जर एम.पी.एस.सी. व यू.पी.एस.सी या दोन्ही परीक्षेच्या दृष्टीने बघितल्यास भूगोल हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.गेल्या दोन वर्षांतील परीक्षेचा अभ्यास केल्यास, असे लक्षात येते की, या घटकावर साधारण 15ते 17प्रश्न विचारले होते. एम.पी.एस.सी.च्या नवीन अभ्यासक्रमात (जो अभ्यासक्रम 'यूपीएससी'सारखाच आहे.) काही बदल करण्यात आले आहेत.
उदा. नवीन अभ्यासक्रमात जगाचा भूगोल हा नव्याने समाविष्ट केलेला घटक आहे. जुन्या अभ्यासक्रमानुसार जर कृषिशास्त्राचाही विचार केला तर या भागावर जवळजवळ ३५ ते ४० प्रश्न विचारले जात असत, आपण पीएसआय / एसटीआय / असिस्टंट पूर्व या परीक्षांचाही विचार केला तर या घटकावर साधारणत: 15ते 17प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे.
राज्यसेवेचा अभ्यास असो वा यू.पी.एस.सी.चा अभ्यास, एक महत्त्वाचे सूत्र आहे, ते विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे. फक्त पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजे यश मिळवणे असे नाही तर आपल्याला पूर्व, मुख्य व मुलाखत या प्रत्येक टप्प्यावर यशस्वी होणे आवश्यक आहे. म्हणून पूर्वपरीक्षेचा अभ्यास करताना मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम नेहमी डोळ्यासमोर ठेवावा आणि त्या दृष्टीने प्रयत्न करावेत. त्याचा फायदा असा आहे की, यामुळे अभ्यास जास्त सविस्तर आणि परिपूर्ण होण्यास मदत होते. शिवाय मुख्य परीक्षेला अभ्यासाचे कमी दडपण असते.
राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमात खालील
विषयांचा समावेश आहे -
महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा- प्राकृतिक, सामाजिक व आíथक-भूगोल. जर आपण यू.पी.एस.सी.चा अभ्यासक्रम बघितला तर त्यात भारताचा व जगाचा प्राकृतिक, सामाजिक व आíथक भूगोल आहे. त्यात फक्त महाराष्ट्राचा भूगोल नाही. महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासताना पुढील घटकांचा अभ्यास करावा -
महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल ज्यात महाराष्ट्रातील डोंगररांगा, त्या डोंगररांगेतील महत्त्वाची शिखरे त्या डोंगररांगा कोणत्या जिल्ह्य़ात पसरलेल्या आहेत, इ. चा अभ्यास करावा. नदीप्रणाली अभ्यासताना त्या नद्यांवरील विविध प्रकल्प, महाराष्ट्राची पीकप्रणाली. महाराष्ट्राची मृदा, महाराष्ट्राचे हवामान, खनिज संपत्ती, वाहतूक व्यवस्था, विविध शहरे व पर्यटन केंद्र यांचा सविस्तर अभ्यास करावा. हा अभ्यास करतानाच महाराष्ट्राचा जिल्हावार अभ्यास करावा. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात काय महत्त्वाच्या घडामोडी झाल्यात यांचा अभ्यास केल्यास चालू घडामोडींचा देखील अभ्यास होतो. शक्यतो महाराष्ट्राचे कोरे नकाशे घेऊन त्यावर जिल्हावार नोट्स तयार केल्यास अधिक उत्तम. कारण परीक्षेच्या काळात कमी वेळेत या विषयाची उजळणी पूर्ण होते.
महाराष्ट्राच्या सामाजिक भूगोलाचा अभ्यास करताना २००१ व २०११ च्या जनगणनेचा सविस्तर अभ्यास करावा. महाराष्ट्राची लोकसंख्या, लोकसंख्येची घनता, तिचे वितरण, िलग गुणोत्तर, माता मृत्युदर, अर्भक मुत्युदर यांचा अभ्यास स्वतंत्र तक्ता बनवून तुलनात्मक दृष्टीने करावा. महाराष्ट्राची लोकसंख्या, लोकसंख्येचा चढता- उतरता क्रम, घनतेचा चढता-उतरता क्रम स्वतंत्र वहीत लिहून त्याचे वारंवार वाचन करावे. महाराष्ट्रातील वस्तीप्रणाली ग्रामीण व नागरी वस्त्या, त्यांच्या समस्या यांचा अभ्यास करावा. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे जिल्हावार अभ्यास करताना महाराष्ट्रातील विविध जाती-जमाती लक्षात ठेवाव्यात. महाराष्ट्राचा आíथक भूगोल अभ्यासताना महाराष्ट्रातील खनिज संपत्ती, त्यांचे वर्गीकरण, ऊर्जासाठे, त्यांचे उत्पादन, जिल्हावार वर्गीकरण, त्यांचे विविध प्रकल्प, आयात-निर्यात यांची माहिती, त्यांचा क्रम यांचा अभ्यास नकाशाच्या मदतीने करावा.
वरीलप्रमाणे अभ्यास केल्यास आपल्याला राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पेपर - १ मधील पुढील विषयांचा अभ्यास होण्यास
मदत होते.
- महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल
- आíथक भूगोल
- महाराष्ट्राचा मानवी व सामाजिक भूगोल
- लोकसंख्या भूगोल
भारताचा भूगोल -
जर आपण राज्यसेवा व यु.पी.एस.सी.चा अभ्यास करीत असाल तर हा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. भारताचा प्राकृतिक विभाग अभ्यासताना हिमालय, हिमालयाच्या डोंगररांगा त्यांची विभागणी, हिमालय पर्वतातील महत्त्वाच्या िखडी, हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या, त्यावरील निरनिराळे प्रकल्प, मदानी प्रदेश, त्यांचे वितरण, भारताचा पठारी प्रदेश, पठारावरील निरनिराळ्या डोंगररांगा, पूर्वघाट, पश्चिम घाट, अंदमान, निकोबार बेटे, लक्षद्वीप बेटे यांचा अभ्यास करावा. भारताच्या हवामानाचा अभ्यास करताना भारतीय मान्सून, त्याचा उदय, पावसाचे वितरण, भारतीय हवामानावर एल् निनो ला-निना यांचा प्रभाव, अवर्षण पूर यांचा अभ्यास करावा.
भारतीय सामाजिक व आíथक भूगोलाचा अभ्यासात २००१ व २०११ च्या जणगणनेचा तुलनात्मक अभ्यास, भारतीय लोकसंख्या, लोकसंख्येची घनता, साक्षरता, स्त्री-पुरुष प्रमाण, बाल मृत्युदर, माता मृत्युदर या मुद्दय़ांवर विशेष भर द्यावा. त्याच प्रमाणे भारतातील नागरीकरण, नागरीकरणाच्या समस्या, झोपडपट्टींचा प्रश्न, केंद्र सरकार- राज्य सरकार यांनी या समस्या सोडविण्यासाठी योजलेले उपाययोजना यांचा अभ्यास करावा. भारतात आíथक भूगोल अभ्यासताना खनिज संपत्ती, उद्योगधंदे, ऊर्जानिर्मिती प्रकल्प, वाहतूक व्यवस्था यांचा अभ्यास करावा. अभ्यास करताना नकाशाचा जास्तीत जास्त वापर करावा.
जगाचा भूगोल -
भारतीय सामाजिक व आíथक भूगोलाचा अभ्यासात २००१ व २०११ च्या जणगणनेचा तुलनात्मक अभ्यास, भारतीय लोकसंख्या, लोकसंख्येची घनता, साक्षरता, स्त्री-पुरुष प्रमाण, बाल मृत्युदर, माता मृत्युदर या मुद्दय़ांवर विशेष भर द्यावा. त्याच प्रमाणे भारतातील नागरीकरण, नागरीकरणाच्या समस्या, झोपडपट्टींचा प्रश्न, केंद्र सरकार- राज्य सरकार यांनी या समस्या सोडविण्यासाठी योजलेले उपाययोजना यांचा अभ्यास करावा. भारतात आíथक भूगोल अभ्यासताना खनिज संपत्ती, उद्योगधंदे, ऊर्जानिर्मिती प्रकल्प, वाहतूक व्यवस्था यांचा अभ्यास करावा. अभ्यास करताना नकाशाचा जास्तीत जास्त वापर करावा.
जगाचा भूगोल -
या वर्षांपासून राज्यसेवा पूर्वपरीक्षेत हा अभ्यासक्रम नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे. जगाचा भूगोल अभ्यासताना सर्वप्रथम नकाशावरील महत्त्वाचे भाग मार्क करून त्याचा अभ्यास करावा. उदा. निरनिराळ्या देशातील पर्वतरांगा, नदीप्रणाली, महत्त्वाची सरोवरे इ. नंतर जगाचा अभ्यास. खंडाप्रमाणे केल्यास जास्त सोपा होतो. उदा. अमेरिकेचा अभ्यास करताना दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका यांतील पर्वतश्रेणी, नदीप्रणाली, विविध सरोवरे, त्यांचा दक्षिण उत्तर क्रम, खनिज संपत्ती, निरनिराळे प्रकल्प, महत्त्वाची शहरे असा अभ्यास करावा. यूपीएससीच्या मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा आधार घेतल्यास महत्त्वाची गोष्ट लक्षात येते. ती म्हणजे या घटकावर साधारणत: प्रश्न नकाशावर विचारले जातात. म्हणून एक चांगला नकाशा घेऊन त्याचा अभ्यास केल्यास अवघड प्रश्नांची उत्तरे देणे सोपे होते. याशिवाय जगातील शेतीप्रणाली, उद्योगधंदे, जंगल, मासेमारी, खनिज संपत्ती यांचे तक्ते बनवावेत.
भूगोलाचा अभ्यास करताना फक्त भूगोलाचाच अभ्यास होत नाही तर सामान्य अध्ययनातील चालू घडामोडींचाही अभ्यास होत असतो. म्हणून या घटकाचा अभ्यास करताना पुढील संदर्भ ग्रंथांचा आधार घ्यावा.
महत्त्वाचे मुद्दे -
भूगोलाचा अभ्यास करताना फक्त भूगोलाचाच अभ्यास होत नाही तर सामान्य अध्ययनातील चालू घडामोडींचाही अभ्यास होत असतो. म्हणून या घटकाचा अभ्यास करताना पुढील संदर्भ ग्रंथांचा आधार घ्यावा.
- महाराष्ट्राचा भूगोल - ए.बी.सवदी
- भारताचा भूगोल - ए.बी.सवदी
- भारताचा भूगोल (इंग्रजीत) माजिद हुसेन
- जगाचा भूगोल - जिओग्राफी थ्रु मॅप्स् - के. सिद्धार्थ.
- महाराष्ट्र बोर्डाची सहावी ते दहावीपर्यंत भूगोलाची पुस्तके
- यूपीएसीसाठी पाचवी ते दहावीपर्यंतची सी.बी.एस.सी. बोर्डाची पुस्तके तसेच
- इंडिया इयर बुक जे अद्याप बाजारपेठेत यायचे आहे. (भारत सरकारचे) ते मात्र यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी नक्की वाचावे, त्याचप्रमाणे एम.पी.एस.सी. मुख्य परीक्षेसाठी हे पुस्तक वाचणे आवश्यकच आहे.
महत्त्वाचे मुद्दे -
- २००१च्या जनगणनेनुसार राज्यात दर हजार पुरुषांच्या मागे ९२५ स्त्रिया आहे. हे प्रमाण २००१ साली ९२२ स्त्रिया असे होते.
- २०११ च्या जनगणनेनुसार ५४.७७ % लोकसंख्या ग्रामीण भागात तर ४५.२३% लोकसंख्या नागरी भागात राहते. तर सन २००१च्या जणगणनेनुसार राज्यात ग्रामीण लोकसंख्या ५७.६०% तर शहरी लोकसंख्या ४२.४० % इतकी होती.
- भारताच्या एकूण क्षेत्रफळापकी ९.३६ % भाग म्हणजे एक दशांश हिस्सा महाराष्ट्राने व्यापलेला आहे. महाराष्ट्राला ७२० कि.मी.चा समुद्र किनारा लाभला आहे. देशातील एकूण समुद्र किनाऱ्यापकी ९.५८ % एवढा हिस्सा महाराष्ट्राला आला आहे.
- देशातील रेगूर मृदेचा सर्वात मोठा साठा हा महाराष्ट्रात आहे.
- आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून सह्याद्री पर्वतात आहे. तर तोरण माळ हे नंदुरबार जिल्ह्यात असून ते तोरणमाळच्या डोंगररांगेत स्थित आहे.
- चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावतीत गावीलगढच्या डोंगरात आहे.
- मुळा आणि मुठा या नद्यांच्या संगमावर पुणे हे शहर वसलेले आहे.
- कृष्णेच्या खोऱ्यात बॉक्साइट हे खनिज सापडते.
- वर्धा व वैनगंगा यांचा संगम शिवने येथे झाला आहे.
- उल्हास ही कोकणातील सर्वात लांब नदी आहे.
- प्राकृतिक रचना ही महाराष्ट्रातील पर्जन्यावर परिणाम करणारे सर्वात मोठे घटक आहे.
- महाराष्ट्रातील सर्वात जास्त तापमान हे चंद्रपूर या ठिकाणी आढळून येते.
- महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतात जांभी मृदा आढळते.
- ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती या तालुक्यात आढळून येते
- महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात लोह खनिजांचे मोठे साठे आढळून येतात.
- अकोला जिल्ह्यातील महत्त्वाचा औष्णिक विद्युत प्रकल्प पारस या ठिकाणी आहे.
- िठबक सिंचनामुळे ३० ते ६० % पाण्याची बचत होऊन त्यामुळे २५ ते ४० % अतिरिक्त क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते.
- महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक विहिरी अहमदनगर व त्या खालोखाल नाशिक जिल्ह्यात आहे. मात्र घनतेचा विचार करता सांगली व सोलापूर जिल्ह्यांत सर्वात जास्त आहे.
- नाशिक जिल्ह्यात ठिबक सिंचनात अधिक प्रगती झालेली आढळून येते.
- कोयना प्रकल्पअंतर्गत सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात हेळवाकनजिक जे धरण बांधण्यात आले, त्या धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर हे नाव देण्यात आले आहे.
- मेरीनो जातीच्या मेंढय़ा या लोकरीसाठी उत्तम असतात.
- सांगली जिल्ह्यातील जत हे ठिकाण खिलार बलांचे पदास केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.
- महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहेत.
- महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना बल्लारपूर येथे आहे.
- महाराष्ट्रातील सर्वात मोठी सहकारी सुत गिरणी इचलकरंजी येथे आहे.
- हर्णे हे बंदर रत्नागिरी जिल्ह्यात आहे.
- कोकण रेल्वेचा सर्वात लांब पुल शरावती नदीवर आहे.
- न्हावाशेवा हे महाराष्ट्रातील संपूर्ण संगणकीकृत बंदर आहे.
- महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वात कमी घनता गडचिरोली जिल्ह्यात आहे.
- महाराष्ट्रात सहा वर्षे वयापर्यंतच्या मुला-मुलींमधील प्रमाण हजार पुरुषांमागे ८८३ स्त्रिया असे आहेत.
- पितळ खोरे लेण्या या औरंगाबाद जिल्ह्यात आहेत.
- नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यात आहे.
- महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय नाशिक येथे आहे.
- १ मे १९७८ रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली.
- बाबा आमटे यांनी अपंग वन कुष्ठरोगी यांच्यासाठी चालवलेले केंद्र हेमलकसा असून हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यात आहे.
- गडचिरोली हा जिल्हा उद्योग विरहित जिल्हा म्हणून जाहीर केला आहे.
- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर हे ठिकाण कोळसाच्या खाणी व औष्णिक विद्युत केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.
- चंद्रपूर जिल्ह्यात सिंदेवाली येथे ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र आहे.
- भोर हे अभयारण्य व पर्यटन केंद्र वर्धा जिल्ह्यात आहे.
- ऊनकेश्वर, यवतमाळ या जिल्ह्य़ात गरम पाण्याचे झरे आढळतात.
- लोणार खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.
- अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन १ जुल १९९८ रोजी वाशिम या जिल्ह्याची निर्मिती झाली.
- संत तुकडोजी महाराजांची समाधी तसेच संत तुकडोजी महाराजांचे गुरुकुंज मोजरी अमरावती या जिल्ह्यात आहे.
- अमरावती जिल्ह्यातील डोंगराळ भागात तिखाडी नावाचे गवत आढळते या गवतापासून रोसा हे तेल बनवले जाते.
- औंढा नागनाथ या ठिकाणी महादेवाचे मंदिर असून हे ठिकाण िहगोली जिल्ह्यात आहे.
- १ मे १९९९ रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन िहगोली जिल्ह्याची निर्मिती झाली.
- िहगोली जिल्ह्यातील वनांमध्ये सुगंधी व औषधी तेल आढळते.
- हेमांडपती शिल्पाचा नमुना असलेले तुळजाभवानीचे मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यात आहे.
- औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन जालना जिल्ह्याची निर्मिती झाली.
- जाम हे ठिकाण समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान आहे.
- औरंगाबाद जिल्ह्यातील पठण तालुक्यात आपेगाव हे ठिकाण संत ज्ञानेश्वरांचे जन्मस्थान आहे.
- संत एकनाथ महाराजांची समाधी पठण येथे आहे.
- जल व भूमी व्यवस्थापन संस्था वाल्मी औरंगाबाद या ठिकाणी आहे.
- एक जुल १९९८ रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली.
- नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे म्हणून याला आदिवासी जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले आहे.
- नंदुरबार या ठिकाणी तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे.
- फेकरी येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे हे ठिकाण जळगाव भुसावळ जवळ आहे.
- प्रवरा नदीच्या काठी दायमाबाद या ठिकाणी ताम्रपाषाण काळातील काही अवशेष सापडतात.
- महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी संस्था (मेरी) व महाराष्ट्र राज्य पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.
- गगनबावडा येथे गगनगिरी महाराजांचा मठ असून हे कोल्हापूर येथे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा