Post views: counter

Current Affairs November 2016 Part - 2

★|| 🇪🇲 🇵 🇸 🇨 🇰🇦 🇹 🇹🇦  ||★

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹राज्यातील आठ खेळाडूंना शासकीय नोकरी

 राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल कामगिरी करून राज्याचा नावलौकिक वाढविणाऱ्या आठ खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे .

राज्यातील क्रीडा क्षेत्रास प्रोत्साहन मिळावे , यासाठी राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचे विशेष धोरण आहे . त्यानुसार राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अशा गुणवंत खेळाडूंबाबत चर्चा केली . त्यानंतर या समितीने आठ खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक व क्रीडाविषयक पात्रतेनुसार शासकीय सेवेत थेट सामावून घेण्याचा प्रस्ताव तयार केला होता . त्यास मुख्यमंत्री फडणवीस आणि क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी मान्यता दिली आहे .
या खेळाडूंमध्ये संदीप यादव ( क्रीडा मार्गदर्शक , क्रीडा विभाग ) , कविता राऊत ( आदिवासी विकास विभाग ) , ओंकार ओतारी ( तहसीलदार , महसूल विभाग ) , अजिंक्य दुधारे ( क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा विभाग ) , पूजा घाटकर ( विक्रीकर निरीक्षक , विक्रीकर विभाग ) , नितीन मदने ( तहसीलदार , महसूल विभाग ) , किशोरी शिंदे ( नगरविकास विभाग ) आणि नितू इंगोले ( क्रीडा विभाग ) यांचा समावेश आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सोयाबीनवर आयात शुल्क वाढवण्याची केंद्राकडे मागणी

राज्यात यंदा सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्याने त्याचे दर घसरण्याची शक्यता आहे . अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने सोयाबीनवरील आयात शुल्क
वाढवावे , अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे केली आहे .

मुख्यमंत्र्यांनी जेटली यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे , की यंदा राज्यात सर्वत्र झालेला समाधानकारक पाऊस आणि राज्य सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे . गेल्या वर्षापेक्षा ते तिपटीने अधिक अपेक्षित आहे . त्यामुळे राज्यात सोयाबीनचे दर घसरण्याची शक्यता आहे . अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने किमान आधारभूत किमतीवर सोयाबीनची खरेदी सुरू केली आहे .

 शेतकरी अडचणीत येऊ नयेत , यासाठी विविध उपाययोजनाही लवकरच अमलात आणण्यात येतील . या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोयाबीनवरील आयात शुल्क वाढविल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹राज्यातील पर्यटन व्यवसाय होणार अधिक सोपा

आदरातिथ्य ( हॉस्पिटॅलिटी ) क्षेत्रातील व्यवसायांसाठी पर्यटन विभाग एकच सामाईक अर्ज ( मास्टर कॉमन ऍप्लिकेशन ) करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे दिले . परवान्यांची संख्या 70 वरून 41 वर आणण्यात आली आहे . लवकरच ही संख्या 34 वर आणण्यासाठीही प्रयत्न करावेत , अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे .

आदरातिथ्य क्षेत्रात " इज ऑफ डुईंग बिझनेस ' नुसार करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली "वर्षा ' निवासस्थानी बैठक झाली . यावेळी पर्यटन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्यासह विविध विभागांचे प्रधान सचिव व सचिव उपस्थित होते.

पर्यटन विभागाने संबंधित विभागांचे अर्ज एकत्रित करून एकच सामाईक अर्ज तयार करावा . तसेच या सर्व सेवा सेवा हमी कायद्यांतर्गत आणाव्यात , असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले . सर्व परवानग्या , मंजुरी यांची एकत्रित माहिती आणि यादी यांचा समावेश असलेला एकत्रित "जीआर ' पर्यटन विभागाने तयार करून तो सर्वांपर्यंत पोहचवावा . त्यासाठी सामाईक पोर्टलही तयार करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले .

इव्हेंट करण्यासाठी मंजुरीच्या प्रक्रियेत सुलभीकरण यावे यासाठी बंदिस्त थिएटर, हॉल , हॉटेल अशा स्थळांना पूर्वमंजुरी म्हणून नोंदणीकृत करण्यात येणार आहे . यामुळे आयोजकांच्या वेळेत बचत होईल . त्यांना पोलिस , वाहतूक , तसेच करमणूक कर यासंदर्भातील परवानगी घेणे आवश्यक राहील . मैदाने आणि मोकळ्या जागांवरील कार्यक्रमांनाही अशाच प्रकारे पूर्वपरवानगीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे , असे सादरीकरणाच्या वेळी सांगण्यात आले .

पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर - सिंह यांनी सादरीकरण केले. यावेळी मुंबई
महापालिका , सार्वजनिक बांधकाम विभाग , पोलिस , ऊर्जा , महसूल , विक्रीकर विभाग , राज्य उत्पादन शुल्क यांनी केलेल्या कारवाईबाबत आढावा घेण्यात आला .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹महिला साहित्य संमेलन १३ नोव्हेंबरला

अध्यक्षपदी डॉ. विजया वाड

महिला साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘पुढचं पाऊल ट्रस्ट’, ‘भरारी प्रकाशन’ आणि ‘ऋजुता फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन १३ नोव्हेंबर रोजी दादर माटुंगा कल्चरल सेंटर येथे होणार आहे. या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिका आणि मराठी विश्वकोश मंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ. विजया वाड या भूषवणार आहेत. यावेळी सुप्रसिद्ध साहित्यिका गिरीजा कीर यांचा सन्मान केला जाणार आहे.

या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिका माधवी कुंटे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. अध्यात्मविषयक अभ्यासक व विचारवंत डॉ. उषा देशमुख, वैद्यकीय क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल डॉ. मंजुषा दराडे, अनाथ मुलांसाठी मौलिक कार्य करणाऱ्या कावेरी नागरगोजे, परिस्थितीशी झगडून यश मिळवणाऱ्या अनघा मोडक, खाकी वर्दीतील संवेदनशील कवयित्री रिटा राठोड- जाधव यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
साहित्य संमेलनादरम्यान ‘ताऱ्यांचे जग- स्त्री साहित्य विशेषांक’ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. ‘गरज स्त्रीचे आत्मभान जागृत करणाऱ्या साहित्याची’ तसेच ‘स्त्रीला आचार, विचार आणि उच्चाराचे स्वातंत्र्य आहे का?’ या विषयांवर या संमेलनात चर्चासत्रे रंगणार आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आगामी काळात कर्करोगाचा धोका

मागील काही वर्षांपासून देशभरात कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे .

 सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 2012 मध्ये स्तनाच्या कर्करोगामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 39 हजार 234 एवढी होती . ही संख्या 2013 मध्ये 40 हजार 509 आणि 2014 मध्ये 41 हजार 851 एवढी प्रचंड होती . भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने ( आयसीएमआर ) व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पुढील तीन वर्षांत कर्करोगाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असून , 2020 मध्ये ती 17 लाखांच्या पुढे जाईल , असे भाकीत वर्तविण्यात आले आहे .

" आयसीएमआर ' च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे की , 2012 ते 2014 या काळात ग्रामीण आणि शहरी भागातील स्तनाचा कर्करोग झालेल्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे . ज्येष्ठ नागरिकांची वाढती संख्या, आरोग्याला हानी पोचविणारी जीवनपद्धती , तंबाखू आणि तंबाखू पासून बनविलेल्या उत्पादनांचे सेवन आदी कारणांमुळे ही संख्या वाढली असल्याचे म्हटले आहे .

गर्भाशयाच्या कर्करोगावर लस
सुरवातीच्या काळातच होणाऱ्या तपासण्या आणि वाढती जनजागृती आदींमुळे स्तनाच्या कर्करोगाचे निदान करण्यात बऱ्याच प्रमाणात यश आले आहे .

 उपचारांतील मतभिन्नतेमुळे गर्भाशयाचा कर्करोग झालेल्या महिलांवर उपचार होण्याचे प्रमाण कमी झाले असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे . गर्भाशयाच्या कर्करोगावर लस उपलब्ध असली , तरी त्याबाबत रुग्ण अनेकदा अनभिज्ञ असतात किंवा ही लस महागडी असल्यामुळे खरेदी करणे टाळतात , असे अहवालात म्हटले आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹दहशतवाद मुकाबल्यासाठी भारत - चीनचे सहकार्य

दहशतवादाशी मुकाबला व अन्य क्षेत्रांत उच्च पातळीवर मैत्रीपूर्ण संबंध ठेवून देवाणघेवाण करण्याचे भारत व चीनने ठरविले आहे . दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या चर्चेत हा निर्णय झाला.

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांग जियेची यांची काल हैदराबाद येथे चर्चा झाली. त्यामध्ये मैत्रीपूर्ण व खुले संबंध ठेवण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाल्याचे ठरविण्यात आल्याचे अधिकृत निवेदनात आज म्हटले आहे .

गेल्या दोन महिन्यांत यांग हे तिसऱ्यांदा भारत भेटीवर आले आहेत. या चर्चेत द्विपक्षीय , या प्रदेशातील तसेच आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे . राजकीय , आर्थिक, संरक्षण व दहशतवादाशी मुकाबला या क्षेत्रांत उच्च पातळीवर माहितीची देवाणघेवाण करीत शांततेचे वातावरण ठेवण्याचे या वेळी ठरविण्यात आले.

या चर्चेच एनएसजीचे सदस्यत्व त्याचप्रमाणे दहशतवादी मसूद अजहरच्या मुद्यांवर चर्चा झाली की नाही याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्याला चार पारितोषिके

आर्थिक व्यवहार, सर्वसमावेशी विकास, पायाभूत सुविधा आणि ई - गव्हर्नन्स या चार क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्राला "इंडिया टुडे ' नियतकालिकातर्फे आज येथे पुरस्कृत करण्यात आले . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी हे पुरस्कार केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते स्वीकारले .

वर्षभरातील आर्थिक व्यवहारविषयक पाहणीत राज्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी , सर्वसमावेशी विकासाच्या आघाडीवर मोठ्या राज्यांच्या श्रेणीत पहिला क्रमांक , तर पायाभूत सुविधा क्षेत्रातील सर्वाधिक सुधारित राज्य म्हणून महाराष्ट्राला पुरस्कृत करण्यात आले. त्याचबरोबर ई - गव्हर्नन्सद्वारे राज्याने केलेली श्रमांची बचत ही मोठ्या राज्यांच्या श्रेणीतील अग्रगण्य ठरल्याने यासाठीही महाराष्ट्राला पुरस्कार देण्यात आला .

या प्रसंगी बोलताना फडणवीस यांनी पारदर्शकता, कार्यक्षमता आणि लोकसहभाग ही राज्याच्या प्रगतीची त्रिसूत्री असल्याचे सांगितले .

 राज्यकारभारात माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर राज्याने केला आहे आणि त्याचा लाभही जनता मोठ्या प्रमाणात घेत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले .

 दुष्काळाचा उल्लेख करून त्यांनी गेल्या वर्षभरात 4500 गावे दुष्काळमुक्त केल्याचे सांगितले . शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संख्येतही लक्षणीय घट झाल्याचा दावा त्यांनी केला . राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या उत्कृष्ट कामाची प्रशंसा निती आयोगाने केल्याचे सांगून त्यामध्ये राज्याला उच्च क्रमांक प्राप्त झाला आहे , अशी माहिती त्यांनी दिली . मुंबई - नागपूर हा 800 किलोमीटर लांबीचा महामार्ग विकसित करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली .

" जीएसटी ' करपद्धतीच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राला न्याय मिळेल, अशी अपेक्षा मुनगंटीवार यांनी व्यक्त केली .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹जगातील सर्वांत मोठी अवकाश दुर्बीण तयार

परग्रहावरील सृष्टीचाही वेध शक्य असल्याचा खगोल शास्त्रज्ञांचा दावा
वॉशिंग्टन - अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था " नासा' ने जगातील सर्वांत मोठी अवकाशातील दुर्बीण तयार करण्याचा आपला महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केला आहे . "जेम्स वेब ' असे या दुर्बिणीला नाव दिले असून , ती 2018 मध्ये अवकाशात कार्यरत होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले . ही दुर्बीण मागील 26 वर्षांपासून कार्यरत असलेल्या हबल या दुर्बिणीची जागा घेणार आहे .

या दुर्बिणीद्वारे परग्रहावरील जीवसृष्टीचाही वेध घेणे शक्य होणार असल्याचा दावा काही शास्त्रज्ञांनी केला आहे . " जेम्स वेब ' ची निर्मिती पूर्ण झाली असून , तिच्या काही चाचण्या होणे अद्याप बाकी आहेत. या दुर्बिणीचा मुख्य भाग असल्या " प्रायमरी मिरर ' वर तंत्रज्ञांनी नुकताच अंतिम हात फिरवला आहे . ही दुर्बीण कार्यरत झाल्यावर ती 3. 5 अब्ज वर्षे पूर्वीच्या घटनांचा वेध घेऊ शकणार आहे .

 म्हणजेच , विश्वाच्या निर्मितीनंतरच्या घटनांची आतापर्यंत माहीत नसलेली माहिती या दुर्बिणीद्वारे मिळणार आहे . तब्बल वीस वर्षांच्या प्रयत्नांनंतर ही दुर्बीण तयार करण्यात आली आहे . ही दुर्बीण " नासा' ने युरोपीय स्पेस एजन्सी आणि कॅनडाच्या अवकाश संस्थेच्या साह्याने तयार केली आहे .

' नासा ' च्या हबल या दुर्बिणीपेक्षा शंभरपट अधिक "जेम्स वेब' ची क्षमता असून , हबलपेक्षा ही तिप्पट मोठी आहे . म्हणूनच या दुर्बिणीला "सुपर हबल ' असे टोपण नाव मिळाले आहे . निर्मिती पूर्ण झाली असली , तरी "जेम्स वेब ' ला काही चाचण्यांना सामोरे जावे लागणार आहे .

 अवकाश उड्डाणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या आवाजाच्या आणि कंपाच्या चाचणीबरोबरच अवकाशातील वातावरणामध्ये टिकण्याच्या दृष्टीने क्रायोजेनिक चाचणीही या दुर्बिणीवर केली जाईल , असे सूत्रांनी सांगितले . या दुर्बिणीचा मुख्य आरसा हा अठरा षट्कोनी आरशांपासून बनला असून , हे आरसे बेरिलियमपासून तयार केले आहेत. किरणोत्सारी किरणांचे परावर्तन प्राप्त करण्यासाठी या आरशांवर सोन्याचा अत्यंत पातळ थर लावला आहे .

' जेम्स वेब ' ची वैशिष्ट्ये

- 100 पट : हबलपेक्षा सक्षम
- 3 पट : हबलहून मोठी
- 18 : षट्कोनी आरसे
- 46 पौंड : प्रत्येक आरशाचे वजन
- सूर्यकिरणांचा सामना करू शकणारे अत्युच्च दर्जाचे कॅमेरे
- टेनिसच्या मैदानाच्या आकाराची पाच थरांची " ढाल ' दुर्बिणीचे रक्षण करण्यासाठी सज्ज

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘अतुल्य भारत’साठी मोदींचा चेहरा?

केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या ‘अतुल्य भारत’ जाहिरात मोहिमेचा चेहरा म्हणून सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि प्रियंका चोप्रा यांच्यासारख्या अभिनेत्यांची नावे मागे पडून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. अभिनेता आमिर खान याची जानेवारीमध्ये या मोहिमेतून गच्छंती झाल्यापासून या मोहिमेचे ‘ब्रँड अॅम्बेसिडर’पद रिक्त होते. मोदी यांनी गेल्या अडीच वर्षांत देशात तसेच परदेशात पर्यटनविषयक मुद्दे मांडलेल्या भाषणांचे व्हिडीओ फुटेज यासाठी वापरले जाणार आहे.

याआधी पर्यटन मंत्री महेस शर्मा यांनीही पर्यटन क्षेत्राच्या ब्रँड अॅम्बेसडर पदासाठी मोदी हाच ‘सर्वोत्तम चेहरा’ असल्याचे म्हटले होते. पंतप्रधान मोदी यांनी ज्या ज्या देशांना भेटी दिल्या आहेत, त्या त्या देशांमधून भारतात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्याचे त्यांनी म्हटले आहे. या दाव्याला दुजोरा देत मोदी यांच्या भेटीनंतर अमेरिका, जर्मनी, फिजी, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, यूके, कॅनडा, म्यानमार या देशांमधील पर्यटकांची संख्या वाढल्याचे पर्यटन मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

याआधी अनेक वर्षे अभिनेता आमिर खान हा पर्यटन मंत्रालयाच्या ‘अतुल्य भारत’ मोहिमेचा चेहरा होता. मात्र देशातील वाढत्या असहिष्णुतेबाबत त्याने केलेल्या विधानानंतर, जानेवारी महिन्यात त्याची या मोहिमेतून उचलबांगडी झाली होती. मात्र आमिर खान याची निवड सरकारने नव्हे, तर जाहिरात मोहीम राबवणाऱ्या एजन्सीने केली होती. मात्र त्याचा करार संपल्याने आमिरचा सहभाग संपला, असा दावा पर्यटन मंत्रालयाने तेव्हा केला होता.

देशातील वैविध्य आणि वैशिष्ट्ये याबद्दल मोदींच्या भाषणांचे ऑडिओ आणि व्हिडीओ यासाठी वापरण्याचा मानस असून या फुटेजची निवड करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. अनुकूल हवामान आणि नाताळ व नववर्षानिमित्त मिळणाऱ्या सुट्ट्या यामुळे नोव्हेंबर अखेरीपासून भारतातील पर्यटनाचा मोसम सुरू होणार असल्याने पुढील ४०-४५ दिवसांत ही मोहीम प्रसारित केली जाईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले. या मोहिमेसाठी एजन्सीच्या निवडीची प्रक्रियाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ब्रिटनकडून व्हिसा धोरणामध्ये बदल

कर्मचाऱ्यांच्या वेतन मर्यादेतील वाढीचा भारताला फटका

लंडन - ब्रिटनमधील विस्थापितांच्या वाढत्या लोकसंख्येची दखल घेऊन तेथील सरकारने युरोपियन संघाचे नागरिक नसलेल्यांसाठीच्या व्हिसा धोरणामध्ये बदल केला आहे . या बदलाचा मोठा फटका माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या भारतीयांना बसेल . ब्रिटनच्या गृह मंत्रालयाने गुरुवारी सायंकाळी याची घोषणा केली . आता नव्या बदलान्वये द्वितीय श्रेणीतून "इंट्रा कंपनी ट्रान्स्फर'( आयसीटी) अंतर्गत 24 नोव्हेंबरनंतर व्हिसासाठी अर्ज भरणाऱ्यांसाठी 30 हजार पौंडची वेतन मर्यादा निर्धारित करण्यात आली असून , याआधी हे प्रमाण 20 हजार आठशे पौंड एवढे होते .

ब्रिटनमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या बहुतांश भारतीय कंपन्यांकडून " आयसीटी' मार्गाचा अवलंब केला जातो . विस्थापितविषयक सल्लागार समितीने केलेल्या अभ्यासातून यंदा 90 टक्क्यांपेक्षाही अधिक व्यावसायिक आणि अभियंत्यांनी याच मार्गाने व्हिसा प्राप्त केल्याचे उघड झाले आहे . ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे रविवारी तीन दिवसांच्या भारत भेटीवर येत असतानाच ब्रिटिश सरकारने व्हिसा धोरणात हा महत्त्वपूर्ण बदल केला आहे .

अन्य बदल
द्वितीय श्रेणी ( सामान्य ) अंतर्गत अनुभवी कामगारांची वेतनमर्यादा 25 हजार पौडांवर नेण्यात आली असून द्वितीय श्रेणी ( आयसीटी) अंतर्गत थोडासा दिलासा देत सरकारने पदवीधर प्रशिक्षणार्थ्यांच्या वेतन मर्यादेत कपात करून ती 23 हजार पौंडवर आणली आहे . कंपन्यांमधील प्रतिवर्ष जागांची संख्या 20 टक्क्यांनी वाढविण्यात येईल . द्वितीय श्रेणी ( आयसीटी ) कौशल्य हस्तांतर ही उपश्रेणी रद्द करण्यात आली आहे . याशिवाय चतुर्थ श्रेणी नियमांतदेखील काही बदल करण्यात आले आहेत.

भाषा सक्तीचाही फटका
ब्रिटन सरकारने युरोपियन युनियन बाहेरील देशांतील नागरिकांसाठी नवी इंग्रजी भाषा सक्तीची केली असल्याने याचाही भारतीयांना फटका बसेल . ब्रिटनमध्ये अडीच वर्षांपेक्षाही अधिक काळ तेथे व्यतीत केल्यानंतर स्थिरावू पाहणाऱ्या भारतीयांच्या समस्या यामुळे वाढणार आहेत. आपल्या देशात येणाऱ्या परकीय मनुष्यबळाला चाप लावण्यासाठी ब्रिटन सरकारने हे बदल केल्याचे बोलले जात आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारत-जपानमध्ये शुक्रवारी अणुकरार

भारत जपानसोबत शुक्रवारी नागरी अणुकरार करण्याची शक्यता आहे. भारताने अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर (एनपीटी) स्वाक्षरी केलेली नाही. एनपीटीवर करार न करूनही जपानसोबत अणुकरार करणारा भारत पहिला देश ठरणार आहे, असे ‘साऊथ चीन मॉर्निंग पोस्ट’ने (एससीएमपी) आपल्या वृत्तात म्हटले आहे. जपानच्या योमिऊरी शिंबून वृत्तपत्राचा या बातमीत हवाला देण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी गुरुवारी जपानमध्ये दाखल होणार आहेत. शुक्रवारी त्यांच्या उपस्थितीत या अणुकरारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. या करारामुळे जपान भारतात अणुऊर्जा प्रकल्प उभारू शकणार आहे.

दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमा आणि नागासाकी शहरांमध्ये अणुबॉम्बचा विध्वंस अनुभवलेल्या जपानने या आधी भारताशी अणुकरार करण्याबद्दल विचारही केला नव्हता. त्यामागे भारताने ‘एनपीटी’वर सही केली नव्हती हे प्रमुख कारण होते. भविष्यात जर भारताने अणुचाचणी केली तर जपान नागरी अणुकरारासंबंधी सहकार्य तातडीने थांबवेल असे या करारात नमूद केल्याचेही या वृत्तात म्हटले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारतातील तंबाखूविरोधी परिषदेवर पाकिस्तानचा बहिष्कार

इस्लामाबाद - भारतात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय तंबाखूविरोधी परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे . भारत आणि पाकिस्तान संबंधात सध्या प्रचंड तणाव निर्माण झाला आहे , त्या पार्श्वभूमीवर आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे पाकिस्तानकडून सांगण्यात आले . जागतिक आरोग संघटनेतर्फे तंबाखू नियंत्रणासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली असून , या परिषदेला 180 देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. नवी दिल्ली येथे 7 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत ही परिषद होत आहे .

पाकिस्तानच्या आरोग्य विज्ञान नियंत्रण मंत्री सैरा अफझल तरार यांनी सांगितले की , भारतात होत असलेली तंबाखूविरोधी परिषद महत्वाची आहे . मात्र , दोन देशांमधील सध्याची तणावाची परिस्थिती पाहता या परिषदेला पाकिस्तानचा प्रतिनिधी उपस्थित राहणार नाही . उरी हल्ल्यानंतर झालेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹कांगारुंनी २८ वर्षांनी घरच्या मैदानात टेकले गुडघे, आफ्रिकेची मालिकेत विजयी सलामी

कागिसो रबाडाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियावर १७७ धावांनी विजय मिळविला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. १९८८ नंतर पहिल्यादाच ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानात पहिली कसोटी गमावली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला ५३९ धावांचे आव्हान दिले होते. डोंगरा एवढ्या धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा डाव ३६१ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाच्या ९७ आणि पीटर नेव्हिलने नाबाद ६० धावांची खेळी करुन आफ्रिकन गोलंदाजांचे आव्हान पेलण्याचा प्रयत्न केला. त्याच्या व्यतिरिक्त अन्य फलंदाजांना मैदानात तग धरता आला नाही. परिणामी ऑस्ट्रेलियाला तब्बल २८ वर्षानंतर पराभवाचा सामना करावा लागला.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹चीनच्या नाकावर टिच्चून भारताने लडाखमध्ये टाकली पाइपलाइन

चीनच्या नाकावर टिच्चून भारतीय लष्कराच्या अभियंत्यांनी लडाखमधील डेमचोक भागात पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण केले आहे. येथील रहिवाशांना सिंचनाची सोय व्हावी यासाठी भारताकडून येथे पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू होते. मात्र चीनने या कामास आक्षेप घेतल्याने भारतील लष्कर आणि चिनी सैनिकांमध्ये झटापट झाली होती.

चीनने डेमचोक भागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ यावेळी पीपल्स आर्म्स पोलीस फोर्स (पीएपीएफला तैनात केले होते. मात्र सामान्यपणे येथे पीएलएचे सैनिक तैनात असतात. दरम्यान चिनी सैनिकांनी शुक्रवारी या भागात प्लॅस्टिकचे तंबू ठोकण्याचा प्रयत्न केला होता. पण भारताच्या इंडो-तिबेट सीमा पोलिसांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला होता. दोन्ही देशांचे सैनिक तीन दिवस समोरासमोर होते. अखेर ही तणावाची परिस्थिती शनिवारी निवळली. दरम्यान, चिनी सैन्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत भारतीय लष्कराच्या इंजिनियर्सनी एक किलोमीटर अंतराची पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण केले.

★|| 🇪🇲 🇵 🇸 🇨 🇰🇦 🇹 🇹🇦  ||★

#NATIONAL

Union Environment Ministry constitutes four-member team for conservation of Loktak Lake
Meghalaya govt to amend IT policy to new digital policy
NitinGadkari lays foundation stone of three major initiatives at Mumbai Port trust
New Delhi Declaration, Sendai Framework Plan adopted at AMCDRR 2016
India's first rural skate park in Bundelkhand

#INTERNATIONAL

Sinhala & Tamil to get equal status along with English as third official language in Sri Lanka
China Adopts Cyber Security Law
Global Climate conference to begin in Marrakech

#BANKING NEWS

UCO Bank To Raise Rs. 270 Crore Via Preferential Shares To LIC

#BUSINESS NEWS

ONGC VideshTo Provide $318 Million Financing Guarantee To Venezuela

#AGREEMENTS &MoUs

Assam Govt Inks MoU with Aviation Min
DRDO Signs MoU With IIT Delhi

#APPOINTMENTS

RBI appoints M RajeshwarRao as new ED

#AWARDS

Justin Bieber wins three awards at 2016 MTV EMAs
India rises to second spot on global business optimism index

#SCIENCE & TECHNOLOGY

‘Lost’ Chandrabhagariver found in Odisha
Google Capital changes its name to 'CapitalG'

#SPORTS NEWS

Sports Ministry wants BCCI to come under RTI
Petra Kvitova wins 2016 WTA Elite Singles Trophy
Henri Kontinen, John Peers win 2016 BNP Paribas Masters Doubles title

#OBITUARY

Former MoS Jayawantiben Mehta Dies

Mahesh Waghmare:
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते “ मुंबई पोर्ट ट्रस्ट” च्या प्रकल्पांचा प्रारंभ

मुंबई, 7-11-2016

“ मुंबई पोर्ट ट्रस्ट” च्या विविध प्रकल्पांचा केंद्रीय जहाज, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज प्रारंभ करण्यात आला. यावेळी देशातील सर्वात मोठ्या “ ऑईल हँडलिंग जेट्टी” चा पायाभरणी समारंभ गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच पूर्व मुंबई जल वाहतूक सेवा आणि विस्तारित फेरी प्रवासी टर्मिनलचे उद्‌घाटन यावेळी करण्यात आले.
मुंबई पोर्ट ट्रस्टने जवाहर द्वीप येथे पाचव्या ऑईल बर्थचा प्रकल्प हाती घेतला आहे. यामुळे सार्वजनिक उद्योगातील तेल कंपन्यांना मोठे तेलाचे टँकर बंदरात उतरवणे सोयीचे जाणार आहे. या सुविधेमुळे भाडे दरात प्रतिवर्षी 170 कोटी रुपये वाचणार आहेत. या प्रकल्पाचा खर्च बीपीसीएल आणि एचबीसीएल संयुक्तपणे करणार आहेत.
बंकरिंग सेवा-
जवाहर द्वीप येथे बंकरिंग सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी बीपीसीएल आणि एचपीसीएल यांनी मुंबई पोर्ट ट्रस्टशी करार केला आहे. या बंकरिंग सेवेमुळे दोन लाख टन मालाची चढ-उतार होत असलेल्या या बंदराचा व्यवसाय सन 2034 पर्यंत 19.25 लाख टनांपर्यंत वाढेल, अशी अपेक्षा आहे. जवाहर द्वीप येथे सध्या असणाऱ्या दुसऱ्या ऑईल बर्थमध्ये सुधारणा करण्याचे कार्यही मुंबई पोर्ट ट्रस्ट करणार आहे. त्यानुसार एचपीसीएल आणि बीपीसीएल यांना माल साठवण्याची सुविधा मिळणार आहे.
रो-रो सेवा-
मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवर सागरी प्रवासी सेवेला प्राधान्य देण्यासाठी जहाज मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने रो-रो प्रवासी वाहतूक सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी मुंबई,  अलिबागमधील मांडवा आणि नवी मुंबईतील नेरुळ ही ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

भाऊचा धक्का सुधारणार
फेरी वार्फ अर्थात पूर्वीचा भाऊचा धक्का येथील प्रवासी वाहतुकीत आणखी सुधारणा करण्यात येणार आहे. लक्ष्मण चंदरजी अजिंक्य यांनी सन 1789 ते 1858 या काळात “ भाऊचा धक्का” बांधला होता आणि मुंबईत फेरी वाहतुकीला प्रारंभ झाला होता. आता हा भाऊचा धक्का अधिक चांगल्या पद्धतीनं सुधारण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार राहूल शेवाळे आणि खासदार अरविंद सावंत उपस्थित होते.

★|| 🇪🇲 🇵 🇸 🇨 🇰🇦 🇹 🇹🇦  ||★:
Current Affairs

•    वह देश जिसमें विश्व की पहली शून्य कार्बन उत्सर्जन हाइड्रोजन ट्रेन आरंभ की गयी: जर्मनी

•    इस देश की टीम ने महिला एशियन चैंपियंस ट्रॉफी ख़िताब जीता: भारत

•    वह युगल जिसने बीएनपी पेरिबैस मास्टर्स में एटीपी वर्ल्ड टूर मास्टर्स 1000 टीम टाइटल जीता: हेनरी कोंटीनेन एवं जॉन पीयर्स

•    भारत के 17000 जजों के कार्यकाल से संबंधी जानकारी यहां सेव रखी जाएगी: नेशनल जुडिश्यल डाटा ग्रिड

•    इन्हें शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमेटी का प्रधान नियुक्त किया गया: किरपाल सिंह बडूंगर

•    केन्द्र सरकार द्वारा गर्भवती महिलाओं के लिए शुरू किए गए वह अभियान जिसके तहत देश की 3 करोड़ गर्भवती महिलाओं को तमाम अत्याधुनिक प्रसव-पूर्व सुविधाएं प्रदान किया जायेगा: प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान

•    विश्व बैंक द्वारा नवम्बर 2016 को जारी की गई रिपोर्ट के अनुसार यह राज्य विद्युत के कार्यकुशल प्रयोग के मामले में अग्रणी राज्य बना: आन्ध्र प्रदेश

•    पुरे विश्वभर में 5 नवम्बर 2016 को मनाये गये पहला विश्व सुनामी जागरूकता दिवस का विषय यह था: प्रभावी शिक्षा और निकासी ड्रिल

•    भारत और जिस देश ने तेल उत्पादन समझौते पर हस्ताक्षर किए: वेनेजुएला

•    केंद्र सरकार ने आरआईएल और उसके सहयोगियों पर जितने करोड़ रुपये का जुर्माना लगाया: 10,000 करोड़

•    विश्व  टेनिस रैंकिंग में नोवाक जोकोविच को पीछे छोड़कर जिस टेनिस खिलाड़ी ने प्रथम पायदान पर पहुँचा: एंडी मरे

•    मैनी पैक्याओ ने विश्व मुक्केबाजी संगठन का वेल्टरवेट वर्ग का खिताब जीता. इससे पहले वे इतने बार यह ख़िताब जीत चुके हैं: दूसरी

•    पहली अंतर्राष्ट्रीय कृषि जैव विविधता सम्मेलन का उद्घाटन जिसने किया: प्रधानमंत्री नरेन्द्र  मोदी

•    एशिया प्रशांत क्षेत्र के जितने देशों ने सभी प्रकार की आपदाओं से निपटने हेतु व्यवस्था मजबूत करने तथा वैश्विक प्रारूप अपनाने का संकल्प लिया: 51 देश

•    हाल ही में राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (एनएचआरसी) का सदस्य जिसे नियुक्त किया गया: अविनाश राय खन्ना

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अजिंठा , वेरूळ लेण्यांच्या संवर्धनासाठी जपानची मदत

मुंबई - जगभरातील व देशाच्या कानाकोपऱ्यातील पर्यटकांना औरंगाबाद येथील अजिंठा -वेरूळ लेण्यांचे मोठे आकर्षण आहे . त्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील संवर्धनासाठी जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी (जेआयसीए ) आता महाराष्ट्र पर्यटन विकास विभागाला ( एमटीडीसी) मदत करणार आहे .

बाह्य मूल्यांकनाविषयी नुकतेच जेआयसीएच्या भारतातील कार्यालयाने "एमटीडीसी ' ला पत्र पाठवले होते . 27 नोव्हेंबरपासून 24 डिसेंबरपर्यंत " जेआयसीए' चे प्रतिनिधी या स्थळांना भेट देतील . त्यानंतर जवळपास वर्षभर म्हणजेच ऑक्टोबर 2017 पर्यंत याविषयी अभ्यास केला जाईल . निश्चित करण्यात आलेल्या समितीवर केंद्र सरकारच्या "एएसआय ' , " एएआय ' या संस्थांबरोबर "एमटीडीसी ' आणि इतर राज्यांतील सरकारी संस्थांच्या प्रतिनिधींचीही निवड करण्यात आली आहे . अजिंठा आणि वेरूळ येथे पर्यटकांच्या सोईबरोबर वास्तूंचे संवर्धन करणेही अत्यंत आवश्यक आहे . याचा पहिला टप्पा 1993 ते 2004 दरम्यान पूर्ण झाला . दुसरा टप्पा 2016 आणि 17 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पाचशे , हजारच्या नोटा तडकाफडकी रद्द

नवी दिल्ली - काळा पैसा आणि अवैध व्यवहार रोखण्यासाठी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा आज मध्यरात्रीपासून (ता. ८ ) चलनातून बंद करण्यात आल्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जाहीर केला . दूरचित्रवाणीवरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी ही अतिमहत्त्वाची घोषणा केली . यातील एक हजाराच्या नोटा चलनातून पूर्णपणे बंद होणार असून , पाचशे रुपयांच्या नव्या नोटा लवकरच चलनात येतील. तसेच दोन हजार रुपयांची नोटही चलनात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राइक
काळ्या पैशाबाबत विशेष तपासणी पथक स्थापन
परदेशांत ठेवलेला काळा पैसा साठ टक्के कर भरून तीन महिन्यांत जाहीर करण्यासाठी २०१५ मध्ये कायदा संमत .
बॅंक व्यवहारांच्या माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी अमेरिकेसह अनेक देशांबरोबर करार .
भ्रष्टाचारातून मिळालेल्या काळ्या पैशाला ( बेनामी व्यवहार) आळा घालण्यासाठी ऑगस्ट २०१६ पासून कडक कायदा अस्तित्वात .
मोठा दंड भरून काळा पैसा जाहीर करण्यासाठी योजना
सध्याच्या नोटा करा बँकेत, पोस्टात जमा
३० डिसेंबरपर्यंत मुदत
पाचशे , हजारच्या नोटा बॅंका, टपाल कार्यालयांत १० नोव्हेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान जमा करा
पाचशे व दोन हजारच्या नव्या नोटा चलनात येणार
काही दिवस बॅंकेतून पैसे काढण्यावर मर्यादा
बॅंकेतून एका दिवशी दहा हजार , तर आठवड्याला एकूण वीस हजार काढता येणार
जुन्या नोटा बदलण्यासाठी आधार , पॅन कार्डसारखे सरकारी ओळखपत्र आवश्यक
नोटा बदलण्यासाठी १० ते २४ नोव्हेंबर दररोज चार हजारांची मर्यादा
२५ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत ही मर्यादा वाढणार
३० डिसेंबरनंतर नोटा जमा करण्यासाठी घोषणापत्र आवश्यक
एटीएम उद्या (ता. ९ ) व काही भागात १० नोव्हेंबरला बंद
एटीएममधून पैसे काढण्यावर प्रतिदिन २ हजार मर्यादा
काही दिवसांनतर ही मर्यादा ४ हजारांवर नेणार
मानवतावादी दृष्टिकोनातून ७२ तास सवलत
सरकारी रुग्णालये , सरकारी रुग्णालयांतील औषध दुकाने ( डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनसह ) नोटा स्वीकारणार
रुग्णांच्या कुटुंबीयांना याचा फायदा होणार
रेल्वे तिकीट बुकिंग , सरकारी बस , विमान तिकिटासाठी जुन्या नोटा स्वीकारणार
सरकारी कंपन्यांच्या पेट्रोल पंपांवर नोटा स्वीकारणार
स्मशानभूमीत नोटा स्वीकारणार
या सर्वांना जुन्या नोटांचे तपशील ठेवावे लागणार
धनादेश , डिमांड ड्राफ्ट, डेबिट , क्रेडिट कार्ड, इंटरनेट बॅंकिंगवर कोणतीही मर्यादा नाही

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹महात्मा गांधींचे नातू कनुभाई यांचे निधन

नवी दिल्ली - महात्मा गांधींचे नातू कनुभाई रामदास गांधी यांचे सोमवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले . प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरत येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. कनुभाई यांनी "नासा' मध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम पाहिले आहे .
गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते . काही दिवसांपूर्वी ते कृत्रिम श्वासोच्छवासावर होते . हृदयविकार व पक्षाघात आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . कनुभाईंच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे .

सध्या कनुभाई आपल्या बहिणीकडे बंगळूरमध्ये राहत होते . प्रकृती बिघडल्यामुळे ते सुरतला आले होते . ते सुरत येथील राधाकृष्ण मंदिरातील संत निवास येथे राहत होते. तीन वर्षांपूर्वीच ते अमेरिकेतून भारतात परतले होते . प्रारंभी त्यांनी दिल्ली , वर्धा , नागपूर येथे वास्तव्य केले. त्यानंतर ते सुरत येथील वृद्धाश्रमात काही महिने राहिले होते . गेल्या तीन महिन्यांपासून ते आपल्या पत्नीबरोबर सुरत येथील राधाकृष्ण मंदिरात राहत होते .

मार्च -एप्रिल 1930 च्या ऐतिहासिक मिठाच्या सत्याग्रहादरम्यान गुजरातच्या दांडी गावाच्या किनाऱ्यावर महात्मा गांधींनी हाती घेतलेल्या काठीचे एक टोक धरून पुढे चालणारा मुलगा म्हणून कनु प्रसिद्ध होते .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹लिंक्डइनला देणार फेसबुक शह ?

रोजगाराच्या जाहिराती पेजवर; ऍडमिन अर्जही स्वीकारणार

न्यूयॉर्क : ' फेसबुक' वर पेज ऍडमिनिस्ट्रेटर लवकरच नोकरीची जाहिरात करण्यासोबत उमेदवारांकडून अर्ज स्वीकारू शकणार आहेत. यामुळे लिंक्डइन या कंपनीला मोठी स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे .

याविषयी माहिती देताना फेसबुकचा प्रवक्ता म्हणाला , "फेसबुकवरील एकंदरीत चित्र पाहता अनेक छोटे व्यवसाय नोकरीच्या जाहिराती पेजवर देतात . पेज ऍडमिन रोजगाराच्या जाहिराती देतील आणि उमेदवारांकडून आलेले अर्जही स्वीकारतील याची चाचणी कंपनीकडून सुरू आहे .'' फेसबुकने ऑक्टोबरमध्ये लोकांना वस्तू व खरेदी विक्रीला परवानगी दिली होती . लोकांना जास्तीत जास्त जोडून ठेवण्यासाठी सोशल मीडिया साइट असलेल्या फेसबुककडून प्रयत्न सुरू आहेत. आता फेसबुक कंपन्यांना त्यांच्या पेजवर जाहिराती करण्यास देऊन आणखी निधी मिळवेल .

लिंक्डइन रोजगार देणारे आणि रोजगाराचा शोध घेणारे यांच्यात ऑनलाइन दुवा म्हणून काम करते . यावर कंपनीचे उत्पन्न अवलंबून आहे . रोजगार शोधणारे उमेदवार दरमहा शुल्क भरून त्यांची माहिती संकेतस्थळावर देतात . अनेक जण ही माहिती पाहून त्यांना रोजगाराची संधी देतात .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹बेनेगल यांच्या अहवालावर केंद्राचे मौन

मुंबई : सेंट्रल बोर्ड फॉर फिल्म सर्टिफिकेशन अर्थात सीबीएफसीवर सातत्याने ओढल्या जाणाऱ्या ताशेऱ्यांमुळे माहिती व प्रसारण मंत्रालयाने ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती नेमली. या समितीने वेळेत अहवाल दिला. बोर्डाच्या कार्यपद्धतीवरून सातत्याने वाद झडत असताना, आयबीने मात्र तब्बल तीन महिने उलटूनही या अहवालाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.

प्रमाणपत्रासाठी चित्रपट हा बोर्डाकडे आल्यानंतर त्यात सुचवले जाणारे कट्स, त्यातील शब्दांवर घेण्यात येणारे आक्षेप यावरून सिनेसृष्टीतील अनेक मान्यवरांनी नाराजी नोंदवली. याची दखल घेत दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या मार्गदर्शनाखाली सात जणांची समिती नियुक्त करण्यात आली. बदलत्या काळानुसार सेन्सॉरचे काम अधिक उत्तम व्हावे म्हणून या समितीद्वारे काही सूचना करण्यात आल्या आहेत. जुलैअखेरीस या समितीने माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे अहवाल दिला.

बेनेगल समितीने सुचवलेल्या प्रमाणपत्रांच्या पर्यायांची सूचना सीबीएफसीने मान्य केल्याच्या बातम्या दोन दिवसांपासून येत होत्या. परंतु, अहवाल सादर करून तीन महिने उलटूनही आयबी मूग गिळून गप्प आहे.

पर्याय महत्त्वाचे
आजवर यू, यूए, ए अशी प्रमाणपत्रे दिली जात. शिवाय, बोर्डाकडून चित्रपटात काटछाट होत असे. चित्रपटांना कट वा बीप न सुचवता यू, यूए १२ वर्षावरील, यूए १५ वर्षांवरील यांसह ए आणि एसी (अॅडल्ट विथ कॉशन) असे पर्याय सुचवले आहेत. बोर्डाने केवळ प्रमाणपत्र द्यावे. चित्रपटांत कट वा बीप सुचवू नये, असे या समितीने सुचवल्याचे समजते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आंतरराष्ट्रीय विधी आयोगावर मराठी झेंडा

संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय विधी आयोगाचा सदस्य या नात्याने आपण ‘जैसे थे’ धोरणाचे समर्थन करणार नसून, अतिशय सक्रियपणे काम करण्याची इच्छा बाळगून असल्याचे मत संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) आंतरराष्ट्रीय विधी आयोगावर निवडून आलेले सर्वात तरुण सदस्य अनिरुद्ध राजपूत यांनी मंगळवारी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय विधी आयोगावर निवड झालेले अनिरुद्ध राजपूत पहिलेच मराठी वकील ठरले आहेत.

यंदा आंतरराष्ट्रीय विधी आयोग सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भारताने राजपूत यांची उमेदवारी पुढे केली होती. आशिया खंडातून निवडून आलेल्या सात उमेदवारांमध्ये राजपूत यांना १९१ वैध मतांपैकी सर्वाधिक १६० मते मिळाली.
वयाच्या ३३व्या वर्षी आंतरराष्ट्रीय विधी आयोगाच्या ६८ वर्षांच्या इतिहासात ते सर्वात तरुण सदस्य ठरले आहेत.

 जागतिक स्तरावर असलेली भारताची प्रतिमा आणि तसेच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, संयुक्त राष्ट्रसंघातील कायम प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन आणि परराष्ट्र मंत्रालयाने केलेल्या भरघोस प्रयत्नांमुळे आपला मोठा विजय साध्य झाल्याचे राजपूत यांनी सांगितले. १ जानेवारी २०१७ पासून त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू होणार असून त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल. आंतरराष्ट्रीय कायद्याची उत्तम जाण असलेल्या राजपूत यांचे शिक्षण पुणे आणि लंडनमध्ये झाले असून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात काम केले आहे.

वातावरणातील प्रदूषण हा येणाऱ्या काळातील आंतरराष्ट्रीय महत्त्वाचा विषय ठरणार आहे. पारंपारिक आंतरराष्ट्रीय कायदा कसा तयार होतो, याचीही स्पष्टता नाही. या क्षेत्रात आपण काम करणार असून विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी नेमलेल्या लवादांच्या प्रक्रियेचे नियम तयार करण्यावर भर देणार असल्याची माहिती राजपूत यांनी दिली.

दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्रात शिरुरचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी राजपूत यांचा एका छोटेखानी समारंभात सत्कार करण्यात आला.

 आपल्या घरच्या लोकांनी केलेले हे कौतुक आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे असून या आठवणी चिरकाळ स्मरणात राहतील, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹उद्यापासून या नव्या नोटा

पंतप्रधानांनी नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी पाचशे व दोन हजाराच्या नव्या नोटा उद्या, १० नोव्हेंबरपासून चलनात येणार असल्याचे जाहीर केले. नाशिकरोड प्रेसमध्ये सध्या नव्या डिझाइनच्या पाचशे रुपयांच्या नोटा छापण्याचे काम सुरू असून, त्या नोटाही चलनात आल्याचे रिझर्व्ह बँकेने उशिरा जाहीर केले.

नव्या पाचशेच्या हिरव्या रंगाच्या नोटेच्या दर्शनी भागावर प्रथमच हिंदीत ५००चा आकडा असून, पाठीमागील बाजूस लाल किल्ल्याचे चित्र आहे. तर नव्या दोन हजाराच्या नोटेच्या पाठीमागील भागावर मंगलयानाचे चित्र आहे. या नोटेचा रंग गुलाबी आहे. दोन्ही नोटांवर स्वच्छ भारत अभियानाचे चिन्ह आहे. दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांची छपाई रिझर्व्ह बँकेच्या नाशिकच्या छापखान्यात सुरू आहे.

कमालीची गुप्तता

मोदी सरकारने ५०० व हजाराच्या नोटा रद्द करताना कमालीची गुप्तता पाळली. केंद्रातील संबधित सचिवानांही विश्वासत घेतले नसल्याचे समजते. फक्त पंतप्रधान कार्यालयालाच नव्या निर्णयाची कल्पना होती, असे समजते. प्रेस व्यवस्थापनातही सायंकाळी चलबिचल होती.

नव्या नोटांत जीपीएस चीप

दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार आहेत. दोन हजाराच्या या नोटा फक्त कागदाच्या नाहीत. नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करून या नोटांची निर्मिती करण्यात आली आहे. नोटांमध्ये नॅनो जीपीएस चीप असेल. ते फक्त सिग्नल परावर्तनाचे काम करेल. जेव्हा उपग्रहाकडून एनजीसीकडे त्याचे स्थान जाणून घेण्यासाठी संदेश पाठवला जाईल, तेव्हा दोन हजाराच्या नोटमध्ये असणारी एनजीसी उपग्रहाला सिग्नल पाठवेल. यामुळे नोट नेमकी कुठे आहे, तिचा सीरियल नंबर नेमका काय आहे, याची माहिती मिळू शकेल. विशेष म्हणजे ही नोट जमिनीखाली १२० मीटर असेल तरी ती शोधून काढता येणे शक्य असेल. एनजीसी यंत्रणा नोटेतून काढता येणार नाही. या नोटेच्या आजूबाजूला नेमकी किती रक्कम साठवून ठेवण्यात आली आहे, याची माहितीदेखील मिळू शकणार आहे. एखाद्या दोन हजार रुपयाच्या नोटेच्या जवळ जर मोठी रक्कम बऱ्याच कालावधीपासून असल्याचे आढळले, तर त्याची माहिती प्राप्तीकर विभागाला दिली जाईल आणि याचा तपास सुरू होईल.

Source: Maharashtra Times

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹साठ कोटी पौंड मसाला बाँडची नोंदणी

येत्या तीन महिन्यांच्या आत चार रुपये मूल्याचे ६० कोटी पौंड किमतीच्या (७४.८ कोटी डॉलर) मसाला बाँडची लंडनमध्ये नोंदणी होण्याची शक्यता आहे. अशी माहिती ब्रिटन सरकारतर्फे सोमवारी देण्यात आली. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात भारत आणि ब्रिटनमध्ये महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे.

परदेशांमध्ये रुपयांमध्ये जारी करण्यात येणाऱ्या बाँडना मसाला बाँड म्हणून ओळखले जाते. या बाँडच्या माध्यमातून देशातील महामार्ग आणि रेल्वेमार्गांचा विस्तार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होण्याची तसेच, ऊर्जा निर्मिती विशेषतः अपारंपरिक ऊर्जा निर्मितीसाठी प्रयत्न होण्याची शक्यता आहे. हे बाँड केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ‘इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन’, ‘इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी’, ‘एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेड’ आणि ‘नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया’ या कंपन्यांच्या माध्यमातून जारी करण्यात येणार आहेत. या बाँडचे वितरण जानेवारी २०१७पर्यंत करण्यात येण्याची शक्यता आहे.

‘सरकारने जारी केलेल्या मसाला बाँडना ब्र्रिटनमधून चांगला प्रतिसाद मिळणे, हा भारताच्या विकासावर करण्यात आलेले शिक्कामोर्तबच आहे. यामुळे दोन्ही देशातील आर्थिक संबंध आणखी दृढ होतील,’ असा विश्वास मे यांनी व्यक्त केला. जुलैमध्ये पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतरे मे यांचा हा पहिलाच बिगरयुरोपीय देशाचा दौरा ठरला आहे. दोन्ही देशांतील व्यापारी संबंध आणखी दृढ करून नजीकच्या भविष्यात ब्रेक्झिटमुळे निर्माण होणाऱ्या संकटाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार जुलै २०१६पासून आता आतापर्यंत ९० कोटी पौंडांपेक्षा अधिक मसाला बाँड लंडनमध्ये जारी करण्यात आले आहेत. आतापर्यंत जागतिक बाजारपेठेत जारी करण्यात आलेल्या एकूण मसाला बाँडच्या तुलनेत ७० टक्के बाँड एकट्या लंडनमध्ये जारी करण्यात आले आहेत. ‘आमचे सरकार भारतीय तसेच, आमच्या अर्थव्यवस्थेच्या भक्कमतेसाठी अधिक प्रभावीपणे काम करू इच्छित आहे. त्यामुळे बाँड बाजारात रुपयाच्या वाढीचा वेग कायम राहण्यास मदत होईल. त्याचा फायदा भारताला पायाभूत सोयीसुविधांसंर्भातील गुंतवणूक योजना राबविण्यास मदत होईल,’ असेही श्रीमती मे यांनी स्पष्ट केले.

मसाला बाँड एक संधी
यापूर्वी २०१५मध्ये जारी करण्यात आलेले मसाला बाँड्स भारतीय कंपन्यांना फायदा कमवण्यासाठी एक चांगली संधी आहे. यामुळे जागतिक गुंतवणूकदारांना तसेच कंपन्यांना चांगला नफा कमवण्याचे साधन प्राप्त होण्याची शक्यता आर्थिक विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹नासा सहा लघु उपग्रह सोडणार

नासा सहा प्रगत उपग्रहसोडणार असून, ते आकाराने ब्रेडइतके ते वॉशिंग मशीनसारखे लहान असणार आहेत. त्यामुळे पृथ्वीवरील चक्रीवादळे, ऊर्जा अर्थसंकल्प व हवामान यात दृष्टिकोन किंवा उपाययोजना ठरवण्यात मदत होणार आहे. या उपग्रहांचा आकार लहान असून, त्यांचा खर्च कमी असणार आहे. इतर मोहिमांमधील अग्निबाणांबरोबर पूरक म्हणून हे उपग्रह पाठवले जाणार आहेत. त्यामुळे त्यांच्या अवकाशातील प्रक्षेपणाचा खर्चही कमी होणार आहे. नवीन तंत्रज्ञान व विज्ञानाच्या प्रयोगांसाठी त्यांचा उपयोग होणार आहे. नासा लहान उपग्रह वापरण्यावर भर देत असून, त्याच्या माध्यमातून काही वैज्ञानिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे, असे नासाच्या विज्ञान कार्यक्रम संचालनालयाचे सहायक प्रशासक थॉमस झुपबुशेन यांनी सांगितले.

अवकाशातील नवीन प्रयोग त्यात विद्यार्थ्यांचा सहभाग, संशोधकांना मिळणारा प्रत्यक्ष अनुभव यात महत्त्वाचा आहे. लहान उपग्रह तंत्रज्ञान अवकाशातून पृथ्वीच्या निरीक्षणासाठी उपयोगी ठरणार आहे. यातील पाच उपग्रह पुढील काही महिन्यांत सोडले जाणार असून, त्यात बदलत्या ग्रहाच्या अभ्यासात मदत होणार आहे. नासाच्या पृथ्वी विज्ञान विभागाचे मायकेल फ्रेलिच यांनी सांगितले, की नासाने लघु उपग्रहातून खर्च कमी केला आहे. या महिन्यात रॅव्हन हा उपग्रह सोडण्यात येणार आहे. त्याचे पूर्ण नाव रेडिओमीटर अॅसेसमेंट युजिंग व्हर्टिकली अलाइन्ड नॅनोटय़ूब्ज असे आहे. तो क्युबसॅट प्रकारातील उपग्रह आहे. त्याचा उपयोग पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करून ऊर्जा समस्येवरील खर्च ठरवण्यासाठी होणार आहे. २०१७ मध्ये दोन क्युबसॅट उपग्रह सोडले जाणार असून, ते ढगांचा अभ्यास करणार आहेत. त्यातून वातावरणाची माहिती मिळेल.

 आइसक्युब हा उपग्रह नासाच्या गोडार्ड स्पेस सेंटरचे डाँग वू यांनी तयार केला असून, त्याचा उपयोग ढगातील बर्फाचे मापन करण्यासाठी होणार आहे. त्यात मायक्रोवेव्ह रेडिओमीटरचा वापर केला आहे. हार्प म्हणजे हायपर अँग्युलर रेनबो पोलरीमीटर हा उपग्रह मेरीलँड बाल्टीमोर विद्यापीठाचे वँडेरली यांनी तयार केला आहे. त्यातून हवेतील कणांचे मापन व ढगातील बाष्पकणांचा आकार यांचा नवीन पद्धतीने अभ्यास केला जाईल. मिराटा म्हणजे मायक्रोवेव्ह रेडिओमीटर टेक्नॉलॉजी अॅक्सिलरेशन मिशन हा उपग्रह २०१७ मध्ये सोडला जाणार असून, तो शूबॉक्सच्या आकाराचा आहे. तो हवामान उपग्रह आहे. त्यावर काही संवेदक असून त्यातून तापमान, पाण्याची वाफ, ढगातील बर्फ यांची माहिती गोळा केली जाईल त्यातून वादळे व हवामानाचा अंदाज घेतला जाईल.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पंतप्रधान मोदींच्या काळात देशात रोजगार वाढला; नोकऱ्या देण्यात महाराष्ट्र नं. १

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात देशात रोजगार क्षमतेत आश्चर्यकारक वाढ झाली आहे. ‘इंडिया स्किल्स’च्या सर्व्हेतील आकडेवारीनं ही आनंदाची लाट आली आहे. विशेष म्हणजे २०१४ च्या सुरुवातीला म्हणजेच युपीए सरकारच्या काळात रोजगार क्षमता ३३.९ टक्के होती. ती ४०.४ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. देशात मंदीची लाट आल्याच्या बोंबा ठोकत रोजगारात घट झाल्याचे म्हणणारे तोंडावर आपटले आहेत, असंच या आकडेवारीवरून दिसतं.

२०१४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीच्या तुलनेत २०१५ मध्ये रोजगार क्षमता ३७.२ टक्के होती. २०१६ मध्ये त्यात ३८.१ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे रोजगार क्षमतेत महिलांनी पुरुषांनाही मागे टाकले आहे. सर्व्हेक्षणानुसार, ४१ टक्के महिला नोकरी मिळवू शकतात. तर ४० टक्केच पुरुष नोकरी मिळवू शकतात.

हा सर्व्हे पिपल स्ट्रॉंग, कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री, लिंक्डइन, यूएनडीपी, व्हीबॉक्स, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी, ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन या सहकार्यातून करण्यात आला आहे. रोजगार क्षमता जाणून घेण्यासाठी देशभरातील २९ राज्ये आणि सात केंद्रशासित प्रदेशातील तीन हजार कॅम्पसमध्ये १५ जुलै आणि ३० ऑक्टोबरला सर्व्हे करण्यात आला. जवळपास ५.२ लाख लोकांनी त्यात भाग घेतला होता.

रोजगारात महाराष्ट्र अव्वल, पुण्याला सर्वाधिक पसंती

देशात रोजगार देण्याच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्यानंतर आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू या राज्यांचा क्रमांक लागतो. बेंगळुरू आणि पुणे ही दोन शहरांना अधिक पसंती दिली जाते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹रणजी स्पर्धेत रिषभ पंतचा विक्रम; अवघ्या ४८ चेंडूत शतक

Reserved.
मुखपृष्ठ » क्रीडा »
लोकसत्ता टीम | November 8, 2016 1:58 PM
रणजी चषक स्पर्धेत दिल्लीच्या रिषभ पंतने सर्वाधिक वेगवान शतक झळकाविण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. १९ वर्षांच्या रिषभने झारखंडविरुद्धच्या सामन्यात वादळी खेळी करताना अवघ्या ४८ चेंडूंत शतक झळकावले. रिषभ पंत हा केवळ रणजी स्पर्धेतच नव्हे तर प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये वेगवान शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वीचा वेगवान शतकाचा विक्रम नमन ओझाच्या नावावर होता. नमन ओझाने जानेवारी २०१५मध्ये इंदूर येथील कर्नाटकविरूद्धच्या सामन्यात ६९ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. रिषभ पंतने आजच्या खेळीने हा विक्रम मोडीत काढला आहे. त्याच्या शतकी खेळीत १० षटकार आणि सहा चौकारांचा समावेश आहे.
रिषभ पंतच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने उपहारापर्यंत ४ बाद ३७४ धावांची मजल मारली. मिलिंद नाबाद १५ आणि रिषभ पंत ६६ चेंडूत नाबाद १३५ धावांवर खेळत होते. मात्र, उपहारानंतर तो लगेचच बाद झाला. यंदाच्या हंगामातील रिषभ पंतचे हे चौथे शतक आहे. यापूर्वी त्याने त्रिशतकही झळकावले होते. तत्पूर्वी झारखंडने पहिल्या डावात इशान किशनच्या २७३ धावांच्या जोरावर ४९३ धावा केल्या होत्या. रिषभ पंतने उन्मुक्त चंदच्या साथीने केलेल्या वादळी खेळीमुळे दिल्ली या लक्ष्याच्या जवळपास पोहचली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹युनोच्या सुरक्षा परिषदेवर भारताचा जोरदार हल्ला

दहशतवादी संघटना असल्याचे संयुक्त राष्ट्रांनीच जाहीर केलेल्या गटांच्या नेत्यांवर बंदी घालण्याचा विचार करण्यावरच, अनेक महिने लागत असल्याबद्दल भारताने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेवर कठोर टीका केली आहे.

‘जैश- ए- महंमद’चा (जेईएम) प्रमुख मसूद अझहर याच्यावर संयुक्त राष्ट्रांनी बंदी घालावी, यासाठी भारताकडून होत असलेल्या प्रयत्नांना प्रलंबित’ ठेवल्याचा संदर्भ यामागे आहे. दहशतवादी संघटनांच्या नेत्यांवर बंदी घालण्यात परिषदेच्या असहायतेवर भारताचे प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दिन यांनी टीका केली. संयुक्त राष्ट्रांनी मसूद अजहरला दहशतवादी जाहीर करावे, यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांना चीनने तांत्रिक मुद्द्यावर अडवून ठेवले होते.

या तांत्रिक अडथळ््याची सहा महिन्यांची मुदत सप्टेंबरमध्ये संपल्यानंतर, चीनने आणखी तीन महिन्यांची मुदत वाढवून घेतली. गोगलगाईची गती आणि सुरक्षा परिषदेच्या सुधारणांवरील कधीही न संपणारी चर्चा यावर अकबरुद्दीन यांनी टीका केली. ते म्हणाले, ‘ही कोंडी फोडण्याची वेळ आलेली आहे.’

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे अध्यक्ष

अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. अगदी मतमोजणी सुरू होईपर्यंत हिलरी यांचे पारडे जड मानले जात असताना सर्व अंदाज फोल ठरवत ट्रम्प यांनी 'व्हाइट हाऊस' गाठण्याचे स्वप्न साकारले. ट्रम्प यांच्या रूपाने अमेरिकेला ४५ वे अध्यक्ष मिळाले असून ७० वर्षीय ट्रम्प २० जानेवारी २०१७ रोजी अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत.

ट्रम्प यांनी या विजयानंतर आपण प्रत्येक अमेरिकन नागरिकाचा राष्ट्राध्यक्ष आहे, असे नमूद करत 'मेक अमेरिका, ग्रेट अमेरिका' हा आपला संकल्प पुन्हा एकदा बुलंद केला.

बराक ओबामा यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी हिलरी क्लिंटन या डेमॉक्रेटिक पक्षाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या. २४० वर्षांच्या इतिहासात हिलरी यांच्या रूपाने अमेरिकेला पहिला महिला अध्यक्ष मिळेल, असेही बोलले जात होते. मतदान झाल्यानंतरही हिलरी यांचेच पारडे जड असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला पण प्रत्यक्षात आज मतमोजणी सुरू झाल्यानंतर ट्रम्प यांनी सगळ्या भाकितांना छेद दिला.

मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात ट्रम्प आणि हिलरी यांच्यात 'कांटे की टक्कर' पाहायला मिळाली पण नंतर ट्रम्प हिलरी यांच्यापुढे निघून गेले. ट्रम्प यांची आघाडी हिलरी यांना मोडता आली नाही. अध्यक्षपदी विजय मिळवण्यासाठी २७० इलेक्टोरल कॉलेजेसचा कौल (मतदार मंडलं) आवश्यक होता. ट्रम्प यांनी २७ राज्यांमधून २७६ इलेक्टोरल मतं मिळवून हा टप्पा ओलांडला. हिलरी यांना २१८ इलेक्टोरल मतांपर्यंतच मजल मारता आली.

यशस्वी उद्योजक ते राष्ट्राध्यक्ष

यशस्वी उद्योजक, टीव्ही प्रोड्युसर म्हणून दबदबा निर्माण करणाऱ्या ट्रम्प यांनी निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतल्यापासूनच अनेक वाद निर्माण झाले होते. त्यात महिला, मुस्लिम समाज यांच्याबाबत केलेल्या विधानांनीही ते वादग्रस्त ठरले होते. मात्र त्यानंतरही लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होत ट्रम्प यांनी अमेरिकेचे अध्यक्षपद मिळवले आहे. ट्रम्प यांच्या विजयानंतर अनेक नवी समीकरणे तयार होणार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरही या निकालाचे पडसाद उमटणार असे जाणकारांचे म्हणणे आहे.

कोणी कोणती राज्ये जिंकली?

ट्रम्प: टेक्सास, फ्लोरिडा, दक्षिण कॅरोलिना, उत्तर कॅरोलिना, जॉर्जिया, अल्बामा, मिसिसिपी, लुइसियाना, कन्सास, ओक्लाहोमा, अर्कान्सस, टेनेसी, इंडियाना, केन्टूकी, पश्चिम व्हर्जिनिया, मिसूरी, ओहिओ, पेन्सिलव्हानिया, विस्कॉन्सिन, लोवा, नेब्रास्का, उटाह, इडाहो, व्योमिंग, दक्षिण डाकोटा, मोन्टाना, उत्तर डाकोटा, मिशिगन, अरिझोना, अलास्का

हिलरी: न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, वॉशिंग्टन, ओरेगॉन, नेवाडा, कोलोराडो, न्यू मेक्सिको, इलिनोइस, व्हर्जिनिया, न्यूजर्सी, मेरीलॅण्ड, कोलंबिया डिस्ट्रीक्ट, डेलावेअर, कनेक्टिकट, ऱ्होड आइसलॅण्ड, मसाच्युसेट्स, वेरमॉन्ट, मइने, न्यू हॅम्पशायर, मिनेसोटा, हवाई

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सिनेटमध्ये प्रथमच भारतीय वंशाची अमेरिकन !

नवी दिल्ली - कॅलिफोर्निया राज्याच्या ऍटर्नी जनरल कमला हॅरिस यांची सिनेट या अमेरिकेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये सभासद म्हणून निवड झाल्याचे स्पष्ट झाले आहे . हॅरिस यांचा हा विजय ऐतिहासिक मानला जात आहे . सिनेटमध्ये निवड झालेल्या हॅरिस या पहिल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक आहेत.

51 वर्षीय हॅरिस यांनी डेमोक्रॅट पक्षाच्या अन्य सभासद लोरेटा सॅंचेझ यांचा 34 .8 टक्के मतांनी पराभव केला . हॅरिस यांना एकूण 19 ,04 ,714 मते मिळाली .

 अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बराक ओबामा व उपाध्यक्ष जो बिडेन यांनी हॅरिस यांना पाठिंबा दर्शविला होता . या पार्श्वभूमीवर , हॅरिस यांचा विजय हा जवळपास निश्चित मानला जात होता .

हॅरिस यांचा जन्म ओकलॅंड (कॅलिफोर्निया) येथे झाला असून त्यांची माता भारतीय तर पिता जमैकन -अमेरिकन वंशाचे आहेत. सिनेटसाठी निवड झालेल्या पहिल्या भारतीय उमेदवाराखेरीज हॅरिस या कॅलिफोर्नियामधून सिनेटसाठी निवडल्या गेलेल्या पहिल्या अमेरिकन कृष्णवर्णीय उमेदवारही ठरल्या आहेत. या दृष्टिकोनामधूनही त्यांचा हा विजय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे .

याआधी , अमेरिकन लोकशाही व्यवस्थेमधील कनिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्ये भारतीय वंशाच्या काही उमेदवारांची निवड झाली आहे . मात्र सिनेटमध्ये भारतीय वंशाच्या उमेदवाराची निवड होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती विजयी

डेमोक्रॅट पक्षाचे भारतीय-अमेरिकन उद्योगपती असलेल्या राजा कृष्णमूर्ती यांनीही निवडणुकीत विजय मिळवला आहे. इलिनोइस येथून ते प्रतिनिधी सभागृहात निवडून आले आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹स्टार्टअपना ‘इंग्लिश’ वित्तपुरवठा!

७५ नवोद्योगांना मिळणार यूकेची १६ कोटी पौंडांची मदत

देशातील ७५ नवोद्योगांना (स्टार्टअप्स) ब्रिटिश अर्थसाह्य मिळणार आहे. यूकेच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी मंगळवारी येथे ही घोषणा केली. या स्टार्टअप्समध्ये यूके १६ कोटी पौंड (सुमारे १ हजार ३३० कोटी रुपये) गुंतवणूक करणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

याखेरीज, यूकेतर्फे ‘स्टार्टअप इंडिया व्हेन्चर कॅपिटल’ फंडाला अतिरिक्त दोन कोटी पौंडांचे अर्थसाह्य देण्यात येणार आहे. या फंडातर्फे ३० उद्योगांना वित्त पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी यूके व्हेन्चर कॅपिटल फंडांसह काही गुंतवणूकदारांकडून आणखी चार कोटी पौंड साह्य देण्यात येणार आहे. भारत हा यूकेसाठी महत्त्वाचा देश आहे. यूकेमध्ये सर्वाधिक गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये तिसरा देश म्हणून भारत ओळखला जातो. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगारनिर्मिती करणारा दुसरा सर्वात मोठा देश म्हणूनही भारताची यूकेला ओळख आहे. एकट्या यूकेमध्येच भारतीय कंपन्यांनी १ लाख १० हजार रोजगार निर्माण केले आहेत. याउलट, जी-२० गटातील देशांपैकी यूके हा भारतात गुंतवणूक करमारा सर्वात मोठा गुंतवणूकदार देश आहे. या पार्श्वभूमीवर, भारत व यूके यांच्या आर्थिक विकासासाठी दोन्हीकडच्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करावी, असे आवाहन दोन्ही पंतप्रधानांनी केले आहे.
..
मुक्त व्यापार धोरण

यूकेबरोबर मुक्त व्यापार धोरणासंदर्भात चर्चा सुरू असून या करारातून अधिकाधिक फायदा मिळावा, असा प्रयत्न भारताकडून होणार आहे. केंद्रीय वाणिज्य सचिव रिटा तिओतिया यांनी भारत व यूके यांच्यात मुक्त व्यापार करार झाल्यास यूकेचा अधिक फायदा होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच भारताच्या पारड्यात या करारापासून अधिक लाभ कसे पडतील, याकडे सरकार लक्ष ठेवून असल्याचेही तिओतिया यांनी सांगितले आहे.
..

ब्रिटिश कंपन्यांनाही लाभ

देशात उभारण्यात येणाऱ्या स्मार्ट शहरांसाठी भारत व यूके यांची भागीदारी होणार असून त्यातून ब्रिटिश कंपन्यांसाठी अनेक व्यवसायांची दारे खुली होणार आहेत. यातून ब्रिटिश कंपन्यांना तब्बल दोन अब्ज पौंडांच्या व्यवसाय संधी उपलब्ध होतील, असा अंदाज आहे. व्यवसाय व विकास या दोन्ही बाबींना समान फायदा व्हावा, यासाठी ब्रिटिस सरकार प्रयत्नशील राहणार आहे. स्मार्ट शहरांच्या तंत्रज्ञानामध्ये यूके अव्वल असल्याचा दावाही यूकेतर्फे करण्यात आला आहे.
..

यूके हा नैसर्गिक भागीदार

यूके हा भारताचा नैसर्गिक भागीदार असल्याचा दावा यूकेचे आंतरराष्ट्रीय व्यापार सचिव लियाम फॉक्स यांनी केला आहे. युरोपीय समुदायातून बाहेर पडल्यानंतर यूकेने प्रथमच भारताचे महत्त्व ओळखल्याचे यूकेच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या भारतभेटीतून स्पष्ट झाले आहे. विकसनशील व विकसित देश या दोघांकडे स्वतःच्या अर्थव्यवस्थेचा जगापासून बचाव करण्याची वृत्ती असते. परंतु याला छेद देत यूके व भारत यांनी आपापल्या अर्थव्यवस्था एकमेकांसाठी खुल्या करण्याचा निर्धार केला असल्याचा दाव केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹प्रत्यक्ष कर संकलनात 3 . 77 लाख कोटी जमा

नवी दिल्ली : प्रत्यक्ष कराच्या संकलनात चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सात महिन्यांत 10 .6 टक्के वाढ झाली असून , व्यक्तिगत करदात्यांमध्ये झालेली वाढ याला कारणीभूत ठरली आहे .

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने ( सीबीडीटी) दिलेल्या माहितीनुसार; एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत 3 .77 लाख कोटी रुपयांचा प्रत्यक्ष कर जमा झाला . मागील वर्षी याच काळात जमा झालेल्या करापेक्षा तो 10 .6 टक्के अधिक आहे .

 ऑक्टोबरअखेरपर्यंत कराचे चालू आर्थिक वर्षातील उद्दिष्ट 44 .5 टक्के गाठण्यात यश आले आहे . प्रत्यक्ष करात कंपनी व व्यक्तिगत प्राप्तिकराचा समावेश आहे . प्रत्यक्ष कराचे संकलन चालू आर्थिक वर्षात 12 .64 टक्क्यांनी वाढून 8 लाख 47 हजार 97 कोटी रुपयांवर जाण्याचा अंदाज आहे . ते मागील आर्थिक वर्षात 7 लाख 52 हजार 21 कोटी रुपये होते. कंपनी कराचे संकलन पहिल्या सात महिन्यात 11 . 6 टक्क्यांवर गेले असून , प्राप्तिकराच्या संकलनात 18 .6 टक्के वाढ झाली आहे . ही वाढ मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत झाली आहे .

परतावा ग्राह्य धरून कंपनी कराच्या संकलनात 5 टक्के आणि प्राप्तिकर संकलनात 18 .4 टक्के वाढ होणे अपेक्षित आहे . एप्रिल ते ऑक्टोबर या काळात 93 हजार 836 कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला असून , मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 32 . 2 टक्के वाढ झाली आहे , असे " सीबीडीटी' ने म्हटले आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अमेरिकेच्या संसदेत तीन भारतीय वंशाचे सदस्य

अमेरिकेत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय वंशाच्या तीन सदस्यांनी बाजी मारली आहे. वॉशिंग्टनमधून प्रमिला जयपाल प्रतिनिधी सभेवर निवडून आल्या आहेत. तर कमला हॅरिस कॅलिफोर्नियामधून सिनेटर म्हणून निवडून आल्या आहेत त्याबरोबरच राजा कृष्णमूर्थी हेसुद्धा अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये निवडून आले आहेत.

भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी अमेरिकन सिनेटर म्हणून निवडून येत इतिहास रचला आहे. सिनेटर म्हणून निवडून येणाऱ्या त्या पहिल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक ठरल्या आहेत. कमला हॅरिस यांनी कॅलिफोर्नियाच्या अॅटॉर्नी जनरल म्हणून काम पाहिले आहे. त्यांची आई भारतीय असून, वडील जमैकातील आहेत. 51 वर्षांच्या हॅरिस यांनी निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाच्या लोरेटा सँचेझ यांना 34.8 टक्क्यांच्या मताधिक्याने मात दिली.

त्याबरोबरच प्रमिला जयपाल यांनी वॉशिंग्टनमधून विजय मिळवला आहे. त्या प्रतिनिधी सभेमध्ये निवडून येणाऱ्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला ठरल्या आहेत.तर राजा कृष्णमूर्थी हेसुद्धा अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये निवडून आले भारतीय वंशाचे पहिले नागरिक ठरले आहेत. त्याबरोबरच लतिका मेरी थॉमस, रोहित खन्ना, रोहित खन्ना आणि एमी बेरी या भारतीय वंशाच्या उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय अद्याप झाला नव्हता.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹दुग्ध व्यवसायातील स्पर्धेत पतंजली

नागपूरपाठोपाठ पतंजली उद्योग समूहाच्या वतीने आता नगरमध्ये बस्तान बसविले जाणार आहे. पतंजलीने आता दुग्ध व्यवसायात उडी घेतली असून, नगर जिल्ह्य़ातील खडकाफाटा (ता. नेवासे) येथे त्यांचा पहिला दूध प्रकल्प सुरू होत आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांबरोबरच आता त्यांच्या दुग्धजन्य पदार्थाची टक्कर राज्यातील सहकार तसेच खासगी क्षेत्रांबरोबर होणार आहे.

पतंजलीचा तूप व दुग्धजन्य पदार्थनिर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ १६ नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, योगगुरू रामदेवबाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.
खासगी कंपन्यांकडून गायीचे तूप व दुधाची पावडर खरेदी करून त्याची विक्री पतंजलीच्या बॅण्डनेमने केली जात होती. पहिल्या टप्यात कॅडबरीला टक्कर देणारा एनर्जीबार, बोर्नविटाशी स्पर्धा करणारा पॉवरविटा ही दुग्धजन्य उत्पादने बाजारात आणली होती. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता ते डेअरी उत्पादनात उतरले आहे. त्याकरिता त्यांनी राज्यात सर्वाधिक दूध असलेल्या नगर जिल्ह्य़ाची निवड केली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे २५० कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. शुद्ध प्रतीच्या देशी गायींची निर्मिती करण्याकरिता सुमारे २५० कोटींचे ५० वळू ब्राझिलवरून आयात केले असून, जागा मिळाल्यानंतर नेवाशात गोशाळा सुरू करण्यात येणार आहे.

नेवाशातच प्रकल्प का?

चार जिल्ह्य़ांना मध्यवर्ती ठिकाणी खडकाफाटा (ता. नेवासे) हे नगर-औरंगाबाद महामार्गावर आहे. औरंगाबाद येथील विमानतळावरून मोटारीने अवघ्या एक तासात तेथे पोहोचता येते. शिर्डी येथील विमानतळही जवळ आहे. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर तसेच आंध्र, कर्नाटकशी जोडणारे महामार्ग व दौंड-मनमाड रेल्वेमार्गावरील श्रीरामपूर, नगर तसेच औरंगाबाद, लासूर स्टेशन ही रेल्वेस्थानके जवळ असल्याने देशभर डेअरी उत्पादनांची वाहतूक करणे सोपे जाते.

श्रद्धेचा खुबीने वापर

दुधाचे संकलन करण्यासाठी शेतकरी संघटना, तरुण मंडळे, वारकरी हे माध्यम पतंजलीने मोठय़ा खुबीने वापरले आहे. शुभारंभाच्या कार्यक्रमात त्यांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. ग्रामीण भागात हा घटक दूध धंद्यात आहे. तसेच गायीच्या दुधाबरोबरच गोमूत्र व शेणही पतंजली विकत घेणार आहे. राज्यात दूध व्यवसायात हे प्रथमच घडत आहे. पतंजलीने या पूर्वीच पशुखाद्य बाजारात आणलेले आहेत. नेवासे येथील प्रकल्पाची क्षमता पाच लाख लिटरपासून ते १६ लाख लिटपर्यंत नेण्यात येणार आहे. येत्या तीन महिन्यांत हा प्रकल्प कार्यान्वित होईल.

डेअरी उद्योगाचे सध्याचे स्वरूप

डेअरी उद्योगाची देशात तीन लाख कोटींची सध्या उलाढाल आहे. २०२२ मध्ये ती २२ लाख कोटींवर जाईल असा रामदेवबाबा यांचा दावा आहे. गुजरातच्या अमूल व कर्नाटकच्या नंदिनी यांची उलाढाल ५० हजार कोटींच्या पुढे आहे. ब्रिटानिया, नेस्ले यांच्याप्रमाणेच त्यांची गोदरेज, वारणा, गोकुळ, राजहंस, महानंदा, प्रभात, मदर डेअरी, सरस, वाडीलाल, गोवर्धन या सहकारी व खासगी कंपन्यांशीही स्पर्धा होणार आहे. फ्युचर ग्रुपबरोबर पतंजलीचा यापूर्वीच करार झालेला आहे. त्यामुळे मॉल व सुपरमार्केटमध्ये त्यांच्या दूध प्रक्रिया उत्पादनांना स्थान मिळेल. नगर व पुणे जिल्ह्य़ातील सहकाराशीही त्यांची भावाच्या बाबतीत भविष्यात स्पर्धा होऊ शकते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पाचशे, हजारच्या नोटा रद्द झाल्याने मोबाईल वॉलेट आणि कार्डसाठी ‘अच्छे दिन’

हजार आणि पाचशेच्या रद्द झालेल्या नोटा आणि आगामी ५० दिवसांसाठी बँकांमधून रोख रक्कम काढण्यावर घातलेले निर्बंध यामुळे मोबाईल वॉलेट आणि डेबिट – क्रेडीट कार्डला अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे पे टीएम, ऑक्सिजन, मोबी क्विक, फ्रीचार्ज या कंपन्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

मंगळवारी संध्याकाळी केंद्र सरकारने पाचशे आणि एक हजारच्या नोटा रद्द केल्याची घोषणा केली. याशिवाय आगामी ५० दिवस बँकेतून रोख रक्कम काढण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा डेबिट कार्ड आणि मोबाईल वॉलेट कंपन्यांना थेट फायदा होणार आहे.

 भारतात सध्या मोबाईल वॉलेट आणि कार्ड धारकांची संख्याही वाढत आहे. ई कॉमर्स क्षेत्रात कॅश ऑन डिलेव्हरीचा वापर सर्वाधिक होत होता. पण यापूर्वी ऑनलाइन व्यवहाराकडे पाठ फिरवणारे ग्राहक आता ऑनलाइन व्यवहारावर भर देतील अशी शक्यता जाणकार वर्तवत आहेत. डेबिट, क्रेडीट कार्ड आणि मोबाईल वॉलेटविषयी असलेले सर्व गैरसमज आता दूर होतील आणि कॅश ऑन डिलेव्हरी ही संकल्पनाच आता इतिहास जमा होईल असा दावा या क्षेत्रातील तज्त्रांतर्फे केला जात आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यंदाच्या अर्थंसंकल्पामध्ये काळा पैशांवर लगाम लावण्यासाठी रोख व्यवहार कमी करण्याची गरज आहे असे मत मांडले होते. रुपे या डेबिट कार्डधारकांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे आता डेबिट आणि क्रेडिट कार्डाद्वारे होणा-या व्यवहारांवर सुट देण्याची गरज आहे असे ते म्हणाले होते. आता मोदी सरकारने ५०० आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्या आहेत. एका अहवालानुसार भारतीय अर्थव्यवस्थेत ८५ टक्के नोटा या पाचशे आणि हजार रुपयांच्या होत्या. मोदी सरकारच्या निर्णयामुळे काळा पैशावर लगाम बसेल अशी आशा व्यक्त होत आहे.

Current Affairs Marathi:
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारतीय वास्तुरचनाकार एम. एन. शर्मा यांचे निधन :

चंडीगढ हे भारतातील पहिले सुनियोजित शहर वसवण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेले एम. एन. शर्मा यांचे वयाच्या 93व्या वर्षी निधन झाले. चंदीगडचे पहिले भारतीय मुख्य वास्तुरचनाकार अशी त्यांची ख्याती होती.  तसेच त्यांनी ‘द मेकिंग ऑफ चंदीगड : ल कॉर्बुझिए अँड आफ्टर’ हा ग्रंथ लिहिला.
  चंदीगडच्या संकल्पनेवर निस्सीम प्रेम असणारे शर्मा हे कवीप्रमाणे भावनांच्या प्रकाशात या शहराबद्दल चिंतन करणारे विचारी कलावंत होते.  संपूर्ण चंदीगड युनिसेफने वास्तु-वारसा म्हणून घोषित करावे या मागणीचा पाठपुरावा ते अखेपर्यंत करीत होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹केअर वर्ल्ड वरील बंदीस 24 नोव्हेंबरपर्यंत स्थगिती

आक्षेपार्ह बाबी दाखवल्याने केंद्र सरकारने आरोग्याविषयी माहिती देणाऱ्या केअर वर्ल्ड टीव्ही या चॅनेलवर वर सात दिवस प्रसारणबंदी घातली. या बंदीविरुद्ध चॅनलने उच्च न्यायालयात धाव घेतली. सुटीकालीन न्यायालयाने सरकारच्या निर्णयावर 24 नोव्हेंबरपर्यंत स्थगिती दिली.

केअर वर्ल्ड टी.व्ही चॅनेल 24 × 7 असून या चॅनेलवर आरोग्याविषयी माहिती देण्यात येते.  गेले दहा वर्षे हा चॅनेल सुरू असल्याचे चॅनेलचे अध्यक्ष अतुल सराफ यांनी न्यायालयाला सांगितले.

  माहिती व प्रसारण मंत्रालयाने घातलेल्या सात दिवसांच्या बंदीवर न्या. एम. एस. कर्णिक यांनी 24 नोव्हेंबरपर्यंत स्थगिती दिली.  आयएमसीच्या शिफारशीनुसार माहिती व प्रसारण मंत्रालयाने सात दिवसांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹महाराष्ट्र पर्यटन विकास विभागाला जपानकडून मदत :

जगभरातील व देशाच्या कानाकोपऱ्यातील पर्यटकांना औरंगाबाद येथील अजिंठा-वेरूळ लेण्यांचे मोठे आकर्षण आहे.  तसेच त्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील संवर्धनासाठी जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी (जेआयसीए) आता महाराष्ट्र पर्यटन विकास विभागाला (एमटीडीसी) मदत करणार आहे.

बाह्य मूल्यांकनाविषयी नुकतेच जेआयसीएच्या भारतातील कार्यालयाने 'एमटीडीसी'ला पत्र पाठवले होते.  27 नोव्हेंबरपासून 24 डिसेंबरपर्यंत 'जेआयसीए‘चे प्रतिनिधी या स्थळांना भेट देतील. त्यानंतर जवळपास वर्षभर म्हणजेच ऑक्‍टोबर 2017 पर्यंत याविषयी अभ्यास केला जाईल.

  निश्‍चित करण्यात आलेल्या समितीवर केंद्र सरकारच्या 'एएसआय', 'एएआय' या संस्थांबरोबर 'एमटीडीसी' आणि इतर राज्यांतील सरकारी संस्थांच्या प्रतिनिधींचीही निवड करण्यात आली आहे.  अजिंठा आणि वेरूळ येथे पर्यटकांच्या सोईबरोबर वास्तूंचे संवर्धन करणेही अत्यंत आवश्‍यक आहे.  पहिला टप्पा 1993 ते 2004 दरम्यान पूर्ण झाला. दुसरा टप्पा 2016 आणि 17मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे

चर्चित देश:-
सीलँड:-
* इंग्लंडच्या समुद्रकिनार्यालगत सीलँड हा देश
आहे. इंग्लंडच्या सफोल्ड या समुद्रकिनार्यापासून
फक्त 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या सीलँड
किल्ल्यावर हा देश वसला आहे. दुसर्या महायुद्धात
इंग्लंडने या देशाची निर्मिती केली होती. मात्र
त्यानंतर त्या देशाला खाली करण्यात आले.
* 9 ऑक्टोबर 2012 ला रॉय बेट्स नावाच्या
व्यक्तीला सीलँडचा राजा घोषित करण्यात आले.
रॉय यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा मुलगा मायकल
यांने राज्य केले.
* ज्या देशांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता
मिळालेली नसते त्यांना छोटे देश म्हणून संबोधण्यात
येते. सीलँड या देशाचे क्षेत्रफळ 250 मीटर
(0.25 किलोमीटर) असून लोकसंख्या 27 इतकी
आहे. या देशाची अर्थव्यवस्था देणग्यांवर चालते
आहे.
* सीलँड या देशाला अधिकृतरीत्या मान्यता न
मिळाल्याने सर्वात छोटा देश म्हणून व्हेटिकन सिटी
ओळखला जातो. व्हॅटिकन सिटी क्षेत्रफळ 0.44
वर्ग किलोमीटर आहे. व्हॅटिकन सिटी या देशाची
लोकसंख्या 800च्या घरात आहे.
----------------------------------------
शकुंतला रेल्वे लाईन:-
* भारतीय रेल्वे ही सरकारी मालकीची आहे. पण
भारतात एक रेल्वेमार्ग असा आहे जो खासगी
मालकीचा आहे. शकुंतला रेल्वे असे या रेल्वेमार्गाचे
नाव असून, या शकुंतला रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये
विलीनीकरण होणार आहे.
* विदर्भातील यवतमाळ ते अचलपूर दरम्यानचा
188 किमीचा रेल्वे मार्ग शकुंतला रेल्वेच्या
मालकीचा आहे
* ब्रिटीश कंपनी किलीक निक्सनने 1910 साली
शकुंतला रेल्वेमार्गाची उभारणी केली. स्वातंत्र्यपूर्
वकाळात कापसाची निर्यात करण्यासाठी या
मार्गाचा वापर केला जायचा. स्वातंत्र्यानंतर अन्य
खासगी मालकीच्या रेल्वेमार्गाचे राष्ट्रीयकरण झाले.
करारानुसार भारत सरकारने हा मार्ग 2016 मध्ये
ताब्यात घेतला नाही

चालू  घडामोडी:-
------------------------

ब्रॅण्ड अॅम्बेसेडर;-
* अत्युल्य भारत;- नरेंद्र मोदी
*  स्वच्छ रेलमिशन:-बिंदेश्वर पाठक
*  स्वित्झर्लंड टूरिझम;- रणवीर सिंग

सैन्य  अभ्यास;-
*  सूर्य किरण-X :- "भारत-नेपाळ
* सम्पप्रीती २०१६:- भारत:-) बांगलादेश
* पश्‍चिम लहर’ :-
 भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय नौदल 2 ते 14 नोव्हेंबर दरम्यान अरबी समुद्रात ‘पश्‍चिम लहर’ हा युद्धसराव आयोजित केला आहे. या युद्धसरावात 40 युद्धनौका आणि पाणबुड्या सहभागी होणार आहेत. लढाऊ विमाने, टेहळणी विमाने आणि मानव विरहित टेहळणी विमाने यांचा ताफा युद्धसरावात सहभागी

आयोग;-
न्या. एस. के. पांडे;-
भोपाळ मध्यवर्ती कारागृहातून पळून गेलेल्या दहशतवाद्यांना चकमकीत ठार करण्यात आल्याच्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यासाठी  नेम्लेलें आयोग

चर्चित खेळाडू:-
लिओनेल मेस्सी ;-
* लिओनेल मेस्सी हा बार्सिलोना क्लबकडून खेळताना  पाचशेवा गोल केला, त्यामुळेच बार्सिलोना संघाला सेव्हिला संघाविरुद्धच्या ला लिगा फुटबॉल लीगमधील सामन्यात २-१ असा विजय मिळविता आला.

रिषभ पंत ;-
* रणजी चषक स्पर्धेत दिल्लीच्या रिषभ पंतने सर्वाधिक वेगवान शतक झळकाविण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
*  १९ वर्षांच्या रिषभने झारखंडविरुद्धच्या सामन्यात खेळी करताना अवघ्या ४८ चेंडूंत शतक झळकावले.
·* रिषभ पंत हा केवळ रणजी स्पर्धेतच नव्हे तर प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये वेगवान शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
*  यापूर्वीचा वेगवान शतकाचा विक्रम नमन ओझाच्या नावावर होता. नमन ओझाने जानेवारी २०१५मध्ये इंदूर येथील कर्नाटकविरूद्धच्या सामन्यात ६९ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते.

पुरस्कार:-
---------------------------------

नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार २०१६ :-
* राज्य सरकारमार्फत देण्यात येणाऱ्या नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेते लीलाधर कांबळी यांची निवड केली
* पाच लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे  स्वरूप आहे
* लीलाधर कांबळी यांनी "कलावैभव‘ या नाट्यसंस्थेमार्फत व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. त्यांना विद्यार्थिदशेपासून नाटकाचे वेड होते. "नयन तुझे जादूगार‘ हे नाटक त्यांच्या आयुष्यातील मैलाचा दगड ठरले. "काचेचा चंद्र‘, "सौभाग्य‘, "हिमालयाची सावली‘, "दुभंग‘, "कस्तुरीमृग‘, "वात्रट मेले‘ ही त्यांची गाजलेली नाटके आहेत. "फनी थिंग कॉल्ड लव्ह‘ या भरत दाभोळकरांच्या इंग्लिश नाटकातही त्यांनी काम केले आहे.

संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार २०१६
* ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत ऊर्फ चंदू डेगवेकर यांची संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी महाराष्ट्र शासनाने  निवड  केली
* पाच लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे.
* चंद्रकांत ऊर्फ चंदू डेगवेकर हे नाट्यअभिनेते आणि उत्तम गायक म्हणून प्रसिद्ध आहेत. संगीत नाटकांतील विनोदी भूमिका ही त्यांची खासियत आहे. "पंडितराज जगन्नाथ‘ या नाटकाद्वारे 1968 मध्ये ते नट म्हणून ठळकपणे पुढे आले. त्यानंतर "बावनखणी‘, "रक्त नको मज प्रेम हवे‘, "दुरितांचे तिमिर जावो‘, "मदनाची मंजिरी‘, "मंदारमाला‘, "जय जय गौरी शंकर‘ या नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या. त्यांनी "संगीत सौभद्र‘पासून "संगीत स्वरसम्राज्ञी‘पर्यंत जवळपास सगळीच संगीत नाटके केली.

जमनलाल बजाज पुरस्कार २०१६:-
*  रचनात्मक कार्य:- मोहन हिराबाए हिरालाल ,महाराष्ट्र
* विज्ञान आणि तंत्रज्ञान:- बनबिहारी विष्णू निंबकर, महाराष्ट्र
*  महिला  आणि मुलांच्या  विकासासाठी:- डोनन्नपानेनी मंगादेवी, आंध्र प्रदेश
*  परदेशात म.गांधीजीच्या तत्वाचा प्रसार:- शेख राशीद गंनुबी, ट्युनिशिया

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹बीडचा मूल्यवर्धनाचा पथदर्शी प्रकल्प राज्यात राबविणार

 2009 मध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाची सुरवात सर्वप्रथम बीड जिल्ह्यातील 500 शासकीय शाळांमध्ये झाली . 35 हजार विद्यार्थ्यांनी मूल्यवर्धन कार्यक्रमाचा लाभ घेतला . शिक्षणातील लोकशाही मूल्यांशी संबंधित अध्ययन निष्पत्ती लक्षणीय प्रमाणात साध्य झाल्याचे येथील मूल्यमापन अभ्यासामध्ये दिसून आले. आता बीडचा मूल्यवर्धनाचा पथदर्शी प्रकल्प राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली .

शालेय शिक्षण विभाग आणि पुण्याच्या शांतीलाल मुथ्था फाउंडेशनतर्फे बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या मूल्यवर्धन कार्यक्रमासंदर्भातील आढावा बैठक मंगळवारी ( ता. आठ ) मंत्रालयात पार पडली . यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते . या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासह शालेय शिक्षणचे प्रधान सचिव नंदकुमार, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर , शिक्षण आयुक्त धीरजकुमार , एमसीईआरटीचे संचालक गोविंद नांदेडे , शांतीलाल मुथ्था फाउंडेशनचे शांतीलाल मुथ्था आदी उपस्थित होते .

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले , या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये रचनावादी दृष्टिकोन विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे . यासाठी पालक आणि शिक्षक यांचा समावेश असणे आवश्यक आहे . तसेच मूल्यवर्धित महाराष्ट्र घडविण्यासाठी मूल्याधिष्ठित दर्जेदार शिक्षण ही काळाची गरज आहे . या मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला .

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले , आजघडीला 20 कोटींपेक्षा अधिक शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे ज्ञान , कौशल्य आणि क्षमता वाढविण्याची गरज आहे . मूल्यवर्धन कार्यक्रम राबविताना शिक्षकांचे मूल्यसंवर्धन आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता संवर्धनावर विशेष भर देण्याची गरज आहे . विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही नागरिकत्व रुजविण्यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे .

एमसीईआरटीमार्फत हा उपक्रम राज्यात राबविण्यात येणार आहे . जागतिक स्तरावर या उपक्रमाचे मूल्यमापन करण्यात आले आहे . विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणासाठी हा उपक्रम शांतीलाल मुथ्था फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येत आहे . त्या उपक्रमाला राज्य शासनाने सहकार्य केले आहे .

 मूल्यवर्धित महाराष्ट्र घडविण्यासाठी मूल्याधिष्ठित शिक्षण ही काळाची गरज आहे . मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल. असे करीत असताना सेवानिवृत्त शिक्षकांची या उपक्रमात मदत घेतली जाऊ शकेल का ? ही बाब तपासून घेण्याचे आदेशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले . मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या राज्यातील अंमलबजावणीची माहिती या बैठकीत शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली . मूल्यवर्धन कार्यक्रम अधिक बळकट करण्यासाठी या संस्थेमार्फत जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे , अशी माहिती तावडे यांनी यावेळी दिल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी कळविले आहे .
----------------------------------------------
For more join us @mpscHRD

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹2 . 5 लाखांहून जास्त रकमेचा स्त्रोत सांगा

काळा पैशाविरोधात आणखी कठोर पावले उचलत सरकारने बँकेत अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम भरताना या उत्पन्नाचा स्रोत बेकायदेशीर आढळल्यास प्राप्तिकरासह आणखी 200 टक्के कर दंड म्हणून आकारण्यात येणार असल्याचे सांगितले आहे .

" प्रत्येक बँक खात्यात 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरदरम्यान अडीच लाख रुपयांच्या मर्यादेपलीकडे जमा झालेल्या अधिक रकमेचा अहवाल मागविण्यात येणार आहे . यानंतर प्राप्तिकर विभागाकडून खातेधारकाने सादर केलेले विवरणपत्र पडताळून पाहिले जाईल व पुढील कारवाई केली जाईल . ", अशी माहिती महसूल सचिव हसमुख अढिया यांनी दिली .

जमा रक्कम व विवरणपत्रात कोणतीही विसंगती आढळल्यास तो कर बुडवेगिरीचा( टॅक्स इवेजन ) प्रकार समजला जाईल , असे अढिया म्हणाले . यावर योग्य करासह प्राप्तिकर कायद्यातील कलम 270 ( अ) नुसार आणखी 200 टक्के कराची रक्कम दंड म्हणून भरावी लागेल , असेही त्यांनी सांगितले .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 तारखेच्या मध्यरात्रीपासून सध्या चलनात असलेल्या पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद झाल्याची घोषणा केली . आपल्या जवळील रकमेच्या नोटांच्या बदल्यात तेवढ्याच रकमेच्या दुसऱ्या नोटा बॅंकेकडून देण्यात येतील . परंतु त्यासाठी काही अटी व नियम लागू करण्यात आल्या आहेत. आता लवकरच 500 आणि 2000 च्या नव्या नोटा चलनात येणार आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹यंदाचे वर्ष ठरणार सर्वांत उष्ण?

जगातील मागील पाच वर्षांच्या तापमानाचा विचार केल्यास २०१६ हे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्रांच्या नव्या अहवालात हा अंदाज वर्तवला असून, जागतिक हवामान बदलासाठी मानवी वर्तन कारणीभूत असल्याचे यात म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान संस्थेने (डब्ल्यूएमओ) जागतिक हवामान बदलाबाबत तपशीलवार विश्लेषण प्रसिद्ध केले आहे. जागतिक तापमान वाढीसह समुद्राची वाढलेली पातळी; तसेच आर्क्टिक समुद्रातील बर्फाचे कमी झालेले प्रमाण, हिमनद्या आणि उत्तर गोलार्धातील बर्फ वितळण्याचे प्रकार समोर आले आहेत. हरितगृह वायुंमुळे दीर्घकाळापासून उष्णतेचा कालखंड सुरू असल्याचे या लक्षणांवरून सिद्ध होत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण २०१५मध्ये प्रथमच प्रति दशलक्ष ४०० भाग इतके झाले होते. २०११ ते २०१५ या काळात मानवी वर्तनामुळे झालेल्या हवामान बदलाचा नैसर्गिक घटनांवर थेट परिणाम झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेकडे हा अहवाल सादर करण्यात आला आहे. ‘पॅरिस कराराचा उद्देश जागतिक तापमानवाढ दोन अंश सेल्सियसने कमी करण्याचा आहे,’ असे डब्ल्यूएमओचे सरचिटणीस पेटेरी तालास यांनी म्हटले आहे.

‘सरासरी तापमानाने २०१५मध्ये एक अंश सेल्सियसची मर्यादा ओलांडली होती हे अहवालातून स्पष्ट झाले आहे. पाच वर्षांचा हा काळ अत्यंत उष्ण होता. त्यातही २०१५ हे वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष होते. हा उच्चांक २०१६मध्ये मोडला जाण्याची शक्यता आहे,’ असेही तालास म्हणाले. जागतिक पातळीवर हवामान बदलाचा परिणाम १९८०पासून नियमितपणे दिसून आला आहे. जमीन आणि समुद्रातील तापमान वाढत असून समुद्राच्या पातळीत वाढ होत आहे; तसेच जगभरातील बर्फ वितळत आहे. त्यामुळे उष्णतेची लाट, दुष्काळ, विक्रमी पाऊस; तसेच पूर अशा घटना घडल्या आहेत,’ असेही त्यांनी सांगितले.

नैसर्गिक आपत्तीची मालिका

पूर्व आफ्रिकेमध्ये २०१०-२०१२मधील दुष्काळामुळे सुमारे २ लाख ५८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर २०१३-२०१५ या काळात दक्षिण आफ्रिकी देशांमध्ये दुष्काळ पडला होता. पूर्व आशियात २०११मध्ये आलेल्या पुरांमुळे ८०० लोकांचा बळी गेला, तर भारत आणि पाकिस्तानात २०१५मध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे सुमारे ४ हजार १०० लोकांचा मृत्यू झाला. चक्रीवादळामुळे अमेरिकेत २०१२मध्ये सुमारे ६७ अब्ज डॉलरचे नुकसान झाले, तर फिलिपिन्समध्ये २०१३मध्ये आलेल्या हेयान वादळामुळे ७ हजार ८०० जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती या अहवालात दिली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सतलज – यमुना कालव्याचा वाद: पंजाब काँग्रेसमध्ये राजीनाम्याचा महापूर

सतलज यमुना लिंक कालव्यावरुन पंजाबला सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. हरियाणासोबतचा पाणीवाटपाचा करार रद्द करण्याचा पंजाब सरकारचा निर्णय सुप्रीम कोर्टाने असंवैधानिक ठरवला आहे. त्यामुळे आता हरियाणाला पंजाबमधून पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर आता लिंक कालव्याचे काम पुन्हा एकदा सुरु होणार असून या निर्णयानंतर राजकारणही सुरु झाले आहे. पंजाबमधील काँग्रेसचे सर्व आमदार आणि खासदार कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला आहे.

पंजाब आणि हरियाणा ही दोन्ही राज्य सतलज यमुना लिंक कालव्यावरुन आमने सामने आले आहेत. १९६६ मध्ये पंजाबची पुनर्रचना झाल्यानंतर सतलज यमुना लिंक कालव्याचा वाद सुरु झाला होता. २४ मार्च १९७६ मध्ये केंद्र सरकारने पाणी वाटपासाठी अध्यादेश जारी केले होते.

 सतलज, रावी आणि व्यास नदीतील पाण्याचे वाटप होणे अपेक्षित होते. मात्र पंजाब सरकारने याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली. ८ एप्रिल १९८२ मध्ये इंदिरा गांधी यांनी लिंक कालव्याच्या कामाचे भूमिपुजनही केले. पंजाबमधील दहशतवादी गटांनीही या कालव्याचा विरोध दर्शवला होता. १९८५ मध्ये राजीव गांधी यांच्या पुढाकाराने कालव्याच्या कामाला सुरुवात झाली आणि १९९० पर्यंत ७५० कोटी रुपये खर्चून कालव्याचे अर्धेकाम पूर्ण झाले होते. मात्र यानंतर कालव्याचे काम मंदावले. २००२ मध्ये पंजाबला कालव्याच्या उर्वरित भागाचे काम करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र २००४ मध्ये पंजाबने हरियाणासोबतचा पाणी वाटपाचा करारच रद्द केला. राष्ट्रपतींनी हे प्रकरण सुप्रीम कोर्टाकडे पाठवले होते.

गुरुवारी सुप्रीम कोर्टात याप्रकरणावर सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने पंजाब सरकारच्या निर्णयाला असंवैधानिक ठरवले आहे. पंजाबला करार मोडण्याचा अधिकारच नाही. पंजाबचा हा निर्णय चुकीचा आहे असे कोर्टाने स्पष्ट केले. या निर्णयानंतर आता कालव्याचे काम पुन्हा सुरु होऊ शकेल अशी आशा आहे. मात्र सुप्रीम कोर्टाने यापूर्वीही दोन वेळा पंजाब सरकारविरोधात निकाल दिला आहे. सुप्रीम कोर्टाने पंजाब सरकारविरोधात निर्णय दिल्यानंतर पंजाबमधील राजकारणही सुरु झाले आहे.शिरोमणी अकाली दल आणि भाजप सरकारवर टीका सुरु झाली असून काँग्रेसच्या आमदारांनी या निर्णयाविरोधात थेट राजीनामाच दिला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹महारोगी सेवा समितीला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

असोसिएशन आॅफ एनर्जी इंजिनिअर्स इन वॉशिंग्टन (अमेरिका) यांचा नाविन्यपूर्ण ऊर्जा प्रकल्पासाठीचा प्रतिष्ठित आंतररराष्ट्रीय वरोरा येथील पुरस्कार महारोगी सेवा समिती वरोरा संस्थेला मिळाला आहे. बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समिती वरोरा या संस्थेने आंतरराष्ट्रीय पातळीवरचा नाविन्यपूर्ण ऊर्जा प्रकल्पाबद्दलचा २०१६ सालचा पुरस्कार मिळाला आहे.

आशियाच्या उपखंडातील अपारंपरिक ऊर्जा वापराच्या आनंदवनातील नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. सन १९४९ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचे प्रमुख आणि सचिव डॉ. विकास आमटे आणि विश्वस्त गौत करजगी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार देण्याचा कार्यक्रम असोसिएशन आॅफ एनर्जी इंजिनिअर्सच्या ३९ व्या जागतिक ऊर्जा इंजिनिअर्सच्या परिषदेत २० सप्टेंबर रोजी वॉश्गिंटन येथे झाला. डॉ. विकास आमटे गुरूवारी विदेशातून परतल्यावर त्यांनी ही माहिती दिली.

असोसिएशन आॅफ एनर्जी इंजिनिअर्स (एइइ) ही स्वयंसेवी संस्था वैज्ञानिक आणि शैक्षणिक दोन्ही दृष्टीने ऊर्जा क्षेत्रातील उद्योगात शाश्वत विकासाच्या योजनाना उत्तेजन देण्याचे कार्य करीत आहे. हे कार्य व्यावसायिक पद्धतीचे असून संस्थेचे जगभरातील ९८ देशांत १८ हजारांहून अधिक सभासद आहेत.

आनंदवनमध्ये विविध प्रकारच्या शारीरिक अडचणी असलेल्या सुमारे २५०० व्यक्ती राहतात. त्यात कुष्ठरुग्ण, तरूण व दिव्यांग तसेच अनाथ, निराधार अशा व्यक्तींचा समावेश आहे. एकेकाळी सुदृढ़ समाजाने नाकारलेले हे लोक आज सामाजिकदृष्ट्या स्वाभिमानाचे जिणे जगत आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी जागतिक पातळीवर पुनर्वसनाचे नवीन मापदंड प्रस्थापित केले आहेत. त्यांनी सामाजिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या आव्हानात्मक असे कार्यक्रम अमलात आणले आहेत.
अमेरिकेच्या या पुरस्कारामुळे महारोगी सेवा समितीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

 त्याचबरोबर आनंदवन ही नाविन्यपूर्ण आणि वैशिष्टयपूर्ण कामांची प्रयोगशाळा आहे, हे नामाभिधान सार्थ ठरवले आहे. संस्था नेहमीच नवीन पण उचित अशी साधने आणि तंत्रज्ञान विकसित करण्यात आघाडीवर असते. येथे नैसर्गिक स्त्रोतांचा वापर केला जातो. महारोगी सेवा समितीच्या सहा दशकांच्या वाटचालीत संस्थेने लक्षणीय अशी पर्यावरण पूरक कामे केली आहेत. सोबतच ऊर्जेची निर्मिती करताना पर्यावरणस्नेही स्त्रोतांचा वापर प्राधान्याने केला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सायना, सिंधूचा भाव घसरला

‘पीबीएल’च्या लिलावात कॅरोलिना मारिनची भरारी

ऑलिम्पिक विजेत्या कॅरोलिना मारिनला दुसऱ्या प्रीमियर बॅडमिंटन लीगसाठी (पीबीएल) झालेल्या लिलावामध्ये सर्वाधिक बोली लागली. मात्र रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू आणि लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल यांना लीगसाठी त्या तुलनेत खूप कमी भाव मिळाला.

दोन वेळा जगज्जेतेपद जिंकणाऱ्या मारिनला हैदराबाद हंटर्स संघाने ६१ लाख ५० हजार रुपयांची बोली लावून संघात स्थान दिले. याचप्रमाणे रिओ ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या पुरुष बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतला ५१ लाख रुपयांच्या बोलीसह अवध वॉरियर्सने संघात घेतले. भारताच्या श्रीकांतवर सर्वाधिक बोली लागली.
रिऑ ऑलिम्पिकमधील ऐतिहासिक कामगिरीनंतर भारतीय क्रीडा विश्वामध्ये सिंधूने एक मौल्यवान ठसा उमटवला आहे. त्यामुळे तिच्यावर मोठी बोली लागेल, असा अंदाज होता. मात्र तिला फक्त ३९ लाख रुपये भाव मिळाला.
‘‘लिलावामध्ये माझे नाव अखेरचे होते. त्यामुळे मला फार चांगला भाव मिळू शकला नाही. मात्र चेन्नई संघात पुन्हा समावेश असल्यामुळे मी समाधानी आहे. पैशाचा मी अजिबात विचार करीत नाही. भारतीय बॅडमिंटनचा विकास कशा प्रकारे होतो, हे माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे,’’ असे सिंधूने सांगितले. चेन्नईने हैदराबादवर मात करून तिला आपल्या संघात ठेवण्यात यश मिळवले.

पीबीएलच्या पहिल्या हंगामात सायना आणि ली चाँग वेई यांना सर्वाधिक एक लाख डॉलर्सची बोली लागली होती. पहिल्या फेरीत सायनावर कोणीच बोली लावली नाही. मात्र अवध वॉरियर्सने ३३ लाख या मूळ किमतीलाच तिला संघात स्थान दिले.

दक्षिण कोरियाची महिला बॅडमिंटनपटू संग जि ह्यून हिच्यावर दुसऱ्या क्रमांकाची बोली लागली. मुंबई रॉकेट्स संघाने ६० लाख रुपये मोजून तिला संघात दिले. डेन्मार्कच्या जॅन ओ’जोर्गेनसेनला ५९ लाख रुपये मिळाले. गतविजेत्या दिल्ली एसर्सच्या संघात तिचा समावेश झाला आहे.

डेन्मार्कच्या ऑलिम्पिक विजेत्या व्हिक्टर अॅक्सेलसेनला ३९ लाख रुपयांना बंगळुरू ब्लास्टर्सने खरेदी केले. १५ दिग्गज खेळाडूंपैकी १२ खेळाडूंना सहा संघांनी खरेदी केले. हंटर्स संघाने मलेशियाच्या वी किआँग टँनला ३३ लाख रुपयांच्या बोलीसह संघात स्थान दिले.

भारताच्या अन्य काही खेळाडूंपैकी एच. एस. प्रणॉय आणि अजय जयराम यांना मुंबई रॉकेट्सने अनुक्रमे २२ लाख आणि १९ लाख असा भाव दिला. बी. साईप्रणीतला हैदराबादने २१ लाख रुपयांना खरेदी केली. चायनीज तैपेई स्पर्धा जिंकणाऱ्या सौरभ वर्माला बंगळुरूने १३ लाख रुपये दिले. दुहेरी विशेषज्ञ ज्वाला गट्टाला दिल्लीने १० लाख रुपयांच्या बेालीसह संघात स्थान दिले. अश्विनी पोनप्पाला ब्लास्टर्सने संघात दिले.

पीबीएलचा दुसरा हंगाम

प्रीमियर बॅडमिंटन लीगचा दुसरा हंगाम १ ते १४ जानेवारी २०१४ या कालावधीत रंगणार आहे.

या स्पध्रेत सहभागी होणाऱ्या सहा संघांपैकी प्रत्येक संघ अन्य संघाशी राऊंड-रॉबिन पद्धतीने रंगणार आहे.

प्रत्येक लढतीमध्ये पाच सामन्यांचा समावेश असेल. दोन पुरुष एकेरीत, एक महिला एकेरी, एक पुरुष दुहेरी आणि एक मिश्र दुहेरी सामने यात असतील.

प्रत्येक सामन्यात विजयासाठी ११ गुण आवश्यक असतील.

विजेत्या संघाला तीन कोटी आणि उपविजेत्या संघाला दीड कोटी रुपयांचे बक्षीस मिळेल. याचप्रमाणे उपांत्य फेरीत पराभूत संघांना प्रत्येकी ७५ लाखांचे पारितोषिक मिळेल.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अमेरिकेच्या बॅलेट रिसिटवर झळकली हिंदी

देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यावरून अनेक मतमतांतरे असली तरी नुकत्याच झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत हिंदीलाही मानाचे स्थान मिळाले. या अध्यक्षीय निडणुकीत मतदान करणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या बॅलेट रिसिटवर इतर भाषांबरोबरच हिंदीलाही स्थान देण्यात आले होते.

अभिनेते ऋषी कपूर यांनी अमेरिकन निवडणुकीतील बॅलेट रिसिटचे छायाचित्र प्रसारित केले आहे. अमेरिकेत सुमारे 32 लाख भारतीय वंशाचे नागरिक राहतात. त्यामुळे तेथे इतर परकीय भाषांप्रमाणेच हिंदीही बऱ्याच प्रमाणात बोलली जाते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹खरिपाच्या वाढलेल्या क्षेत्रामुळे रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या

नाशिक - नगर , नाशिक, जळगाव , धुळे, नंदूरबार जिल्ह्यांत यंदा खरिपाचे क्षेत्र गेल्यावर्षीच्या तुलनेत 3 लाख हेक्टरने वाढले आहे . त्यामुळे रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. गेल्या वर्षी विभागात रब्बीच्या 58 .33 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या . यंदा आतापर्यंत 28 टक्के पेरण्या उरकल्या आहेत. नगरमध्ये ज्वारीच्या चार लाख 65 हजार 751 हेक्टरपैकी दोन लाख 12 हजार 835 म्हणजेच 45 टक्क्यांपर्यंत पेरण्या पूर्ण झाल्या .

खरिपाच्या काढण्या पूर्ण झाल्यावर मोकळ्या झालेल्या क्षेत्रात शेतकरी गव्हासह हरभऱ्याची लागवड करतील . रब्बीचा हंगाम 15 सप्टेंबरपासून सुरू झाला असून ऑक्टोबरच्या सुरवातीपर्यंत ज्वारीची पेरणी शेतकरी करतात .

 ज्वारीची काढणी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होते. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात करडई , सूर्यफुलाची लागवड होते आणि या पिकांची काढणी 15 जानेवारीपर्यंत होते . ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये गव्हासह हरभऱ्याची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल राहतो .

 जिल्हानिहाय रब्बीचे सर्वसाधारण आणि प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र हेक्टरमध्ये असे ः नाशिक- 1 लाख 20 हजार 729 - 16 हजार 941 , धुळे- 81 हजार 868 - 15 हजार 921 , नंदूरबार - 71 हजार 486 - 3 हजार 534 , जळगाव - 1 लाख 52 हजार 656 - 13 हजार 944 , नगर - 6 लाख 45 हजार 103 - 2 लाख 49 हजार 438 .

रब्बीच्या पेरण्यांची टक्केवारी

जिल्ह्याचे नाव गेल्यावर्षी यंदा
नाशिक 13 . 90 14
धुळे 31 . 62 19
नंदूरबार 18 . 95 05
जळगाव 39 . 33 09
नगर 75 .01 39

पेरणी झालेल्या क्षेत्राची टक्केवारी
ज्वारी - 42
गहू - 10
मका - 18
हरभरा - 21

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मोदींना एका दिवसात ३ लाख लोकांनी केले अनफॉलो!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा धाडसी निर्णय घेतल्यानंतर अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी अनेकांना हा तडकाफडकी घेतलेला निर्णय रुचला नसल्याचे दिसत आहे. पंतप्रधान मोदी यांना ट्विटरवर फोलो करणाऱ्या ३ लाख लोकांनी एकाच दिवसात 'अनफॉलो' करुन आपली नाराजी व्यक्त केली आहे.

काळ्या पैशांच्याविरोधात लढाई लढाईची आहे, देशातील नागरिकांनी सज्ज राहावे असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला. पंतप्रधानांच्या या निर्णयाचे देशातील अनेकांकडून स्वागत होत असताना दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावर त्याचे तीव्र पडसाद उमटले.

 मोदी यांच्या या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी ९ नोव्हेंबर रोजी ३.१३ लाख ट्विटरकरांनी पंतप्रधान मोदींना अनफॉलो केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेले भारतीय आहेत. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा मोदी यांच्या फॉलोअर्सची संख्या अधिक आहे. तसेच सर्वाधिक प्रसिद्ध ट्विटर युझरमध्ये मोदी हे जगात ४७ व्या क्रमांकावर आहेत.

मोदी हे ट्विटरवर चांगलेच अॅक्टिव्ह असून केंद्र सरकारच्या प्रत्येक योजनेची माहिती ते ट्विटरवर अपडेट करत असतात. मोदी यांच्या देश-विदेशातील दौऱ्याची माहिती, घडामोडी ट्विटरवर मिनिटा-मिनिटाला अपडेट्स होत असतात. त्यामुळे दर दिवशी हजारो फॉलोअर्स मोदींना फॉलो करीत असतात. नोव्हेंबर महिन्याच्या अवघ्या आठ दिवसात २५ हजार फॉलोअर्सनी मोदींना फॉलो केले होते. तसेच ५०० व १०००च्या नोटा बाद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सुद्धा ५० हजार लोकांनी फॉलो केले परंतु दुसऱ्याच दिवशी या निर्णयाला विरोध दर्शवित ३.१३ लाख लोकांनी मोदींना अनफॉलो केले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹काळा पैसा पांढरा करण्यासाठी गुजरात सर्वांत पुढे ?

नवी दिल्ली : काळा पैसा पांढरा म्हणजेच अधिकृत कसा करायचा याबद्दल गुगलवर सर्च करणाऱ्यांमध्ये गुजरात प्रथम क्रमांकावर आहे . त्यापाठोपाठ महाराष्ट्र आणि हरियाना येथून याबद्दल सर्वाधिक गुगल सर्च करण्यात आले आहेत.

पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानंतर काळा पैसा बाळगणाऱ्या लोकांमध्ये खळबळ उडाली असल्याचे गूगल सर्चसंबंधातील निरीक्षणांवरून दिसून आले आहे . ‘ब्लूमबर्ग’ ने याबाबत अहवाल दिला आहे .
“ How to convert black money into white money ” असे गुरुवारी दिवसभरात सर्वात जास्त प्रमाणात सर्च करण्यात आले . सर्च करणाऱ्यांमध्ये गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे , तर महाराष्ट्र दुसऱ्या आणि हरियाना तिसऱ्या क्रमांकावर आहे .

वापरात असलेल्या 86 टक्के नोटा निरर्थक ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे . लोकांनी बँकांमध्ये जुन्या नोटा जमा करण्यासाठी गर्दी केली . मात्र पैसे जमा करण्यासाठी अडीच लाखांची मर्यादा देण्यात आली आहे . यापेक्षा जास्त रक्कम असल्यास त्याच्या उत्पन्नाचा स्रोत द्यावा लागणार आहे . त्यामुळे अधिकृत स्त्रोत नसलेल्या लोकांची पंचाईत झाली आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹टीसीएस’मधूनही सायरस मिस्त्रींना डच्चू

 देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वांत मोठी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या ( टीसीएस ) अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांची उचलबांगडी टाटा सन्सने केली आहे . याबाबत टीसीएस आणि इंडियन हॉटेल्स कंपनीच्या भागधारकांची विशेष बैठक बोलाविण्यात आली आहे .

टाटा सन्सकडे शंभर अब्ज डॉलरची उलाढाल असलेल्या टाटा समूहाची मालकी आहे . सूमहातील सर्वांत मोठी कंपनी असलेल्या टीसीएसच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांची उचलबांगडी करण्यात आली असून , इशात हुसेन यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे . टीसीएसमध्ये टाटा सन्सचा ७३ .२६ टक्के हिस्सा असून , मिस्त्री यांची कंपनीच्या संचालक मंडळावरून हकालपट्टी करण्याचा ठरावावर निर्णय घेण्यासाठी भागधारकांची विशेष बैठक बोलाविण्यात आली आहे . मिस्त्री यांच्या जागी हुसेन यांची निवड करण्यात आल्याचे पत्र टाटा सन्सने टीसीएसला काल ( ता. ९ ) पाठविले . यामुळे मिस्त्री हे आता अध्यक्ष राहिले नसून त्यांच्या जागी हुसेन हे अध्यक्ष असतील , असे टीसीएसने म्हटले आहे . याचप्रमाणे इंडियन हॉटेल्स कंपनीत टाटा सन्सचा २८ . ०१ टक्के हिस्सा असून , या कंपनीच्या संचालक मंडळातून मिस्त्री यांना हटविण्यासाठीही विशेष बैठक बोलाविण्यात आली आहे .

मिस्त्रींनी हटविण्याच्या मोहिमेला जोर
टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून मिस्त्री यांची हकालपट्टी झाल्यानंतर टाटा सन्स आणि मिस्त्री यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मिस्त्री यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या शापूरजी पालनजी सूमहाचा टाटा समूहात १८ . ४१ टक्के हिस्सा आहे . मिस्त्री यांच्या जागी हंगामी अध्यक्ष म्हणून रतन टाटा आले असले, तरी सूमहातील महत्त्वाच्या कंपन्यांचे अध्यक्षपद मिस्त्री यांच्याकडेच आहे . यात इंडियन हॉटेल्स , टाटा मोटर्स आणि टाटा स्टील यांचा समावेश आहे . या कंपन्यांच्या अध्यक्षपदावरून मिस्त्री यांना हटविण्याची मोहीम सुरू झाली आहे .

कोण आहेत हुसेन ?
इशात हुसेन हे टाटा समूहातील अनेक कंपन्यांचे संचालक आहेत. यात टाटा स्टील , व्होल्टाज यांचा समावेश आहे . टीसीएसच्या अध्यक्षपदी नवा स्थायी अध्यक्ष येईपर्यंत ते या पदावर असतील. सध्या ते व्होल्टाज आणि टाटा स्कायचे अध्यक्ष आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारत-जपानमध्ये ऐतिहासिक अणू करार, NSG साठीही पाठिंबा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौ-यात मोठं यश मिळालं आहे. भारत आणि जपान दरम्यान ऐतिहासिक अणू करार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्या उपस्थितीत नागरी अणू करारावर स्वाक्ष-या झाल्या. भारतासोबत अणूकरार करणारा जपान हा 11 वा देश आहे.

तसेच, जपानने अणू पुरवठादार गटात(NSG) भारताच्या कायम सदस्यत्वाचंही समर्थन केलं आहे. जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली.

 अणुपुरवठादार देशांच्या समूहाची आज व्हिएन्नामध्ये महत्त्वाची बैठक होत आहे. त्यामध्ये भारताच्या समावेशाबाबतचा मुद्दा उचलून धरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारत आणि जपान हे नैसर्गिक मित्र आहेत, भारत -जपानच्या भागीदारीमुळे समाजात शांतता आणि समतोल राखण्यास मदत होईल असं मोदी म्हणाले. भारत आणि जपान दोघं मिळून दहशतवादाविरोधात लढण्यास तयार आहे असंही मोदी म्हणाले.

यापुर्वी गुरूवारी मोदींनी एका व्यापार सभेत 'मेक इन इंडिया, मेड बाय जापान' असा नारा दिला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यादरम्यान भारत आणि जपानमध्ये ऐतिहासिक अणुकरारावर स्वाक्षरी झाली. विशेष म्हणजे, अणुबॉम्ब हल्ला झालेल्या जगातील एकमेव जपान या देशानं पहिल्यांदाच अण्विक प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी न करणाऱ्या भारताबरोबर अणुकरार केला आहे. दरम्यान, अणुपुरवठादार देशांच्या समूहाची आजच व्हिएन्नामध्ये महत्त्वाची बैठक होत आहे. त्यात भारताच्या समावेशाबाबतचा मुद्दा उचलून धरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹कोल्हापुरच्या हेमलने जिंकला ‘मिस अर्थ इंडिया’चा किताब

कोल्हापुरातील हेमल इंगळे या युवतीने बुद्धिमत्ता आणि कौशल्याच्या जोरावर ‘मिस अर्थ इंडिया’ या किताबावर आपले नाव कोरले आहे. लवकरच हेमल अमेरिकेत जागतिक दर्जाची होणारी ‘मिस अर्थ’ ही स्पर्धा जिंकण्यासाठी पुढच्या वर्षी ऑगस्टमध्ये रवाना होईल. भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ती उत्सुक आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आयएनएस सुमित्रा सिडनी बंदरात दाखल

‘पूर्वेकडे पहा’ या धोरणाअंतर्गत तसंच मित्र देशांबरोबरचे संबंध अधिक दृढ करण्याच्या हेतूने भारतीय नौदलाची सुमित्रा ही किनारी गस्त नौका 4 ते 7 नोव्हेंबर 2016 या तीन दिवसांच्या भेटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या सिडनी बंदरात दाखल झाली आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातले द्विपक्षीय संबंध दृढ व्हावेत तसंच दोन्ही देशात सागरी सुरक्षा सहकार्य वाढावे या उद्दिष्टाने ही नौका सिडनी दौऱ्यावर आली आहे. दोन्ही राष्ट्रांच्या नौदल अधिकाऱ्यांदरम्यान संवाद, भारतीय नौदल कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक दौरा, यासह इतर कार्यक्रम या तीन दिवसात आयोजित करण्यात आले आहेत. ‘फेस्टीवल ऑफ इंडिया’ या कार्यक्रमात ही नौका सहभागी होणार आहे.

आर्थिक आणि धोरणात्मक बाबतीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दृढ द्विपक्षीय संबंध असून उभय देशात सागरी संबंधही हळूहळू वृध्दींगत होत आहेत. सुमित्रा ही सरयू श्रेणीतली चौथी नौका असून गोवा गोदीमध्ये या नौकेची बांधणी करण्यात आली आहे. 2014 मध्ये नौदलात समावेश झालेल्या या नौकेने हाती घेतलेले ऑपरेशन राहत लक्षवेध ठरले.

2015 मध्ये युध्दग्रस्त येमेनमधून विविध राष्ट्रांच्या नागरिकांची सुखरूप सुटका या ऑपरेशन राहत अंतर्गत करण्यात आली होती.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹संजय घोडावत प्रायव्हेट पायलट परीक्षा उत्तीर्ण

‘संजय घोडावत ग्रुप’चे चेअरमन संजय घोडावत लवकरच पायलट होणार आहेत. नुकतीच ते प्रायव्हेट पायलट परीक्षा उत्तीर्ण झाले व यानंतर त्यांचे पायलट ट्रेनिंग अमेरिकेतील फ्लायिंग स्कूलमध्ये होणार आहे. ट्रेनिंग संपल्यानंतर त्यांना इंटरनॅशनल प्रायव्हेट पायलट लायसन्स मिळणार असून, स्वत:चे हेलिकॉप्टर चालविणारे घोडावत हे भारतातील तिसºया क्रमांकाचे पायलट म्हणून ओळखले जाणार आहेत. ‘पन्नाशीची उमर गाठली अजूनही मोडला नाही कणा,’ ह्या कवितेला साजेल अशी कामगिरी त्यांनी करून दाखविली आहे. घोडावत यांचे आज ५२ वर्षे वय आहे. या वयातही त्यांनी आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न बाळगून ते पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहेत. कित्येक लोक पन्नाशी गाठली की आता लवकरच मी सेवानिवृत्त होणार, आता बस झाले, म्हणून उमेद मालवून घरी बसतात. त्यांच्यासाठी हे उदाहरण आदर्श ठरणारे आहे. घोडावत यांनी औद्योगिक क्षेत्रामध्ये तब्बल ३० वर्षे उत्कृष्टरीत्या त्यांच्या विविध कंपन्यांचे नेतृत्व करून यशस्वी उद्योगपतीची भूमिका पार पाडली आहे. ते स्वत: मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. उद्योग व शिक्षण क्षेत्रांत त्यांनी उभारी घेऊन आपले प्रचंड नावलौकिक मिळविले आहे. त्यांनी आज जवळपास ७,००० हून अधिक कामगारांना रोजगार पुरविला असून, ११००० हून जास्त विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण देण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत त्यांनी पायलट शेजारी बसून हवाई सफरीचा आस्वाद घेतला; पण आता स्वत: ते पायलट म्हणून ज्या वेळेस हवाई सफर करतील, त्यावेळचा तो आनंद त्यांच्यासाठी आल्हाददायी असेल. ‘संजय घोडावत ग्रुप’च्या माध्यमातून त्यांनी घोडावत एन्टरप्रायझेस प्रा. लि. ह्या हवाई वाहतूक कंपनीची उभारणी केली. या कंपनीकडे दोन हेलिकॉप्टर्स असून, भविष्यात ई सी १३५ व ई आर जे १३५ या दोन अद्ययावत विमानाच्या साहाय्याने हवाई वाहतुकीचा त्यांचा मानस आहे. ही त्यांची पुण्याई... परमेश्वर प्रेरणा, आई-वडील व थोरामोठ्यांचे आशीर्वाद, मित्र परिवार, ग्रुपमधील सर्व कर्मचारी वर्ग यांचे प्रेम व शुभेच्छा यामुळेच मी आजवर यशाची शिखरे पार करू शकलो. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी व ऋणी आहे, अशा भावना घोडावत यांनी व्यक्त केल्या आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹रेल्वे स्टेशनांना सौरऊर्जा

पारंपरिक ऊर्जेच्या वापराचे दुष्परिणाम, देखभालीचा वाढता खर्च या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने अनेक प्रायोगिक उपक्रम हाती घेतले असून विजेची बचत करणाऱ्या उपकरणांच्या वापरासह किमान ३० स्टेशनवर सौरउर्जेच्या वापराचा प्रकल्प आखण्यात आला आहे. त्यातून विजेच्या बचतीसोबत वीजबिलात घट होणार असून प्रदूषणविरहीत ऊर्जेचा अखंड पुरवठा होणार असल्याचा दावा केला जात आहे.
पश्चिम रेल्वेने वसई स्टेशनवर पहिल्यांदा विजेची बचत करणारी उपकरणे बसवण्याचा प्रकल्प आखला आहे. त्यात एसीसह बल्ब, पंखे आदी उपकरणांचा समावेश करण्यात आला आहे. त्यास यश मिळताच अन्य स्टेशन्सवरदेखील त्याची अमलबजावणी केली जाणार आहे.

पश्चिम रेल्वेने विजेच्या वापरातील खर्चात बचत करण्याच्या हेतूने सार्वजनिक क्षेत्रातील एनर्जी एफिशिअन्सी सर्विसेस कंपनीबरोबर संयुक्तपणे हा प्रकल्प राबवला जात आहे. वसईमध्ये काही दिवसांतच हा प्रकल्प राबवला जाणार आहे.

हा पथदर्शी उपक्रम यशस्वी झाल्यानंतर त्याचे मॉडेल अन्य स्टेशन्सवरदेखील राबवण्याचा पश्चिम रेल्वेचा मानस आहे. वसई स्टेशनमध्ये ईईएसएल कंपनीतर्फे सध्याची सर्व विजेची सर्व उपकरणे बदलून नवीन उपकरणे बसवली जातील. त्यात, पंखे, एसी, बल्ब आदींचा समावेश आहे. ही उर्जाबचत करणारी उपकरणे वापरात आल्यानंतर बिलात किमान १० टक्क्यांच्या बचतीचा दावा आहे. एकट्या वसई स्टेशनमध्ये विजेचा मासिक वापर ५५ हजार युनिट्स असून त्यासाठी रेल्वेस किमान पाच ते सहा लाख रुपये मोजावे लागतात. या उपकरणांमुळे बिलात मोठी बचत होणार आहे.

पश्चिम रेल्वेने दोन मेगावॉट क्षमतेच्या सौरउर्जेचा वापर करण्यासाठी पावले उचलली आहेत. पारंपरिक उर्जेपेक्षा सौर उर्जेच्या वापरावर रेल्वेने भर दिला आहे. परेच्या मुंबई
विभागाच्या नॉन ट्रॅक्शन वापरासाठी मासिक २५ लाख युनिट्सची आवश्यकता भासते. ही वीज बेस्ट, महावितरणकडून किमान १० रुपये प्रति युनिट दराने खरेदी करावी लागते. त्याअनुषंगाने पश्चिम रेल्वेने एका कंपनीकडून प्रति यु​निट पाच रुपये दराने सौर उर्जा खरेदी करार (पीपीए) करण्यात येणार आहे.

३० स्टेशनवर सौर पॅनेल
यापूर्वी पश्चिम रेल्वेने माटुंगा स्टेशनवर १२ केव्ही क्षमतेचे सौर ऊर्जा यंत्रणा अंतर्भूत केली आहे. मुंबई सेंट्रल येथील विभागीय कार्यालयात १० केव्ही क्षमतेची यंत्रणाही आहे. सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्याचे धोरण रेल्वे मंत्रालयाने आखले आहे. ३० लोकल स्टेशन्सच्या छतांवर सौर पॅनेल उभारले जाणार आहेत. हा पुरवठा कमी ठरल्यास अन्य कंपन्यांकडून ऊर्जा घेण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाणार असून किमान सहा महिन्यात हा प्रकल्प प्रत्यक्षात येईल, असा विश्वास पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी व्यक्त केला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹उसासाठी ठिबक सिंचनाची सक्ती

नागपूर - उसाचे पीक घ्यायचे असेल, तर शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाची सोय करावी लागणार आहे . याबाबचे धोरणच लवकरच राज्य सरकार तयार करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

रेशीमबाग येथे आयोजित आठव्या "ऍग्रो व्हिजन ' च्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते . मुख्यमंत्री म्हणाले , की पूर्वीच्या सरकारने शेतकऱ्यांचे ठिबकचे साडेसातशे कोटी रुपये थकविले. त्यामुळे ठिबक सिंचनाच्या लाभार्थ्यांना अनुदान वेळेत मिळाले नाही . आता हा निधी देण्यात आल्याने ठिबक सिंचनाचे वाटप बंद करण्यात आले. उसाच्या पिकाला पाणी जास्त लागते . ठिबक सिंचनासंदर्भात राज्य सरकार नवीन धोरण तयार करीत आहे . यानुसार उसाच्या पिकासाठी ठिबक सिंचन सक्तीचे करण्यात येईल .

सरकार , ऊस कारखानदार आणि शेतकरी यांच्यात करार करण्यात येईल . ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले जाईल . यावरील 50 टक्के व्याज सरकार देईल ; तर 25 टक्के कारखानदार आणि 25 टक्के व्याजाची रक्कम लाभार्थी भरेल . यामुळे कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन घेता येणार आहे . उसाला पिकासाठी पाणी मोठ्या प्रमाणात पाणी लागते . पाण्याचे नियोजन आणि योग्य उपयोग होणे आवश्यक आहे . ठिबकसाठी धोरण ठरविताना गडकरींनी सुचविलेल्या मार्गदर्शक सूचनांचा समावेश त्यात केला जाईल , अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली . गेल्या दीड वर्षात विदर्भ व मराठवाडा सर्वाधिक कृषी पंप वितरण केले आहे . कृषी फीडर करून 4 हजार सोलर मेगावॅट वीज तयार करण्यात येणार असून , दिवसा 12 तास वीज शेतकऱ्यांना देण्यात येईल . येथील नेत्यांमुळेच दूध डेअरी व्यवसायचे नुकसान झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹जपानबरोबर ऐतिहासिक नागरी अणू करार

टोकियो - जपानने आज आपल्या धोरणाला मुरड घालत भारताबरोबर नागरी अणू सहकार्य करारावर शिक्कमोर्तब केले. गेली सहा वर्षे चाललेल्या सविस्तर चर्चेनंतर हा ऐतिहासिक करार झाला असून , यामुळे दोन्ही देशांतील अणुऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांमधील भागीदारीसाठी मार्ग मोकळा झाला आहे . या कराराबरोबरच भारत- जपान दरम्यान आज इतर नऊ करारांवरही सह्या झाल्या .

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो ऍबे यांच्या उपस्थितीत हे दहा करार झाले . पंतप्रधान मोदी हे सध्या तीन दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अणू हल्ल्यांनी होरपळलेल्या जपानने कोणत्याही देशाबरोबर अणू करार न करण्याचे धोरण स्वीकारले आहे . मात्र , आज त्यांनी या धोरणाला भारतासाठी मुरड घातली. शुद्ध ऊर्जेच्या क्षेत्रातील भागीदारी वाढविण्यासाठी जपानने आज भारताबरोबर अणू ऊर्जेचा शांतिपूर्ण मार्गांनी वापर करण्याच्या सहकार्य करारावर सही केली . मोदी आणि ऍबे यांच्यादरम्यान झालेल्या चर्चेनंतर या करारासह दहा करारांवर स्वाक्षरी करण्यात आली . नंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा करण्यात आली . या करारामुळे जपानबरोबरील आर्थिक आणि संरक्षण संबंधांना बळकटी येणार असून , अमेरिकेतील कंपन्यांनाही भारतात अणुभट्ट्या उभारता येणार आहेत. या करारानुसार, जपान भारताला अणू तंत्रज्ञान निर्यात करणार आहे . यामुळे अण्वस्त्रबंदी करारावर सही न करताही जपानबरोबर अणू करार केलेला भारत हा पहिलाच देश ठरला आहे .

अण्वस्त्रबंदी करारावर सही केली नसतानाही भारत अणुऊर्जेचा जबाबदारपूर्वक शांततापूर्ण वापर करेल , असे करारात नमूद करण्यात आले आहे . संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना ऍबे म्हणाले ,"" जग अण्वस्त्रमुक्त करण्याच्या जपानच्या महत्त्वाकांक्षेला अनुसरूनच हा करार झाला आहे . या करारामुळे जपानला आनंद झाला आहे . अणुऊर्जेचा शांततापूर्ण वापर करण्याचा आपला इरादा भारताने 2008 मध्येच जाहीर केला होता . त्यामुळे अशा देशाबरोबर हा करार होणे ही ऐतिहासिक घटना आहे .'' भारत आणि जपानमधील सहकार्याचा पर्यावरण बदलाविरोधात सुरू असलेल्या लढाईत फायदाच होईल , असेही ऍबे म्हणाले . अमेरिका , रशिया , दक्षिण कोरिया, मंगोलिया , फ्रान्स , नामिबिया , अर्जेंटिना , कॅनडा , कझाकस्तान आणि ऑस्ट्रेलिया या देशांनीही भारताबरोबर नागरी अणू करार केले आहेत.

या कराराबद्दल पंतप्रधान मोदी यांनी ऍबे यांचे आभार मानले . आर्थिक गुंतवणूक , व्यापारवृद्धी , उत्पादन आणि गुंतवणूक सहकार्य, पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, शुद्ध ऊर्जेच्या वापरावर भर आणि नागरिकांची सुरक्षा यांना भारताचे प्राधान्य असल्याचे मोदी यांनी सांगितले . भारताला उत्पादनाचे जागतिक केंद्र बनण्याची इच्छा असून , यासाठी जपानचे सहकार्य आवश्यक असल्याचेही ते म्हणाले . भारत आणि जपानमधील धोरणात्मक भागीदारीमुळे शांतता आणि स्थैर्य निर्माण होण्याची आशा त्यांनी व्यक्त केली .

मुंबई -अहमदाबाद रेल्वेमार्ग 2023 मध्ये
जपानच्या सहकार्याने मुंबई ते अहमदाबाद अतिवेगवान रेल्वेमार्ग बांधण्याचा आगामी प्रकल्प हे दोन देशांमधील मैत्रीचे उदाहरण असल्याचे ऍबे यांनी सांगितले . या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे काम या वर्षाअखेरीस सुरू होऊन प्रत्यक्ष बांधकाम 2018 मध्ये सुरू होणार आहे . हे काम 2023 मध्ये संपविण्याचे नियोजन असल्याचेही ऍबे यांनी सांगितले .

 पंतप्रधान मोदी उद्या (ता. 12 ) अशाच प्रकारच्या रेल्वेगाडीतून प्रवास करणार आहेत. मोदी हे जागतिक दृष्टिकोन असलेले कणखर नेते असल्याची स्तुतीही ऍबे यांनी केली .

ऍबे म्हणाले . . . .
- भारतात उत्पादन संस्था उभारणार
- दहा वर्षांत तीस हजार व्यक्तींना प्रशिक्षण देणार
- नवी दिल्लीत पर्यटन विभाग सुरू करणार
- व्हिसाचे नियम शिथिल करण्यासाठी प्रयत्न करणार

भारत आणि जपान हे देश मुक्तता , पारदर्शकता आणि कायद्याचे पालन करणारे आहेत. केवळ आपल्या देशांमधील नागरिकांचेच नव्हे , तर जगाचे भले होण्यासाठी आम्ही दोघेही प्रयत्न करू . दोन्ही देशांनी एकत्र शक्ती लावल्यास सध्याच्या काळातील आव्हानांना आणि समस्यांना यशस्वीपणे तोंड देता येईल . दहशतवाद आणि मूलतत्त्ववाद यांचा आम्ही निषेध करतो .
- पंतप्रधान नरेंद्र मोदी

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹कोहलीची हिट विकेट, 67 वर्षांनंतर हिट विकेट देणारा दुसरा कप्तान

भारतीय संघ इंग्लंडविरोधात पहिला कसोटी सामना खेळत आहे. चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा सर्वांचं लक्ष होतं भारतीय कर्णधार विराट कोहलीकडे. विराट कोहली सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असल्यामुळे सामन्यात भारताचं पारड जड होईल अशी अपेक्षा सर्व चाहत्यांना होता. फलंदाजी करताना फटका मारुन धाव घेणा-या विराट कोहलीची विकेट गेली आणि सर्वांनाच नेमकं काय झालं कळेना.

इंग्लंडचा लेग स्पिनर आदिल राशिद 120वी ओव्हर करत होता. त्याने चेंडू टाकला आणि त्यानंतर सर्व स्टेडिअम शांत झाले. भारतीय चाहते काय झालं ? प्रश्नासह आश्चर्यचकित होऊन पाहत होते तर दुसरीकडे इंग्लंडचे खेळाडू बेल्स खाली पडली असल्याने जल्लोष करत होते. शॉर्ट बॉलवर पूर करुन धाव घेण्याचा प्रयत्न करणार विराट कोहली मैदानात उभा राहून थर्ड अम्पायरच्या निर्णयाची वाट पाहत होता. आणि त्याला हिट विकेट आऊट देण्यात आलं. विराट कोहलीचा पाय स्टम्पला लागल्यानंतर बेल्स खाली पडली होती त्यामुळे त्याला हिट विकेट देण्यात आलं.

कसोटी सामन्यात हिट विकेट देणारा विराट कोहली दुसरा कर्णधार ठरला आहे. याअगोदर 1949 मध्ये लाला अमरनाथ हिट विकेट झाले होते. 14 वर्षानंतर भारतीय फलंदाज हिट विकेट झाला असून 2002 मध्ये व्हीव्हीएस लक्ष्म्णची वेस्ट इंडिजविरोधात खेळताना हिट विकेट गेली होती.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹उत्पादनांवर प्रवेशकराचा राज्यांना अधिकार

नवी दिल्ली - राज्यांना त्यांच्या उत्पादनांवर प्रवेशकर आकारण्याचा अधिकार असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला . राज्याच्या करविधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी आवश्यक नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले आहे .

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश टी . एस . ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील नऊ सदस्यीय खंडपीठाने हा निर्वाळा दिला .

 राज्यांना उत्पादनांवर प्रवेशकर आकारण्याचा अधिकार असून , यात उत्पादनांमध्ये मात्र भेदभाव करता येणार नाही . राज्याने तेथेच उत्पादित होणाऱ्या उत्पादनावर प्रवेशकर आकारल्यास अन्य राज्यांतून येणाऱ्या त्याच उत्पादनांवर जादा कर आकारता येणार नाही , असे न्यायालयाने स्पष्ट केले. याच वेळी राज्यांचा करविधेयकांची घटनात्मक वैधता न्यायालयाने कायम ठेवली . या निर्णयाला नऊ न्यायाधीशांपैकी सात सदस्यांनी अनुकूल मत दिले , तर दोन सदस्यांनी विरोधात भूमिका घेतली .

या प्रकरणी 2002 पासून प्रलंबित याचिकांवरील सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने 20 सप्टेंबर रोजी निर्णय राखून ठेवला होता . एका राज्यातून दुसऱ्या राज्यात उत्पादन नेताना त्यावर राज्य प्रवेशकर आकारते . ज्या राज्यात उत्पादन जाणार ते राज्य हा कर आकारत नाही . याला अनेक कंपन्यांनी आव्हान दिले होते. हा कर घटनेतील मुक्त व्यापार संकल्पनेचा भंग करणारा असल्याचे कंपन्यांनी म्हटले होते .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹दक्षिण अफ्रिकेने उडवला धुव्वा, ऑस्ट्रेलिया फक्त 85 धावांत ऑल आऊट

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिकेदरम्यान दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. पहिल्या कसोटी सामन्यात पराभव केल्यानंतर दक्षिण अफ्रिकेने आपला पराक्रम कायम ठेवत दुस-या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडवली आहे. दक्षिण अफ्रिकेने यजमान ऑस्ट्रेलिया संघाला पहिल्या सत्रात फक्त 85 धावांवर ऑल आऊट केलं आहे. लंचअगोदरच दक्षिण अफ्रिकेने फक्त 43 धावांवर ऑस्टेलियाचे सहा गडी बाद केले होते. यानंतर 42 धावांत राहिलेल्या 4 विकेट्स घेत दक्षिण अफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला.

दक्षिण अफ्रिकेकडून फिलेंडरने सर्वोत्तम प्रदर्शन करत 21 धावांमध्ये 5 विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त काइली अबॉटने 41 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.

पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण अफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 177 धावांनी पराभव केला आहे. दुस-या कसोटी सामन्यातही ऑस्ट्रेलियावर पराभवाचं संकट दिसत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये ऑस्ट्रेलिया संघाला दक्षिण अफ्रिकेकडून चांगलाच धोबीपछाड मिळत असल्याचं दिसत आहे. 2011 साली केपटाऊनमध्ये दक्षिण अफ्रिकेने ऑस्ट्रेलिया संघाला फक्त 47 धावांत गारद केलं होतं, तर गतवर्षी 2106 मध्ये नोटींघ्घम येथे 60 धावांमध्ये संपुर्ण संघाला तंबूत पाठवलं होतं. हे दोन्ही सामने देशाबाहेर झाल्याने ऑस्ट्रेलिया संघाची तेवढी अब्रू वाचली होती. मात्र यावेळी घरच्याच मैदानावर दक्षिण अफ्रिकेने त्यांचं वस्त्रहरण केलं आहे, त्यामुळे हा सामना जिंकण्याची जबाबदारी ऑस्ट्रेलिया संघाच्या खांद्यावर आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सर्वसमावेशक पर्यावरण निर्देशांक घसरुनही चंद्रपूर प्रदूषितच!

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ७० सीपी इंडेक्सवरील प्रदूषण अतिशय धोकादायक ठरविले आहे. प्रदूषणात देशात चौथ्या व सहाव्या क्रमांकावर राहिलेल्या चंद्रपूरचे सर्वसमावेशक पर्यावरण मूल्यांकन ५४.४२ सीपी इंडेक्सवर आणण्यात स्थानिक प्रदूषण नियंत्रण मंडळाला यश आले आहे. तरीही महाऔष्णिक वीज केंद्र, कोळसा खाणी आणि सिमेंट व इतर उद्योगांमुळे चंद्रपुरात हवा, जल, ध्वनी आणि धुळीचे प्रदूषण मोठय़ा प्रमाणात आहे.

जिल्हय़ात वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या ३० कोळसा खाणी, महाऔष्णिक वीज केंद्र, खासगी औष्णिक विद्युत केंद्र, बल्लारपूर पेपर मिल, पोलाद उद्योग, पाच सिमेंट कारखाने तसेच वाहतूक व्यवसाय व प्रदूषणात भर घालणारे असंख्य उद्योग आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार कुठल्याही शहराचा सर्वसमावेशक पर्यावरण निर्देशांक हा ७० सीपी इंडेक्सच्या वर नको. तो आरोग्याच्या दृष्टीने अतिशय हानीकारक समजला जातो. मात्र २०१० च्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदीनुसार चंद्रपूरचा सर्वसमावेशक पर्यावरण निर्देशांक तेव्हा ८३.९८ होता. त्यामुळे सहा वर्षांपूर्वी चंद्रपूर देशात प्रदूषणात चौथ्या क्रमांकावर होते. प्रदूषणाची ही आकडेवारी बघून तेव्हा खासदार हंसराज अहीर यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना येथे आणले होते. त्यानंतरच चंद्रपूरचा आराखडा तयार करण्यात आला. तो अतिशय कठोरपणे राबविण्यात आला. २०१३ मध्ये पुन्हा एकदा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सर्वसमावेशक मूल्यांकन केले असता चंद्रपूरचा सीपी इंडेक्स ८१.९३ होता. यावेळी चंद्रपूर चौथ्या वरून देशात सहाव्या क्रमांकावर आले होते. प्रदूषणाची ही मात्रा कमी करण्यासाठी कठोर उपाय योजना करताना सर्वाधिक प्रदूषण करणारे चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे २१० मेगाव्ॉटचे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाचा दोन संच बंद करण्यात आले. विविध उपाययोजना करतानाच महाऔष्णिक विद्युत केंद्र तसेच वेकोलि, बिल्ट तसेच इतर उद्योगांतून नदी, नाले व तलावांत सोडण्यात येणारे विषारी पाणी सोडणे बंद करण्यात आले. त्याचा परिणाम जलप्रदूषणही कमी झाले. विशेष म्हणजे यानंतर २०१० पासून या जिल्हय़ात केंद्रीय प्रदूषण मंडळाले लावलेली उद्योगबंदी मागे घेण्यात आली. केंद्रीयमंत्री हंसराज अहीर व अर्थ, नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे तसेच प्रदूषण कमी झाल्याने ही बंदी मागे घेण्यात आली. प्रदूषण नियंत्रण विभागाचे अधिकारी जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मे २०१६ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात चंद्रपूर शहराचे सर्वसमावेशक पर्यावरण मूल्यांकन ५४.४२ सीपी इंडेक्स आहे. याचाच अर्थ शहरातील प्रदूषण कमी झाले आहे.

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे नवीन ५०० मेगाव्ॉटचे दोन संच, धारीवाल पॉवर प्रोजेक्ट, अंबुजा, एसीसी, अल्टाटेक सिमेंट कारखाना, लॉईड मेटल्स, घुग्घुस, मल्टी ऑरगॅनिक, वेकोलिच्या कोळसा खाणी आदींमधून प्रदूषण सुरू आहे.

 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संमतीपत्राच्या समितीने १० ऑक्टोबर २०१६ रोजीच्या बैठकीत ताडाळी ‘एमआयडीसी’मधील धारीवाल औष्णिक वीज प्रकल्पाला धुराचे नमूने तपासल्यानंतर अहवालात संमतीपत्र रद्द का करण्यात येऊ नये, या आशयाची नोटीस बजावली आहे.

वन्यजीवांवर परिणाम

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या महाऔष्णिक विद्युत केंद्राचा वाघ, बिबटय़ासह इतर वन्यजीवांवर परिणाम होत असल्याची तक्रार ग्रीन प्लॅनेट सोसायटीने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे केली होती.

प्रदूषणाने विविध आजार

चंद्रपूर शहर प्रदूषणात देशात चौथ्या व सहाव्या क्रमांकावर होते, त्या वर्षी जिल्हय़ात प्रदूषणामुळे ४२० लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाने घेतली होती.

केवळ मृत्यूच नाही तर १ लाख २६ हजार ३३८ लोकांना विविध आजाराने ग्रासले होते. यामध्ये हृदयरोग, त्वचारोग, कर्करोग, दमा, केस गळती, क्षयरोग यासोबतच पोटाचे विकास, किडनी आजार, मूत्रपिंड यासारख्या आजारांचे प्रमाण वाढले.

विशेष म्हणजे तेव्हापासून जिल्हय़ात या आजाराचे रुग्ण मोठय़ा संख्येत आहेत. याला प्रदूषण हे एकमेव कारण असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

प्रदूषण मात्रेची मोजणी करणाऱ्या यंत्राची फिल्टर टेप तुटल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून चंद्रपूर शहर प्रदूषणात देशात पहिल्या क्रमांकावर असल्याची नोंद केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वेबसाइटवर घेतली गेली आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अनागोंदी कारभारामुळे हा सर्व प्रकार झाल्याची बाब उघड झाली आहे. मात्र मे महिन्याच्या अहवालानुसार चंद्रपूरचे प्रदूषण धोक्याच्या पातळीच्या खाली आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा