अनेकदा विद्यार्थ्यांची
अभ्यासाची कल्पना म्हणजे त्या विषयाशी संबंधित विविध पुस्तके वाचणे, अशी
वेगवेगळी पुस्तके मिळवण्यासाठी निरनिराळ्या ग्रंथालयांकडे धाव
घेणे, मित्रवर्गाकडून परीक्षेतील विषयांच्या वेगवेगळ्या नोट्स मिळवणे..
अशी नियोजन-शून्य पळापळ बहुसंख्य विद्यार्थी करत असतात. ज्याचा काहीही
उपयोग नसतो. म्हणूनच आधी अभ्यास ही संकल्पना समजून घ्यायला हवी. अभ्यासाचे
नियोजन करायला हवे. शिस्तशीर - पद्धतशीर अभ्यास करून विषयांवर हुकूमत
मिळवायला हवी.
अभ्यासाचे नियोजन करताना वेळेचे व्यवस्थापन करावे लागते. अभ्यास किती वेळ आणि कुठल्या वेळात करायचा हे निश्चित करावे लागते. वेळेचा परिणामकारक वापर करण्याची काही तंत्रे आहेत. ती शिकून नियोजनपूर्वक अभ्यासाची गुणवत्ता वाढवता येईल. इथे वेळेचे व्यवस्थापन करण्याचे तंत्र अभ्यासावे लागेल. अभ्यासाची गुणवत्ता वाढवावी लागेल.
बदललेल्या अभ्यासक्रमानुसार राज्यसेवा पूर्वपरीक्षेतील यशापयश हे मुख्यत: सीसॅट पेपर २ वर अवलंबून असते. या पेपरमध्ये काही विद्यार्थ्यांना उत्तम गुण मिळतात, तर काही विद्यार्थ्यांना अत्यल्प गुण मिळतात.या पेपरमधील सर्वात त्रासदायक घटक म्हणजे आकलन. या घटकावर सुमारे ४० ते ५० प्रश्न विचारले जातात.
गतवर्षी संघ लोकसेवा आयोगाच्या प्रश्नपत्रिकेतील सीसॅट पेपर-२ संदर्भात सीसॅट पेपर असावा की नसावा, हा घोळ निर्माण झाला होता. तो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संदर्भात उद्भवण्याची शक्यता नाही. म्हणूनच विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच या घटकाच्या तयारीला लागायला हवे. वाचनवेग कसा वाढेल आणि कमीतकमी वेळात एखाद्या घटकाचे आकलन कसे होईल यासाठी आत्तापासूनच प्रयत्न करायला हवा. आकलन या घटकात उताऱ्यांवर आधारित पाच ते सहा प्रश्न दिलेले असतात.
आकलन या घटकात तुमच्या इंग्रजी भाषेचे आकलन कौशल्य जोखणारा उतारा इंग्रजीतून दिलेला असतो. प्रशासकीय क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी भाषेचे ज्ञान तपासण्यासाठी हा उतारा देण्यात येतो. याचा स्तर साधारणत: दहावी-बारावीपर्यंतचा असतो. हे उतारे सरळसोपे असतात. त्यामुळे प्रथम हा उतारा सोडविण्याचा प्रयत्न करावा. कारण यात हक्काचे गुण मिळवण्याची संधी असते.
परीक्षेमधील आकलनविषयक उतारे सोडवताना खालील मुद्दे लक्षात घ्यावेत-

- परीक्षा कक्षात विद्यार्थ्यांवर मानसिक ताण असतो. त्यामुळे अनेकदा घाईगडबडीत माहिती असलेल्या गोष्टींतही विद्यार्थ्यांकडून चुका होतात. आकलन हा घटक असा आहे, ज्यात अधिक गुण मिळविण्याची संधी असते. या घटकाच्या तयारीसाठी कोणत्याही पूर्वज्ञानाची आवश्यकता नसते. यात दिलेल्या उताऱ्यातून उत्तरांची निवड करायची असते. त्यामुळे सर्वप्रथम उताऱ्यांची संख्या किती आहे, लहान उतारे किती व मोठे उतारे किती? इंग्रजी उतारे किती आहेत हे पाहून वेळेचे नियोजन करावे.
- उतारा योग्य गतीने एकाग्र होऊन वाचावा. उताऱ्याचे वाचन अशा रीतीने करावे की उत्तरे वाचण्यासाठी तो वारंवार वाचण्याची गरज पडणार नाही. उतारा वाचताना महत्त्वाचे वाक्य पेन अथवा पेन्सिलीने अधोरेखित करावे. उताऱ्यात लेखकाला काय मांडायचे आहे ते समजून घ्यावे.
- सर्वसाधारपणे उताऱ्यावरील प्रश्न हे पुढील प्रकारचे असतात- उताऱ्याला योग्य शीर्षक द्या, उताऱ्याचा मुख्य आशय स्पष्ट करा, उताऱ्यात दिलेली वस्तुनिष्ठ माहिती शोधा, लेखकाचा दृष्टिकोन स्पष्ट करा, उताऱ्यावरून योग्य तो निष्कर्ष काढा.
- सीसॅट पेपर- २ची प्रश्नपत्रिका सोडवताना 'मराठी आकलनक्षमता' या विभागाला जास्तीत जास्त ५५ ते ६० मिनिटेच देता येतात. या ठरावीक वेळेत सुमारे १०-११ उतारे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात. या सर्व बाबींचा विचार केला तर एक उतारा वाचून त्यावरील प्रश्न सोडविण्यास जास्तीत जास्त सहा ते सात मिनिटांचा वेळ मिळतो.
- सर्वप्रथम उतारा वाचून नंतर प्रश्न सोडवावेत की प्रश्न वाचून उतारा सोडवावा याबाबत मतेमतांतरे आहेत. आपला ज्या पद्धतीने सराव असेल आणि ज्या पद्धतीने कमीतकमी वेळात प्रश्न सोडवून होत असतील, तर ती पद्धत स्वीकारावी.
- प्रश्न वाचून उतारा सोडविल्यास आपल्याला कुठली माहिती उताऱ्यातून जाणून घ्यायची आहे हे समजते आणि आपला वेळ वाचतो. प्रश्न वाचून घेतल्याने उतारा समजणे जास्त सोपे जाते. उतारा वाचताना तो शब्दन्शब्द न वाचता उताऱ्यातील महत्त्वाच्या वाक्यांवर नजर फिरवल्यास आपला वाचनवेग वाढतो.
- प्रथम उतारा वाचून नंतर प्रश्न सोडवणे.
या तंत्राचा वापर करताना विद्यार्थ्यांनी खालील मुद्दे लक्षात घ्यावेत-
- उताऱ्यातील प्रत्येक वाक्याचा अर्थ समजल्याशिवाय पुढच्या वाक्याकडे जाऊ नये.
- उताऱ्यामधील ज्या वस्तुनिष्ठ माहितीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो, ती माहिती अधोरेखित करावी.
- उतारा वाचताना त्याचा सारांश काढावा.
- प्रथम प्रश्न वाचून नंतर उतारा वाचणे.
- या तंत्राचा वापर करताना विद्यार्थ्यांनी खालील मुद्दे लक्षात घ्यावेत-
- प्रश्न वाचताना थेट उत्तर शोधण्याचा प्रयत्न न करता प्रश्नाचे नेमके स्वरूप समजून घ्यावे.
- प्रश्नामधील असे काही महत्त्वाचे शब्द अधोरेखित करावे, ज्यांच्या मदतीने नंतर उतारा झरझर वाचणे सुकर ठरेल.
- जेव्हा एखाद्या वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नाचा संदर्भ उतारा वाचताना येतो, तेव्हा अशा प्रश्नाचे उत्तर लगेचच नमूद करावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा