Post views: counter

नदी

प्रमुख भूरूपे - नदी 

 
                          युवावस्था अवस्‍थेत पर्वतीय प्रदेशात नदीचा उगम होतो. पाण्‍यांचे आकारमान कमी असले तरी देखील तीव्र उतारामुळे उर्ध्‍व खनन प्रभावी असते. या अवस्‍थेस पुढील भूरूपांची निर्मिती होते.
१) ‘व्‍ही’ आकाराची दरी
तीव्र उर्ध्‍व खननामुळे तळभागाची खोली वाढून ‘व्‍ही’ आकाराच्‍या दरीची निर्मिती होते.
२) निदरी व घळई
अत्‍यंत तीव्र उताराच्‍या बाजू असलेल्‍या अरूंद दरीस निदरी असे म्‍हणतात. जेव्‍हा या निदरीच्‍या बाजूंचा उतार अत्‍यंत तीव्र व खोली अतयंत जास्‍त असते तेव्‍हा त्‍यास घळई असे संबोधले जाते.
उदा. कोलोरॅडो नदीवरील ग्रँड घळई.
३) धावत्‍या/धावते/ध्रुतवाह
नदीच्‍या उतारावर मृदु व कठीण खडकांमुळे उंचसखलपणा निर्माण होतो, याला धावते असे म्‍हणतात. असे अनेक धावते एकत्र येऊन महाप्रपातांची निर्मिती होते.
उदा. नाईल नदीवरील धावते.
४) धबधबा
उंच कड्यावरून जलप्रवाह खाली कोसळून धबधब्‍यांची निर्मिती होते. धबधब्‍याच्‍या तळाशी निर्माण झालेल्‍या सरावरास प्रपात कुंड असे म्‍हणतात.
उदा. जोग धबधबा. शरावती नदीवरील जोग धबधब्‍यामुळे ४० मीटर प्रपात कुंड निर्माण झाले आहे.
५) रांजण खळगे
नदीच्‍या पात्रात खडकांच्‍या चक्राकार खणनामुळे निर्माण झालेल्‍या खळग्‍यांना रांजण खळगे असे म्‍हणतात. हे खळगे गोलाकृतीय असतात.
उदा. गोदावरी नदीतील रांजण खळगे.
६) नदीचे अपहरण
दोन प्रवाहादर्‍या जलविभागाची झीज होऊन एका प्रवाहाचे पाणी दुसर्‍या प्रवाहाकडे वळण्‍याच्‍या क्रियेस नदी अपहरण असे म्‍हणतात. अपहरण करणार्‍या क्रियाशील प्रवाहास अपहणकर्ता प्रवाह तर अपहरण झालेल्‍या प्रवाहास अपहृत प्रवाह असे संबोधले जाते. ज्‍या ठिकाणी ही अपहरणाची प्रक्रिया घडून येते. त्‍यास अपहरणांचा कोपरा असे म्‍हणतात.
उदा. म्‍यानमार मध्‍ये इरावती नदीने सिटांग नदीचे अपहरण केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा