Post views: counter

Current Affairrs Nov 2015 part - 1

 •  कुस्ती लीग 
 प्रो कुस्ती लीगसाठी आज पैलवानांचा लिलाव झाला. या लिलावात महिला पैलवान पुरुषांपेक्षाही सरस ठरल्या.
या लिलावात यूक्रेनची ओकसाना हरहेल सर्वात महागडी ठरली. हरहेलला हरियाणाने 41. 30 लाख रुपये आणि वेसलिसा (बेलारूस) हिला पंजाबने 40.20 लाख रुपयांत आपल्या टीममध्ये घेतले.
 भारताचे दोन सर्वात लोकप्रिय आेलिम्पिक पदक विजेते पैलवान योगेश्वर दत्त आणि सुशील कुमार यांनाही चांगली किंमत मिळाली. योगेश्वरला 39.70 लाख रुपयांमध्ये तर सुशीलला 38.20 लाख रुपयांत हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या संघांनी विकत घेतले आहे. आयकॉन खेळाडूंमध्ये योगेश्वर आणि सुशीलची बेस प्राइज 33-33 लाख रुपये होती.सहा आयकॉन खेळाडूंमध्ये पैलवान नरसिंह यादव, महिला पैलवान गीता फोगाट, अमेरिकेची महिला पैलवान अॅडेलीन ग्रे आणि स्वीडनची सोफिया मॅटसन यांचा समावेश होता. अमेरिकीची पैलवान ग्रे हिला मुंबईने 37 लाख रुपयांत विकत घेतले. तर, दिल्लीने मॅटसनला तिच्या बेस प्राइसवरच खरेदी केले..मुंबईच्या नरसिंगला बंगळुरू संघाने ३४ लाख ५० हजार रु.मिळाले

खेळाडूंची आखणी:-प्रत्येक फ्रँचाइजीकडे पाच भारतीय व चार परदेशी असे एकूण नऊ खेळाडू असतील.
त्यामध्ये चार महिला खेळाडूंचा समावेश आहे.
लीगमधील फ्रँचाइजी:- दिल्ली, पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, मुंबई व बंगळुरू.
स्पर्धेची ठिकाणे:- दिल्ली, मुंबई, बंगळुरू, लुधियाना, नोएडा व गुरगाव.
6 टीम, 18 सामने, 21 दिवस
- 21 दिवस चालणार टूर्नामेंट 10 ते 27 डिसेंबर पर्यंत.
- संघ हरियाणा, पंजाब, मुंबई, उत्तर प्रदेश, बेंगलुरु आणि दिल्ली
- प्रत्येक संघात असतील पांच पुरुष व चार महिला.
- 54 खेळाडू विकले गेले, 2 कोटीत .
- 18 सामने होणार एकूण बक्षिसे तीन कोटींची.
 • निधन:
ब्रिजमोहन मुंजाळ:-
उद्योगपती आणि हीरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष ब्रिजमोहन मुंजाळ (वय ९२) यांचे दिल्लीत रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे धाकटे बंधू ओ. पी. मुंजाळ यांचेही दोन महिन्यांपूर्वी निधन झाले होते
बी. एम. मुंजाळ यांचा जन्म सध्या पाकिस्तानात असलेल्या पंजाब प्रांतातील टोबा टेकसिंग या जिल्ह्यात झाला होता.सुरवातीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आर्मी ऑर्डनन्स फॅक्‍टरीत काम केले.फाळणीनंतर ते भारतात आले. ओ. पी. मुंजाळ, दयानंद मुंजाळ आणि सत्यानंद मुंजाळ या आपल्या तीन भावांसह त्यांनी १९४४ मध्ये अमृतसरमध्ये सायकलचे सुटे भाग विक्रीचा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय नंतर त्यांनी लुधियानाला हलविला.१९५६ मध्ये तत्कालीन पंजाब सरकारने राज्यात सायकल बनविण्यासाठी मुंजाळ बंधूंना परवाना दिला आणि त्यांनी ‘हीरो सायकल’ची स्थापना केली.१९८६ मध्ये सायकलचे जगातील सर्वाधिक उत्पादन करणारी कंपनी म्हणून हीरो सायकलची नोंद गिनेस बुकात झाली होती.होंडा मोटर्सबरोबर भागीदारी करण्याआधी त्यांनी मॅजेस्टिक ऑटो लिमिटेडची स्थापना करून हीरो मॅजेस्टिक मोपेडचे उत्पादन सुरू केले. याला चांगला प्रतिसाद मिळाला. होंडाबरोबर १९८४ मध्ये सुरू केलेली भागीदारी काही वर्षांपूर्वी संपुष्टात आल्यानंतर त्यांनी हीरो मोटोकॉर्प लिमिटेडची स्थापना केली होती.
 • जगातील सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींत – मोदी ९वे

*.फोर्ब्ज मासिकाने जगातील सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिध्द केली आहे. (सन २०१५ साठीची)
*. पंक्तित नरेंद्र मोदी ९ वे ठरले आहेत.
*.मोदी :--
*.मोदी २०१४ साली १४ व्या स्थानी होते. यावर्षी थेट नंबर ९१. व्लादिमिर पुतीन :--
*.रशियाचे अध्यक्ष
*.सलग तिसऱ्या वर्षी नंबर १ (hatrick)

२. एन्जेला मर्केल :--
*.जर्मनीच्या चान्सलर
*.२०१४ साली नंबर ३ वर होत्या. यंदा बराक भाऊंनामागे टाकले. (बराक ओबामा रे दोस्तांनो!)
*.सलग १० व्या वर्षी जगातील सर्वात प्रभावशाली महिला!

