Post views: counter

Current Affairs Nov 2015 Part - 2


 • 2016 मध्ये जीएसटी विधेयक मंजूर केले जाण्याचा विश्‍वास :

मलेशियापाठोपाठ सिंगापूरमध्येही जागतिक गुंतवणूकदारांना भारतात येण्याचे आवाहन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परकी गुंतवणूकदारांना सोयीचे जावे, यासाठी अधिक सुधारणा करण्याचे आश्‍वासन दिले.
 गुंतवणूकदारांची योग्य काळजी घेतानाच 2016 मध्ये वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) विधेयक मंजूर केले जाण्याचा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. पुढील वर्षापासून देशात वस्तू आणि सेवाकराची अंमलबजावणी सुरू होऊन नवे वातावरण तयार होईल, अशी आशा व्यक्त करत मोदी यांनी कंपनी कायदे लवाद स्थापन करणार असल्याचे जाहीर केले. तसेच कर आणि नियंत्रणाबाबत असलेल्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी 14 ठोस उपाय केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संरक्षण सहकार्य वाढविण्याबरोबरच सायबर सुरक्षा, जहाज बांधणी आणि नागरी उड्डाण या क्षेत्रांमध्ये हे दहा करार करण्यात आले.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात संरक्षणासह विविध क्षेत्रांशी संबंधित दहा करार :
 1. भारत आणि सिंगापूरमधील संबंध धोरणात्मक भागीदारी पातळीवर नेणे
 2.  संरक्षण मंत्री पातळीवर चर्चा सुरू करणे, दोन्ही देशांमध्ये संयुक्त लष्करी सराव, संयुक्त उत्पादन आणि विकासासाठी दोन्ही देशांच्या संरक्षण कंपन्यांमध्ये सहकार्य वाढविणे
 3.  सुरक्षा सहकार्यासाठी भारतीय माहिती तंत्रज्ञान विभाग, भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद गट (सर्ट-इन) आणि सिंगापूर सायबर संस्थेदरम्यान करार
 4.  भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि सिंगापूर कॉर्पोरेशन एंटरप्राइजेस यांच्यात नागरी उड्डाण सेवेबाबत आणि जयपूर आणि अहमदाबाद विमानतळ व्यवस्थापनाबाबत करार
 5.  नीती आयोग आणि सिंगापूर कॉर्पोरेशन एंटरप्राइजेसमध्ये योजना सहकार्य करार
 6.  भारताचा अंमलीपदार्थ नियंत्रण विभाग आणि सिंगापूरचा केंद्रीय अंमलपदार्थ विभाग यांच्यामध्ये अंमलीपदार्थाच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्यासाठी सामंजस्य करार
 7.  भारताच्या गाव आणि देश नियोजन संस्था आणि सिंगापूर कॉर्पोरेशन एंटरप्राइजेस यांच्यामध्ये नगर नियोजन आणि प्रशासन सहकार्य करार
 8.  जहाज बांधणी करार
 9.  सिंगापूरमधील आशियाई संस्कृती संग्रहालयाला कर्जपुरवठा
 10.  दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध आणि नागरिकांमध्ये थेट संवाद वाढविण्यासाठी प्रयत्न करणे

 • "स्व. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजना" :

यंदाच्या वर्षापासून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी "स्व. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजना" राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या योजनेनुसार विमा कंपन्यांना हप्त्याची रक्कम दिल्यापासून 12 महिने कालावधीसाठी शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांचे विमासंरक्षण मिळणार आहे.
 या योजनेसाठी आवश्‍यक असणारा निधी वितरित करण्यासही या वेळी मान्यता देण्यात आली.
 या योजनेचा लाभ सात-बारावरील नोंदीप्रमाणे 10 ते 75 वर्षे वयोगटातील राज्यातील 1 कोटी 37 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच राज्यात सध्या राबविण्यात येत असलेल्या शेतकरी जनता अपघात विमा योजनेची मुदत 30 नोव्हेंबर 2015 रोजी समाप्त होत असल्याने ही नवी योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. योजनेसाठी दोन लाख रुपयांच्या विमासंरक्षणासाठी 27 कोटी 24 लाख 93 हजार रुपयांचा विमा हप्ता भरण्यात येणार आहे तसेच शेतकऱ्यांना विहित कागदपत्रांशिवाय इतर कोणतीही कागदपत्रे सादर करावी लागणार नाहीत. योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी किंवा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने विमा कंपन्यांकडे स्वतंत्ररीत्या विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज नाही. सर्व खातेदार शेतकऱ्यांचा हप्ता राज्य शासनाद्वारे भरण्यात येणार आहे; तसेच यापूर्वी शेतकऱ्यांनी अथवा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने कोणतीही वेगळी विमा योजना लागू केली असल्यास अथवा विमा उतरविला असल्यास त्याचा या योजनेशी काहीही संबंध असणार नाही. या योजनेचे लाभ स्वतंत्ररीत्या मिळणार आहेत. तसेच स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी स्वच्छ महाराष्ट्र कोष स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यातील ग्रामीण आणि नागरी भागांत राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी हा कोष वापरण्यात येणार आहे.
 मुख्यमंत्री या कोषाचे अध्यक्ष; तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, नगरविकास राज्यमंत्री, मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव (वित्त), प्रधान सचिव (नगर विकास-1), प्रधान सचिव (पाणीपुरवठा व स्वच्छता), सचिव (नगर विकास-2) सदस्य असतील. तर नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमी या पोलिस प्रशिक्षण संस्थेस पुण्याच्या "यशदा" या संस्थेच्या धर्तीवर स्वायत्तता देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला. यामुळे ही संस्था यापुढे महाराष्ट्र पोलिस दलाची शिखर प्रशिक्षण संस्था म्हणून कार्य करणार आहे.
 • गदिमा पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना जाहीर :
साहित्य, चित्रपट आणि कलाक्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना जाहीर झाला आहे. गीतरामायणकार गजानन दिगंबर माडगूळकर अर्थात गदिमांच्या 38 व्या स्मृतीदिनानिमित्त 14 डिसेंबर रोजी ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या हस्ते होणार आहे. गदिमांच्या पत्नी विद्या माडगूळकर यांच्या स्मरणार्थ गेल्या दहा वर्षांपासून गदिमा प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा 'गृहिणी सखी सचिव' पुरस्कार आंतरराष्ट्रीय किर्तीचे अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या पत्नी वसुंधरा जाधव यांना देण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून दिला जाणारा 'विद्या प्रज्ञा पुरस्कार' भारतातील युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांना जाहीर झाला आहे. तर नव्या उभारीच्या प्रतिभावंतांना स्फूर्तीदायक ठरलेला चैैत्रबन पुरस्कार कथा, पटकथा, गीतकार आणि दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांना जाहीर झाला आहे.
 • वस्तू विक्रीसाठी हिंदू देवदेवताच्या नावांचा वापर करता येणार नाही :
वस्तू आणि सेवा विक्रीसाठी हिंदू देवदेवता अथवा धार्मिक ग्रंथांच्या नावांचा वापर करता येणार नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. अशा प्रकारच्या गोष्टींना मान्यता दिल्यास जनतेच्या संवेदनक्षमतेवरील विश्वासाला तडा जाऊ शकतो, असे न्या. रंजन गोगोई आणि न्या. एन. व्ही. रामन यांच्या पीठाने म्हटले आहे. पाटणा येथील लालबाबू प्रियदर्शी यांनी उदबत्त्या आणि सुंगधी द्रव्ये यांच्या विक्रीसाठी 'रामायण' हा ट्रेडमार्क वापरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका केली होती, त्या वेळी पीठाने वरील बाब स्पष्ट केली. कोणत्याही व्यक्तीला नफा मिळविण्यासाठी देवदेवता अथवा धार्मिक ग्रंथांच्या नावाचा वापर करण्याचा अधिकार देता येणार नाही, हा युक्तिवाद पीठाने मंजूर केला.

>>ब्रॅंड फायनान्स या कंपनीने तयार केलेल्या अहवालात ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत अमेरिका प्रथम क्रमांकावर असून, त्यांचे व्यापारमूल्य १९.७ अब्ज डॉलर आहे. चीनने दुसरा, तर जर्मनीने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. ब्रिटन, जपान आणि फ्रान्सचाअनुक्रमे चौथा, पाचवा आणि सहावा क्रमांक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत फ्रान्स आणि भारताने एका क्रमांकाने सुधारणा केली आहे, तर पहिल्या पाच देशांची क्रमवारी गेल्यावर्षीप्रमाणेच आहे. यादीत भारत सातव्या स्थानावर असला तरी व्यापारमूल्यात झालेली ३२ टक्के वाढ ही पहिल्या वीस देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. आर्थिक मंदीमुळे चीनचे व्यापारमूल्य ६.३ अब्ज डॉलरने घटले असले, तरी दुसरा क्रमांक कायम राखण्यात त्यांना यश आले आहे.

 • पॅरिस जागतिक हवामान परिषद:-
येत्या ३० नोव्हेंबर व एक डिसेंबरला फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये जगभरातील देश एकत्र येणार आहेत. या परिषदेत सर्व देशांचे पंतप्रधान; तसेच अध्यक्ष सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भारत, चीन, ब्राझील व दक्षिण आफ्रिका या देशांच्या प्रतिनिधींची बैठक बीजिंग येथे ३० व ३१ ऑक्टोबरला झाली.या चार देशांमध्ये जगातील ४० टक्के लोकसंख्या राहात असल्याने या चार देशांची भूमिका सर्व देशांना गांभीर्याने घ्यावी लागणार आहे. पर्यावरणातील बदल आणि जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी विकसनशील देशांनी त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रयत्न केले असून, त्यातही भारत आघाडीवर आहे. या तुलनेत पाश्चात्त्य विकसित देशांनी त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी प्रयत्न केले आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन विकसित देशांनी आपला अधिकचा वाटा उचलावाया मुद्द्यावर परिषदेत भर देण्यात येणार आहे.
 • चर्चित देश:- चीन
चीन सरकारने गुन्हेगारी कायद्यात दुरुस्ती केली असून, या बदलांमुळे आता पुरुषांवर होणारे लैंगिक अत्याचार बलात्कार समजले जाणार आहेत. चीनमध्ये स्त्री किंवा पुरुषांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणी कमीत कमी पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. आतापर्यंत फक्त स्त्रियांवरील लैंगिक अत्याचारांसाठी शिक्षेची तरतूद चीनमधील कायद्यात होती. गुन्हेगारी कायद्यातील वरील दुरुस्तीला चीनने ऑगस्टमध्ये मंजुरीदिल्याचे वृत्त चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिले आहे.पुरुषांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांना चीनच्या गुन्हेगारी कायद्यानुसार गुन्हा समजण्यात येत नव्हते. त्यामुळे अशा स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये गुन्हेगारांना अतिशय अल्प शिक्षाहोत असे. पुरुषांवरील लैंगिक अत्याचारासंबंधीतक्रार दाखल करणेहीअतिशय अवघड काम होते.वसतिगृहात राहणाऱ्या एका पुरुष कामगारावर २०१०मध्ये सुरक्षा रक्षकाने लैंगिक अत्याचार केले होते. मात्र या प्रकरणातील आरोपीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल गुन्हा दाखल होऊ शकला नव्हता. या प्रकरणात अवघ्या १२ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आरोपीला झाली होती.कायद्यातील दुरुस्तीनुसार अल्पवयीन वेश्येबरोबरचे लैंगिक संबंध हा गुन्हा ठरणार असून, त्या प्रकरणी बलात्काराचे कलम लावले जाणार आहे. थोडक्यात अल्पवयीन वेश्येबरोबरचा लैंगिक संबंध बलात्कार समजला जाणार आहे. आतापर्यंत अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार १४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या वेश्येबरोबर लैंगिक संबंध ठेवल्यास कमीत कमी १५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद होती. तसेच, लहान मुलांवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे.
 • चर्चित व्यक्ती:- मीरा मोदी
न्यूयॉर्क सिटीत राहणाऱ्या ११ वर्षीय मीरा मोदी या मुलीने अभेद्य असणारा पासवर्ड तयार केला असून, ती हॅकर्ससमोर आव्हान बनलीआहे. हा पासवर्ड ती दोन डॉलरमध्ये (१३० रुपये) विकत आहे.मीरा मोदी ही सहाव्या इयत्तेत शिकत आहे. ती डाईसच्या (फासे) मदतीने सहा शब्दांचा पासवर्ड तयार करते. हा पासवर्ड युजर्सना लक्षात ठेवण्यासाठी सोपा आहे. पासवर्ड सोपा बनविण्यासाठी जुन्या डाईसवेअरची पद्धती वापरते.या पद्धतीने ती एक वाक्प्रचार करते आणि त्याची मदत घेऊन ती सहा शब्दांचा पासवर्ड तयार करते. हा पासवर्ड हॅकर्ससुद्धा हॅक करू शकत नाहीत. मीराने ‘डाईसवेअर पासवर्डस् डॉट कॉम’ या नावाने वेबसाईट तयार केली आहे. त्या वेबसाईटवरून कोणीही हाअभेद्य पासवर्ड प्राप्त करू शकतो.डाईसवेअर हे वाक्प्रचार तयार करणारे जुने तंत्रज्ञान आहे. त्यात डाईसचा वापर केला जातो. डाईसद्वारे स्पेशल डाईसवेअर वर्ल्ड लिस्टमधून दोन शब्द निवडतो. या लिस्टमधील प्रत्येक शब्द पाच डिजिटसच्या क्रमांकाच्या भविष्यवाणीसाठी आधार म्हणून घेतले जातात. सर्व डिजिटस् १ ते ६ क्रमांकांच्या दरम्यान असतात. त्यानुसार आपल्याला पाच डाईसचा उपयोग करताना यादीतील एक शब्द निवडण्याची सुविधा देते. याच आधारावर आलेल्या सहा शब्दांचा एक वाक्पप्रचार बनतो, त्यापासून पासवर्ड बनविला जातो.
 • अटल सौर कृषी पंप' योजना:-
राज्यातील पाच लाख शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्यासाठी अटल सौर कृषी पंप योजना राबविण्यात येणार असून, त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यातील दहा हजार सौर कृषी पंपांचे वाटप लवकरात लवकर करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.अटल सौर कृषी पंप योजनेमधून १० हजार सौर कृषी पंपांच्या वाटपाची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात आहे. ऊर्वरित शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत सौर कृषी पंपांचे वाटप लवकरात लवकर करावे. अटल सौर कृषी पंप योजना जनतेपर्यंत पोचविण्यासाठी; तसेच सौर पंपांची उपयुक्तता शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी जिल्हास्तरावर प्रचार वप्रसार मोहीम राबवावी. राज्यातील एक लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्याकृषी पंपांना वीजजोडणी अद्याप मिळाली नाही. त्यामुळे या कृषी पंपांना वीजजोडणी देण्यासाठी विशेष मोहिम राबवून ३१ मार्चपर्यंत सर्वांना जोडणी द्यावी.असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
 • संयुक्त राष्ट्रसंघ (यूएन)चा अहवाल:-
पश्चिम आशियामध्ये आणि विशेषत: सीरियामधील युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक नागरिक स्थलांतरित होत असून, दर दहा मिनिटाला एक "देशविहीन‘ बालक जन्माला येत असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने (यूएन) दिला आहे. सीरियातील परिस्थिती आणि त्याचा परिणाम म्हणून निर्माण झालेला युरोपमधील स्थलांतरितांचा प्रश्न अद्यापही कायम असल्याने बालकांची परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची भीतीही "यूएन‘ने व्यक्त केली आहे.स्थलांतरितांच्या प्रश्नांचा अभ्यास करून "यूएन‘च्या एका समितीने नुकताच आपला अहवाल सादर केला आहे. स्थलांतरित आणि स्थलांतरादरम्यान "देशविहीन‘ अवस्थेत जन्माला येणाऱ्या बालकांवरपुढील काळात सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या प्रश्नांचा अभ्यास या समितीने केला आहे. या बालकांना कोणतेही नागरिकत्व नसल्याने त्यांना वैद्यकीय सुविधा, शिक्षण आणि रोजगार नाकारले जाऊ शकतात, असे या अहवालात म्हटले आहे.सीरियामधील कायद्यानुसार, बालकांना वडिलांच्या अस्तित्वाच्या आधारावरच नागरिकत्व मिळते. मात्र, येथे गेल्या चार वर्षांपासून यादवी असल्याने लाखो लोक देश सोडून गेले आहेत आणि किमान २५ टक्के कुटुंबांमध्ये कोणी वडीलच उरलेले नाहीत. गर्भवती असताना देश सोडावा लागलेल्या महिलांना एक दिवस पुन्हा आपल्या देशात जाण्याचीआशा असली तरी, त्यांच्या मुलांकडे जन्माचा दाखला नसल्याने त्यांचे भविष्य अंधारात आहे. युरोपातील वीस देशांमध्ये जवळपास ७० हजार "देशविहीन‘ बालके असून, त्यांच्या संख्येत सरासरी दर दहा मिनिटाला एक याप्रमाणे वाढ होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. यातील अनेक बालकांचे लसीकरणही झालेले नाही.‪

#‎अहवालात‬केलेल्या शिफारशी:--

बालकांच्या आईच्या नागरिकत्वाच्या आधारे त्यांना दाखले मिळावेत- ज्या देशात त्यांचा जन्म झाला, तेथील नागरिकत्व द्यावे- धर्म, वंश या आधारावर नागरिकत्व नाकारले जाऊ नये.

 • उच्च न्यायालयाची सूचना:-

"कट ऑफ डेट‘नंतर तिसरे अपत्य झालेल्यांना ग्रामपंचायत निवडणूक लढवू द्या. त्यांच्या अपात्रतेचा निर्णय नंतर जिल्हाधिकाऱ्यांनीसुनावणीअंती घ्यावा, अशी महत्त्वाची सूचना उच्च न्यायालयाने सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला केली आहे.विशिष्ट तारखेनंतर तिसरे अपत्य झालेल्यांना ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास महाराष्ट्र ग्रामपंचायत कायद्यानुसार बंदी आहे. निवडणूक नियमांनुसार अशांचा उमेदवारी अर्ज तातडीच्या सुनावणीनंतर फेटाळण्याचे अधिकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना (आरओ) आहेत. मात्र, या आरओंनी तातडीच्या सुनावणीनंतर (समरी ट्रायल)अशा व्यक्तींचे उमेदवारी अर्ज फेटाळण्यास उच्च न्यायालयाने हरकत घेतली आहे.तीन अपत्ये असलेली व्यक्ती ग्रामपंचायतीवर निवडून आल्यानंतर तिच्या अपात्रतेबाबत जिल्हाधिकारी सुनावणी घेऊन आदेश देऊ शकतात. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरताना त्यांना अपात्र ठरवू नये, असा न्या. नरेश पाटील व न्या. एस. बी. शुक्रे यांच्या मतप्रदर्शनाचा अर्थ आहे.ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील खारभाऊ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी महेंद्र पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, त्यांना कायद्यात नमूद केलेल्या विशिष्ट तारखेनंतर तिसरे अपत्य झाल्याचा आक्षेप प्रतिस्पर्धी उमेदवाराने घेतला. याबाबतची कागदपत्रे आणि युक्तिवाद लक्षात घेऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तातडीच्या सुनावणीत पाटील यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला. त्याविरुद्ध पाटील यांनी याचिका सादर केली आहे. तिसऱ्या अपत्याच्या पुराव्यांबाबत सविस्तर सुनावणी व छाननी आवश्यक आहे. आरओंच्या तातडीच्या सुनावणीत हे होणार नाही, असा त्यांचा आक्षेप होता. तो खंडपीठाने मान्य केला.
 • भारत-रशिया:-
भारत रशियाकडून ‘एस-४०० ट्राएम्फ’ ही क्षेपणास्त्रभेदी यंत्रणाविकत घेण्याचा तसेच आणखी एक अणू पाणबुडी भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रयत्न करत आहे. येत्या डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉस्कोला जाणार आहेत. त्या भेटीत या कराराला अंतिम स्वरूप मिळण्याची अपेक्षा आहे.रशियाने आजवर ही प्रणाली केवळ चीनलाच विकली आहे. चीनने त्यासाठी ३ अब्ज डॉलर मोजले आहेत. जर मोदी यांच्या भेटीत करार झालातर भारत ही प्रणाली घेणारा दुसरा देश असेल. रशियन सुरक्षा दलांमध्ये २००७ पासून ही प्रणाली कार्यान्वित आहे. भारताकडे यापूर्वीच असलेल्या ‘एस ३००’ या रशियन क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेची ही सुधारित आवृत्ती आहे. ‘एस-४०० ट्राएम्फ’ शत्रूची विमाने, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हवेतच ४०० किलोमीटर अंतरावर नष्ट करू शकते. ती आपल्या दिशेने येणाऱ्या लक्ष्यांच्या दिशेने तीन प्रकारची वेगवेगळ्या क्षेपणास्त्रे डागू शकते. एकाच वेळी ३६ लक्ष्यांचा वेध घेऊ शकते.भारताने रशियाकडून २०१२ मध्ये चक्र ही अणू पाणबुडी भाडेतत्त्वावर घेतली होती. तशी आणखी एक पाणबुडी घेण्याची योजना आहे. रशियाच्या कामोव्ह-२२६टी या प्रकराच्या २०० हेलिकॉप्टर्सचे भारतात उत्पादन करण्याचा प्रस्ताव आहे. शिवाय सुखोई-३० एमकेआय या लढाऊ विमानांच्या देखभाल-दुरुस्तीसंदर्भातही वाटागाटी झाल्या. या करारांना मोदींच्या मॉस्को भेटीत अंतिम स्वरूप दिले जाण्याची शक्यता आहे.
 • उदय‘ (उज्ज्वल डिस्कॉम ऍश्युरन्स) योजना:-
राज्यांमधील तोट्यात चालणाऱ्या वीज वितरण कंपन्यांवरील कर्जाचा बोजा दूर करण्यासाठी "उदय‘ योजना राबविली जाईल. २०१९ पर्यंत सर्व डिस्कॉम कंपन्यांचा तोटा शून्यावर आणण्याचे या "उदय‘ योजनेचे उद्दिष्ट आहे.बहुतांश राज्यांमधील डिस्कॉम कंपन्यांची अर्थिक स्थिती फारशी चांगली नसून, मार्च २०१५ पर्यंत या कंपन्यांचा तोटा तीन लाख कोटींहून अधिक आहे. अव्यवस्थापनामुळे तोटा वाढला आहे. त्यातील राजस्थान, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि हरियाना या राज्यांमधील डिस्कॉम कंपन्यांची आर्थिक स्थिती अत्यंत डबघाईला आली असल्याने या राज्यांना "उदय‘ योजनेमध्ये लाभ दिला जाईल.इतरही राज्यांच्या डिस्कॉम कंपन्यांना, त्या त्या राज्यांच्या मागणीनंतर योजनेमध्ये सामावून घेतले जाईल, यापूर्वी २००२ मध्ये सुरेश प्रभू ऊर्जामंत्री असताना त्यांनी डिस्कॉम कंपन्यांच्या मदतीसाठीची योजना आणली होती. आता पुन्हा एकदा नवी योजना सरकार राबविली जाणार आहे.
 • असोचॅमचे सर्वेक्षण :
असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ऑफ इंडिया (असोचॅम) या उद्योगक्षेत्रातील शिखर संघटनेने केलेल्या पाहणीतून रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्रच आघाडीवर असल्याचे दिसून आले असून, उत्तर प्रदेश दुसऱ्या तर गुजरात तिसऱ्या स्थानावर आहे.महाराष्ट्रातील रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये 20.8 टक्के (तीन लाख कोटी रुपयांची) गुंतवणूक झाली असून उत्तर प्रदेशात 13.8 टक्के (दोन लाख कोटी रुपयांची) गुंतवणूक झाली आहे.देशभरातील रिअल इस्टेट क्षेत्रात झालेल्या गुंतवणुकीतील अर्धी गुंतवणूक या तीन राज्यांमध्ये झाली आहे.तसेच कर्नाटक, हरियाना आणि तेलंगणमध्ये अनुक्रमे 12.3 टक्के, 7.9 टक्के आणि 6.1 टक्के एवढी गुंतवणूक झाली आहे.गुजरातमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रातील मागील दोन दशकांमधील गुंतवणुकीचा दर 28 टक्‍क्‍यांवर पोचला आहे.यानंतर केरळ (59 टक्के), कर्नाटक (40 टक्के) आणि राजस्थान (29 टक्के) या राज्यांचा क्रम लागतो.
 • आमीरच्या असहिष्णुतेबाबतच्या वक्तव्याचा "स्नॅपडील" कंपनीला फटका :
आमीरच्या असहिष्णुतेबाबतच्या वक्तव्याचा "स्नॅपडील" या "ई-कॉमर्स" क्षेत्रातील कंपनीला फटका बसला आहे.आमीर खान "स्नॅपडील"चा ब्रॅंड ऍम्बॅसिडर आहे.त्यामुळे त्याच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी नेटिझन्सनी "स्नॅपडील"चे स्मार्टफोन्समधील "ऍप" काढून टाकण्याबाबत आवाहन केले आहे.
 • विजय मल्ल्या पुढील महिन्यात निवृत्त्ती घेणार :
विजय मल्ल्या हे वयाच्या 60 वर्षे पूर्ण होताना म्हणजे पुढील महिन्यात निवृत्त्ती घेणार आहेत. आपण निवृत्ती घेण्याचा विचार करीत आहोत असे त्यांनी म्हटले आहे. निवृत्तीचा निर्णय निश्चित झाल्याची घोषणा त्यांनी अद्याप केली नाही. निवृत्तीनंतर जीवनाचा आनंद घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विजय मल्ल्या यांची युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडमध्ये 4.07 टक्के भागीदारी आहे.
 • "इंटरनेट डॉट ओआरजी"या उपक्रमाद्वारे इंटरनेटच्या विनामूल्य सेवा संपूर्ण भारतभर :
"नेट न्युट्रॅलिटी"चा मुद्दा उपस्थित झालेला असताना "फेसबुक"ने आपल्या "इंटरनेट डॉट ओआरजी"या उपक्रमाद्वारे रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या सहकार्याने बेसिक इंटरनेटच्या विनामूल्य सेवा संपूर्ण भारतभर सुरु करण्याची घोषणा केली आहे. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी याबाबत फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली आहे. तसेच आरोग्य, शिक्षण, रोजगार आदी प्राथमिक इंटरनेट सेवा रिलायन्स नेटवर्कद्वारे विनामूल्य उपलब्ध होणार आहेत. देशातील प्रत्येकजण या "फ्री इंटरनेट सेवा" वापरू शकतो असे झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे. फेसबुकने अलिकडेच गुजरात, महाराष्ट्र आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि गोव्यामध्ये "फ्री बेसिक इंटरनेट" सेवा सुरु केल्या आहेत. तसेच या उपक्रमांतर्गत 32 मोबाईल ऍप्स आणि संकेतस्थळांना निशुल्क भेट देता येते. आता विनामूल्य मोबाईल ऍप्स्‌ आणि संकेतस्थळांची संख्या वाढवून 80 करण्यात आली आहे.

