ब्रिटिश सत्तेचे एकत्रीकरण (१८१८-१८५७)
पेशवाईचा
१८१८ मध्ये अस्त झाला आणि बराच मोठा भू प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात आला.
आता पंजाबमधील शीख साम्राज्य संधि व बलुचिस्तानचे अमीर ही राज्येच
ज्ंिाकावयाची राहिली होती. बाकीच्या संपूर्ण भारतीय प्रदेशावर आता कंपनीचा
ताबा प्रस्थापित झाला होता अॅक्हर्स्टच्या कारकिर्दीतचपासून कंपनीचे लक्ष
सर्व बाजूंनी भारताच्या भौगोलिक सीमेपर्यत आपले राज्य वाढविण्याकडे
केंदि्रत झाले होते. जसजसा साम्राज्याविस्तार वाढला तसतशा या साम्राज्याचे
संरक्षण करण्याच्या समस्याही निर्माण झाल्या अॅम्हर्स्ट ते डलहौसी
पर्यतच्या सर्वच गव्हर्नरांना या समस्येची उकल करण्याकडे लक्ष द्यावे
लागले.
र्लॉड
हेस्टिंग्जनंतर र्लॉड अॅक्हर्स्ट भारताचा सगव्हर्नर जनरल झाला. त्याच्या
कारकिर्दीतचत पहिले ब्रम्ही युध्द झाले. या युध्दात इंग्रजांनी ब्रम्ही
फौजांचा पराभव केला. यांदेबूच्या तहाने ब्रम्ही सरकारने इंग्रजांना आराकान व
तेनासरीम हे प्रांत दिले व आपल्या फौजा असामच्या प्रदेशातुन मागे घेतल्या
(१८२६)
- सिंधवर विजय :
संधि प्रांत पूर्वी मोगल
साम्राज्याचा एक विभाग होता. या साम्राज्याच्या पतनानंतर अफगाणांनी संधि
काबीज केला. अफगाणिस्तानात जेव्हा यादवी सुरु झाली त्या वेळी १७६८ मध्ये
बलुचिस्थानातील तालपूर जातीने तेथे आपली सज्ञ्ल्त्;ाा स्थापन केली.
स्ंिाधमध्ये तीन निरनिराळे सरदार मीरपूर व हैद्राबाद येथे राज्य करीत होते.
व्यापारी व लष्करीदृष्टया इंग्रजांना संधि महत्वाचा वाटत होता. त्यामुळे
बेंटिकने तेथील अमीरांशी घनिष्ठ संबंध स्थापन करण्याचा प्रयत्न केला .
त्यासाठी र्बोड ऑफ कंट्रोलचा अध्यक्षा र्लॉड एलेनबरो याने सुचविलेल्या
योजनेनूसार कार्य करण्याचे त्याने ठरविले. इ.स. १८३० मध्ये लेफटनंट रॉर्बट
बर्न याला काही घोडे व अन्य वस्तू रणजितस्ंिागला भेट देण्यासाठी
स्ंिाधमार्गे पंजाबला पाठविण्यात आले. बर्नला असा गुप्त आदेश देण्यात आला
होता. की त्याने प्रवासात स्ंिाधच्या राजकीय व लष्करी स्थितीची पाहाणी
करावी. जमल्यास अमीराशी व्यापारी करार करावा आणि आपला अहवाल गव्हर्नर
जनरलकडे पाठवावा.
बर्नच्या
योजनेमूळे रणजितस्ंिागच्या मनातही इंग्रजांच्या हेतुबदल अमीराप्रमाणेच शंका
निर्माण झाली. कारण संधि जिंकून घेण्याची त्याचीही इच्छा होती. पंरतु
रणजितस्ंिागने सिंधवर आपले वर्चस्व प्रस्थापित करावे ही गोष्ट इंग्रजांना
मान्य नव्हती संधिी अमीरसुध्दा रणजितस्ंिागच्या संभाव्य आक्रमणाबदल भयभीत
होते. बेंटिंकने त्यांच्या भीतीचा फायदा घेऊन कच्छचा इंग्रज रेसिडेंट कर्नल
पॉटीजर याला अमीराशी बोलणे करण्यासाठी पाठविले. त्याने इ.स. १८३२ मध्ये
अमीराला कंपनीशी व्यापारी तह करण्यास भाग पाडले. या तहानुसार इंग्रज
स्ंिाधमध्ये व्यापार करू शकत होते.
- सिंध जिंकण्यात यश (१८४२-१८४४) :
वरीलप्रमाणे १८३२ मध्ये र्लॉड
बेंटिंकने स्ंिाधच्या अमीरांशी एक व्यापारी करार केला होता आणि अमीराला
कंपनीने असे आश्र्वासन दिले होते. की कंपनी आपल्या फौजा सिंधमधुन कधीही
नेणार नाही. इ.स. १८३८ मध्ये ऑकलंडने पुन्हा स्ंिाधच्या अमीरांशी एक करार
केला. या करारानुसार अमीरांनी हैद्राबाद येथे इंग्रज रेसिडेंट ठेवून
घेण्याचे मान्य केले. पहिल्या इंग्रज अफगाण युध्दाला सुरुवात झाल्यावर
इंग्रज सेनेला रणजितस्ंिागने आपल्या प्रदेशातून जाऊ दिले नाही. त्यामूळे
ऑकलंडने १८३२ चा अमीरांशी झालेला करार मोडून इंग्रज सैन्य सिंधमधुन
अफगाणिस्तानाकडे पाठविले. एवढेच नव्हे तर युध्दाच्या खर्चासाठी त्याने
संधिी अमीरांकडून २१ लक्ष रु वसूल केले. त्यांनंतर १८३९ मध्ये ऑकलंडने
अमीरांशी पुन्हा एक नवीन तह केला त्यानुसार अमीरांनी इंग्रजांना ३ लक्ष रु
वार्षिक खंडणी द्यावी संधि हैद्राबादेस इंग्रज रेसिडेंट होता. त्याने २
अमीरांबदल तार केल्यामूळे त्यांची चौकशी करण्याकरीता र्लॉड एलेनबरोने सर
चार्ल्स नेपियरला सैन्यासह स्ंिाधमध्ये पाठवले. ९ सप्टेंबर १८४२ रोजी तो
कराचीत येऊन दाखल झाला. त्याने अमीराविरुध्द पुरावे गोळा केले व त्याच
आधारावर अमीरांनी कंपनीशी केलेला करार पाळला नाही ही सबब पुढे करुन
नोव्हेंबर १८४२ मध्ये त्यांच्यापूढे नेपियरने एक नवीन करार ठेवला त्यातील
प्रमुख कलमे पुढीलप्रमाणे (१) अमीरांनी आपली स्वतंत्र नाणी पाडू नयेत. (२)
सिंधमधील शिकारपूर, सख्खर, भक्कर, ही महत्वाची ठिकाणे. कंपनीच्या ताब्यात
द्यावीत. (३) सख्खरच्या उत्तरेकडील प्रदेश बहावलपूरच्या नबाबाला द्यावा (४)
संधिू नदीतून मुक्त संचार करण्याची इंग्रजांना परवानगी द्यावी. (५)
अमीरांनी कंपनीशी एकनिष्ठ राहावे इ. कलमे त्यात होती या कराराच्या
मोबदल्यात अमीरांना तैनाती फौजेच्या खर्चासाठी जे ३ लक्ष रु द्यावे लागत
होते ते माफ करण्यात आले.
हैद्राबादच्या
परिषदेत अमीरांनी इच्छा नव्हती तरी या करारावर सहया केल्या. या सहया
म्हणजे जूलूम जबरदस्तीच होती. इंग्रजांपूढे अशी शरणागती पत्करण्यास काही
अमीर तयार नव्हते. १५ फेब्रुवारी १८४३ राजी सायंकाळी पुष्कळशा बलूची
लोकांनी रेसिडेंट आऊटरमच्या बंगल्यावर हल्ला चढवला, पण हल्ला होताच आऊटरम
पळून गेल्यामुळे वाचला.
हैद्राबादच्या
उत्तरेस सुमारे १० मैलांवर मियानी येथे २०,००० बलूची सैन्य गोळा झाले
होते. १७ फेब्रूवारी १८४३ रोजी नेपियर हैद्रबादहून सैन्यासह निघाला आणि
त्याने बलूची सैन्यावर हल्ला चढवला मियानी येथे घनघोर युध्द होऊन त्यात
अमीरांचा पराभव झाला. हैद्राबाद शहर इंग्रजांच्या ताब्यात आले. काही
दिवसांनंतर पुन्हा अमीरांनी गडबड केल्याचे नेपियरला कळले अमीर हैद्राबादवर
चालून आले. हे वर्तमान कळताच २४ मार्च १८४३ रोजी नेपियरने एकदम हल्ला करुन
त्यांना पराभूत केले. २७ मार्च १८४३ रोजी इंग्रज सेनेने मीरपूर जिंकून
घेतले. १४ जून १८४३ रोजी अमीरांचा नेता शेर मोहम्मद याचाही पाडाव करुन
नेपियरने सर्व संधि इंग्रजांच्या वर्चस्वाखाली आणला ऑगस्ट १८४३ मध्ये
एलेनबरोने स्ंिाधचे विलीनीकरण ब्रिटिश साम्राज्यात झाल्याची घोषणा केली
सिंधवर विजय मिळवून देणार्या नेपियरलाच तेथे गव्हर्नर म्हणून नेमण्यात
आले.
- इंग्रज-शीख युद्धे : (१८४५-१८५०)
- पहिले युद्ध : (१८४५).
लाहोर तहानंतरही पंजाबमधील
राजकीय अस्थिरता कमी झाली नाही. १८४६ मध्ये शीख सरदारांनी इंग्रजांबरोबर
दुसरा तह केला. या तहानुसार पंजाबची राज्यव्यवस्था आठ शीख सरदारांच्या
रीजन्सी कौन्सिलने पहावी व त्यावर ब्रिटिश रेसिडेंट अध्यक्ष असावा, असे
ठरले. दलीपसिंग वयात येईपर्यंत इंग्रजी फौज लाहोरला ठेवावी व त्याबद्दल
शिखांनी ब्रिटिशांना प्रतिवर्षी आठ लक्ष रूपये द्यावे असे ठरले. ह्या
तहामुळे लाहोर दरबारावर इंग्रजी पकड घट्ट होऊन पुढील काळात पंजाब ताब्यात
घेण्यास इंग्रजांचा मार्ग सुकर झाला.
- दुसरे युद्ध : (१८४९).
ब्रिटिशांनी
दलीपसिंगाला ५०,००० पौंड वार्षिक तनखा देऊन शिक्षणासाठी इंग्लंडला
पाठविले. पुढे तो ख्रिस्ती झाला. त्यानंतर पंजाबचे राज्य खालसा करण्यात
आले. पंजाब प्रांत मिळाल्यामुळे ब्रिटिश साम्राज्याची सरहद्द
अफगाणिस्तानच्या सरहद्दीपर्यंत भिडली. पंजाब स्वतंत्र प्रांत करण्यात आला .
पुढील काळात ब्रिटिशांच्या सनदशीर धोरणामुळे शीख ब्रिटिशांचे कायम मित्र
बनले. त्यांनी दुसरे इंग्रज-अफगाण युद्ध व १८५७ चा उठाव यांत ब्रिटिशांना
सहकार्य दिले.
- र्लॉड डलहौसीकडून पंजाबचे विलिनीकरण :
Dalhousie |
या
गोष्टी मुलराजाला मान्य नव्हत्या, म्हणून त्याने डिसेंबर १८४७ मध्ये
आपल्या गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला. त्यामूळे त्याच्या जागेवर ३०,००० रु
वार्षिक वेतनावर काहनस्ंिाहाला नियूक्त करण्यात आले. त्याला मदत करण्यासाठी
जे दोन इंग्रज अधिकारी आले होते. त्यांच्या उद्दाम वर्तनामुळे त्यांना ठार
मारण्यात आले. प्रजेने जे बंड केले त्याचे नेतृत्व मुलराजला देण्यात आले.
या बंडाचे लोण इतरत्रही पसरले.
ऑक्टोबर
१८४८ मध्ये डलहौसीने घोषणा केली की कोणतीही पूर्वसूचना न देता शिखांनी
अकारण युध्द सुरु केले आहे. मी शपथपूर्वक सांगतो की शिखांपासून या युध्दाचा
बदला घेतला जाईल.
१६
नोव्हेंबर १८४८ रोजी हयु गफ याचा शीख सैन्याशी संघर्ष् झाला. त्यांच्यात
झालेल्या या रामनगरच्या लढाईत कोणताही निर्णय लागला नाही, तसेच त्यांच्यात
जानेवारी १८४९ मध्ये झालेल्या चिलियनवाला येथील युध्दातही कोणताच निर्णय
लागला नाही. त्यामूळे हयू गफच्या जागेवर चार्ल्स नेपियरची नियुक्ती करण्यात
आली. त्याच्या नेतृत्वाखाली झालेल्या गुजरात युध्दांत इंग्रजांनी शिखांचा
पराभव केला हे युध्द तोफांची लढाई म्हणून प्रसिध्द आहे. ही निर्णायक लढाई
होती. संपूर्ण पंजाब इंग्रजांच्या हाती आला डलहौसीने ब्रिटिश साम्राज्यात
पंजाबचे विलीनीकरण करुन टाकले. दिलीपस्ंिागला वार्षिक ५०,००० रु पेन्शन
देऊन उच्च शिक्षणासाठी इंग्लडला पाठविण्यात आले. आयुक्तांच्या एका समितीकडे
पंजाबचे प्रशासन सोपविण्यात आले.
- र्लॉड डलहौसीची कारकिर्द (१८४८-१८५६) :
वेलस्लीनंतर इंग्रज सत्तेची मोठी वाढ
र्लॉड डलहौसीने केली. खर्या अर्थाने तो इंग्रजांचे साम्राज्याचा निर्माता
होता. तो अत्यंत कार्यक्षम व महत्वाकांक्षी गव्हर्नर जनरल होता.
इंग्रजांचे राज्य वाढवीत असता त्याने निती अनीतीचा फारसा विचार केला नाही.
इंग्रजी साम्राज्यावादाचा तो खराखुरा प्रतिनिधी होता.
- विलीनीकरणाचे तत्व :
र्लॉड डलहौसी कर साम्राज्यवादी होता.
पंजाब व ब्रहयू युध्दांनतर त्याने आपले लक्ष अंतर भारतीय संस्थानांकडे
वळविले. कारण अजूनही देशात अनेक लहान मोठी. विखूरलेली होती ज्यामूळे
कंपनीचे राज्य एकसंघ न राहता तुटक दिसत होते. या संस्थानांना या ना त्या
कारणांनी नष्ट करून भारतात कंपनीचे सामर्थ्यसंपन्न असे साम्राज्य निर्माण
करण्याची डलहौसीची इच्छा होती. भारतातील विविध राज्ये खालसा करण्यासाठी
त्याने पुढील युक्त्या शोधून काढल्या. (१) राजाला प्रत्यक्ष युध्दात
ज्ंिाकणे (२) दत्ताक वारस नामंजूर करणे (३) कंपनीने पूर्वी दिलेल्या पदव्या
व पेन्शन बंद करणे (४) एखाद्या राजयकत्र्यांचा राज्यकारभार अव्यावस्थित
असेल तर ते राज्य खालसा करणे (५) तैनाती फौजेची ठरविलेली खंडणी न दिल्यास
त्या राज्याचा काही मुलुख ताब्यात घेणे अशा विविध कारणांनी त्याने अनेक
राज्ये ब्रिटिश साम्राज्यास जोडली.
- दत्ताक वारस नामंजूर करणे :
या तत्वानुसार कंपनीची सज्ञ्ल्त्;ाा
भारतात स्थापन होण्यापूवर्ी् जी अनेक राज्ये अस्तित्वात होती त्यांना
दत्ताक वारस नामुंजुरीचे तत्व लावावयाचे नाही परंतु जी राज्ये इंग्रजांनी
निर्माण केली त्यांना यात हा नियम लागू करण्याचे ठरविले, पण प्रत्यक्षात
र्लॉड डलहौसीने सरसकट जी संस्थाने दत्ताक नामंजुरीच्या तत्वावर खालसा केली
त्यावरून असे दिसते की त्याने स्वत: केलेला नियम पाळला नाही हिंदू
धर्मशास्त्रानूसार एखाद्या राजास औरस संतती नसल्यास त्याला आपला वंश
चालविण्यासाठी व आई वडिलांच्या मृत्यूनंतरचे संस्कार पार पाडण्यासाठी
दत्ताक पुत्र घेण्याचा विधी ज्यांना मुलबाळ नसेल असे राजे महाराजे पार
पाडीत असत. त्यानंतर या दत्ताक पुत्रास औरस पुत्राचे सर्व अधिकार मिळत असत.
पण हे तत्व डालहौसीने मान्य केले नाही तो म्हणतो की वंश चालविण्यासाठी
दत्तक घेण्याची गरज असल्यास संस्थानिकांनी खुशाल दत्ताक घ्यावा आणि त्यास
आपली वैयक्तीक संपज्ञ्ल्त्;ाी द्यावी, राज्य नाही जर दत्ताक पुत्रास
राज्याचा वारस करण्याचा हेतु असेल तर कंपनी सार्वभौम असल्याकारणाने दत्ताक
घेण्यापूर्वी तिची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. तशी परवानगी न घेतल्यास
सार्वभौम सज्ञ्ल्त्;ाा या नात्याने कंपनी त्या दत्ताकाला राज्याचा वारस
म्हणून मान्यता देणार नाही. या धोरणानुसार त्याने अनेक भारतीय संस्थाने
खालसा केली.
- (१) दत्ताक नामंजुरीच्या या सिध्दान्तानुसार राज्ये खालसा :
(अ) सातारा : इ.स.
१८४८ साली येथील राजा शहाजी भोसले याचा मृत्यू झाला. त्यापूर्वी त्याचा
भाऊ प्रतापसिंह याचाही मृत्यू झाला होता. औरस संतती नसल्यामुळे दोघांनीही
इंग्रज रेसिडेंटसमोर विधियुक्त दत्ताक विधान केलेले होते. पण डलहौसीने या
दत्ताक विधानास परवानगी न देता राज्य खालसा केले.
(ब) नागपूर : इ.स. १८५३ मध्ये येथील राजा तिसरा राघोजी भोसले याचा मृत्यू झाला मृत्यूपूर्व त्याने कंपनीकडे राज्यासाठी दत्ताक घेण्याची परवानगी मागितली होती ती न आल्याने राजाने मृत्यूपूर्वी यशवंतराव नावाच्या मुलास दत्ताक घेण्याची आज्ञम्प्;म्प्;ाा आपल्या पत्नीस कळवली होती. त्यानुसार दत्ताक विधान झाले परंतू डलहौसीने या दत्ताकास परवानगी न देता राज्य लाखसा केले.
(क) झाशी : इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी पेशव्यांचे राज्य खालसा केल्यानंतर झाशीचा प्रदेश ओघाने इंग्रजाकडे आला. तो प्रदेश इंग्रजांनी वंशपरंपरेने राम चंद्रराव नेवाळकर यास इ.स. १८३२ मध्ये बेटिंगने राम चंद्ररावास महाराज ही पदवी दिली त्यांचा इ.स. १८३५ साली मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूनंतर चुलता रघुनाथराव यास इंग्रजांनी गव्हर्नर, पण तोही निपुत्रिक मरण पावल्यामुळे गंगाधरराव हा राजा झाला. इ.स. १८५३ साली त्याचा मृत्यू झाला त्याने राजाने मृत्यूपूर्वी दामोदरराव नावाच्या मुलास दत्ताक घेतले होते. परंतू उलहौसीने या दतकास नकार देऊन झाशीचे राज्य खालसा केले. ज्या राज्यांना औरस संतती नव्हती आणि ज्यांनी मृत्यूपूर्वी हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे कोणालाही दत्ताक घेतले नव्हते अशी अनेक लहान संस्थाने डलहौसीने खालसा केली. उदा. ओर्छा, जेतपूर, संबळपूर, उदयपूर इ.
(ब) नागपूर : इ.स. १८५३ मध्ये येथील राजा तिसरा राघोजी भोसले याचा मृत्यू झाला मृत्यूपूर्व त्याने कंपनीकडे राज्यासाठी दत्ताक घेण्याची परवानगी मागितली होती ती न आल्याने राजाने मृत्यूपूर्वी यशवंतराव नावाच्या मुलास दत्ताक घेण्याची आज्ञम्प्;म्प्;ाा आपल्या पत्नीस कळवली होती. त्यानुसार दत्ताक विधान झाले परंतू डलहौसीने या दत्ताकास परवानगी न देता राज्य लाखसा केले.
(क) झाशी : इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी पेशव्यांचे राज्य खालसा केल्यानंतर झाशीचा प्रदेश ओघाने इंग्रजाकडे आला. तो प्रदेश इंग्रजांनी वंशपरंपरेने राम चंद्रराव नेवाळकर यास इ.स. १८३२ मध्ये बेटिंगने राम चंद्ररावास महाराज ही पदवी दिली त्यांचा इ.स. १८३५ साली मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूनंतर चुलता रघुनाथराव यास इंग्रजांनी गव्हर्नर, पण तोही निपुत्रिक मरण पावल्यामुळे गंगाधरराव हा राजा झाला. इ.स. १८५३ साली त्याचा मृत्यू झाला त्याने राजाने मृत्यूपूर्वी दामोदरराव नावाच्या मुलास दत्ताक घेतले होते. परंतू उलहौसीने या दतकास नकार देऊन झाशीचे राज्य खालसा केले. ज्या राज्यांना औरस संतती नव्हती आणि ज्यांनी मृत्यूपूर्वी हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे कोणालाही दत्ताक घेतले नव्हते अशी अनेक लहान संस्थाने डलहौसीने खालसा केली. उदा. ओर्छा, जेतपूर, संबळपूर, उदयपूर इ.
- पदव्या व पेन्शन समाप्ती:
(अ) पेशवा
: इ.स. १८५१ साली दुसर्या बाजीरावाचा मृत्यू झाला त्याने धोडोपंत र्ऊफ
नानासाहेबास दत्ताक घेतले होते. पित्याच्या मृत्यूनंतर आपणास त्यांची
जहागीर व पेन्शन मिळावी अशी नानासाहेबांनी कंपनीकडे मागणी केली. पण
डलहौसीने ती मागणी अमान्य करुन जहागीर व बाजीरावास दिले जाणारे वार्षिक
पेन्शन देणे बंध केले.
(आ) कर्नाटक :इ.स.
१८५३ साली नबाब गाउझखानाचा मृत्यू झाला. त्याला मुलगा नसल्यामुळे मद्रास
सरकारने केलेल्या शिफारशीवरून डलहौसीने नबाब पद खालसा केले.
(इ) तंजावर : तंजावरच्या शिवाजी राजांना फक्त मुली होत्या मुलगा नव्हता, त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतीर तंजावर खालसा केले.
(ई) मोगल सम्राट : मोगल
सम्राटाचे नामधारी पद समाप्त करण्याचे डलहौसीने ठरविले. पण कंपनीच्या
संचालकांनी या गोष्टीस मान्यता दिली नाही. असे असूनही डलहौसीने सम्राट
बहादूरशहाच्या एका मुलास आपल्या बाजूला वळवून घेतले युवराज पद
मिळविण्याच्या मोहाने या राजपुत्राने दिल्लीचा लाल किल्ला कंपनीस देण्याचे व
कंपनी सांगेल तेथे जाऊन राहण्याचे आश्र्वासन डलहौसीला दिले.
- अव्यवस्था व अराजकतेमुळे राज्य खालसा :
(अ) वर्हाड :
निजामाकडे तैनाती फौजेच्या खर्चाची बरीच बाकी थकली होती ती त्यास देणे
शक्य नसल्यामुळे इंग्रजांनी १८५१ मध्ये पैशांच्या मोबदल्यात वर्हाड व
त्याच्याजवळचा काही प्रदेश निजामाकडून घेतला अशा धोरणामुळे हळूहळू
कंपनीच्या राज्यातील तुटकपणा कमी होत जाऊन ते अधिक एकसंघ व एकरुप होऊ
लागले.
(आ) औंध (अवध) : ईस्ट
इंडिया कंपनीच्या राज्य स्थापनेपासून हे राज्य कंपनीचे मित्र राज्य होते.
डलहौसी भारतात येण्याआधीच येथील नवाब उधळे व व्यसनी असल्यामूळे तेथे
अराजकता निर्माण झाली होती. डलहौसी आला तेव्हा ती अधिकच वाढली होती. तेथील
राज्यकारभारातील अराजकता थांबविण्यासाठी डलहौसीने स्लीमन व आऊटराम या
रेसिडेंटांना पाठवले. पण तेथील परिस्थिती नियंत्रबाहेर असल्याचे त्यांनी
कळवले स्वत: डलहौसीने औध संस्थान खालसा केले. तेथील नवाब वाजीद अलीशहा यास
१२ लक्ष रु पेन्शन दिली. औधचे संस्थान खालसा करणे म्हणजे फार मोठा अन्याय
होता.
(इ) सिक्कीम :
हिमालयाच्या उतारावरील व नेपाळच्या सीमेलगत असलेले हे एक स्वतंत्र राज्य
होते सिक्कीमच्या राजाने तेथील इंग्रज वकिलास बंदिवान करुन दोन इंग्रज
माणसांचा अपमान केला होता. त्यामूळे डलहौसी चिडला व त्याने या राज्यावर
स्वारी करून दाज्र्ंिाल्ंिागचा भाग जिंकून घेतला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा