Post views: counter

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017 चीतयारी कशी करावी , how to prepare for State service preliminary 2017?राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी :

मित्रांनो गेले काही दिवस मला सातत्याने येऊ घातलेल्या राज्यसेवा 2017 च्या नियोजनासाठी विचारणा होत होती . वेळापत्रक बनवून द्या , नियोजन करून द्या अशी मागणी होत होती , आणि आता तर 2017 मधील पूर्ण चित्र स्पष्ट झाले आहे , म्हणून आपल्या विनंतीला मान देऊन माझा हा अल्पसा प्रयत्न .

◆ राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी कशी करावी ?
◆ हातात असलेल्या 4 महिन्यात कसा अभ्यास करावा ?
◆ अभ्यासाचे वेळापत्रक कसे असावे ? 4 महिन्यात अभ्यास पूर्ण होईल ?
◆ उजळणी साठी वेळ पुरेल ?

बरोबर ना तुमच्या मनात हेच काहूर उठले आहे ना प्रश्न भरपूर आणि वेळ कमी
अशी स्थिती आहे ना .

आज दिनांक 21 नोव्हेंबर 2016 (ज्या दिवशी हा लेख मी लिहित आहे ), राज्यसेवा पूर्व परीक्षा साधारणतः आयोगाच्या वेळापत्रकाप्रमाणे 2 एप्रिल 2017 रोजी आहे, तर आपण आजपासूनचे उपलब्ध दिवस मोजल्यास ते 130 च्या आसपास आहेत. तरीही आपण ते 1 डिसेंबर 2016 पासून धरल्यास 120 - 122 दिवस उरतात , म्हणजे अगदीच 4 महिने .

आपण जर या उपलब्ध 130 दिवसांचे काटेकोर पने नियोजन करून अभ्यास केला तर नक्कीच या 4 महिन्यात पूर्व परीक्षेची तयारी होऊ शकते .

मी दिलेल्या नियोजनानुसार अभ्यास केला तर आपली रीविजन सहित तयारी होऊ शकते . सविस्तरपने मी वेळापत्रक तयार केले आहे , शक्यतो यामध्ये जास्त बदल न करता फ़ॉलो करा , तसेच नियोजन हे लवचिक असावे या उक्तीनुसार आपण यामध्ये आपणास हवे त्याप्रमाणे बदल करू शकता . अर्थात हे नियोजन फक्त पूर्ण वेळ अभ्यास करू शकतात त्यांच्यासाठी आहे . जे लोक पूर्ण वेळ करू शकत नाहीत त्यांनी त्यांच्या उपलब्ध तासांप्रमाणे या वेळापत्रकातील वेळ कमी जास्त करावा .

साधारणतः चालू घडामोडी या मागील 1 वर्षातील घटनांवर आधारित असतात , तेंव्हा आपण साधारणतः जानेवारी 2016 पासून चालू घडामोडी वाचा , शेवटच्या काही दिवसात पूर्ण एक वर्षाच्या चालू घडामोडी एकत्र वाचण्यासाठी आपल्या वेबसाइटला भेट द्यायला विसरू नका .(www.eMPSCkatta.blogspot.in )
तसेच रोजच्या चालू घडामोडीसाठी आमचे चालू घडामोडीचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे , पूर्व परीक्षा हि पायाभूत ज्ञाना ( basic knowledge ) वर आधारित असल्याने बेसिक बुक्स वर जास्त भर द्या .

CSAT साठी मात्र दररोज सराव असणे केंव्हाही उत्तमच , परीक्षेत पूर्वीचा 1 महिना केलेला सराव आपणास धोकादायक ठरू शकतो .

बाकी अधिक माहिती मी खाली दिलेली आहे ती काळजी पूर्वक वाचा :


____________________________________
Admin-  🎯 eMPSCkatta 🎯
____________________________________

1 टिप्पणी:

  1. नोकरी जाहिराती या संकेतस्थळावर सर्व प्रकारच्या रोजगारांच्या संधी कोठे कोठे उपलब्ध आहेत याची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. http://www.nokarijahirati.tk

    उत्तर द्याहटवा