Post views: counter

Current Affairs June 2017 Part- 3 ( चालू घडामोडी )

🔹समाजवादी नेते प्रा. गोपाळ दुखंडे यांचं निधन

ज्येष्ठ समाजवादी नेते प्रा. गोपाळ दुखंडे यांचं 13 जून रोजी सावंतवाडी इथं निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. दुखंडे यांच्या निधनामुळं महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी चळवळीतील एक झंझावात शांत झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

समाजवादी वर्तुळात 'सर' म्हणून परिचित असलेल्या दुखंडे यांच्यावर डॉ. राममनोहर लोहिया यांच्या विचारांचा पगडा होता. त्या विचारसरणीशी प्रामाणिक राहून दुखंडे यांनी कोकणासह महाराष्ट्रात वंचितांच्या हक्कांसाठी अनेक लढे दिले. नाईट स्कूलच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा असो, विना अनुदानित शिक्षकांचा लढा असो, कोकणातल्या बेरोजगार तरुणांची जनाधिकार परिषद असो, कोकणातला राजकीय दहशतवाद मोडून काढण्यासाठी १९९५ साली मालवण विधानसभा मतदार संघात दिलेली लढाई असो. अतिशय नीडरपणे त्यांनी लोकलढ्यांचे नेतृत्व केले.


कोकणातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी ते अखेरपर्यंत प्रयत्नशील होते. त्यासाठी त्यांनी मुंबई विद्यापीठात ग्रामीण विकासाचा अभ्यासक्रम सुरू करण्यात पुढाकार घेतला. सामाजिक कार्यातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.

🔹वनहक्कांच्या अमलात गडचिरोली टॉप

वनसंसाधनांचे हक्क स्थानिक समुदायाला देणे आणि वनहक्क कायद्याची अंमलबजावणी, अशा दोन्ही क्षेत्रांत गडचिरोलीने राज्यात बाजी मारली आहे. एकूण क्षमतेच्या ६६ टक्के वनहक्कांची अंमलबजावणी गडचिरोलीने केली आहे. याउलट, राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये या कामात एक टक्का उद्दिष्ट गाठण्यातही यश आले नसल्याची माहिती पुढे आली आहे.

वन हक्क कायदा- २००६ च्या राज्यभरात होत असलेल्या अंमलबजावणीचा आढावा घेणारा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. मागील दहा वर्षांत महाराष्ट्राने या क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा या अहवालातून मांडण्यात आला आहे. वनहक्कांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या राज्यभरातील नामवंत स्वयंसेवी संघटना आणि कार्यकर्त्यांनी हा अहवाल तयार केला आहे. टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स तसेच बंगलोरच्या अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी अॅण्ड एन्व्हायरमेंट या संस्थांची मदतही या कामाकरिता घेण्यात आली आहे. स्थानिक समुदायांना वनोपजांचा उपयोग करता यावा, यासाठी वनहक्क कायद्यात तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीचे पालन राज्यात कशा प्रकारे झाले, याची माहिती या अहवालातून मांडण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्था तसेच शासकीय यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

वन हक्क कायद्यान्वये ग्रामसभांना स्थानिक संसाधनांवर हक्क प्रदान करण्यात आले आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीत गडचिरोलीने सर्वात चांगली कामगिरी केली आहे. संसाधन हक्कांच्या एकूण क्षमतेपैकी ६६ टक्क्यांपेक्षा जास्त काम गडचिरोलीने केले आहे. त्यापाठोपाठ, नागपूर आणि नांदेड या दोन जिल्ह्यांचा क्रमांक असून त्यांनी ३३ टक्के ते ६६ टक्के इतके काम केले आहे. अहमदनगर, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, गोंदिया, जळगाव, नंदूरबार, नाशिक, ठाणे आणि यवतमाळ येथे शून्य ते ३३ टक्के अंमलबजावणी झाली आहे. मात्र, राज्यातील २१ जिल्हे मात्र सामूहिक वनहक्कांच्या अंमलबजावणीत संपूर्ण अपयशी ठरले असल्याची आकडेवारी या अहवालातून मांडण्यात आली आहे.

🔹प्रतिनाटो’मध्ये भारत

शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’मधील (एससीओ) भारताच्या प्रवेशाची औपचारिकता पूर्ण झाली आहे. चीनचा प्रभाव असणाऱ्या या लष्करी संघटनेमध्ये भारताचा प्रवेश महत्त्वपूर्ण असून, काही वर्षांमध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखालील ‘नाटो’ला पर्याय म्हणून ही संघटना पुढे आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ‘एससीओ’ची स्थापना सन २००१मध्ये करण्यात आली असून, त्यानंतर प्रथमच या संघटनेचा विस्तार करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानच्या प्रवेशासाठी प्रक्रिया राबविण्यात येत होती. पाकच्या प्रवेशासाठी चीन प्रयत्नशील होता, तर रशियामुळे भारताला प्रवेश मिळाला आहे. ‘हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा क्षण आहे,’ अशी प्रतिक्रिया कझाकस्तानचे अध्यक्ष नूरसुलतान नाझरबायेव्ह यांनी दिली.

सहकार्य वाढणार

खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या आयातीमध्ये भारताचा खूप वरचा क्रमांक असून, मध्य आशियातील पाचही देशांमध्ये नैसर्गिक वायू व खनिज तेलाचे मुबलक साठे आहेत. त्यामुळे ‘एससीओ’तील सहकार्याबरोबर इंधनाच्या पुरवठ्यातील सहकार्यामध्येही वाढ होण्यास मदत होणार आहे. रशियातील उफामध्ये जुलै २०१५मध्ये झालेल्या परिषदेमध्ये भारत आणि पाकिस्तान यांना पूर्ण वेळ सदस्य देण्याविषयीची प्रक्रिया सुरू झाली. दोन वर्षांच्या प्रशासकीय प्रक्रियांनंतर हा प्रवेश निश्चित झाला आहे.

>> ‘एससीओ’तील संस्थापक सदस्य : चीन, रशिया, कझाकस्तान, किरगिजस्तान, तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान

>>४० टक्के
भारताच्या प्रवेशानंतर, जगाच्या तुलनेत ‘एससीओ’च्या सदस्य देशांमधील लोकसंख्या

>>२० टक्के
जगाच्या तुलनेत ‘एससीओ’तील देशांचा जीडीपी

🔹५०० रुपयांच्या नव्या नोटा चलनात

नोटाबंदीनंतर पाचशे व दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात येऊन काही महिने उलटत नाहीत तोच, रिझर्व्ह बँकेनं पाचशेच्या नव्या नोटा चलनात आल्या आहेत. अर्थात, या नव्या नोटांमध्ये केवळ एका अक्षराचा बदल करण्यात आला आहे. या नोटांसोबत सहा महिन्यांपूर्वीच्या जुन्या नोटाही चलनात राहणार आहेत, असं आरबीआयनं स्पष्ट केलं आहे.

पाचशे रुपयांच्या आधीच्या नोटांवरील नंबर पॅनलमध्ये '' हे इंग्रजी अक्षर आहे. त्याजागी आता '' अक्षराची नवी बॅच चलनात दाखल झाली आहे. नव्या नोटांच्या डिझाइनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर डॉ. उर्जित पटेल यांचं हस्ताक्षर असलेल्या या नव्या नोटांची छपाई २०१७ या आर्थिक वर्षातली आहे.

🔹औद्योगिक उत्पादन घसरले

कारखानदारी क्षेत्राने निराशा केल्यामुळे औद्योगिक उत्पादन एप्रिल महिन्यात पुन्हा एकदा घसरले आहे. औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक (आयआयपी) एप्रिल महिन्यात घसरून ३.१ टक्क्यांवर आला आहे. कारखानदारी क्षेत्राबरोबरच खनिकर्म व ऊर्जा क्षेत्रानेही निराशा केली आहे. यंत्रसामग्री व ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रांची कामगिरीही फारशी चांगली झालेली नाही. ही माहिती केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने (सीएसओ) सोमवारी प्रसिद्ध केली.

गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात आयआयपी ६.५ टक्के होता. त्यात यंदा मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. सीएसओ कार्यालयाने मार्च महिन्यासाठी आयआयपीचा वाढदर २.७ टक्क्यांवरून ३.७५ टक्क्यांवर नेला आहे. ३.७५ टक्के वाढ गृहित धरल्यास यंदा एप्रिलमध्ये औद्योगिक वाढीत घसरण दिसून आली आहे. आयआयपीमध्ये सर्वाधिक ७७.६३ टक्के वाटा असलेल्या कारखानदारी क्षेत्रात एप्रिल महिन्यात २.६ टक्के वाढ झाली आहे. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात ही वाढ ५.५ टक्के होती. खनिकर्म क्षेत्रात गेल्यावर्षीच्या ६.७ टक्के वाढीच्या तुलनेत यंदा ४.२ टक्केच वाढ दिसून आली आहे. एप्रिल २०१६मध्ये वीज क्षेत्रात १४.४ टक्के इतकी मोठी वाढ झाली होती. त्या तुलनेत यंदा ५.४ टक्केच वाढ होऊ शकली आहे.

८.१ टक्के वाढीची नोंद करणाऱ्या यंत्रसामग्री क्षेत्राने केवळ १.३ टक्के वाढ नोंदवली आहे. ग्राहकोपयोगी वस्तूंची वाढही घसरली असून १३.८ टक्क्यांच्या तुलनेत फक्त ६ टक्के वाढ नोंदवली आहे.

उद्योगांची संमिश्र वाढ

मुख्य २३ औद्योगिक गटांपैकी १४ गटांनी एप्रिल महिन्यात वाढ नोंदवली आहे. यामध्ये औषधनिर्मिती तसेच वैद्यकीय, रासायनिक व जैविक उत्पादनांनी सर्वाधित २९.१ टक्के वाढ नोंदवली आहे. त्याखालोखाल तंबाखु उत्पादनांची १७.९ टक्के तर यंत्रे व उपकरणे निर्मिती उद्योगाची ९.५ टक्के वाढ झाली आहे. पेयनिर्मितीमध्ये १९.२ टक्के घट, वाहन निर्मितीमध्ये १५.६ टक्के घट, तसेच विद्युत उपकरणांच्या निर्मितीत १४.४ टक्के घसरण दिसून आली आहे.

🔹नदालचे दहावे विजेतेपद

स्पेनच्या रफाएल नदालने रविवारी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत इतिहास घडविला. पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत नदालने स्वित्झर्लंडच्या स्टॅन वॉवरिन्कावर ६-२, ६-३, ६-१ असा सरळ सेटमध्ये विजय नोंदवून जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या स्पर्धेतील नदालचे हे दहावे जेतेपद ठरले. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच टेनिसपटू ठरला.

जागतिक क्रमवारीत ३१ वर्षीय रफाइल नदाल चौथ्या, तर ३२ वर्षीय स्टॅन तिसऱ्या क्रमांकावर आहे. यापूर्वी हे दोघे अठरा वेळा आमनेसामने आले होते. त्यात पंधरावेळा नदालने, तर तीनदा स्टॅनने बाजी मारली होती. २०१४मध्ये स्टॅनने नदालला हरवून ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली होती. अर्थात, या वेळीही नदालला हरवून आणखी एक ग्रँड स्लॅम जेतेपद स्टॅन पटकाविणार की, ‘क्ले किंग’ नदाल दहाव्यांदा ही स्पर्धा जिंकणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोचली होती. पहिल्या सेटमध्ये सुरुवातीला दोघांत चुरस पाहायला मिळाली. चौथ्या गेमअखेर दोघांत २-२ अशी बरोबरी होती. मात्र, त्यानंतर नदालने लौकिकाला साजेसा खेळ करत सलग चार गेम जिंकून पहिल्या सेटमध्ये बाजी मारली.

दुसऱ्या सेटमधील दुसऱ्याच गेममध्ये नदालने स्टॅनची सर्व्हिस भेदली आणि त्यापाठोपाठ सर्व्हिस राखत ३-१ अशी आघाडी घेतली. पाहता पाहता नदालने या सेटमध्ये ५-२ अशी आघाडी घेतली. आठव्या गेममध्ये स्टॅनने सर्व्हिस राखली. अर्थात, सेटमध्ये आव्हान राखण्यासाठी स्टॅनला नदालची सर्व्हिस भेदण्याची आवश्यकता होती. मात्र, नवव्या गेममध्ये बाजी मारत नदालने दुसरा सेटही जिंकला.
तिसऱ्या सेटमध्ये नदालने धडाक्यात सुरुवात केली. नदालने पहिल्याच गेममध्ये स्टॅनची सर्व्हिस भेदली. त्यापाठोपाठ सर्व्हिस राखत नदालने २-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर पाचव्या गेममध्येही नदालने स्टॅनची सर्व्हिस भेदली आणि त्यापाठोपाठ सर्व्हिस राखत नदालने ५-१ अशी आघाडी घेतली. आव्हान राखण्यासाठी स्टॅनला सातव्या गेममध्ये सर्व्हिस राखणे गरजेचे होते. मात्र, नदालने ४०-१५ अश आघाडीसह दोन मॅच पॉइंट मिळविले. त्यातील एक पॉइंट स्टॅनने वाचविला. मात्र, त्यानंतर पॉइंट घेत नदालने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. २ तास पाच मिनिटे ही लढत चालली.

▪️खेळ आकड्यांचा...

१५ – नदालचे हे पंधरावे ग्रँड स्लॅम जेतेपद ठरले. यासह नदालने महान टेनिसपटू पीट सॅम्प्रास यांना मागे टाकले. पीट सॅम्प्रास यांनी एकेरीची चौदा ग्रँड स्लॅम जेतीपदे पटकावली आहेत. पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपदांचा विक्रम स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररच्या नावावर आहे. फेडररने १८ ग्रँड स्लॅम जेतीपदे पटकावली आहेत. त्यापाठोपाठ आता दुसऱ्या क्रमांकावर नदाल (१५ विजेतीपदे), तिसऱ्या क्रमांकावर सॅम्प्रास (१४) आहेत.

१० – नदालने दहाव्यांदा फ्रेंच ओपनच्या पुरुष एकेरीचे जेतेपद मिळविले. अशी कामगिरी करणारा नदाल एकमेव खेळाडू आहे. नदालने २००५, ०६, ०७, ०८, २०१०, ११, १२, १३, १४ आणि आता २०१७मध्ये ही स्पर्धा जिंकली.

२ – एकाच ग्रँड स्लॅम स्पर्धेत एकेरीचे दहा किंवा त्याहून अधिकवेळा जेतेपद पटकाविणारा रफाएल नदाल दुसराच टेनिसपटू ठरला. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या मार्गारेट कोर्ट यांनी अकरावेळा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली होती. १९६० ते १९७३दरम्यान त्यांनी हा पराक्रम केला होता. त्यानंतर प्रथमच टेनिसपटूने दहा वेळा एकाच ग्रँड स्लॅम स्पर्धेतील एकेरीचे जेतेपद मिळविले.

१५ – नदालचे हे पंधरावे ग्रँड स्लॅम जेतेपद ठरले. यासह नदालने महान टेनिसपटू पीट सॅम्प्रास यांना मागे टाकले. पीट सॅम्प्रास यांनी एकेरीची चौदा ग्रँड स्लॅम जेतीपदे पटकावली आहेत. पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपदांचा विक्रम स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररच्या नावावर आहे. फेडररने १८ ग्रँड स्लॅम जेतीपदे पटकावली आहेत. त्यापाठोपाठ आता दुसऱ्या क्रमांकावर नदाल (१५ विजेतीपदे), तिसऱ्या क्रमांकावर सॅम्प्रास (१४) आहेत.

१० – नदालने दहाव्यांदा फ्रेंच ओपनच्या पुरुष एकेरीचे जेतेपद मिळविले. अशी कामगिरी करणारा नदाल एकमेव खेळाडू आहे. नदालने २००५, ०६, ०७, ०८, २०१०, ११, १२, १३, १४ आणि आता २०१७मध्ये ही स्पर्धा जिंकली.

२ – एकाच ग्रँड स्लॅम स्पर्धेत एकेरीचे दहा किंवा त्याहून अधिकवेळा जेतेपद पटकाविणारा रफाएल नदाल दुसराच टेनिसपटू ठरला. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या मार्गारेट कोर्ट यांनी अकरावेळा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली होती. १९६० ते १९७३दरम्यान त्यांनी हा पराक्रम केला होता. त्यानंतर प्रथमच टेनिसपटूने दहा वेळा एकाच ग्रँड स्लॅम स्पर्धेतील एकेरीचे जेतेपद मिळविले.

🔹जितू राय-हीना सिद्धूला सुवर्ण

10 मी. एअर पिस्तुल मिश्र सांघिक नेमबाजीत रशियावर मात, फ्रान्सला कांस्य
वृत्तसंस्था / गॅबाला, अझरबैजान
भारताच्या जितू राय व हीना सिद्धू यांनी येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजीतील मिश्र सांघिक 10 मी. एअर पिस्तुल गटात सुवर्णपदक मिळविताना रशियाच्या जोडीवर 7-6 अशी निसटती मात केली.

फ्रान्सने इराणचा 7-6 अशाच फरकाने पराभव करून कांस्यपदक पटकावले. यग स्पर्धेच्या चौथ्या दिवशी सकाळी जितू व हीना दोघांनाही वैयक्तिक 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. पात्रता फेरीत त्यांनी अनुक्रमे 12 व नववे स्थान मिळविले. पहिल्या आठ स्पर्धकांनाच अंतिम फेरीत स्थान दिले जाते. यावषी विश्वचषक स्पर्धेच्या मिश्र सांघिक नेमबाजीतील पदके विचारात घेतली जात नसली तरी 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये या क्रीडा प्रकाराचा समावेश करण्याला मंजुरी मिळाली आहे.

जितू व हीना यांनी दोघांनी मिळून मिळविलेले विश्वचषकातील हे दुसरे सुवर्णपदक आहे. या वषीच्या प्रारंभी दिल्लीत झालेल्या टप्प्यात त्यांनी सुवर्ण जिंकले होते. चीनने पदकतक्त्यात आघाडीचे स्थान मिळविले असून त्यांनी 3 सुवर्णपदकांसह एकूण 6 पदके मिळविली आहेत.

45 देशांतील 430 स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले असून आयएसएसएफ विश्वचषक अंतिम स्पर्धेसाठी पात्रता मिळविण्याची रायफल व पिस्तुल नेमबाजांसाठी ही शेवटची स्पर्धा आहे. या स्पर्धेत जगातील आठ सर्वोत्तम नेमबाज एकमेकांशी स्पर्धा करताना दिसतील. त्यात विद्यमान ऑलिम्पिक व वर्ल्ड चॅम्पियनशिप पदकविजेते आणि वाईल्डकार्ड प्रवेशधारकांचा समावेश असेल.

🔹ज्येष्ठ तेलुगू कवी नारायण रेड्डी यांचे निधन

ज्येष्ठ तेलुगू कवी, लेखक आणि ज्ञानपीठ विजेते सी. नारायण रेड्डी (वय 85) यांचे 12 जून 2017 रोजी निधन झाले. रेड्डी हे सीनारे या नावानेच प्रसिद्ध होते. त्यांच्या मागे चार मुली असा परिवार आहे. रेड्डी हे आधुनिक तेलुगू लेखक होते त्याचप्रमाणे ते बहुश्रुत कवी, तेलुगू चित्रपटाचे गीतकार, शिक्षणतज्ज्ञ होते.

रेड्डी यांच्या विविध कविता, चित्रपट संगीत, नाटकांची गाणी, गझल याच्यासह 80 साहित्यकृती प्रसिद्ध झाल्या आहेत. रेड्डी यांनी चित्रपटांसाठी 3500 गाणी लिहिली आहेत. त्यांची तब्येत बिघडल्याने पहाटे तीन वाजता त्यांना मनिकोंडा येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

रेड्डी यांचा जन्म 29 जुलै 1931 मध्ये करीमनगर जिल्ह्यातील हनुलजीपेटा या दुर्गम गावात झाला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे उर्दू माध्यमातून झाले होते. तरुणपणीच्या काळात त्यांचा रोमॅंटिक तेलुगू कवींमध्ये समावेश होता. 1980 मध्ये "विश्वंभर' नावाने त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यांना 1977 मध्ये पद्मश्री मिळाली होती, तर 1992 मध्ये पद्मविभूषण देण्यात आले होते.

चिनाब नदीवर उभा राहतोय आयफेल टॉवरपेक्षाही उंच रेल्वे पूल


        जगातील सर्वात उंच रेल्वे पूल भारतातील चिनाब नदीवर बांधला जात असून त्याची उंची पॅरिसमधील प्रसिद्ध आयफेल टॉवरपेक्षाही जास्त असणार. या पूलाची उंची 359 मीटर असणार आहे. हा रेल्वे पूल आयफेल टॉवरपेक्षाही 30 मीटर उंच असणार आहे. जम्मू काश्मीरमधील चिनाब नदीवर या पुलाचं काम सुरु आहे. रेआसी जिल्ह्यात बांधकाम सुरु असलेला हा पूल जून 2019 पर्यंत पुर्णपणे तयार असेल. पुलाचं 66 टक्के काम पुर्ण झालं आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये ३२६ किलोमीटरचा उधमपुर-श्रीनगर-बारामुला रेल्वे जोडणी प्रकल्प सुरु आहे. चिनाब नदीवरील सर्वात उंच रेल्वे पुल साकारण्याचे काम कोकण रेल्वेकडून केले जात आहे.

       चिनाब नदीवरील हा पुल जम्मू आणि श्रीनगरला जोडणारा सर्वात महत्वाचा दुवा मानला जातो. अशा या पुलाचे काम २00२-0३ पासून सुरु करण्यात आले. नदीच्या तळापासून ३५९ मीटर उंचीवर पुल साकारताना कोकण रेल्वेला मोठे आव्हान स्वीकारावे लागत असल्याचे कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी सांगितले आहे. आयफेल टॉवरची उंची ही ३२४ मीटर तर कुतूबिनारची उंची ही ७२ मीटर एवढी आहे. त्यामुळे जगातील सर्वात उंच असा पुल बांधण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी केला.

        चिनाब नदीवरील 1.3 किमी लांबीच्या या पुलासाठी एकूण 1,250 कोटींचा खर्च येणार असल्याचं कोकण रेल्वेचे मुख्य अभियंता आर के सिंग यांनी सांगितलं आहे. हा पूल 2019 पर्यंत तयार व्हावा यासाठी 1300 कामगार आणि 300 इंजिनिअर्स दिवसरात्र मेहनत करत असल्याचंही त्यांनी सागितलं आहे.

      2004 रोजी या पुलाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र 2008-09 रोजी परिसरात जोराचे वारे वाहत असल्याने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काम थांबवण्यात आलं होतं. प्रती तास 100 किमी वेगाने वाहणा-या वा-याचा विचार करता रेल्वेने पूल बांधण्यासाठी चिनाब नदीवरच दुसरी जागा शोधण्यास सुरुवात केली होती. मात्र शेवटी हीच जागा योग्य असल्याचं ठरलं अशी माहिती उपमुख्य अभियंता आर आर मलिक यांनी दिली आहे.

   हा पूल उभारल्यानंतर त्याला असणारा दहशतवाद्यांकडून धोका पाहता कोकण रेल्वेने सुरक्षेच्या दृष्टिने अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. पुलाच्या बांधकामात उच्च दर्जाची सामुग्री वापरण्यात आली असून ४0 किलोग्रॅम आरडीएक्स किंवा टीएनटीसारखे भयंकर स्फोटके वापरुन स्फोट घडविल्यासही पुलाला फारसा धक्का लागणार नाही आणि या पुलावरुन ट्रेन सुखरुप धावू शकेल, याची खबरदारी घेण्यात आल्याचे कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी सांगितले. चिनाब नदीवर बांधण्यात येणारा पुल २0१८-१९ पर्यंत पूर्ण होईल.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹स्थलांतरात भारत पहिल्या क्रमांकावर

अन्य देशांमध्ये स्थलांतर करणाऱ्या नागरिकांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. १.५६ कोटी भारतीय परदेशात राहत असल्याची बाब प्यू रिसर्चच्या अहवालातून समोर आली आहे. जागतिक लोकसंख्येच्या ३.३ टक्के लोक आंतरराष्ट्रीय प्रवासी असल्याचेही यात म्हटले आहे. इतर देशाच्या तुलनेत अमेरिकेत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय स्थलांतरित नागरिक राहतात.

आंतरराष्ट्रीय प्रवासी दिवसाच्या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी जाहीर करण्यात आली असून, यात म्हटले आहे की, २०१५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, ३५ लाख भारतीय संयुक्त अरब अमिरातमध्ये राहतात. स्थलांतरित राहत असलेला हा जगातील सर्वात मोठा दुसरा भाग आहे. मेक्सिको - अमेरिकेशिवाय संयुक्त अरब अमिरात आणि पार्शियन खाडीत अन्य देशांत राहणाऱ्या भारतीयांची संख्या गत दशकात वाढली आहे.

१९९० मध्ये ही संख्या २० लाख होती, २०१५ मध्ये ८० लाख झाली. लेखक फिलिप कोनोर यांनी म्हटले आहे की, तेलाने समृद्ध असलेल्या या भागात बहुतांश लोक उत्पन्नाच्या आशेने गेलेले आहेत.

- जगातील सर्व आंतरराष्ट्रीय स्थलांतरित एकाच देशात राहिले असते, तर तो जगातील पाचवा सर्वात मोठा देश असला असता.
- या देशात २४.४ कोटी नागरिक असले असते. जगातील आंतरराष्ट्रीय स्थलांतरित नागरिकांची संख्या आज
जगाच्या एकूण संख्येच्या ३.३ टक्के आहे.
- स्थलांतरित नागरिकांच्या मूळ देशाच्या यादीत भारत 1.56 कोटी संख्येने पहिल्या क्रमांकावर आहे.
- मेक्सिको 1.23कोटी
- रशिया 1.06कोटी
- चीन 95 लाख
- बांगलादेश 72 लाख
- इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे ४.६६ कोटी स्थलांतरित नागरिक राहतात.
- जर्मनीत १.२ कोटी, रशिया १.१६ कोटी, सौदी अरेबियात १.०२ कोटी, तर इंग्लंडमध्ये ८५ लाख स्थलांतरित नागरिक राहतात.

आयएनएस चेन्नई';-
---------------------

* दि. 18 नोव्हेंबर 2016 रोजी 'आयएनएस चेन्नई' (INS Chennai) ही विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. 'मेक इन इंडिया' कार्यक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेल्या या विनाशिकेमध्ये शत्रूचा लांब पल्ल्याचा मारा परतवून लावण्याची क्षमता आहे.

* देशातील पहिलीच आधुनिक यंत्रणेसह सज्ज असलेली ही विनाशिका प्रोजेक्‍ट 15 (अ) मध्ये कोलकाता क्‍लासमधील शेवटची विनाशिका आहे. 2006 मध्ये बांधणीस सुरुवात करण्यात आलेही ही विनाशिका माझगाव डॉकने दि. 31 ऑगस्ट 2016 रोजी नौदलाकडे सुपूर्द केली.

* संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या मदतीने विनाशिकेवर आधुनिक शस्रे तैनात करण्यात आली आहेत. विनाशिकेवरील ब्राह्मोस क्षेपणास्रामुळे लांब पल्ल्याचा मारा तसेच पाणी व हवेतून मारा करण्याची क्षमता या विनाशिकेमध्ये आहे.

* शत्रूंना चकवा देण्यासाठी विनाशिकेवर खास 'कवच' बसवण्यात आले असून या कवचामुळे युद्ध नौका तसेच जहाजांवर होणारा हल्ला दुसऱ्या दिशेला वळवणे शक्‍य होणार आहे. अशा प्रकारची चार कवचे या विनाशिकेवर आहेत. त्यात छोटी क्षेपणास्र असून पडल्यानंतर ते ढगासारखे बनतात. शिवाय विनाशकेवर दोन हेलिकॉप्टरदेखील तैनात करण्यात आली आहेत.

* विनाशिकेत नौसैनिकांसाठी खास स्वयंपाक घर आहे. हे स्वयंपाक घर 24 तास सुरू राहणार असून त्यामध्ये तासाला 800 ते 900 चपात्या आणि आणि डोसा बनविण्याचे यंत्र बसविण्यात आले आहे. नौसैनिकांसाठीचे खाद्यपदार्थ हे खाद्यतज्ज्ञांच्या सल्ल्याने दिले जाणार आहेत.
विनाशिकेची लांबी 164 मीटर असून वजन 7 हजार 500 टन इतके आहे तसेच विनाशिकेवर 350 नौसैनिक आणि 30 अधिकारी यांच्या राहण्याची व्यवस्था आहे.

* प्रमुख भारतीय युद्धनौका
आयएनएस अरिहंत
आयएनएस सिंधुरक्षक
आयएनएस विक्रमादित्य
आयएनएस विराट
आयएनएस गोदावरी

🔹AUSINDEX-17 सागरी सरावाला सुरुवात

13-17 जून 2017 या काळात AUSINDEX-17 हा भारत-ऑस्ट्रेलिया यांचा संयुक्त सागरी सराव सुरू आहे. हा सराव ऑस्ट्रेलियाच्या फ्रीमंतले येथे आयोजित केला गेला आहे. AUSINDEX-17 हा दोन्ही देशातील नौदलात आयोजित करण्यात येणारा सागरी सराव आहे. यावर्षी ही या सरावाची दुसरी संस्करण आहे. 2015 साली विशाखापट्टणम येथे या सरावाला प्रथम सुरुवात झाली.

🔹रणगाडा भेदक ‘नाग’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

राजस्थानच्या वाळवंटात रणगाडा भेदक गाईडेड (ATGM) ‘नाग’ क्षेपणास्त्राची यशस्वीरीत्या चाचणी घेण्यात आली आहे. तिसर्या पिढीतील ATGM नाग मध्ये इमेजिंग इन्फ्रारेड रडार (IIR) सीकर यासारखे उन्नत तंत्रज्ञान बसविलेले आहे. हे संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) ने विकसित केले आहे. हे 8 किलो युद्धसामुग्री वाहून नेण्यास सक्षम आहे. हे जास्तीतजास्त 4 किलोमीटरपर्यंत मारा करू शकते.

🔹बालमजुरीवरील 2 मुख्य ILO करारांना भारताचे अनुसमर्थन

बालमजुरीसंदर्भात समस्येला हाताळण्यासाठी सिद्धांतपूर्ण मार्गदर्शनासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) कडून 1919 साली ‘किमान वय करार क्र. 138’ आणि 1999 साली ‘बालमजुरीचे वाईट प्रकार करार क्र. 182’ तयार केले गेलेत. यांच्या मार्गदर्शनाखाली बालमजुरी नाहीसे करण्यासाठी ‘बालमजुरीवर ILO कार्यक्रम (IPEC)’ कार्य करते.

बालमजुरी मुक्त भारत साकारण्यासाठी, जिनेव्हा येथे 13 जून 2017 रोजी आयोजित आंतरराष्ट्रीय कामगार परिषद, 2017 मध्ये केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालयाने वरील दोन्ही करारांसंदर्भात अनुसमर्थन करारनामे ILO यांच्याकडे सोपवले आहेत.

▪️ILO करारांचे स्वरूप

ILO च्या ‘बालमजुरीचे वाईट प्रकार करार क्र. 182’ अंतर्गत अतिशय वाईट बालकामगार पद्धती ठराव यामध्ये खालील प्रकारांना बेकायदेशीर ठरवण्यात आलेली आहेत:

बालकांची विक्री व तस्करी, कर्ज फेडण्यासाठी गुलाम आणि वेठबिगारी आणि सक्तीने किंवा अनिवार्य कामगार, सशस्त्र संघर्षात वापरासाठी बालकांची भरती यांच्या समावेशासह सक्तीने भरती अश्या गुलामगिरी समान असणार्या सर्व प्रकारच्या गुलामगिरी किंवा पद्धती;

वेश्याव्यवसायासाठी बालकांची खरेदी, त्यांचा वापर किंवा आमिष दाखवणे, अश्लील साहित्यांच्या उत्पादनासाठी बालकांचा वापर;

बेकायदेशीर क्रियाकलापांसाठी, विशेषतः अमली पदार्थांच्या उत्पादनासाठी आणि तस्करीसाठी, बालकांची खरेदी, त्यांचा वापर किंवा आमिष दाखवणे;

बालकांचे आरोग्य, सुरक्षितता किंवा नैतिकता धोक्यात येईल अश्याप्रकारच्या कोणत्याही स्थितीतील काम

ILO च्या ‘किमान वय करार क्र. 138’ मध्ये बालकांसाठी रोजगाराची किमान वयोमर्यादा चौदा वर्षे किंवा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा बालकांचा अधिकार अधिनियम, 2009 मध्ये स्पष्ट केलेले वय, यापैकी जे अधिक असेल ते वय असणार.

▪️आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO)

भारत हा आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा संस्थापक सदस्य आहे. या संघटनेची सन 1919 मध्ये स्थापना झाली. सध्या या संघटनेचे 187 सदस्य देश आहेत.

🔹राष्ट्रीय पुरस्कारासाठी जलसंवर्धनाच्या नालंदा मॉडेलची निवड

ग्रामीण विकास मंत्रालयाकडून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGP) मध्ये उत्कृष्टतेच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी दक्षिण मध्य बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील यशस्वी जलसंवर्धन करण्याचा मॉडेल (प्रारूप) याची निवड करण्यात आली आहे. नवी दिल्लीत 19 जून 2017 रोजी आयोजित कार्यक्रमात 'जलसंचय प्रकल्प' यावर हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. MGNREGP च्या 'जलसंचय प्रकल्प' अंतर्गत नालंदा जलसंवर्धन मॉडेलचे बांधकाम झाले आहे.

🔹विक्रमी कमी 2.18% इतका महागाई दराची नोंद झाली

भाजीपाला आणि डाळी यांच्यासारख्या स्वयंपाकघरातील किरकोळ वस्तूंबाबत महागाईतही घट होऊन महागाई दर प्रथमच विक्रमी स्वरुपात म्हणजेच 2.18% इतका कमी नोंदवला गेला आहे. ग्राहक किंमत निर्देशांक आधारित किरकोळ महागाई ही एप्रिल 2017 मध्ये 2.99% होती. मे 2016 मध्ये, ही 5.76% होती. भाज्यांचे भाव 13.44% ने, तर डाळींचे भाव 19.45% ने उतरले आहेत.

🔹22 वे APEDA वार्षिक सोहळ्यात पुरस्कारांचे वितरण

22 वे APEDA वार्षिक सोहळ्यात निर्यातामध्ये उल्लेखनीय सेवा दिलेल्या निर्यातदारांना वर्ष 2014-15 आणि वर्ष 2015-16 यासाठी 82 पुरस्कारांचे वाटप करण्यात आले. हे पुरस्कार डायमंड-2, गोल्ड-33, सिल्वर-29, कांस्य-18 या प्रकारांमध्ये सादर केले गेलेत. ऍलानासन्स लिमिटेड यांना दोन्ही वर्षासाठी "डायमंड ट्रॉफी" मिळाली. हे पुरस्कार वाणिज्य सचिव रीटा तेओतीया यांच्या हस्ते दिले गेलेत.

कृषी व प्रक्रियाकृत खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) ही भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाची सर्वोच्च संस्था आहे, जी कृषी उत्पादने आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादने यांच्या निर्यातीची जाहिरात करते.

🔹 जागतिक बालमजुरी विरोधी दिवस जगभरात साजरा

जगभरात दरवर्षी 12 जून या तारखेला ‘जागतिक बालमजुरी विरोधी दिवस (World Day Against Child Labour)’ साजरा केला जातो. या वर्षी "इन कंफ्लिक्ट्स अँड डिझास्टर्स, प्रोटेक्ट चिल्ड्रेन फ्रॉम चाइल्ड लेबर" या संकल्पनेखाली हा दिवस साजरा करण्यात आला आहे.

बालमजुरीबाबत जागतिक सचित्र
जागतिक स्तरावर 1.5 अब्ज लोक संघर्ष, हिंसा आणि नाजूक परिस्थितीने प्रभावित असणार्या देशांमध्ये राहतात. तसेच, दरवर्षी 20 कोटी लोक संकटांनी प्रभावित होतात. त्यापैकी एक तृतीयांश मुले आहेत. संघर्ष आणि आपत्ती परिस्थितीत सापडलेल्या भागात राहणाऱ्या 168 दशलक्ष बालके मजुरीचा महत्त्वपूर्ण भाग बनला आहे.

सद्यपरिस्थितीत, जगभरात सुमारे 215 दशलक्ष मुले काम करतात, त्यातील अनेक पूर्णवेळ काम करतात, त्यामुळे त्यांचे संपूर्ण बालपण हिरावून घेतल्या जाते. त्यापैकी निम्म्याहून अधिक धोकादायक आणि हानिकारक वातावरणात काम करतात.

शाश्वत विकास लक्ष्य 8.7 अनुसार, 2030 सालापर्यंत "वेठबिगारचे निर्मूलन, आधुनिक गुलामगिरी आणि मानवी तस्करी रोखणे आणि प्रतिबंध कायम राखणे आणि बालमजुरीचे सर्वात वाईट प्रकार बंद करणे" ही उद्दिष्टे साध्य करण्याच्या उद्देशाने प्रयत्न केले जात आहेत.

▪️पार्श्वभूमी व इतिहास

बाल कामगारांच्या समस्येवर जागतिक स्तरावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक कारवाई व प्रयत्न करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) ने 2002 साली जागतिक बालमजुरी विरोधी दिवसाची स्थापना केली.

या दिवशी बालमजुरीच्या समस्येवर प्रकाश टाकण्यासाठी आणि अश्या बालकांना मदत करण्यासाठी कश्याप्रकारे कार्य केले जाऊ शकते या संदर्भात निर्णय घेण्याकरिता सरकार, नियोक्ते आणि कामगार संघटना, नागरी समाज आणि जगभरातील लाखो लोक एकत्र येतात.

बालमजुरीसंदर्भात समस्येला हाताळण्यासाठी सिद्धांतपूर्ण मार्गदर्शनासाठी ILO कडून 1919 साली ‘किमान वय करार क्र. 138’ आणि 1999 साली ‘बालमजुरीचे वाईट प्रकार करार क्र. 182’ तयार केले गेले. यांच्या मार्गदर्शनाखाली बालमजुरी नाहीसे करण्यासाठी ‘बालमजुरीवर ILO कार्यक्रम (IPEC)’ कार्य करते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹इंग्लंडने 20 वर्षांखालील युवा फुटबॉल विश्वचषक जिंकला

इंग्लंड संघाने सुवॉन (गियॉग्गी प्रांत, उत्तर-पश्चिम कोरिया) येथे झालेल्या अंडर-20 फुटबॉल विश्वचषक 2017 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात व्हेनेझुएलाचा पराभव करत विजेतेपद पटकावले आहे.

इंग्लंडच्या डोमेनिक सोलंके याला ‘गोल्डमन बॉल - स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू’ आणि फ्रेडी वुडमनला ‘गोल्डन ग्लोव्ह - स्पर्धेचा सर्वोत्तम गोलरक्षक’ पुरस्कार देण्यात आले. इंग्लंडने यापूर्वी 1990 सालच्या विश्वचषक स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले होते.

FIFA अंडर-20 विश्वचषक ही स्पर्धा 20 वर्षाखालील पुरुष खेळाडूंसाठी फेडरेशन इंटरनॅशनले डी फुटबॉल असोसिएशन (FIFA) कडून आयोजित केली जाणारी स्पर्धा आहे. 1977 सालापासून स्पर्धेचे विजेतेपद दर दोन वर्षांनंतर बहाल केले जाते.

🔹न्यूयॉर्क येथे प्रथम UN महासागर शिखर परिषद संपन्न

5-9 जून 2017 या काळात संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे प्रथम संयुक्त राष्ट्रसंघाची महासागर शिखर परिषद (UN Ocean Conference) आयोजित करण्यात आली होती. फिजी आणि स्वीडन सरकार यांनी या परिषदेचे आयोजन केले.

शाश्वत विकास उद्दिष्ट 14: शाश्वत विकासासाठी महासागर, समुद्र आणि सागरी संसाधनांचे संवर्धन व शाश्वतपूर्ण वापर” याला समर्थन देण्याकरिता ही परिषद आयोजित करण्यात आली.

🔹परिषदेचे परिणाम

परिषदेत सर्व सदस्य देशांनी महासागराचे आरोग्य सुधारण्यासाठी कार्य करण्याची शपथ घेतली आणि त्यामधून जगभरात सागराचे संरक्षण करण्यासाठी 1300 प्रकारांची कार्ये चालवली जाण्याबद्दल शपथ घेण्यात आली.

वाढत्या महासागरातील प्रदूषणाने होणारे विपरीत परिणाम याविषयी जगभर जागृती निर्माण करण्यात येत आहे. परिषदेत महासागरातील प्रदूषणाचे चक्र बदलण्याविषयी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

परिषदेत 14 ठळक मुद्द्यांचे ‘कॉल ऑफ अॅक्शन’ दस्तऐवज अंगिकारण्यात आले आहे.

🔹पार्श्वभूमी

दस्तऐवजात स्पष्ट केलेले मुद्दे हे शाश्वत विकासावरील संयुक्त राष्ट्रसंघाचे उच्च स्तरीय राजकीय मंच (HLPF) चे भाग आहेत. HLPF हे केंद्रीय मंडळ सप्टेंबर 2015 मध्ये अंगिकारलेल्या शाश्वत विकास आणि शाश्वत विकास उद्दिष्ट्ये (SDGs) साठीच्या 2030 अजेंडाच्या आढाव्यासाठी आणि देखरेखीसाठी आहे.

🔹पलक्कड येथे मेगा फूड पार्कचे भूमिपूजन

केरळ राज्यात केरळ इंडस्ट्रियल इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट (KINFRA) द्वारा पलक्कड येथे ‘मेगा फूड पार्क’ उभारण्यात येत आहे. या पार्कचे भूमिपूजन 11 जून 2017 रोजी करण्यात आले आहे. केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.

शिवाय, केरळ स्टेट इंडस्ट्रियल डेवलपमेंट कॉर्पोरेशन (KSIDC) द्वारा अलप्पुझा येथे आणखी एक ‘मेगा फूड पार्क’ उभारण्यासाठी देखील भूमिपूजन करण्यात आले.

भारत सरकारच्या मेगा फूड पार्क योजनेअंतर्गत प्रत्येक मेगा फूड पार्क प्रकल्पाला 50 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जात आहे.

🔹सामाजिक कार्यासाठी इला गांधी सन्मानित

दक्षिण आफ्रिकेमध्ये सामाजिक कार्य करणार्या इला गांधी यांना त्यांच्या आजीवन कार्यासाठी सन्मानित करण्यात आले आहे. त्या महात्मा गांधी यांच्या नात आहेत. 70 वर्षीय गांधी यांना हा सन्मान 1946 सालच्या ‘इंडियन पॅसिव रेझिस्टेंस कॅम्पेन’ च्या 70 व्या वर्धापन दिवसानिमित्त देण्यात आला आहे.

🔹"इंदिरा गांधी - ए लाइफ इन नेचर" पुस्तकाचे अनावरण

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर जीवनावर "इंदिरा गांधी - ए लाइफ इन नेचर" या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले आहे. या पुस्तकाचे लेखक माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश हे असून प्रकाशक ‘सायमन अँड शुस्टर’ द्वारा प्रकाशित केले गेले आहे.

🔹विधी मंत्रालयाने “टेली-लॉं” प्रणाली सुरू केली

ग्रामीण क्षेत्रात अधिवास करणार्या नागरिकांना भारताच्या न्याय प्रणालीमधील कायदेशीर सेवा उपलब्ध व्हावी यासाठी भारत सरकारने ‘टेली-लॉ’ प्रणाली आणली आहे. हा कार्यक्रम विधि व न्याय मंत्रालय आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय संयुक्तपणे चालवणार आहेत.

कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारा देशभरात पंचायत स्तरावर सुरू असणार्या सामान्य सेवा केंद्रांचा (CSC) वापर केला जाणार आहे.

▪️कार्यक्रमातील मुख्य बाबी

प्रायोगिक प्रकल्प उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये 1000 सामान्य सेवा केंद्रांकडून (CSC) चालविला जाईल.

या कार्यक्रमामधून 1000 महिला निम-विधिक स्वयंसेवकांच्या (Para Legal Volunteers -PLV) क्षमता बांधणीमध्ये मदत मिळणार.

टेली-लॉ प्रणालीच्या प्रभावी कार्यासाठी 1000 सामान्य सेवा केंद्रांमध्ये VLE यांना प्रशिक्षण दिले जाणार.

▪️कार्यक्रमाचे स्वरूप

पहिल्या टप्प्यात ‘टेली-लॉ’ कार्यक्रम प्रायोगिक तत्वावर उत्तरप्रदेश व बिहार मधील 500 CSC मार्फत चालविण्यात येणार. त्यानंतर प्रणालीचा अभ्यास करून देशभर हा कार्यक्रम सुरू करण्यात येईल. कार्यक्रमांतर्गत प्रत्येक CSC वर एक PLV नियुक्त केले जाईल.

कार्यक्रमांतर्गत ‘टेली-लॉ’ नावाचे एक डिजिटल व्यासपीठ सुरू करण्यात येईल, जे सर्व CSC वर उपलब्ध असणार. हे व्यासपीठ नागरिकांना विधी सेवा प्रदातांसोबत जोडणार. राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण (NALSA) राज्यांच्या राजधानीमधून वकीलांचे एक मंडळ उपलब्ध करून देणार, जे नागरिकाला विडियो कांफ्रेंसिंगद्वारा कायदेशीर सल्ला देणार.

▪️पार्श्वभूमी

झारखंड व राजस्थान येथे वंचित गटांना न्याय व्यवस्थेमध्ये प्रवेश मिळावा यासाठी न्याय विभाग आणि संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) द्वारा “एक्सेस टू जस्टिस” प्रकल्प चालवण्यात येत आहे. या अंतर्गत झारखंडमध्ये 3 जिल्ह्यातील 10 CSC आणि राजस्थानमध्ये 11 जिल्ह्यातील 500 CSC येथे कायदेशीर सहायता दिली जात आहे. याच कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ‘टेली-लॉं’ प्रणाली आहे.

🔹कझाकस्तानमध्ये एक्सपो 2017 भरविण्यात आले

कझाकस्तानची राजधानी अस्ताना येथे एक्सपो 2017 या प्रदर्शनी भरविण्यात आली आहे. या प्रदर्शनीची संकल्पना ‘फ्युचर एनर्जि’ ही आहे.

एक्सपो 2017 हे नवीकरणीय आणि हरित तंत्रज्ञान क्षेत्राचे जागतिक दर्जाचे प्रदर्शन आहे. ही प्रदर्शनी 10 जून-10 सप्टेंबर 2017 दरम्यान सुरू राहणार आहे. ब्युरो इंटरनॅशनल डीस एक्सपोजिशन (BIE) ने प्रदर्शनीचे आयोजन केले. कझाकस्तानमधील भारतीय राजदूत हर्ष कुमार जैन यांनी भारताच्या प्रदर्शनीचे उदघाटन केले.

🔹हॅरिसन-व्हीनस जोडीकडे फ्रेंच ओपनचे विजेतेपद

न्यूझीलंडचा मायकेल व्हीनस व अमेरिकेचा रायन हॅरिसन या जोडीने पॅरिस येथे खेळल्या गेलेल्या 2017 फ्रेंच ओपन अंतिमच्या पुरुष दुहेरीचे विजेतेपद जिंकले. त्यांनी मेक्सिकोचा सॅंटिएगो गोंझालेझ व अमेरिकेचा डोनाल्ड यंग या जोडीला पराभूत केले. फ्रेंच ओपन (रोनांड-गॅरोस) ही फ्रान्सच्या पॅरिसमध्ये स्टेड रोनांड-गॅरोस येथे आयोजित होणारी वार्षिक टेनिस स्पर्धा आहे. या स्पर्धेची स्थापना 1891 साली झाली.

🔹ओस्टापेंको हिने फ्रेंच ओपन विजेतेपद जिंकले

लाट्वियाची जेलेना ओस्टापेंको हिने रोमानियाच्या सिमोना हालेप चा पराभव करत पॅरिस येथे खेळल्या गेलेल्या 2017 फ्रेंच ओपन अंतिमचा महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले. यासोबतच ती ग्रँड स्लॅम जिंकणारी प्रथम लाट्वियन ठरली आहे.

फ्रेंच ओपन (रोनांड-गॅरोस) ही फ्रान्स, पॅरिसमध्ये स्टेड रोनांड-गॅरोस येथे आयोजित होणारी वार्षिक टेनिस स्पर्धा आहे. या स्पर्धेची स्थापना 1891 साली झाली.

🔹सौमित्र चॅटर्जी यांना ‘लीजन डी'ऑनर’
सन्मान

बंगालचे अभिनेता सौमित्र चटर्जी यांना ‘लीजन डी'ऑनर’ हा फ्रेंच सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला आहे. 82 वर्षीय चटर्जी यांनी 1959 सालच्या "अपुर संसार" चित्रपटातून सत्यजित रे यांच्यासह कामाला सुरुवात केली. त्यांनी त्यानंतर रे यांच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. चटर्जी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित आहे.

लीजन डी'ऑनर’ हा फ्रेंच सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा सन्मान नागरी मूल्य जपणार्या व्यक्तिला दिला जातो. नेपोलियन बोनापार्टने 1802 साली या सन्मानची स्थापना केली.

🔹साहिथी पिंगली हिच्या नावावरून ग्रहाला नाव देण्यात येणार

बेंगळुरूमधील 16 वर्षीय साहिथी पिंगली हिला इंटेल इंटरनॅशनल सायन्स अँड इंजिनियरिंग फेअर (ISEF) स्पर्धेत दुसर्या स्थानचे बक्षीस प्राप्त झाले आहेत. बक्षीस स्वरुपात एका छोट्या ग्रहाला तिचे नाव देण्यात येणार आहे.

ISEF स्पर्धेत पिंगलीने "अॅन इनोवेटिव्ह क्राउडसोर्सिंग अॅप्रोच टु मॉनिटरिंग फ्रेशवॉटर बॉडीज" या विषयावर सादरीकरण केले.

मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लिंकन प्रयोगशाळेच्या सिरस कनेक्शन प्रोग्रामद्वारे एक लहान ग्रह शोधण्यात येईल.

🔹NITI आयोगाकडून SATH कार्यक्रमाला सुरुवात

बदलत्या भारतासाठी राष्ट्रीय संस्थान (National Institution for Transforming India -NITI) आयोगाकडून सहकारी संघवादाच्या कार्यसूचीवर अंमलबजावणीसाठी ‘‘ सस्टेनेबल अॅक्शन फॉर ट्रांसफार्मिंग ह्यूमन कॅपिटल (SATH) ’’ नावाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.

▪️कार्यक्रमाचे लक्ष्य:

शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात क्रांति घडवून आणणे.

आरोग्य व्यवस्थेसाठी राज्यांचे तीन आगामी ‘रोल मॉडल’ यांची निवड करून त्यांचे निर्माण करणे.

कार्यक्रमामधून चालवली जाणारी कार्ये
SATH कार्यक्रम विभिन्न राज्यांद्वारा NITI आयोगाकडून अपेक्षित तांत्रिक सहकार्याची आवश्यकता पूर्ण करणार.

NITI आयोग अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी राज्यांना उपकरणे उपलब्ध करून देऊन हस्तक्षेपाचा एक सुदृढ पथदर्शक नकाशा तयार करणार.

कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आराखडा तयार करणार.

देखरेख व विश्लेषण व्यवस्था कायम करणार.

संस्थात्मक उपाययोजनांमधून राज्यांच्या विभिन्न प्रकारांना सहकार्य केले जाईल.

▪️पार्श्वभूमी

NITI आयोगाकडे SATH कार्यक्रमाअंतर्गत 14 राज्य व केंद्रशासित प्रदेशांकडून प्रकल्पांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यामधून 5 प्रस्तावांची निवड करण्यात आली. राज्यांच्या अंतिम निवड ही विभिन्न आरोग्यासंदर्भात असलेल्या मानदंडांवर, जसे की प्रसूतिमृत्यु दर, बालमृत्यु दर, मलेरिया प्रकरणे इत्यादींच्या आधारावर केले जाईल. पुढे कार्यक्रमांतर्गत केल्या जाणार्या करारांमधून तीन राज्यांमध्ये या कार्यक्रमाची अंमलबाजवणी केली जाणार.

🔹बोपन्ना-डॅब्रोवस्की यांनी फ्रेंच ओपन मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले

भारतीय रोहन बोपण्णा आणि कॅनडाची गेब्रिएला डॅब्रोवस्की या जोडीने पॅरिस येथे खेळण्यात येणार्या 2017 फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. या जोडीने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जर्मनीची अॅना-लेना ग्रोएनफेल्ड आणि कोलंबियाचा रॉबर्ट फराह या जोडीला हरवले.

बोपण्णा हा लिएंडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झा नंतर ग्रँड स्लॅम जिंकणारा चौथा भारतीय खेळाडू बनला आहे. डॅब्रोवस्की ही ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकणारी पहिली कॅनेडियन खेळाडू ठरली आहे.

पॅरिसमध्ये स्टेडे रोलँड-गॅरोस येथे 1891 सालापासून आयोजित केली जाणारी टेनिस स्पर्धा आहे.

🔹जगातील शीर्ष 200 विद्यापीठांमध्ये तीन भारतीय संस्थांचा समावेश

क्वाक्केरेली सायमन्ड्स (QS) वर्ल्ड युनिर्व्हसिटी रॅंकिंग 2018 मध्ये जगातील सर्वोत्तम 200 विद्यापीठांच्या यादीत तीन भारतीय संस्थांचा समावेश करण्यात आली आहे. 2004 सालापासून प्रदर्शित होणार्या या क्रमवारीत प्रथमच तीन भारतीय संस्थांनी शीर्ष 200 विद्यापीठांमध्ये स्थान मिळवले आहे.

या यादीत शीर्ष 200 विद्यापीठांमध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) दिल्ली-172; IIT बॉम्बे-179; IISc बंगळुरू-190 यांचा समावेश आहे.

जागतिक क्रमवारीत शीर्ष 3 संस्थांमध्ये अनुक्रमे मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT), अमेरिका (प्रथम); स्टँडफोर्ड युनिव्हर्सिटी आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटी या संस्था आहेत. ब्रिटन (यूके) ची युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिज जागतिक पातळीवर पाचव्या स्थानी आहे.

🔹हवाई प्रवाश्यांच्या सेवेत 'डिजीयात्रा'
व्यासपीठ

नागरी उड्डाण मंत्रालयाने हवाई प्रवाश्यांच्या सेवेसाठी ‘डिजीयात्रा (DigiYatra)’ या डिजिटल व्यासपीठाचा शुभारंभ केला आहे.

या व्यासपीठावरून भारतात हवाई प्रवाश्यांचे प्रवासादरम्यानचे अनुभव व्यक्त केले जाईल तसेच त्यांना तक्रारी नोंदवता येणार. याशिवाय, प्रवासासंबंधित माहिती, सुचना त्यांना वेळोवेळी प्रदान केले जाणार.

हे व्यासपीठ चार महत्वपूर्ण स्तंभावर उभे करण्यात आले आहे, ते आहेत – आपापसात जोडले गेलेले प्रवासी, आपापसात जोडले गेलेले विमानतळ, आपापसात जोडले गेलेले उड्डाण आणि आपापसात जोडल्या गेलेल्या प्रणाल्या.

🔹भारत स्वच्छ कोळसा वापरासाठी प्रगत अल्ट्रा सुपरक्रिटिकल टेक्नॉलॉजीवर राष्ट्रीय मोहीम सुरू करणार

कार्बन उत्सर्जनात कमतरता आणण्यासाठी देशात एकूण USD 238 दशलक्ष खर्चाची स्वच्छ कोळश्याच्या वापरासाठी प्रगत अल्ट्रा सुपरक्रिटिकल तंत्रज्ञांनावर एक राष्ट्रीय मोहीम सुरू करण्याची घोषणा भारताने 6-8 जून 2017 दरम्यानच्या बीजिंग, चीनमधील द्वितीय मिशन इनोवेशन मंत्रिस्तरीय व आठव्या स्वच्छ ऊर्जा मंत्रिस्तरीय बैठकीत केली आहे.

30 नोव्हेंबर 2015 रोजी 20 देशांच्या नेत्यांनी एकत्र येऊन ‘मिशन इनोवेशन (MI)’ उपक्रमाला सुरूवात केली. भारत स्मार्ट ग्रिड, ऑफ ग्रिड अॅक्सेस आणि शाश्वत जैवइंधन या तीन आव्हानांचे नेतृत्व करीत आहे.

🔹बीजिंगमध्ये BRICS देशांचे प्रथम ‘मीडिया फोरम’ आयोजित

चीनची राजधानी बीजिंगमध्ये BRICS (ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) देशांच्या प्रथम ‘मीडिया फोरम’ बैठकीला 8 जून 2017 रोजी सुरुवात करण्यात आली.

जागतिक अस्थिर अर्थव्यवस्थेमुळे BRICS देशांच्या आर्थिक-व्यापारी-राजकीय संबंधांवर गैरसमज दूर करून व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी प्रसार माध्यमांना प्रोत्साहन देण्यासाठी हा मंच स्थापन करण्यात आला आहे.

या बैठकीत 27 वृत्तसंस्था, दूरदर्शन वाहिन्या, वृत्तपत्रे आणि BRICS देशांतील इतर वृत्तपत्रांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

🔹CBDT कडून नवी 'सेफ हार्बर व्यवस्था' अधिसूचित

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (Central Board of Direct Taxes -CBDT) यांच्याकडून एक नवी ' सेफ हार्बर व्यवस्था' अधिसूचित करण्यात आली आहे.

सेफ हार्बर व्यवस्था ही हस्तांतरणादरम्यानच्या किंमतीसंदर्भात असलेल्या विवादांमध्ये कमतरता आणणे, करदातांना निश्चितता उपलब्ध करणे, सेफ हार्बर मार्जिनला औद्योगिक मानकांच्या अनुरूप करणे आणि सेफ हार्बर ट्रांजॅक्शनला व्यापक करण्यासाठीच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे.

▪️ठळक मुद्दे

नवी व्यवस्था 1 एप्रिल 2017 रोजी म्हणजेच कर निर्धारण वर्ष 2017-18 च्या आरंभी प्रभावी करण्यात आली आहे, जी पुढील दोन वर्षासाठी म्हणजेच कर निर्धारण वर्ष 2019-2020 पर्यंत प्रभावी राहणार.

कर निर्धारण वर्ष 2017-18 पर्यंतच्या उपस्थित हार्बर व्यवस्थेअंतर्गत पात्र करदातांना सर्वाधिक फायदेशिर पर्याय निवडण्याचा अधिकार असणार.

ट्रांजॅक्शनची एक नवी श्रेणी ‘रिसीट ऑफ लो वॅल्यू-अॅडिंग इंट्रा ग्रुप सर्विसेज’ ला सुरू करण्यात आले आहे.

सॉफ्टवेयर विकास क्षेत्रातील सेवा, माहिती तंत्रज्ञान आधारित सेवा, नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग सेवा, सॉफ्टवेयर विकास क्षेत्राशी तसेच जेनेरिक औषधांशी जोडलेल्या पूर्णत: वा आंशिक करारबद्ध संशोधन व विकास सेवा यांच्या बाबतीत नवी सेफ हार्बर व्यवस्था 200 कोटी रुपयांपर्यंत ट्रांजॅक्शनसाठी उपलब्ध आहे.

सॉफ्टवेयर विकास क्षेत्रातील सेवा व माहिती तंत्रज्ञान आधारित सेवांशी जोडलेल्या ट्रांजॅक्शन संदर्भात सेफ हार्बर मार्जिन दर आधीच्या व्यवस्थेमध्ये 22% ने कमी करून 18% इतक्या कमाल स्तरावर आणली गेली आहे.

नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग सेवांशी जोडलेल्या ट्रांजॅक्शन संदर्भात 24%, 21%, आणि 18% या तीन विभिन्न दरांची एक श्रेणीबद्ध संरचना तयार करण्यात आली आहे, ज्याला आधीच्या व्यवस्थेच्या 25% इतक्या एकल दराच्या जागेवर आणले गेले आहे.

सॉफ्टवेयर विकास क्षेत्राशी जोडलेल्या पूर्णत: वा आंशिक करारबद्ध संशोधन व विकास सेवा आणि जेनेरिक औषधांशी जोडलेल्या पूर्णत: वा आंशिक करारबद्ध संशोधन व विकास सेवांशी जोडलेल्या ट्रांजॅक्शन संदर्भात सेफ हार्बर मार्जिनला आधीच्या व्यवस्थेच्या अनुक्रमे 30% 29% वरून कमी करून 24% इतके केले गेले आहे.

🔹IOC ने 2020 टोकियो खेळांमध्ये 15 नवीन क्रीडाप्रकाराला मंजूरी दिली

आंतरराष्ट्रीय ऑलंपिक समितीने (IOC) 2020 टोकियो खेळामध्ये खेळण्यात येणार्या क्रीडाप्रकारांमध्ये 15 नवीन क्रीडाप्रकारांना मंजूरी दिली आहे. यासोबतच टोकियो ऑलंपिकमध्ये 321 क्रीडाप्रकारांमध्ये स्पर्धा आयोजित केल्या जाणार.

यात 3-ऑन-3 बास्केटबॉल, मिश्र 4x400 मीटर रिले, मिश्र जलतरण, मिश्र ट्रायथलॉन, मिश्र सांघिक तिरंदाजी, BMX फ्रीस्टाईल यांचा समावेश आहे. मिश्र क्रिडाप्रकारांची संख्या दुप्पट होऊन 18 इतकी झाली आहे.

IOC ही विश्वभरातील ऑलंपिक चळवळीचे सर्वोच्च प्राधिकरण आहे. याचे मुख्यालय लॉसेन, स्वित्झर्लंड येथे आहे. याची स्थापना पिअरे डी कौर्बर्टिन यांनी 23 जून 1894 रोजी केली आणि डेमेट्रीओस विकेलस हे त्याचे पहिले अध्यक्ष झाले. दर चार वर्षांनी उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात आधुनिक ऑलंपिक खेळ आणि युवा ऑलंपिक खेळांचे आयोजन केले जाते. प्रथम ऑलंपिक 1896 साली अॅथेन्स, ग्रीसमध्ये आयोजित केले गेले.

🔹ICC हॉल ऑफ फेममध्ये श्रीलंकेचा पहिला खेळाडू: मुथय्या मुरलीधरन

श्रीलंकेच्या गोलंदाज मुथय्या मुरलीधरन याला लंडनमधील ICC क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. यासोबतच मुरलीधरन हा ICC हॉल ऑफ फेम यामध्ये समाविष्ट होणारा श्रीलंकेचा पहिला खेळाडू आणि एकूणच 83 वा खेळाडू झाला आहे.

आर्थर मॉरिस, जॉर्ज लोहमॅन आणि कॅरेन रॉल्टन यांच्यासह मुरलीधरनला यावेळी हा सन्मान देण्यात आला आहे.

ICC क्रिकेट हॉल ऑफ फेम हे क्रिकेटच्या प्रदीर्घ इतिहासात कर्तृत्ववान कामगिरी करणार्यांना सन्मानित करण्यासाठी आहे. 2 जानेवारी 2009 रोजी फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशन (FICA) च्या सहकार्याने दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ने उद्घाटन केले.

🔹भारत आणि बांग्लादेश दरम्यान माहिती तंत्रज्ञान तसेच इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात सहकार्याबद्दलच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

भारत आणि बांग्लादेश दरम्यान माहिती तंत्रज्ञान तसेच इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात सहकार्य वाढावे यादृष्टीने करण्यात आलेल्या सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
एप्रिल 2017 मध्ये दोन्ही देशांच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयादरम्यान हा करार करण्यात आला होता. हा करार पाच वर्षे अस्त्विात असेल. त्यानंतर गरज पडल्यास दोन्ही देशाच्या समितीने त्याला मुदतवाढ दिली जाईल.
या कराराचा मुख्य उद्देश ई-प्रशासन अधिक कार्यक्षम करणे हा असून त्याअंतर्गंत सर्व सार्वजनिक सेवा इलेक्ट्रॉनिक पध्दतीने करण्यावर काम केले जाईल.

🔹भारत आणि पेलेस्टाईन दरम्यान कृषी सहकार्य सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत , भारत आणि पेलेस्टाईनच्या कृषी मंत्रालयांमधल्या सामंजस्य कराराला मंजुरी देण्यात आली .
मे 2017 मध्ये पेलेस्टाईनचे मंत्री भारत दौऱ्यावर आले असतांना हा करार करण्यात आला होता.

या करारामुळे, कृषीसह, पशुसंवर्धन आणि पशुवैद्यक क्षेत्रात भारताला पेलेस्टाईनचे सहकार्य मिळू शकेल. तसेच रोप आणि भूमी पोषण,
आधुनिक सिंचन तंत्रज्ञान या विविध क्षेत्रातही परस्पर सहकार्य केले जाईल.
या सामंजस्य कराराअंतर्गत, एक कृषी निरीक्षण समितीही तयार केली जाईल.

🔹युवा विषयांसंदर्भात भारत आणि आर्मेनिया यांच्यात सामंजस्य करार

युवकांशी संबंधित विविध मुद्दयांवर परस्पर सहकार्य करण्याबाबत भारत आणि अर्मेनिया यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. एप्रिल 2017 मध्ये हा करार करण्यात आला होता. हा करार पाच वर्षांसाठी अस्तित्वात असेल. त्यानंतर त्याला आपोआप मुदतवाढ दिली जाईल.
दोन्ही देशातल्या युवकांमध्ये विविध खेळ तसेच सांस्कृतिक, शैक्षणिक घडामोंडीमधून विचारांची देवघेव व्हावी यादृष्टीने हा करार करण्यात आला आहे.

यात दोन्ही देशातले युवक एकमेकांच्या देशात जातील, युवा संघटना आणि युवा धोरणांसाठी कार्यरत सरकारी अधिकारी यांच्यातही नियमित भेटीगाठी आणि चर्चा होतील. आंतरराष्ट्रीय स्तरावर परिषदा आणि चर्चासत्र आयोजित केली जातील. तसेच शिबीरे, युवा महोत्सव यांच्या माध्यमातूनही भारत आणि आर्मेनिया यांच्यातल्या युवा शक्तीचे परस्पर सहकार्य वाढविण्यासाठी हा करार उपयुक्त ठरेल.

🔹वित्तीय तोडगा आणि ठेव विमा विधेयक 2017 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज वित्तीय तोडगा आणि ठेव विमा विधेयक 2017 ला मंजूरी देण्यात आली. या विधेयकामुळे विशिष्ट वित्तीय क्षेत्रातल्या कंपन्यांची दिवाळखोरी झाल्यानंतर येणाऱ्या आर्थिक संकटावर एक सर्वसमावेशक तोडगा निघू शकेल. बँका, विमा कंपन्या आणि इतर वित्तीय संस्थांसाठी हे विधेयक उपयुक्त ठरेल.

हे विधेयक संमत झाल्यावर सरकारला एक तोडगा मंडळ स्थापन करता येईल. या मंडळाच्या मदतीने ठेव विमा आणि पत हमी महामंडळ कायदा 1961 च्या मसुद्यात सुधारणा करुन या महामंडळाकडे ठेव विमा विषयक अधिकार वळवता येईल.

हे मंडळ वित्तीय व्यवस्थेत स्थैर्य वाढवून ग्राहकांचे संरक्षण करु शकेल तसेच काही प्रमाणात सार्वजनिक निधीचेही संरक्षण करणे शक्य होईल.

केंद्र सरकारने नुकताच दिवाळखोरी कायदा संमत केला असून त्याच्या मदतीने बिगर वित्तीय संस्थांमधील बुडीत कर्जांवर कारवाई करणे शक्य होणार आहे. या कायद्याला जोड म्हणून हे नवे विधेयक संमत झाल्यास एक सर्वसमावेशक तोडगा आराखडा बनविणे शक्य होईल.
या विधेयकामुळे वित्तीय शिस्त वाढेल तसेच सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांना सध्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो त्यावरही उपाययोजना करणे शक्य होईल.

🔹घाऊक किंमतीच्या निर्देशांकात घट

घाऊक किंमतीच्या निर्देशांकात मे 2017 मध्ये 0.4 टक्का घट होऊन हा निर्देशांक 112.8 टक्के (अंदाजित) राहिला. गेल्या महिन्यात निर्देशांक 113.2 टक्के होता.
मे 2017 मध्ये चलनवाढीचा दर 2.17 टक्के होता. गेल्या महिन्यात हा दर 3.85 टक्के होता.

अन्नधान्य निर्देशांकात 1.2 टक्का घट झाली. डाळी, अंडी, फळे, भाजीपाला तसेच चहा, तांदूळ, बाजरी आणि गव्हाच्या किंमती कमी झाल्या. मात्र ज्वारी, नाचणी, मासे, आदींच्या दरात वाढ झाली. अन्नधान्य वगळून इतर वस्तूंच्या निर्देशांकात 1.2 टक्के घट झाली. धातूंच्या निर्देशांकातही 1.9 टक्का वाढ झाली.

इंधन आणि ऊर्जा क्षेत्र निर्देशांकात 2.1 टक्के घट तर निर्मिती क्षेत्र निर्देशांकात 0.4 टक्के वाढ झाली.

🔹ऊर्जा, कोळसा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा, खाण मंत्रालयाने तीन वर्षात केलेली कामगिरी

केंद्रीय ऊर्जा, कोळसा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा तसेच खाण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) पियूष गोयल यांनी आपल्या मंत्रालयाच्या गेल्या तीन वर्षातील कारकिर्दीची माहिती प्रसार माध्यमांना आज दिली. त्याचबरोबर गोयल यांनी अहमदाबाद, बंगलोर, भुवनेश्वर, जयपूर, लखनौ आणि पाटणा या सात शहरांतील पत्रकारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला.

सर्वांना परवडणाऱ्या दरामध्ये चोवीस तास अखंड स्वच्छ पर्यावरणाला पूरक वीज पुरवठा करण्याचे म्हणजेच “उज्वल भारता” चे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांची “नवभारत संकल्पना” साकारण्यासाठी
उज्वल भारत” योजनेची मदत होणार आहे. अशी माहिती पियूष गोयल यांनी केंद्रातल्या रालोआ सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

उज्जवल भारत” उद्दिष्ट पूर्तीसाठी चार मंत्रालयांनी मिळून सहा तत्वांवर आधारित एक कार्यक्रम तयार केला आहे. यामध्ये ऊर्जा सहज सुलभतेने उपलब्ध झाली पाहिजे तसेच विजेचा दर कमी-स्वस्त म्हणजेच सर्व सामान्यांना परवडणारा पाहिजे. आणि ऊर्जा स्वच्छ म्हणजेच पर्यावरणाला पूरक असावी. यासाठी संपूर्ण देशभरात पायाभूत सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत आणि सगळयांपर्यंत वीज पोहोचलीच पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येक भारतीयाला सुरक्षित वाटले पाहिजे. यासाठी कार्य करण्यात येणार आहे, असे यावेळी गोयल यांनी पत्रकारांना सांगितले.

वीज उत्पादनासाठी कोळशाचा तुटवडा भासणार नाही, याची दक्षता सरकार घेत असून सध्या देशात मोठया प्रमाणावर कोळसा उपलब्ध आहे. त्याचबरोबर कोळसा आयातीमध्ये घट झाली असून देशाचे 25,900 कोटी रुपयांचे परकीय चलन वाचले आहे. कमीतकमी कोळशामध्ये जास्त ऊर्जा या तत्वाने कार्य केले जात आहे.

पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष “गरीब कल्याण वर्ष” म्हणून साजरे केले जात असून यावर्षी ग्रामीण भागांमध्ये दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेतून विद्युतीकरण केले. “उजाला” या योजनेतून वीज बचत करणाऱ्या एलईडी बल्बचे वितरणही करण्यात आले.

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जेला प्राधान्य देण्यासाठी सौर आणि पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्प सुरु करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. खाणींसाठी उपग्रहा मार्फत खाणी दक्षता प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या अवकाश तंत्रज्ञानाच्या वापरामुळे खाणींमधून बेकायदा उत्खनन करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच मंत्रालयाने 24 खनिज पट्टयांच्या विभागांचे लिलाव पारदर्शक पध्दतीने केले जात आहेत. त्यामुळे लिलावातून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये एक लाख कोटी रुपये वाढ होत आहे.

खनिज संपत्ती मोठया प्रमाणावर असणाऱ्या देशातल्या 12 राज्यांमध्ये प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना राबविण्यात येत आहे. या निधीचा वापर खाणींमुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रातल्या लोकांच्या, शिक्षण, आरोग्य आणि कल्याणासाठी करण्यात येत आहे.

ग्राहक हा राजा मानून त्याला खात्याची सर्व माहिती मिळावी, यासाठी ऊर्जा मित्र, तरंग यासारखे मोबाईल ॲप तयार करण्यात आले आहेत. 18002003004 या क्रमाकांला मिसकॉल करुन हे मोबाईल अॅप डाऊनलोड करता येऊ शकतात. या पत्रकार परिषदेला ऊर्जा खात्याचे सचिव पी.के. पुजारी, कोळसा खात्याचे सचिव सुशील कुमार, खाण मंत्रालयाचे सचिव अरुण कुमार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

🔹उद्योगांशी संबंधित पर्यावरणविषयक 90 पैकी केवळ 20 अटीच कायम

उद्योगांशी संबंधित जैवविविधता आणि पर्यावरणविषयक नियमनांना प्रोत्साहन देत केंद्र सरकारने सध्याच्या 90 पैकी केवळ 20 अटी कायम ठेवल्या आहेत. पर्यावरण, वन आणि हवामान बदल संबंधी मंत्रालयाच्या अपर सचिव डॉ. अमिता प्रसाद यांनी ही माहिती दिली. यासंदर्भात भारतीय उद्योग महासंघातर्फे मुंबईत आयोजित परिषदेत त्या काल बोलत होत्या.

लहान शहरांमधल्या लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये जैवविविधता आणि पर्यावरणातील बदलांबाबत जागृती करणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या.

यूएनडीपीच्या ऊर्जा आणि पर्यावरण प्रमुख डॉ. प्रिती सोनी यांनीही यावेळी आपले विचार मांडले. जैवविविधता आणि वातावरणातील बदलविषयक सुधारणा तातडीने हाती घेतल्या नाही तर जगातील सकल अंतर्गत विकासाचा दर वर्षभरात 5 टक्क्यांपेक्षा कमी होईल असे त्या म्हणाल्या. यासाठीच्या प्रयत्नात काही थोडक्या देशांनी हातभार न लावल्यास जागतिक समुदायाचे मोठे नुकसान होईल, अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.

🔹कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयातर्फे देशभरात स्वच्छता पंधरवडयाचे आयोजन

कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयातर्फे देशभरात 16 ते 31 मे 2017 या अवधीत स्वच्छता पंधरवडयाचे आयोजन करण्यात आले. मंत्रालयाच्या अखत्यारितील परिसर आणि कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहिम राबविणे आणि स्वच्छतेविषयक जागरुकता निर्माण करणे या हेतूने या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कृषी बाजार, मासळी बाजार तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरातील गावांमध्येही या पंधरवडयात स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून स्वच्छतेच्या आवश्यकतेचा संदेश देण्यात आला.

या विभागाने स्वच्छ भारत मोहिमेंतर्गंत गावे स्वच्छ ठेवण्याबरोबरच जनावरच्या मलमूत्राचा वापर करुन अल्प दरात जैविक खत तयार करण्याचे तंत्र विकसित केले आहे. स्वच्छता पंधरवडया दरम्यान 142 गावे आणि कृषी बाजारांमध्ये या तंत्राबाबत माहिती देण्यात आली.

पशुधन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या कार्यालय आणि विभागांमध्येही ही मोहिम राबविण्यात आली. 11 राज्यांमधील 20 मासळी बाजारांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करणारे 23 उपक्रम राबविण्यात आले. शासकीय शाळा आणि गावांमध्येही स्वच्छ अभियानांतर्गंत जनजागृती करण्यात आली.

🔹 पहिल्या रेल्वे मनुष्यबळ गोलमेज परिषदेचे रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली येथे आयोजित पहिल्या रेल्वे मनुष्यबळ गोलमेज परिषदेचे आज रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते उद्घाटन झाले. रेल्वे मंडळाचे अध्यक्ष ए.के.मित्तल, कर्मचारी सदस्य प्रदीप कुमार यांच्यासह रेल्वेचे अनेक अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

रेल्वेच्या 10 विभागांमध्ये 13 लाखपेक्षा जास्त कार्यरत आहेत. या मनुष्यबळाशी संबंधित विविध मुद्दे आणि समस्या याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

🔹आरोग्य सचिवांच्या हस्ते वात्सल्य मातृ अमृत कोषाचे उद्घाटन

आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव सी. के. मिश्रा यांनी आज दिल्लीतील लेडी हार्डींग वैद्यकीय महाविद्यालयात वात्सल्य मातृ अमृत कोषाचे उद्घाटन केले. ही उत्तर भारतातील मानवी दुधाची सर्वात मोठी बँक असून तेथे स्तनपान समुपदेश केंद्राचीही तरतूद आहे. या बँकेत नवमातांनी दान दिलेल्या दुधामुळे अनेक गरजू बालकांचे प्राण वाचू शकतील, असा विश्वास मिश्रा यांनी यावेळी व्यक्त केला.

बालकाच्या निकोप वाढीसाठी आईच्या दुधाची आवश्यकता लक्षात घेत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. स्तनपानाविषयी जागरुकता वाढवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे काही उपक्रही राबवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

नवजात बालक आणि नवप्रसूत मातांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबतही मिश्रा यांनी यावेळी माहिती दिली.

🔹जागतिक पर्यावरण दिवस 2017

आज जागतिक पर्यावरण दिवस. भारतीय नौदलाच्या हरीत उपक्रम मोहिमेला आज तीन वर्षे पूर्ण होत आहे. हरीत उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने या मोहिमेंतर्गत भारतीय नौदलाने विविध उपक्रम यशस्वीरित्या राबवले आहेत. ऊर्जा बचत करताना वीज आणि इंधन या देान्ही ऊर्जास्रोतांचा वापर करण्यासाठी नौदलाच्या सर्वच विभागांनी प्रयत्न केले आहेत.

पदपथांवर एलईडी दिव्यांचा वापर, नवीकरणीय उर्जेच्या वापराला प्रोत्साहन तसेच जहाजांवर विविध कामांसाठी सोलार पॅनलच्या सहाय्याने सौर उर्जेचा वापर करणे असे उपक्रम नौदलाने राबवले. आपल्या वार्षिक तरतूदीपैकी 1.5 टक्के भाग नवीकरणीय ऊर्जा निर्मितीसाठी वापरण्याचा निर्णय नौदलाने घेतला. तसेच 2018 पर्यंत 19 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे आव्हान नौदलाने स्वीकारले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्व्च्छ भारत अभियानातही नौदल सक्रीय सहभागी आहे. नौदलाच्या विविध आस्थापनांमध्ये यासंदर्भात राबववेल्या उपक्रमांचा माध्यमातून दरमहा 5600 किलो खत आणि 450 किलो बायोगॅस प्राप्त होत आहे. त्याचबरोबर नौदलाने 14000 पेक्षा जास्त रोपटीही लावली आहे.

🔹दरवाजा बंद’ मोहिमेचा मुंबईत शुभारंभ

देशातील खेड्यांमध्ये शौचालयांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने ‘दरवाजा बंद’ या नव्या मोहिमेचा आज मुंबईत शुभारंभ करण्यात आला.

केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्री नरेंद्रसिंग तोमर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाचे सचिव परमेश्वरन अय्यर तसंच या मोहिमेचे अग्रणी विख्यात चित्रपट अभिनेता अमिताभ बच्चन आदी यावेळी उपस्थित होते.

या मोहिमेला जागतिक बँकेचे सहाय्य लाभले असून देशभरात ही मोहीम राबवली जाणार आहे. शौचालय असूनही त्यांचा वापर न करणाऱ्यांच्या मानसिकतेत बदल घडून यावा या करता या मोहिमेची आखणी करण्यात आली आहे. गावातल्या महिलांनी यासाठी पुढाकार घ्यावा म्हणून चित्रपट अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचाही या मोहिमेत सहभाग असेल. शौचालयांच्या शाश्वत वापर आणि हागणदारीमुक्त गाव यासाठी केंद्र आणि राज्य पातळीवर संपर्क मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

हागणदारी मुक्त अभियानात आतापर्यंत मिळालेले 64 टक्के यश हे पंतप्रधानांच्या कटिबद्धतेचं प्रतिबिंब असल्याचे नरेंद्रसिंग तोमर यांनी सांगितले. महाराष्ट्राने या अभियानात 80 टक्के उल्लेखनीय लक्ष्य साध्य केले असल्याचेही ते म्हणाले.

दरवाजा बंद अभियानाची सुरुवात महाराष्ट्रापासून केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. 2018 पर्यंत महाराष्ट्र 100 टक्के हागणदारी मुक्त करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरवाजा बंद अभियानाच्या प्रगतीबद्दल अमिताभ बच्चन यांनी यावेळी माहिती दिली. तसेच स्वच्छतेच्या कामांना आपला कायम पाठिंबा राहील, असे स्पष्ट केले.

2014 मध्ये उघड्यावर शौच करणारे 55 कोटी लोक होते. मे 2017 पर्यंत हा आकडा 35 कोटी एवढा कमी झाल्याची माहिती केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाचे सचिव परमेश्वरन अय्यर यांनी दिली. दरवाजा बंद हा केवळ शौचालय बांधण्याचा कार्यक्रम नसून लोकांमधील मानसिकतेत बदल घडवून आणण्यावर लक्ष्य केंद्रीत करण्यात आले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमापूर्वी केंद्रीय मंत्री तोमर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या ग्रामीण स्वच्छ भारत अभियानाचा आढावा घेतला. यावेळी राज्यातल्या 11 हागणदारीमुक्त जिल्ह्यांना सन्मानित करण्यात आले.

🔹कांडला बदरात 200 मेगावॅट क्षमतेचा सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी नौवहन मंत्रालयाकडून समिती स्थापन

कांडला बंदरात असलेल्या जमिनीवर 200 मेगावॅट क्षमतेचा सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी नौवहन मंत्रालयाने एक समिती स्थापन केली असल्याचे केंद्रीय नौवहन आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबईत सांगितले.

हरित बंदर आणि तेल गळती व्यवस्थापन 2017’ या परिषदेत ते बोलत होते. सर्व बंदरांमध्ये सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पात गुंतवणूक करणं हे कमी खर्चिक आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारे असून यातून निर्माण होणारी वीज नॅशनल ग्रीडद्वारे वापरात आणता येईल, असे त्यांनी सांगितले. सौर उर्जेचा प्रत्येक युनिटमागील खर्च कमी होऊन 2 रुपये 63 पैसे इतका झाला आहे. तसेच पवन उर्जेवरील खर्चही कमी झाला असून याद्वारे सर्व बंदरे एकत्रितरित्या दरवर्षी 600 ते 700 कोटी रुपयांची बचत करू शकतात असे ते म्हणाले. सागरमाला प्रकल्पात एकूण 12 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून 14 औद्योगिक क्लस्टर उभारण्यात येणार आहेत. यामुळे हरित उर्जेच्या वापराला प्रोत्साहन मिळेल.

पर्यावरणपूरक शाश्वत पर्याय लक्षात घेऊन बंदरांसाठी भावी हरित ऊर्जा योजना तयार करण्यासंदर्भात या परिषदेत चर्चा करण्यात येईल असे मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी सांगितले.

इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी तसेच नौवहन मंत्रालयाचा सागरमाला प्रकल्प मुंबई पोर्ट ट्रस्ट, इंडियन पोर्टस् असोसिएशन आणि शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया यांनी या परिषदेचे आयोजन केले.

🔹दरवाजा बॅण्ड’ या अंतर्गत स्वच्छ भारत अभियान पुढे राबविणार

शौचालयांचा वापर या राष्ट्रीय उपक्रमासाठी अमिताभ बच्चन ब्रॅण्ड ॲम्बेसॅडर

देशभरातील गावांमध्ये शौचालयांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय ‘दरवाजा बॅण्ड’ या नवीन अभियानाला उद्यापासून मुंबई येथे सुरुवात करण्यात येणार आहे.

प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका राहणार असून हे अभियान केंद्र आणि राज्याच्या पेयजल मंत्रालय आणि स्वच्छता मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने राबविले जाणार आहे. या अभियानाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय पेयजल मंत्री नरेंद्रसिंग तोमर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सचिव पारमेश्वरन अय्यर आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

जागतिक बँकेचा पाठिंबा अभियानाला मिळणार असून याद्वारे ज्या पुरुषांशी मानसिकता शौचालय असूनही न वापरण्याची आहे अशांसाठी ‘वागणूक बदलावर’ या अंतर्गत भर देण्यात येईल. तसेच ज्या महिलांनी ग्रामीण भागात शौचालयांचा वापर व्हावा यासाठी खंबीर भूमिका घेतली आहे अशा महिलांना प्रोत्साहन म्हणून अनुष्का शर्मा या अभियानात सहभागी होणार आहेत.

माहिती, शिक्षण आणि संदेशवहन या त्रिसूत्रींच्या जोरावर स्वच्छ भारत अभियान हे मानवी वागणुकीतील बदल घडविण्यासाठी प्रामुख्याने राबविण्यात येणार असून अमिताभ बच्चन हे या अभियानाचे ॲम्बेसॅडर म्हणून राहतील.

🔹सेवा’ ॲपचे पियुष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन

ऊर्जा क्षेत्रातल्या ग्राहकांसाठीच्या सेवा अर्थात सरल इंधन वितरण ॲप्लीकेशन, या ॲपचे केंद्रीय ऊर्जा, कोळसा, नवीकरणीय ऊर्जा आणि खाण राज्यमंत्री पियुष गोयल यांनी उद्घाटन केले. कोल इंडिया लिमिटेडने हे ॲप विकसित केले आहे. ‘सेवा’ ॲप हे डिजीटल इंडिया उपक्रमाचा एक भाग असून, ग्राहकांशी संवाद वाढविण्याबरोबरच कोळसा क्षेत्रात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविणे, हा या मागचा उद्देश आहे.

सुलभ, प्रभावी, काटकसरी आणि पारदर्शक प्रशासन या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाला अनुसरुन हे ॲप आणि विविध मंत्रालयांची ॲप सुरु करण्यात आले असल्याचे गोयल यांनी यावेळी सांगितले.

कोळसा पाठवण्यासंदर्भातले ॲप, सर्वसामान्यांसाठी महत्वाचे नाही, असा एक समज आहे. मात्र या ॲपचा वापर करुन ऊर्जा निर्मितीसाठी कोळशाचा उपयोग करण्यासंदर्भातली अकार्यक्षमता आणि गळतीवर सामान्य माणूस अंकुश ठेऊ शकेल, असे गोयल म्हणाले. यामुळे कोळसा क्षेत्रातल्या जोडण्यांचे सुसूत्रीकरण होऊन देशात, वीजदर कमी व्हायला मदत होईल, असे गोयल म्हणाले.

🔹राष्ट्रीय जलमार्गांच्या विकासासाठी केंद्रीय रस्ते निधीपैकी 2.5 टक्के रक्कमेचा वापर करणार

राष्ट्रीय जलमार्गांचा विकास आणि देखरेख यासाठी केंद्रीय रस्ते निधीपैकी 2.5 टक्के निधीच्या वाटपाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली. या साठी केंद्रीय रस्ते निधी कायदा 2000 मध्ये सुधारणा करुन हे वाटप केले जाईल, असे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

विकल्या गेलेल्या प्रतिलीटर पेट्रोलमागे 6 रुपये उपकर आकारुन केंद्रीय रस्ते निधी स्थापन करण्यात आला आहे. या निधीचा वापर आतापर्यंत राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच ग्रामीण रस्त्यांचा विकास आणि देखरेख यासाठी केला जात आहे. आजच्या मंत्रिमंडळ निर्णयामुळे राष्ट्रीय जलमार्गांच्या विकास आणि देखरेखीसाठी दरवर्षी सुमारे 2000 कोटी रुपयांची तरतूद करता येईल. 2016-17 या वर्षात केंद्रीय रस्ते निधीअंतर्गत 80,800 कोटी रुपये जमा झाले होते.

पुढील तीन वर्षात तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यतेवर आधारीत 24 राष्ट्रीय जलमार्ग विकसित करण्याची सरकारची योजना आहे. यामधे महाराष्ट्रातील अंबा नदी, सावित्री नदी, दाभोळ खाडी आणि रेवदंडा खाडी या जलमार्गााच्या तसेच गोव्यातील झुआरी आणि मांडोवी या नद्यांवरील जलमार्गांच्या विकासाचा समावेश आहे.

🔹आसाम मधे कामरूप इथे नवे एम्स उभारायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

आसाम मधे कामरूप इथे नवे एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था उभारायला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत हे एम्स उभारण्यात येणार असून, त्यासाठी 1123 कोटी रुपये खर्च येणार आहे.

48 महिन्यात हे एम्स पूर्ण करण्यात येईल. नवी दिल्लीतल्या एम्सच्या धर्तीवर उभारण्यात येणाऱ्या या एम्समध्ये 750 खाटा, 16 ऑपरेशन थेटर असतील. त्याचबरोबर ट्रामा केंद्र, वैद्यकीय महाविद्यालय, परिचारिका महाविद्यालय आणि याच्याशी संलग्न इतर सेवा असतील.

🔹राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी रिझवी

राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष म्हणून सय्यद गय्यूर हसन रिझवी यांनी आज नवी दिल्लीत पदभार स्वीकारला. अल्पसंख्याकांच्या कल्याण आणि विकासासाठी आयोग कार्यरत राहील असं रिझवी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना सांगितले. कला शाखेचे पदवीधर आणि मेकॅनिक्स डिप्लोमाधारक असलेल्या रिझवी यांनी उत्तर प्रदेश अल्पसंख्याक वित्त विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.

🔹विद्यापीठ अनुदान आयोगाच्या रॅगींग विरोधी नव्या ॲपचा प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते प्रारंभ

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीच्या रॅगींग विरोधी ॲपचा शुभारंभ आज झाला. या मोबाईल ॲपमुळे विद्यार्थ्यांना रॅगींग विरोधी तक्रारी दाखल करायला मदत होईल, असे जावडेकर यांनी यावेळी सांगितले.

विद्यापीठांमधून रॅगींगचे संपूर्ण उच्चाटन होणे गरजेचे आहे, असे जावडेकर म्हणाले. हे ॲप ॲन्ड्रॉईड प्रणालीवर चालणार असून विद्यार्थ्यांनी लॉग इन करून तात्काळ तक्रार नोंदवायची असून याबाबतची माहिती सर्व संबंधितांना तात्काळ कळविली जाईल आणि त्या विरुद्ध ताबडतोब कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

रॅगींगमध्ये सहभागी झालेल्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल आणि संबंधित शैक्षणिक संस्थेत त्यांना शिक्षण घेता येणार नाही असेही जावडेकर यांनी स्पष्ट केले.

🔹इंडोनेशिया ओपन: किदम्बी श्रीकांत चॅम्पियन!

इंडोनेशिया ओपन सिरीजच्या बॅडमिंटन स्पर्धा पुरूष एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या किदम्बी श्रीकांत ने जपानच्या काजूमासा साकाईला पराभूत करत इंडोनेशिया ओपन सुपर सिरीजचा किताब जिंकला. ३७ मिनिटे चाललेला हा सामना श्रीकांतने २१-११, २१-१९ ने जिंकला.

श्रीकांतने शनिवारी जागतिक पातळीवरील अव्वल खेळाडू असलेल्या दक्षिण कोरियाच्या सोनवानला पराभूत केले होते. तर, दुसरीकडे काजूमासा साकाईने भारताच्या प्रणॉयला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

श्रीकांत सुरूवातीपासूनच पू्र्ण रंगात खेळत होता. समोरच्या खेळाडूवर तो पहिल्याच डावात प्रबळ ठरला, पहिल्याच डाव त्याने २१-११ने जिंकला. दुसऱ्या डावात साकाईने सुरूवातीला जोर धरला, साकाई ११-६ ने अग्रस्थानी होता. परंतु यानंतर श्रीकांतने आक्रमक पवित्रा घेतला. सुरुवातीला हा सामना बरोबरीत सुरू होता. नंतर मात्र श्रीकांतने सामना आपल्या बाजूने फिरवत २१-१९ ने जिंकला. श्रीकांतला या विजयासाठई १० लाख अमेरिकी डॉलरचे बक्षीस मिळाले.

श्रीकांत संध्या जागतिक क्रमवारीत २२व्या स्थानावर आहे. श्रीकांतने आजच्या विजयानंतर दुसऱ्यांदा हा सुपर सिरीज किताब आपल्या नावावर केला आहे. याआधी २०१४ मध्ये 'चायना ओपन'मध्ये श्रीकंतने बाजी मारली होती. श्रीकांतसाठी ही चौथी सुपर सिरीज फायनल होती. २०१५ मध्ये श्रीकांत 'इंडिया ओपन'चा विजेता ठरला होता.

🔹चेत्रीने रुनीला मागे टाकले

भारताचा कर्णधार सुनील चेत्रीने किर्गिझस्तानविरुद्ध ६९व्या मिनिटाला गोल केला. हा त्याचा भारतासाठी केलेला ५४वा गोल ठरला. अशी कामगिरी करत चेत्रीने इंग्लंडच्या वेन रुनीला मागे टाकले आहे. चेत्रीपुढे आता फक्त ख्रिस्तियानो रोनाल्डो व लिओनेल मेसी हे दोघेच आहेत.

▪️सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारे सध्याचे फुटबॉलपटू

ख्रिस्तियानो रोनाल्डो ७३ गोल
लिओनेल मेसी ५८ गोल
क्लिंट डेम्पसी ५६ गोल
सुनील चेत्री ५४ गोल
वेन रुनी ५३ गोल

🔹२०२२मध्ये स्मार्टफोनधारक १४० कोटींवर!

सव्वाशे कोटींहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या देशातील एकूण मोबाइलधारकांची संख्या २०२२मध्ये १४० कोटींवर जाण्याची शक्यता आहे. त्यापैकी एक तृतीयांश संख्या फोर-जी ग्राहकांची असणार आहे.

जगभरात मोबाइल ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून, त्यामध्ये भारतीय ग्राहकांचा क्रमांक बराच वरचा आहे. जानेवारी ते मार्च २०१७ या कालावधीत एकूण ग्राहकसंख्येत ४.३० कोटी ग्राहकांची भर पडल्याचे एरिक्सन मोबिलिटीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. याच तीन महिन्यांच्या कालावधीत चीनमधील मोबाइल ग्राहकांच्या संख्येत २.४० कोटी ग्राहकांची भर पडली. देशातील मोबाइल ग्राहकांची संख्या वाढण्यासाठी फोर-जी तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार असून, २०२२पर्यंत फोर-जी वापरकर्त्यांची संख्या ५२ कोटींवर जाईल, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सध्या देशात फोर-जी तंत्रज्ञानाचा वापर होत असून, येत्या पाच वर्षांत फाइव्ह-जी तंत्रज्ञान सादर होण्याची शक्यताही ‘एरिक्सन मोबिलिटी’ने वर्तवली आहे. २०२२मध्ये फाइव्ह-जी वापरकर्त्यांची संख्या ३० लाखांवर जाईल, असेही अहवालात म्हटले आहे.

▪️थ्री-जी काळाच्या पडद्याआड

फोर-जी तंत्रज्ञानाचा वाढता प्रसार आणि प्रचार पाहता, २०२२ पर्यंत देशातून थ्री-जी तंत्रज्ञान काळाच्या पडद्याआड गेलेले असेल, असा अंदाज ‘एरिक्सन इंडिया’चे नेटवर्कप्रमुख नितीन बन्सल यांनी व्यक्त केला. दूरसंचार कंपन्यांमध्ये सुरू असणाऱ्या दरयुद्धामुळे येत्या काही दिवसांत फोर-जी तंत्रज्ञान आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान घराघरात पोहोचेल, असेही बन्सल यांना वाटते. सध्या थ्री-जीची जागा फोर-जी घेत असून, थ्री-जीच्या तुलनेत फोर-जी सुसह्य असल्याचे मत ग्राहकांनी नोंदवले आहे.

▪️ब्रॉडबँडही होतेय लोकप्रिय

ब्रॉडबँडचे विकसित होत जाणारे तंत्रज्ञान आणि वाढणारा वेग या कारणांमुळे त्याचाही देशात विस्तार होत असल्याचे ‘एरिक्सन मोबिलिटी’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

▪️स्मार्टफोनच्या संख्येतही वाढ

सध्या देशातील एकूण मोबाइलधारकांपैकी ३० टक्के स्मार्टफोनधारक आहेत. हेच प्रमाण २०२२मध्ये वाढून ६० टक्क्यांवर जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

▪️व्हिडिओमुळे डेटावापरात वाढ

ऑनलाइन व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे मोबाइल डेटा वापराच्या प्रमाणाताही वाढ झाली आहे. २०१६च्या अखेरीस एक स्मार्टफोनधारक सरासरी चार जीबी डेटा वापरत असल्याची नोंद आहे. मात्र, २०२२पर्यंत हेच प्रमाण वाढून ११ जीबीवर जाईल, असेही अहवालात म्हटले आहे. २०१६च्या अखेरीस देशातील डेटावापराचे प्रमाण दरमहा १ एक्झाबाइट अर्थात १० लाख टेराबाइट्स असल्याचे नोंदविण्यात आले आहे. हेच प्रमाण २०२२मध्ये वाढून दरमहा आठ एक्झाबाइट्सपर्यंत जाईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

▪️व्हॉट्सअॅप’ची बोलु कौतिके!

अँड्रॉइड स्मार्टफोनवर सर्वाधिक वापर होणाऱ्या अॅपमध्ये ‘व्हॉटसअॅप’ अद्याप आघाडी टिकवून असून, त्यापाठोपाठ यूट्यूबचा क्रमांक लागतो. तर, अॅपल स्मार्टफोनवर फेसबुकने अव्वल स्थान मिळवले आहे. दोन्ही ऑपरेटिंग सिस्टीमवर गुगल मॅप्सने तिसरे स्थान पटकावले आहे.

🔹हेल्मुट कोल यांचे निधन

पूर्व आणि पश्चिम जर्मनीच्या एकीकरणात ऐतिहासिक भूमिका बजावणारे जर्मनीचे माजी चान्सलर हेल्मुट कोल यांचे निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. लुडविगशेफेन येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कोल हे १९८२ ते १९९८ या कालावधीत जर्मनीच चान्सलर होते. जर्मनीचे चान्सलरपद सर्वाधिक काळ भूषविण्याचा मान त्यांना मिळाला. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका व रशियातील शीतयुद्धामुळे जर्मनीची फाळणी झाली होती. या दोन देशांच्या मधोमध उभारली गेलेली बर्लिन भिंत ही जर्मन नागरिकांसाठी भळभळणारी जखम होती. मात्र कोल यांनी चान्सलरपदाच्या कार्यकाळात नोव्हेंबर १९८९मध्ये या दोन्ही देशांचे एकीकरण करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. युरोपीय देशांमध्ये ऐक्य असावे यासाठीही ते आग्रही होते. कोल हे दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वश्रेष्ठ युरोपीय नेते होते, अशा शब्दांत अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी कोल यांचा गौरव केला होता.

युरोचेही मानकरी

समस्त युरोपीय देशांचे एकच चलन असावे यासाठीही कोल हे आग्रही होते. फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकोई मिटरँड यांच्या साह्याने कोल यांनी ही कल्पना प्रत्यक्षात आणली व युरो हे चलन अस्तित्वात आले.

🔹बांबूच्या संवर्धनासाठी संकल्प

बांबूच्या संवर्धन व संशोधनामुळे या क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रकल्प आकाराला येत आहेत. यातूनच आदिवासीसह बेरोजगारांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. विनू काळे यांनी बांबू क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन संपूर्ण बांबू केंद्रातर्फे ११ जून संकल्प दिवस म्हणून साजरा केला जातो. बांबूच्या क्षेत्रात मेळघाटातील संपूर्ण बांबू केंद्राने सुरू केलेल्या प्रकल्प देशासाठी आदर्श असल्याचे प्रतिपादन आमदार प्रा. अनिल सोले यांनी केले.

सावरकरनगर सभागृहात आयोजित संकल्प दिवस कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. अनिल सोले यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र बांबू बोर्डाचे व्यवस्थापकीय संचालक टी.एस.के. रेड्डी, धनंजय भिडे, डॉ. निरुपमा देशपांडे, तसेच संपूर्ण बांबू केंद्राचे प्रमुख सुनील देशपांडे व्यासपीठावर उपस्थित होते. नागपूरच्या मित्र परिवारातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण बांबू केंद्राच्या माध्यमातून डॉ. निरुपमा देशपांडे व सुनील देशपांडे यांनी बांबूच्या उपयुक्तेचा अभ्यास करुन तांत्रिक कौशल्याच्या माध्यमातून आदिवासींसोबत मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात सेवावृद्धीने प्रकल्प उभा केला आहे. आदिवासीने तयार केलेल्या बांबूपासूनच्या वस्तूंना बाजारपेठ मिळून देण्यासोबतच आदिवासी कारागीरांना प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी केले आहे.

🔹शंभर टक्के कृषीकर्ज फेडणारे गाव!

सातारा जिल्ह्य़ातील बोरगावचा नवा आदर्श

कृषीकर्ज म्हटले की, ते थकीत आणि त्यानंतर कर्जमाफी अशी चर्चा कायम ऐकायला मिळते, परंतु सातारा जिल्ह्य़ातील बोरगाव नावाच्या गावातील सर्व शेतक ऱ्यांनी आजपर्यंत अनेक वेळा हे कृषीकर्ज घेतले आणि प्रत्येक वेळी ते १०० टक्के भरले आहे. सध्याच्या कर्जमाफीच्या चर्चेच्या पाश्र्वभूमीवर बोरगावचा हा लौकिक सगळय़ांच्याच नजरेत भरत आहे.

बोरगाव हे वाई तालुक्यातील कृष्णा नदीच्या तीरावर वसलेले गाव. या गावाशेजारी नदीवर १९७२ साली धोम धरण झाले आणि यामध्ये गावातील मोठे शेतीक्षेत्र बुडाले. नदीलगतची शेती गेली. गाव थोडे उंचावर, डोंगर उतारी राहू लागले. उरलेली शेतीही या डोंगरउतारावरच. यामुळे त्याला पाणी देणे अशक्य झाले. यासाठी मग गावाने एका पाणी योजनेद्वारे नदीवरून या उंचीवर पाणी आणण्याचा निर्णय घेतला. यासाठी ११ लाख रुपये खर्च येणार होता. गावातील सर्व शेतकरी छोटय़ा गटातील असल्याने त्यांच्यासाठी हा खर्च मोठा होता. मग त्यासाठी स्वत:ची शेती गहाण ठेवत या शेतक ऱ्यांनी पहिल्यांदा शेतीकर्ज काढले. या कर्जातून पाणी योजना साकार झाली आणि तब्बल शंभर एकर क्षेत्र नव्याने ओलिताखाली आले. शेती सुरू होताच या शेतक ऱ्यांनी घेतलेले कर्ज फेडून टाकले. पुढे दोन वेळा या पाणी योजनेच्या विस्तारीकरणाची गरज निर्माण झाली. पुन्हा शेतकऱ्यांच्या नावे कर्ज काढण्यात आले. या विस्तारीकरणामुळे गावातील शेतीच्या पाणीपुरवठय़ात मोठी सुधारणा झाली. शेतकऱ्यांनी या पाण्याचा वापर करत पुन्हा आपले उत्पन्न वाढवले आणि हेही कर्ज फेडून टाकले. कधीकाळी या डोंगरउतारावरच्या शेतीत केवळ पावसाळी भातपीक घेतले जायचे. आता या योजनेमुळे इथले शेतकरी बाराही महिने शेती करू लागले असून स्ट्रॉबेरी, विविध फळे, पालेभाज्यांचे उत्पादन घेत आहेत.

दरम्यान, गावातील अनेक शेतक ऱ्यांनी दरवर्षी शेतातील कामे, बियाणे, खते, कीटकनाशके यासाठीदेखील विविध पतसंस्था, व्यापारी बँका, जिल्हा बँकेकडून कृषी कर्ज घेतले. पण घेतलेले हे प्रत्येक कृषीकर्ज पेडण्याची परंपरा या गावाने निर्माण केली आणि आजवर ती कसोशीने पाळली. यामुळे सद्य:स्थितीत गावातील एकाही शेतकऱ्याच्या नावावर कुठल्याही प्रकारच्या कृषीकर्जाची थकबाकी नाही.

🔹ICC Champions trophy 2017 Ind vs Pak: भारतावर मात करुन पाकिस्तान ‘चॅम्पियन्स’ !

२०१७ सालच्या चॅम्पियन्स करंडकात पाकिस्तानने भारतावर मात करत चॅम्पियन्स करंडकाचा किताब आपल्याकडे खेचून आणलाय. अंतिम सामन्यात सरफराजच्या संघाने कोहलीच्या टीम इंडियाचा १८० धावांनी दणदणीत पराभव केला. अंतिम सामन्यात पाकिस्तानने दिलेल्या ३३९ धावसंख्येचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी पुरती ढेपाळली. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात धावांची टांकसाळ उघडणारे रथी-महारथी फलंगाज एका मागोमाग एक हजेरी लावत परत तंबूत गेले. भारताकडून एकट्या हार्दीक पांड्याने झुंज देण्याचा प्रयत्न केला.

🔹माहिती, संपर्क तंत्रज्ञान निर्यातीत भारत अग्रेसर

माहिती व संपर्क तंत्रज्ञान सेवा निर्यातीत भारत सर्वात मोठा देश म्हणून पुढे आला असल्याचे मत संयुक्त राष्ट्राने व्यक्त केले आहे. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या (डब्ल्यूआयपीओ) दहाव्या आवृत्तीत ही माहिती देण्यात आली आहे.

भारत हा आशियातील उदयोन्मुख नावीन्यपूर्ण केंद्र असल्याचे मत यात व्यक्त करण्यात आले आहे. तथापि, राजकीय स्थिरता आणि सुरक्षितता यात भारत १०६व्या क्रमांकावर आहे.

जगातील उदयोन्मुख १३० देशात भारताचे स्थान ६०वे आहे. मध्य व दक्षिण आशियात भारत प्रथम क्रमांकावर आहे. गतवर्षीच्या ६६व्या स्थानावरून भारत यंदा ६०व्या स्थानावर आला आहे.

भारत, केनिया, व्हिएतनामसह अन्य काही देशांनी आपल्या समकक्ष देशांपेक्षा या क्षेत्रात आघाडी घेतली आहे. संयुक्त राष्ट्राच्या एजन्सीच्या
मते नव्या उत्पादनांच्या संदर्भात जागतिक परिवर्तनात समृद्ध देशांचे वर्चस्व कायम आहे. सलग सातव्या वर्षी स्वित्झर्लंड अव्वल स्थानावर आहे.

भारताने अनेक बाबतीत चांगला ठसा उमटविला आहे. माहिती व संपर्क सेवा निर्यातीत भारत अग्रेसर आहे. विज्ञान आणि अभियांत्रिकीच्या पदवीधरांच्या बाबतीत भारत १०व्या स्थानावर आहे.
ई-भागीदारीबाबत २७व्या स्थानावर तर जागतिक संशोधन आणि कंपन्यांच्या विकासाबाबत भारत १४व्या स्थानावर, सरकारी आॅनलाइन सेवांच्या बाबतीत ३३व्या क्रमांकावर आहे. पायाभूत विकासाच्या बाबतीत ३२वे स्थान आणि सर्जनशील वस्तंूच्या निर्यातीत १८व्या स्थानावर आहे. बौद्धिक संपदेच्या बाबतीत
२९वे स्थान, तर नावीन्यपूर्ण गुणवत्तेत सलग दुसऱ्या वर्षी दुसऱ्या
क्रमांकावर आहे.