Post views: counter

Current Affairs January 2017 Part- 5

🔰 Current Affairs Marathi 🔰:
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹शहीद पांडुरंग गावडे यांना शौर्य चक्र जाहीर

दहशतवाद्यांशी लढताना वीरगती प्राप्त झालेले मराठा लाइट इन्फंट्री व "राष्ट्रीय रायफल्स‘चे नायक पांडुरंग महादेव गावडे यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर झाले आहे. लष्करातर्फे शांतीकाळात दखविलेल्या अतुलनीय शौर्यासाठी शौर्य चक्र दिले जाते.

https://t.me/chalughadamodi/3885
जम्मू-काश्मीरमधील सीमावर्ती भागातील कुपवाडा जिल्ह्यात २१ मे २०१६ रोजी जैश ए महंमदच्या दहशतवाद्यांशी नऊ तास चकमक सुरू होती. या चकमकीत भारतीय जवानांनी पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकी दरम्यान गावडे गंभीर जखमी झाले होते. रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले गावडे हे उत्तम नेमबाज (स्नायपर), रेडिओ ऑपरेटर होते तसेच कॉम्प्युटर आणि सर्व प्रकारचे रेडिओ संच हाताळण्यात कुशल होते. ते उत्तम हॉकी, बास्केटबॉल आणि फूटबॉलपटू होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील आंबोली-मुळवंदवाडी (ता. सावंतवाडी) येथील मूळ रहिवासी असलेले गावडे मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये कार्यरत होते. काही वर्षांपूर्वी त्यांची नेमणूक जम्मू काश्मिरमध्ये अतिरेक्यांचा सामना करणाऱ्या ४१ राष्ट्रीय रायफल्समध्ये झाली होती. गावडे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. गावडे यांना घरातूनच लष्करी सेवेचे बाळकडू मिळाले होते. त्यांचे दोन मोठे भाऊ सैन्यातच कार्यरत होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सोशल मीडियावरील 'एक्झिट पोल'वरही बंदी

राज्यातील महानगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगानं एक्झिट पोलवरच्या बंदीची व्याप्ती वाढविली असून यंदा प्रथमच सोशल मीडियावरही एक्झिट पोल जाहीर करण्यास बंदी घातली आहे. आयोगानं निर्बंध घातलेल्या कालावधीत सोशल मीडियावर एक्झिट पोल जाहीर केल्यास तो निवडणूक आचारसंहितेचा भंग ठरणार आहे.


राज्यात २५ जिल्हा परिषदा, २८३ पंचायत समित्यांसाठी येत्या १६ आणि २१ फेब्रुवारी आणि आणि १० महापालिकांसाठी २१ फेब्रुवारीला निवडणुका होत आहेत. दोन्ही निवडणुका पाठोपाठ होत असल्याने जिल्हापरिषदांच्या निवडणुका झाल्यावर १६ फेब्रुवारी पासून जनमत चाचणी घेण्यास निवडणुक आयोगानं बंदी घातली आहे. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांचा एक्झिट पोल प्रसारित केल्यानं त्याचा दहा महापालिकांच्या मतदानावर परिणाम होण्याची शक्यता असल्यानं हा एक्झिट पोल सादर करण्यास निवडणूक आयोगानं बंदी घातली असून २१ जानेवारी रोजी तसे परिपत्रकच निवडणूक आयोगानं जारी केलं आहे. १४ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या कालावधीत जनमत चाचणी किंवा मतदानोत्तर चाचणी प्रसिद्ध केल्यास तो आचार संहितेचा भंग ठरेल, असे राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव नितीन वागळे यांनी सांगितले.
एसएमएसवरही पोल जाहीर करता येणार नाही.

https://t.me/chalughadamodi/3887
यापूर्वी टीव्ही चॅनेल, रेडिओ आणि वर्तमानपत्रातून निवडणूक काळात एक्झिट पोल जाहीर करण्यास बंदी असायची. आता सोशल मीडियाचे पेव फुटल्याने मतदारांना प्रभावित करू नये आणि मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून पहिल्यांदाच सोशल मीडियावरही एक्झिट पोल जाहीर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. १४ ते २१ फेब्रुवारी दरम्यान केवळ टीव्ही, केबल चॅनल, वर्तमानपत्र, नियतकालिके आणि चॅनेल जनमत चाचणी जाहीर करता येणार नाही. त्याशिवाय एसएमएस, इंटरनेट, फेसबूक आणि इतर सोशल मीडियावरही एक्झिट पोल जाहीर करण्यास मनाई करण्यात आली आहे. साध्या एसएमएसवरूनही एक्झिट पोल किंवा मतदानाचा निष्कर्ष जाहीर केल्यास आचारसंहितेचा भंग ठरणार आहे. या आठ दिवसाच्या कालावधीत सोशल मीडियावर येणाऱ्या मेसेजवर आयोग बारकाइनं लक्ष ठेवणार आहे. सायबर गुन्हे शाखा आणि तत्सम यंत्रणांच्या सहाय्यानं सोशल मीडियावर वॉच ठेवण्यात येणार असल्याचंही वागळे म्हणाले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹शरद पवार, मुरली मनोहर जोशी यांना पद्मविभूषण जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे ज्येष्ठ मुरली मनोहर जोशी, ज्येष्ठ गायक येसूदास यांना प्रतिष्ठेचा पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याशिवाय लोकसभेचे माजी अध्यक्ष पी. ए. संगमा, सुंदरलाल पटवा (मरणोत्तर) यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने बुधवारी पद्म पुरस्कारांची घोषणा केली.

तर पत्रकार चो रामास्वामी (मरणोत्तर), वैज्ञानिक यूआर राव आणि अध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, महिला कुस्तीपटू साक्षी मलिक, जिम्नॅस्ट दीपा कर्माकर, अंध क्रिकेट संघाचा कर्णधार शेखर नाईक, पॅरा-ऑलिम्पिक विजेती दीपा मलिक, मरियप्पम थांगवेलू, ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल, गायक कैलास खेर, ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी आदींना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

https://t.me/chalughadamodi/3889
केंद्र सरकारने मागील वर्षी ऑनलाईन पद्धतीने पद्म पुरस्कारांसाठीचे नामांकन कौल मागवले होते. यामध्ये शिफारस करण्यात आलेल्या पाच हजार नावांपैकी ५०० नावे अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आली.

पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी:

विश्व मोहन भट्ट ( कला – संगीत )
प्रा. डॉ. देवी प्रसाद द्विवेदी ( साहित्य आणि शिक्षण )
तेहम्तन उद्वाडिया ( वैद्यकीय )
रत्नसुंदर महाराज ( इतर-अध्यात्म )
स्वामी निरंजन नंदा सरस्वती ( इतर-योग )
प्रिन्सेस महा चक्री सिरींधोर्न ( परदेशी ) ( साहित्य आणि शिक्षण ) (थायलंड)
चो रामस्वामी (मरणोत्तर) ( साहित्य आणि शिक्षण, पत्रकारिता )

पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांची यादी खालीलप्रमाणे :

मीनाक्षी अम्मा (मार्शल आर्ट्स)
चिंताकिंदी माल्लेशाम (विज्ञान आणि अभियंता)
दारीपल्ली रमैय्या (सामाजिक कार्य)
बिपिन गणत्र (सामाजिक कार्य)
डॉ. सुनीती सोलोमन (मेडिसीन)
डॉ. सुब्रोतो दास (मेडिसीन)
डॉ. भक्ती यादव (मेडिसीन)
गिरीश भारद्वाज (सामाजिक कार्य)
अनुराधा कोईराला (सामाजिक कार्य)
करीमूल हक (सामाजिक कार्य)
डॉ. मापूसकर (सामाजिक कार्य)(मरणोत्तर)
बलबीर सिंग सीचेवाल (सामाजिक कार्य)
गिनाभाई दर्गाभाई पटेल (कृषी)
शेखर नाईक (क्रीडा)
अनंत अग्रवाल (साहित्य आणि शिक्षण)
दीपा कर्मकार (क्रीडा)
मरियप्पम थांगवेलू (क्रीडा)
सुकरी बोम्मागोवडा (संगीत)
जितेंद्र हरीपाल (संगीत)
इली अहमद (साहित्य)
संजीव कपूर ( पाककला)

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹माऊंट एव्हरेस्टचे होणार पुनर्मापन!

https://t.me/chalughadamodi/3891
वैज्ञानिकांच्या समुदायाने माऊंट एव्हरेस्टच्या उंचीबाबत शंका उपस्थित केल्याच्या पार्श्वभूमीवर ‘सर्व्हे ऑफ इंडिया’ जगातील या सर्वांत उंच शिखराचे पुनर्मापन करणार आहे. यासाठीच्या आवश्यक परवानग्या मिळाल्या असून, लवकरच या कामाला सुरुवात होईल, असे सांगण्यात आले.

दोन वर्षांपूर्वी नेपाळमध्ये झालेल्या ‌शक्तिशाली भूकंपामुळे एव्हरेस्टची उंची कमी झाली असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच या शिखराचे पुनर्मापन करण्यात येणार असल्याचे भारताचे सर्व्हेअर जनरल स्वर्ण सुभा राव यांनी सांगितले. १८५५मध्ये एव्हरेस्टची उंची जाहीर करण्यात आली होती. ‘सर्व्हे ऑफ इंडिया’नुसार ती २९ हजार ०२६ फूट आहे. इतरांनीसुद्धा या शिखराची उंची मोजली आहे, परंतु ‘सर्व्हे ऑफ इंडिया’चे मापच आजही अचूक व प्रमाण मानले जाते, असे राव म्हणाले.

एव्हरेस्टचे पुन्हा माप घेतले जाईल. परराष्ट्र मंत्रालयाकडून यासाठीच्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या असून, महिनाभरात ही मोहीम सुरू करण्यात येईल. या पुनर्मापनाचा शास्त्रीय आणि पर्वतरांगांच्या हालचालींचा अभ्यास करण्यासाठी उपयोग होईल. पुनर्मापनासाठी तब्बल महिनाभर निरीक्षण केले जाईल त्यानंतर मोजणी व तपशील जाहीर करण्यासाठी आणखी १५ दिवस लागतील, असे राव यांनी नमूद केले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹युएई व भारतात "व्यूहात्मक तेलसाठ्या'चा करार

https://t.me/chalughadamodi/3893
भारत व संयुक्त अरब अमिरातीमध्ये तेलाचा व्यूहात्मक साठा करण्यासंदर्भातील अत्यंत संवेदनशील करार झाल्याची घोषणा आज (बुधवार) करण्यात आली.

संयुक्त अरब अमिरातीचे युवराज शेख मोहम्मद बिन झायेद अल-नहयान हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व युवराजांच्या उपस्थितीमध्ये ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. दोन देशांमध्ये एकूण 14 करार करण्यात आले असून द्विपक्षीय संबंधांचे रुपांतर आता "व्यूहात्मक भागीदारी'मध्ये करण्यात आले आहे.

भारताने 2014 मध्ये अबु धाबी राष्ट्रीय तेल कंपनीशी व्यूहात्मक तेल साठ्याची बांधणी करण्यासंदर्भातील चर्चा सुरु केली होती. या करारानुसार आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये या तेलसाठ्यावर भारताचा प्रथम अधिकार असेल. यानंतर संयुक्त अरब अमिरातीस येथून मागणीनुसार तेलपुरवठा करता येईल.

भारताचे तेल मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि अबु धाबी राष्ट्रीय तेल कंपनीच्या प्रतिनिधींनी यासंदर्भातील करारावर औपचारिक स्वाक्षरी केली. भारताच्या इंधन सुरक्षेच्या दृष्टिकोनामधून संयुक्त अरब अमिरातीचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भारतास 2015-16 या वर्षात सर्वाधिक तेल पुरवठा करणाऱ्या देशांमध्ये संयुक्त अरब अमिरातीचे स्थान पाचवे होते. भारताच्या एकंदर परराष्ट्र धोरणामध्ये या देशाचे स्थान अत्यंत संवेदनशील मानले जाते.

""भारताच्या विकास कार्यक्रमामध्ये संयुक्त अरब अमिरातीचा सहभाग आम्ही अत्यंत महत्त्वपूर्ण मानतो. भारतामधील पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात संयुक्त अरब अमिरातीने दाखविलेल्या उत्सुकतेचे मी विशेषत्वाने स्वागत करतो. डिजिटल अर्थव्यवस्था, कुशल मनुष्यबळ आणि स्मार्ट शहरीकरणाच्या उद्देशार्थ आम्ही हाती घेतलेल्या योजनांमध्ये अंतर्भाव असलेल्या अनेक संधींच्या पूर्तीसाठी दोन देश एकत्रित काम करु शकतात,'' असे प्रतिपादन भारतीय पंतप्रधानांनी यावेळी केले.

याचबरोबर मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये मंदिर बांधण्यासाठी जागा दिल्याबद्दलही युवराजांचे आभार मानले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ज्येष्ठांच्या पेन्शन योजनेवर आठ टक्के परतावा

https://t.me/chalughadamodi/3895
ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक सुरक्षितता देण्यासाठी केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेच्या अंतर्गत लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अर्थात ‘एलआयसी’तर्फे दहा वर्षांसाठी आठ टक्के दराने परतावा देण्यात येणार आहे. आर्थिक सर्वसमावेशकता आणि सामाजिक सुरक्षा या उद्देशांच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून कॅबिनेटने निर्णयाला मंजुरी दिली आहे.

सरकारी प्रसिद्धीपत्रकानुसार, या योजनेत करण्यात आलेल्या गुंतवणुकीवर दहा वर्षांसाठी आठ टक्के दराने निश्चित परतावा देण्यात येणार आहे. योजनेंतर्गत दरमहा, तिमाही, सहामाही अथवा वार्षिक पेन्शन मिळवण्याचा पर्याय देण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात एलआयसीतर्फे ही योजना अंमलात येईल. साठ वर्षे किंवा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना शेअर बाजाराच्या अनिश्चिततेचा फटका बसू नये, यासाठी या योजनेतून घसरलेल्या व्याजदराची भरपाईही करण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत एलआयसीला मिळणारे व्याजदर आणि गुंतवणूकदाराला देण्यात परतावा यातील फरकाची भरपाई करण्यासाठी केंद्र सरकार वार्षिक अनुदान देणार आहे. ही योजना लाँच झाल्याच्या तारखेपासून वर्षभरात ज्येष्ठ नागरिक कधीही लाभ घेऊ शकतील.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक डोळ्यांनी पाहता येणार

https://t.me/chalughadamodi/3897
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (आयएसएस) आता उघड्या डोळ्यांनी पाहता येणार आहे, सद्यःस्थितीला पृथ्वीभोवती फिरणारे हे स्थानकच एक कृत्रिम उपग्रह असून, आकाशात तो एखाद्या गडद ठिपक्यासारखा दिसत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. महाराष्ट्रात पाच ठिकाणांवरून आयएसएस दिसणार आहे.

आयएसएस सध्या पृथ्वीपासून केवळ 400 किलोमीटर अंतरावरून फिरत असून, तो सेकंदाला आठ किलोमीटर एवढ्या वेगाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालत आहे. तो दिवसातून 15 वेळा पृथ्वीप्रदक्षिणा करत असल्याने आणि तो पृथ्वीच्या जवळ असल्याने लोक त्याला उघड्या डोळ्यांनीदेखील पाहू शकतात.

यासाठी तुम्ही https://spotthestation.nasa.gov/home.cfm या संकेतस्थळावर जाऊन आपल्या शहराचे नाव टाकून आयएसएस पाहण्याच्या वेळांची माहिती घेऊ शकता. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूर येथून आयएसएस तुम्हाला पाहता येणार आहे. या संकेतस्थळावर तुम्हाला तुमच्या जवळच्या जागांची माहितीही मिळेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या महिन्याच्या अखेरीपर्यंत ही संधी उपलब्ध असेल असे समजते.

कसे ओळखाल आयएसएस
अंतराळ स्थानक हे तुम्हाला एखाद्या विमानासारखेच दिसेल किंवा एखादा मोठा तेजस्वी तारा आकाशातून जाताना दिसतो तसे काहीसे दिसेल. हे विमानापेक्षाही वेगाने जात असले तरी तुम्हाला डोळ्यांनी ते दिसेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹यंदाचा अर्थसंकल्प, आर्थिक सर्वेक्षणही डिजिटल!

नरेंद्र मोदी सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प आणि आर्थिक सर्वेक्षणाच्या कमीत कमी प्रती छापण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ग्रीन’ उपक्रमांतर्गत सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आगामी अर्थसंकल्पाच्या प्रती प्रसारमाध्यमे आणि सर्वसामान्यांना देण्यात येणार नाहीत, हे यातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांना आता अर्थमंत्रालयाच्या वेबसाईटवर अर्थसंकल्प आणि आर्थिक सर्वेक्षणाच्या डिजिटल प्रतींचा आधार घ्यावा लागणार आहे. अर्थ मंत्रालयाने याबाबत केलेल्या तयारीनुसार, या वर्षी अर्थसंकल्प आणि आर्थिक सर्वेक्षणाच्या केवळ ७८८ प्रतींची छपाई करण्यात येणार आहे. त्या केवळ राज्यसभा आणि लोकसभा सदस्यांनाच देण्यात येणार आहेत.

केंद्रीय अर्थसंकल्प आणि आर्थिक सर्वेक्षणाच्या डिजिटल प्रती सभागृहातील पटलावर ठेवल्यानंतर सर्वसामान्यांसह प्रसारमाध्यमांना त्या लगेच वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

 आर्थिक सर्वेक्षण ३१ जानेवारी तर, सर्वसाधारण अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सभागृहात सादर करण्यात येणार आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय २०१४-१५ मध्ये संसदेच्या स्थायी समितीने दिलेल्या सूचनेनंतर घेण्यात आला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प आणि आर्थिक सर्वेक्षणाच्या कमीत कमी प्रती छापण्यात याव्यात, असे समितीने सूचवले होते.

https://t.me/chalughadamodi/3899
केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, २०१६ मध्ये अर्थसंकल्प आणि आर्थिक सर्वेक्षणाच्या प्रतींमध्ये ६० टक्क्यांची कपात करत अर्थसंकल्पाच्या २,०४७ प्रती छापल्या होत्या. तर २०१५ मध्ये एकूण ५, १०० प्रतींची छपाई करण्यात आली होती. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, २०१६ मध्ये एका प्रतीच्या छपाईसाठी केंद्र सरकारने ३ हजार ४५० रुपये खर्च केले होते. तर अर्थसंकल्प आणि आर्थिक सर्वेक्षणाच्या मोफत प्रती सदस्य आणि प्रसारमाध्यमांना दिल्यानंतर अतिरिक्त प्रती अनुदानासहित १५०० रुपयांना लोकसभेच्या खिडकीवरून विकल्या जात होत्या. या दरानुसार अर्थसंकल्पाच्या प्रतींची छपाई करण्यासाठी केंद्र सरकारला गेल्या वर्षी ७० लाखांहून अधिक रुपये खर्च करावे लागले होते.

युद्ध सराव २०१६

युद्ध अभ्यास:- भारत आणि अमरिका

 मैत्री :- पाकिस्तान आणि रशिया

 दोस्तकी :- भारत आणि कझाकिस्तान

मलबार:- भारत , जपान आणि अमरिका

 उलाची प्रिझम:-द. कोरिया आणि अमरिका

शाहीन व्ही :- चीन आणि पाकिस्तान

 सहयोग ही ओब्लेयोग:- भारत आणि द. कोरिया

शक्ती :- भारत आणि फ्रान्स

 डेझर्ट ईगल:- भारत, ईरान आणि अमरिका

 लोमिती;-२:-भारत आणि सेशल्स

इंद्र:- भारत आणि रशिया

गरुडशक्ती:- भारत आणि ईडोनीशीया

सूर्यकिरण:- भारत आणि नेपाळ

कोब्रा गोल्ड:- थायलंड भारत जपान आणि मलेशिया

 वरूण:- भारत आणि फ्रांस

 एकुकोरीन:- भारत आणि मालदी

मित्रशक्ती - भारत आणि श्रीलंका

समप्रिती- भारत आणि बांगलादेश

सिमबेक्स- भारत आणि सिंगापूर

-----------------------------------
जॉईन करा @eMPSCkatta

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹रशियाच्या भारतातील राजदूताचे निधन

रशियाचे भारतामधील राजदूत ऍलेक्झांडर कदाकिन यांचे आज (गुरुवार) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी ट्विटद्वारे यासंदर्भातील माहिती दिली.

""कदाकिन यांच्या रुपाने भारताने आज भारत व रशियामधील द्विपक्षीय संबंधांना गेली काही दशके आकार देणारा ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी गमावला आहे,'' अशा शब्दांत स्वरुप यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कदाकिन हे 2009 पासून रशियाचे भारतामधील राजदूत म्हणून जबाबदारी सांभाळत होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ऑस्ट्रेलियन ओपन: नदाल विरुद्ध फेडररमध्ये फायनल

https://t.me/chalughadamodi/3912
राफेल नदालने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत रविवारी रॉजर फेडरर आणि राफेल नदाल एकमेकांना भिडणार आहेत. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात राफेल नदालने बल्गेरियाच्या ग्रीगॉर दिमीत्रोवचे कडवे आव्हान मोडीत काढले.

सुमारे पाच तास चाललेल्या या सामन्यात दिमीत्रोवने नदालला कडवी झुंज दिली. अखेर नदालने उपांत्य फेरीत दिमीत्रोव्हवर ६-३,५-७,७-६(७/५), ६-७(४/७), ६-४ असा विजय मिळवला. पाच सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात नदालने शेवटच्या सेटमध्ये अगदी मोक्याच्यावेळी कामगिरी उंचावली. दिमित्रोवची सर्विस ब्रेक करत नदाने निर्णायक आघाडी घेतली. दिमीत्रोवने उपांत्य फेरीत नदालला चांगलीच लढत दिली. मात्र, मोक्याच्या क्षणी झालेल्या चुकांमुळे त्याला सामना गमावावा लागला.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹साखरेचे उत्पादन मागील हंगामापेक्षा कमी

https://t.me/chalughadamodi/3914
'आयएसएमए'चा सुधारित अंदाज जाहीर; महाराष्ट्र, कर्नाटकात सर्वाधिक फटका

इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (आयएसएमए) या हंगामात देशातील साखर उत्पादनाचा अंदाज 9 टक्क्यांनी कमी करून 21.3 दशलक्ष टनांवर आणला आहे. याला महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील उत्पादनातील घट कारणीभूत ठरली आहे.
"आयएसएमए'ने जाहीर केलेल्या पहिल्या अंदाजानुसार, देशात 2016-17 या हंगामात (ऑक्टोबर-सप्टेंबर) साखरेचे उत्पादन 23.4 दशलक्ष टन अपेक्षित होते.

 मागील हंगामात ते 25.1 दशलक्ष टन होते. सरकारने या हंगामात साखरेचे उत्पादन 22.5 दशलक्ष टन राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. "आयएसएमए'ने जाहीर केलेल्या सुधारित अंदाजानुसार, या हंगामात साखरेचे उत्पादन 21.3 दशलक्ष टन राहील. "आयएसएमए'ची बैठक आज दिल्लीत झाली. या बैठकीनंतर हा अंदाज जाहीर करण्यात आला. साखरेचे उत्पादन कमी होण्याला उसाचे हेक्टरी कमी झालेले उत्पादन, साखर कारखान्यांचे मंदावलेले गळीत हंगाम, घसरलेला साखर उतारा आणि पाण्याची कमी झालेली उपलब्धता हे घटक कारणीभूत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

महाराष्ट्र व कर्नाटकातील दुष्काळी भागातील काही साखर कारखान्यांनी गळीत हंगाम बंद केले आहेत. उसाचा पुरवठा अपेक्षेपेक्षा कमी झाल्याने त्यांना हा निर्णय घ्यावा लागला आहे. संघटनेने दिलेल्या आकडेवारीनुसार, या वर्षी 15 जानेवारीपर्यंत साखरेचे उत्पादन 10.48 दशलक्ष टन झाले आहे. यात मागील हंगामाच्या तुलनेत 5 टक्के घट झाली आहे. आता दुष्काळी भागातील साखर कारखाने गळीत हंगाम बंद करू लागल्याने ही घट आणखी वाढणार आहे.

उत्तर प्रदेशात चांगले उत्पादन

उत्तर प्रदेशात या वर्षी उसाचे उत्पादन अपेक्षेपक्षा चांगले आहे. यामुळे राज्यातील साखर उत्पादनात आधीच्या अंदाजापेक्षा काही प्रमाणात वाढ होणार आहे. उसाच्या "को0238' या वाणाची लागवड वाढल्याने उत्पादन आणि साखर उताराही वाढल्याने गेल्या हंगामापेक्षा या हंगामात साखरेचे उत्पादन राज्यात अधिक होण्याची शक्यता आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹करचुकव्यांना करणार ‘गार’, १ एप्रिलपासून नवीन कायदा

https://t.me/chalughadamodi/3916
कर चुकवेगिरीवर चाप लावण्यासाठी जनरल अॅन्टी अव्हायडन्स रुल अर्थात ‘गार’ या कायद्याची १ एप्रिल २०१७ पासून अंमलबजावणी होणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्रालयाने केली आहे.

कर चुकवण्यासाठी काही कंपन्या परदेशातून विशेषतः सिंगापूर आणि मॉरिशस यासारख्या देशांमधून गुंतवणूक करतात. व्होडाफोन – हचिसन्स या व्यवहाराच्या वेळी ही बाब प्रकर्षाने समोर आली होती. तेव्हापासून कर चुकवण्यासाठी केलेल्या स्थलांतरावर चाप लावण्यासाठी स्वतंत्र कायदा निर्माण करण्याची गरज भासली. तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या अर्थसंकल्पातून या कायद्याचा उगम झाला होता. मात्र भांडवली बाजारासह अर्थ क्षेत्रातून या कायद्याबाबत नाराजी व्यक्त झाली आणि हा कायदा मागे पडला. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांवरही विपरित परिणाम करू पाहणाऱ्या या कराबाबत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानेही आपल्या शिफारसी पंतप्रधानांना सादर केल्या होत्या. मात्र याबाबत समाधान न झाल्याने अखेर ‘शोम समितीं’ नियुक्त करण्यात आली होती. या कायद्यासाठी आयकर विभागातील कर्मचा-यांना प्रशिक्षण द्यावे लागेल असे या समितीने म्हटले होते. गेल्या वर्षी संसदेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या कायद्याची पुढील वर्षी अंमलबजावणी केली जाईल असे आश्वासन दिले होते.

विचारविनिमय केल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्रालयाने अखेर गार कायद्याची अंमलबजावणी होणार असल्याचे शुक्रवारी जाहीर केले. २०१७ – १८ या आर्थिक वर्षापासून कायदा लागू होईल असे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.

 भारताशिवाय ‘गार’ हा कायदा अन्य देशांमध्येही आधीपासूनच अस्तित्वात आहे. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चीन. दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये हा कायदा अस्तित्वात आहे. ‘गार’ या कायद्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी मेक इन इंडिया या मोहीमेवर परिणाम होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹लवकरच येणार हायपरलूप;
मुंबई-दिल्ली अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ निम्म्याने घटणार

मुंबई-दिल्ली आणि मुंबई-चेन्नई प्रवासासाठी लागणारा वेळ निम्म्याने कमी करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच पाऊल उचलणार आहे. यासोबतच चेन्नई-बंगळुरु आणि बंगळुरु-थिरुअनंतपुरम यांच्या दरम्यानच्या प्रवासासाठी लागणारा वेळदेखील निम्म्याने कमी होणार आहे.

 केंद्र सरकार लवकरच हायपरलूप तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याने प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेत बचत होणार आहे. हायपरलूप तंत्रज्ञानावर आधारित प्रवासाला सुरुवात झाल्यास चेन्नई-बंगळुरु प्रवासासाठी १ तासाऐवजी अवघी २० मिनिटे लागतील. तर बंगळुरु-थिरुअनंतपुरम हे अंतर कापण्यासाठी ७० मिनिटांऐवजी ३० मिनिटे लागणार आहेत.

‘हायपरलूपच्या माध्यमातून १,०८० किलोमीटर प्रतितास वेगाने प्रवास शक्य आहे. हायपरलूपची क्षमता ट्रेनसारखी असली तरी हायपरलूपमधील सोयीसुविधा मेट्रोसारख्या असतात,’ अशी माहिती हायपरलूप वनचे उपाध्यक्ष ऍलन जेम्स यांनी दिली आहे. भारतात पाच मार्गांवर हायपरलूप तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रवासी मार्ग सुरू केला जाणार आहे. याबद्दलची शासकीय प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये हायपरलूप तंत्रज्ञान भारतात आणले जाणार आहे.

‘हायपलूप तंत्रज्ञानातून देशातील शहरांना जोडण्यासाठी संबंधित राज्यांची परवानगी घेण्यात येणार आहे. याविषयी रस्ते वाहतूक मंत्रालयाशी चर्चा करायची आहे. यानंतर आम्ही सरकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊ,’ असे हायपरलूपचे उपाध्यक्ष ऍलन जेम्स यांनी म्हटले आहे. हायपरलूप तंत्रज्ञानावर काम करणारी हायपरलूप वन ही सध्या जगातील एकमेव कंपनी आहे.

काय आहे हायपरलूप तंत्रज्ञान ?

हायपरलूप तंत्रज्ञानामध्ये हवेच्या निर्वात पोकळीतून गतिरोधाशिवाय विशिष्ट वाहनातून प्रवासी किंवा सामानाची ने – आण करणे शक्य होते. यासाठी विशिष्ट प्रकारच्या ट्यूबची (बोगदा) निर्मिती करावी लागते. या ट्यूबमध्ये कॅप्सूलच्या आकाराचे डबे असतात. हे डबे ट्यूबमधील चुंबकीय तंत्रज्ञान असलेल्या रुळांवरुन धावतील. ट्यूबमध्ये हवे प्रतिरोध नसल्याने आणि चुंबकीय तंत्रज्ञानामुळे हे डबे विमानाच्या वेगाने धावू शकतात. एका डब्यामधून २८ ते ३० प्रवासी प्रवास करु शकतात. ३० सेकंदानंतर प्रत्येक कॅप्सूल सोडता येईल असा दावा कंपनीच्या अधिका-यांनी केला आहे. हायपरलूप ट्रेनचा वेग हा ध्वनीच्या वेगाइतका असल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे हायपरलूप कंपनीने भारतात हा प्रकल्प राबवण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे.

हायपरलूपसाठी येणारा खर्च ?

बुलेट ट्रेनसाठी प्रति किलोमीटर २०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर हायपरलूपसाठी प्रति किलोमीटर २६० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पण बुलेट ट्रेनपेक्षा हायपरलूप ट्रेनच्या देखभाल दुरुस्तीवर होणारा खर्च खूप कमी आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलचे खास डुडल

https://t.me/chalughadamodi/3919
भारताच्या ६८ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलने खास डुडल तयार केले आहे. गुगलने डुडलमध्ये एक स्टेडियम दाखवले आहे. या स्टेडियममध्ये लोक भारतीय ध्वजाच्या रंगात उभे आहेत. २६ जानेवारी १९५० रोजी भारतात घटना लागू झाली. या घटनेला ६८ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे गुगलने खास डुडल तयार केले आहे.

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताने घटना स्विकारली. २६ जानेवारी १९५० रोजी भारतात घटना लागू करण्यात आली आणि भारत देश प्रजासत्ताक बनला. तेव्हापासून २६ जानेवारीला देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. १९३० साली २६ जानेवारीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ब्रिटिश राजवटीपासून पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा करत ब्रिटिशांविरोधातील लढा तीव्र केला. त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने याच दिवशी घटना लागू केली आणि भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झाला. भारताची घटना जगातील सर्वात मोठी घटना आहे.

भारताचा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा राजपथावर संपन्न झाला आहे. यामधून भारतातील परंपरा, विविध संस्कृती आणि या वैविध्यातूनही जपली जाणारी एकता यांचा परिचय जगाला मिळाला. संयुक्त अरब अमिरातीच्या १७९ सैनिकांनी केलेले संचलन आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड्सकडून पहिल्यांदाच करण्यात आलेले संचलन यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे वैशिष्ट्य होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारत-यूएई यांच्यात 14 महत्त्वपूर्ण करार

https://t.me/chalughadamodi/3921
भारत-संयुक्त अरब अमिरात (यूएई) यांच्यात बुधवारी संरक्षण, सुरक्षा, माहिती-तंत्रज्ञान सेवा आणि महामार्ग प्रकल्पांबाबत 14 करारांवर स्वाक्षऱया झाल्या. यूएई भारतात पुढील काही वर्षांमध्ये जवळपास 5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास तयार आहे. अबुधाबीचे युवराज शेख मोहम्मद बिन जाएद अल नाहयान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यादरम्यान हैदराबाद हाउसच्या उद्यानात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. 68 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडवेळी मुख्य अतिथी म्हणून सहभागी होण्यासाठी नाहयान हे मंगळवारी दिल्लीत दाखल झाले होते.

युवराज आणि मोदी यांच्यात बुधवारी सकाळी 7 लोक कल्याण मार्गावरील निवासस्थानात देखील बैठक झाली. दुपारी हैदराबाद हाउसमध्ये शिष्टमंडळ स्तरीय चर्चा झाली. यूएई भारताचा चांगला ऊर्जामित्र आहे. दोन्ही देशांमध्ये ऊर्जा आणि गुंतवणुकीवर सकारात्मक चर्चा झाली. आगामी काही वर्षांमध्ये दोन्ही देशांचे नाते आणखी बळकट होईल असे मोदींनी बैठकीनंतर बोलताना सांगितले.

व्यापारी भागीदारी विषयक करारावर स्वाक्षरी झाली आहे. यूएईने भारतासाठी ऊर्जा क्षेत्रात नवे प्रकल्प सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दर्शविला आहे. दोन्ही देशांनी संरक्षणाच्या सहमती करारावर स्वाक्षरी केली. दहशतवादी हल्ल्यांची दोन्ही देश निंदा करतात. दहशतवाद दोघांसाठी धोका असून आम्ही एकत्रितपणे त्याच्याशी लढू. अफगाणिस्तान आणि पश्चिम आशियात सहकार्य वाढवू असे प्रतिपादन मोदींनी केले. अबुधाबीत मंदिर उभारण्यासाठी जागा दिल्याबद्दल मोदींनी युवराजांचे आभार मानले. 26 लाख लोकांसाठी यूएई आपल्या घरासमान असल्याचे वक्तव्यही त्यांनी केले.

6 महामार्ग प्रकल्पात गुंतवणूक
यूएई भारताचा उत्तम व्यापारी भागीदार आहे. दोन्ही देशांदरम्यान पायरेसी, नागरी अणुऊर्जा क्षेत्र, माहिती-तंत्रज्ञान सेवा आणि 6 महामार्ग प्रकल्पांसाठी करार झाला. यूएईला दक्षिण भारतात तेलाचा साठा निर्माण करण्यास सरकारने अनुमती दिली आहे. भारत आणि यूएई आपल्या राजनैतिकांसाठी मोफत व्हिसा प्रवास आणि विशेष पारपत्राच्या सुविधेबाबत काम करत असल्याचे आर्थिक विषयक सचिव अमर सिन्हा यांनी सांगितले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹देशातील भ्रष्टाचारात थोड्या प्रमाणात घट; न्यूझीलंड, डेन्मार्क सर्वाधिक पारदर्शक

https://t.me/chalughadamodi/3923

भारतातील भ्रष्टाचाराचे प्रमाण थोड्या प्रमाणात कमी झाल्याचे एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील अहवालातून समोर आले आहे. बर्लिनस्थित लाचविरोधी संघटनेने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. या यादीत न्यूझीलंड आणि डेन्मार्क या देशांनी संयुक्तपणे पहिला क्रमांक पटकावला आहे. न्यूझीलंड आणि डेन्मार्कमधील भ्रष्टाचाराचे प्रमाण अतिशय कमी आहे.

जागतिक आर्थिक मंच आणि इतर संघटनांकडे असणाऱ्या माहितीच्या आधारे बर्लिनस्थित लाचविरोधी संघटनेने जगातील सर्वाधिक पारदर्शक आणि कमी भ्रष्टाचार असणाऱ्या देशांची यादी तयार केली आहे. ही यादी तयार करताना देशांमधील सार्वजनिक जीवनात नेमका किती भ्रष्टाचार आहे, याचा आढावा घेण्यात आला आहे. भ्रष्टाचार मोजताना ० ते १०० असे गुण देण्यात आले आहेत. शून्य गुण म्हणजे सर्वाधिक भ्रष्टाचार आणि शंभर गुण म्हणजे सर्वाधिक पारदर्शकता असे या गुणांचे स्वरुप आहे.

भारत, चीन आणि ब्राझीलला लाचविरोधी संघटनेने ४० गुण दिले आहेत. त्यामुळे भारतसाह चीन आणि ब्राझीलचा समावेश मध्यम भ्रष्टाचार असलेल्या देशांच्या गटात झाला आहे. २०१५ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात भारताला ३८ गुण मिळाले होते. यंदा त्यामध्ये २ गुणांची वाढ झाली आहे. न्यूझीलंड आणि डेन्मार्क या देशांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. या दोन्ही देशांनी प्रत्येकी ९० गुण मिळवत यादीत अव्वल क्रमांक पटकावला आहे. न्यूझीलंड, डेन्मार्क पाठोपाठ फिनलंड, स्वीडन, स्विझर्लंड, नॉर्वे, सिंगापूर, नेदरलँड आणि कॅनडाचा क्रमांक लागतो. या देशांमधील भ्रष्टाचाराचे प्रमाण अतिशय कमी असल्याचे बर्लिनस्थित लाचविरोधी संघटनेचा अहवाल सांगतो.

सोमालिया देशातील सार्वजनिक जीवनात भ्रष्टाचाराचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे बर्लिनस्थित लाचविरोधी संघटनेच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. याशिवाय सार्वजनिक संस्थांमधील लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या देशांमध्ये सीरिया, दक्षिण सुदान, उत्तर कोरिया, अफगाणिस्तान आणि इराकचा समावेश आहे.

एकाही देशाला भ्रष्टाचार पूर्णपणे मोडून काढता आलेला नाही, हे लाचविरोधी संघटनेच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. यासोबतच जवळपास दोन तृतीयांश देशांना ५० पेक्षा कमी गुणांची कमाई करता आलेली नाही. त्यामुळे जगभरात भ्रष्टाचार मोठी समस्या असल्याचे या अहवालाने अधोरेखित केले आहे. या सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या १७६ देशांची स्थिती विचारात घेता भ्रष्टाचाराची जागतिक सरासरी ४३ इतकी आहे. त्यामुळे भारतातील भ्रष्टाचार हा जागतिक सरासरीपेक्षा जास्त असल्याचे हा अहवाल सांगतो.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹निक्की हेली असणार अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील दूत

निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना केला होता विरोध

https://t.me/chalughadamodi/3925
साउथ कॅरोलिनाच्या भारतीय वंशाच्या गव्हर्नर निक्की हेली संयुक्त राष्ट्रात अमेरिकेच्या दूत असतील. अमेरिकन सिनेटने निक्की यांच्या बाजूने मतदान करत त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. निक्की यांच्या समर्थनार्थ 96 तर विरोधात 4 मते पडली. निक्की यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांना विरोध केला होता. परंतु नंतर त्यांनी ट्रम्प यांना समर्थन केले होते. राष्ट्रीय सुरक्षा आणि अमेरिकन लष्कराबाबत निक्की यांचे विचार रिपब्लिकन पक्षाशी मिळतेजुळते आहेत.

वृत्तसंस्थेनुसार विदेश विषयक 21 सदस्यांच्या सिनेटच्या समितीने मंगळवारी निक्की हेली यांच्या नामनिर्देशनाला आपली मंजुरी दिली. त्या अमेरिकेच्या सर्वोच्च राजनैतिक पदाची जबाबदारी सांभाळण्यासाठी साउथ कॅरोलिनाच्या गव्हर्नरपदाचा राजीनामा देतील. 44 वर्षीय निक्की यांनी व्यापार आणि कामगार मुद्यांवर खूप काम केले आहे. परंतु त्यांना कोणताही राजनैतिक अनुभव नाही.

निक्की यांना मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात ट्रम्प यांच्या भावी प्रशासनाकडून या पदाचा प्रस्ताव देण्यात आला होता, जो नोव्हेंबर अखेरीस त्यांनी स्वीकारला होता. निक्की यांच्या या नियुक्तीमागे ट्रम्प मंत्रिमंडळात लैंगिक आणि जातीय विविधता आणण्याचा उद्देश असल्याचे बोलले जाते.

अमेरिकेच्या विदेश मंत्री म्हणून त्या पहिल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन ठरतील अशी आधी चर्चा होती. ट्रम्प यांच्या हस्तांतरण संघात त्यांचे नाव समाविष्ट होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹2035 पर्यंत खनिज तेल वापरात भारत सर्वोच्च स्थानी

https://t.me/chalughadamodi/3927
खनिज तेलाच्या वापराच्या बाबतीत जपानला मागे टाकत भारत जगातील तिसऱया क्रमांकाचा ग्राहक बनला आहे. 2035 पर्यंत कच्च्या तेलाच्या विक्रीच्या बाबतीत जगातील सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांत भारत पहिल्या स्थानी पोहोचेल असे बीपी या आंतरराष्ट्रीय पातळीवरील ऊर्जा क्षेत्रातील कंपनीने अहवालात म्हटले आहे.

2008 मध्ये उर्जेच्या वापराच्या बाबतीत भारत आशियात दुसऱया स्थानी होता. 2015 मध्ये भारताने जपानला मागे टाकले आणि कच्च्या तेलाच्या विक्रीमध्ये अमेरिका आणि चीननंतर तिसऱया क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे.

 2035 पर्यंत सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांना मागे टाक भारतात तेलाची विक्री मोठय़ा प्रमाणात पोहोचेल. यामध्ये भारतातील उत्पादनात वाढ होण्याबरोबराचे देश आयातीवरही निर्भर राहील. भारत 2030 पर्यंत ऊर्जेच्या वापराच्या बाबतीत चीनलाही मागे टाकेल असे कंपनीच्या अहवालात म्हणण्यात आले आहे.

खनिज तेलाच्या विक्रीच्या बाबतीत 2015 मध्ये 41 लाख बॅरल प्रतिदिनावरून वाढत 2035 पर्यंत 92 लाख बॅरल प्रतिदिनावर पोहोचेल. याचप्रमाणे नैसर्गिक वायूची विक्री 4.9 अब्ज घनमीटरवरून 12.8 अब्ज घनमीटरवर पोहोचेल. कोळशाची विक्री दुप्पट वाढत 83.3 कोटी टनावर पोहोचेल असे म्हणण्यात आले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹टार्गेट आॅलिम्पिक पोडियमच्या प्रमुखपदी अभिनव बिंद्रा

https://t.me/chalughadamodi/3929
बीजिंग आॅलिम्पिकचा सुवर्ण विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याची केंद्र सरकारने पुनर्गठित टार्गेट आॅलिम्पिक पोडियम(टॉप) समितीच्या प्रमुखपदी शुक्रवारी निवड केली. पी.टी. उषा आणि प्रकाश पदुकोण यांचा देखील समितीत समावेश आहे.

बिंद्रा हा मागच्या समितीचा देखील प्रमुख होता पण त्याने २०१६ च्या रिओ आॅलिम्पिकवर लक्ष केंद्रित करण्यासाठी समितीचा राजीनामा दिला होता.
दहा सदस्यांच्या समितीत अन्य दोन खेळाडू नेमबाज अंजली भागवत आणि सिडनी आॅलिम्पिकची कांस्य विजेती कर्णम मल्लेश्वरी यांचा तसेच टेनिस महासंघाचे अध्यक्ष सी. के. खन्ना, बॉक्सिंगमधील प्रशासक के. मुरलीधरन राजा, रेल्वे बोर्डाच्या सचिव रेखा यादव, साईचे कार्यकारी संचालक एस. एस. रॉय, संयुक्त क्रीडा सचिव इंदर धमीीजा आदींचा समावेश आहे.

ही समिती खेळाडू निवडीची पद्धत स्वत: निश्चित करेल. गरज भासल्यास तज्ज्ञांना पाचारण करेल. समितीचा कार्यकाळ एक वर्षाचा असेल. २०२० आणि २०२४ च्या आॅलिम्पिकसाठी पदक विजेत्यांचा शोध घेणे हा टॉपचा उद्देश आहे. ही योजना आधी २०१६ आणि २०२० च्या आॅलिम्पिकला डोळ्यापुढे ठेवून आखण्यात आली होती

उत्तरे:
विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा (२९ जानेवारी) चालू घडामोडी:-
---------------------------------------------------

१) रा.चि ढेरे यांनी कोणते ग्रंध लिहिले आहेत ? :-१) चक्रपाणी २) त्रिविध ३) लज्जा गिरी

२)जम्मू आणि काश्मीर च्या पहिल्या मुख्यंमंत्री कोण?:- मेहबुबा मुफ्ती

३) हरियाणातील आंतर्राष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा सध्या --------- या नावाने ओळखला जातो:- गुरुग्राम

४)अनवस्र तंत्रज्ञान नियंत्रण नियम(एम.टी.सी.आर) गटबाबत:-
* जून २०१६ मध्ये भारत या गटाचा सदस्य झाला
* या गटात ३५ राष्ट्रे सभासद आहे
* प्रथमच भारताचा समावेश अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्यात नियंत्रण गटात झाला आहे
* क्षेपनाश्रे आणि वैमाणिक विरहीत विमानाच्या तंत्रज्ञान प्रसारावर नियंत्रण ठेवणे हा या गटाचा सर्वात मुख्य उद्देश आहे

५)ऑल्वीन टाॅफलर यांनी कोणते ग्रंध लिहिले :- १)फ्युचर शाॅक २) पाॅवर शिफट ३) थर्ड वेव्ह

६) ८८ व्या अकादमी अवार्ड मध्ये आॅस्कर पारितोषिक विजेते चित्रपट व त्यांचे प्रकार :-
सर्वोत्कृष्ट परकीय भाषा चित्रपट:-सन ऑफ साॅल
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघु चित्रपट:-बेअर स्टोरी
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर :-इंनसाईड आऊट
सर्वोत्कृष्ट अनुबोध:-एमी

७)आय.एस.आर ओ म्हणजे :-इंडीयन स्पेस रिसर्च आॅरगनायझेशन

८) २०१४ ते २०१६ या कालावधीत कोलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण होते:- डॉ मंजुळा चेल्लूर

९) जुलै २०१६ मध्ये कोणी आपल्या राज्य सभा सदस्यत्वचा राजीनामा दिला :- नवज्योतसिग सिधु

१०) भारतातील कोणते राज्य सन २०१५ मध्ये सेंद्रीय राज्य म्हणून घोषित केले गेले :सिक्कीम

११) सुंदरबन :-
* ते भारत आणि बांगलादेशात पसरलेला आहे
* २४ परगणा (दक्षीन)वन विभाग  सुंदरबनचा भाग आहे

१२) दि २१.१०२०१५ रोजी झालेले २०१२-१३ ची शिवछत्रपती पारितोषिक :-
जीवनगौरव:-रमेश विपट
नेमबाजी :-राही सरनोबत
जिमनॅस्टीक:-रोमा जोगळेकर
जिजामाता:-नंदिनी बोंगाडे

१३) युरोपियन युनीयनचे मुख्यालय ब्रुसेल्स येथे आहे
court ऑफ जस्टीस व युरोपियन कमिशन ह्या रोपियन युनीयन च्या उपसंस्था आहेत

१४) योग्य कधने
* रीओ ओल्य्म्पिीक मध्ये सामन्यांच्या उद्घाटन सभारभात हवामान बदल या विषयावर चर्चा करण्यात आली
* ३१ व्या स्पर्धा ब्राझील मध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या

१५) तेजस :-(योग्य विधाने)
* स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान आहे
* इ.स. २००३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी तेजस असे नामकरण केले
* त्याचा पल्ला ३००० की.मी आहे

१६) रामचंद्र चिंतामण ढेरे :-(योग्य विधान)
* त्यानी लोकसाहित्य ,प्राचीन ,साहित्य यांचा अभ्यास केला
* साहित्य विशारद आणी राष्ट्र भाषा प्रवीण या परीक्षा ते उतीर्ण झाले
* साहित्य अकादमी पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले
* श्री नृसिह -उदय आणि विकास या त्यांच्या अखेरच्या पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वी त्यांचा मृत्यू झाला

Source: स्टडी सर्कल फेसबुक पेज

जॉईन करा @ChaluGhadamodi

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा