Post views: counter

भारताचे स्थान

भारताचे स्थान

भारत पूर्व गोलार्धात मध्यवर्ती स्थानी आहे, तर दुस– या प्रकारे तोउत्तर गोलार्धात येतो. भारताच्याप्रचंड आकारामुळे त्यास उपखंड म्हणतात. भारतीय उपखंडात भारत, मालदिव, पाकिस्थान भुतान, नेपाळ, बांग्लादेश व श्रीलंका यांचा समावेश होतो. भारताची मुख्य भुमी आशिया खंडाच्या दक्षिणेस ८ ० ४ उ. ते ३७ ० ६ उ. अक्षांश ६८ ० ७ पू. ते ९७ ० २५ पू. रेखावृत्तापर्यंत पसरलेली आहे. भारताचे अति दक्षिणेचे टोक म्हणजे इंदिरा पॉइंट ( ग्रेट निकोबार ) ६ ० ३० उत्तर अक्ष वृत्तावर आहे. कर्कवृत्त भारताच्या मध्यातून जाते. ( गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड, प. बंगाल, त्रिपूरा, व मिझोराम ) भारताचे दक्षिण टोक विषुववृत्तापासुन ८७५ कि.मी. अंतरावर आहे. भारताची पूर्व – पश्चिम लांबी २९३३ कि.मी. असून उत्तर दक्षिण लांबी ३२१४ कि.मी. इतकी आहे.


भारताच्या सीमा व क्षेत्रफळ :-भारताचे क्षेत्रफळ ३२,८७,२६३ चौ.कि.मी. असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात भारताचा सातवा क्रमांक लागतो. भारताने जगाचे २.४२ % क्षेत्रफळ व्यापले आहे. जगातील सर्वात मोठे देश आकारानुसार १) रशिया २) कँनडा ३) चीन ४) अमेरिका ५) ब्राझील ६) ऑस्ट्रेलिया व ७) भारत भारताच्या मुख्य भूमीच्या किनारपट्टीची लांबी ६१०० कि.मी. आहे, तर एकूण समुद्री किनारपट्टीची लांबी ७५१६ कि.मी. आहे. भारताची जल सीमा किना–यापासुन १२ नॉटिकल मैल लांबी आहे. भारतात सर्वाधिक किनारपट्टी गुजरात राज्याला लाभलेली आहे. यानंतर आंध्रप्रदेशाचा क्रमांक लागतो. भारतास एकूण १५,१६८ कि.मी. लांबीचीभू-सीमा लाभली आहे. ती खालील प्रमाणे-
संबंधित देश- सीमेचे नाव - लांबी

  1. चीन - मॅकमोहन रेषा - ४२५०कि.मी. 
  2. नेपाल १०५० कि.मी.
  3. पाकिस्थान रॅडक्लिफ लाईन ४०९०कि.मी. 
  4. भूतान ०४७५ कि.मी.
  5. बांग्लादेश रॅडक्लिफ लाईन ३९१०कि.मी. 
  6. अफगाणिस्थान
  7. ब्रम्हदेश १४५०कि.मी. 
भारताच्या दक्षिण बाजूस हिंदी महासागर आहे. पश्चिम बाजूस अरबी समुद्र तर पूर्वेस बंगालचा उपसागर आहे. समुद्रमार्गे श्रीलंका हा देश भारतास सर्वात जवळ आहे. मन्नारचे आखात व पाल्कच्या सामुद्रधुनीमुळ श्रीलंका भारतापासून वेगळी झाली आहे.

भारताची प्राकृतीक रचना:भारताचे प्राकृतिक दृष्ट्या खालील पाच भाग पडतात.
  1. उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश
  2. उत्तरेकडील मैदाने
  3. द्विकल्पीय पठार
  4. किनारी मैदाने
  5. भारतीय बेटे
भारताचा १०.७% भाग पर्वतीय, १८.६% भाग डोंगराळ, २७.७% पठारी व४३% भाग मैदानी प्रदेशाचा आहे.

भारतीय उपखंडाची निर्मितीः-
भारतीय उपखंड
आल्फ्रेड वेगनर याने या विषयी भूखंड वहन सिधांन्त मांडला. सद्याच्या हिमालय व मैदानी भागातपूर्वी टेथिस नावाचा समुद्र होता. टेथिसच्या उत्तरेस लॉरेशिया (अंगारा भूमी) व दक्षिणेस गोंडवाना भूमी होती. या महासागराचा विस्तार भारत- म्यानमारच्या सीमेपासून अटलांटिक महासागरातील गिनीच्या खाडीपर्यंत होता. दोन्ही बाजूच्या जमिनीच्या झीज होऊन ती टेथिस महासागरात जमा झाली. दोन्ही भूखंडाच्या परस्परांकडे सरकण्यामुळे गाळास वळ्या पडून पर्वताची निर्मिती झाली. या पर्वताची झिज होऊन गाळ टेथिस समुद्रात जमा झाली. अशा प्रकारे मैदानांची निर्मिती झाली.

१) उत्तरेकडील पर्वतमय प्रदेशः-पर्वतमय प्रदेश
जगाचे छप्पर म्हणून ओळखले जाणार्या पामिर पठारापासून अनेक पर्वत श्रेणी निघालेल्या आहेत. यातील कुनलून पर्वत श्रेणी तिबेटकडे, तर काराकोरम काश्मिरकडे प्रवेश करते. यातच अक्साईचीनचे पठार आहे. बाल्टोरो व सियाचीन या येथील प्रमुख हिमनद्या आहेत. काराकोरमच्या दक्षिणेस अनुक्रमे लडाख व झास्करपर्वत रांगा आहेत. कैलास पर्वतावर सिंधू नदी उगम पाऊन लडाख व झास्कर पर्वत रांगातून वायव्येकडे वाहत जाते.

हिमालय पर्वतः- सिंधू व ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्ये असणार्या पर्वत श्रेणीस हिमालय म्हणतात. याची लांबी २५०० किमी. असून रूंदी १५० ते ४०० किमी आहे. भारत-म्यानमार सीमेवर यास पूर्वाचल म्हणतात. हिमालयास तरुणपर्वत असे म्हणतात. भारतातून तिबेटकडे जातांना हिमालयाच्या खालील रांगा लागतात.

अ) शिवालिक किंवा उपहिमालयः-ही सर्वात कमी उंचीची पर्वत रांग आहे. मॄदेची सर्वाधिक झीज हिमालयाच्या या सर्वात तरुण भागात होते.याची सरासरी उंची १००० ते १२०० मी व रुंदी १० ते ५० कि.मी. आहे. या रांगेस नद्यांनी अनेक ठिकाणी छेदले असुन त्यास पश्चिमेसडे डून (उदाः- डेहराडुन, कोथरीडून,) व पूर्वेकडे द्वार म्हणतात. (उदाः- हरीद्वार)

ब) लघु हिमालय/ मध्य/लेसर/ हिमालयः-याची सरासरी रुंदी ८० किमी व उंची ४००० ते ५००० मी. इतकीआहे. निसर्ग सौंदर्यामुळे हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. उदाः- डलहौसी, धर्मशाळा, शिमला, मसुरी, नैनिताल, राणीखेत व दार्जिलिंग इ. यातच काश्मिर खोरे व काठमांडू खोरे आहे. यातील पर्वतउतारावरील गवताळ प्रदेशास काश्मिरमध्ये मग असे म्हणतात. (सोनमर्ग, गुलमर्ग) तर गढवाल हिमालयात यास बुग्याल व पयार म्हणतात. झेलम व बियास नद्यांच्या दरम्यानची पिरपंजाल ही पर्वत रांग लेसर हिमालयातील सर्वांत लांब रांग आहे. तसेच धौलपारु, नांगतिबा, महाभारत व मसुरी या पर्वत रांगा आहेत.

क) बृहत/ हिमाद्री/ग्रेटर हिमालयः-याची उंची सर्वाधिक म्हणजे सरासरी ६००० मी. आहे. येथे जगातील सर्वोच्च असणारे एव्हरेस्ट (नेपाल- ८८४८ मी. पर्वत) आहे. त्यास नेपाळमध्ये सागर माथा असे म्हणतात. इतर नंदादेवी, गंगा पर्वत इ.

ड) बाह्य हिमालय (ट्रान्स हिमालय):-यात काराकोरम व झास्कर पर्वत रांगा आहेत. के -२ किंवा गॉडविन ऑस्टिन हे जगातील द्वितीय क्रमांकाचे शिखर (८६११ मी.) काराकोरम पर्वत रांगेत आहे. हे भारतातील सर्वोच्च शिखर आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा