Panchayatraj लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Panchayatraj लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Post views: counter

Gramsabha - ग्रामसभा

❇ ग्रामसभा ❇

जशी लोकसभा, विधानसभा तशी ग्रामसभा. लोकसभेचे सभासद खासदार असतात. विधानसभेचे सभासद आमदार असतात. तसेच ग्रामसभेचे सभासद मतदार असतात.

माणूस १८ वर्षाचा झाला कि त्याला मतदान करण्याचा अधिकार मिळतो. मग तो प्रत्येक नागरिक आपोआपच ग्रामसभेचा सदस्य बनतो. एकदा सदस्य झाला कि तो मरेपर्यंत सदस्य असतो. ग्रामसभेला निवडणूक नाही. गावातील प्रत्येक मतदार नागरिक हा ग्रामसभेचा सदस्य आहे.

ग्रामसभेत हजर राहण्याचा, ग्रामसभेत मत, विचार मांडण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. बहुमतांनी ठराव पास / नापास करण्याचा, मत देण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे.
Post views: counter

भारतातील-महाराष्ट्रातील पंचायतराजचा विकास










                                       पंचायतराज व स्थानिक स्वराज्य संस्था हा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक आहे. याचा अभ्यास करताना या व्यवस्थेतील प्रगतीचे टप्पे, ७३ वी घटनादुरुस्ती, ७४ वी घटनादुरुस्ती, जिल्हा परिषद, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हा परिषदेच्या विषय समित्या, मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समिती, त्याची रचना, पंचायत समिती सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी, पंचायत समितीचे कार्य, ग्रामपंचायत, ग्रामसभा, सरपंच, ग्रामसेवक यांचा अभ्यास करावा. याशिवाय नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेत महानगरपालिका, महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, महानगरपालिका आयुक्त, नगर परिषदा, त्यांची रचना, त्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगर परिषदेच्या समित्या, मुख्य अधिकारी यांचा अभ्यास करावा.
Post views: counter

मुख्य सचिव


  1.  प्रत्येक राज्यात मुख्यमंत्र्याच्या सरळ अधिनियंत्रणाखाली सामान्य प्रशासन विभाग कार्यरत असतो. मुख्य सचिव  हा राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेचा प्रमुख असतो.
  2.  मुख्य सचिव राज्य सचीवालयाचा कार्यकारी प्रमुख असतो. राज्यातीलसर्व प्रशासकीय कार्यालयावर मुख्य सचिवांचे पूर्ण नियंत्रण असते.केंद्र -राज्य तसेच राज्य - राज्य संबंधात तो प्रमुख दुवा असतो.
  3.  १९६५-६६ च्या "आंध्र प्रदेश प्रशासकीय सुधारणा समिती"च्या अहवालानुसार मुख्य सचिव राज्यातील सनदी सेवांचा प्रमुख असतो.
  4.  केंद्राच्या कॅबिनेट सचिवाच्या तुलनेत राज्याच्या मुख्य सचिवाची भूमिका अधिक रुंद असते. राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेचा प्रमुख यासोबतच  राज्य लोकसेवा आयोगाचा प्रमुख, राज्य शासनाचा प्रमुख जनसंपर्क अधिकारी या भूमिका त्यांना वठवाव्या लागतात.
  5.  मुख्य सचिव या पदावर अधिकाऱ्याचा कालावधी निश्चित नाही. कदाचित मुख्य सचिव त्याच पदावर असताना निवृत्त होऊ शकतो किंवा केंद्र सरकारच्या एखाद्या विभागात बढती होऊन जाऊ शकतो.
  6.  "राजस्थान प्रशासकीय सुधारणा समिती,१९६३" ने मुख्य सचिवाची तणावपूर्ण बहुआयामी भूमिका स्पष्ट केली. तो मुख्यमंत्र्यांचा प्रमुख सल्लागार असतो. त्याच्याकडील विभाग वगळता इतर विभागाच्या कार्यातही तो समन्वय घडवून आणतो. इतर सचिवांच्या कार्यकक्षेत न येणारे विषय मुख्य सचिव हाताळतो.
Post views: counter

जिल्हा परिषद

जिल्हा परिषद


                   जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. नाईक समितीच्या शिफारशिनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीअधिनियम 1961 कलम क्र.6 नुसार प्रत्येक जिल्हयासाठी नागरी जिल्हे सोडून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना 1 मे, 1962 रोजी करण्यात आली.
  • रचना -प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक अध्यक्ष आणि जिल्हापरिषद सदस्य मिळून एक जिल्हापरिषद निर्माण करण्यात येईल.

पंचायत समिती

पंचायत समिती 


महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961, कलम क्र. 56 नुसार प्रत्येक तालुक्यासाठी एक पंचायत समिती निर्माण करण्यात आली आहे.

पंचायत राज्यातील मधला स्तऱ म्हणून पंचायत समितीला ओळखले जाते.
  • निवडणूक : प्रत्येक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते.
  • सभासदांची पात्रता :
  1. तो भारताचा नागरिक असावा
  2. त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत.
  3. त्या तालुक्यातील मतदान यादीत त्याचे नाव असावे.
  • आरक्षण :
महिलांना : 50 %
अनुसूचीत जाती/जमाती : लोकसंख्येच्या प्रमाणात (महिला 50%)
इतर मागासवर्ग : 27% (महिला 50%)

ग्रामपंचायत


ग्रामपंचायत

 
  • कायदा - 1958 (मुंबई ग्रामपंचायत अधिनियम - १९५८ )
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम - १९५८ कलम 5 मध्ये प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु एखाद्या गावामध्ये 600 लोकसंख्या असेल त्याठिकाणी गट ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
  • सभासद व त्यांची विभागणी - कमीत-कमी 7 व जास्तीत जास्त 17
लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सभासद संख्या -लोकसंख्या :
  1. 600 ते 1500 - 7 सभासद
  2. 1501 ते 3000 - 9 सभासद
  3. 3001 ते 4500 - 11 सभासद
  4. 4501 ते 6000 - 13 सभासद
  5. 6001 ते 7500 - 15 सभासद
  6. 7501 त्यापेक्षा जास्त - 17 सभासद
Post views: counter

ग्रामपंचायत

ग्रामपंचायत 


  • एक स्वराज्य संस्था जिथे स्थानिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते (घटनेच्या चौकटीत राहून) तसेच स्वयंपूर्तीसाठी विविध योजना तयार करून राबविण्याची संपूर्ण अधिकार असलेली घटनात्मक संस्था. 
  • ग्रामपंचायत म्हणजेच राज्य शासनाचे विविध कार्य राबविणारे एक केंद्र, ग्रामस्थ आणि शासन ह्यांच्यामधी दुवा.
ग्रामपंचायतींच्या अखत्यारीत येणारे विषय :
  1. भूविकास
  2. जमीन सुधारणांची अंमलबजावणी
  3. जमिनीचे एकत्रीकरण
  4. मृदुसंधारण
  5. लघु पाट बंधारे
  6. सामाजिक वनीकरण