Maha Geography लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Maha Geography लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Post views: counter

नदी

प्रमुख भूरूपे - नदी 

 
                          युवावस्था अवस्‍थेत पर्वतीय प्रदेशात नदीचा उगम होतो. पाण्‍यांचे आकारमान कमी असले तरी देखील तीव्र उतारामुळे उर्ध्‍व खनन प्रभावी असते. या अवस्‍थेस पुढील भूरूपांची निर्मिती होते.
१) ‘व्‍ही’ आकाराची दरी
तीव्र उर्ध्‍व खननामुळे तळभागाची खोली वाढून ‘व्‍ही’ आकाराच्‍या दरीची निर्मिती होते.
२) निदरी व घळई
अत्‍यंत तीव्र उताराच्‍या बाजू असलेल्‍या अरूंद दरीस निदरी असे म्‍हणतात. जेव्‍हा या निदरीच्‍या बाजूंचा उतार अत्‍यंत तीव्र व खोली अतयंत जास्‍त असते तेव्‍हा त्‍यास घळई असे संबोधले जाते.
उदा. कोलोरॅडो नदीवरील ग्रँड घळई.

वारा

 प्रमुख भू प्रकार - वारा


                   क्षरण प्रक्रियेत वारा हे अत्‍यंत महत्त्वाचे कारक आहे. वार्‍याचे बहुतांशी कार्य शुष्‍क वाळवंटी प्रदेशात आढळून येते. वार्‍याचे कार्य प्रामुख्‍याने खनन, वहन व संचयन या प्रकारे होते.
                   वार्‍याचे खनन कार्य प्रामुख्‍याने ३ प्रकारे होते. वार्‍यामुळे एखाद्या ठिकाणची रेती थेटपणे उचलून नेण्‍याच्‍या प्रक्रियेस अपवहन असे म्‍हणतात. अपघर्षण क्रियेत वार्‍यासोबत असणारे रेतीचे कण खडकांवर घासले जाऊन खडकांची झीज होते. तर रेतीचे कण एकमेकांवर आदळून विभाजीत होण्‍याच्‍या क्रियेस सन्निघर्षण असे संबोधले जाते. वार्‍याच्‍या खनन कार्याची तीव्रता प्रामुख्‍याने वार्‍याचा वेग, रेतीच्‍या कणांचा आकार, खडकांचे स्‍वरूप व हवामान यावर अवलंबून असते.
Post views: counter

महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन संस्था

महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन संस्था
  1. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, --------- पाडेगांव (सातारा) 
  2. गवत संशोधन केंद्र, ------------------- पालघर (ठाणे)
  3. नारळ संशोधन केंद्र, ------------------ भाटय़े (रत्नागिरी)
  4. सुपारी संशोधन केंद्र, ------------------ श्रीवर्धन (रायगड)
  5. काजू संशोधन केंद्र, -------------------- वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
  6. केळी संशोधन केंद्र, -------------------- यावल (जळगाव)
  7. हळद संशोधन केंद्र, -------------------- डिग्रज (सांगली)
  8. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, हिरज ---केगांव (सोलापूर)
  9. राष्ट्रीय कांदा- लसून संशोधन केंद्र -----राजगुरूनगर (पुणे)
Post views: counter

महाराष्ट्रातील खनिज संपत्ती : लोहखनिज

महाराष्ट्र खनिज साधनसंपत्ती :
महाराष्ट्र हे खनिज साधनसंपत्तीसाठी फारसे प्रसिद्ध राज्य नाही, राज्याच्या एकूण क्षेत्रफळापकी फक्त १२.३३ टक्के क्षेत्रात खनिज संपत्ती आढळते. महाराष्ट्राची खनिज संपत्तीही प्रामुख्याने बेसॉल्ट खडकाच्या बाह्य़ क्षेत्रात स्फटिकयुक्त व रूपांतरित खडकात पाहायला मिळते. महाराष्ट्रात दगडी कोळसा मँगनिज, लोह खनिज, बॉक्साइट, इ. खनिजे आढळतात.

महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र पूर्व विदर्भ असून यात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ इ. जिल्हे येतात. याशिवाय सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, इ. ठिकाणीदेखील खनिजे आढळतात.

लोहखनिज:
भारतातील एकूण लोहखनिजांच्या साठय़ांपकी २० टक्के लोहखनिजाचे साठे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात लोहखनिजाचे साठे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्य़ांत आढळतात.

महाराष्ट्रातील खनिज संपत्ती : बॉक्साइट

महाराष्ट्र खनिज साधनसंपत्ती :

महाराष्ट्र हे खनिज साधनसंपत्तीसाठी फारसे प्रसिद्ध राज्य नाही, राज्याच्या एकूण क्षेत्रफळापकी फक्त १२.३३ टक्के क्षेत्रात खनिज संपत्ती आढळते. महाराष्ट्राची खनिज संपत्तीही प्रामुख्याने बेसॉल्ट खडकाच्या बाह्य़ क्षेत्रात स्फटिकयुक्त व रूपांतरित खडकात पाहायला मिळते. महाराष्ट्रात दगडी कोळसा मँगनिज, लोह खनिज, बॉक्साइट, इ. खनिजे आढळतात.

महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र पूर्व विदर्भ असून यात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ इ. जिल्हे येतात. याशिवाय सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, इ. ठिकाणीदेखील खनिजे आढळतात.

बॉक्साइट :
याचा उपयोग प्रामुख्याने अ‍ॅल्युमिनियम निर्मितीसाठी केला जातो. भारतातील सुमारे २१ % बॉक्साइटचे उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रातील बॉक्साइटचे साठे उच्च प्रतीचे आहेत, ते कोल्हापुर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, सातारा व सांगली या जिल्ह्य़ांत आढळतात.

महाराष्ट्रातील खनिज संपत्ती : चुनखडी

महाराष्ट्र खनिज साधनसंपत्ती:
महाराष्ट्र हे खनिज साधनसंपत्तीसाठी फारसे प्रसिद्ध राज्य नाही, राज्याच्या एकूण क्षेत्रफळापकी फक्त १२.३३ टक्के क्षेत्रात खनिज संपत्ती आढळते. महाराष्ट्राची खनिज संपत्तीही प्रामुख्याने बेसॉल्ट खडकाच्या बाह्य़ क्षेत्रात स्फटिकयुक्त व रूपांतरित खडकात पाहायला मिळते. महाराष्ट्रात दगडी कोळसा मँगनिज, लोह खनिज, बॉक्साइट, इ. खनिजे आढळतात.

महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र पूर्व विदर्भ असून यात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ इ. जिल्हे येतात. याशिवाय सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, इ. ठिकाणीदेखील खनिजे आढळतात.

चुनखडी :
बांधकामात जोडण्यासाठी लागणारा चुना हा चुनखडकापासुन तयार केला जातो. महाराष्ट्रात चुनखडीचे फक्त दोन टक्के साठे आहेत. महाराष्ट्रात चुनखडीचे साठे यवतमाळ, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्य़ात आढळतात.

महाराष्ट्रातील खनिज संपत्ती : मँगनिज

महाराष्ट्र खनिज साधनसंपत्ती:

महाराष्ट्र हे खनिज साधनसंपत्तीसाठी फारसे प्रसिद्ध राज्य नाही, राज्याच्या एकूण क्षेत्रफळापकी फक्त १२.३३ टक्के क्षेत्रात खनिज संपत्ती आढळते. महाराष्ट्राची खनिज संपत्तीही प्रामुख्याने बेसॉल्ट खडकाच्या बाह्य़ क्षेत्रात स्फटिकयुक्त व रूपांतरित खडकात पाहायला मिळते. महाराष्ट्रात दगडी कोळसा मँगनिज, लोह खनिज, बॉक्साइट, इ. खनिजे आढळतात.

महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र पूर्व विदर्भ असून यात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ इ. जिल्हे येतात. याशिवाय सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, इ. ठिकाणीदेखील खनिजे आढळतात.

मँगनिज:
भारतातील एकूण मँगनिज साठय़ापकी ४० टक्के साठा एकटय़ा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात मँगनिजचे प्रमुख साठे भंडारा, नागपूर व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आढळतात.
Post views: counter

नद्या व उपनद्या :


१) गोदावरी :-
• उजव्या तिराने :- दारणा, प्रवरा, मुळा, बोरा, सिंदफणा, (बिंदुसरा), कुंडलिका, सरस्वती.
• डाव्या तिराने :- कादवा, शिवना, खाम, खेळणा

२) भीमा नदी :-
• उजव्या तिराने :- भामा, इंद्रायणी, मुळा-मुठा, पवना, वेळ, क-हा, नीरा, माण, बोर.
• डाव्या तिराने :- कुकडी, पुष्पावती, मीना, घोड, भोगावती, बोर

३) कृष्णा नदी :- 
• गोदावरी & कावेरी यादरम्यानची प्रमुख नदी.
• उगम : धोम - महाबळेश्वर.
• उजव्या तिराने :- कोयना, वारणा, पंचगंगा [कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती व सरस्वती (गुप्त)], दुधगंगा, वेदगंगा, घटप्रभा, ताम्रपणी..
• डाव्या तिराने :- येरळा, नंदला, अग्रणी
Post views: counter

कोयना धरण

कोयना धरण



•प्रवाह- कोयना नदी

•स्थान -कोयनानगर , पाटण, सातारा जिल्ह,महाराष्ट्र

•सरासरी वार्षिक पाऊस- ५००० मि.मी.

•लांबी -८०७.७२ मी

•उंची -१०३.०२ मी

•बांधकाम सुरू -१९५४-१९६७

•ओलिताखालील क्षेत्रफळ १२१०० हेक्टर

•जलाशयाची माहिती

निर्मित जलाशय शिवसागर जलाशय 

•क्षमता- २७९७.४ दशलक्ष घन

कोयना धरण हे कोयना नदीवर असलेले महाराष्ट्रातील सर्वांत मोठे धरण आहे.

•धरणाची माहिती-

गोदावरी नदी

गोदावरी नदी 




  • उगम- त्र्यंबकेश्वर १,६२० मी.
  • मुख- काकिनाडा (बंगालचा उपसागर )
  • लांबी- १,४६५ कि.मी.
  • देश- महाराष्ट्र, कर्नाटक , आंध्रप्रदेश ,मध्य प्रदेश, ओरिसा
  • उपनद्या- इंद्रावती , मंजिरा, बिंदुसरा
  • सरासरी प्रवाह- ३,५०५ मी³ /से
  • पाणलोट क्षेत्र- ३,१९,८१० किमी²
  • धरण- गंगापूर (नाशिक ), नांदूर मधमेश्वर ( नाशिक ), डौलेश्वरम



गोदावरी नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते. गोदावरी नदीची लांबी १,४५० किलोमीटर (९०० मैल) आहे. गोदावरीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात होतो. साधारणत: आग्नेय दिशेला वाहून गोदावरी राजमहेंद्रीजवळ बंगालच्या

नर्मदा नदी

नर्मदा नदी 




  • उगम-अमरकंटक ९०० मी.
  • मुख-अरबी समुद्र
  • लांबी-१,३१२ कि.मी.
  • देश-भारत ( मध्य प्रदेश , महाराष्ट्र, गुजरात)
  • पाणलोट क्षेत्र-१,००,००० किमी²
  • धरण-सरदार सरोवर धरण(केवडिया कॉलोनी)



नर्मदा नदी भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. ही नदी भारताच्या मध्य प्रदेश (१०७७ कि.मी) , महाराष्ट्र (७६ कि.मी), गुजरात (१०० कि.मी.) या राज्यांतून वाहते. नर्मदा भारतीय उपखंडातील पाचव्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वांत मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदेला रेवा असेही एक नाव आहे. (इतर पश्चिम वाहिनी मोठ्या नद्या: तापी व मही).

पंचगंगा नदी

पंचगंगा नदी



  • उगम- प्रयाग संगम, चिखली, करवीर तालुका,कोल्हापूर.
  • मुख- नृसिंहवाडी (कृष्णा नदी)
  • लांबी- ८०.७ कि.मी.
  • देश- महाराष्ट्र
  • उपनद्या- कासारी , कुंभी , तुळशी , भोगावती
  • या नदीस मिळते- कृष्णा नदी


पंचगंगा नदी पश्चिम महाराष्ट्रातून जाणारी महत्त्वाची नदी आहे. पाच उपनद्यांच्या संगमापासून तयार झाल्याच्या दंतकथेनुसार पंचगंगा असे नाव पडले आहे.

स्रोत-पंचगंगा नदी कोल्हापूर शहराच्या सीमेवरून वाहते, ती प्रयाग संगमावरून ( चिखली गाव, करवीर तालुका ) ती सुरू होते. कुंभी, कासारी, तुळशी, आणि भोगावती

प्रवरा नदी

प्रवरा नदी




  • अन्य नावे - अमृतवाहिनी
  • उगम- रतनगड ८५२ मी.
  • मुख- रत्नाबाईची गुहा
  • लांबी- २०० कि.मी.
  • देश - महाराष्ट्र
  • उपनद्या- मुळा, आढळा, म्हाळुंगी


प्रवरा ही महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातून उगम पावणारी नदी आहे. हिला मुळा , आढळा, म्हाळुंगी या उपनद्या असून ही नदी पुढे गोदावरीला जाऊन मिळते.

नवेगाव राष्ट्रीय उद्यान

नवेगाव राष्ट्रीय उद्यान 



हे महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान आहे.

जंगलाचा प्रकार-
हे जंगल मुख्यत्वे मध्य भारतीय पानगळी प्रकारात मोडते. ऐन, हळदू, कलाम धावडा, बीजा, साग, सूर्या अशा प्रकारची झाडे या अरण्यात आढळतात.

भौगोलिक-उद्यानाचा मुख्य भाग हा डोंगराळ आहे डोंगराच्या पायथ्याशी नवेगाव नावाच्या तळ्याने वेढलेले आहे. इटिडोह धरण आणि नवेगाव बांध तलाव असे दोन मोठे जलाशय येथे आहेत. या जंगलाचा विस्तार सुमारे १३४ चौरस किलोमीटर आहे. माधव झरी, राणी डोह, कामझरी, टेलनझरी, अंगेझरी, शृंगार बोडी हे झरे आणि पाणसाठी येथे आहेत. हा विभाग पाणथळ आणि दलदल असलेला आहे.

Post views: counter

चांदोली राष्ट्रीय उद्यान

चांदोली राष्ट्रीय उद्यान 


महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील हे राष्ट्रीय उद्यान आहे. २००४ मध्ये याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला. चांदोली धरणाच्या तलावात नावेतूनही जंगल फिरता येते.दुर्गवाडीच्या उतरून पायी भटकता येते.दुर्गवाडीच्या डोंगरावरून चांदोली जलाशयाचा परिसर दिसतो.

• स्थान-सांगली जिल्ह्यात ३२ शिराळा तालुक्यात वारणा नदीवर\ चांदोली धरण आहे.त्याच्या पाणलोट क्षेत्रात चांदोली अभयारण्य आहे

• स्थापना- 

या अभयारण्याची स्थापना १९८५ साली झाली.

वाळवंट

 वाळवंट

  

वाळवंट हे अनेक भौगोलिक रचनांपैकी एक असून पृथ्वीचा बराच भूभाग वाळवंटांनी व्यापला आहे. तथापिवाळवंट हा शब्द केवळ वाळूने व्यापलेल्या प्रदेशालाच लागू होत नाही तर इतर काही भौगोलिक रचनादेखील वाळवंट या संज्ञेत येतात.

प्रकार- वाळवंटांची दोन मुख्य प्रकारांमध्ये विभागणी करता येते.
उष्ण वाळवंटे व शीत वाळवंटे 


वाळूने व्यापलेला प्रदेश ही व्याख्या केवळ उष्ण वाळवंटांसाठीच लागू होते. नावाप्रमाणे उष्ण वाळवंटातील तापमान अतिउष्ण ते शीत या पट्ट्यात येते.

• वैशिष्ट्ये - सर्वसाधारणपणे उष्ण वाळवंटाची पुढील वैशिष्टे सांगता येतील.

• भौगोलिक वैशिष्ट्ये-

  1. वाळूने व्यापलेला प्रदेश. वाळूच्या टेकड्या आणि त्यावरील वैशिष्ट्यपूर्ण अशा वळ्या
  2. हवेतील बाष्पाचे आणि जमिनीतील आर्द्रतेचे अत्यल्प प्रमाण
  3. वर्षभरातील पावसाची अत्यल्प सरासरी

नदी

 नदी 



नैसर्गिक पाण्याच्या रुंद प्रवाहाला नदी असे म्हणतात. नदीचा उगम हा तलाव , मोठा झरा, अनेक छोटे झरे एकत्रित येऊन किंवा बर्फाच्छादित पर्वतापासून होतो.

जगातील सर्वांत जास्त लांबीच्या १० नद्या पुढीलप्रमाणे आहेत.

  1. नाईल नदी ( ६,६९० कि.मी.)
  2. अॅमेझॉन नदी ( ६,४५२ कि.मी.)
  3. मिसिसिपी नदी- मिसूरी नदी ( ६,२७०कि.मी.)
  4. यांगत्झे नदी (चँग जिआंग ) ( ६,२४५ कि.मी.)
  5. येनिसे आंगारा नदी ( ५,५५० कि.मी.)
  6. ह्वांग हो नदी ( ५,५६४ कि.मी.)
  7. ऑब ईर्तीश नदी ( ५,४१० कि.मी.)
  8. आमूर नदी ( ४,४१० कि.मी.)
  9. काँगो नदी ( ४,३८० कि.मी.)
Post views: counter

MPSC Prelim Paper घटक ३-महाराष्ट्राचा भूगोल




                      जर एम.पी.एस.सी. व यू.पी.एस.सी या दोन्ही परीक्षेच्या दृष्टीने बघितल्यास भूगोल हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.गेल्या दोन वर्षांतील परीक्षेचा अभ्यास केल्यास, असे लक्षात येते की, या घटकावर साधारण 15ते 17प्रश्न विचारले होते. एम.पी.एस.सी.च्या नवीन अभ्यासक्रमात (जो अभ्यासक्रम 'यूपीएससी'सारखाच आहे.) काही बदल करण्यात आले आहेत.

                     उदा. नवीन अभ्यासक्रमात जगाचा भूगोल हा नव्याने समाविष्ट केलेला घटक आहे. जुन्या अभ्यासक्रमानुसार जर कृषिशास्त्राचाही विचार केला तर या भागावर जवळजवळ ३५ ते ४० प्रश्न विचारले जात असत, आपण पीएसआय / एसटीआय / असिस्टंट पूर्व या परीक्षांचाही विचार केला तर या घटकावर साधारणत: 15ते 17प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे.
Post views: counter

महाराष्ट्र पठाराची निर्मिती




महाराष्ट्र पाठाराची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली.70 दशलक्ष वर्षापूर्वी - भ्रंशमुलक उद्रेक झाला व लाव्हारसाचे संचयन झाले. अशा प्रकारच्या अनेक उद्रेकापासून महाराष्ट्र पठार तयार झाले. या पठारावर अग्निजन्य खडक आढळतात.भुपृष्टावर किंवा कमी खोलीवर आढळणारे 'असिताश्म व कृष्णप्रस्तर' हे दोन प्रकारचे खडक आढळतात.महाराष्ट्र पठारावर उत्तरेकडून दक्षिणेकडे पुढील खोरी आढळतात.
  • तापी-पूर्णा खोरे 
  • गोदावरी खोरे 
  • प्रणहिता खोरे 
  • भीमा खोरे
  • कृष्णा खोरे 
 आर्कियन खडक :

हा अतिप्राचीन खडक पूर्व विदर्भा, चंद्रपुर, भंडारा, गडचिरोली, नांदेड जिल्ह्याचा पूर्वभाग आणि सिंधुदुर्गातील काही तालुक्यांमध्ये आढळतो.
ग्रँनाईट, नीस व शिस्ट प्रकारच्या खडकांपासून बनलेल्या या भुस्तरात लोह खनिजांचे विपुल साठे आहेत.
 धारवाड खडक : या श्रेणीच्या खडकांमध्ये ग्रँन्जुलाईट्स
Post views: counter

विविध क्रांत्या :

विविध क्रांत्या :


  1. हरित क्रांती -अन्नधान्य उत्पादन
  2. नील क्रांती- मत्स्य उत्पादन
  3. पीत क्रांती- तेलबिया उत्पादन
  4. सुवर्ण क्रांती -फळे उत्पादनात वाढ
  5. कृष्णा क्रांती- पेट्रोलियम क्षेत्र
  6. करडी क्रांती- खत उत्पादन
  7. श्वेत क्रांती-दुग्धोत्पादन
  8. गुलाबी क्रांती -कोळंबी उत्पादन
  9. चंदेरी क्रांती-अंडी उत्पादन
  10. अमृत क्रांती-नद्याजोड प्रकल्प