Post views: counter

Current Affairs February 2017 Part- 1

🔰 Current Affairs Marathi 🔰:
केंदीय अर्थसंकल्प:-
----------------------
क्षेत्रनिहाय तरतुदीः-
१. शेती विकासदर 4.1 टक्के
यंदा कृषी विकासदर 4.1 टक्के राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. येत्या पाच वर्षांमध्ये देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेमार्फत (नाबार्ड) दूध प्रकिया उद्योगांसाठी आठ हजार कोटी रुपयांची तर पीक विम्यासाठी नऊ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. याशिवाय, नाबार्डसाठी 20,000 कोटी रुपयांचा दीर्घकालीन निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असून 'पर ड्रॉप, मोर क्रॉप' या ब्रीदवाक्याअंतर्गत लघूपाटबंधारे निधीची स्थापना केली आहे. त्याचप्रमाणे, शेतकऱ्यांना 10 लाख कोटींचे कृषीकर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा सरकारने केली आहे.

२. ग्रामीण भारतासाठी 3 लाख कोटी
देशातील ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकसंख्येच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसंकल्पात 3 लाख कोटी रुपयांची विशेष तरतूद केली आहे. येत्या 2019 पर्यंत एक कोटी कुटुंबे गरिबीमुक्त करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. देशातील सुमारे पन्नास हजार ग्रामपंचायती गरीबीमुक्त करण्याची योजना असून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी 48 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी पंतप्रधान रस्ते योजनेंतर्गत दिवसाला 133 किमी रस्ते उभारले जात आहेत. या
Post views: counter

Current Affairs January 2017 Part- 5

🔰 Current Affairs Marathi 🔰:
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹शहीद पांडुरंग गावडे यांना शौर्य चक्र जाहीर

दहशतवाद्यांशी लढताना वीरगती प्राप्त झालेले मराठा लाइट इन्फंट्री व "राष्ट्रीय रायफल्स‘चे नायक पांडुरंग महादेव गावडे यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर झाले आहे. लष्करातर्फे शांतीकाळात दखविलेल्या अतुलनीय शौर्यासाठी शौर्य चक्र दिले जाते.

https://t.me/chalughadamodi/3885
जम्मू-काश्मीरमधील सीमावर्ती भागातील कुपवाडा जिल्ह्यात २१ मे २०१६ रोजी जैश ए महंमदच्या दहशतवाद्यांशी नऊ तास चकमक सुरू होती. या चकमकीत भारतीय जवानांनी पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकी दरम्यान गावडे गंभीर जखमी झाले होते. रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले गावडे हे उत्तम नेमबाज (स्नायपर), रेडिओ ऑपरेटर होते तसेच कॉम्प्युटर आणि सर्व प्रकारचे रेडिओ संच हाताळण्यात कुशल होते. ते उत्तम हॉकी, बास्केटबॉल आणि फूटबॉलपटू होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील आंबोली-मुळवंदवाडी (ता. सावंतवाडी) येथील मूळ रहिवासी असलेले गावडे मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये कार्यरत होते. काही वर्षांपूर्वी त्यांची नेमणूक जम्मू काश्मिरमध्ये अतिरेक्यांचा सामना करणाऱ्या ४१ राष्ट्रीय रायफल्समध्ये झाली होती. गावडे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. गावडे यांना घरातूनच लष्करी सेवेचे बाळकडू मिळाले होते. त्यांचे दोन मोठे भाऊ सैन्यातच कार्यरत होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सोशल मीडियावरील 'एक्झिट पोल'वरही बंदी

राज्यातील महानगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगानं एक्झिट पोलवरच्या बंदीची व्याप्ती वाढविली असून यंदा प्रथमच सोशल मीडियावरही एक्झिट पोल जाहीर करण्यास बंदी घातली आहे. आयोगानं निर्बंध घातलेल्या कालावधीत सोशल मीडियावर एक्झिट पोल जाहीर केल्यास तो निवडणूक आचारसंहितेचा भंग ठरणार आहे.

Current Affairs January 2017 Part- 4

🔰 Current Affairs Marathi 🔰:
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹बावीस टक्के विद्यार्थ्यांनाच येतो भागाकार

राज्यातील शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणारा "प्रथम' या शिक्षण संस्थेचा अहवाल बुधवारी प्रसिद्ध झाला असून, या पाहणीत विद्यार्थ्यांची गणिताबाबत घाबरगुंडी उडत असल्याचे दिसून आले आहे. 2016 च्या या अहवालात केवळ 22 टक्के विद्यार्थी भागाकार करू शकतात, असे समजले. ही भयावह स्थिती शैक्षणिक प्रगतीत मोठा अडथळा असल्याचे "प्रथम'च्या संचालिका उषा राणे यांनी सांगितले.

"महाराष्ट्र असर 2016' हा अहवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत सादर झाला. देशातील ग्रामीण भागात मुले शाळेत जातात का? त्यांना वाचन करता येते का? आणि सोपी गणिते सोडवता येतात का? याची पाहणी करण्यात आली. 3 ते 16 या वयोगटातील मुलांचे हे सर्वेक्षण होते. 5 ते 16 वयोगटातील मुलांची गणित आणि वाचनाची चाचणी घेण्यात आली. बुधवारी पत्रकार परिषदेत अहवालाचा लेखाजोखा मांडण्यात आला.

राज्यात 6 ते 14 वयोगटातील शाळेत जाणाऱ्या मुलांचे प्रमाण 99.1 टक्के आहे. पाच वर्षांखालील 96 टक्के मुले बालवाडी-अंगणवाडीत जात आहेत, असे दिसून आले. वाचनात जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी खासगी शाळांना मागे टाकले आहे. जिल्हा परिषदेच्या 41.2 टक्के आणि खासगी शाळांतील 38.8 टक्के तिसरीतील मुले दुसरीच्या स्तरावरील वाचन करू शकतात. राज्यात पहिलीतील मुलांच्या वाचनात 60.7 टक्के सुधारणा दिसून आली. देशात हे प्रमाण 53.9 टक्के आहे.

Post views: counter

Current Affairs Jan 2017 Part - 3

🔰 Current Affairs Marathi 🔰

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹'खांदेरी'ने वाढणार नौदलाची ताकद...

फ्रान्सच्या सहकार्याने येथील माझगाव गोदीत सुरू असलेल्या "स्कॉर्पिन' पाणबुड्या बांधणीच्या प्रकल्पातील "खांदेरी' या दुसऱ्या स्वदेशी पाणबुडीचे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत आज जलावतरण करण्यात आले. या अत्याधुनिक पाणबुडीमुळे स्वदेशी बनावटीच्या संरक्षण साहित्यात भारताने मोठा टप्पा गाठल्याचे मानते जाते. या पाणबुडीच्या आता चाचण्या होणार असून, या वर्षअखेर ती नौदलात दाखल होण्याची शक्यता आहे. नौदलप्रमुख ऍडमिरल सुनील लांबा या वेळी उपस्थित होते.

'खांदेरी'ची वैशिष्ट्ये:

- छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीतीचे उदाहरण असलेल्या प्रख्यात खांदेरी बेटावरून पाणबुडीचे नामकरण. "टायगर' शार्क माशालाही "खांदेरी' म्हणतात.
- बहुपयोगी पाणबुडी. सागराच्या पृष्ठभागावरून होणारा, पाणबुडीतून होणारा मारा परतवण्याची क्षमता. तसेच सुरुंग पेरणे, टेहळणी करणे, गुप्त माहिती गोळा करण्यासाठीही उपयुक्त.
- शत्रूपासून लपण्याची उच्च क्षमता, अधिक अचूक दिशादर्शक प्रणाली.
- संवाद, दळणवळणसाठी पाणबुडीवर अत्याधुनिक यंत्रणा
- सागराच्या पृष्ठभागावरून किंवा पाण्याखालून पाणतीरांचा मारा करणे, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता.
- उष्णकटिबंधीयसह कोणत्याही वातावरणात कार्य करण्यास सक्षम.
- नौदलात पहिली पाणबुडी आठ डिसेंबर 1967 रोजी दाखल झाली होती.
- "स्कॉर्पिन' श्रेणीची पहिली पाणबुडी नौदलात सहा डिसेंबर 1986 रोजी दाखल झाली होती. वीस वर्षांच्या सेवेनंतर तिला निरोप देण्यात आला.
- "खांदेरी' या वर्षअखेर नौदलात दाखल होण्याची शक्यता.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹हवाई दलप्रमुखांचे "मिग'मधून उड्डाण

हवाई दलप्रमुख एअरचीफ मार्शल बी. एस. धानोआ यांनी आज "मिग-21' या लढाऊ विमानातून उड्डाण केले.

राजस्थान सीमेवरील बारमेरजवळच्या हवाई दलाच्या उतरलाई तळावरून त्यांनी एकट्याने हे उड्डाण केले. हवाई दलाच्या प्रमुखपदाची सूत्रे एअरचीफ मार्शल धानोआ यांनी

Current Affairs Jan 2017 Part - 2

🔰 Current Affairs Marathi

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹"स्वच्छता' मानांकनासाठी राज्यातील सर्वांधिक शहरे

"स्वच्छता अभियानात' पात्र ठरून देशपातळीवरील मानांकन स्पर्धेत यशस्वी लढा देण्यासाठी राज्यातील सर्वांधिक 44 शहरे पात्र ठरली आहेत. राज्यातील शहरांचा हा आकडा यंदा प्राथमिक निकष पात्र ठरलेल्या देशातील 500 शहरांमध्ये सर्वांधिक असून, महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक लागला आहे. मागील वर्षी देशभरातील 73 शहरांमध्ये राज्यातील 9 शहरांचा समावेश होता.

"स्वच्छ भारत अभियानांतर्गत' दरवर्षी देशातील शहरांची निकष लावून निवड केली जाते. यानंतर केंद्रीय नगरविकास विभागाची पथके एका ठराविक काळात प्रत्येक शहरांना भेट देऊन स्वच्छतेची पाहणी करताना प्रत्येक शहरांना मानाकन देतात. यासाठी दोन हजार गुणांच्या परीक्षेला प्रत्येक शहराला सामोरे जावे लागते. यापैकी 1200 गुण हे घनकचरा व्यवस्थापन, हागणदारीमुक्त शहर यासाठी, तर उरलेले 800 गुण शहर, प्रशासन कागदपत्रे आदींविषयी आहेत. घनकचरा व्यवस्थापनामध्ये प्रकल्प, त्याची अंमलबजावणी, त्यातील कल्पकता, पर्यावरण, नावीन्यपूर्ण बाबी असे अनेक घटक विचारात घेतले जातात. तर हागणदारीमुक्त शहर यात शौचालये, स्वच्छता, आरोग्य आदी घटकांचा विचार करून हे गुण दिले जातात. ज्या शहराला जास्तीत जास्त गुण त्या शहराचे मानांकन सगळ्यात वरचे राहणार आहे. यामध्ये देशातील सर्वांधिक स्वच्छतेचे पहिल्या मानांकनाचे शहर ते अगदी तळाच्या म्हणजे 500 व्या स्थानावर स्थानावर असलेले शहर असे मानांकन राहणार आहे.

राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने "स्वच्छता अभियान' राबविताना यंदा राज्यातील जास्तीत जास्त शहरांचा देशपातळीवर नामांकनासाठी विचारव व्हावा, या दृष्टिकोनातून गेल्या आठ महिन्यांपासून काम केले. त्यानुसार घनकचरा व्यवस्थापन, त्यातील गती, हागणदारीमुक्तीच्या दिशेने योग्य कार्यवाही, यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. यासाठी जागतिक स्तरावरील जाणकारांच्या कार्यशाळा, शहरपातळीवरील नगरविकास विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांना "उद्दिष्ट पूर्तीचे' लक्ष्य दिले. त्यानुसार अंमलबजावणी केल्यामुळे 44 शहरे प्राथमिक निवडीचे निकष पार करू शकली.

केंद्रीय पथके 4 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2017 या कालावधीत या शहरांची पाहणी करून मानांकन करणार आहेत. यानंतर 15 फेब्रुवारीच्या दरम्यान देशातील 500 शहरांचे मानांकन जाहीर केले जाणार आहे.

मानांकनाच्या शर्यतीतील शहरे