Post views: counter

Refrance Book List For Tax Assistant exam ?

कर सहायक तयारी कशी करावी
               मित्रानो कशी सुरु आहे तयारी.कर सहायक पदाची ४५० पदासाठीची एम पी एस ची जाहिरात आली आहे.पण हि फक्त मराठी ३० आणि इंग्रजी ४० टायपिंग परीक्षा पास केलेल्या किवा कोर्स पूर्ण केलेल्या उमेदवारानाच देता येते. त्यामुळे अजून ज्यांनी कोणी टायपिंग केले नसेल त्यांनी जून पासून करण्यास काही हरकत नाही कारण इतर विभागाच्या सुधा जाहिरात निघत असतात झाला तर फायदाच होतो. पण आता ज्यांचे टायपिंग पूर्ण आहे त्यांच्यासाठी हि सुवर्णसंधी आहे तेव्हा एक world cup च्या वेळी प्रसिद्ध होत असलेल्या
जाहिरातीप्रमाणे "मौका मौका " आहे तेव्हा फायदा करून घ्या एक पोस्ट हातात घ्या आणि पुढे अभ्यास करतच राहा चांगल्या पोस्ट साठी. आता कर सहायक हि परीक्षा कशी असते किवा त्याचे स्वरूप काय असते.

                        या परीक्षेमध्ये मराठी,इंग्रजी,सामान्यज्ञान,बुद्धिमत्ता चाचणी,मुलभूत गणितीय कौशल्य आणि पुस्तपालन आणि लेखाकर्म हे विषय असतात. या विषयावर साधारणपणे २०० प्रश्न ४०० गुणासाठी विचारले
जातात.वेळ २ तास आहे आणि निगेटिव्ह मार्किंग असते.म्हणजे एक प्रश्न २ मार्कला आहे. याचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Source: www.eMPSCkatta. blogspot.in

आता संदर्भ पुस्तके पाहूया कोणती वापरायची ते अभ्यासक्रमानुसार-
A) मराठी-
  1. मो रा वाळिंबे
  2. बाळासाहेब शिंदे.
  3. के सागर परिपूर्ण मराठी व्याकरण
B) इंग्रजी
  1. पाल आणि सुरी
  2. रेन आणि मार्टिन
  3. oxford dictionary 
शब्दसंग्रह वाढवण्यासाठी आणि जे तुमच्याकडे असतील ते सुधा One word substitution,synonyms,antonyms,idioms and phrases वरती कमांड असणे गरजेचे आहे.
C) आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास-
  1. अनिल कटारे
  2. जयसिंगराव पवार
  3. ५वी, 8वी, ११वी ची शालेय पुस्तके
D) महाराष्ट्राचा भूगोल
  1. महाराष्ट्राचा भूगोल : सवदी
  2. खतीब के सागर
  3. नकाशे
  4. ५ वी ते १२ वी शालेय पुस्तके.
E) नागरिकशास्त्र आणि भारतीय राज्यघटना
  1. राज्यघटना : रंजन कोळंबे
  2. ३ नवीन कायदे तरतुदी चेक करा नेट वर
Source: www.eMPSCkatta. blogspot.in
F) पंचवार्षिक योजना
  1. देसले भाग १
  2. रंजन कोळंबे
  3. आताचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचा आणि भारताचा
  4. योजना मासिक
G) चालू घडामोडी.
मागील वर्षभराचे चालू घडामोडी विचारतात.
 पेपर-जानेवारी २०१४ ते ३१ मे २०१५ पर्यंतच्या
संदर्भ-लोकसत्ता,महाराष्ट्र टाईम्स,सकाळ.
स्टडी सर्कल मासिक , युनिक , परिक्रमा मासिक , लोकराज्य ,योजना मासिक
H) पुस्तपालन व लेखाकर्म
  1. के सागर चे बुक
  2. स्टडी सर्कल बुक
  3. ३ ११ वी चे पुस्तक यासंदर्भातील
  4. दीपस्तंभ 1000 प्रश्नसंच
I) बुध्दिमत्ता चाचणी
  1. दांडेकर/ अंकलगी
  2. जि , किरण
  3. R S Agarwal reasoning
J) मुलभूत गणितीय कौशल्य -
  1. नितीन महाले
  2. सतीश वसे
K) आर्थिक सुधारणा व कायदे
  1. किरण देसले भाग १

५ टिप्पण्या: