाला दिलासा दिला.

• तिरंदाजीमध्ये भारताला आज ( गुरुवार) सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले . दीपिका कुमारीचा पराभव झाल्यानंतर काही वेळातच बॉम्बयला देवीचेही ऑलिंपिकमधील आव्हान संपुष्टात आल.

• भारताची तिरंदाज दीपिका कुमारीला तैवानच्या या टिंग - टॅंग हिच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.

• नेमबाजांप्रमाणेच भारतीय बॅडमिंटनपटूंच्या मोहिमेची सुरवातही आज ( गुरुवार) अपयशाने झाली. महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीतच भारताच्या ज्वाला गुट्टा -अश्विनी पोनप्पा या अनुभवी जोडीला पराभव स्वीकारावा लागला .

• रिओ ऑलिंपिकमध्ये बलाढ्य अर्जेंटिना संघावर गट फेरीतूनच बाहेर जाण्याची नामुष्की ओढावली आहे . तर, ब्राझीलने आव्हान टिकविण्यासाठी आवश्यक असलेल्या सामन्यात 4 - 0 असा विजय मिळविला.

• भारताचा बॉक्सर मनोज कुमारने आपल्या रिओ ऑलिंपिकमधील अभियानाला विजयाने सुरवात केली आहे . मनोज कुमारने लाइट वेल्टरवेट ( 64 किलो) गटात लिथुआनियाच्या पेट्राउसकास इव्हालडसचा 2 - 1 असा पराभव केला.

Join us for more updates @eMPSCkatta

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹तेजसची आता लेहकडे भरारी

हवाई दलाचे बहुचर्चित लढाऊ तेजस विमान आज भोपाळच्या राजा भोज विमानतळावर तपासणीसाठी उतरले . हवाई दलतज्ज्ञाच्या पथकाने तपासणी केल्यानंतर तेजस लेहकडे उड्डाण करणार आहे .
विमानतळाचे संचालक आकाशदीप माथूर म्हणाले , की तेजस विमान येथून लेहकडे उड्डाण करणार आहे . नव्या कार्यक्रमपत्रिकेनुसार बुधवारी सायंकाळी भोपाळहून लेह एअरबेसला पाठविण्यात येणार आहे . यादरम्यान स्थानिक विमान अभियंते विमानाची तपासणी करणार असून , त्यात इंधन भरण्यात येणार आहे . तेजस विमानाला तीस वर्षांचा इतिहास असून , 1983 मध्ये पहिल्यांदा लाइट कॉम्बॅट एअर क्राफ्टच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती . त्यानंतर तेजसच्या निर्मितीला चालना मिळाली . प्रकल्पाच्या 33 वर्षांनंतर देशाला लढाऊ विमान मिळाले आहे . 4 जानेवारी 2001 मध्ये तेजसने पहिल्यांदा उड्डाण केले होते . 2003 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी या लढाऊ विमानाला तेजस नाव दिले होते. तेजस हा संस्कृत शब्द असून , त्याचा अर्थ पॉवरफुल एनर्जी असा होता .

तेजसची वैशिष्ट्ये
तेजस विमान हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर क्षेपणास्त्र सोडू शकतो.
क्षेपणास्त्राबरोबरच बॉंब आणि रॉकेटचाही मारा करू शकतो.
तेजस 50 हजार फूट उंचीपर्यंत उड्डाण करू शकतो.
तेजसच्या निर्मितीसाठी सुमारे 7 हजार कोटी लागले आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹राज्यात प्रथमच सोलापुरात ५४ विधवांना रिक्षापरवाने

मरण पावलेल्या रिक्षाचालकांच्या विधवा पत्नींच्या नावे रिक्षा परवाना नोंद करण्याचा प्रयोग सोलापूरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने हाती घेत आतापर्यंत ५४ विधवांना रिक्षा परवाने दिले आहेत. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा केला जात आहे.
सोलापूर शहरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे परवानाधारक रिक्षांची संख्या ८५९३ इतकी आहे. शहराची लोकसंख्या सुमारे दहा लाखांपर्यंत आहे.

 लोकसंख्येच्या तुलनेत रिक्षांची संख्या अपुरी आहे. रिक्षांची संख्या वाढविण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. या पाश्र्वभूमीवर एकीकडे अधिकृत परवानाधारक रिक्षांची संख्या कमी असताना दुसरीकडे अनधिकृत व आयुष्मान संपलेल्या रिक्षांची संख्या वाढली आहे. यापूर्वी २००७ साली दीड हजार रिक्षांचे वाढीव परवाने वितरित केले गेले होते. दरम्यान, काही रिक्षापरवानाधारक मरण पावले. यातच शहरातील पालिका परिवहन उपक्रमाची प्रतिकूल स्थिती पाहता रिक्षा परवान्यांची संख्या वाढविण्याची मागणी पुन्हा पुढे आली. त्याचा विचार करून सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी परिवहन प्राधिकरणाच्या जिल्हास्तरीय बैठकीत रिक्षा परवाना नूतनीकरणाच्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेतला. जे परवानाधारक रिक्षाचालक व मालक मरण पावले आहेत, त्यांच्या विधवा पत्नीला उदरनिर्वाहाचे साधन म्हणून मृत पतीचे परत गेलेले रिक्षा परवाने विधवा पत्नींच्या नावे हस्तांतरण करण्यास मंजुरी दिली. हा निर्णय मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात आला असता त्यास शासनानेही मंजुरी दिली. त्यानुसार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी मृत रिक्षापरवानाधारकांच्या विधवा पत्नींकडून अर्ज मागविले. यात ११८५ अर्ज प्राप्त झाले. या अर्जातून १९८५ सालापासूनची यादी तपासल्यानंतर त्यातून ५४ रिक्षा परमिट विधवांच्या नावे हस्तांतरित करण्यास मंजुरी देण्यात आली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹डॉ . पानतावणे यांना जीवनगौरव पुरस्कार

डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्काराची बुधवारी कुलगुरू डॉ . बी. ए . चोपडे यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली . यात विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे यांच्यासह तिघांचा समावेश आहे .

वेदप्रकाश यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण 23 ऑगस्ट रोजी होणार आहे . डॉ . चोपडे म्हणाले , "" शिक्षण , विज्ञानासाठी डॉ . सुखदेव थोरात , वैद्यकीय सेवा , संशोधन व समाजकार्यासाठी डॉ . अशोक कुकडे, साहित्य लेखनासाठी डॉ . गंगाधर पानतावणे , प्रशासन , प्रशासकीय सेवेसाठी डॉ . उमाकांत दांगट, विधी क्षेत्रासाठी ऍड . भगवानराव देशपांडे यांना पुरस्कार जाहीर करण्यात येत आहेत. ''

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹प्रसुती रजेचा कालावधी वाढवणारे विधेयक राज्यसभेत मंजूर

सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना आता २६ आठवड्यांपर्यंतची पगारी रजा मिळणार आहे. यासंबधीचे विधेयक गुरुवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे. याआधी प्रसुती रजेचा कालावधी हा केवळ १२ आठवड्यांचा होता. गुरूवारी प्रसुती रजा विधेयक राज्यसभेत सादर करण्यात आले यावेळी या विधेयकात रजेचा कालावधी १२ आठवडयांवरुन २६ आठवडयांचा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. यामुळे खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. सरकारी नोकरीत काम करणाऱ्या महिलांना ही सुविधा होतीच, परंतु, आता खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनादेखील याचा फायदा होणार आहे. या विधेयकामध्ये सरोगसी मातांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. जर एखादी महिला कर्मचारी बाळास दत्तक घेत असेल, तर तिला १६ आठवड्यांची पगारी रजा दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹कुदनकुलम अणुऊर्जा प्रकल्प – १ देशाला समर्पित

पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी बुधवारी संयुक्तपणे १००० मेगावॅट क्षमतेचा कुदनकुलम अणुऊर्जा प्रकल्प-१ देशाला समर्पित केला. हा जगातील सर्वात सुरक्षित प्रकल्प असल्याची ग्वाहीही या वेळी या नेत्यांनी दिली.
कुदनकुलन – १ हा भारत-रशियाचा संयुक्त प्रकल्प असून भारतात स्वच्छ ऊर्जानिर्मिती वाढविण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे, असे नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतून या कार्यक्रमात सहभागी होताना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जाहीर केले. रशियासमवेत असलेली आपली मैत्री अबाधित आहे आणि आम्ही एकत्रितपणे हा प्रकल्प समर्पित करीत आहोत हे योग्यच आहे. हरित वाढीसाठी भागीदारीचा मार्ग सुरू करण्याची आमची बांधिलकी आहे याचे संकेतही यातून मिळाले आहेत, असे मोदी म्हणाले.
मॉस्को येथून या कार्यक्रमात सहभागी होताना पुतिन म्हणाले की, सर्वासाठी हा मोठा कार्यक्रम आहे. हा प्रकल्प रशियातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आला आहे, प्रकल्प उभारून केवळ तो कार्यान्वित करणे इतकेच याचे महत्त्व नाही. अणुतंत्रज्ञानात रशिया अग्रेसर असल्याचे सर्वश्रुत आहे आणि रशियाच्या तंत्रज्ञानात भारतीयांना सहभागी करून घेण्यास आम्हाला आनंद होत आहे, असे पुतिन म्हणाले.
या कार्यक्रमात चेन्नईतून सहभागी होताना जयललिता म्हणाल्या की, हा प्रकल्प म्हणजे भारत आणि रशिया यांच्यातील मैत्रीचे एक प्रतीक आहे आणि त्यामुळेच या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला आपण पाठिंबा दिला. या प्रकल्पात रशियातील व्हीव्हीईआर पद्धतीच्या अणुभट्टय़ांचा वापर करण्यात आला आहे. प्रकल्पाचा दुसरा टप्पा या वर्षअखेरीला कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. स्थानिकांनी विरोध केल्याने या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यास विलंब झाला. हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्याने भारत आणि रशियातील मैत्रीचा नव्या क्षेत्रातील अध्याय सुरू झाला आहे. प्रत्येकी १००० मेगाव्ॉट क्षमतेची पाच युनिट या प्रकल्पात उभारण्यात येणार आहेत, असे मोदी म्हणाले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹तब्बल 12 वर्षांनंतर प्रकटली भगीरथी !

श्रीक्षेत्र महाबळेश्वर येथे तब्बल 12 वर्षांनंतर आज रात्री 9.29 मिनिटांनी भगीरथी नदी प्रकटली. महाबळेश्वर येथील गंगाभागीरथी कुंड सतत अकरा वर्षे कोरडे होते. तब्बल बारा वर्षांनंतर भागीरथी नदी गुरुवारी रात्री साडेनऊला प्रकट होणार होती. या पार्श्वभूमीवर महाबळेश्वरमधील पंचगंगा मंदिर विद्युत रोषणाई, फुलांच्या माळा व दिव्यांनी सजवले होते. रात्री आठच्या सुमारास आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते सपत्नीक गंगापूजन करण्यात आले.

दक्षिण भारतातील प्राचीन सुप्रसिद्ध तीर्थस्थळ असलेले श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे यंदाच्या वर्षी शके १९३८ मध्ये श्रावण शु. ८ गुरुवार, दि. ११ आॅगस्ट २०१६ रोजी रात्री ९ वाजून २९ मिनिटांनी बारा वर्षांतून गुरू कन्या राशीमध्ये प्रवेश करत आहे. यावेळी भागीरथी नदी जलप्रवाह दृष्टिक्षेपास येणार आहे. हा दिव्य सोहळा पाहण्यासाठी क्षेत्र महाबळेश्वर येथे राज्यभरातील हजारो भाविक दाखल होत होते.

भागीरथी नदी बारा वर्षांनंतर प्रकट होणार असल्याने भाविकांमध्ये उत्साह दिसून येत होता. पंचगंगा देवस्थान व श्री क्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायतीने अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये सायंकाळी साडेसात वाजता आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते झेंडा पूजनाने कार्यक्रमांना सुरुवात झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून गंगापूजन करण्यात आले. साडेनऊला आरती करण्यात आली. त्यानंतर हजारो भाविक भागीरथी नदीत स्नान करतील, अशी माहिती देवस्थानतर्फे देण्यात आली.

क्षेत्र महाबळेश्वर येथील पंचगंगा मंदिरातून कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री, गायत्री, गंगाभागीरथी आणि सरस्वती या नद्या उगम पावतात. यातील कृष्णा, वेण्णा, कोयना आणि सावित्री या चार कुंडातून नित्य निरंतर जलप्रवाह सुरू असतो. सरस्वती नदी ही सदैव गुप्त रूपाने वास करून असते. त्यामुळे तिच्यातील प्रवाह दिसत नाही.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मंजुळा चेल्लुर [ मुख्य न्यायाधीश - कोलकाता उच्च न्यायालय ]

१) मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. जे. वाघेला यांच्या सेवानिवृत्ती नंतर कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लुर यांची नियुक्ती करण्यात आली.
.
२) न्या. चेल्लुर २४ आॅगस्टपासून पदभार स्वीकारतील. मुंबई हायकोर्टाच्या १५० वर्षांच्या इतिहासातील त्या दुसऱ्या महिला मुख्य न्यायाधीश ठरल्या आहेत.
.
३) विधी व न्याय मंत्रालयाने १० आॅगस्ट रोजी अधिसूचना काढून कोलकता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर यांची बदली मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून करण्यात आल्याचे जाहीर केले.
.
४) न्या. चेल्लुर या मुंबई उच्च न्यायालयाच्या ४१ व्या मुख्य न्यायाधीश असतील. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या दुसऱ्या महिला मुख्य न्यायाधीश असतील.
.
५) १९९४ मध्ये निवृत्त न्या. सुजाता मनोहर यांनी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पद भूषविले होते.
.
६) न्या. चेल्लुर यांचा जन्म १९५५ मध्ये कर्नाटकमधील बेल्लरी गावात झाला. त्यांनी १९७७ मध्ये कायद्यात पदवी घेतली.
.
७) १९८८ मध्ये त्यांनी जिल्हा न्यायाधीश म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्यांनी १० वर्षे वकिली केली.
.
८) २००० मध्ये त्यांची कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर केरळ उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून काम केले.
.
९) २०१४ मध्ये त्यांची बदली कोलकाता उच्च न्यायालयात करण्यात आली. बेल्लरीमधील त्या पहिल्या महिला वकील आणि परदेशी जाऊन शिक्षण घेणाऱ्या पहिल्याच महिला ठरल्या.आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा