History लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
History लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Post views: counter

संयुक्त महाराष्ट्र चळवळ

संयुक्त महाराष्ट्र चळवळ
स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे इ. स. १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.
महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा बोलणारे मुंबई, कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा, खानदेश व अजूनही महाराष्ट्राबाहेरच असलेले डांग, बेळगाव, निपाणी, कारवार व बिदर हे भाग अभिप्रेत होते. साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय या सर्व अंगानी ही चळवळ उभी राहिली.
 पूर्वार्ध 
                      ब्रिटिशांनी आपल्या राज्यकारभारासाठी भारताची विभागणी वेगवेगळ्या प्रांतात केली होती परंतु ती भाषेप्रमाणे नव्हती. इ. स. १९२० रोजी नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी भाषावर प्रांतरचेनेचा मुद्दा महात्मा गांधींनी मान्य केला होता.लोकमान्य टिळक हे देखील भाषावर प्रांतरचनेच्या बाजूने होते. काँग्रेसनेच एकेकाळी मान्य केलेला हा मुद्दा स्वातंत्र्यानंतर मात्र पक्षाला ,विशेषत: नेहरुंना , संकुचित व राष्ट्रीय एकात्मकतेला धोका वाटू लागला.मुंबईतील भांडवलदारांना जे मुख्यत: अमहाराष्ट्रीय होते, त्यांचा मुंबई महाराष्ट्राला द्यायला कडाडून विरोध होता.संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा पाया इ. स. १९३८ च्या अखेर वऱ्हाडात घातला गेला. त्या वेळी वऱ्हाडचा प्रदेश जुन्या मध्यप्रांत व वऱ्हाड (सी. पी. अँड बेरार प्रॉव्हिन्स) प्रांतात समाविष्ट होता. त्यात बहुसंख्या हिंदी भाषिकांची होती. वऱ्हाडातून येणारे उत्पन्न अधिकतर हिंदी विभागावर खर्च होऊनही वऱ्हाड दुर्लक्षिलेला राही.त्यामुळे त्यातून मराठी वऱ्हाड वेगळा करण्याची मागणी चालू शतकाच्या प्रारंभीपासून व्हाइसरॉयच्या कौन्सिलात होत होती. इ. स. १९३५ साली प्रांतिक स्वायत्ततेचा कायदा पास झाला.इ. स. १९३७च्या निवडणुकीत प्रांतिक विधिमंडळात काँग्रेसला बहुमत लाभले.विधिमंडळाचे सदस्य रामराव देशमुख यांनी १ ऑक्टोबर इ. स. १९३८ रोजी त्या विधिमंडळापुढे मांडलेला वेगळ्या वऱ्हाडाचा ठराव एकमताने मंजूर झाला.
Post views: counter

पुणे करार

पुणे करार 



                    विधिमंडळातील अस्पृश्यांच्या राखीव जागांसंबंधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व म. गांधी यांच्यात २४ सप्टेंबर १९३२ रोजी झालेला करार. १९३१ च्या अखेरीस झालेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेत अल्पसंख्यांकांच्या प्रतिनिधित्वाचा विचार झाला . मुसलमान व शीख यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याचे आधीच मान्य झाले होते. मुसलमान वगळता उरलेल्या सवर्ण हिंदूंकरवी अस्पृश्यांना योग्य प्रतिनिधित्व व रास्त राजकीय हक्क मिळणे अशक्य वाटल्यावरुन डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या राखीव जागांचा व विभक्त मतदारसंघाचा आग्रह धरला. म. गांधींनी त्यास विरोध केला. याचा निर्णय ब्रिटिश पंतप्रधान जेम्स मॅकडोनल्ड यांच्याकडे सोपविण्यात आला.

Post views: counter

तात्या टोपे

तात्या टोपे 


  • नाव : रामचंद्र पांडुरंग टोपेटोपणनाव: तात्या टोपे
  • जन्म: १८१४ येवला ( नाशिक)
  • मृत्यू: एप्रिल १८, १८५९ शिवपुरी, मध्य प्रदेश
  • चळवळ: १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध
  • धर्म: हिंदू
  • वडील: पांडुरंगराव टोपे
  • आई: रखमाबाई


रामचंद्र पांडुरंग टोपे ऊर्फ तात्या टोपे (१८१४ - एप्रिल १८ , १८५९ ) हे १८५७ च्या उठावामधील सेनानी होते.

जीवन-१८१४ मध्ये नाशिक जिल्ह्यातील येवल्यातला त्यांचा जन्म. पांडुरंग टोपे यांच्या आठ अपत्यांपैकी तात्या हे दुसरे अपत्य. त्यांचे मूळ नाव रघुनाथ. त्यांचे नाव रामचंद्र असेही

शिवराम हरी राजगुरू

शिवराम हरी राजगुरू 


  • जन्म: ऑगस्ट २४, इ.स. १९०८ राजगुरूनगर , पुणे जिल्हा , महाराष्ट्र, भारत
  • मृत्यू: मार्च २३, १९३१ लाहोर, पंजाब
  • चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
  • संघटना: हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन
  • धर्म: हिंदू 

शिवराम हरी राजगुरू (ऑगस्ट २४, इ.स. १९०८; खेड, महाराष्ट्र - मार्च २३, १९३१ ; लाहोर, पंजाब ) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करलेले क्रांतिकारक होते. ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी या संघटनेच्या क्रांतिकार्यात सहभागी झाले होते.

अनंत कान्हेरे

अनंत कान्हेरे 




  • जन्म: इ.स. १८९१
  • मृत्यू: एप्रिल १९, इ.स. १९१० ठाणे , महाराष्ट्र, भारत (फाशी)
  • चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
  • संघटना: अभिनव भारत
  • धर्म: हिंदू
  • प्रभाव: विनायक दामोदर सावरकर
  • वडील:लक्ष्मण कान्हेरे


अनंत लक्ष्मण कान्हेरे (इ.स. १८९१ ; आयनी मेटे, रत्नागिरी जिल्हा , महाराष्ट्र - एप्रिल १९, इ.स. १९१०; ठाणे , महाराष्ट्र) हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक होता. तो इ.स. १८९९ साली गणेश दामोदर सावरकर आणि विनायक दामोदर सावरकर यांच्या

खुदीराम बोस

खुदीराम बोस 




भारतातील सर्वात तरूण वयाचा क्रांतीकारक म्हणून ओळखला जाणारा हा वीर वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी शहीद झाला. त्याचा जन्म बंगाल मधल्या मेदिनीपूर जिल्ह्यातल्या बहुवेनी या गावात दि. ३ डिसेंबर १८८९ ला झाला. त्याच्या लहानपणीच आई (लक्ष्मीप्रियादेवी) आणि वडील (त्रैलोक्यनाथ) यांचा मृत्यु झाल्याने त्याची मोठी बहीण अनुरूपादेवी आणि तिचे पती अमृतलाल यांनी पालनपोषण केले.
Post views: counter

कर्मवीर भाऊराव पाटील


बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवणारे आधुनिक भगीरथ आणि वटवृक्ष-रूप धारण केलेल्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक!

                    रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय. लहानपणापासूनच भाऊराव बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहीरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा या गावी झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले.

पंडिता रमाबाई



स्त्रियांचा सर्वांगीण विकास, स्त्रियांचे समाजातील स्थान, स्त्रियांची कर्तबगारी यांबाबत बुद्धिमत्ता व स्व- कर्तृत्वाच्या साहाय्याने प्रतिकूल परिस्थितीतही पायाभूत कार्य केलेल्या विदुषी! 

                      परित्यक्ता, पतिता व विधवा स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने सतत कार्यरत राहिलेल्या विदुषी म्हणजे पंडिता रमाबाई होत. यांचा जन्म अनंतशास्त्री व लक्ष्मीबाई डोंगरे यांच्या पोटी, गंगामूळ (कर्नाटक) येथे झाला. त्यांचे वडील अनंतशास्त्री हे त्या काळी स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते, स्त्रियांना शिक्षण द्यावे या मताचे ते होते. पत्नी लक्ष्मीबाई व मुलगी रमाबाई यांस त्यांनी वेद शास्त्रांचे शिक्षण दिले होते. रमाबाई नऊ वर्षांच्या

नामदार गोपाळ कृष्ण गोखले



‘राजकारणाचे आध्यात्मिकरण’ ही अद्वितीय संकल्पना भारतात मांडणारे; सार्वजनिक जीवनात स्वत: ही संकल्पना आचरणात आणणारे एक ‘आदर्श भारतसेवक’! 

                     ’झाले बहु होतील बहु; परंतु या सम हा’ ही उक्ती ज्यांच्या बाबतीत सार्थ ठरते असे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे सुरुवातीच्या काळातील मवाळ, सनदशीर नेते व आदर्श भारतसेवक म्हणजे नामदार गोपाळ कृष्ण गोखले होत. 

                    रत्नागिरी जिल्ह्यातील कोतळूक या खेड्यात जन्मलेल्या गोखले यांचे बालपण कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षणही

गोपाळ गणेश आगरकर



भौतिकता - ऐहिकता, बुद्धिप्रामाण्य, व्यक्तिस्वातंत्र्य या आधुनिक तत्त्वांना प्रमाण मानून जिवाच्या कराराने समाज सुधारणांचा पाठपुरावा करणारे समाजप्रबोधक!



                         महाराष्ट्रातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला विवेकाचे, बुद्धिप्रामाण्याचे व व्यक्तिस्वातंत्र्याचे  अधिष्ठान देऊन,परिवर्तनाचे विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञान निर्माण करण्याचे श्रेय गोपाळ आगरकरांकडे जाते. 

                         आगरकरांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या खेड्यात, एका गरीब कुटुंबात झाला. घरच्या गरिबीमुळे शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांना अनेक मार्ग चोखाळावे लागले. कधी मामलेदार कचेरीत उमेदवारी करून, कधी माधुकरी मागून तर कधी कंपाउंडरचे काम करून त्यांनी आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासाठी ते कर्‍हाड,

गोपाळ हरी देशमुख



इंग्रजी शिक्षणातून मिळालेल्या मूल्यांच्या साहाय्याने आधुनिक विचार देण्याचा प्रयत्न करणारे महाराष्ट्रातील अगदी पहिल्या पिढीतील समाजसुधारक!


                      एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात इंग्रजी शिक्षणामुळे एक नवी पिढी घडत होती. त्या पिढीच्या पहिल्या काही नवशिक्षितांपैकी एक म्हणजे गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी) होत. गोपाळरावांचे वडील पेशव्यांच्या दरबारात हिशेबनीस म्हणून काम करत होते. त्यांनी मराठी शाळेत शिक्षण घेत असतानाच इंग्रजीचा अभ्यास केला. 
Post views: counter

भारतातील शिक्षणाचा विकास

पाश्चात्त्य शिक्षणाची ओळख



                         कोलकाता जवळील श्रीरामपूर येथील डँनिश मिशनमधील मिशनरीनी पाश्चात्त्यज्ञान प्रसारार्थ केलेलेयोगदान महत्त्वाचे ठरते .यात विलियम कँरे , फेलिक्स कँरे , विलियम बोर्ड, जाँन मार्श यांनी संस्कृत , बंगाली , हिंदी , मराठी या भारतीय भाषांचा अभ्यास केला .
  1. वॉर्ड- ' बायबल ' चा बंगाली भाषेत अनुवाद .
  2. मार्शमन - भारताचा इतिहास , भुगोल , खगोलशास्रावर पुस्तके लिहिली .
  3. फेलिक्स कँरे - बंगाली भाषेत विश्वकोष
  4. कोलकाता ढाका चितगाव येथे इंग्रजी भाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू केल्या .त्यात ख्रिस्ती धर्माच्या अभ्यासावर भर होता .
  5. १८१८- श्रीरामपूरयेथे बाप्टिस्ट मिशन कॉलेज सुरू केले .

लॉर्ड कॉर्नवॉलिस ( १७८६ - १७९३)

लॉर्ड कॉर्नवॉलिस ( १७८६ - १७९३) च्या काळातील महत्वाच्या घटना 


 कंपनीमध्ये प्रशासन कार्यक्षम बनविण्यासाठी सर्वांगीण सुधारणा घडविण्यासाठी प्रयत्न

प्रशासकीय व अंतर्गत सुधारणा -
  1. संचालक मंडळीच्या आप्त स्वकीयांना दिली जात असलेली अनेक अनावश्यक पदे रद्द केली .
  2. १७७८ - व्यापाऱ्यांऐवजी प्रतिनिधींशी खरेदीचे करार .
  3. जमीन महसुल रक्कम कायम करण्यात आली व ती गोळा करुन भरण्याची जबाबदारी जमीनदारांकडे सोपवली.
Post views: counter

लार्ड डलहौसि - (1848 ते 56)

लार्ड डलहौसि - (1848 ते 56) च्या काळातील महत्वाच्या घटना 


भारतातील सर्वात तरुण गवर्नर जनरल होय वयाच्या 36 व्या वर्षी हा गवर्नर जनरल बनला.

खालसा धोरण
डलहौसिने खालसा धोरण सहाय्याने भारतातील अनेक राज्ये खालसा केलि.
1848 सातारा
1849 संभलपुर
1850 बघात
1850 जैतपुर
1852 उदयपुर
1853 झांशि
1853 वरहाड
1854 नागपुर.

पेंशन रद्द
कानपूर - नानासाहेब पेशवा
कर्णाटक - मुहमद घौस्
तंजावर - नवाब.

लार्ड लिटन (1876 ते 1880)

लार्ड लिटन (1876 ते 1880) च्या काळातील महत्वाच्या घटना 

1876 - स्ट्रेची कमीशन
लिटनने गवर्नर जनरल पद स्विकारताच भारतात मोठा दुष्काळ परिस्थिति निर्मान झाली मात्र लिटन याने कोणतीही मदत न करता केवल एक समिति नियुक्त केलि.

1877 - ढिल्लो दरबार
दुष्काळ संबधी कुठलीही मदत न करता लिटन याने मात्र विक्टोरिया राणीला कैसर ए हिन्द हा किताब देऊ केला. दरबरावर 1 करोड़ रुपये खर्च करण्यात आले.
कैसर ए हिन्द याचा अर्थ हिन्दुस्तानचि स्मरादनि होय

लार्ड रिपन - 1880 ते 1884


लार्ड रिपन  (1880 ते 1884) च्या काळातील काही महत्वाच्या घटना 


1881 - पहिला फैक्ट्री कायदा
कामगार वर्गाच्या सुधारणासाठी केला. नारायण मघजी लोखंडे यांचे नेतृत्व यासाठी महत्वाचे ठरते.
लोखंडे यानि 1884 मधये Bombay Mill Hands Association ही संघटना स्थापन केलि. कामगारांच्या हितकरिता दीनबंधु नावाचे वृत्तपत्र सम्पादित करीत असत.

1881 - जनगणना
भारतातील प्रथम जनगणना सर्वत्र एकाच वेळी करण्यात आली. हंटर यांच्या नेतृत्वत् ही जनगणना पूर्ण करण्यात आली.

1882 - विद्यापीठ स्थापना
भारतातील पंजाब व् अलाहाबाद विद्यापीठनचि स्थापना करण्यात आली.

1882 - स्थानिक स्वराज्य संस्था
स्थानिक स्वशास्नचा ठराव पास करण्यात आला. यतुंनच स्थानिक स्वराज्य संस्थाचा विकास घडून आला. रिपन स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून ओळखला जातो.

लार्ड मेयो (1869 ते 72)


लार्ड मेयो (1869 ते 72) च्या काळातील महत्वाच्या घटना 


वित्त विकेंद्रीकरण लागु केले
1871 - ब्रिटिश काळात भारतात प्रथमच जनगणना करण्यात आली.
1872 - नेटिव्ह सिविल मेरेज अक्ट
         - कायदा पास करण्यासाठी केशक्वचंद्र सेन यांचे योगदान महत्वाचे आहे
         - अंदमान या बेटावर मेयोचा शेरअली या पठानाने खून केला याला कारणीभूत घटना वहाबी चळवळ होय
         - राजकोट कॉलेज - काठियावाड़
         - मेयो कॉलेज - अजमेर
         -वरील कोलेजांची स्थापना मेयोने संस्थानिकांच्या मुलाना राजकीय प्रशिक्षण व् शिक्षण देण्यासाठी स्थापना केलि.

लार्ड कॅनिंग (1856 ते 62)

 लार्ड कॅनिंग (1856 ते 62) च्या काळातील महत्वाच्या घटना 


1857 - गभर्तीय सैन्याने उठाव घडवून आला.

1858 - रानीचा जाहिरनामा

1 नोवेम्बर 1858 अलाहाबाद येथे दरबार भरविन्यत आला

1858 - भारताच्या सुशासनाचा कायदा
         - कंपनीची सत्ता संपुष्टात आली
         - भरतमंत्री पदाचि निर्मिती करण्यात आली
         - इंडिया काउन्सिल स्थापन केले
         - भारताचा कारभार ब्रिरिश संसद बनली

लॉर्ड रिडिंग - 1921 ते 26

लॉर्ड रिडिंग ( 1921 ते 26 )  च्या काळातील महत्वाच्या घटना 



विश्वभारती विद्यापीठ रविंद्रनाथ टैगोर यानि स्थापना केलि.
1921 - मोपला उठाव
1922 - चौरीचौरा घटना
1923 - स्वराज्य पक्ष स्थापना
1923 - सनदी सेवा परीक्षा भारतात आयोजित
करण्यास प्रारम्भ झाला.
1924. - ली समिति सनदी सेवा संबधी स्थापन केलि
1924 - मुदिमन समिति 1919 कायद्याच्या चौकशी
साथी नियुक्त करण्यात आले

आधुनिक भारताचा इतिहास या घटकाचा अभ्यास करताना लक्षात ठेवायच्या बाबी


                 समाजामध्ये ज्या काळात सामंतशाही समाजव्यवस्था प्रस्थापित होण्यास सुरुवात होते, तेथे प्राचीन कालखंडाचा अंत व मध्ययुगीन कालखंडाची सुरुवात मानली जाते. तद्वतच ज्या काळात सामंतशाही समाजव्यवस्थेला बाजूला सारून भांडवलशाहीवर आधारित समाजव्यवस्था प्रस्थापित होण्यास सुरुवात होते, तिथे मध्ययुगीन कालखंडाचा अंत व आधुनिक कालखंडाची सुरुवात मानली जाते. अर्थात, समाजव्यवस्थेतील बदल एका रात्रीतून घडत नाहीत. म्हणूनच दोन कालखंडांच्या बदलाचा काळ हा दोन्ही कालखंडांतील वैशिष्टय़ांनी युक्त असतो. भारताच्या संदर्भात आधुनिक कालखंडाच्या उदयाचा काळ वरील निकषानुसार ठरवणे कठीण आहे.