फोर्ब्ज जगातील सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींची यादी :--
*.फोर्ब्ज हे मासिक २००९ पासून ही यादी बनवत आहे
*.दरवर्षी १०० दशलक्ष लोकांतून एकाची निवड केली जाते. यावर्षी ७१ जणांची निवड झाली.
*.निकष : आर्थिक संसाधने, जगावरील प्रभाव, सत्ता आणि तिचा वापर, लोकांवरील प्रभाव इ.
*.सुरोजित चटर्जी : flipkart चे वरिष्ठ उपाध्यक्ष
*.सुरोजित चटर्जी flipkart चे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
*.flipkart ही भारतातील एक अग्रगण्य इ-मार्केटिंग कंपनी आहे.

 • पुरस्कार:-
पणशीकर जीवनगौरव:-
राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या २०१५-१६ च्या प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी दि गोवा हिंदू असोशीएशनच्या कला विभागाच्या सर्वसार्वा रामकृष्ण नाईक यांची  निवड नाईक यांनी दि गोवा असोशीएशनतर्फे रायगडाला जेव्हाजाग येते संगीत मत्सगंधा लेकरे उधड झाली अखेरचा सवाल नटसम्राट आदी नाटके सादर केली पाच लाख रु,स्मृती चिन्हेआणी मानपत्रे असे स्वरूप आहे अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव:- राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या २०१५-१६ च्या अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी जेष्ठ अभिनेत्री व गायिका रजनी जोशी यांची निवड केली रजनी जोशी यांनी सौभद्र , स्वंयवर, मृच्छकटिक अशा नाटकातून विविध भूमिका साकारल्या पाच लाख रु,स्मृती चिन्हेआणी मानपत्रे असे स्वरूप आहे
 • इंद्र-२०१५ : ७ वा भारत-रशिया संयुक्त लष्करी सराव अभ्यास

‘इंद्र-२०१५’ हा ७ वा भारत-रशिया संयुक्त लष्करी सराव अभ्यास आज सुरू झाला.
ठिकाण : बिकानेर जिल्हा, राजस्थानया

७ व्या संयुक्त सरावाचा उद्देश :--
‘संयुक्त राष्ट्र मान्यतेनुसार वाळवंटी प्रदेशात दहशतवादविरोधी अभियाने’
‘Counter Terrorism Operations in Desert Terrain under a United Nations Mandate’.
हा अभ्यास २ टप्प्यात पार पडेल.
फायदे :--
भारत-रशिया यांच्या लष्करादरम्यान सहकार्य वाढेल.
भारत-रशियाचे लोक परस्परांजवळ येतील.
 • पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ला, १५० ठार, आणीबाणी लाग

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे, एकाच वेळी जवळपास सात ते आठ ठिकाणी करण्यात आलेल्या या हल्ल्यात जवळपास १५० लोकांचामृत्यू झाला आहे. तर १०० पेक्षा अधिक जणांना हल्लेखोरांकडून धोका असल्याचा अंदाज आहे. फ्रान्सच्या राजधानी पँरिस मध्ये अल्लाहू अकबरच्या घोषणा देत भर जमावावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान या हल्ल्याची अद्याप कुठल्याही संघटनेने जबाबदारी घेतलेली नाही. या घटनेच्या पार्श्वभूमीवर फ्रान्समध्येआणीबाणी लागू करण्यात आली आहे. गोळीबारातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येते आहे. पोलिसांकडून सर्व बाधितांना सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, भारत सरकारने फ्रान्स सरकारकडे सहानुभूती व्यक्त केली आहे, तसेच पॅरीसमधले सगळे भारतीय सुखरूप असतील अशी आशा व्यक्त केली आहे.पॅरिसमधील स्टेडियमबाहेर देखील बॉम्बस्फोट झाला आहे. या स्टेडियममध्ये फ्रान्स आणि जर्मनी यांच्यात फुटबॉलचा सामना सुरु होता. हासामना पाहण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रास्वा होलांद देखील आले होते. होलांद हे टर्कीच्या दौ-यावर जाणार होते, त्यांनी हा दौरा रद्द केला आहे. मात्र, त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. कंबोज नावाच्या एका रेस्टॉरंटमध्येदेखील फायरिंग करण्यात आली असल्याची माहिती आहे.दरम्यान, फ्रान्सच्या पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिला दिला आहे. तुर्तास हा हल्ला कोणी केला आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र यामध्ये मोठ्या दहशतवादी संघटनेचा हात असण्याची शक्यता आहे. या हल्ल्यात मशीनगने बेछूट फायरिंग करण्यात आली. या हल्ल्यामुळे पँरिसमधील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं असून जगभरात अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांकडून या हल्ल्याचा निषेध केला, फ्रान्सच्या लोकांवर नाही तरमानवतेवर हल्ला आहे असे त्यांनी आपले मत व्यक्त केले.
 • भारत‬-ब्रिटन करार

भारत आणि ब्रिटन यांनी गुरुवारी तब्बल ९ अब्ज पाऊंडांच्यासामंज्यस्य करारावर (एमओयू) स्वाक्षऱ्या केल्या. यापैकी ६करार ब्रिटनमधील प्रमुख कंपन्यांशी करण्यात आले आहेत. मोबाईल नेटवर्क, सौर उर्जा, आरोग्यसेवा, बँकिंग अशा व्यापकक्षेत्रात हे करार करण्यात आले आहेत.हे प्रमुख करार पुढीलप्रमाणे आहेत-

 1.  ब्रिटनमधील सौर ऊर्जा क्षेत्रातील आघाडीची कंपनी लाईट सोर्स भारतात
 2.  अब्ज पाऊंडांची गुंतवणूक करणार आहे.२ वोडाफोन १.३ अब्ज पाऊंडांची गुंतवणूक करून भारतातील आपल्या नेटवर्कमध्ये सुधारणा आणि विस्तार करणार आहे.
 3.  ब्रिटनमधील आणखी एक प्रमुख वीज कंपनी इंटेलिजंट एनर्जीने १.२ अब्ज पाऊंडांचा करार केला आहे.
 4. किंग्ज कॉलेज हॉस्पिटल फाऊंडेशन ट्रस्ट आणि इंडो-युके हेल्थकेअर यांच्यात १ अब्ज पाऊंडांचा करार झाला.
 5. इंडिया बुल्स ६६ दशलक्ष पाऊंडांची गुंतवणूक करील. स्टार्ट-अप बँक ओकनॉर्थमध्ये हा निधी गुंतविण्यात येईल.
 6. येस बँक आणि लंडन स्टॉक एक्स्चेंजने ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्समध्ये बाँड आणि इक्विटी जारी करण्यासंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.पुणे आणि हैदराबादेत नवी तंत्रज्ञान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. तसेच नवे डाटा सेंटर आणि पेमेंट बँकेची स्थापनाही वोडाफोनद्वारे केली जाणार आहे.या करारान्वये भारतातील २७,४०० मोबाईल टॉवरांना स्वच्छ ऊर्जा पुरविण्यात येईल.याशिवाय हायड्रोजन इंधन सेलही बसविण्यात येतील.या कराराद्वारे चंदीगडमध्ये एक हॉस्पिटल उभारण्यात येईल. भारत-ब्रिटनच्यासहकार्यातून अशी एकूण ११ रुग्णालये उभारण्यात येतील.ओकनॉर्थ ही ब्रिटीश कंपनी आहे. या सौद्यामुळे इंडिया बुल्सचा समभाग मुंबई शेअर बाजारात तब्बल १०.२ टक्क्यांनी घसरला. आगामी काळात ३०० दशलक्ष पाऊंडांचे ग्रीन बाँड जारीकरण्याची त्यांची योजना आहे.

 • भारत-ब्रिटनची नागरी अणुकरारावर स्वाक्षरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लंडनमध्ये पाऊल ठेवत ब्रिटनसोबतच्या नव्या सहकार्य पर्वाचा प्रारंभ केला आहे. संरक्षण, व्यापार आणि काही क्षेत्रांत ९ अब्ज पौंडांच्या गुंतवणुकीसह नागरी अणुकरारावर स्वाक्षरी करीत दोनदेशांनी संबंध भक्कम करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. द्विपक्षीय चर्चेनंतर मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी संयुक्त पत्रपरिषदेला संबोधित करीत विविध करारांची घोषणा केली

 • भारतीय वंशाचे हरजित सज्जान कॅनडाच्या संरक्षणमंत्रीपदी

कॅनडातील नवनिर्वाचित पंतप्रधान जस्टिन ट्रुडी यांच्या मंत्रिमंडळात तीन भारतीय वंशांच्या खासदारांची वर्णी लागली आहे. विशेष बाब म्हणजे कॅनडातील संरक्षण खात्यासारख्या महत्त्वाच्या विभागाचा कार्यभार भारतीय वंशाचे हरजित सज्जान यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. कॅनडात ऑक्टोबरमध्ये पार पडलेल्या निवडणुकांमध्येलिबरल पार्टीचे जस्टिन ट्रुडी यांनी कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचा धुव्वा उडवत बाजी मारली होती. गुरुवारी ४३ वर्षीय ट्रुडी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली असून ट्रुडी यांच्या तीस जणांच्या मंत्रिमंडळात शीख समाजातील तिघा खासदारांची वर्णी लागली आहे. ४२ वर्षीय हरजित सज्जान हे बॅंकुवर येथून खासदार म्हणून निवडून आलेअसून ते निवृत्त जवान आहेत. त्यांनी बोस्निया आणि अफगाणिस्तानमधील कंदहार येथे कॅनडातील सैन्यासाठीकाम केले आहे. सज्जान यांचा जन्म भारतात झाला असून ते ५ वर्षांचे असताना त्यांचे आईवडिल कॅनडात स्थायिक झाले होते.
 • ज्वारी उत्पादनात २० टक्के वाढ

यंदा उशिरा झालेल्या पावसाचा फायदा ज्वारीला होणार असल्याने २० टक्के उत्पादन वाढीचा दावा राहुरी कृषी विद्यापीठाने केला आहे. देशात ४५ तर महाराष्ट्रात ३२ लाख हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे.सध्या पेरणी झालेली रब्बी ज्वारी गर्भावस्थेत असून महाराष्ट्रात ३२ लाख हेक्टर क्षेत्रावर समाधानकारक परिस्थिती आहे़ स्वाती नक्षत्र ७ नोव्हेंबर रोजी संपत असून, या दरम्यान पाऊस झाला, तर ज्वारी उत्पादनात भरघोस वाढ होईल, परंतु पाऊस झाला नाही, तरी २० टक्के वाढ अपेक्षित आहे.अहमदनगर, पुणे, सोलापूर या तीन जिल्ह्यात तब्बल १६ लाख हेक्टर क्षेत्रावर ज्वारी उभी असून, उत्पादन वाढण्याची चिन्हे असल्याचे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ ज्वारी पैदासकार शरद गडाख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ भारी जमिनीवर २९ टक्के, मध्यम जमिनीवर ४८ टक्के, तर हलक्या जमिनीवर २३ टक्के रब्बी ज्वारीचे पीक उभे असल्याची माहिती गडाख यांनी दिली
 •  भारत सरकारचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार :

१) इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय. शांतता, नि:शस्रीकरण व विकास पुरस्कार :
इंदिरा गांधी पुरस्कार किंवा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार हा भारत सरकारद्वारे दरवर्षी दिला जाणारा एक ख्यातनाम पुरस्कार आहे. हा पुरस्कार जगामधील अशा व्यक्ती किंवा संस्थेला दिला जातो ज्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता राखण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत
- सुरुवात : १९८६
- स्वरूप : रु २५ लाख व सन्मानचिन्ह
- २०१४ : भारतीय अवकाश सशोधन संस्था (इस्रो)
- २०१३ : अंजेला मर्केल (जर्मनी चान्स्लेर)
- २०१२ : एलेन जॉन्सन-सर्लिफ (लायबेरिया राष्ट्राध्यक्ष)

२) आंतरराष्ट्रीय म.गांधी शांतता पुरस्कार :
महात्मा गांधीजीच्या १२५ व्या जयंतीनिमित्त १९९५ सालापासून भारत सरकारद्वारे हा पुरस्कार देण्यात येतो
- स्वरूप : १ कोटी रु व मानपत्र
- २०१४ : भारतीय अवकाश सशोधन संस्था (इस्रो)
- २०१३ : चंडी प्रसाद भट

3) जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कार :
- सुरुवात : १९६५
- स्वरूप : २५लाख रु व मानपत्र
- २००९ : अंजेला मर्केल (जर्मनी चान्स्लेर)
- २००७ : वोल्कर ग्रीसमन (आइसलॅड राष्ट्रपती )
 • केंद्र सरकारची जाम योजना :

प्रधानमंत्री जनधन योजनेत वर्षभरात देशात अठरा कोटी बॅंक खाती उघडण्यात आली आहेत. या योजनेची व्याप्ती वाढवत याला मोबाईलची जोड देण्यात येणार आहे.यासाठी जनधन, आधार आणि मोबाईल यांचा एकत्रित आविष्कार असणारी जाम (JAM) योजना केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती केंद्रीय नागरी विकासमंत्री वेंकय्या नायडू यांनी दिली. तसेच देशातील संपूर्ण 585 कृषी बाजार समित्यांना एकत्रित जोडण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने राष्ट्रीय कृषी विकास बाजाराची संकल्पना अमलात आणली आहे.सर्व राज्यांना राष्ट्रीय कृषी विकास बाजार स्थापना अनिवार्य असून जानेवारीपर्यंत संपूर्ण देशात याची अंमलबजावणी होईल, असा विश्‍वास केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी व्यक्त केला.
 • भारत अमेरिकेला मागे टाकून जगात दुसऱ्या क्रमांकावर :

भारतातील इंटरनेट युजर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून डिसेंबर 2015 अखेरीस भारत अमेरिकेला मागे टाकून जगात दुसऱ्या क्रमांकावर पोचणार असल्याची माहिती इंटरनेट ऍण्ड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया (आयएएमएआय) आणि इंडियन मार्केट मार्केट रिसर्च ब्युरोने (आयएमआरबी) प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.ऑक्‍टोबर 2015 अखेर भारतामध्ये एकूण 37.5 कोटी इंटरनेट युजर आढळून आले आहे.सध्या इंटरनेट युजर्सच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.मात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने डिसेंबर 2015 अखेरपर्यंत भारतामध्ये 40.2 कोटी इंटरनेट युजर्स असण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.अशाप्रकारे अपेक्षित वाढ झाली तर भारत अमेरिकेला मागे टाकणार असून जगात दुसऱ्या क्रमांकावर पोचणार आहे.याबाबतीत जगामध्ये चीन सर्वांत पुढे असून तेथे 60 कोटी इंटरनेट युजर्स आहेत.गेल्या दशकभरात भारतामध्ये इंटरनेट युजर्समध्ये 1 कोटी वरून 100 कोटी एवढी वाढ झाली आहे.तर मागील तीन वर्षात ही संख्या 100 कोटींवरून 200 कोटींवर पोचली आहे.याचाच अर्थ असा की डिजीटल इंडस्ट्रीमध्ये भारत मोठी झेप घेत असून भारतामध्ये ई-कॉमर्सला मोठी संधीआहे असेही अहवालात पुढे म्हटले आहे.
 • ज्येष्ठ नेते अशोक सिंघल यांचे निधन :

रामजन्म चळवळीतील अग्रणी, विश्‍व हिंदू परिषदे (विहिंप) ज्येष्ठ नेते अशोक सिंघल यांचे निधन झाले. ते अविवाहित होते.1992 मध्ये अयोध्येतील बाबरी मशिद पाडण्यात कारसेवकांचा मोठा सहभाग होता.सिंघल यांचा जन्म 2 ऑक्‍टोबर 1926 रोजी झाला.
 • 'फूड सेफ्टी स्टॅण्डर्ड अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया'ने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल :

मॅगीच्या विरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात जाऊ नये यासाठी राजकीय दबाव कार्यरत झालेले असताना केंद्र शासनाच्या 'फूड सेफ्टी स्टॅण्डर्ड अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया'ने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे.त्यामुळे मॅगीची न्यायालयीन लढाई संपलेली नाही.फूड सेफ्टी अ‍ॅथॉरिटीने अगदी सुरुवातीस म्हणजे 5 जून रोजी मॅगीवर बंदी आणली होती.तर लगेचच 6 जून रोजी राज्य सरकारने मॅगीवर बंदी आणली होती.या बंदीच्या विरोधात मॅगी बनवणाऱ्या नेस्ले कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती.

 • बेलफास्ट, लिव्हरपूल येथील विद्यापीठांचे संशोधन :

कार्बन उत्सर्जनामुळे पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे, आता पॅरिसमधील हवामान परिषदेत कार्बन उत्सर्जन कुणी किती कमी करायचे यावर तू-तू-मैं-मैं होईल, पण प्रत्यक्षात हे उत्सर्जन वातावरणात पसरू नये यासाठी एक युक्ती वैज्ञानिकांनी शोधून काढली आहे.त्यांनी एका सच्छिद्र द्रवाचा शोध लावला असून त्याच्या मदतीने कार्बन उत्सर्जन गोळा करता येते, परिणामी ते वातावरणात मिसळत नाही.सच्छिद्रतेचा गुणधर्म असलेला द्रव जगात प्रथमच तयार करण्यात आला आहे.ब्रिटनमधील बेलफास्टच्या क्वीन्स विद्यापीठ व लिव्हरपूल विद्यापीठाच्या संशोधकांनी तसेच त्यांच्या आंतरराष्ट्रीय भागीदारांनी हा नवीन द्रव शोधून काढला आहे.त्यात खूप मोठय़ा प्रमाणावर हरितगृह वायू विरघळवता येतात.हे वायू द्रवाच्या सच्छिद्रता गुणधर्मामुळे शोषले जातात.अनेक पर्यावरण स्नेही रासायनिक प्रक्रिया यातून शोधता येतील.सध्या कार्बन पकडून तो समुद्राच्या तळाशी गाडला जातो, त्याला कार्बन सिक्वेट्रेशन असे म्हणतात त्यापेक्षा तो सच्छिद्र द्रवाने पकडता येत असेल तर ते जास्त फलदायी आहे.‘नेचर’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
 • सय्यद अकबरुद्दीन यांची यूएन कायमस्वरूपी सदस्य म्हणून नियुक्ती :

परराष्ट्र मंत्रालयाचे माजी प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांची भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातील (यूएन) कायमस्वरूपी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणून अकबरुद्दीन यांच्या कामगिरीची प्रशंसा झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकबरुद्दीन यांची निवड केली आहे. पुढील वर्षी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये अशोक पंडित यांच्याकडून अकबरुद्दीन सूत्रे स्वीकारतील. संयुक्त राष्ट्रसंघाने आता 70व्या वर्षांत पदार्पण केले आहे. यानिमित्ताने सर्व 193 देशांशी चर्चा करून संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यपद्धतीमध्ये काही बदल घडविणे आणि सुरक्षा समितीतील कायमस्वरूपी सदस्यांची संख्या वाढविणे हे दोन महत्त्वाचे कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. सुरक्षा समितीतील कायमस्वरूपी स्थानासाठी भारत प्रयत्नशील आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या काळामध्ये अकबरुद्दीन यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
 • योगगुरू बाबा रामदेव यांची स्वदेशी मॅगी बाजारात :

नेस्लेच्या मॅगीवर अद्याप काही राज्यात बंदी असतानाच योगगुरू बाबा रामदेव यांची स्वदेशी मॅगी आज बाजारात आली आहे. ही मॅगी शुद्ध असून, ती आरोग्यास घातक नसल्याचा दावा करण्यात येत आहे. स्वदेशी मॅगीच्या विक्रीचा प्रारंभ बाबा रामदेव यांच्या हस्ते आज झाला. स्वदेशी मॅगीवर "झटपट बनाओ, बेफिकीर खाओ"ची टॅगलाइन आहे. 70 ग्रॅमच्या या मॅगीच्या पुड्याची किंमत पाच रुपये असून, किरकोळ बाजारासह सर्व मॉल्समध्ये ती उपलब्ध असेल.
 • एनएससीएन-के संघटना केंद्राने दहशतवादी संघटना म्हणून जाहीर :

नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालॅंड-खापलांग (एनएससीएन-के) या संघटनेला केंद्राने दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले आहे. मणिपूरमधील 18 जवानांच्या हत्येमागे या संघटनेचा हात असल्याचे निष्पन्न झाले होते. अवैध कारवाया (नियंत्रण) कायदा 1967 नुसार केंद्रीय गृहमंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार "एनएससीएन-के" व त्याच्या अखत्यारीतील सर्व संघटनांवर बंदी घालण्यात आल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने दिली. "एनएससीएन-के"ने 2001मध्ये शांतता व शस्त्रसंधी करारावर स्वाक्षरी केली होती. त्यानंतर यावर्षी मार्चमध्ये ते या शस्त्रसंधी करारापासून एकतर्फी मागे हटले. त्यांनी भारत - बांगलादेश सीमेवरील भागात परेश बरुआच्या नेतृत्वाखालील नक्षलवाद्यांना आश्रय देण्यास सुरवात केली होती. तसेच आय. के. सोंगबिजित याच्या नेतृत्वाखालील "एनडीएफबी" या गटालाही सहकार्य करणे सुरू केले होते. याशिवाय मणिपूरमधील पीपल्स लिबरेशन आर्मीही त्यांनी शस्त्रे पुरवल्याचे स्पष्ट झाले आहे.
 • ज्येष्ठ अभिनेते सईद जाफरी यांचे निधन :

"शतरंज के खिलाडी", "राम तेरी गंगा मैली", "गांधी‘, "मासूम" आदी हिंदी चित्रपटांबरोबरच इंग्रजी चित्रपट आणि रंगभूमीवर विविध भूमिका साकारून आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते सईद जाफरी यांचे लंडनमध्ये निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. सईद जाफरी यांचा जन्म 9 जानेवारी 1929 रोजी पंजाबमध्ये झाला होता.
 • मिशेल जॉन्सन याची क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा :

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सन याने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली. न्यूझीलंडविरुद्ध पर्थमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीनंतर तो निवृत्त होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या मायकेल क्लार्क, ब्रॅड हॅडीन, रायन हॅरीस, ख्रिस रॉजर्स आणि शेन वॉट्सन यांनी नुकतीच ऍशेस मालिकेनंतर निवृत्ती घेतली होती. ऑस्ट्रेलियासाठी सर्वात जास्त बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत जॉन्सनचा चौथा क्रमांक लागतो. त्याने 311 बळी घेतले असून, त्याच्यापेक्षा जास्त शेन वॉर्न (708), ग्लेन मॅकग्रा (563) व डेनिस लिली (355) यांनी जास्त मिळविलेले आहेत. जॉन्सनने 73 कसोटीत 311 बळी घेतला आहेत. तर, 153 वनडेमध्ये 239 विकेट घेतल्या आहेत.
 • आदिवासींसाठी कुपोषण निर्मूलनाची योजना :

आदिवासी भागांतील वाढते कुपोषण रोखण्यासाठी मातांना एकवेळचा पोषक आहार देण्यासाठी सरकारने अवघ्या बावीस रुपयांची तरतूद केली आहे. राज्यातील आदिवासी भागांतील कुपोषण, बालमृत्यू आणि कमी वजनाच्या बालकांचा जन्म या समस्या फारच गंभीर आहेत. यावर मात करण्याच्या उद्देशाने 3 नोव्हेंबर 2015 च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. कुपोषण निर्मूलनाची तुटपुंजी तरतूद असणाऱ्या या योजनेस नाव मात्र, माजी राष्ट्रपती दिवंगत ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे देण्यात आले आहे. ही योजना राज्यातील 16 आदिवासीबहुल जिल्ह्यांमधील 85 एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्पांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.  ही योजना राज्यातील अंगणवाड्यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.  जेवण बनविण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना महिन्याला प्रति माता 250 रुपये मानधनाची तरतूद या योजनेत आहे.  डॉ. अब्दुल कलाम अमृत योजनेच्या माध्यमातून बाळंतपणाच्या अगोदरचे तीन आणि नंतरचे तीन महिने आदिवासी मातांना दररोज एकवेळचा चौरस आहार देण्यात येणार आहे.  केंद्र सरकारच्या टीएचआर योजनेचा निधीदेखील या योजनेत वळविण्यात येणार आहे.  या एकवेळच्या पूर्ण आहारामध्ये चपाती किंवा भाकर, कडधान्ये-डाळी, सोया दूध, शेंगदाणा लाडू, साखर-गूळ, नाचणीचा हलवा, अंडी, केळी, फळे, पालेभाज्या, खाद्यतेल, आयोडीनयुक्त मीठ आणि मसाला या घटकांचा समावेश असणार आहे.
 • नेपाळ फुटबॉल संघाचे प्रमुख गणेश थापा 10 वर्षांसाठी निलंबित :

लाच घेतल्याप्रकरणी नेपाळ फुटबॉल संघाचे प्रमुख गणेश थापा यांना 'फिफा'ने तब्बल 10 वर्षांसाठी निलंबित केले आहे. त्याचवेळी लाओस संघाचे अध्यक्ष विफेट सिचाकर यांच्यावरही दोन वर्षांची बंदी आणली आहे. थापा यांनी आपल्या 19 वर्षांच्या कार्यकाळामध्ये लाखो डॉलरची कमाई केल्याचा आरोप आहे.
 • भाषा आकलनावर नवा प्रकाश :

मेंदूत जसे न्यूरॉन्सचे जाळे असते तसे कृत्रिम न्यूरॉन्सचे जाळे तयार करून त्याच्या माध्यमातून मानवी भाषेने संवाद साधणारे बोधनात्मक प्रारूप तयार करण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे. हे प्रारूप इटलीतील सासारी विद्यापीठ व ब्रिटनमधील प्लायमाऊथ या विद्यापीठांनी तयार केले असून त्याचे नाव 'अ‍ॅनाबेल' ( आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क विथ अ‍ॅडाप्टिव्ह बिहेवियर एक्सप्लॉइटेड फॉर लँग्वेज लर्निग )असे आहे. हे कृत्रिम न्यूरॉन्सचे जाळे भाषा शिकू शकते व त्यात माणूस त्याला ती भाषा शिकवणारा मध्यस्थ असतो. माणसाला भाषेचे आकलन कसे होते त्यावर या संशोधनामुळे प्रकाश पडणार आहे. आपला मेंदू गुंतागुंतीची बोधनात्मक कार्ये कशी पार पाडतो हे समजण्यात अजून यश आलेले नाही. भाषा व तर्क यांचाही मानवी मेंदूच्या दृष्टिकोनातून उलगडा यात होणार आहे. माणसाच्या मेंदूत शेकडो न्यूरॉन्स असतात व ते विद्युत संदेशाने एकमेकांशी संपर्क साधत असतात. ‘प्लॉस वन’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
 • चीनमध्ये एफडीआय १०३.७ अब्ज डॉलरवर:

चीनमध्ये यावर्षी आॅक्टोबरअखेर थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) ८.६ टक्क्यांनी 
वाढून १०३.७ अब्ज डॉलरपर्यंत गेली आहे. एकट्या आॅक्टोबरमध्ये थेट विदेशी गुंतवणूक ४.२ टक्क्यांनी वाढून ८.७७ अब्ज डॉलरची झाली.शिन्हुआ वृत्तसंस्थेने म्हटले की, यंदा पहिले १० महिने आर्थिक क्षेत्र वगळता इतर सगळ्या क्षेत्रात एफडीआय गेल्या वर्षीच्या याच १० महिन्यांच्या तुलनेत ८.६ टक्क्यांनी वाढून १०३.७ अब्ज डॉलरची झाली. अतिउच्च तांत्रिक सेवा क्षेत्रात ५७.५ टक्के वाढ झाली.
 • रबीच्या पिकांना गारपिटीचा धोका !

: पश्चिमेकडून येणारे थंड वाऱ्यांचे प्रवाह एल निनोमुळे मध्य भारतातून वाहण्याची शक्यता असून,तसे झाल्यास महाराष्ट्रासह मध्य भारताला पुन्हा गारपिटीचा फटका बसू शकतो, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.यंदाच्या दुष्काळी स्थितीला कारणीभूत ठरलेला ‘एल निनो’ हा घटक येत्या दोन महिन्यांत त्याच्या सर्वोच्च पातळीवर पोचणार असल्याचा अंदाज ‘अमेरिकेच्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटर’ने (सीपीसी) दिला आहे. त्याचबरोबर येत्या फेब्रुवारीपासून त्याची तीव्रता झपाट्याने कमी होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. भारतासाठी हा अंदाज मोठा दिलासा देणारा असू शकतो. पुढील वर्षांचा मान्सून सर्वसाधारण राहण्याची शक्यता यामुळे बळावली असली, तरी याबाबतचे निश्चित भाकीत २५ डिसेंबरनंतरच करता येईल, असे साबळे यांनी सांगितल

 • विविध घोषित वर्ष:-

#जी२०१७:-
व्हिट महाराष्ट्र वर्ष ( महाराष्ट्र शासन )
* भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांमध्ये २०१७ हे सांस्कृतिक देवाणघेवाणीचे वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे.

#२०१६:- सामाजिक समता व सामाजिक न्याय वर्ष ( महाराष्ट्र शासन)
संस्कृतीक वारसा वर्ष (सार्क)
आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष (सयुंक्त राष्ट्र)
आंतरराष्ट्रीय कॅमेलीड्स वर्ष ( (सयुंक्त राष्ट्र)

#२०१५:- राष्ट्रीय जलक्रांती वर्ष (केंद्र सरकार)
राष्ट्रीय जलसंधारण वर्ष (२०१५-१६)( केंद्र सरकार)
आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष (सयुंक्त राष्ट्र)
.प्रकाश आणी प्रकाशधारीत तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष (सयुंक्त राष्ट्र)
किसान वर्ष (उत्तर प्रदेश)
पर्यटन वर्ष (उत्तखंड)
राष्ट्रीय वाचन वर्ष (भूतान)
डीजीटल वर्ष (महाराष्ट्र सरकार)
औषध सामग्री वर्ष (रसायन मंत्रालय. भारत सरकार)

#२०१४:- आंतरराष्ट्रीय कौटूबिक वर्ष (सयुंक्त राष्ट्र)
आंतरराष्ट्रीय क्रिस्टोलोग्राफी वर्ष (सयुंक्त राष्ट्र)
आंतरराष्ट्रीय लहान बेट विकासाचे वर्ष (सयुंक्त राष्ट्र)
पॅलेस्टीनी लोकांचे आंतरराष्ट्रीय एकता वर्ष (सयुंक्त राष्ट्र)
युवा दक्षता वर्ष (केंद्रीय युवा मंत्रालय)
 • सू की यांनी जिंकल्या संसदेत २/३ जागा
गेल्या रविवारी येथे झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकशाहीवादी नेत्या आँग सान सू की यांच्या पक्षाला निर्विवाद बहुमत मिळाले आहे. त्यामुळे म्यानमारमध्ये होणारा हा सत्ताबदल ऐतिहासिक म्हणवला जात आहे.१९९० नंतर सू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी या पक्षाची ही पहिली निवडणूक होती. या निवडणुकीत ८०टक्क्यांपेक्षा जास्त जागा सू की यांच्या पक्षाला मिळाल्या. म्यानमारमध्ये लष्कराची सत्ता होती; पण आता लोकनियुक्त सरकार येत असून या सरकारला अध्यक्षनिवडण्याची आणि सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली आहे.निवडणूक आयोगाने हळूहळू सर्व निकाल जाहीर केले. त्यात सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेले दोन तृतीयांश बहुमत नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी या पक्षाला मिळाले.या पक्षाने आतापर्यंत ३४८ जागा जिंकल्या असून, आणखी बरेच निकाल जाहीर व्हायचे आहेत. या बहुमताने सू की यांना संसदेच्या दोन्ही सभागृहावर नियंत्रण मिळाले आहे. त्यामुळे हाच पक्ष नवीन अध्यक्ष निवडू शकतो आणि सरकारही स्थापन करू शकतो.
 • काही महत्वाचे :

 1. बीसीसीआयने २०१५-१६ साठी क्रिकेटपटूंच्याकराराची घोषणा केली, महेंद्र सिंग धोनी, विराट कोहली, आर. अश्विन आणि अजिंक्य रहाणेंचा ए ग्रेडमध्ये समावेश
 2. माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांना आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलवरून हटवले, आता गव्हर्निंग काऊन्सिलमध्ये केवळ पाच सदस्य
 3. बीसीसीआयच्या निवड समितीत बदल, गगन खोडा, एमएसके प्रसाद यांचा निवड समितीत समावेश
 4. भारताच्या अग्नी-४ या अण्वस्त्रवाहक मिसाइलची यशस्वी चाचणी
 5. इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) चेअरमनपदी राजीव शुक्ला यांची पुन्हा निवड करण्यात आली
 6. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्षएन. श्रीनिवासन यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) चेअरमन पदावरून गच्छंती करण्यात आली
 7. म्यानमारमध्ये 25 वर्षांनंतर पहिल्यांदाच निवडणूक
 8. अठरा वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारत चीनपेक्षा कमी भ्रष्ट देश ठरला आहे. भ्रष्टाचारविरोधी "ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल' या संस्थेने केलेल्या वार्षिक पाहणीतून हे स्पष्ट झाले
 9.  भारतीय लष्कराने आज जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असणाऱ्या ब्राह्मोस या क्षेपणास्त्राचीराजस्थानमधील पोखरण येथे यशस्वी चाचणी घेतली
 10.  रेल्वेचे आरक्षित झालेले तिकीट आता यापुढे रद्द करण्यासाठी पूर्वीपेक्षा दुप्पट शुल्क भरावे लागणार
 11. सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायॉलॉजी या संस्थेचे संस्थापक संचालक व ख्यातनाम वैज्ञानिक पी.एम.भार्गव यांनी त्यांना १९८६ मध्ये मिळालेला पद्मभूषण किताब राष्ट्रपतींना परत केला
 12. पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया सोसायटीवर सरकारने सतीश शहा, चित्रपट समीक्षक भावना सोमैया व सीआयडी फेम दिग्दर्शक बी. पी. सिंह यांची नेमणूक केली
 13. भारताने अखेर विश्वगकरंडक पात्रता फुटबॉल स्पर्धेतील पहिला विजय मिळविताना गुआमचा पाडाव केला
 14. देशातील पहिली हॅंडबॉलची महा लीग स्पर्धा 21 ते 24 जानेवारीदरम्यान सोलापुरात होणार आहे. त्यासाठी ब्रॅंड ऍम्बेसिडर म्हणून ईशा देओल हिची निवड
 15. अर्जेन्टिनाच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाचे कर्णधारपदी रितू राणी हिचीच निवड करण्यात आली आहे. १८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत हा दौरा होणार आहे.
 16. भारत आणि इंग्लंड यांच्यात अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला नागरी आण्विक करार झाला आहे. इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. याबरोबरच उभय देशांत ९ बिलियन पौंडचा व्यापारी करारही झाला
 17. केंद्राच्या धर्तीवर राज्य शासनानेसुद्धा दत्तक ग्राम योजना जाहीर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या लगतचे पाचगाव दत्तक घेतले
 18. आशियातील सर्वाधिक वेश्याावस्ती असलेल्या जिल्ह्यांपैकी एक असलेल्या सोनागाचीमध्ये पुढील महिन्यापासून एक महत्त्वाचा प्रयोग केला जाणार आहे. येथील देहविक्रय करणाऱ्यांना एचआयव्ही प्रतिबंधक औषधे पुरविली जाणार असून, भारतात असे प्रथमच होत आहे.प्रकल्पाचे स्वरूप:- हा प्रकल्प सुरवातीला दोन वर्षांसाठी चालविला जाणार आहे.यासाठी सर्व प्रथम सोनागाचीमधील एड्‌स नसलेल्या एक हजार वेश्यां ना निवडून त्यांचे समुपदेशन केले जाईल.त्यांना औषधाबाबत माहिती दिली जाईल. या वेश्यां ची दर तीन महिन्यांनी रक्तचाचणी होईल. दोन वर्षांनंतर याबाबतचा अहवाल सादर केला जाईल.
 19. अठरा वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारत चीनपेक्षा कमी भ्रष्ट देश ठरला आहे. भ्रष्टाचारविरोधी "ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल‘ या संस्थेने केलेल्या वार्षिक पाहणीतून हे स्पष्ट झाले. या संस्थेने जगातील 175 देशांमध्ये पाहणी करून क्रमवारी तयार केली होती. त्यानुसार भारत 85व्या स्थानी असून, चीनला शंभरावे स्थान मिळाले आहे. या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या भ्रष्टाचार पूर्वानुमान निर्देशांकानुसार डेन्मार्क (92) हा सर्वात कमी भ्रष्ट देश असून, सोमालिया आणि उत्तर कोरिया सर्वांत भ्रष्ट देश ठरले आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा