Post views: counter

Current Affaires November 2016 Part - 5


#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹ICT विकास निर्देशांक 2016 मध्ये भारत 138 व्या क्रमांकावर:-

मेजरींग द इन्फॉर्मेशन सोसायटी रीपोर्ट च्या 2016 आवृत्तीचे 22 नोव्हेंबर 2016 रोजी गॅबरोन, बोट्सवाना मधील जागतिक दूरसंचार/ICT निर्देशक परिषद (World Telecommunication/ICT Indicators Symposium-WTIS) 2016 दरम्यान अनावरण करण्यात आले आहे. अहवालामध्ये, दरवर्षीप्रमाणे, ICT विकास निर्देशांक(Development Index-IDI) 2016 प्रसिद्ध करण्यात आले आहे.

IDI मध्ये भारत

ICT विकास निर्देशांक 2016 मध्ये भारत 138 व्या क्रमांकावर दिसून आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने यावेळी भारत तीन स्थानांनी मागे पडला आहे.

मोठ्या विकसनशील अर्थव्यवस्था, जश्या बांगलादेश, भारत, इंडोनेशिया व पाकिस्तान येथे मोबाइल फोन चे मालकी प्रमाण अजूनही कमी आहे. म्हणजेच देशाची 40% लोकसंख्या अजूनही मोबाइल फोन वापरत नाही.


मेजरींग द इन्फॉर्मेशन सोसायटी रीपोर्ट:-
मेजरींग द इन्फॉर्मेशन सोसायटी रीपोर्ट हे 2009 सालापासून दरवर्षी प्रकाशित केले जात आहे, जे की ICT विकास निर्देशांक (IDI) च्या समावेशासह माहिती समुदायाचे मापन करण्यासाठी असलेले ICT डेटा आणि बेंचमार्किंग साधन आहे. IDI 2016 मध्ये जगभरातील 175 अर्थव्यवस्थांमध्ये ICT विकासाची पातळी स्पष्ट केलेली आहे आणि वर्ष 2014 पासून त्यांच्यामधील प्रगतीची तुलना केली गेली आहे.

अहवालामधील महत्त्वाचे निष्कर्ष

सरासरी जागतिक IDI गुण हे वर्ष 2015 मधील 4.74 पेक्षा सुधारित दिसलेले आहे. हा आकडा वर्ष 2016 मध्ये 4.94 इतका दिसून आला आहे.IDI च्या यादीमध्ये कोरिया प्रजासत्ताक 8.84गुणांसह सलग दुसर्‍यांदा प्रथम क्रमांकावर आहे. तर सहाराच्या उप-क्षेत्रातील आफ्रिकेतील नायजर हे 1.07 गुणांसह सर्वात शेवटी (175 वे स्थान) आहे.यादीत टॉप 10 देशांमध्ये आशिया-पॅसिफिक प्रदेशातील कोरिया प्रजासत्ताक सह आणखी दोन अर्थव्यवस्था आणि सात युरोपीय देशांचा समावेश आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹पुण्याचा प्रसाद बनला ग्लोबल ' आयर्न मॅन'

वजन अति वाढल्यामुळे ' फिटनेस ' गमावला आणि अनेक त्रास मागे लागले, त्यातून वाचण्यासाठी त्याने व्यायाम सुरू केला. त्यानंतर त्याला व्यायामाची अशी काही गोडी लागली, की त्याला थेट आंतरराष्ट्रीय पातळीवरील ' फिटनेस' चा कस पाहिल्या जाणाऱ्या ' ट्रायथलॉन ' शर्यतीत सहभागी होण्याचे वेध लागले. हे स्वप्नदेखील त्याने लगोलग सत्यात उतरवले , थेट ' आयर्न मॅन ' हा किताब मिळवून .


दिवाळीच्या फराळावर मनसोक्त ताव मारल्यानंतर आता गुलाबी थंडीमध्ये व्यायाम करून घाम गाळायचे दिवस सुरू झालेत; परंतु आजच्या ' जंक फूड ' च्या जमान्यात स्थूलपणा डोकेदुखी ठरत आहे . त्यावर व्यायाम हाच एकमेव उपाय आहे ; परंतु बहुतेकांचा व्यायामाचा निश्चय काही दिवसांनंतर संपलेला असतो. मात्र व्यायामात सातत्य ठेवल्यास ' फिटनेस ' मिळतोच , हे पुण्यातील प्रसाद शिंदे (वय 35 ) या तरुणाने थेट आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत यश मिळवून दाखवून दिले आहे .

प्रसादचे वजन अति वाढले होते , त्यामुळे त्याने ' फिटनेस ' गमावला होता . त्यातून अनेक शारीरिक व्याधी त्याच्या मागे लागल्या होत्या . त्यामुळे त्याने पुण्यातील तळजाई टेकडीवर फेऱ्या मारायला सुरवात केली . त्यातून त्याला व्यायामाची अशी काही गोडी लागली, की थेट आंतरराष्ट्रीय पातळीवरील फिटनेसचा कस पाहिल्या जाणाऱ्या ' ट्रायथलॉन ' शर्यतीत सहभागी होण्याचे वेध त्याला लागले . हे स्वप्नदेखील त्याने लगोलग सत्यात उतरवले.

फिटनेसचा कस पाहणारी , मलेशियात झालेली ही अनोखी खडतर शर्यत पूर्ण करून त्याने ' आयर्न मॅन ' चा किताब मिळविला.

मराठमोळा अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण , जलतरणपटू कौस्तुभ राडकर यांनी यापूर्वी ही कामगिरी केली आहे . कौस्तुभने सलग चारवेळा हा किताब मिळविला आहे . अभिनेता मिलिंद सोमण याने मागील वर्षी वयाच्या पन्नाशीच्या उंबरठ्यावर असताना ' आयर्न मॅन' किताब पटकावला आणि या स्पर्धेची भारतभर चर्चा झाली. ' फिटनेस ' ची खडतर परीक्षा घेणारी ही स्पर्धा . या स्पर्धेतच काय, साधी तळजाईची टेकडीही आपण सर करू की नाही , अशा विचारात असलेल्या प्रसाद शिंदे याने स्थूलपणावर मात करण्यासाठी व्यायामाला सुरवात केली .

काही वर्षांपूर्वी वजनाची शंभरी ओलांडलेल्या प्रसादने खडतर व्यायामातून फिटनेस मिळवला . त्यानंतर पुण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली त्याने काही मॅरेथॉन शर्यतींमध्येही सहभाग घेतला . सन 2015 मध्ये 42 किलोमीटरची हैदराबाद मॅरेथॉन साडेचार तासांत, सन 2016 मध्ये 42 किलोमीटरची मुंबई मॅरेथॉन 4 तास 13 मिनिटांमध्ये पूर्ण केली .

दरम्यानच्या काळात त्याने मिलिंद सोमण याने ' आयर्न मॅन' किताब जिंकल्याची बातमी पाहिली . त्यातून त्यानेही ही स्पर्धा जिंकण्याचा चंग बांधला . त्यासाठी त्याने कसून सराव सुरू केला .

मलेशियात 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या या स्पर्धेत त्याने सहभाग घेतला आणि 14 तास 12 मिनिटांमध्ये ही स्पर्धा यशस्विरीत्या पूर्ण करून भारताचा तिरंगा ध्वज अभिमानाने फडकावला .

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकास सलग 2 .8 किलोमीटर पोहणे , 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42 किलोमीटर धावणे अशा तीन प्रकारांतील 224 .8 किलोमीटर अंतर ठराविक वेळेत पूर्ण करावे लागते . त्यात जगभरातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता . त्यामध्ये प्रसादने निश्चित केलेल्या वेळेपूर्वी ( 14 तास 28 मिनिटे ) शर्यत पूर्ण करून ' आयर्न मॅन ' किताब पटकावला .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांचे पुण्यात निधन

ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत दिलीप पाडगावकर (वय ७२) यांचे आज पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात निधन झाले. पाडगावकर किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू होते.

१ मे १९४४ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांनी वयाच्या २४ वर्षी पत्रकारितेला सुरूवात केली होती. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक म्हणून त्यांची ओळख होती. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी राज्यशास्त्राची पदवी प्राप्त केली होती. पटकथा-दिग्दर्शन पदवीही त्यांनी मिळवली होती. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने त्यांची पॅरिस प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली होती. १९७८ ते १९८६ या कालावधीत त्यांनी युनेस्कोत बँकॉक आणि पॅरिससाठी काम केले होते. १९८८ मध्ये त्यांची टाइम्स ऑफ इंडियाच्या संपादकपदी नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर ते तब्बल सहा वर्षे होते. २००२ मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित केले होते.

काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी काश्मीर कमिटीचे काम ते करत होते. जून महिन्यापासून धुमसत असलेल्या काश्मीर खोऱ्यात शांततेची फुंकर घालण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून राबवलेल्या आठ कलमी कार्यक्रमांतर्गत काश्मिरी जनतेशी संवाद साधण्यासाठी केंद्र सरकारचे संवादक म्हणून त्यांची अलिकडेच नियुक्ती करण्यात आली होती. काश्मीरमधील सर्व घटकांशी विशेषत: तरुण आणि विद्यार्थ्यांशी सातत्याने, विनाअडथळा संवाद साधण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.

ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत दिलीप पाडगावकर यांच्या निधनाने एक सव्यसाची व्यक्तिमत्त्व गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. पाडगावकर यांची पत्रकारितेतील अर्धशतकी कारकीर्द ही अतिशय समतोल आणि पत्रकारितेचा वस्तूपाठ आहे. विविध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींचा त्यांचा चांगला अभ्यास होता. भारतीय पत्रकारितेत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. मानवता या विषयात पीएच.डी. करणाऱ्या पाडगावकर यांच्या जगण्याचा आणि लिखाणाचा केंद्रबिंदूही मानवतावाद हाच होता. याशिवाय काश्मिरमधील परिस्थिती सुधारण्याविषयी उपाययोजना सुचविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्यांच्या निधनाने एक व्यासंगी पत्रकार, विचारवंत आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले आहे, असे त्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹सावत्र पित्याचे नाव पासपोर्टवर वैध

न्यायालयाने कायदेशीर पालकत्वाचे अधिकार बहाल केलेले नसतील तरीही सावत्र पित्याला मुलाच्या पासपोर्टवर स्वतःचे नाव लावता येईल, असा महत्त्वपूर्ण निकाल पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने दिला.

मोहित (२६) याने दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी निकाल देताना उच्च न्यायालयाने हा निकाल दिला. मोहितचे पालक एस. एम. अरोरा आणि निर्मला अरोरा यांचा १९९६मध्ये घटस्फोट झाला होता. मोहित यांची कस्टडी त्याची आई निर्मला यांच्याकडे देण्यात आली होती. त्यांनी १९९७मध्ये उज्ज्वल सिंग यांच्याशी पुनर्विवाह केला. मोहितचे आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच शाळेच्या प्रमाणपत्रांवर उज्ज्वल
सिंग यांचेच नाव नोंदवण्यात आले होते.

 मोहितने सावत्र पित्याच्या नावानेच पासपोर्टसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, पासपोर्ट अधिकाऱ्यांनी पासपोर्ट मॅन्युअल कायदा, २०१०मधील प्रकरणाचा आधार घेऊन मोहित याला पासपोर्ट नाकारला होता. या कायद्यानुसार पुनर्विवाहानंतर सावत्र पिता हा कायदेशीर पालक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केल्याशिवाय पासपोर्टवर त्याचे नाव देता येत नाही. मात्र, या प्रकरणात सर्वार्थाने सावत्र पिता हाच पालक असल्याचे सिद्ध झाल्याने नव्याने न्यायालयाची परवानगी आणण्याची गरज नसल्याचे न्या. राजेश कुमार यांनी स्पष्ट केले. मोहितला सावत्र वडिलांचे नाव असलेला पासपोर्ट महिनाभरात द्यावा, असे आदेश दिले.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹आंध्रात ' कॅशलेस ' साठी मोफत मोबाईल योजना

विजयवाडा - केंद्र सरकारने पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर सामान्य जनतेसह अनेकांना त्याचा फटका बसला. या समस्येवर मात करण्यासाठी "कॅशलेस' व्यवहार हा उपाय असून , त्यासाठी आर्थिकदृष्ट्या मागास नागरिकांना मोफत मोबाईल वाटप करण्याचा विचार आंध्र प्रदेश सरकार करीत आहे .

मुख्यमंत्री एन . चंद्राबाबू नायडू यांनी याविषयीचा प्रस्ताव रिझर्व्ह बॅंक आणि अन्य बॅंकेच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत सादर केला . कॅशलेस व डिजिटल व्यवहारांसाठी प्रत्येकाकडे मोबाईल फोन असणे गरजेचे आहे . म्हणूनच ही कल्पना आम्ही मांडली असून , मोबाईल वाटप करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे , असे नायडू यांनी सांगितले . तीन हजार कोटी नव्या नोटा सोमवारपर्यंत (ता. 28 ) राज्यात पोचतील . यात कमी मूल्याच्या नोटांची संख्या 60 कोटी असण्याची शक्यता आहे , अशी माहिती "आरबीआय ' च्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली . नोटाबंदीनंतर उद्भवलेले प्रश्न जोपर्यंत पूर्णपणे सुटत नाही , तोपर्यंत टेलिकॉन्फरन्सिंद्वारे परिस्थितीचा आढावा सातत्याने घेण्याची सूचना नायडू यांनी अधिकाऱ्यांना केली . "आरबीआय ' चे प्रतिनिधी हरी शंकर , आंध्र बॅंकेचे उपसरव्यवस्थापक जी . एस . कृष्ण राव व इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹धर्मांतर:पाकिस्तानातील हिंदूना दिलासा

पाकिस्तानात अल्पसंख्य़ांकांचे जबरदस्तीने होणारे धर्मांतर हा नेहमीच कळीचा मुद्दा राहिला आहे. पाकच्या सिंध प्रांतात तर जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतराने येथील अल्पसंख्यांक समाजाचे जगणे मूश्किल झाले होते. या पार्श्वभूमीवर आता पाकमध्ये धर्मांतर करणे गुन्हा मानला जाणार असून त्यासाठी आजीवन कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात हा कायदा लागू करण्यात आल्याने येथील अल्पसंख्यांक हिंदूंना दिलासा मिळाला आहे.

पाकिस्तानमधील सिंघ प्रांतात हा कायदा मंजूर करण्यात आला आहे. अल्पसंख्यांकांचे जबरदस्तीने होणारे धर्मांतर रोखणे हा कायद्याचा उद्देश आहे. अल्पसंख्यांकांवर होत असलेले अत्याचार थांबविण्यासाठी धर्मांतर करणे कायद्याने गुन्हा ठरविणे आवश्यक होते, असे या कायद्यात म्हटले आहे.तसेच ज्यांना धर्मांतर करायचे आहे, अशा लोकांना २१ दिवस प्रतिक्षा करावी लागणार असून त्यानंतरच त्यांना धर्मांतर करता येणार आहे.

१८ वर्षाखालील तरुणांना बंदी

या कायद्यानुसार १८ वर्षाखालील तरुणांना धर्मांतर करण्यास बंदी घालण्यात आली आली आहे.तसेच जबरदस्ती धर्मांतर घडवून आणणाऱ्य़ांना कमीत कमी ५ वर्षाची शिक्षा किंवा आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. हा ऐतिहासिक निर्णय असल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानातील एक हिंदू खासदार नंद कुमार गोकलानी यांनी व्यक्त केली. सिंध प्रांतात सातत्याने होणाऱ्या जबरदस्तीच्या धर्मांतराविरोधात अनेक संघटनांनी आंदोलने केली होती, त्यानंतर हा कायदा करण्यात आला आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹दिल्लीत प्रदूषणामुळे फटाक्यांना बंदी

नवी दिल्ली - दिल्लीत धोकादायक पातळी ओलांडलेल्या प्रदूषणाला आळा बसण्यासाठी येथे फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे . सर्वोच्च न्यायालयाने आज ( शुक्रवार) हा निर्णय दिला .

यंदा दिवाळीनंतरच्या काळात राजधानी प्रदूषणाच्या धुक्याने काळवंडली होती . त्या वेळी येथील प्रदूषणाची पातळी नेहमीपेक्षा 17 पटीने अधिक होती . "स्मॉग ' मुळे दिल्लीकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता . या स्थितीची तुलना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी "गॅस चेंबर ' शी केली होती .

दिल्लीत प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाल्याने याची दखल घेत न्यायालयाने फटाके विकण्यावर बंदी घातली आहे . त्यानुसार सर्व फटाके विक्रत्यांचे परवाने बेमुदत काळासाठी निलंबित करण्यात आले आहेत . सर्वोच्च न्यायालयाचा पुढील आदेश येईपर्यंत फटाक्यांवरील बंदी लागू राहील .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹नेपाळमध्ये ५००, २०००च्या नोटांवर बंदी

'अवैध आणि अनधिकृत' असा शिक्का मारून नेपाळ राष्ट्र बँकेने भारतीय चलनात आलेल्या ५०० आणि २००० रुपयाच्या नव्या नोटांवर तूर्त बंदी घातली आहे. नेपाळमध्ये या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत, असे 'एनआरबी'कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

भारत सरकारने ८ नोव्हेंबर रोजी ५०० आणि १००० रुपयाच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्या आणि त्याजागी ५०० आणि २००० रुपयाच्या नव्या नोटा चलनात आणण्यात आल्या. या नव्या नोटा नेपाळमध्ये तूर्त वैध नसतील असे, नेपाळ राष्ट्र बँकेचे (एनआरबी) प्रवक्ते नारायण पौडल यांनी सांगितले. भारताने परकीय चलन व्यवस्थापन कायद्याअंतर्गत (फेमा) याबाबत अधिसूचना जारी केल्यानंतरच या नोटा नेपाळमध्ये वैध ठरतील, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.

दरम्यान, नेपाळमध्ये गेल्यावर्षीपर्यंत जुन्या ५०० आणि १००० रुपयाच्या नोटांवर बंदी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नेपाळ दौऱ्यात याविषयी चर्चा केली आणि त्यानंतर ही बंदी उठवण्यात आली होती.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये ऑस्ट्रेलियाच्या रोल्टनचा समावेश

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार कॅरेन रोल्टनचा गुरूवारी येथे आयसीसीच्या क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. येथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आाrफ्रका महिला क्रिकेट संघातील तिसऱया कसोटीतील खेळाच्या पहिल्या दिवशी चहापानावेळी समारंभ आयोजित करण्यात आला होता.

आयसीसीचे प्रमुख कार्यकारी डेव्हिड रिचर्डसन यांच्या हस्ते क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार रोल्टनच्या तेलचित्राचा समावेश करण्यात आला. या समारंभावेळी रिचर्डसन यांच्या हस्ते रोल्टनला मानाची कॅप देवून गौरवण्यात आले. आयसीसीच्या क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये आतापर्यंत 81 क्रिकेटपटूचा समावेश झाला आहे. हा बहुमान मिळविणारी रोल्टन ही सहावी महिला क्रिकेटपटू आहे. या समारंभावेळी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे चेअरमन डेव्हिड पिव्हेर यांनी रोल्टनच्या क्रिकेट क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹उद्यापासून राज्यभरात संविधान जागर यात्रा

महाराष्ट्र अंनिसतर्फे २६ नोव्हेंबर ते २६ जानेवारी हा कालावधी संविधान जागर महोत्सव म्हणून साजरा केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान राज्यभरातून संविधान जागर यात्रा काढली जाणार आहे. हि यात्रा 2 टीम मध्ये विभागली असून यापैकी एक टीम मुंबई ते महू (मध्यप्रदेश) असा प्रवास करणार असून दुसरी टीम नागपूर ते औरंगाबाद असा प्रवास करणार आहेत.

या प्रवासादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी संबंधित असणाऱ्या ठिकाणांना भेटी देऊन त्या परिसरात संविधानावर आधारित कार्यक्रम घेतले जाणार आहेत. तर याची सुरूवात उद्या मुंबईतील राजगृहापासून होणार असून दिवसभर सिद्धार्थ कॉलेज, आंबेडकर कॉलेज व इतर ठिकाणी व्याख्याने व कार्यक्रम पार पडणार आहेत. संध्याकाळी ६ वाजता सर्वजण दादर येथील चैत्यभूमीवर जमा होतील. तिथे मान्यवरांच्या हस्ते यात्रेचे औपचारिक उदघाटन होईल.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹अमेरिकनही आता ‘गांधीवादी’

अमेरिकेतील इंटरनेट युझर्स महात्मा गांधींविषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. भारतीयांनंतर महात्मा गांधी, त्यांचे आयुष्य, साहित्याविषयी जाणून घेण्यासाठी अमेरिकेमधील इंटरनेट युझर्सनी गांधींविषयक संकेतस्थळांना अधिकाधिक भेट दिल्या आहेत.
गुगल अॅनालिटिकल रिपोर्टनुसार, गांधीजींविषयीची पुस्तके, भाषणे, ऐतिहासिक प्रसंग, संकेतस्थळ, ई-बुक्स यांचे सर्वाधिक डाऊनलोडिंग भारतानंतर अमेरिकेतील युझर्स करत असल्याचे दिसले आहे. या अहवालानुसार, जवळपास २४० देशांतून महात्मा गांधींविषयी सर्च केले जाते. त्यांच्याविषयी माहिती घेतली जाते, या शोधप्रवासात भारतानंतर अमेरिकेने दुसरे स्थान मिळविल्याचे मुंबई सर्वोदय मंडळाचे संकेतस्थळ प्रमुख राजेश शिंदे यांनी सांगितले.

गेल्या सहा वर्षांत १ कोटीहून अधिक ई-बुक्स संकेतस्थळाहून डाऊनलोड्स करण्यात आले आहे. त्यात ६ कोटी भारतीयांकडून तर २.५ कोटी अमेरिकन युझर्सने डाऊनलोड्स केले आहेत, अशी माहिती संस्थेचे विश्वस्त तुलसीदास सोमय्या यांनी दिली. ते म्हणाले की, डिजिटल युगाचा विस्तार पाहता संस्थेच्या संकेतस्थळावर लवकरच गांधींशी निगडित १५० साहित्यकृतींचे ई-पब, पीडीएफ आणि मोबी डोमेन स्वरूप करण्यात येणार आहे. त्यामुळे गांधी साहित्याचा अधिकाधिक प्रचार व प्रसार वाढेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹फेसबुक देणार मोफत WIFIची माहिती

फेसबुक वापरणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. फेसबुक लवकरचं एक सुविधा देणार आहे. आपल्या जवळ असणाऱ्या मोफत WIFIची माहिती आता फेसबुकवरुन मिळणार आहे. मोफत वायफाय सेवा देणाऱ्या ठिकाणांची माहिती सुलभ उपलब्ध व्हावी यासाठी नवे फीचर लकरचं उपलब्ध होणार आहे. फेसबुकच्या या फिचरमुळे फेसबुक वापरकर्त्यांस आपल्या परिसरात मोफत वायफाय आणि व्हॉटस्पॉटची माहिती मिळणे सोपे होईल.

जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साईट असलेले फेसबुक हे आपल्या रोजच्या वापरातील अविभाज्य घटक बनले आहे. आपण दररोज न चुकता त्याचा वापर करतं असतो. फेसबुक आपल्या युजर्सनां प्रत्येक वेळी नविन फिचर देऊन आपले जाळे, नेटवर्क भक्कम करत आहे.

सध्या फेसबुक आपल्या या नव्या फीचरवर काम करत असून सध्या निवडक मोबाईल अॅप वापरकर्त्यांना ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

 आयओएस अॅपचा वापर करणाऱ्यांसाठी नवे फीचर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. फेसबुकने चाचणीच्या स्वरुपात हे फिचर दिले आहे. फेसबुकच्या मुख्य मेनूमध्ये नव्या फीचरला स्थान देण्यात आले आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹७ हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन शहराचा लागला शोध

जगातील सधन संस्कृतीपैकी मानल्या जाणा-या इजिप्शियन संस्कृतीतील आणखी एका शहराचा शोध लागला आहे. इजिप्तच्या पुरातत्त्व विभागाला ७ हजार वर्षांपूर्वी जमीनीखाली गाढल्या गेलेल्या शहराचा शोध लागला आहे.

पुरात्त्व विभागाकडून सुरु असलेल्या या खोदकामात झोपड्यांचे अवशेष सापडले आहेत. तसेच लोखंडापासून बनवलेल्या वस्तू, भांडी आणि पिरॅमिडचे अवशेषही सापडले आहेत. प्राचीन इजिप्तमधल्या अबॉयदस शहराचा हा महत्त्वाचा भाग समजला जातो. येथे या शहाराची नगर रचना करण्यात मोलाचे योगदान देणा-या कामगारांच्या वस्त्या असू शकतात असा तर्क मांडण्यात येत आहे. अबॉयदस ही प्राचीन काळी इजिप्तची राजधानी होती असे अनेकांचे ठाम मत आहे. नव्याने शोधलेल्या या शहरात कदाचित शहरातील प्रमुख अधिका-यांची किंवा पिरॅमिड बांधणा-यांची घरे असल्याचे पुरातत्व विभागाने सांगितले आहे. तसेच या खोदकामादरम्यान १५ कबर देखील सापडल्या आहे. अबॉयदसच्या राजाच्या कबरेपेक्षाही या कबरींचे आकारमान हे मोठे आहे अशी माहितीही पुरातत्व विभागाने दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी इजिप्तमधल्या कदाचित उच्च स्थानावर असलेल्या व्यक्तींना पुरण्यात आले असल्याचा अनुमान लावण्यात आला आहे.

नाईल नदीच्या किना-यावर असलेल्या लक्सर शहरातील सेती मंदिरापासून ४०० किलोमीटर अंतरावर या शहराचा शोध लागला आहे. इजिप्शियन संस्कृती ही जगातील महान संस्कृतीपैंकी एक समजली जाते. नाईल नदीच्या खो-यात वसलेली ही संस्कृती इसवी सन पूर्व ३, १५० च्या सुमारास उदयास आली. या संस्कृतीबद्दल अनेक कोडी अजूनही सुटली नाही. त्यातलीच एक म्हणजे पिरॅमिड. ही पिरॅमिड आजही अनेकांच्या कुतूहलाचा विषय आहेत. जगातील सात आश्चर्यांपैकी ही पिरॅमिड एक मानली जातात. प्राचीन इजिप्शियन संस्कृतीचा पुर्नजन्मावर विश्वास होता. त्यामुळे राजे आपल्यासाठी पिरॅमिड बांधून घेत. त्यांच्या मरणानंतर या पिरॅमिडमध्ये सोने, चांदी ,दास -दासींपासून त्यांच्या उपयोगाच्या वस्तू ठेवल्या जात. नव्याने शोध लागलेल्या या शहरामुळे या संस्कृतीबद्दल आणखी रहस्ये समोर येऊ शकतात. त्याचप्रमाणे या शहरामुळे इजिप्तच्या खालावलेल्या पर्यटन व्यवस्थेला देखील उभारी मिळू शकते अशी आशा वर्तवण्यात येत आहे. २०११ पासूनच इजिप्तची पर्यटन व्यवस्था खालावली होती.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹क्यूबाचे क्रांतिकारी नेते फिडेल कॅस्ट्रो यांचे निधन

क्यूबाचे क्रांतिकारी नेते आणि माजी राष्ट्रपती फिडेल कॅस्ट्रो ( वय 90 ) यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले . फिडेल कॅस्ट्रो यांचे भाऊ आणि सध्याचे क्यूबाचे अध्यक्ष राऊल कॅस्ट्रो यांनी त्यांच्या निधनाबद्दल माहिती दिली .

क्यूबाचे अध्यक्ष राऊल कॅस्ट्रो यांनी सरकारी वाहिनीवरून फिडेल कॅस्ट्रो यांच्या निधनाबद्दल बोलताना सांगितले , की क्यूबाचे क्रांतिकारी नेते फिडेल कॅस्ट्रो यांचे शुक्रवारी रात्री दहा वाजून 29 मिनिटांनी निधन झाले . फिडेल कॅस्ट्रो यांच्या निधनानंतर जगभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे .

फिडेल कॅस्ट्रो यांनी त्यांचा भाऊ राऊल कॅस्ट्रो यांच्या हाती 2008 मध्ये सत्ता देण्यापूर्वी सुमारे 50 वर्षे क्यूबावर एकहाती वर्चस्व राखले होते . एप्रिल महिन्यांत फिडेल यांनी कम्युनिस्ट पार्टी काँग्रेसमध्ये शेवटचे भाषण केले होते .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹जुन्या कायद्यानुसार डान्सबारना परवाने द्या

सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

डान्सबारबंदीसाठी महाराष्ट्र सरकार नव्या कठोर कायद्याच्या माध्यमातून अंकूश ठेवू पाहत असतानाच, डान्सबारना जुन्या कायद्यानुसार परवाने द्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी महाराष्ट्र सरकारला दिले. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात छमछम सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत.डान्सबारबंदीसाठी महाराष्ट्र सरकार नव्या कठोर कायद्याच्या माध्यमातून अंकूश ठेवू पाहत असतानाच, डान्सबारना जुन्या कायद्यानुसार परवाने द्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी महाराष्ट्र सरकारला दिले. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात छमछम सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत.

डान्सबारबंदीला आव्हान देण्यात आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने गेल्या एप्रिलमध्ये डान्सबारसाठी हॉटेल्स, रेस्टॉरट व बार रूममध्ये अश्लील नृत्याना प्रतिबंध आणि महिला प्रतिष्ठा संरक्षण कायदा, २०१६(महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ ऑबसेन्स डान्स इन हॉटेल्स, रेस्टॉरन्ट्स अँड बार रूम्स अँड प्रोटेक्शन ऑफ डिग्निटी ऑफ वूमन अॅक्ट, २०१६) हा नवा कायदा केला. यात बारबाला नाचत असलेल्या ठिकाणी ग्राहकांना मद्य देता येणार नाही. बारमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावणे बंधनकारक असेल, तसेच ६.३० ते ११.३० या वेळेतच व्यवसाय करता येईल आदी कठोर अटी टाकण्यात आल्या होत्या. या कायद्याला हॉटेल व्यावसायिकांच्या ‘आहार’ या संघटनेने न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, या खटल्यादरम्यान, ज्या तीन डान्सबारना जुन्या कायद्याप्रमाणे परवाना मिळाला आहे, त्यांना नव्या कायद्यातील अटी लागू नसतील असे, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टे केले होते. मात्र, नव्या कायद्याचा खटला न्यायालयात प्रलंबित असल्याने, या तीन बारप्रमाणे इतर बारमालकांनाही समानतेचा न्याय लागू होतो. त्यामुळे इतर बारमालकांनाही जुन्या कायद्याप्रमाणे परवाना देण्याबाबत महाराष्ट्र सरकारने विचार करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे न्या. दीपक मिश्रा आणि अमिताव रॉय यांच्या खंडपीठाने दिले.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹जगासाठी एक कोडं बनलेले फिडेल कॅस्ट्रो

जगातील सर्वोच्च साम्यवादी नेत्यांच्या प्रभावळीत स्थान निर्माण करणारे फिडेल कॅस्ट्रो हे सर्वांसाठीच अखेरपर्यंत एक कोडं बनून राहिले होते. कॅस्ट्रो यांच्या हयातीतच त्यांनी केलेल्या अनेक गोष्टी आजही लोकांना आश्चर्यानं तोंडात बोटं घालायला लावतात. काय आहेत या गोष्टी...

प्रदीर्घ काळ सत्ता

स्वत:च्या देशावर प्रदीर्घ काळ राज्य करणारे फिडेल कॅस्ट्रो हे जगातील तीन मोठ्या नेत्यांपैकी होते. क्युबाची सत्ता त्यांनी १९५९ साली हाती घेतली होती. २००८ साली स्वत:हून त्यांनी ही जबाबदारी त्यांचे बंधू राउल कॅस्ट्रो यांच्यावर सोपवली.

लांबलचक भाषणाचा विश्वविक्रम

कॅस्ट्रो यांच्या नावावर सर्वात मोठ्या भाषण केल्याचा विश्वविक्रम आहे. गिनीज बुकात तशी नोंद आहे. २९ सप्टेंबर १९६० रोजी कॅस्ट्रो यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत ४ तास २९ मिनिटांचं भाषण केलं होतं. तर, १९८६साली क्युबामध्ये ७ तास १० मिनिटांचं भाषण केलं होतं.

शेकडो कटातून वाचले!

कॅस्ट्रो यांची हत्या घडवून आणण्याचे ६३८ प्रयत्न झाले. अमेरिकी गुप्तचर संस्था व कॅस्ट्रोच्या विरोधकांचा यात हात होता. विषारी गोळ्या, विषारी सिगारेट, विषारी कपडे घालून त्यांना मारण्याचे कट रचले गेले. मात्र, या सगळ्यातून कॅस्ट्रो सुखरूप निसटले.

११ अमेरिकी अध्यक्षांशी संघर्ष

कॅस्ट्रो यांच्या नेतृत्वाखाली क्युबानं तब्बल ४५ वर्षे अमेरिकेनं लादलेल्या आर्थिक निर्बंधांचा सामना केला. आयसेनहोवर ते बिल क्लिंटनपर्यंत ११ राष्ट्राध्यक्षांशी त्यांचा संघर्ष झाला. बुश यांच्या कारकिर्दीत त्यांना सर्वाधिक विरोध सहन करावा लागला. पण ते बधले नाहीत.

दूध उत्पादनाचा विक्रम

फिडेल कॅस्ट्रो यांनी १९८०च्या दशकात दूध उत्पादनाचा एक प्रकल्प राबवला होता. त्या अंतर्गत पाळण्यात आलेल्या गायी एका दिवसात ११० लीटर दूध द्यायच्या. हा जागतिक विक्रमच होता.

अमेरिकेविरोधी क्षेपणास्त्र

शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत रशियाला क्युबाच्या भूमीवर अमेरिकेविरोधी क्षेपणास्त्र तैनात करण्याची परवानगी देऊन कॅस्ट्रो यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या या भूमिकेमुळं जगाला अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं होतं.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹जगातील सर्वात सुंदर पुरुषांमध्ये हृतिक तिसऱ्या स्थानावर

बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींमध्ये त्यांच्या चित्रपटाव्यतिरिक्त आणखी एका कारणावरुन चांगलीच स्पर्धा पाहायला मिळते. ही स्पर्धा उघडपणे नसली तरीही कलाकार त्यांच्या सौंदर्याच्या बाबतीत नेहमीच जागरुक असतात. त्यातही विविध मासिकं आणि संकेतस्थळांच्या माध्यमातून जाहिर होणाऱ्या विविध विषयांवर आधारित क्रमवारीमध्ये कलाकारांना त्यांच्या सौंदर्यावरुन, कमाईवरुन आणि त्यांच्या अभिनयाच्या स्तरावरुन विविध यांदीमध्ये स्थान दिले जाते. असेच काहीसे अभिनेता हृतिक रोशनसोबत घडले आहे. हॉलिवूड अभिनेता जॉन डेप आणि ब्रॅड पिट या कलाकारांना मागे टाकत हृतिक रोशनने बाजी मारली आहे. जगातिल सर्वात सुंदर पुरुषांमध्ये हृतिक तिसऱ्या स्थानावर आहे. एका वेगळ्याच लूकमुळे बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हृतिकचे नाव Worldstopmost.com. या संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेल्या एका यादीमध्ये हृतिकच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹पंतप्रधान पीक विम्यात महाराष्ट्र देशात अव्वल

६७ लाख शेतकऱ्यांना सुमारे सतरा हजार कोटी रुपयांचे विमा संरक्षण

राज्यातील शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिल्याने पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये देशभरामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक अव्वल आला. राज्यातील सुमारे ६७ लाख शेतकऱ्यांनी सुमारे सतरा हजार कोटी रुपयांचे विमा संरक्षण काढले आहे.

ही माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार अहमद पटेल यांच्यासह अनेकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कृषिराज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली. त्यानुसार, २०१६च्या खरीप हंगामासाठी देशातील ३ कोटी २६ लाख शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घेतला. त्यामध्ये एकटय़ा महाराष्ट्रातील ६६ लाख ७९ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. म्हणजे हे प्रमाण वीस टक्क्यांहून अधिक आहे. तसेच या ६६ लाख ७९ हजारांमध्ये कर्जाने वाकलेल्या २१ लाख शेतकऱ्यांचाही समावेश आहे. या सर्वाचा एकूण १६,९६४ कोटी रुपयांचा पीक विमा उतरविला आहे.
राज्यातील कृषी खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेत प्रामुख्याने मराठवाडा, खानदेश व विदर्भातील शेतकऱ्यांचा मोठा सहभाग आहे. आत्महत्याग्रस्त असलेल्या उस्मानाबाद, यवतमाळ, लातूर, बीडसारख्या जिल्ह्य़ांमध्ये सरासरी ९० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांना विमा संरक्षणाखाली आवर्जून आणले आहे. जलयुक्त शिवार मोहिमेपाठोपाठ या विमा योजनेसाठी राज्याने खास प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.

देशाचा विचार करता ३ कोटी २६ लाख शेतकऱ्यांचा ३८० लाख हेक्टर क्षेत्रासाठी १ लाख ३७ हजार ५३५ कोटींचा विमा उतरविला आहे. २०१५च्या खरिपामध्ये हेच प्रमाण ३ कोटी ९ लाख शेतकरी, ३३९ लाख हेक्टर क्षेत्र आणि विमा रक्कम ६९,३०७ कोटी रुपये होती. म्हणजे विम्याचे कवच मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या एका वर्षांमध्ये साडेपाच टक्क्यांनी, शेतीचे क्षेत्र बारा टक्क्यांनी आणि विम्याची रक्कम थेट शंभर टक्क्यांनी म्हणजे दुपटीने वाढली. महाराष्ट्रापाठोपाठ राजस्थान (५३ लाख शेतकरी व १२ हजार कोटींचे कवच), मध्य प्रदेश (३२ लाख शेतकरी आणि वीस हजार कोटींचे कवच), आंध्र प्रदेश (१५ लाख शेतकरी व साडेचौदा हजार कोटींचे कवच) आणि उत्तर प्रदेश (३० लाख शेतकरी व १४ हजार कोटींचे कवच) यांचा समावेश आहे.

पाच वर्षांत २२ हजार हेक्टर शेतीवर गंडांतर

२००८ ते २०१४ या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रातील २२ हजार हेक्टर शेतीवर औद्योगिकीकरणाने गंडांतर आणल्याची माहिती राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात मिळाली. २००८-०९मध्ये राज्यातील २ कोटी ११ लाख ४९ हजार हेक्टर क्षेत्र शेतीखाली होते. हे क्षेत्र २०१३-१४मध्ये २२ हजार हेक्टरने घटून २ कोटी ११ लाख २७ हजार हेक्टरवर आले. त्यामुळे एकूण भूभागाशी असलेले शेतीचे प्रमाण ६८.७३ टक्क्यांवरून ६८.६६ टक्क्यांवर घसरले. थोडक्यात ०.०७ टक्के शेतीचे रूपांतर बिगरकृषी जमिनीमध्ये झाले. याच कालावधीत संपूर्ण देशामध्ये मात्र ६ लाख ९ हजार हेक्टर शेतजमीन (१८ कोटी २४ लाख ५९ हजारांवरून १८ कोटी अठरा लाख ५० हजार हेक्टरवर) बिगरकृषी कारणांकडे वळविली गेली.

 औद्योगिकीकरणामध्ये महाराष्ट्राशी स्पर्धा करणाऱ्या गुजरातमध्ये मात्र या पाच वर्षांमध्ये शेतजमिनीवर गदा न आल्याचे आकडेवारीतून दिसते आहे. २००८ आणि २०१४ या दोन्ही वर्षांमध्ये एकूण भूभागाशी शेतीचे असलेले प्रमाण ५३.३० टक्के एवढे कायम राहिले. दुसरीकडे आसाम, पंजाब आणि झारखंड आदी राज्यांमध्ये शेतीचे क्षेत्र आश्चर्यकारकरीत्या वाढले.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹मध्यप्रदेशातील खडककला जगातील प्राचीन

मध्यप्रदेशातील मंडसौर जिह्यामधील भानपूर क्षेत्रातील एका टेकडीमधील खडकावर कोरलेली चित्रे जगातील सर्वात जुनी असून तज्ञांच्या मते ती 2 ते 5 लाख वर्षांपूर्वीची असावीत, असा अंदाज आहे. चालू नोव्हेंबरच्या 2 ते 23 पर्यंत झालेल्या यशस्वी मोहिमेने हे नवीन रहस्य जगापुढे आणले आहे. आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे सरसचिव प्रा. गिरिराज कुमार आणि ऑस्ट्रेलियन वैज्ञानिक रॉबर्ट बेडनरिक यांच्या संयुक्त सहकार्यातून सदर मोहीम यशस्वी करण्यात आली. बेनरिक हे खडककलेतील जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक असून ते ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रॉक आर्ट ऑर्गनायझेशन’ चे (आयएफआरएओ) समन्वयक आहेत. आग्य्रातील दयाळबाग एज्युकेशनल इन्स्टिटय़ूटमधील रॉक आर्ट सायन्सचे कुमार प्राध्यापक आहेत. त्यांनीच सदर खडकचित्रकलेचे वय 2 ते 5 लाख वर्षांचे असल्याबद्दलचा अंदाज व्यक्त केला.

दर की चट्टान गुहेतील खडकावर कलात्मक चित्र असल्याचा शोध 2002 च्या प्रारंभी लागल्याने त्यासंदर्भात संशोधन सुरू झाले. त्याजागी प्रहार केल्याने निर्माण झालेले दगडही 5 लाख वर्षांपूर्वीचे असावेत, असे कुमार यांनी सांगितले. खडक प्रकल्पाचा तपशील सांगताना ते म्हणाले की सदर प्रकल्पाच्या कामाने ही मोहीम रूंपली दर की चट्टान गुहेतील खडकांचे नमुने व तपशील जाणण्याचा यामागील हेतू होता. यासाठी भारतासह ऑस्टेलिया व युरोपमधील वैज्ञानिकांनी भाग घेतला आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹भारताला ‘सर्न’चे सहसदस्यत्व

’युरोपियन ऑर्गनायझेशन ऑफ न्यूक्लिअर रीसर्च’ किंवा सर्न या प्रतिष्ठित संघटनेचे सहसदस्यत्व भारताने मिळविले आहे. ही संस्था आण्विक आणि कण भौतिकशास्त्र या विषयांमध्ये मोठे संशोधन करते. संस्थेकडे जगातील सर्वात मोठी प्रयोगशाळा आहे. याच प्रयोगशाळेने 2012 मध्ये विश्वातील सर्वात सूक्ष्म ‘देवकणा’चे संशोधन केले होते. या संशोधनात भारतीय शास्त्रज्ञांचेही मोलाचे साहाय्य झाले होते. आता भारताला या संस्थेचे सहसदस्यत्व मिळाले आहे.

या सहसदस्यत्वाचे वार्षिक शुल्क सुमारे 78 कोटी रूपये आहे. तसेच सहसदस्यत्व मिळूनही संस्थेच्या नियमानुसार भारताला मतदानाचा अधिकार देण्यात आलेला नाही. तरीही हे सदस्यत्व आर्थिकदृष्टय़ा फायद्याचे आहे. कारण यामुळे भारतातील उद्योगांना जगातील इतर उद्योगांशी करार करण्यासाठी एक माध्यम उपलब्ध झाले आहे. याचा लाभ अत्युच्च तंत्रज्ञान, अण्विक उपकरणांचे डिझाईन, अशा उपकरणांची निर्मिती, सॉफ्टवेअर निर्माण करणे आणि खरेदी विक्री करण्यात होणार आहे. त्यामुळे हे सदस्यत्व किफायतशीर आहे, अशी माहिती अणुऊर्जा आयोगाचे सचिव अरूण श्रीवास्तव यांनी दिली.

सर्नचे स्थान जिनेव्हा येथे असून ते फ्रान्स आणि स्विट्झर्लंडच्या सीमारेषेवर आहे. 22 देश त्याचे सदस्य आहेत. तर चार देश सहसदस्य आहेत. सहसदस्यत्वाचे शुल्क सदस्य देशांच्या 10 टक्के आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹रणजित सावरकर यांच्या पुढाकाराने घसई होणार नोटबंदी नंतरचे भारतातील पहिले रोखमुक्त गाव

नोटाबंदीनंतर निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती दूर करण्याच्या दृष्टीने रोखमुक्त व्यवहाराच्या दिशेने केंद्र सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी ठाणे जिल्ह्यातील मुरबाडच्या आदिवासी विभागातील धसई गावातील व्यवहार रोखमुक्त करण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. अशाप्रकारे नोटबंदी नंतर रोखमुक्त होणारे घसई हे भारतातील पहिलेच गाव ठरणार आहे.

हे गाव १ डिसेंबर २०१६ पासून संपूर्णतः रोख मुक्त होत आहे. गावाची लोकसंख्या १०००० असून इथे जवळ पास १०० व्यावसायिक आहेत. आसपासची साधारण २५ खेडी व्यवहारांसाठी धसई वर अवलंबून आहेत. रोख मुक्तीचा लाभ धसाई आणि आजूबाजूच्या परिसरातील सुमारे पन्नास हजार लोकांना होणार असून, बँकेतून रोकड काढण्याच्या त्रासातून मुक्तता होईल. १०० पैकी सुमारे ३४ व्यापाऱ्यांचे कार्ड स्वाईप मशीन ३० नोव्हेंबर पर्यंत कार्व्यान्वित होत आहेत. अन्य व्यापारी ह्या मशीन्स घेण्याकरिता आवश्यक ती कारवाई पूर्ण करीत आहेत.

येथील प्रत्येक कुटुंबाकडे जन-धन खाते असून डेबिट कार्ड हि आहे. त्यामुळे १ डिसेंबर पासून ह्या भागातील लोक आपल्या सर्व गरजा करिता हे कार्ड वापरू शकतील अगदी वडापाव पाव पासून भाजी पाला , धान्य, औषधे, खते आणि इतर सर्व गरजांसाठी डेबिटकार्ड वापरता येईल. हे कार्ड केशकर्तनालये, दवाखाने, मोटार गॅरेजेस पासून अगदी शेती कामासाठी ट्रॅक्टर भाड्याने घेण्यासाठी डेबिट कार्ड वापरता येईल. थोडक्यात, सांगायचे तर डेबिट कार्ड असलेया कोणालाही धसई गावात रोख रक्कम वापरण्याची गरज नाही.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹Hong Kong Open : पी. व्ही. सिंधूला हाँगकाँग ओपन सुपर सीरिजचे उपविजेतेपद

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधू हिला हाँगकाँग सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. चीन तैपईच्या तेई तिझूयिंग हिने सलग दुसऱयांदा हाँगकाँग सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे.

 चायना ओपनमधील आपला झंझावात कायम राखताना पी.व्ही.सिंधूने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण अंतिम लढतीत तिझूयिंग हिने आपल्या अनुभवाच्या जोरावर सामन्यावर पकड निर्माण करून विजेतेपदावर नाव कोरले.

सिंधूला १५-२१, १७-२१ अशा पराभवाला सामोरे जावे लागले. सिंधू अंतिम लढतीत चांगली सुरूवात केली होती. पण जोरदार स्मॅश आणि नजाकती खेळीच्या बळावर तिझूयिंग हिने आघाडी घेत पहिला गेम १५-२१ असा जिंकला. दुसऱया गेममध्ये दोघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. सामना अगदी १२-१२ असा बरोबरीपर्यंत पोहोचला होता. दुसऱया गेममध्ये तिझूयिंग हिने पुन्हा एकदा निर्णायक आघाडी घेऊन लागोपाठ गुणांची कमाई करून सिंधूवर भक्कम आघाडी घेतली. यानंतर सिंधू दबावाखाली खेळताना पाहायला मिळाली. सिंधूला दुसऱया गेममध्ये १७ व्या गुणापर्यंत पोहोचता आले खरे पण मॅच पॉईंटवर पोहोचलेल्या तिझूयिंग हिने अखेरीस सामना जिंकला.

तिझूयिंग हिचे हाँगकाँग ओपनचे दुसरे विजेतेपद असून तिने जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित आणि रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती कॅरोलिना मारिन हिला पराभवाचा धक्का देऊन अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर सिंधूने उपांत्य फेरीत हाँगकाँगच्या चेऊंग नगान हीचा २१-१४, २१-१६ असा पराभव केला होता. चायना ओपनमध्ये बाजी मारून कारकिर्दीतले पहिले सुपर सीरिज जेतेपद नावावर करणाऱ्या पी. व्ही. सिंधूने बीडब्लूएफच्या जागतिक क्रमवारीत अव्वल दहा खेळाडूंमध्ये स्थान पटकावले आहे.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹एकच ध्यास-Mpsc-Upsc:
RBI ने बँकिंग प्रणाली मध्ये अधिक लिक्विडीटी व्यवस्थापित करण्यासाठी वाढीव CRR सादर केले

बँकिंग प्रणाली मध्ये येणार्‍या वाढीव लिक्विडीटी ला अवरोधीत करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने 100% ने वाढीव रोख राखीव प्रमाण (Cash Reserve Ratio -CRR) सादर केले आहे. हा निर्णय 26 नोव्हेंबर 2016 पासून प्रभावी आहे.
वाढीव CRR हा प्रणाली मध्ये डिमोनेटायझेशन नंतर येणार्‍या वाढीव लिक्विडीटी ला आटोक्यात आणण्यासाठी RBI च्या लिक्विडीटी व्यवस्थापन चौकटीत बसणारा एक तात्पुरता उपाय आहे. मात्र, नियमित CRR हे 4% ने पुढे चालू राहील.

CRR म्हणजे ग्राहकांच्या एकुण ठेवीच्या एक ठराविक किमान भाग होय, जो व्यापारी बँकांना RBI मध्ये एकतर रोख किंवा ठेवी स्वरुपात साठा म्हणून ठेवावा लागतो.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹३१ डिसेंबरपासून गोवा देशातील पहिले कॅशलेस राज्य

भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला वेसन घालण्यासाठी कॅशलेस व्यवहाराकडे वळण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच आवाहन केले होते. या आवाहनाला गोवा राज्याने सर्वात प्रथम प्रतिसाद दिला आहे. येत्या ३१ डिसेंबरपासून गोवा कॅशलेस होणार असून देशातील ते पहिले कॅशलेस राज्य ठरणार आहे. त्यामुळे गोवेकरांना मोबाइलच्या एका क्लिकवर भाजीपाल्यापासून ते मांस-मच्छीपर्यंतच्या कोणत्याही अवश्यक वस्तू मिळणार आहेत.

गोव्याला कॅशलेस राज्य बनविण्याच्या योजनेवर सध्या काम सुरु आहे. त्यामुळे सध्यातरी पैशाचे व्यवहार सुरु ठेवण्यात येणार आहे. कॅशलेस योजना लागू झाल्यावर खरेदी केल्यानंतर लगेच लगेच ग्राहकांच्या अकाऊंटमधून पैसे कट होतील, असे मुख्यसचिव आर.के.श्रीवास्तव यांनी सांगितले.

उद्यापासून जनजागृती !

लोकांनी कॅशलेस व्यवहाराकडे वळावे म्हणून उद्या सोमवारपासून विक्रेते, छोटे दुकानदार आणि ग्राहकांमध्ये जागृती करण्यात येणार आहे. त्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे.तसेच बॅंकेत रजिस्ट्रेशन करणाऱ्या प्रत्येक विक्रेत्यांना एमआय नंबर दिला जाणार असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी याबाबत गोव्याच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चाही केली . तसेच कॅशलेस समाज निर्माण करण्याचे मोदी यांचे स्वप्न आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करणारे गोवा हे पहिले राज्य असेल, असे पर्रिकर यांनी गोव्यात एका रॅलीला संबोधताना सांगितले.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचे निधन

ज्येष्ठ लेखक आणि साहित्यिक आनंद यादव यांचं निधन झालं आहे. वयाच्या 81व्या वर्षी आनंद यादव यांनी अखेरचा श्वास घेतला. काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्य प्रकारांत विपुल लेखन केले. 30 नोव्हेंबर 1935 रोजी त्यांचा कोल्हापुरात जन्म झाला. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर आणि पुणे येथून शिक्षण पूर्ण केले. आकाशवाणीवर त्यांनी नोकरी केली.

पुणे विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाल्यावर तेथेच मराठी विभाग प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. ग्रामीण साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन आदी संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. त्यांच्या झोंबी या आत्मचरित्रासाठी १९९० मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. घरभिंती, नांगरणी, काचवेल कादंब-याही प्रसिद्धीच्या झोतात आल्या.

आनंद यादव यांनी संत तुकारामाच्या जीवनावर लिहिलेल्या संतसूर्य तुकाराम या काल्पनिक कादंबरीवर आक्षेप घेत वारकऱ्यांनी हल्लाबोळ करून त्यांना २००९ सालच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्यापासून वंचित केले होते.

 कादंबरीतून तथाकथित आक्षेपार्ह मजकूर काढून टाकल्यानंतर देखील वारकऱ्यांचे समाधान झाले नाही. अखेर कादंबरी बाजारातून मागे घ्यावी लागली होती. लेखनातूनही निवृत्ती घेण्याचा इरादा त्यांनी २९ एप्रिल २०१३ रोजी बोलून दाखविला होता. आनंद यादव यांनी सुमारे ४०हून अधिक पुस्तके लिहिली आहेत.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹जागतिक मुष्टियोद्धा महासंघाकडून मेरी कोम सन्मानित

आंतरराष्ट्रीय मुष्टियोद्धा महासंघाकडून (एआयबीए) भारताची स्टार म†िहला मुष्टियोद्धा मेरी कोमला लिजेंडरी ऍवॉर्डने सन्मानित केले जाणार आहे. पाचवेळा विश्वचॅम्पियनचा किताब पटकावणाऱया एम. सी. मेरी कोमला हा पुरस्कार स्वित्झर्लंडच्या लुसाने शहरात 20 डिसेंबरला एका समारंभामध्ये सन्मानपूर्वक दिला जाणार आहे. जागतिक मुष्टियोद्धा महासंघाने या घोषणेला पुष्टी देत प खसिद्धी शनिवारी पत्रक जाहीर केले आहे. मेरी कोमला या पुरस्काराविषयी विचारले असता ती म्हणाली, हा पुरस्कार मला भावनाप्रधान व प्रेरणादायी आहे. माझा सन्मान देशातील अन्य मुष्टियोद्धयांना प्रोत्साहन देणारा ठरेल. हा माझ्या एकटीचा सन्मान नसून, संपूर्ण देशाचा सन्मान आहे, असेही मेरी कोमने शेवटी सांगितले.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹‘जीएसटी’ तुटीची तिमाही भरपाई

प्रस्तावित वस्तू आाणि सेवाकर (जीएसटी) लागू झाल्यावर राज्यांच्या महसूलात जी तूट येईल त्याची केंद्राकडून दर तिमाहीला हंगामी स्वरूपात भरपाई करण्यात येईल. वर्षअखेरीस भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षकांकडून (कॅग) आॅडिट झाल्यावर त्या वर्षाच्या भरपाईचा पक्का हिशेब करण्यात येईल.

‘जीएसटी’ भरपाईसंबंधी करायच्या कायद्याचा मसुदा केंद्र सरकारने शनिवारी प्रसिद्ध केला. यावर केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली २ व ३ डिसेंबर रोजी होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत विचार केला जाईल. तेथे जो मसुदा मंजूर होईल त्यानुसार कायद्याचे विधेयक संसदेत मांडले जाईल.

कौन्सिलच्या आधीच्या बैठकींमध्ये जीएसटीच्या ५,१२, १८ आणि २८ टक्के अशा चौस्तरीय कर आकारणी रचनेस मंजुरी देण्यात आली होती. तसेच चैनीच्या वस्तू आणि तंबाखूसारख्या वस्तूवर अधिभार लावून भरपाईसाठी ५० हजार रुपयांचा विशेष निधी स्थापन करण्याचेही ठरले आहे. येणाऱ्या तुटीची केंद्र सरकार राज्यांना पुढील पाच वर्षे भरपाई देणार आहे.

शनिवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रस्तावित कायद्याच्या मसुद्यात प्रामुख्याने भरपाईचा हिशेब आणि वाटप कसे होईल याची तरतूद आहे. त्यानुसार अधिभारातून जमा होणारी रक्कम ‘जीएसटी भरपाई निधीत’ जमा केली जाईल. या निधीतून दर तिमाहीला राज्यांना हंगामी हिशेब करून भरपाई दिली जाईल. वर्षाचा अंतिम हिशेब ‘कॅग’च्या आॅडिटनंतर केला जाईल.

पाच वर्षांच्या अखेरीस भरपाई निधीत भरपाई देऊन जी अधिकची रक्कम शिल्लक राहील त्यापैकी ५० टक्के रक्कम भारत सरकारच्या संचित निधीत जमा केली जाईल व त्याचे केंद्र व राज्यांमध्ये कायद्यात नमूद केलेल्या ठराविक प्रमाणात वाटप होईल. बाकीच्या शिल्लक ५० टक्के रकमेचे वाटप पाच वर्षांच्या संक्रमण काळात जमा झालेल्या जीएसटीमध्ये त्या त्या राज्याचा जितका वाटा असेल त्या प्रमाणात त्या राज्यास दिली जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)

- या प्रस्तावित कायद्यांचे मसुदे याआधी सरकारने जूनमध्ये प्रसिद्ध केले होते. आताच्या मसुद्यात अधिभार आकारणीवरून केंद्र व राज्यांमधील मतभेद विचारात घेण्यात आलेले नाहीत.

- १ एप्रिलपासून जीएसटी लागू करण्यावर केंद्र ठाम आहे. ही विधेयके 'मनी बिल’ म्हणून मांडण्यात येणार असल्याने सरकारचे बहुमत नसलेल्या राज्यसभेत ती अडकण्याची शक्यता नाही. तरीही राज्यांचा पाठिंबा मिळाला तरच सुरळित अंमलबजावणी होईल. नोटाबंदीमुळे विरोधकांची झालेली एकजूट पाहता विरोधी सरकारे असलेल्या राज्यांची भूमिका महत्त्वाची ठरेल.

तूट ठरविण्याचे सूत्र
जीएसटी लागू झाल्यावर राज्यांना त्यातील मिळणारा वाटा व आधीच्या राज्यस्तरीय कररचनेतून मिळणारे उत्त्पन्न यात जो फरक असेल ती तूट मानली जाईल. हा हिशेब करताना

2015-16

हे आधारवर्ष मानले जाईल व त्यात दरवर्षी १४ टक्क्यांनी वाढ गृहित धरली जाईल.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹तांदूळ वाण 'IR-8' व हरितक्रांती ला 50 वर्षे पूर्ण झाली

आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था (IRRI) ने 29 नोव्हेंबर 1966 रोजी IR-8 च्या नावाने तांदळाची एक जात शोधून काढली होती. या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपारिक बियाणे हे प्रति हेक्टर फक्त दोन टन भाताचे उत्पन्न देते, तर IR-8 हे प्रति हेक्टर सात टन भाताचे उत्पन्न देते. आज या घटनेला 50 वर्षे पूर्ण झालेली आहेत.

या तांदळाची लागवड प्रथम 1966 साली फिलीपिन्स मध्ये  करण्यात आली होती. IRRI ही मुळची फिलीपिन्स मधील कृषि संशोधन संस्था आहे. फोर्ड फाउंडेशन, रॉकफेलर फाउंडेशन हे संस्थापक आहेत. तर मुख्यालय लॉस बॅनोस, लागुना, फिलीपिन्स मध्ये आहे.


IR-8 ची पार्श्वभूमी

भारतासह बहुतेक आशियायी देशांमध्ये दुष्काळ चालु असताना, तांदळाची उच्च उत्पादन क्षमतेची वाण विकसित करण्यासाठी सन 1960 मध्ये संशोधनाला सुरुवात करण्यात आली. पीटर जेनिंग्स, आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचे प्रथम तांदूळ प्रजनक (rice breeder) (1961-67) यांनी यामध्ये नेतृत्वपूर्ण कामगिरी केली. संशोधकांनी चीन, तैवान आणि इंडोनेशिया पासून मिळालेल्या तांदूळ वाणांचे 38 अलग-अलग संकरीत वाण तयार केले.

अनेक वर्षांच्या संशोधनानंतर, हेन्री एम. बिचेल, जेनिंग्स यांचे सहकारी, यांनी तांदळाच्या डी-जिओ-वू-गेन आणि पेटा या वाणांचे संकरीत स्वरूप म्हणून IR8-288-3 या नव्या वाणाचा विकास केला आणि फिलीपिन्स मध्ये त्याचे परीक्षण केले. आश्चर्यकारक बाब म्हणजे त्यावेळी 88 किलो शुद्ध बियाणांच्या पेरणीपासून 71 टन भाताचे उत्पादन झाले होते. त्यानंतर, 29 नोव्हेंबर 1966 रोजी IRRI ने या नव्या जातीला अधिकृतपणे IR-8 हे नाव दिले आणि जाहीर केले.


हरित क्रांती आणि भारत

फिलीपिन्स मध्ये मिळालेल्या परिणामानंतर, भारत हा मोठया प्रमाणात भात खाणारा देश असल्यामुळे, दुष्काळाच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी, सन 1967 मध्ये, एन. सुब्बा राव यांनी आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्हा अटचंता मध्ये 2,000 हेक्टर क्षेत्रात IR-8 ची पेरणी केली. हा क्षण म्हणजे भारतामध्ये भात लागवडीमधील क्रांतीचा भाग झाला.

कमी वाढ कालावधी व उच्च उत्पन्न तसेच नायट्रोजन खताला प्रतिसाद देणारे वाण असल्यामुळे IR-8 हे शेतकर्‍यांमध्ये अधिक लोकप्रिय झाले. कीटक प्रतिरोधक हे आणखी एक कारण होते. शिवाय, आकाराने खूपच लहान असल्याने, IR8 हे वाराधून परिस्थितीत उभे राहू शकत होते. IR-8 हे फक्त 105 दिवसांत कापणीसाठी तयार होते.

त्यानंतर, भारतीय शास्त्रज्ञांनी IR-20, IR-36, आणि IR-50 असे अनेक वाण विकसित केले आहे.

भारत आणि फिलीपिन्स मधील,  यशानंतर डॉ. जेनिंग्स यांनी युद्धाने ग्रासलेल्या व्हिएतनाम मध्ये याची लागवड करण्यात आली. व्हिएतनाम मध्ये याला कौतुकाने "होंडा राइस" असे म्हणतात, कारण याच्या उच्च उत्पादन क्षमतेमुळे शेतकऱ्यांना पैसे कमावता आले. ज्यामधून त्यांनी होंडा मोटारसायकल घेण्यास सुरू केले होते.


हवामानातील बदलाचा उत्पन्नावर परिणाम

2010 साली, फील्ड क्रॉप्स रिसर्च जर्नल कडून प्रकाशित अभ्यासामधून हे दिसून आले आहे की, हवामान बदलामुळे, IR-8 च्या उत्पादन क्षमतेत 15 टक्क्यांनी घट झाली आहे. गरम रात्री, वारंवार येणारे पुर आणि प्रदूषण हे यासाठी जबाबदार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Join us @MPSCGeography

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹राज्यात 30 हजार केंद्रांत डिजिटल बॅंकेची सोय

मुंबई : रब्बी हंगामासाठी बियाणे, खते, कीटकनाशके, खरेदी करता येणे शक्‍य व्हावे, यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या बॅंक खात्यातून अधिकृत विक्रेत्यांना ऑनलाइन रक्कम देण्याची सोय उपलब्ध करण्यात आली असून, कृषि विभागामार्फत अधिकृत विक्रेते व वितरकांची यादी इंडियन बॅंकर्स असोसिएशन तसेच स्टेट बॅंक ऑफ इंडिया यांना देण्यात आली आहे. त्यामुळे धनादेशची सुविधा नसलेल्या बॅंक खात्यावरूनही डेबिट स्लीपच्या माध्यमातून शेतकरी विक्रेत्यांच्या खात्यावर पैसे जमा करू शकतील, असे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी सोमवारी येथे सांगितले.


संघटित तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांचे बॅंक खाते उघडण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचा आदेश देऊन 'आपले सरकार'च्या 30 हजार केंद्राच्या माध्यमातून डिजिटल पेमेंटची सुविधा तातडीने कार्यान्वित करावी. या केंद्रांसाठी पी.ओ.एस. यंत्र बॅंकांमार्फत सरकारकडे उपलब्ध करून दिले जाणार आहे, असे मुख्य सचिवांनी सांगितले. मंत्रालयात मुख्य सचिवांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधून आढावा घेतला.


मुख्य सचिव या वेळी म्हणाले की, राज्यातील 30 हजार आपले सरकार केंद्र डिजिटल बॅंक म्हणून कार्यान्वित करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करुन येत्या दोन दिवसात जिल्हास्तरीय बॅंक समितीची बैठक घ्यावी. इंडियन बॅंक असोसिएशनने दिलेल्या निर्देशानुसार आपले सरकार केंद्रांना पी.ओ.एस. यंत्र देण्यासाठी विशेष लक्ष द्यावे. 1 डिसेंबरपासून या यंत्राद्वारे डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या वापरास सुरवात होईल. त्याचबरोबर नव्याने 10 हजार केंद्रांवरून डिजिटल बॅंकिंगला सुरवात होईल.

बाजार समित्या होणार 'ई-मंडी'

केंद्र सरकारच्या कार्यक्रमानुसार राज्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे रूपांतर 'ई-मंडी'मध्ये करायचे असून, सध्या राहाता, हिंगणघाट, आकोट येथे ही मंडी सुरू असल्याचे मुख्य सचिवांनी सांगितले. राज्यात आधार क्रमांक नोंदणीचे 93 टक्के काम पूर्ण झाले असून, 31 मार्च 2017 पर्यंत हे काम पूर्ण करायचे असल्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी सांगितले. अद्याप पाच वर्षांपर्यंत आणि 5 ते 18 वर्षे वयोगटातील 99 लाख जणांचे आधार क्रमांक नोंदणी होणे बाकी आहे. आधार क्रमांक नोंदणी प्रक्रियेला गती देण्याचे आवाहन त्यांनी केले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹तृतीयपंथीयांसाठी रेल्वे आरक्षण अर्जात स्वतंत्र रकाना

नवी दिल्ली - रेल्वेने आरक्षण आणि ते रद्दच्या अर्जामध्ये आता तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र रकाना सुरू केला आहे , अशी माहिती रेल्वे मंत्रालयातर्फे प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे . याबाबत दिल्लीतील जमशेद अन्सारी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती .

 आरक्षण आणि ते रद्दच्या अर्जात तृतीयपंथीयांसाठी या प्रकारचा रकाना रेल्वेने समाविष्ट न केल्याचे राज्यघटनेतील अधिकारांचा भंग केल्याचे त्यात म्हटले होते . या तृतीयपंथीयांसाठी रेल्वेत स्वतंत्र कोच आणि जागा असाव्यात , अशी मागणीही त्यांनी केली होती . या संदर्भात याचिकाकर्त्याला दिल्ली उच्च न्यायालयाने रेल्वे मंत्रालयाकडे जाण्यास सांगितले होते . दरम्यान , सर्वोच्च न्यायालयाच्या 2014 च्या आदेशानुसार रेल्वेने त्यांच्या अर्जामध्ये तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र रकान्याचा समावेश केला आहे . या रकान्याच्या माध्यमातून त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यात येत आहे .
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹वन हक्क कायद्याबाबत सात राज्ये उदासीन

केंद्र सरकारने सात राज्यांत वन हक्क कायद्याचे प्रभावीपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. हा कायदा अनेक पिढ्यांपासून जंगलात राहणाऱ्या आदिवासींच्या अधिकाराशी संबंधित आहे . संबंधित राज्यांत वन हक्क कायद्याचे प्रभावीपणे पालन केले जात नसल्याचे निदर्शनास आल्याने केंद्राने आदेश दिला आहे .

पंतप्रधान कार्यालयाने अनुसूचित जाती आणि जमाती, तसेच जंगलांत राहणाऱ्या पारंपरिक जातींच्या रहिवाशांसाठी वन हक्क कायदा लागू करण्याचे निर्देश दिले होते . मात्र आसाम , बिहार , हिमाचल प्रदेश , तमिळनाडू , उत्तर प्रदेश , उत्तराखंड आणि झारखंड येथे वन हक्क कायदा प्रभावीपणे लागू करण्यास अपयशी ठरल्याचे निदर्शनास आले आहे . त्यामुळे या संबंधी मासिक अहवाल पंतप्रधान कार्यालयाला पाठविण्यात आला असून , त्याबाबत माहिती घेतली जात असल्याचे मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले .
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भगतसिंग यांचे पिस्तूल पंजाबमध्ये आणणार

चंडिगड - इंदोरमधील बीएसएफच्या सेंट्रल स्कूल ऑफ वेपन्स अँड टॅक्टिक्स संग्रहालयात सापडलेले भगतसिंग यांचे पिस्तूल आता पंजाबमधील खतकर कलन येथील शहीद -ए -आझम भगतसिंग संग्रहालयात आणण्यात येणार आहे . त्यांचे भाचे अभयसिंग सांधू यांनी याबाबतची मागणी केली होती .

1969 पर्यंत हे पिस्तूल फिलापूर येथील पंजाब पोलिस ऍकॅडमीत होते . त्यानंतर त्याचा पत्ता लागला नव्हता, अनेक लोकांनी शोध घेऊन पिस्तुलाची बनावट आणि सीरियल नंबरच्या आधारे इंदोरमधील संग्रहालयातील पिस्तूल हेच भगतसिंग यांचे असल्याचे सिद्ध केले . यानंतर भगतसिंग यांच्या कुटुंबीयांच्या मागणीनुसार ते आता पंजाबमध्ये आणण्यात येणार आहे .
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ऐतिहासिक दिन: 'हाजीअली'त महिलांनी केला प्रवेश

मुंबईतील प्रसिद्ध हाजीअली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळवण्याबाबतच्या आंदोलनासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. आपला हक्क बजावण्यासाठी देशभरातून आलेल्या ८० महिलांनी आज पहिल्यांदाच हाजीअली दर्ग्यातील मजारीपर्यंत प्रवेश केला. दीर्घकालीन कायदेशीर लढाई केल्यानंतर महिलांनी शेवटी हा ऐतिहासिक क्षण अनुभवला.

दोन वर्षांपूर्वी दर्ग्यातील मुख्य भागातील महिलांच्या प्रवेश करण्यावर लावण्यात आलेल्या प्रतिबंधाला भारतीय मुस्लिम महिला आंदोलानानं (BMMA) आव्हान दिलं होतं.

याच वर्षी ऑगस्ट महिन्यात मुंबई हायकोर्टानं हा प्रतिबंध हटवण्याचा आदेश दिला. महिलांना प्रवेशबंदी करणं म्हणजे राज्यघटनेच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन ठरतं, असं मत मुंबई हायकोर्टानं नोंदवलं होतं. त्यानंतर हायकोर्टाच्या या निर्णयाला दर्गा ट्रस्टनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं.

२४ ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला. शेवटी, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी दर्गा ट्रस्टनं सुप्रीम कोर्टाकडे ४ आठवड्यांची सवलत मागितली होती.

सप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर २९ नोव्हेंबर या दिवशी महिला मजारीपर्यंत प्रवेश करतील अशी घोषणा भारतीय मुस्लिम आंदोलनानं केली होती. नियोजित कार्यक्रमानुसार महिलांनी आज हाजीअली दर्ग्यातील मजारीवर चादर चढवून फुलं वाहिली आणि शांतीसाठी दुआ मागितली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पाकमधील जनगणना पुढे ढकलली

इस्लामाबाद - भारत -पाकिस्तानमधील तणावग्रस्त वातावरणामुळे सैन्यदलांची मदत मिळत नसल्याने पाकिस्तानमध्ये जनगणना अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली आहे . तब्बल 17 वर्षांनंतर ही जनगणना होणार होती .

 पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दर यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला . या वेळी प्रलंबित असलेली ही सहावी जनगणना आता कधी होणार , याबाबतही निश्चित माहिती अधिकाऱ्यांनी सांगितली नाही . सरकारने जनगणनेसाठी सर्व तयारीही पूर्ण केली होती . मात्र, जनगणना सुरळीत पार पडण्यासाठी सरकारला वीस ते तीस हजार सैनिकांची आवश्यकता आहे आणि सीमेवरील तणाव वाढल्याने सैनिक उपलब्ध होऊ शकत नाहीत . त्यामुळेच हा निर्णय घ्यावा लागल्याचे येथील माध्यमांनी म्हटले आहे . पाकिस्तानमध्ये 1951 , 1961 , 1972 , 1981 आणि 1998 मध्ये जनगणना झाली आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹नामदार गोखले रस्ता होणार ‘कॅशलेस’

शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि कॉलेजवयीन युवक-युवतींचा सर्वाधिक वावर असणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले रस्त्याला (फर्ग्युसन कॉलेज रोड) देशातील पहिला ‘कॅशलेस रोड’ म्हणून ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने आरंभला आहे. त्यादृष्टीने एक डिसेंबरपर्यंत ऑनलाइन, डेबिट/क्रेडिट कार्ड आणि ई-वॉलेटच्या माध्यमातून व्यवहार व्हावेत, यासाठी सर्वेक्षणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

शहर भाजपच्या वतीने ‘कॅशलेस पुणे’ मोहिमेचा शुभारंभ शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहिमेंतर्गत ‘कॅशलेस’ व्यवहार करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार असून, येत्या आठ दिवसांत दोन लाख माहिती पुस्तिकांचे वाटप केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील तरुण पिढीचा सर्वाधिक वेळ गोखले रस्त्यावर जातो. त्यामुळे हा रस्ता ‘कॅशलेस व्यवहारां’साठी आदर्श ठरू शकतो, असे लक्षात आल्याने पक्षातर्फे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. विविध व्यापाऱ्यांना ऑनलाइन पेमेंट, डेबिट/क्रेडिट कार्ड आणि ई-वॉलेटची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती गोगावले यांनी दिली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ब्राझीलच्या स्थानिक फुटबॉल संघासह प्रवास करणाऱ्या विमानाला अपघात

बोलिवियाहून मेडेलिन आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या विमानाला अपघात झाला आहे. या चार्टर विमानातून ब्राझीलमधील स्थानिक फुटबॉल संघ प्रवास करत होता. ७२ प्रवाशांना घेऊन प्रवास करत असलेले हे विमान कोलंबियात कोसळले आहे.

या विमानाने बोलिवियाहून उड्डाण केल्याची माहिती विमानतळ व्यवस्थापनाने ट्विटरवर दिली होती. या चार्टर विमानातून चॅपकोयन्स हा ब्राझीलमधील स्थानिक फुटबॉल संघ प्रवास करत होता. कोपा सुदामिरेका स्पर्धेची अंतिम फेरी खेळण्यासाठी चॅपकोयन्सचा संघ मेडेलिनला जात होता. बुधवारी होणाऱ्या अंतिम फेरीत चॅपकोयन्सची गाठ ऍटलेटिको नॅशनल संघाशी पडणार होती. ‘या अपघातातून काहीजण बचावतील,’ अशी आशा मेडेलिनचे महापौर फेडेरिको गुटियेरेझ यांनी व्यक्त केली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹लोकसभेत आयकर कायदा सुधारणा विधेयक मंजूर

लोकसभेमध्ये मंगळवारी विरोधकांच्या गोंधळात आयकर कायदा सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. भाजपाने आपल्या सर्व खासदारांना व्हिप जारी करून या विधेयकासाठी सभागृहात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. हे विधेयक संमत झाल्यानंतर लोकसभा बुधवारपर्यंत स्थगित करण्यात आली.

या विधेयकाबाबत बोलताना केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली म्हणाले, 'सरकारने काळ्या पैश्यांविरोधात सातत्याने कठोर पावलं उचलली आहेत, जवळपास 70 हजार कोटी काळंधन बाहेर आलं आहे'. लोकसभा स्पीकर सुमित्रा महाजन यांनी गोंधळ सुरू असताना चर्चा होऊ शकत नाही, विरोधकांना चर्चा नको आहे असं म्हणत कामकाज तहकूब केलं.

यापुर्वी संसदेच्या दोन्ही सभागृहात नोटबंदीच्या मुद्द्यावरही गोंधळ झाला, त्यामुळे लोकसभा 2 वेळेस स्थगित करण्यात आली. राज्यसभेत खासदारांनी नरेंद्र मोदी सदन मे आओ अशी नारेबाजी केल्यानंतर सभागृह स्थगित करण्यात आलं.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ट्रम्प, ओबामांना पछाडत अमेरिकेत मोदी ठरले अव्वल

अमेरिकेतील प्रसिद्ध टाईम मॅग्झिनद्वारे दरवर्षी देण्यात येणाऱ्या पर्सन ऑफ दी इयर पुरस्कारासाठी घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन सर्वेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मागे टाकून अव्वल स्थान गाठले आहे. या यादीत मोदींनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी चीनपिंग यांनाही पछाडीवर टाकले आहे.

 अमिरिकेतील नागरीकांनी मोदीं यांना भरघोस मत दिली आहेत. सध्या मोदी आघाडीवर असल्याचे चित्र आहे. या यादीच्या निश्चितीवर टाईम्सच्या संपादक मंडळाचा अंतिम निर्णय असला, तरी टाईम पर्सन ऑफ द ईअरच्या ठरवण्यासाठी वाचकांकडूनही ऑनलाईन मते मागवली जातात. यामधे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाजी मारत, सर्वाधिक मते मिळवली आहेत.

प्रत्येक वर्षी जगाला प्रभावित करणाऱ्या अथवा माध्यमांमध्ये प्रभाव निर्माण करणाऱ्या व्यक्तीला टाइमतर्फे ह्यपर्सन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

गेल्या वर्षी जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. या पुरस्काराच्या शर्यतीत असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आतापर्यंत एकूण मतदानापैकी २१ टक्के मते घेऊन आघाडीवर आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानी विकिलिक्सचे वादग्रस्त संस्थापक ज्युलियन असांजे आहेत. त्यांना ८ टक्के मते मिळाली आहेत.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना सात टक्के मते मिळाली आहेत. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन अद्यापही बराक ओबामा यांच्या मागे आहेत. त्यांना प्रत्येकी ६ टक्के मते मिळाली आहेत. चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांना केवळ एक टक्का मते मिळाली आहेत. या मतदानात ३० व्यक्ती या पुरस्कारासाठी दावेदार आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मोहालीत भारताचा ८ गडी राखून विजय

मोहालीत झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर ८ गडी राखून आज दणदणीत विजय मिळवला. चौथ्या दिवशीच सामना जिंकून भारताने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.

सामन्याच्या आजच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात हसीब हमीद वगळता इंग्लंडचे खेळाडू फारसे खेळपट्टीवर टिकू शकले नाही. आर. अश्वीनने तीन तर रवींद्र जडेजा, जयंत यादव आणि मोहमद शामी यांनी इंग्लंडचे प्रत्येकी दोन-दोन गडी बाद केली. यामुळे इंग्लंडचा दुसरा डाव २३६ धावांवरच गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. इंग्लंडने १०३ धावांची आघाडी घेतली होती.

भारताने २० ओव्हरमध्येच दोन गडी गमवत १०४ पूर्ण केल्या. दुसऱ्या डावात पार्थीव पटेलने सर्वाधिक ६७ धावा केल्या. चेतेश्वर पुजारा २५ धावांवर आणि मुरली विजय शून्यावर बाद झाला. तर कर्णधार विराट कोहली ६ धावांवर खेळत होता.

इंग्लंडने पहिल्या डावात २८३ धावा केल्या होत्या. याला उत्तर देताना अर्धशतकवीर अश्विनने जडेजासह केलेल्या भागीदारीमुळे भारताने पहिल्या डावात ४१७ धावांपर्यंत मजल मारत १३४ धावांची आघाडी घेतली होती.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ICICI बँक 100 गावांना करणार 'डिजिटल'

मोदी सरकारनं देशाला कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आयसीआयसीआय बँकेनं 100 गावांना कॅशलेस म्हणजेच डिजिटल बनवण्याचा घाट घातला आहे. आयसीआयसीआय बँकेनं गावं डिजिटल करण्यासाठी गुजरातमधून सुरुवात केली आहे.

या कॅशलेस योजनेंतर्गत आयसीआयसीआय बँक 100 गावांमधील सर्वांचं बँकेत खातं उघडणार आहे. त्या खात्यांच्या माध्यमातून आयसीआयसीआय बँक लोकांना कॅशलेस व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे. कॅशलेस व्यवहारासाठी फोन बँक खात्याशी जोडण्यात येणार असून, एसएमएसच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहार करण्यासाठी मार्गदर्शनही करणार आहे. आयसीआयसीआय बँकेने गुजरातमधल्या साबरकांठा जिल्ह्यातील अकोदरा हे गाव डिजिटल व्हिलेज म्हणून दत्तक घेतल्यानंतर नव्या 100 गावांसाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या आहेत.

अकोदरा गावातच सर्वात पहिल्यांदा कॅशलेस व्यवहाराची संकल्पना राबवण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत आयसीआयसीआय बँक टॅबलेटद्वारे खातं उघडणार आहे. तसेच आधार केवायसी यांचा वापर करणार आहे. यामुळे कमीतकमी खर्चात तसंच वेळेत आणि कागदपत्रांशिवाय बचत खातं उघडता येईल. या सर्व खातेधारकांना रूपे डेबिट कार्ड देण्यात येणार असून, गरज असल्यास पीओएस म्हणजे कार्ड स्वाईप मशिन्स बसवण्यात येतील आणि जास्तीत जास्त कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहित केलं जाईल. तसेच किसान क्रेडिट कार्ड, टू व्हिलर कर्ज, शेतीच्या उपकरणांसाठी कॅशलेस व्यवहारांच्या माध्यमातून कर्ज देण्यात येणार आहे, अशी माहिती आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांनी दिली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹इराणचा ‘डॉक्टर’ चित्रपट ठरला सर्वोत्कृष्ट!

भारताच्या 47 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (आंचिम) स्पर्धेत रेझा मीटकरीमी दिग्दर्शित इराणी चित्रपट ‘डॉक्टर’ला उत्कृष्ट चित्रपट म्हणून सुवर्ण मयूर व रु. 40 लाख असा सर्वात मोठा पुरस्कार प्राप्त झाला. काल सोमवारी पणजीत झालेल्या समारोपाच्या रटाळ कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही याच चित्रपटातील फरहाद असलानी या अभिनेत्याला प्राप्त झाला. लॅटिव्हियन चित्रपटाची नायिका एलिना व्हस्का हिला ‘मेलो मड’ या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार रोख रु. 10 लाख आणि रजत मयूर प्राप्त झाला आहे.
केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री हर्षवर्धनसिंह राठोड, राज्यपाल मृदुला सिन्हा, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, बाहुबली या तेलगू चित्रपटाचे निर्माते एस. राजमौली हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

तुर्कस्थानला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार

तुर्कस्तानच्या ‘रौफ’ या चित्रपटाचे दिग्दर्शक बारिस काया यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे पारितोषिक प्राप्त झाले. बारिस काया आणि निर्माता सोनेट जनेट यांना रु. 15 लाख आणि रजत मयूर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. परीक्षकांच्या उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार दक्षिण कोरियाच्या ‘द य्रोन’ या ली जॉन ईफ दिग्दर्शित सिनेमाला देण्यात आला. रजत मयूर आणि रु. 15 लाख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

स्पॅनिश ‘रारा’ चित्रपट पदार्पणातील सर्वोत्कृष्ट

पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी शताब्दी पुरस्कार हा ‘रारा’ या अर्जेंटीनाच्या पेपासॅन मार्टिन यांच्या स्पॅनिश चित्रपटाला बहाल करण्यात आला. रजत मयूर व रु. 10 लाख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. चित्रपटांचे परीक्षक मंडळ इव्हान पासेर यांच्या अध्यक्षतेखाली असून त्यात लॅरी स्मिथ, लॉर्डन झॅफ्रोनॅव्हिक, नागेश कुकनूर आणि लैला किलानी यांचा समावेश होता.

या महोत्सवाच्या निमित्ताने आयसीफटीयुनेस्को गांधी पुरस्कारही देण्यात आले. तुर्कस्तानचे निर्माते मुस्तफा कारा यांच्या ‘कोल्ड ऑफ कालंदर’ या चित्रपटाला हा पुरस्कार देण्यात आला. ‘द अपॉलॉजी’ या चित्रपटाला विशेष उल्लेखनीय पुरस्कार देण्यात आला.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अर्जेंटिना पहिल्यांदाच डेव्हिस चषकाचा मानकरी

अर्जेंटिनाने रविवारी येथे पहिल्यांदाच डेव्हिस टेनिस चषकावर आपले नाव कोरले. अंतिम लढतीत अर्जेंटिनाने क्रोएशियाचा पराभव केला. या अंतिम लढतीतील परतीच्या शेवटच्या एकेरी सामन्यात अर्जेंटिनाच्या डेल पोट्रोने मनगटाला झालेल्या दुखापतीवर मात करत क्रोएशियाच्या मॅरीन सिलीकचा 6-7 (4-7), 2-6, 7-5, 6-4, 6-3 असा पराभव केला.

या लढतीतील शेवटचा परतीचा एकेरी सामना निर्णायक ठरला. या सामन्यापूर्वी दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत होते. पण पोट्रोने शेवटचा एकेरी सामना जिंकून क्रोएशियाचे आव्हान 3-2 अशा फरकाने संपुष्टात आणले. या विजयानंतर अर्जेंटिनाच्या टेनिसपटूंनी डेव्हिस चषकासह मैदानावर विजयी जल्लोष केला.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अशोक लेलँडला ‘डेमिंग प्राइज’

हिंदुजा ग्रुपच्या अधिपत्याखालील अशोक लेलँडला पंतनगरच्या उत्पादन सुविधेसाठी 2016 चे ‘डेमिंग प्राइज’ प्रदान करण्यात आले आहे. ‘डेमिंग प्राइज’ हा दर्जात्मकतेसाठी देण्यात येणारा जगातील सर्वांत जुना आणि मानाचा असा पुरस्कार आहे.

आपल्या व्यवसायात टीक्यूएम प्रक्रियांमध्ये स्थापित असलेल्या कंपन्यांना हा पुरस्कार देण्यात येतो.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹बेयरेस्टोने नोंदवला कॅलेंडर वर्षात सर्वाधिक बळींचा नवा विक्रम

इंग्लंडचा यष्टिरक्षक जॉनी बेयरेस्टोने सोमवारी उमेश यादवचा झेल टिपताना एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक बळी घेण्याचा नवा विक्रम नोंदवला. बेयरेस्टोचा यंदाचा वर्षातील यष्टिपाठी हा ६८ वा बळी होता. त्याने आॅस्ट्रेलियाचा इयान हिली
व दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाऊचर यांचा ६७ बळींचा विक्रम मोडला.

च्हिलीने १९९३ मध्ये वेस्ट इंडीजच्या जेफ ड्युजोनने १९८४ मध्ये नोंदवलेला ५५ बळींचा विक्रम मोडला होता. बाऊचरने १९९८ मध्ये हिलीच्या विक्रमाची बरोबरी साधली. बेयरेस्टोचा यंदाच्या वर्षातील १५ वा कसोटी सामना आहे. त्याने आतापर्यंत ६५ झेल टिपले असून, ३ फलंदाजांना यष्टिचीत केले आहे. त्याने एका वर्षात सर्वाधिक झेल टिपण्याच्या बाऊचरच्या विक्रमाची बरोबरी साधली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारताच्या क्रिकेट इतिहासात प्रथमच झाला हा विक्रम

भारताच्या क्रिकेट इतिहासात प्रथमच सातव्या क्रमांक किंवा त्याखाली खेळणाऱ्या तीन खेळाडूंनी (आश्विन, जडेजा व जयंत) एका डावात अर्धशतके झळकावण्याची कामगिरी केली. काल मोहाली कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या तळाच्या फलंदाजांनी चिवट फलंदाजी करताना भारताला 134 धावांची आघाडी मिळवून दिली.

 भाराताकडून जाडेजाने 90 धावांची खेळी केली. तर अश्विन 72 आणि जयंतने 52 धावांची खेळी केली. भारतातर्फे अशी कामगीरी प्रथमच झाली आहे. तळाच्या फलंदाजांनी 3 अर्धशतके करण्याची कामगिरी अश्विन, जाडेजा आणि जयंत यादव यांच्या नावावर झाली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹देशातील ४० टक्के कीटकनाशके पर्यावरणाला घातक

कृषिक्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांपैकी तब्बल ४० टक्के कीटकनाशके ही सुमार दर्जाची आणि जमीन व पर्यावरणाला घटक असल्याचे आढळून आले आहे. अशा कीटकनाशकांमुळे पिकांवरील कीड, आळ्या, बुरशी आणि रोगांवर नियंत्रण ठेवण्यास अपयश येऊन कृषिउत्पादनात १५ ते २० टक्क्यांची घट होते आणि उत्पादनांची गुणवत्ता खालावते; असेही निदर्शनास आले आहे.

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि टाटा स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट ग्रुपच्या वतीने करण्यात आलेल्या शेतीविषयक अभ्यासात ही बाब निदर्शनास आली आहे.

शेतकऱ्यांमधील अज्ञान, नवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्याबाबत कीटकनाशक उत्पादकांमध्ये असलेली उदासीनता यामुळे दर्जाहीन कीटकनाशके वापरली जातात. त्यामुळे कीटक आणि आळ्यांचा प्रतिबंध प्रभावीपणे होत नाही त्याचप्रमाणे नापिकी आणि पर्यावरणाचीही मोठ्या प्रमाणावर हानी होते; असे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. शेतकऱ्यांमध्ये असलेला शिक्षणाचा अभाव, भारतातील भाषा वैविध्य यामुळे आघाडीच्या रसायन उद्योगांना आपल्या उत्पादनाची वैशिष्ट्य आणि त्याच्या वापराची पद्धत शेतकऱ्यांना समजावून देताना अडचणी येतात. त्यामुळे शेतकरी दुय्यम दर्जाच्या कीटकनाशकांचा वापर करतात. उत्पादक आणि शेतकरी यांच्यातील सुवा असलेल्या घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांमध्ये तांत्रिक माहितीचा अभाव असल्याने ते देखील शेतकऱ्यांना योग्य कीटकनाशक वापरण्याचा सल्ला देण्यात अपयशी ठरतात; असेही दिसून आले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹वर्षभरात ६५ हजार सौर पंप बसवून भारताचा जागतिक विक्रम

अक्षय ऊर्जा क्षेत्रात केंद्र सरकारने राबविलेल्या धोरणांनतर गेल्या एका वर्षात संपूर्ण देशात ६५ हजार सौर पंप बसवून भारताने जागतिक विक्रम केला असल्याची माहिती अक्षय ऊर्जा मंत्रालयाचे संयुक्त सचिव तरूण कपूर यांनी दिली. आम्ही येत्या काळात १ लाख नवे सौर पंप बसववण्याचे लक्ष्य ठेवले असल्याचे त्यांनी नमूद केले.

नाबार्डकडून सौर ऊर्जा पंपांसाठी शेतक-यांना ४० टक्के अनुदान आणि कर्जदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे, असे कपूर यांनी सांगितले. आगामी काळात विविध माध्यमातून विजेचे २० हजार मेगावॅट एवढेअतिरिक्त उत्पादन करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर ३ ते ४ महिन्यांमध्ये याबाबत निविदा काढल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या देशात सौर ऊर्जेपासून वीज निर्मितीची क्षमता ७ हजार मेगावॅट आहे आणि २० हजार मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर आहेत.

सौर पार्कांमध्ये या शिवाय १० ते ५० मेगावॅटच्या सौर प्रकल्पांचा विस्तार प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येणार आहे. येत्या २०२० पर्यंत एक लाख मेगावॅट सौर ऊर्जा उत्पादनाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. दरम्यान देशात वीज उपकरणांचे उत्पादन करणारी प्रसिद्ध कंपनी हॅवेल्स इंडिया आपली क्षमता वाढविण्यावर भर देत आहे. याच महिन्यात ही कंपनी सौर ऊर्जा क्षेत्रात अनेक उत्पादन लाँच करणार आहे.

 सौर ऊर्जा उत्पादन प्रणाली, घरगुती लाइटिंग किट, सौर पंप, स्ट्रीट लाइट आदी उत्पादने याच महिन्यात बाजारात आणण्याची शक्यता आहे. सौर ऊर्जेवरील सरकारचा फोकस पाहता कंपनीने या क्षेत्रात अग्रेसर राहण्याचे ठरविले आहे. लवकरच देशभरात या उत्पादनांना एकाचवेळी लाँच करण्यात येण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. या सर्व उत्पादनांची निर्मिती राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील निमराना येथील कारखान्यात केले जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹लवकरच रस्तेही करणार वीजनिर्मिती

सर्व कांही सुरळीत पार पडले तर नजीकच्या भविष्यात सूर्याच्या उर्जेपासून वीजनिर्मिती करण्याचे काम रस्तेही करू शकणार आहेत. ही वीज संबंधित गावाची किंवा शहराची रोजची विजेची गरज भागवू शकेल. फ्रान्समध्ये असे रस्ते तयार केले गेले असून त्याच्या चाचण्या सुरू आहेत. गेली पाच वर्षे त्यावर संशोधन केले जात होते. त्यामुळे आता लवकरच सौरऊर्जेपासून वीजनिर्मितीचे इलेक्ट्राॅनिक अॅन्व्हेन्यू शहरात प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा होत आहे.

फ्रान्सच्या बुईख इंजिनिअरींग ग्रुपची उपकंपनी कोलास एसए यांनी यासाठीची सोलर पॅनल डिझाईन केली आहेत. ही पॅनल अठरा चाकी ट्रकचा भार सहन करू शकतात. सध्या ही पॅनल रस्त्यावर वापरता येण्यायोग्य बनविली जात आहेत. कंपनीचे मुख्य इंजिनिअर फिलिप हर्ल म्हणाले शेतजमिनींचा वापर सौर पॅनलसाठी केला जात आहे त्याऐवजी रस्त्यांचा वापर अधिक सोईचा होणार आहे. आम्ही १०० आउटडोअर साईट तयार केल्या आहेत व टूरोवर गावात या रस्त्यांच्या टेस्ट घेतल्या जात आहेत. गतमहिन्यात २८०० चौरसमीटर रस्त्यावर बसविलेल्या पॅनलमधून २८० किलोवॅट वीज निर्माण झाली व ५ हजार वस्तीच्या गावासाठी ती पुरेशी आहे. अर्थात या पॅनलसाठी सध्या येणारा खर्च जास्त असून तो कमी कसा करता येईल याचे प्रयत्न सुरू आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पहिल्या सहामाहीमध्ये जीडीपी दर ७.१ टक्के

जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी असतानाही भारतीय अर्थव्यवस्था पहिल्या सहामाहीत ७.१ टक्क्यांच्या दराने वाढली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत ही माहिती दिली.

लोकसभेत ओमप्रकाश यादव आणि कर्नल सोनाराम चौधरी यांच्या लिखित प्रश्नाला उत्तर देताना निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीनंतरही भारत सकल घरेलू उत्पादनाच्या (जीडीपी) वृद्धीत २०१४-१५ मध्ये ७.२ टक्के, २०१५-१६ मध्ये ७.६ टक्के आणि एप्रिल ते सप्टेंबर २०१६-१७ या काळात ७.१ टक्के दर कायम ठेवला आहे. औद्योगिक उत्पादन आणि वृद्धीदराला चालना देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली आहेत.

‘मेक इन इंडिया’अंतर्गत भारतात उद्योगांना गती देण्यासाठी प्रमुख क्षेत्रांची निवड करण्यात आली
आहे. यात ‘स्टार्ट अप इंडिया’ आणि ‘इज आॅफ डुइंग बिझनेस’ या योजनांचाही समावेश आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सुपरकपॅसिटर मुळे इलेक्ट्रिक कार व स्मार्टफोन क्षेत्रात क्रांती

भारतीय वंशाचे नितीन चौधरी यांनी त्यांच्या अन्य संशोधकांच्या टीमसह तयार केलेल्या सुपरकपॅसिटरमुळे स्मार्टफोनचे चार्जिंग कांही सेकंदात होऊ शकणार आहे. फ्लोरिडा विद्यापीठात या संशोधकांच्या टीमने असा कपॅसिटर तयार केला असून त्यामुळे स्मार्टफोन चार्जिंगच नाही तर इलेक्ट्रीक कार क्षेत्रातही क्रांती घडून येईल असा दावा केला जात आहे.

सध्या असलेल्या सुपरकपॅसिटरच्या तुलनेत हा नवा कपॅसिटर ३० हजार पटीने वेगवान आहे. तो बनविताना नवी प्रक्रिया वापरली गेली आहे व त्यासाठी टूडी मटेरियलचा वापर केला गेला आहे. अत्यंत सोप्या रासायनिक संयुगांचा वापर केल्याने हा कपॅसिटर अत्यंत उपयुक्त ठरल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.या कपॅसिटरवर फोन चार्ज केला की पुन्हा आठवडाभर तो चार्ज करण्याची गरज राहात नाही.अन्य संशोधकांनी यापूर्वी ग्रेफीन व टूडी मटेरियलचा वापर करून असे कपॅसिटर बनविले होते मात्र त्यांना मर्यादित यश मिळाले होते असेही समजते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹विमानांना आकाशस्थ धोकयांची सूचना देणारा उपग्रह लाँच

अमेरिकेच्या राष्ट्रीय सागरी व हवामान प्रशासन विभागाने (एनओएए) नुकताच एक उपग्रह अंतराळात पाठविला आहे. हा उपग्रह आत्तापर्यंतच्या हवामान उपग्रहातील सर्वात उत्तम उपग्रह असल्याचा दावा केला जात आहे. हा उपग्रह ढगांच्या अत्यंत स्वच्छ प्रतिमा पाठविणार आहेच पण हवामानातील बदल, वार्यांचा वेग, धुके, बर्फ, ढगांतील विजांची प्रखरता यांचीही माहिती देणार आहे.

याचा सर्वाधिक फायदा वैमानिकांना होणार आहे. ही माहिती उपग्रहाकडून मिळताच संबंधित धोक्यांच्या आसपास असणारी विमाने त्यांचे मार्ग बदलून अधिक सुरक्षित मार्गाने जाऊ शकणार आहेत व त्यामुळे विमानांवर वीज पडणे, वादळात विमान भरकटणे असे प्रकार कमी होऊ शकणार आहेत. २०१७ पासून हा उपग्रह आकडेवारी पाठविणार असल्याचेही समजते.या उपग्रहासाठी १ अब्ज अमेरिकन डॉलर्स खर्च केले गेले असून पूर्वीच्या उपग्रहांच्या तुलनेत तो पाच पट वेगाने माहिती पाठवू शकणार आहे. तसेच त्याने पाठविलेल्या प्रतिमाही अधिक स्पष्ट असतील असेही सांगितले जात आहे.

DDNewsLive (Facebook)

केन्द्रीय जल संसाधन,नदी विकास और गंगा संरक्षण मंत्रालय कौन सा पानी किस चीज के लिए उपयोग हो इसके लिए एक कानून लाने जा रहा है ताकि गिरते भू जल स्तर को कम करने से रोका जाए। नई दिल्ली में भू जल मंथन 2 कार्यक्रम में केन्द्रीय जल संसाधन,नदी विकास और गंगा संरक्षण मंत्री उमा भारती ने कहा कि जल संरक्षण को जन आंदोलन बनाने की जरुरत है।

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारताचा प्रथम राष्ट्रीय सॉफ्टवेअर धोरणाचा मसुदा जाहीर

भारत सरकारने देशाचा पहिला राष्ट्रीय सॉफ्टवेअर धोरणाचा मसुदा जाहीर केला आहे. या धोरणाचा मुख्य उद्देश म्हणजे, भारतीय सॉफ्टवेअर उत्पादनांचा हिस्सा जागतिक बाजारपेठेत 10 पटीने अंदाजे USD 148 अब्ज पर्यंत वाढवणे आणि वर्ष 2025 पर्यंत 3.5 दशलक्ष लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे आहे. या संबंधी इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) कडून पी. पी. चौधरी यांनी स्पष्टता दिली.

धोरणासंबंधी जाहीर केलेले मुद्दे

धोरणानुसार, सॉफ्टवेअर उत्पादनांसाठी स्थानिक देशांतर्गत / आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सहज प्रवेश मिळवून प्रसार करून वर्ष 2025 पर्यंत जागतिक सॉफ्टवेअर उत्पादन बाजारपेठेत भारतीय हिस्सा वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल.
अंदाजानुसार, भारतीय सॉफ्टवेअर उत्पादन उद्योगाचा जागतिक बाजारपेठेत 1.48% चे योगदान आहे आणि या धोरणामधून हा वाटा 10 पटीने वाढवून अंदाजे USD 148 अब्ज पर्यंत वाढवणे.
जागतिक स्तरावर स्पर्धात्मकरीत्या सॉफ्टवेअर उत्पादने विकसित करण्यासाठी 10,000 तंत्रज्ञान स्टार्ट-अप च्या निर्मितीसाठी पोषक वातावरण तयार करणे आणि त्याद्वारे 3.5 दशलक्ष अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती करणे हे या धोरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

तसेच सरकारकडून करण्यात येणार्‍या खरेदी मध्ये भारतीय सॉफ्टवेअर उत्पादनाचा समावेश वाढविण्यासाठी फ्रेमवर्क तयार केले जाईल आणि संरक्षण, अणू ऊर्जा, अवकाश, रेल्वे, दूरसंचार, ऊर्जा आणि आरोग्य इ. मोक्याचा क्षेत्रात त्यांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाणार.

मसुदात विचारार्थ बाबी

आंतर मंत्रालयीन समन्वय गटाची स्थापना – MeitY कडून  देशातील इज ऑफ डूइंग बिजनेस सुनिश्चित करण्यासह सॉफ्टवेअर उत्पादन उद्योगांसंबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एक आंतर मंत्रालयीन समन्वय गटाची स्थापना करण्यात येईल.

इलेक्ट्रॉनिक विकास निधी - MeitY कडून 100 कोटी रुपयांच्या मदतीने PPP (सार्वजनिक-खासगी भागीदारी) मॉडेल अंतर्गत 10,000 कोटी रूपयांसह इलेक्ट्रॉनिक विकास निधी उभारण्यात येईल. यामधून सॉफ्टवेअर स्टार्ट-अप ला आर्थिक सहाय्य दिले जाईल.
कर आकारणी - सॉफ्टवेअर सेवा पासून सॉफ्टवेअर उत्पादनांसाठी कर दर निश्चित करण्यासोबतच भारतीय सॉफ्टवेअर उत्पादनांना अनुकूल असे सोपे, योग्य आणि पारदर्शक कर प्रणाली आणण्यास प्रयत्न केले जाईल.
देशांतर्गत अवलंबण - सरकारकडून करण्यात येणार्‍या खरेदी मध्ये भारतीय सॉफ्टवेअर उत्पादनाचा समावेश वाढविण्यासाठी फ्रेमवर्क तयार केले जाईल तसेच ई-गव्हर्नन्स संबंधित भारतीय सॉफ्टवेअर चा एक डेटाबेस तयार करण्यासाठी क्लाऊड आधारित पायाभूत सुविधा विकसित केले जाईल.
रोजगार, शिक्षण आणि जाहिरात - MeitY विविध बाजारपेठेमधील प्रवेशास असणार्‍या पुढाकारांच्या माध्यमातून भारतीय SaaS, उपक्रमे, क्लाऊड पायाभूत सुविधा, माहिती विश्लेषण, IoT आणि मोबाइल उत्पादने यांना प्रोत्साहित करणार आणि क्लाऊड कम्प्यूटिंग, ई-कॉमर्स चा वापर, माहिती सुरक्षा यावर खास लक्ष दिले जाईल.
सॉफ्टवेअर उत्पादन उद्योगाबाबत जागतिक परिस्थिती

सद्यपरिस्थितीत, सॉफ्टवेअर उत्पादन उद्योग हे जागतिक स्तरावर USD 411 अब्ज असल्याचा अंदाज आहे आणि वर्ष 2025 पर्यंत सुमारे USD 1 ट्रिलियन पोहोचण्याचे अपेक्षित आहे. यामध्ये भारताचा सॉफ्टवेअर उत्पादन उद्योगातील एकूण महसूल हा USD 6.1 अब्ज इतका आहे, त्यामध्ये निर्यात वाटा हा USD 2 अब्ज इतका आहे.

भारतीय माहिती तंत्रज्ञान व उद्योग प्रक्रिया बाह्यस्त्रोत उद्योगाचे व्यापारी संघटन असलेले सॉफ्टवेअर आणि सेवा कंपन्यांचे राष्ट्रीय महामंडळ (National Association of Software and Services Companies –NASSCOM) नुसार, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाचा व्यवसाय हा सुमारे USD 143 अब्ज इतका आहे आणि वर्ष 2025 पर्यंत USD 350 अब्ज इतका वाढू शकण्याची अपेक्षा आहे.

All India Radio News (Facebook)
photo
source

INS Darshak completes Hydrographic Survey for #Tanzania.

The survey was undertaken under the MoU signed for Foreign Cooperation in the field of Hydrography between Tanzania and India on exchange of hydrographic data to promote development and cooperation through conducting surveys, exchange of data, capacity building and infrastructure strengthening.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹थिएटरमध्ये चित्रपट सुरु होण्याआधी तिरंग्यासह राष्ट्रगीत बंधनकारक

आता राष्ट्रगीत देशभरातील चित्रपटगृहांमध्ये अनिवार्य असून थिएटरमध्ये चित्रपट सुरु होण्यासाठी राष्ट्रगीतासह पडद्यावर राष्ट्रध्वज दाखवा, असा आदेशच सर्वोच्च न्यायालयाचा देशभरातील चित्रपटगृहांना दिला आहे.

याआधी केवळ महाराष्ट्रातच चित्रपटाआधी राष्ट्रगीत अनिवार्य होते. मात्र आता देशभरातील सर्वच थिएटरमध्ये राष्ट्रगीत बंधनकारक असेल. राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहणेही गरजेचे असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. तसेच कोणत्याही परिस्थिती अपूर्ण राष्ट्रगीत लावण्यास परवानगी नसेल, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.

यासंदर्भातील निर्देश सर्व राज्यांना केंद्र सरकारने द्यावेत, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. शिवाय व्यावसायिक फायद्यासाठी राष्ट्रगीताच वापर करु नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियातूनही याबाबत जागरुकता केली जाईल.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹दिल्लीने खेचून घेतला मुंबईचा आर्थिक राजधानीचा दर्जा

देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई शहराची ओळख, पण आता भारताची आर्थिक राजधानी मुंबई ही राहिली नाही. मुंबईचा हा दर्जा दिल्लीने खेचून घेतला आहे. ऑक्सफोर्ड इकॉनमिक्सने केलेल्या एका सर्वेमध्ये जगातील ५० मेट्रोपोलिन इकॉनमिक शहरांमध्ये दिल्लीला ३०वे स्थान मिळाले आहे. मुंबई या यादीत ३१ व्या स्थानी आहे.

सर्वेक्षणानुसार दिल्लीचा शहरी क्षेत्राचा विस्तार झाला आहे. गुडगाव, नोएडा, गाजियाबाद आणि फरीदाबाद या सारख्या शहरांसह दिल्ली-एनसीआरचा जीडीपी ३७० अरब डॉलर म्हणजेच २५१६४ अरब रुपये आहे. तर देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या मुंबईत नवी मुंबई, ठाणे, वसई-विरार, भिवंडी आणि पनवेल यांचा समावेश केला गेला आहे. शहरांचा संयुक्त जीडीपी ३६८ अरब डॉलर आहे. भविष्यात देखील दिल्लीच याबाबतीत पुढे असणार असे या रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे. जगात हे दोन्ही शहर आर्थिक केंद्र म्हणून लवकरच अजून प्रगती करतील असे म्हणण्यात आले आहे. २०३० मध्ये जगातील आर्थिक केंद्र असणाऱ्या शहरांच्या यादीत दिल्ली ११ व्या तर मुंबई १४ व्या स्थानावर असेल असे या रिपोर्टमध्ये म्हणण्यात आले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹प्रकाशाच्या वेगाबाबत आइनस्टाइनला आव्हान

सिद्धान्ताची पडताळणी लवकरच होणार
प्रख्यात वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन याच्या भौतिकशास्त्रातील सिद्धान्ताला आव्हान देणाऱ्या सिद्धान्ताचा पडताळा लवकरच घेतला जाणार आहे, त्यामुळे दुसरा सिद्धान्त खरा ठरला, तर आपले विश्वाचे ज्ञान बदलून जाईल. प्रकाशाचा वेग स्थिर असतो या आइनस्टाइनच्या म्हणण्याविरोधात हा वेग बदलत असतो, असे प्रतिपादन नवीन सिद्धान्तात केले आहे.

आइनस्टाइनने असे म्हटले होते, की कुठल्याही परिस्थितीत प्रकाशाचा वेग हा सारखाच असतो व अवकाश तसेच काळ हे वेगवेगळय़ा परिस्थितीत वेगवेगळे असतात. प्रकाशाचा वेग हा स्थिर असतो, या प्रतिपादनामुळे महाविस्फोटात विश्वाच्या निर्मितीनंतरच्या बालविश्वाबाबतच्या आपल्या संकल्पना त्यावर आधारित आहेत. काही वैज्ञानिकांच्या मते पूर्वीच्या विश्वात प्रकाशाचा वेग खूप जास्त होता. लंडनच्या इम्पिरियल कॉलेजचे जोआओ माग्वेजो यांनी कॅनडातील पेरीमीटर इन्स्टिटय़ूटचे नियायेश अफशोरदी यांच्यासमवेत असा सिद्धान्त मांडला आहे, की त्यात प्रकाशाचा वेग स्थिर नसतो हे भाकीत तपासता येऊ शकेल.

विश्वातील दीर्घिका या स्पंदनांमुळे तयार झाल्या आहेत, कारण त्या वेळी काही भागांतील घनता वेगवेगळी होती. वैश्विक मायक्रोवेव्ह नकाशात या स्पंदनांची नोंद आहे व तो विश्वातील जुना प्रकाश स्पेक्ट्रल इंडेक्स मानला जातो. या स्पंदनांवर प्रकाशाच्या वेगातील बदलांचा परिणाम झाला आहे, असे नवे प्रारूप मांडण्यात आले असून, त्यात स्पेक्ट्रल इंडेक्सचा नेमका आकडा शोधण्याचा प्रयत्न आहे. हा आकडा अचूक काढण्यासाठी विश्वरचना शास्त्रज्ञ प्रयत्नशील आहेत. हा आकडा ०.९६४७८ असल्याचे सांगितले जाते.

१९९० मध्ये हा सिद्धान्त मांडला होता. आता तो परिपक्व अवस्थेत आहे व त्यातील भाकिते तपासली जाऊ शकतात असे माग्वेजियो यांचे म्हणणे आहे. यातील आकडा अचूक निघाला तर आइनस्टाइनच्या गुरुत्व सिद्धान्तात बदल करावे लागतील. प्रकाशाचा वेग बदलतो ही कल्पना प्रथम अचूक वाटत नव्हती, पण आता आकडा हाती असल्याने या मुद्दय़ावरील सिद्धान्ताची पडताळणी शक्य आहे. जर्नल फिजिकल रिव्हय़ूमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सफाई कामगारांना घरं देणारी ठाणे देशातील पहिली महापालिका – पालकमंत्री

सफाई कर्मचा-यांना मालकी हक्काची घरे देणारी ठाणे महापालिका ही देशातील एकमेव महापालिका असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सफाई कर्मचा-यांना चावी वाटप कार्यक्रमात केले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मेघालयात होणार देशातला पहिला चेरी महोत्सव

मेघालयात देशातला पहिला वहिला चेरी महोत्सव साजरा केला जाणार आहे. जपानमध्ये चेरी ब्लॉसम फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो व तेथे त्याला साकुरा असे म्हटले जाते. या दिवसांत जपानमध्ये पर्यटक प्रचंड संख्येने साकुरा पाहण्यासाठी बाहेर पडतात. जपानमध्ये हा महोत्सव एप्रिलमध्ये साजरा होतो कारण त्यावेळी तेथे चेरीची झाडे फुलांनी बहरतात.

हिमालयाच्या पहाडी भागात चेरीची झाडे पानगळीच्या दिवसांत म्हणजे थंडीत फुलतात. यावेळी झाडांवर पाने राहातच नाहीत तर सारे झाड चेरीच्या नाजुक गुलाबी पांढरट फुलांनी डवरलेली असतात व अशी शेकडो झाडे एकचवेळी पाहणे हा नयनोत्सव असतो. शिलाँगमध्ये चेरीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली गेली आहे.१९८० मध्ये प्रथमच वन विभागाने चेरी लागवड करण्याचा निर्णय घेतला होता. आता ही झाडे मोठी झाली आहेत.

शिलाँगच्या वॉर्ड सरोवराजवळ हा चेरी महोत्सव साजरा केला जाणार असून त्यात फूड, फॅशन शो, तिरंदाजी, रॉक कॉन्सर्ट यांचाही समावेश आहे. देशातून या महोत्सवासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. चेरीची ही फुले अ्रगदी नाजूक असतात व उमलली की दुसर्याच दिवशी ती गळून पडतात त्याचा सडा झाडांखाली पसरलेला दिसतो.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मोबाईल फोन निर्मितीमध्ये उत्तर प्रदेश देशात अग्रगण्य

देशातील 39 मोबाईल निर्मिती करणाऱया केंद्रापैकी 15 प्रकल्प एका उत्तर प्रदेश राज्यात असून सॅमसंग, लाव्हा, इन्टेक्स अशा प्रकारच्या कंपन्यांची निर्मिती क्षमता प्रत्येकी 13.1 दशलक्ष मोबाईल फोन निर्माण करण्याची आहे, असे इंडियन सेल्युलर असोसिएशनने (आयएसए) म्हटले आहे. आंध्रप्रदेशमध्ये दशलक्ष निर्मितीचे 5 कारखाने आहेत. हरियाना 3 (2.5 दशलक्ष), उत्तराखंड आणि दिल्ली 4 (प्रत्येकी 3 दशलक्ष आणि 1.1 दशलक्ष), तेलंगणा 2 केंदे, महाराष्ट्रामध्ये 0.8 व 0.3 दशलक्षांची निर्मिती होते, आयसीएच्या अहवालाने माहिती दिली आहे.

तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, 50 बंगाल व दमणमध्ये प्रत्येकी एक कारखाना आहे. मोबाईल सेट निर्माण करण्याची नोंद 2014-15 वर्षात 18900 कोटी रुपयांची होती तर 2015-16 मध्ये 54000 कोटींची आहे. ही वाढ 90 टक्क्मयांवरून सुमारे 185 टक्के होते. 2019 मध्ये मोबाईल निर्मिती व्यवसायाने देशात वर्षाला 50 कोटी हॅण्डसेटच्या उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. तर 2025 व्या वषी 125 कोटी हँडसेटचे (15 लाख कोटी रुपये) उत्पादन होण्याची शक्मयता व्यक्त केली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पीओएस मशिनवरील जकात कर स्थगित

नोटाबदलीच्या निर्णयानंतर डिजिटल व्यवहारातकाही प्रमाणात वाढ झाली आहे. याचबरोबर पीओएस (पॉईन्ट ऑफ सेल – स्वाईप मशिन) मशिनचीही मागणी वाढली आहे. सध्या चलन मंदीची काही प्रमाणात समस्या उद्भवल्याने पीओएस मशिनच्या उत्पादनावरील जकात कर स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मशिनवर 12.5 टक्के जकात कर आणि 4 टक्के विशेष अतिरिक्त कर आकारण्यात येत होता. या उत्पादनांवरील हे दोन्ही करत 31 मार्च 2017 पर्यंत स्थगित करण्यात आले असे सांगण्यात आले. 8 नोव्हेंबर रोजी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्यापासून या मशिनच्या मागणी प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. या मशिनच्या सहाय्याने डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या सहाय्याने देयके देता येतात.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹डेव्हिड जॉन हॉकी इंडियाचे ‘हाय परफॉर्मन्स डायरेक्टर’

भारताच्या वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी संघाचे माजी फिजिओलॉजिस्ट ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड जॉन यांची भारतीय हॉकीचे ‘हाय परफॉर्मन्स डायरक्टर’पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी हॉकी इंडियाने ही घोषणा केली.

याआधी या पदाची जबाबदारी रोलँट ओल्टमन्स सांभाळत होते. त्यांची राष्ट्रीय पुरुष संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर या जबाबदारीतून त्यांची मुक्तता करण्यात आली. 2020 मध्ये होणाऱया टोकियो ऑलिम्पिकपर्यंत ओल्टमन्स प्रमुख प्रशिक्षकपदी राहणार आहेत. जॉन यांनी यापूर्वी लंडन ऑलिम्पिकआधी एक्सरसाईज फिजिओलॉजिस्ट व सायंटिफिक सल्लागार म्हणून वरिष्ठ हॉकी संघासमवेत काम केले आहे. त्यांनी बळ व ट्रेनिंगच्या नव्या योजना राबवून भारतीय हॉकीपटूंच्या फिटनेसमध्ये सुधारणा घडवून आणली. याशिवाय त्यांनी हाय परफॉर्मन्स डायरेक्टर म्हणून हॉकी इंडिया लीगमधील दोन संघांसाठीही काम केले आहे. 2016 मध्ये त्यांनी कलिंगा लान्सर्ससाठी काम केले आणि या संघाने उपविजेतेपद पटकावले. जॉन यांना हॉकी, रग्बी, फुटबॉल, ट्रायथ्लॉन यासारख्या विविध क्रीडा प्रकारांचा मोठा अनुभव आहे. नव्या कामगिरीने जबाबदारी वाढली असून भारतीय संघासमवेत वेगळय़ा भूमिकेत काम करण्यासाठी उत्सुक असल्याचे जॉन यांनी सांगितले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पंकज अडवाणीला कांस्यपदक

दोहा : येथे संपलेल्या एबीएसएफ वर्ल्ड स्नूकर अंजिक्य स्पर्धेत भारताचा अव्वल खेळाडू पंकज आडवणीला उपांत्य फेरीत वॉल्सच्या अँड्र्यू पॅगेटकडून २-७ फ्रेमने पराभव पत्करावा लागल्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
१५ वेळा विश्वविजेतेपद जिंकलेल्या पंकज आडवाणीला अँड्र्यूकडून ७४-१४, ७१-८, ८७-०, ६४-७८, ८१-०, ३७-७०, ८०-७,
६८-३७, १४-१९ असे पराभूत व्हावे लागले. या लढतीमध्ये पंकज आडवाणीला शेवटपर्यंत सूर गवसला नाही.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘टाइम’च्या प्रभावशाली छायाचित्रांमध्ये महात्मा गांधी यांचा चरखा

अमेरिकेतील ‘टाइम’ मासिकाने १०० सर्वात प्रभावशाली छायाचित्रांच्या संकलनात चरख्यासह महात्मा गांधी यांचे १९४६ मधील एका छायाचित्राचा समावेश केला आहे. महात्मा गांधी यांचे हे कृष्णधवल छायाचित्र प्रसिद्ध छायाचित्रकार मार्गारेट बोर्केव्हाइट यांनी काढले होते.

‘टाइम’च्या संकलनात सन १८२० पासून २०१५ पर्यंत घेण्यात आलेली सर्वात प्रसिद्ध आणि इतिहास घडवणाऱ्या छायाचित्रांचा समावेश करण्यात आला आहे. ‘टाइम’ने त्यात आता चरख्यासमवेत महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील एका छायाचित्राचा समावेश केला आहे. या छायाचित्रात महात्मा गांधी जमिनीवरील एका गादीवर बसले आहेत. ते वृत्तपत्र वाचत असल्याचे छायाचित्रात दिसत असून, त्यांच्यासमोर त्यांचा एक चरखा आहे. हे छायाचित्र भारतीय नेत्यांवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका लेखासाठी घेण्यात आले होते. मात्र, ते प्रकाशित होण्याच्या दोन वर्षे आधी आणि महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर हे छायाचित्र श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रकाशित करण्यात आले होते. अल्पावधीतच हे छायाचित्र जगभरात प्रसिद्ध झाले होते. टाइमच्या संकलनात १८२० ते २०१५ या कालावधीत घेण्यात आलेल्या सर्वाधिक प्रसिद्ध आणि इतिहास घडवणाऱ्या छायाचित्रांचा समावेश करण्यात आलेला आहे, असे ‘टाइम’कडून सांगण्यात आले.