History लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
History लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Post views: counter

लॉर्ड चेम्सफोर्ड (१९१६ – १९२१)


लॉर्ड चेम्सफोर्ड (१९१६ – १९२१) 

 
 
लॉर्ड चेम्सफोर्डच्या काळातील महत्वपूर्ण घटना –  
 
  1.  १९१६ मध्ये दोन ठिकाणी होमरूल लीगची स्थापना करण्यात आली. जून १९१६ मध्ये लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात केली तर सप्टेंबर १९१६ मध्ये श्रीमती अॅनी बेझंट यांनी मद्रास प्रांतात होमरूल लीगची स्थापना केली.
  2. १९१६ मध्ये कॉंग्रेसचे ऐतिहासिक अधिवेश लखनौ येथे पार पडले. जहालाना कॉंग्रेसमध्ये प्रवेश मिळावा म्हणून अॅनी बेझंटनी महत्वाची भूमिका निभावली.
  3. १९१६ मध्ये कॉंग्रेस व मुस्लीम लीगमध्ये “लखनौ करार” झाला. या करारांतर्गत दोघांनीही एकमेकांना मदत करण्याचे आश्वासन दिले. हा करार करण्यामध्ये टिळकांची महत्वाची भूमिका होती.
  4. १९१६ मध्ये गांधीजीनी गुजरातमध्ये साबरमती आश्रमाची स्थापना केली.
  5. १९१७ साली बिहारमध्ये गांधीजीनी चंपारण्य सत्याग्रह घडवून आणला.
  6. १९१८ मध्ये अहेमदाबाद येथे गिरणी कामगारांचा संप आणि खेडा येथे शेतक-यांचा सत्याग्रह यशस्वी झाला.
Post views: counter

वेलस्लीची कारकिर्द (१७९८ - १८०५) :

वेलस्लीची कारकिर्द (१७९८ - १८०५)


                      र्लॉड वेलस्नलीची कारकिर्द अनेक लढाया व त्यात त्याने मिळविलेले विजय व त्यांच्या मुत्सद्देगीरीने गाजली. हिंदी राजांना आपल्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी व त्यांचा जास्तीत जास्त प्रदेश आपल्या ताब्यात आणण्यासाठी त्याने तैनाती फौजेची पध्दत राबवली या योजनेत त्यास फार मोठे यश मिळाले.
  • तैनाजी फौजेची पध्दतीच्या धोरणाचे स्वरूप :
तैनाती फौज स्वीकारणार्‍या शासनकत्र्यास पुढील अटी स्वीकारव्या लागत असत.
(१) परराज्यांशी इंग्रजांच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवता येणार नाही.
(२) मोठया राज्यांना शांतता व सुव्यवस्थेसाठी ंकंपनीची मोठी फौज ठेवावी लागेल. या फौजेचे नियंत्रण इंग्रज अधिकार्‍यांच्या हातात राहील. या फौजेच्या खर्चासाठी आपल्या राज्यातील काही मुलुख कंपनीला कायमचा तोडून द्यावा लागेल. लहान राज्ये यात दरवर्षी कंपनीस ठरावीक रक्कम देतील.

वॉरन हेस्टिंग्जची कारकिर्द (१७७२ ते १७८५)

वॉरन हेस्टिंग्जची कारकिर्द (१७७२ ते १७८५)

                      १७७२ वॉरन हेस्टिंग्ज बंगालचा गव्हर्नर म्हणून भारतात आला. त्या वेळी कंपनीची आर्थिक स्थिती खूप खालावली होती. खजिना रिकामा पडला होता. कंपनीच्या अधिकार्‍यात लाचलुचपत वाढली होती. बंगालमध्ये अराजकाता वाढली होती. शहा आलम बादशहाने मराठयांचा आश्रय घेतला होता. मराठे व हैदर यांच्या सज्ञ्ल्त्;ाा या काळात प्रबळ होत्या. हेस्ंिटग्जने अनेक महत्वाच्या सुधारण केल्या. त्यांने व अयोध्येच्या बेगमांचे प्रकरण यात भाषांतरांवरूनरष्ट मार्गाचा अवलंब करुन त्याने कंपनीस प्रचंड पैसा मिळवून दिला. पण त्यामुळे कंपनीची बदनामी झाली.
                    वॉरन हेस्टिग्जंच्या काळात पहिले इंग्रज मराठा युध्द (१७७८ ते १७८२) उदभवले. नारायणराव पेशवे यांच्या खुनानंतर राघोबादादा इंग्रजांच्या आश्रयास गेले.
Post views: counter

राजर्षी शाहू महाराज

राजर्षी शाहू महाराज


                          राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सर्वोत्तम उदाहरण घालून देणारे आदर्श शासनकर्ते आणि बहुजनांमध्ये प्रचंड आत्मविश्र्वास निर्माण करणारे द्रष्टे समाजसुधारक ! चौथे शाहू, अर्थात राजर्षी छत्रपती शाहू
महाराज , ( जून २६ , इ.स. १८७४ - मे ६ , इ.स. १९२२) हे कोल्हापूर संस्थानाचे इ.स. १८८४-१९२२ सालांदरम्यान छत्रपती होते.
                           राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेतले. १८९४ मध्ये महाराजांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर १९२२ पर्यंतची २८ वर्षांची त्यांची कोल्हापूर संस्थानातील कारकीर्द महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरते.
Post views: counter

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

  • होळकर घराणे:

होळकर घराणे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील होळ या गावचे. घराण्याचे मूळपुरूष मल्हारराव होळकर यांनी छत्रपतींनी माळवा प्रांताची सुभेदारी दिली.त्यांनी इंदौर संस्थानाची स्थापना केली.याच घराण्यातील पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर स्वतःचे राज्य स्वबळावर मिळवून राज्यभिषेक करून घेणारा एकमेव राजा "महाराजा यशवंतराजे होळकर" तसेच भारतामध्ये रेल्वे चालू करण्यासाठी ब्रिटीशांना कर्ज देणारे तुकोजीराजे होळकर हे याच घराण्यातले.'   दिल्लीतील 'रायसीना' हा भुभाग होळकरांच्या अधिपत्यात होता.याच रायसीना ग्राममध्ये 'होळकर उद्यान' होते.आज याच 'रायसीना होळकर इस्टेट मध्ये' आपले राष्ट्रपती भवन,संसदभवन,केंद्रीय सचिवालस आदि भव्य वास्तु दिमाखाने उभ्या आहेत. प्रजासत्ताक दिनादिवशी राष्ट्रपती भवनावरती 'होळकरांचा राजेशाही झेंडा' डौलाने फडकत आहे.तसेच राष्ट्रपतींच्या आगमव प्रसंगी प्रथम येणारे घोडदळ डौलाने होळकरांचा राजेशाही झेंडा मिरवत आणते. 

  •  जन्म:अहिल्याबाई यांचा जन्म नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील सीना नदी काठच्या "चौंडी" या गावात ३१-मे-१७२५ रोजी जन्म झाला.     
  • विवाह: श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांनी आपला मुलगा खंडेराव यांचा विवाह अहिल्येशी करण्याची मागणी केली.अहिल्या व खंडेराव यांचा लग्न सोहळा पुण्यातील शनिवारवाडा परिसरात "सातारकर छत्रपती शाहू महाराज{थोरले}" यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

भारतातील व्हाईसरॉय

भारतातील व्हाईसरॉय 
  1. लॉर्ड कॅनिंग - 1856-1862
  2. लॉर्ड एलिगन - 1862-1863
  3. सर जॉन लॉरेन्स - 1864-1869
  4. लॉर्ड मियो - 1869-1872
  5. लॉर्ड नॉर्थब्रूक - 1872-1876
  6. लॉर्ड लिटन - 1876-1880
  7. लॉर्ड रिपन - 1880-1884
  8. लॉर्ड डफरिन - 1884-1888
  9. लॉर्ड लॅन्सडाऊन 1888-1894

लोकमान्य टिळक

लोकमान्य टिळक 

                                   टिळकांचा जन्म २३ जुलै इ.स. १८५६ मध्ये रत्‍नागिरीमधील मधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. टिळकांचे पूर्वज रत्‍नागिरीजवळील चिखलगावाचे खोत होते.
                                 गंगाधरपंतांचे ते तीन मुलींनंतरचे चौथे अपत्य होते. त्यांचे खरे नाव केशव ठेवले असले तरी सर्वजण त्यांना बाळ या टोपणनावानेच ओळखत असत.त्यांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक प्रसिद्ध शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. लहानपणापासूनच टिळक अत्यंत हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना गणितामध्ये विशेष गती होती. टिळकांना लहानपणापासूनच अन्यायाबद्दल चीड होती. वयाच्या दहाव्या वर्षी गंगाधर टिळकांची बदली पुण्याला झाली. पु्ण्यातील वास्तव्याचा मोठा परिणाम टिळकांच्या आयुष्यावर झाला. त्यांनी पुण्यात एका अँग्‍लो-व्हर्न्याक्युलर शाळेत प्रवेश घेतला. तेथे त्यांना अनेक प्रसिद्ध शिक्षकांच्या हाताखाली शिकण्याची संधी मिळाली.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

विठ्ठल रामजी शिंदे 


जन्म - 23 एप्रिल 1873, जामखिंडी, कर्नाटक. 
मृत्यू - 2 जानेवारी 1944.

1932 - 33: 
  1. बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड परितोषिक.
  2. 'महाराष्ट्राचे अपेक्षित मानकरी' गं. बा. सरदार.
  3. 'निष्काम कर्मयोगी', भाई माधवराव बागल.
  4. जनतेकडून 'महर्षी' ही पदवी.
  5. अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रश्र्न राष्ट्रीय एकात्मतेशी जोडला. 
संस्थात्मक योगदान :
  1. 1905 - मुंबई येथे तरुण अस्तिकांचा संघ स्थापन.

समाजसुधारकांची वृत्तपत्रे

समाजसुधारकांची वृत्तपत्रे व संपादक


  1. दर्पण - बाळशास्त्री जांभेकर - 6 जानेवारी 1832
  2.  दिग्दर्शन (मासिक) - बाळशास्त्री जांभेकर - 1840
  3.  प्रभाकर (साप्ताहिक) - भाऊ महाराज
  4.  हितेच्छू (साप्ताहिक) - लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख
  5.  काळ (साप्ताहिक) - शी.म.परांजपे
  6.  स्वराज्य पत्र (साप्ताहिक) - शी.म.परांजपे
  7.  केसरी - लोकमान्य टिळक
Post views: counter

समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था

  1. ब्राहमो समाज - 20 ऑगस्ट 1828 - राजा राममोहन रॉय
  2. तत्वबोधिनी सभा - 1838 - देवेंद्रनाथ टागोर
  3. प्रार्थना समाज - 31 मार्च 1867 - दादोबा पाडुरंग तर्खडकर, रानडे, भांडारकर
  4. परमहंस सभा - 31 जुलै 1849 - भाऊ महाराज , दादोबा पाडुरंग तर्खडकर
  5. आर्य समाज - 10 एप्रिल 1875 - स्वामी दयानंद सरस्वती
  6. रामकृष्ण मिशन - 1896 - स्वामी विवेकानंद
  7. थिऑसॉफिकल सोसायटी - 1875 - कर्नल ऑलकॉट व मादाम ल्लाव्हट्स्कि
  8. सत्यशोधक समाज - 1875 - महात्मा फुले
  9. भारत कुषक समाज - 1955 - पंजाबराव देशमुख
Post views: counter

लॉर्ड आयर्विन (१९२६ – १९३१)

                            लॉर्ड आयर्विन (१९२६ – १९३१) 

लॉर्ड आयर्विनच्या काळातील महत्वपूर्ण घटना –


१) सायमन कमिशन :
  1. १९१९ च्या माँटेग्यु चेम्सफोर्ड कायद्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने शिफारशी करण्यासाठी तत्कालीन भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी भारतात सायमन कमिशन पाठविण्याची घोषणा केली. तेंव्हा ब्रिटनचे पंतप्रधान सर रॅम्से mमॅक्डोनॉल्ड हे होते. घोषणेनुसार त्यांनी ७ सदस्य असलेली एक समिती इस. १९२७ मध्ये नियुक्त केली. या समितीच्या अध्यक्षपदी सर जॉन सायमन यांची नियुक्ती करण्यात आली. या समितीतील सातही सदस्य इंग्रज असल्यामुळे भारतीयांनी सायमन कमिशनला विरोध केला. 
  2. इस. १९२८ मध्ये सायमन कमिशनने भारतभर दौरा केला. ठिकठिकाणी “सायमन गो बॅंक” ही घोषणा देवून सायमन कमिशनला विरोध करण्यात आला. अशाच एका मोर्चाचे नेतृत्व करणा-या लाला लजपतराय यांच्यावर लाठी हल्ला झाला. थोड्या दिवसातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 
  3. १० ऑगस्ट १९२८ रोजी नेहरू अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. मुस्लीम लीग व हिंदू महासभेने नेहरू अहवाल फेटाळून लावला. 

साावित्रीबाई फुले

साावित्रीबाई फुले 
सावित्रीबाई फुले

  • जन्म : नायगाव-सातारा जिल्हा, जानेवारी ३, इ.स. १८३१.
  • मृत्यू : पुणे, मार्च १०, इ.स. १८९७.
                         सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. इ.स. १८४० साली जोतिराव फुल्यांशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीबाईचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले. सावित्रीबाईंचे पती जोतिराव फुले यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही.त्यांची मावस बहीण सगुणा-आऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाआऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. 
Post views: counter

स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाचा अभ्यास कसा करावा ?

                        राज्य सेवा मुख्य परीक्षेत इतिहास घटकाची तयारी करताना भारताचा- विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासणे आवश्यक आहे.  राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर-१ मधील इतिहास या विषय घटकाच्या अभ्यासाविषयी या लेखात चर्चा करू.

                        ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना या मुद्दय़ाच्या अनुषंगाने प्रमुख भारतीय सत्तांविरूद्ध युद्धे, तनाती फौज धोरण, खालसा धोरण, १८५७ पर्यंतची ब्रिटिश राज्याची रचना हा पूर्णपणे तथ्यात्मक भाग असून याचा तक्त्यांच्या स्वरूपात अभ्यास करणे सोयीचे ठरेल. आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास (१८१८ ते १८५७) अभ्यासताना वृत्तपत्रे, रेल्वे, टपाल व तार, उदय़ोगधंदे, जमीन सुधारणा व सामाजिक-धार्मिक सुधारणा यांचा समाजावरील परिणाम हे घटक अभ्यासताना या विषयीच्या बाबी कालक्रमाने लक्षात घ्याव्यात. १८१८ ते १८५७ व त्यानंतर काँग्रेसच्या कालखंडामध्ये या मुद्दय़ांची भूमिका, महत्त्व काय होते याचा अभ्यास करावा.
सामाजिक, सांस्कृतिक बदलांचा अभ्यास करताना ख्रिश्चन मिशनबरोबरचे संबंध, इंग्रजी शिक्षण व मुद्रणालयाचे आगमन, अधिकृत सामाजिक सुधारणांचे उपाय (१८२८ ते १८५७), सामाजिक-धार्मिक सुधारणांच्या चळवळी जसे- ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, शीख तसेच मुस्लीम धर्मीयांतील सुधारणा चळवळी, अस्पृश्यतेच्या निर्मूलनासाठी सुरू करण्यात आलेले डिप्रेस्ड क्लासेस मिशन, ब्राह्मणेतर चळवळ व जस्टिस पार्टी यांचा अभ्यास आवश्यक आहे. सत्यशोधक समाज, अस्पृश्यता निर्मूलनासाठी चळवळी इत्यादींचा अभ्यास करतेवेळी गांधी युगातील त्यांच्या वाटचालींचा अभ्यास जास्त बारकाईने व सविस्तर करणे आवश्यक  आहे.

इतिहास घटकविषयाचा तार्किक अभ्यास

                                   इतिहास हा समाज समजून घेण्याचा एक दृष्टिकोन आहे. त्यामुळे या विषयाचा तार्किक अभ्यास सोपा आणि परिणामकारक ठरतो. कालानुक्रमाची जंत्री पाठ करण्यापेक्षा अधिक स्वारस्यपूर्ण असं बरंच काही या विषयात आहे, हे लक्षात घ्यायला हवं.

                                   प्रशासनात काम करताना अधिकारी हे कल्याणकारी राज्याचे प्रतिनिधित्व करत असतात. नफ्या-तोटय़ाच्या तराजूपेक्षा जनतेच्या 'कल्याणा'चे मापदंड इथे जास्त महत्त्वाचे ठरतात. हे कल्याणकारी कामाचे मापदंड समाजाची रचना, वैशिष्टय़े आणि इतिहास यांच्या आधारे ठरवले जातात. त्यामुळेच स्पर्धापरीक्षांच्या अभ्यासक्रमामध्ये 'इतिहास' हा घटक निरपवादपणे समाविष्ट असतो. 'इतिहासा'च्या समावेशाचे हे कारण लक्षात घेतले तर कालानुक्रमाची जंत्री पाठ करण्यापेक्षा  स्वारस्यपूर्ण अशा अनेक गोष्टी या विषयात आहे, हे लक्षात येईल. 'इतिहास' हा समाज समजून घेण्याचा एक दृष्टिकोन आहे. त्यामुळे या विषयाचा तार्किक अभ्यास सोपा आणि परिणामकारक ठरतो, हे लक्षात घ्यायला हवे.
                                  मुख्य परीक्षेमध्ये आधुनिक भारत व महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासणे आयोगाला अभिप्रेत आहे. हा पूर्ण भाग पूर्वपरीक्षेतही असल्याने एकत्रितपणे अभ्यास वेळेच्या बचतीसाठी आवश्यक आहे. प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाच्या अभ्यासाची रणनीती आपण पूर्वपरीक्षेच्या विभागात सविस्तरपणे पाहिली आहे. आधुनिक इतिहासाच्या तयारीसाठीची पद्धत या प्रकारामध्ये पाहू या.

स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख नेत्यांची नावे

 ● स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख नेत्यांची नावे ●

१) सुभाषचंद्र बोस ------------------------ नेताजी
२) रविंद्रनाथ टागोर ---------------------- गुरुदेव
३) पंडित जवाहरलाल नेहरू ------------ चाचा
४) मोहनदास करमचंद गांधी ----------- राष्ट्रपिता
५) मोहनदास करमचंद गांधी ----------- महात्मा
६) महात्मा गांधी ------------------------- बापू
७) खान अब्दुल गफार खान -------------सरहद्द गांधी
८) खान अब्दुल गफार खान ------------ बादशहाखान
९) विनोबा भावे ------------------------- आचार्य
१०) जे. बी. कृपलानी -------------------- आचार्य
११) बाळ गंगाधर टिळक --------------- लोकमान्य
१२) चक्रवर्ती राजगोपालाचारी ---------- राजाजी
१३) वल्लभभाई पटेल ------------------- सरदार

महर्षी धोंडो केशव कर्वे

स्त्री शिक्षणाचे प्रणेते महर्षी धोंडो केशव कर्वे 
Dhondo Keshav Karve

                               महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपलं १०४ वर्षांचं जीवन वाहिलेल्या धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे यांची आज १५८ वी जयंती आहे. त्यांचा जन्म जन्म १८ एप्रिल, इ.स. १८५८ साली रत्नागिरी जिह्याच्या खेड तालुक्यातील शेरावली या गावी एका निम्न मध्यमवर्गीय घरात झाला. ते स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे मराठी समाजसुधारक होते. इ.स. १९०७ साली त्यांनीमहाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली. त्यांनी एसएनडीटी या महिला महाविद्यालयाचीही स्थापन केली होती. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून १९५८ साली वयाच्या १००व्या वर्षी त्यांना भारतरत्न या सर्वोच्च किताबाने गौरविण्यात आले होते.
  • बालपण आणि तारूण्य
रत्नागिरी जिल्ह्यातील मुरूड हे अण्णांचे गाव. शिक्षणासाठी त्यांना खूप पायपीट करावी लागली.इ.स. १८८१ मधे मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मुंबईच्या एल्फिन्सटन कॉलेजातून त्यांनी गणिताची पदवी संपादन केली.वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला. राधाबाई त्या वेळी ८

डॉ. बाबासाहेब आंबेडकर


 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • जन्मतारीख: एप्रिल १४, इ.स. १८९१
  • निधन: ६ डिसेंबर, इ.स. १९५६
  • भारताचे घटनालेखक
  • जन्मस्थान: महू, मध्य प्रदेश
                         डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल, इ.स. १८९१; महू, मध्य प्रदेश - ६ डिसेंबर, इ.स. १९५६; दिल्ली) हे मराठी, भारतीय कायदेतज्ज्ञ व राजकारणी होते. स्वातंत्र्योत्तर काळात भारताची राज्यघटना बनवणार्‍या मसुदासमितीचे ते अध्यक्ष होते. दलितांच्या उद्धारासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. इ.स. १९९० साली भारतीय शासनाने त्यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले.
सामाजिक आणि अर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणाऱ्या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते. नंतर कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांतील अभ्यास व संशोधन यांसाठी त्यांना कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून विविध पदव्या मिळाल्या.

बाबासाहेब आंबेडकर

  • सुरुवातीचे जीवन
                          मोलोजीराव हे रामजींचे वडील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा होते. सुभेदार रामजी हे मालोजीरावांचे सुपुत्र आणि डा. बाबासाहेब आंबेडकर याचे आदर्श वडील होते. आजोबा मालोजीराव

ब्रिटिश जमीनदारी पद्धती :कायमधारा पद्धती

ब्रिटिशकालीन जमीनदारी पद्धती

ब्रिटिश अंमल स्थिर होताना बिटिशांनी मुख्यतः कायमधारा पद्धती बिहार, बंगाल, ओरिसा या भागांत, तर तात्पुरता सारा पद्धत इतर प्रदेशांसाठी निश्चित केली. शेतसारा वसूल करण्याचा अधिकार जमीनदारांना देण्यात आला. प्रत्येक शेतकऱ्यावरील सारा परंपरेनुसार कायम करण्यात आला. लॉर्ड कॉर्नवॉलिस (कार. १७८६-९३) गव्हर्नर जनरल असताना १७९३ मध्ये ही पद्धत सुरू झाली. कायमधारा पद्धतीत शेतसाऱ्याच्या १०/११ भाग सरकारकडे जमा करायचा व /११ भाग जमीनदाराने घ्यावयाचा, असे निश्चित करण्यात आले होते. तात्पुरता सारा पद्धतीत त्या प्रदेशात उत्पन्न होणाऱ्या प्रमुख पिकांचे दर एकरी उत्पादन, शेतमालाच्या किंमती, जमिनीची खंडाने द्यावयाची व विक्रीची किंमत; तसेच उत्पादनाचा सरासरी खर्च या गोष्टी लक्षात घेऊन १५ ते ४० वर्षांसाठी आकारणी केली जावी, अशी तरतूद होती. तात्पुरता सारा पद्धतीनुसार जमीनदार, मालगुजार वगैरे मध्यस्थांबरोबर करार करण्यात येत असत. 

कायमधारा पद्धती
  • ➨ या पद्धतीला जागीरदारी,मालगुजारी,बिस्वेदारी म्हणून ओळखले जाते.
  • ➨ हि पद्धत लागू करण्यासाठी लॉर्ड कोर्नवालीसने जॉन शोअर याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली.
  • ➨ जॉन शोअरच्या अहवालानुसार 'जमीनदार हेच जमिनीचे मालक असल्याचे आणि त्यांना परंपरागत अधिकार असल्याचे नमूद करण्यात आले.
  • ➨ कोर्नवालीसने हि पद्धत १७९३ मध्ये बंगाल,बिहार,ओरिसा कालंतराने मद्रास व वाराणसी येथे सुरु केली.
  • ➨ या पद्धतीत सारा वसुलीचा अधिकार जमिनदारांना देण्यात आला व ते जमिनीचे मालक बनले म्हणून हिला जमीनदारी पद्धती असे नाव पडले.
  • ➨ इ स १७९३ मध्ये कोर्नवालीसने हि व्यवस्था कायमस्वरूपी लागू केली म्हणून या पद्धतीला कायमधारा पद्धत असे नाव पडले.
Post views: counter

भारतीय इतिहासातील काही महत्वाच्या सनावळ्या, ऐतिहासिक घटना

भारतीय इतिहासातील काही महत्वाच्या सनावळ्या, ऐतिहासिक घटना, वर्षे व स्थळे
  1. १८२९ : सती बंदीचा कायदा
  2. १८४८ः महात्मा फुल्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा काढली.
  3. १८५६ : विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा.
  4. १८५७ : मुंबई, चेन्नई व कोलकाता येथे विद्यापीठांची स्थापना
  5. १८७६ : वासुदेव बळवंत फडके यांचा सशस्त्र उठाव
  6. १८८५ : राष्ट्रीय काँग्रेस सभेची स्थापना.
  7. १८९१ : विवाह संती वयाचा कायदा.
  8. १८९२ : कौन्सिल सुधारणा कायदा संत.
  9. १८९३ : महात्मा गांधी वकिलीच्या कामानिमित्त द.आफ्रिकेत
  10. १९०० : ङ्कमित्रमेळाङ्क ही क्रांतिकारी संघटना स्थापन.
  11. १९०४ : अभिनव भारतची स्थापना
  12. १९०५ : बंगालची फाळणी व रशिया-जपान युद्ध.
  13. १९०६ : राष्ट्रीय सभेच्या चतुःसूत्रीची घोषणा.
  14. १९०६ : मुस्लीम लीगची स्थापना.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (२८ मे, इ.स. १८८३:भगूर - २६ फेब्रुवारी, इ.स. १९६६) 

                            स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी भाषेतील कवी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाचा तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते.

Vi.Da. Savarkar