 • ओएनजीसी पुढील वर्षी भांडवली खर्चात 20 ते 30 टक्क्यांची कपात करणार :
कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने तेल व नैसर्गिक वायू महामंडळाने (ओएनजीसी) पुढील वर्षी आपल्या भांडवली खर्चात 20 ते 30 टक्क्यांची कपात करण्याचे निश्चित केले आहे. कंपनीने हा निर्णय घेतल्याचे ओएनजीसीचे अध्यक्ष दिनेश सराफ यांनी सांगितले आहे. कंपनीने चालू वर्षात मात्र भांडवली खर्चाची रक्कम मागील वर्षीप्रमाणे 30 हजार कोटी रुपयांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु कंपनीच्या कमी झालेल्या गुंतवणूकीचा उत्पादनावर परिणाम होणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. केवळ कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याने भांडवली खर्चात कपात करण्यात येणार आहे. तसेच कृष्णा गोदावरी खोऱ्यातील ओएनजीसीच्या क्लस्टर-2 मधील उत्पादनांकरिता सरकारने जास्त दर आकारण्याची परवानगी द्यावी अशी मागणी ओएनजीसीने केली आहे.
 • महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीचे पाच वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विभाजन :
महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीचे पाच वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विभाजन करण्याचे निश्चित झाले आहे. वर्षभरात यासंबंधीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून त्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे जून 2005 ला होल्डिंग, महानिर्मिती, महापारेषण व महावितरण अशा चार शासकीय कंपन्यांमध्ये विभाजन झाले होते. त्यानंतर आता पुन्हा 10 वर्षांनी यातील महावितरण कंपनीचे विभाजन केले जात आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई-कोकण अशा पाच कंपन्यांमध्ये हे विभाजन करण्याचे निश्चित झाले आहे.
 • भारत आणि फ्रान्स राफेल लढाऊ विमानांबाबतच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाणार :
फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वॉ ओलांद हे प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला हजर राहण्यासाठी भारत भेटीवर येणार असून त्या वेळी भारत आणि फ्रान्स यांच्यात 36 राफेल लढाऊ विमानांबाबतच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाणार आहेत. या करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर तीन वर्षांत पहिले लढाऊ विमान भारताला पुरविण्यात येणार असल्याचे कराराच्या मसुद्यात म्हटले आहे. तर करारावर स्वाक्षऱ्या पूर्ण झाल्यानंतर भारतीय हवाई दलासाठी 36 लढाऊ विमाने सात वर्षांच्या कालावधीत पुरविण्यात येणार आहेत. सध्या उपलब्ध असलेली लढाऊ विमाने पाकिस्तान आणि चीनचा सामना करण्यासाठी पुरेशी नाहीत, त्यासाठी किमान 44 विमानांची गरज आहे.
 • बिहारमध्ये पुढील वर्षी दारूबंदी लागू :
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सत्ता हाती येताच धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरवात केली असून, पुढील वर्षी एक एप्रिलपासून राज्यभर दारूबंदी लागू केली जाणार असून, यासाठी स्वतंत्र कायदाही तयार केला जाणार आहे. पाटण्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली.राज्य सरकार एक स्वतंत्र कायदा तयार करत असून, त्या माध्यमातून टप्प्या-टप्प्याने राज्य दारूमुक्त केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 • अयोध्येत भव्य राममंदिर बांधले जाईल :
राममंदिर उभारणी, जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम रद्द करणे आणि समान नागरी कायदा लागू करणे, या भाजपच्या कार्यक्रम पत्रिकेवरील प्रमुख मुद्द्यांवर मोदी सरकारने प्रथमच संसदेमध्ये तोंड उघडले.अयोध्येत भव्य राममंदिर बांधले जाईल, अशी ग्वाही सरकारमधील वरिष्ठ मंत्री थावरचंद गेहलोत यांनी घटना दिनाच्या चर्चेचे निमित्त साधून थेट संसदेच्या व्यासपीठावरच दिली.

 • अण्वस्त्रधारी "पृथ्वी 2" या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी :
अण्वस्त्रधारी "पृथ्वी 2" या मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली.चंडीपूरस्थित इंटिग्रेटेड टेस्ट रेंज (आयटीआर) या संस्थेने ही मोहीम पार पाडली.आयटीआरच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्ट गायडन्स पद्धतीनुसार या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्यात आले. तसेच या क्षेपणास्त्राने नियोजित लक्ष्य अचूक वेळेत साधत आपली क्षमता सिद्ध केली. या मोहिमेमध्ये उपयुक्‍त सर्व रडार यंत्रणा, इलेक्‍ट्रो ऑप्टिकल ट्रेकिंग यंत्रणा, टेलीमेट्री स्टेशन्स आदी उपकरणाचा प्रक्षेपण मोहिमेदरम्यान वापर करण्यात आला.तसेच क्षेपणास्त्राचा पल्ला 350 किलोमीटर आहे, तर ते एक हजार किलो अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते.


 • काही महत्वाचे :
१) जगातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून २०१४ साली इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी दिल्ली ची निवड करण्यात आली

२) भारतातील पहिली सेमी ट्रेन मार्च २०१६ मध्ये दिल्ली ते आग्रा या दरम्यान धावणार आहे
या रेल्वेला भारताची पहिली गतिमान एक्स्प्रेस असे म्हटले जाणार आहे
रेल्वेची वैशिष्ट्य
>5400 हॉर्स पॉवरचे इंजन
>12 मॉर्डन कोच असतील
>160 किमी ताशी वेग
>105 मिनीटात 200 किमी अंतर कापणार
>9 इतर मार्गांवर धावणार रेल्व

३) विकल्प योजना:-
ही योजना भारतीय रेल्वेने १ नोव्हे २०१५ पासून तात्विक प्रायोगिक तत्वावर दिल्ली ते लखनौ व दिल्ली ते जम्मू या दोन रेल्वे मार्गावर मेल व एक्सप्रेस रेल्वे गड्यासाठी सुरु केली
इटरनेतवर ऑनलाईन प्रतीक्षा यादीत आरक्षण केलेल्या प्रवाशांना पर्यायी रेल्वे गाडीत स्थान मिळवून देण्याशी संबधीत आहे

४) हरिद्वार ते अहमदाबाद मेल :-
भारतीय रेल्वे मंत्रालयाने २१जून २०१५ या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून हरिद्वार ते अहमदाबाद मेल या रेल्वेचे नामकरण योग एक्स्प्रेस असे ठेवले

५) भारतीय कायाकल्प परिषद चे अध्यक्ष :- रतन टाटा
सदस्य:- शिवगोपल मिश्रा. एम रघुवैया (युनियन नेते)
उद्देश:- भारतीय रेल्वे सेवेचे जाळे वेगाने उभारणे तसेच रेल्वे आत्याधुनिक बनविणे
रेल मंत्री श्री सुरेश प्रभु ने 26 फेब्रुवारी 2015 रोजी संसद मध्ये २०१५-१६ चा रेल्वे अर्थसंकल्प मांडताना कायाकल्प परिषदेची घोषणा केली होती

६) महाराष्ट्रात पहिली सीएनजी गॅसवर आधारीत शहर बस सेवा नागपूर येथे सुरु करण्यात आली[28/11 11:47 am] VisHaL ThoRaT: 📱चालू घडामोडी (28 नोव्हेंबर 2015)📱

 • अग्नी-1 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी :

भारताने पुन्हा स्वदेशी बनावटीच्या अण्वस्त्रवाहू अग्नी-1 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली असून हे क्षेपणास्त्र 700 किलोमीटरवरील लक्ष्य भेदू शकते. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे असून, या सिंगल स्टेज क्षेपणास्त्रासाठी घनरूपातील इंधनाचा वापर करण्यात आला आहे. तसेच अब्दुल कलाम आयलंडवरील लॉंच पॅड-4 वरून या क्षेपणास्त्राने अवकाशात झेप घेतली. मोबाईल लॉंचरच्या माध्यमातून हे क्षेपणास्त्र डागण्यात आले आहे. लॉंच पॅडवरून हे क्षेपणास्त्र झेपावल्यानंतर ते लक्ष्यभेद करेपर्यंत त्याच्यावर रडार, टेलिमेट्री ऑब्झर्व्हेशन इन्स्ट्रुमेंट आणि इलेक्‍ट्रो- ऑप्टिक इन्स्ट्रुमेंटच्या माध्यमातून नजर ठेवण्यात आली होती. या क्षेपणास्त्राचे वजन 12 टन एवढे असून त्याची लांबी 15 मीटर एवढी आहे. हे क्षेपणास्त्र एक टनांहून अधिक वजन वाहून नेऊ शकते तर वजनाच्या तुलनेमध्ये या क्षेपणास्त्राचा पल्ला कमी-जास्त केला जाऊ शकतो. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) मधील ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लॅबोरेटरीने ते विकसित केले आहे. यासाठी संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळा आणि इम्रातमधील संशोधन केंद्र व हैदराबादेतील भारत डायनॅमिक्‍स लिमिटेड या संस्थांनीही मदत केली होती.
 • बराक-8 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी :
इस्राईलने भारतासमवेतच्या संयुक्त उपक्रमातून विकसित केलेल्या बराक-8 क्षेपणास्त्राची पुन्हा एकदा यशस्वी चाचणी घेतली. या क्षेपणास्त्राने शत्रू म्हणून एका छोट्या ड्रोनवर हल्ला केला. इस्राईल सैनिकांच्या सूत्रानुसार, इस्राईलच्या नौसेनेच्या जहाजावरून सोडण्यात आलेले बराक-8 क्षेपणास्त्राने अचूक लक्ष्य साधले आणि शंभर टक्के यश मिळवले. त्यानंतर दहा डिसेंबर रोजी भारतीय नौसेनेकडून या क्षेपणास्त्राची चाचणी होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. या चाचणीसाठी भारतीय बनावटीच्या आयएनएस कोलकता याचा वापर होण्याची शक्‍यता आहे. कारण आयएनएसवर रॉकेट लॉंचर आणि क्षेपणास्त्राचा शोध घेणारे रडार तैनात करण्यात आले आहे. डीआरडीओ आणि इस्राईल एरोस्पेस इंडस्ट्रिज (आयएआय), इस्राईल्स ऍडमिनिस्ट्रेशन फॉर डेव्हलपमेंट ऑफ वेपन्स अँड टेक्‍नॉलॉजिकल इन्फ्रास्ट्रक्‍चर, एल्टा सिस्टिम्स, राफेल आणि अन्य कंपन्यांच्या सहकार्याने क्षेपणास्त्राची निर्मिती केली जात आहे. तसेच भारत डायनामिक्‍स लिमिटेड (बीडीएल) याला क्षेपणास्त्र निर्मितीची जबाबदारी सोपविली जाणार आहे. प्रारंभी 32 क्षेपणास्त्र आयएनएस कोलकतावर तैनात करण्यात आले असून या क्षेपणास्त्रामुळे हवाई संरक्षणाची कक्षा वाढण्यास मदत होणार आहे. येत्या दोन वर्षांत ती संरक्षणासाठी सज्ज असेल, अशी अपेक्षा आहे. बराक-8 हे बराक क्षेपणास्त्राचे विकसित रूप मानले जाते. हे क्षेपणास्त्र विमान, ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यात नौसेनेचे संरक्षण करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे.
 • भारतातून एचएसबीसी या बँकिंग व्यवसाय बंद करण्याचा निर्णय :
आशियातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या भारतातून एचएसबीसी या बँकिंग व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील खाजगी बॅंकिंगचे धोरणात्मक पुनरावलोकन केल्यानंतर आम्ही व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती बॅंकेच्या मुंबईतील प्रवक्त्याने दिली आहे. भारतातील व्यवसाय बंद करणारी एचएसबीसी दुसरी परदेशी बॅंक आहे. याआधी आरबीएसने भारतातील आपला बँकिंगव्यवसाय बंद केला होता. तसेच गेल्या काही वर्षात एसएसबीसीने जगभरातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी कपात करण्यास सुरुवात केली आहे. तर वर्ष 2010 पासून जगभरातील कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल दीड लाखांची घट केली आहे.
 • चीनमधील एड्‌सग्रस्तांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक :
चीनमधील एड्‌सग्रस्तांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून येत आहे. ही चिंतेची बाब असल्याचे या विषयातील तज्ज्ञाने चीनमधील एका दैनिकाशी बोलताना म्हटले आहे.
 चीनमध्ये या वर्षअखेर अंदाजे 1 लाख 10 हजार नवीन एड्‌सग्रस्त रुग्ण आढळून येण्याची शक्‍यता असून त्यापैकी 3 हजार 400 पेक्षा अधिक रुग्ण 18 ते 22 वयोगटातील विद्यार्थी असण्याची शक्‍यता आहे, असा अंदाज राष्ट्रीय एड्‌स नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राचे प्रमुख वु झुंगयू यांनी वर्तविला आहे.
 2008 मध्ये ही संख्या 779 एवढी होती. मात्र आता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून ही चिंताजनक बाब असल्याचेही ते म्हणाले.
 • एच.एल. दत्तू यांचे नाव राष्ट्रीय मानवाधिकर आयोगाच्या अध्यक्षपदासाठी विचाराधीन :
डिसेंबरमध्ये निवृत्त होणारे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एच.एल. दत्तू यांचे नाव राष्ट्रीय मानवाधिकर आयोगाच्या अध्यक्षपदासाठी विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
 तसेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी केवळ निवृत्त मुख्य न्यायाधीशांचीच नियुक्ती करता येते.
 न्यायाधीश दत्तू हे येत्या 2 डिसेंबरला निवृत्त होत आहेत. त्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली तर इतर कोणाच्याही नावाचा विचार केला जाणार नाही अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
 न्यायाधीश के. जी. बालाकृष्णन यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने गेल्या मे महिन्यापासून आयोगाचे अध्यक्षपद रिक्त आहे.
 • महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार जाहीर :
संस्कृत भाषेतील अपूर्व योगदानासाठी देण्यात येणारे राज्य शासनाचे महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार जाहीर करण्यात आले. प्राचीन संस्कृत पंडित या वर्गवारीतील पुरस्कारासाठी अशोक विष्णू कुलकर्णी, तर वेदमूर्ती वर्गवारीतील पुरस्कारासाठी मनोज बालाजी जोशी यांची निवड केली आहे. अन्य राज्यांतील संस्कृत पंडित म्हणून डॉ. सिद्धार्थ वाय. वाकणकर यांना गौरविण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप 25 हजार रुपये रोख व सन्मानपत्र असे आहे.
 • पी.व्ही. सिंधूची मकाऊ ओपनच्या विजेतेपदाची 'हॅटट्रिक'
-  भारताची स्टार बॅडमिंटनपटू, पाचवी मानांकित पी. व्ही. सिंधू  हिने मकाऊ ओपन ग्रॅण्डप्रिक्स बँडमिंटन स्पर्धेच्या विजयाची हॅटट्रिक केली आहे. सिंधूने जपानच्या मिनात्सू मितानीचा पराभव करत तिने सलग तिस-यांदा या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. सिंधू हिने मिनात्सूवर २१-९, २१-२३, २१-१४ अशी मात करत एक लाख २०हजार डॉलर पारितोषिक रकमेच्या मकाऊ ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावले.दरम्यान जागतिक क्रमवारीत १२ व्या स्थानावर असलेल्या सिंधूने महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात नववी मानांकित जपानची अकाने यामागुची हिचा काल पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली होती. एक तास चाललेल्या कडव्या संघर्षात सिंधूने काल अकाने यामागुचीचा २१-८, १५-२१, २१-१६ ने पराभव करत २०१३ च्या योनेक्स जपान ओपनमध्ये यामागुचीकडून झालेल्या पराभवाचा हिशोबही चुकता केला
 • पॅरिस : आजपासून वातावरण बदल परिषद
: संयुक्त राष्ट्रांनी येथे सोमवारपासून आयोजित केलेल्या वातावरण बदलावरील (क्लायमेट चेंज)जागतिक परिषदेत कार्बन उत्सर्जनाला कमी करण्यासाठी प्रदीर्घ काळ उपयोगी पडेल असा करार करण्याचा प्रयत्न होईल. परिषदेला जगातून १५० देशांचे सर्वोच्च नेते उपस्थित राहणार असून पंधरा दिवसांपूर्वी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्यापार्श्वभूमीवर अतिशय कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी या प्रश्नाला टिकावू असा जागतिक उपाय शोधला पाहिजे, असे आवाहन केले. ११ डिसेंबरपर्यंत ही परिषदचालेल. बान की मून, मोदी यांच्यासह अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन परिषदेला पहिल्या दिवशी उपस्थित असतील.गेल्या २० वर्षांतील ही अशा स्वरूपाची पहिलीच परिषद आहे.
 • 'एक भारत श्रेष्ठ भारत' योजनेची घोषणा :
असहिष्णुतेच्या मुद्द्यावर देशभरात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे 'एक भारत श्रेष्ठ भारत' या योजनेला मूर्त रूप देण्याची घोषणा केली.
 पंतप्रधान मोदींनी 31 ऑक्‍टोबरला लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी 'एक भारत, श्रेष्ठ भारत' अभियानाचे सुतोवाच केले होते. देशात ऐक्‍याचा प्रवाह सदैव वाहता राहावा यासाठी 'एक भारत, श्रेष्ठ भारत' ही योजना राबविली जाणार आहे. या योजनेची रूपरेषा, जनतेची भागीदारी याबाबतच्या सूचना, अभिप्राय 'मायजीओव्ही' या वेबसाइटवर पाठवाव्यात, असेही आवाहन केले होते.
 • लोकपाल विधेयकाचा मसुदा संसदीय समितीने तयार केला :
तब्बल वर्षभरापासून रखडलेल्या बहुचर्चित लोकपाल विधेयकाचा मसुदा संसदीय समितीने तयार केला असून, या मसुद्याची अंतिम प्रत पुढील महिन्यात राज्यसभेत सादर करण्यात येईल.
 काँग्रेसचे खासदार ई. एम. सुदर्शन नचिप्पन यांच्या अध्यक्षतेखालील 31 सदस्यीय जनलवाद, कायदा आणि न्यायविषयक समितीने लोकपाल, लोकायुक्त आणि अन्य दुरुस्तीविषयक विधेयक-2014 चा सखोल अभ्यास केला होता. या सर्व सदस्यांचे मत लक्षात घेतल्यानंतर 10 डिसेंबरपूर्वीच यासंबंधीचा अंतिम अहवाल राज्यसभेत सादर केला जाणार आहे. तसेच मागील वर्षी 18 डिसेंबर रोजी सुधारित विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले होते. त्यानंतर ते समितीकडे पाठविण्यात आले. यावर्षी 25 मार्चपर्यंत समितीने या विधेयकावर आपले मत नोंदविणे अपेक्षित होते. राज्यसभेचे अध्यक्ष हमीद अन्सारी यांच्याकडे यासंबंधीचा अहवाल सादर करण्यात आला आहे.
 • जपानचे भारताला रेल्वेसाठी कर्ज देण्याचे जाहीर :
जपानने भारताला चेन्नई व अहमदाबाद मेट्रो रेल्वेसाठी 5479 कोटी रूपयांचे कर्ज देण्याचे जाहीर केले आहे, असे अर्थ मंत्रालयाने सांगितले. दोन्ही देशांनी या करारावर आधीच स्वाक्षऱ्या केल्या असून चेन्नई मेट्रोला 1069 कोटी तर अहमदाबाद मेट्रोला 4410 कोटी रूपये कर्ज देण्यात आले आहे, असे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. काही वर्षांत भारत-जपान यांचे आर्थिक सहकार्य वाढले असून त्यात धोरणात्मक भागीदारीचा सहभाग वाढला आहे. भारत व जपान यांच्यात आर्थिक कामकाज सचिव एस. सेल्वाकुमार व जपानचे उपराजदूत युकाटा किकुटा यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

 • काही महत्वाचे
१) खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाने जगातील मुंग्याचा पहिला वहिलानकाशा मांडला ज्यात विश्वातील मुंग्याचे वितरण दर्शविण्यात आले आहे ? :-Hong Kong

२) खालील पर्यातील कोणता निवडा दिल्ली उच्च न्यायालयाने १४ सप्टे.२०१५ ला दिला. जो की ऐतिहासिक महत्वाचा ठरला ? :- नाविक दलात स्रियांना कायमचे अधिकारपदास मान्यता

३) रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी नुकतीच " टनेल टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट" स्थापना केली.या संदर्भात खालील विधाने सत्य आहे ?
A) ही इन्स्टिट्यूट कोकण रेल्वेतर्फे स्थापन होईल
B) ही इन्स्टिट्यूट गोव्यामध्ये स्थापन होईल
C) तीला माजी रेल्वे मंत्री जॉर्जे फनाँडीस यांचे नाव देण्यात येईल

४) केंद्र सरकारने नविनच प्रस्थापित केलेल्या अखिलभारतीय क्रीडा समितीचा पहिला अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची नेमणूक केली ? या अध्यक्षना केंद्रीय मंत्र्यापैकी राज्य मंत्र्याचा दर्जा दिला गेला आहे ?:- विजयकुमार मल्होत्रा

५) गदिमा प्रतिष्ठान चा मानाचा समजला जाणारा " गदिमा पुरस्कार" ----------------- यांना जाहीर झाला ?:-सुमन कल्याणपूर

६) खालीलपैकी कोणत्या देशात शानबाग चळवळ सक्रीय आहे ? :-बांगलादेश

७) हेपेटायटीस बी या आजाराच्या विरोधात युनीसेफ आणी महाराष्ट्राच्याआरोग्यखात्याने जनजागृती मोहीम सुरु केली आहे . या मोहिमेचे गुडविल अम्बेसिडर म्हणून --------------------- यांची निवड केली :- अमिताभ बच्चन

८) २०१७ मध्ये -------------- या देशामध्ये युरोपिअन युनियनमध्ये रहावेअथवा नाही, यासाठी सार्वमत घेतले जाणार आहे. :-ग्रेट ब्रिटन

९) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषतेतर्फे यंदा सोलापूरमध्ये २६ ते २९ नोव्हेंबर मध्ये भरणार आहे.त्या समेलनाच्या अध्यक्षपदी -------------- यांची निवड झाली ?:- कांचन सोनटक्के

१०) रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम’ २०१४ या पुरस्कार सोहाळ्यात ---------------यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत केले गेल :-कुलदीप नय्यर

११) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून आयोजीत केले जाणारे ९६वे नाट्य समेलन यंदा -------------- येथे होणार आहे ?:- ठाणे

१२) पहिला मराठी फिल्मफेअर पुरस्कारात-------------- हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला? :- डॉ. प्रकाश आमटे

१३) न्यूयार्क येथे झालेल्या टेडेक्स परिषदेत बालदिनाच्या दिवशी भाषण देणारी सर्वात लहान वक्ता म्हणून लोकप्रिय झालेली इशिता कोणत्या शहरतील आहे ?:------------पुणे

१४) पहिल्या मराठी फिल्म फेअरमध्ये सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार कोणी पटकावला ? :-अजय-अतुल१५) मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा या वर्षाचा कालिदास सन्मान पुरस्कार कोणाला जाहीर झाला ?:- महेश एलकुंजवार

१६) ------------------- यांची मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली ?:- प्रशांत दामले.

१७)भारतीय युवा हॉकी संघाने ---------- चा ६-१ असा धुव्वा उडवून कुमार गटाच्या आशिया करंडकावर आपले नाव कोरले ? :-पाकिस्तान

१८) नॅशनल क्रिकेट अकादमीचे संचालक म्हणून ----------------- यांची निवडकरण्यात आली ? :-दिलीप वेंगसरकर

१९) यंदाच्या वर्षापासून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी "------------- शेतकरी अपघात विमा योजना‘ राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला :- स्व. गोपीनाथराव मुंड


 • Hong Kong विद्यापीठाने जगातील मुंग्याचा पहिला वहिला नकाशा मांडला ज्यात विश्वातील मुंग्याचे वितरण दर्शविण्यात आले आहे
 • नाविक दलात स्रियांना कायमचे अधिकारपदास मान्यता निवडा दिल्ली उच्च न्यायालयाने 14 सप्टे. 2015 ला दिला. जो की ऐतिहासिक महत्वाचा ठरला
 • गदिमा प्रतिष्ठान चा मानाचा समजला जाणारा "गदिमा पुरस्कार" सुमन कल्याणपूर यांना जाहीर झाला
 • बांगलादेश देशात शानबाग चळवळ सक्रीय आहे
 • हेपेटायटीस बी या आजाराच्या विरोधात युनीसेफ आणी महाराष्ट्राच्या आरोग्यखात्याने जनजागृती मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेचे गुडविल अम्बेसिडर म्हणून अमिताभ बच्चन यांची निवड केली
 • 2017 मध्ये ग्रेट ब्रिटन या देशामध्ये युरोपिअन युनियनमध्ये रहावे अथवा नाही, यासाठी सार्वमत घेतले जाणार आहे.
 • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषतेतर्फे यंदा सोलापूरमध्ये 26 ते 29 नोव्हेंबर मध्ये भरणार आहे.त्या समेलनाच्या अध्यक्षपदी कांचन सोनटक्के यांची निवड झाली
 • रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम 2014 या पुरस्कार सोहाळ्यात कुलदीप नय्यर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत केले गेल
 • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून आयोजीत केले जाणारे 96वे नाट्य समेलन यंदा ठाणे येथे होणार आहे
 • पहिला मराठी फिल्मफेअर पुरस्कारात डॉ. प्रकाश आमटे हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला
 • न्यूयार्क येथे झालेल्या टेडेक्स परिषदेत बालदिनाच्या दिवशी भाषण देणारी सर्वात लहान वक्ता म्हणून लोकप्रिय झालेली इशिता पुणे शहरतील आहे
 • पहिल्या मराठी फिल्म फेअरमध्ये सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार अजय-अतुल यांनी पटकावला
 • मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा या वर्षाचा कालिदास सन्मान पुरस्कार महेश एलकुंजवार जाहीर झाला
 • प्रशांत दामले यांची मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली
 • भारतीय युवा हॉकी संघाने पाकिस्तान चा 6-1 असा धुव्वा उडवून कुमार गटाच्या आशिया करंडकावर आपले नाव कोरले
 • नॅशनल क्रिकेट अकादमीचे संचालक म्हणून दिलीप वेंगसरकर यांची निवड करण्यात आली
 • यंदाच्या वर्षापासून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी "स्व. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजना" राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला

 1. फ्रान्समध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून --------- सरकारने सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यास बंदी घातली ? :--------स्वित्झर्लंड
 2. ------------ यांची जागतिक नाणेनिधीवर कार्यकरी संचालक म्हणून केंद्र सरकारने नेमणूक केली. भारत, बांग्लादेश,श्रीलंका, वभूतान याचे ते प्रतीनिधीत्व करतील व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा दैंनदिन व्यवहार ते पाहतील:----------डॉ. सुधीर गोकर्ण
 3.  कसोटी क्रिकेटच्या १३८ वर्षाच्या इतिहासात प्रथमच डे- नाइट कसोटी सामना ------------- या दोन संघा दरम्यान खेळणार आहे :---ऑस्ट्रेलिया -न्युझीलंड
 4. अंतोनिओ कोस्ता या भारतीय वंशाच्या व्यक्तीची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली? :----पोर्तुगाल
 5. यंदाच्या वर्षीचा महात्मा फुले पुरस्कार कोणाला जाहीर झाला ?:- अरुधती राॅय
 6. आज, २६ नोव्हेंबरला ‘संविधान दिन’ साजरा करण्यात येणार आहे. हा -------------- वा संविधान दिन’ होता :-१ला
 7. ----------- या राज्यामध्ये सरकारी शाळेतील इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकल योजना सुरू केली ? :-पॉंडिचरी
 8. कोणत्या राज्यामध्ये दि. 1 एप्रिल 2016 पासून दारूबंदी करण्यात येणार आहे ?:-----बिहार
 9.  गुगलची कोणती सेवा आता ऑफलाइन होणार आहे ?:- गुगल Map