Post views: counter

How To Face CSAT In Civil Service Exams ?



                           पूर्व परीक्षा पेपर २ हा अभिव्यत्ती परीक्षणासाठीचा पेपर आहे. उमेदवारांची तर्क करण्याची, विश्लेषण करण्याची व निर्णय घेण्याची क्षमता तसेच त्यांचे आकलन या पेपरद्वारे तपासले जाते. ऐनवेळी समोर आलेल्या प्रश्नांना विचार करून प्रतिसाद द्यायचा असतो आणि उत्तीर्ण व्हायचे तर हा प्रतिसाद, उत्तर अचूक असणे गरजेचे असते. पाठांतराच्या वा स्मरणशक्तीच्या आधारावर या पेपरमधील प्रश्नांची उत्तरे देणे शक्य नाही. पेपरचे व प्रश्नांचे हे स्वरूप लक्षात घेता या पेपरामध्ये प्रत्येकी दोन ते पाच गुणांसाठी ८० प्रश्न विचारण्यात येतात.
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास लक्षात येते की, एखाद्या विभागावर किती गुणांचे प्रश्न विचारायचे याबाबत आयोगाने लवचिकता ठेवली आहे. मात्र, ढोबळमानाने उपघटकांसाठी प्रश्नसंख्या पुढीलप्रमाणे असल्याचे दिसून येते-

  • आकलनासाठी ५० प्रश्न. यामध्ये मराठी भाषा आकलन व इंग्रजी भाषा आकलन यांसाठी प्रत्येकी पाच ते सात प्रश्न असतात आणि बाकीचे ३७ ते ४० प्रश्न सर्वसाधारण आकलनासाठी विचारण्यात येतात.
  • गणित व सामग्री विश्लेषणावर साधारणपणे १० ते १२ प्रश्न.
  • ताíकक क्षमता व सामान्य बौद्धिक क्षमतेवर साधारण पाच ते आठ प्रश्न.
वरील विश्लेषणाच्या अनुषंगाने विभागवार तयारी व पेपर सोडवणे या दोन्हींसाठी योजना ठरवावी लागेल.
 आकलन                            आकलनक्षमता तपासण्यासाठी 'उताऱ्यावरील प्रश्न' विचारण्यात येतात. मात्र गोंधळात टाकणारे पर्याय प्रश्नाखाली दिले असल्याने उताऱ्याचे नेमके आकलन होणे आवश्यक असते. उताऱ्यांच्या लांबीप्रमाणे प्रश्नांची संख्या कमी-जास्त होईलच असे नाही. खूप मोठय़ा उताऱ्यावरही दोन वा तीनच प्रश्नही विचारण्यात आले आहेत. त्यामुळे पेपर सोडवताना एखाद्या उताऱ्यावर किती प्रश्न विचारले आहेत ते पाहून मगच तो आकलनासाठी वाचायला घ्यावा.
                          उताऱ्याचा बारकाईने अभ्यास करणे आवश्यक नसते. मात्र उतारा घाईघाईने वाचायचा हलगर्जीपणाही करू नये. आकलन करत वाचताना वरवरच्या वाचनापेक्षा जास्त वेळ लागतोच. त्यामुळे आकलनाच्या प्रश्नांचा सराव अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी एखादा प्रश्नसंच घेऊन आधी वेळ न लावता बरोबर उत्तरे शोधण्याचा सराव करावा. अशा १०-१५ उताऱ्यांनंतर वेळ लावून प्रश्न सोडवायचा सराव सुरू करावा. साधारणपणे ३००-३५० शब्दांवरील उताऱ्यावरचे पाच प्रश्न सोडवायला पाच ते सात मिनिटे इतका अवधी पेपरमध्ये ढोबळमानाने उपलब्ध होतो हे मागील प्रश्नपत्रिका पाहिल्यास लक्षात येते. असा वेग गाठण्यासाठी सराव आवश्यकच आहे.
  1. आकलनासाठीचे उतारे अनेक उमेदवारांना 'अवघड' वाटतात. कारण या उताऱ्यांचा भावार्थ तिरकस किंवा उपरोधी असतो.
  2. काही वेळा पारिभाषिक संज्ञांचा वापर जास्त असतो.
  3. जयंत नारळीकर यांच्या पुस्तकातील एक उताराही प्रश्नपत्रिकेमध्ये विचारण्यात आला होता, हे लक्षात घ्यावे.
  4. यासाठी आघाडीच्या वृत्तपत्रांतील लेख घेऊन त्यांचा आकलनासाठी सराव करावा.
  5. तसेच भाषा 'अवघड' वाटेल अशा पुस्तकांचे नियमित वाचनही आवश्यक आहे.
                            इंग्रजी भाषा आकलनासाठी व्याकरण पक्के असायलाच हवे. एखाद्या शब्द व वाक्प्रचाराच्या अर्थात अंदाज एखाद्या वाक्यावरून किंवा एका परिच्छेदाच्या अर्थावरून बांधता यावा यासाठी भरपूर सराव आणि वाचन आवश्यक आहे.
गणित व सामग्री विश्लेषण
                            या दोन्ही भागांवर मिळून साधारण १० ते १२ प्रश्न विचारण्यात येतात. मात्र ही प्रश्नसंख्या वाढू शकते. सामग्री विश्लेषणाच्या प्रश्नांमध्ये भागीदारी, टक्केवारी, गुणोत्तर अशा पायाभूत गणिती प्रक्रियांचाच वापर करायचा असतो. त्यामुळे या विभागात पायाभूत अंकगणिताचा व भूमितीचा अभ्यास पक्का असणे गरजेचे आहे.
या भागाच्या तयारीसाठी २० पर्यंतचे पाढे, २० पर्यंत संख्यांचे वर्ग, घन पाठ असणे आवश्यक आहे. लसावि, मसावि, गुणोत्तर-प्रमाण, probobility, मध्य-मध्यगा (mean-mode-median) व वर्ग समीकरणांची सूत्रे आणि भूमितीमधील मूलभूत सूत्रे व समीकरणे पाठ असावीत. या सूत्रांचा शाब्दिक उदाहरणांमध्ये वापर करायचा सराव परीक्षेपर्यंत करत राहायला हवा.
तार्किक क्षमता व सामान्य बौद्धिक क्षमता
                           तार्किक क्षमतेच्या प्रश्नांमध्ये आकृत्या, संख्यामालिका, कूट-भाषा, सांकेतिक भाषा असे प्रकार समाविष्ट असतात हे प्रश्न सोडविण्यासाठी बारकाईने निरीक्षण करण्याचा सराव आवश्यक असतो. यासाठी अशा प्रकारचे प्रश्न वारंवार सोडवावेत. दोन चित्रांमधील फरक ओळखणे इत्यादी. वृत्तपत्रांमध्ये येणाऱ्या कोडय़ांचाही सराव यासाठी उपयोगी ठरेल. कथनांवरून निष्कर्ष काढायच्या प्रश्नामध्ये दिलेली कथने वास्तवाशी विसंगत असली तरीही खरी समजून निष्कर्ष काढायला हवा.
                            वस्तूंचे रंग, आकार, आकारमान किंवा व्यक्तींचे छंद, काम, खेळ यासंबंधीचे संयुक्त प्रश्न सोडविण्यासाठी तक्ता तयार करावा. दिलेल्या वाक्यांची माहिती तक्त्यात लिहावी आणि त्याचे विश्लेषण करून टेबलमधील बाकीच्या जागा भराव्यात. त्या आधारावर प्रश्नांची उत्तरे द्यावीत.
अनुक्रमावर आधारित प्रश्नांसाठी एक सरळ रेषा आखून प्रत्येक विधानाप्रमाणे व्यक्तीची वा वस्तूची जागा भरत गेल्यास योग्य अनुक्रम सापडतो. वर्तुळातील अनुक्रमामध्ये प्रत्येकाची डावी व उजवी बाजू व्यवस्थित लक्षात घेणे गरजेचे असते.
                              सामान्य बौद्धिक क्षमतेमध्ये दिशा, नाती, घडय़ाळ, कॅलेंडर इत्यादींवर आधारित प्रश्न विचारले जातात. दिशाविषयक प्रश्नांमध्ये आठ दिशा दाखवून प्रश्नातील क्रमाने दिशा ठरवावी. त्रिकोणातील कर्णाची लांबी काढायचे सूत्र काही वेळा वापरावे लागते. नात्यांची नावे नेमकेपणाने माहीत असावीत. स्वत:ला प्रश्नातील व्यक्तीच्या जागी कल्पून प्रश्न सोडविल्यास त्याचा फायदा होतो. कॅलेंडरवर आधारित प्रश्नांसाठी महत्त्वाचे दिवस, लीप वर्षांमुळे पडणारा फरक या बाबी लक्षात असाव्यात.
व्यवस्थापकीय अभिवृत्ती
                            या प्रश्नांसाठी नकारात्मक गुणपद्धती लागू नाही. त्यामुळे यातील कोणताही प्रश्न सोडून देऊ नये. दिलेल्या पर्यायांमधून जास्तीत जास्त व्यवहार्य, नतिक व संवेदनशील पर्याय निवडण्यासाठी प्रसंगावधान व कॉमन सेन्सचा वापर इथे करायचा आहे. यासाठी काही गोष्टी आधी समजून घ्याव्यात. दिलेला प्रसंग व त्यामध्ये कोणाचे हितसंबंध गुंतले आहेत, ते घटक व एकूण प्रसंगांमधील सक्रिय घटक समजून घ्यावेत. त्यानंतर त्यातील स्वत:ची भूमिका समजून घ्यावी. कोणतीही ठरावीक भूमिका दिली नसल्यास सामान्य जबाबदार नागरिकाच्या भूमिकेतून तुम्ही निर्णय घेणे अपेक्षित आहे. यानंतर पर्याय पाहावेत. यातील असंवेदनशील, अधिकारांचा गरवापर करणारे,अनतिक असे पर्याय वगळावेत. उरलेल्या पर्यायांमध्ये तुलना करून उदासीन, वेळकाढूपणाचे जबाबदारी टाळणारे पर्याय बाद करावेत. तरीही तुलनेमध्ये समान वाटणारे पर्याय शिल्लक राहिलेच तर त्या क्षणी तुम्हाला योग्य वाटणारा पर्याय हेच तुमचे उत्तर असेल. एकूणच या पेपरची चांगली तयारी केवळ चांगल्या सरावानेच करता येईल.

Source : Loksatta.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा