Post views: counter

एमपीएससी राज्यसेवा पूर्व पेपर-१ ची तयारी

एमपीएससी राज्यसेवा पूर्व पेपर-१ ची तयारी 

डेल कारनेजीचे एक वाक्य खूपच छान आहे. तो म्हणाला होता,

'जगातील उत्तुंग यश त्यांनाच मिळाले, ज्यांना ते यश
मिळण्याची अजिबात शक्यता नसतानादेखील
यशासाठी त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले.'

स्पर्धापरीक्षा म्हटली की, यश-अपयश, नराश्य हे आलेच. स्पर्धापरीक्षा हा एक कैफ आहे. यश मिळालं नाही तोपर्यंत किंवा अपयशी होऊन वयोमर्यादा संपत नाही, तोपर्यंत हा कैफ उतरत नाही.

 पूर्वपरीक्षेसाठी दोन पेपर असतील. त्यापकी पेपर पहिला हा सामान्य अध्ययनाचा असेल. सामान्य अध्ययनाचा सविस्तर अभ्यासक्रम आयोगाने दिला नाही. मात्र हा अभ्यासक्रम यू.पी.एस.सी.च्या पेपर-१मधील अभ्यासक्रमासारखाच आहे. हा बदल भविष्याच्या दृष्टीने नक्कीच चांगला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जो अभ्यासक्रम जाहीर केला आहे. तो खालीलप्रमाणे-


१) महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील
महत्त्वाच्या घडामोडी

२) इतिहास (महाराष्ट्राच्या संदर्भासह) आणि भारतीय
स्वातंत्र्य चळवळ


३) राज्य पद्धती व प्रशासन

४) आíथक आणि सामाजिक विकास

५) पर्यावरण

६) सामान्य विज्ञान


सन २०११ - २०१२ याच अभ्यासक्रमावर झालेल्या परीक्षेचा विचार केल्यास या अभ्यासक्रमाचा आवाका आपल्या लक्षात येईल.


१) चालू घडामोडी :

कोणत्याही स्पर्धापरीक्षेचा हा महत्त्वाचा गाभा आहे. स्पर्धापरीक्षेद्वारे निवड होणाऱ्या परीक्षार्थीना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर काय घडामोडी होत आहेत याचे ज्ञान आवश्यक आहे. स्पर्धापरीक्षेच्या प्रत्येक टप्प्यात चालू घडामोडीच्या अभ्यासाला महत्त्वाचे स्थान आहे, म्हणून विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळी बाजारात उपलब्ध होणाऱ्या पुस्तकांवर फक्त अवलंबून न राहता रोज कमीतकमी एक तास याचा योजनाबद्ध अभ्यास करावा. चालू घडामोडींसाठी एक स्वतंत्र नोटबुक तयार करून रोजच्या रोज टिपण काढल्यास सर्वात जास्त फायदा होतो. त्या वहीचे खालीलप्रमाणे भाग करून नियमित वृत्तपत्रातून (उदा.लोकसत्ता, इंडियन एक्स्प्रेस, योजना, कुरुक्षेत्र इ.) टिपणे काढावीत.

१) आंतरराष्ट्रीय घडामोडी
२) राष्ट्रीय घडामोडी उदा. संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी इ.
३) राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी
४) आíथक घडामोडी
५) पर्यावरण क्षेत्रातील घडामोडी
६) वैज्ञानिक घडामोडी
७) कृषी क्षेत्रातील घडामोडी
८) क्रीडा क्षेत्रातील घडामोडी
९) विविध करार, पुरस्कार, समित्या, दिनविशेष इ.

चालू घडामोडीची तयारी रोज करावी. परीक्षेला अवघे काही दिवस राहिले असताना या विषयाची तयारी करण्याचा प्रयत्न केल्यास गोंधळ उडण्याची जास्त शक्यता आहे.


२) इतिहास (महाराष्ट्राच्या संदर्भासह) व भारतीय स्वातंत्र्याची चळवळ

तसे पाहिल्यास या विषयाची व्याप्ती मोठी आहे. कारण जर इतिहास म्हटला तर त्याचे पुढील भाग पडतात.

१) प्राचीन भारताचा इतिहास 

२) मध्ययुगीन भारताचा इतिहास 
३) आधुनिक भारताचा इतिहास 
४) भारतीय स्वातंत्र्याची चळवळ.

सन मागील संघ लोकसेवा परीक्षेचा आधार घेतल्यास साधारणत: भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीवर
जास्त प्रश्न विचारले जातात. आधुनिक भारताचा इतिहास हा कोणत्याही परीक्षेला विचारला जाणारा महत्त्वाचा विभाग आहे. तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षेलासुद्धा हा विभाग आहे म्हणून याचा अभ्यास पूर्वपरीक्षेपासून विस्तृत केल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल.

संदर्भ ग्रंथ : बिपिन चंद्रा, बी. एन. ग्रोव्हर व एन.सी. ई.आर.टी.ची इतिहासाची पुस्तके. याशिवाय प्राचीन भारताचा इतिहास व मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी महाराष्ट्राचा संदर्भ घेऊन अभ्यास करावा. जर इतिहासासाठी स्वतंत्र वही तयार करून त्यात संक्षिप्त स्वरूपात माहिती, सणावळय़ा इत्यादी लिहून ही वही परत परत वाचल्यास निश्चितच फायदा होतो.

३) महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल 

एम.पी.एस.सी.च्या सुरुवातीच्या अभ्यासक्रमात फक्त महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल होता; मात्र बदलेल्या अभ्यासक्रमात जगाचा भूगोल नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे. जर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मागच्या एक वर्षांच्या विविध परीक्षांचा अभ्यास केला, तर भूगोलासंदर्भात एक महत्त्वाचा बदल लक्षात येईल, तो म्हणजे भूगोलावर काही प्रश्न आता विशेषत: नकाशावर विचारले जातात, याचा अभ्यास करण्यासाठी सर्वप्रथम परीक्षार्थीना महाराष्ट्राचा व भारत आणि जग याचा अॅटलास घेणे आवश्यक आहे व अॅटलास समोर ठेवून अभ्यास करावा. या परीक्षेसाठी महाराष्ट्राचा भूगोल तसेच भारताचा भूगोल व्यवस्थित अभ्यासावा.

संदर्भ ग्रंथ : महाराष्ट्र व भारताचा भूगोल सवदी तसे एन.सी.ए. आर.टी. चे पाचवी ते दहावीपर्यंतची पुस्तके वाचावीत. जगाच्या भूगोलाचा अभ्यास करताना सर्वप्रथम जगातील पर्वतरांगा, नदीप्रणाली, जगातील वाळवंटे यांची स्वतंत्र सूची तयार करावी व नंतर खंडाप्रमाणे अभ्यास सुरू करावा, जेणेकरून अभ्यास सोपा होईल. उदा. अमेरिका खंड- उत्तर अमेरिका- कॅनडा- दक्षिण अमेरिका इत्यादी; युरोप खंड, आफ्रिका खंड.

संदर्भ ग्रंथ : जिओग्रॉफी थ्रू मॅप्स- के. सिद्धार्थ यांचे पुस्तक आवश्यक वाचावे.


४) पर्यावरण :मागच्या दोन वर्षांच्या यूपीएससीच्या पेपरचा अभ्यास केल्यास लक्षात येईल की, या घटकावर कमीत कमी २० प्रश्न विचारले गेले आहेत. हा अभ्यासासाठी सर्वात सोपा व मनोरंजक असा विभाग आहे. याची तयारी करताना विद्यार्थ्यांनी खालील प्रकरणांचा आधार घ्यावा.

१) वातावरणातील बदल
२) जैवविविधता
३) परिस्थितिकी
४) ग्लोबल वाìमग
५) कार्बन क्रेडिट
६) बायोस्पेअर रिझव्र्ह
७) नॅशनल पार्क
८) ओझोन थराचा क्षय
९) बायोडायव्हर्सटिी हॉट स्पॉट
त्याचप्रमाणे वातावरण बदलासंदर्भात घेण्यात
आलेल्या विविध परिषदा उदा. रिओ परिषद, कॅन्कून परिषद
इत्यादी.


५) भारतीय व महाराष्ट्रातील राज्यपद्धती व प्रशासन : 

यूपीएससीने मागे घेतलेल्या सी-सॅट परीक्षेत जवळजवळ २५ ते ३० प्रश्न या घटकावर विचारले होते. या घटकावर मुख्य परीक्षेसाठी स्वतंत्र पेपर असल्याने विद्यार्थ्यांनी या घटकाची तयारी चांगली करावी. तयारी करताना दैनंदिन जीवनात ज्या घडामोडी घडत आहेत त्यांचादेखील संदर्भ घ्यावा. प्रथम भारतीय राज्यघटना व्यवस्थित वाचून ती समजून घ्यावी, महत्त्वाची कलमे लिहून ती परत परत वाचावीत, निरनिराळय़ा घटना दुरुस्त्या, भारतीय राज्य प्रणाली, पंचायत राज, ७३ वी घटना दुरुस्ती, ७४ वी घटना दुरुस्ती, पंचायत राज व नागरी प्रशासन, मानवी हक्क, न्यायिक प्रणाली, निरनिराळे आयोग व त्यांची कार्ये, उदा. संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महिला आयोग, निवडणूक आयोग इत्यादी. केंद्रीय व राज्यस्तरावर नियुक्त केलेल्या निरनिराळय़ा समित्या यांचा अभ्यास करावा.

संदर्भ ग्रंथ : के. लक्ष्मीकांत, सुभाष कश्यप, भालभोळे,
घांगरेकर यांची पुस्तके.


६) आíथक व सामाजिक विकास :
 

या वर्षी अभ्यासक्रमात भारतीय अर्थव्यवस्था याऐवजी आíथक व सामाजिक विकास हा शब्द वापरला आहे. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडू शकतो. हा विभाग परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. कारण यूपीएससीने गेल्या २ वर्षांच्या प्रश्नपत्रिकेत जवळजवळ ३० ते ३५ प्रश्न या घटकावरच विचारलेले आहेत. अभ्यास करताना सर्वप्रथम अर्थशास्त्राच्या काही संकल्पना समजावून घ्याव्यात; त्याचप्रमाणे जुन्या अभ्यासक्रमात असलेल्या पंचवार्षकि योजना, बँक प्रणाली, आयात-निर्यात धोरण, करप्रणाली, विविध आंतरराष्ट्रीय संघटना, उदा. जागतिक व्यापार संघटना, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, दारिद्रय़ निर्मूलन, रोजगारनिर्मिती यांचादेखील अभ्यास करावा. याशिवाय वरील अभ्यासाची सांगड खालील मुद्दय़ांशी घातल्यास तयारी परिपूर्ण होईल.

१) शाश्वत विकास
२) लोकसंख्या
३) सामाजिक क्षेत्र
४) भारत व महाराष्ट्राची कृषी व्यवस्था व सहकार इत्यादी.

संदर्भ ग्रंथ : इंडिया इअर बुक २०१३ अजून बाजारात यायचे
आहे.
दत्त आणि सुंदरम् किंवा भारतीय आíथक व्यवस्था (विशेषांक)
प्रतियोगिता दर्पण.


७) सामान्य विज्ञान :सामान्य विज्ञानात प्रश्न 

१) जीवशास्त्र 
२) भौतिक शास्त्र
३) रसायन शास्त्र व दैनंदिन जीवनात घडणाऱ्या विविध घटनांशी संबंधित असलेल्या सामान्य विज्ञानावर प्रश्न विचारले जातात. 


यासाठी विद्यार्थ्यांनी पाचवी ते दहावीपर्यंतची एन.सी.ई.आर.टी.ची पुस्तके यांचा अभ्यास करावा. जीवशास्त्र व भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यांच्यातील शास्त्रीय घटकांचा जास्त अभ्यास करू नये. उदा. रसायनशास्त्रातील निरनिराळय़ा अभिक्रिया, जीवशास्त्रातील प्राणी विज्ञान इत्यादी. मात्र जीवशास्त्राचा एक भाग म्हणजे शरीरशास्त्राशी संबंधित निरनिराळे आजार, त्यासाठी वापरात असलेली औषधे, व्हिटामिन्स, विटामिन्सच्या कमतरतेमुळे होणारे आजार इत्यादींचा अभ्यास व्यवस्थित करावा. याशिवाय ऊर्जा, ऊर्जा समस्या, भारताची संरक्षण व्यवस्था इत्यादींचा अभ्यास करावा.



                             मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आपण स्पर्धापरीक्षेची तयारी करीत आहात. दरवर्षी जवळजवळ चार ते पाच लाख विद्यार्थी या परीक्षेत आपले नशीब आजमावतात. यशस्वी व्हायचे असेल तर शंभर टक्के नव्हे तर एकशे दोन टक्के प्रयत्न करणे आवश्यक आहे . कोणत्याही एकाच घटकावर जास्त वेळ न घालवता सर्व घटक व्यवस्थित समजून त्यांचा अभ्यास करावा. पूर्ण अभ्यासाला चालू घडामोडीचा आधार द्यावा. तयारीदरम्यान कोणत्याही क्षणी नाराज न होता स्वत:चे प्रयत्न सातत्याने चालू ठेवावे, तरच यश प्राप्त होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा