English लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
English लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Post views: counter

मराठी व इंग्रजीचा अभ्यास कसा करावा ?

              उमेदवाराची आकलनक्षमता अभिवृत्ती, विचार-प्रक्रिया, उमेदवाराची अभिव्यक्ती, लेखन आणि संवादाचे कौशल्य या गोष्टी जोखण्यासाठी इंग्रजी व मराठी या दोन अनिवार्य भाषाविषयांच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश एमपीएससी- मुख्य परीक्षेत करण्यात आला आहेत. अनिवार्य इंग्रजी व मराठी विषय १०० गुणांसाठी आणि बारावीच्या परीक्षेच्या समकक्ष असेल व प्रश्नांचे स्वरूप पारंपरिक असेल असे आयोगाने अभ्यासक्रमात नमूद केले आहे. या विषयांच्या तयारीची व प्रश्नपत्रिका सोडवण्याची रणनीती अभ्यासूया.
व्याकरण : हा विभाग पकीच्या पकी गुण मिळवून देणारा     आहे. त्यामुळे व्याकरणावर पकड मजबूत असायला हवी. नियम समजून घेणे व सराव करणे दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत.
लेखन :कार्यालयीन/औपचारिक पत्रांसाठीची ‘रचना’ पक्की लक्षात असायला हवी. या पत्रांची भाषा औपचारिक असणे व मुद्देसूदपणे म्हणणे मांडणे आवश्यक आहे.