लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत भूगोल हा महत्त्वाचा अभ्यासघटक आहे. भूगोलाचा
अभ्यासक्रम आणि मागील परीक्षांमध्ये भूगोलावर विचारले जाणारे प्रश्न लक्षात
घेऊन भारताचा भूगोल आणि प्राकृतिक भूगोल या उपघटकांवर प्राधान्याने अभ्यास
करणे सूज्ञपणाचे ठरते.
नागरी सेवा परीक्षेच्या पूर्व आणि मुख्य या दोन्ही टप्प्यांमध्ये भूगोल हा अत्यंत महत्त्वाचा अभ्यासघटक आहे. प्रस्तुत लेखामध्ये पूर्वपरीक्षेसाठी भूगोलाची परिणामकारक तयारी कशी करावी, याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत. पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमातील भारत व जगाचा भूगोल या अभ्यासघटकाचे प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय अशा उपघटकांमध्ये वर्गीकरण करता येईल. इतिहासाप्रमाणे भूगोलाची व्याप्ती मोठी आहे. या विषयाचे स्वरूप semi-scientific असल्याने यातील संकल्पना स्पष्टपणे समजून घेणे श्रेयस्कर ठरते. कारण परीक्षेत येणाऱ्या विश्लेषणात्मक स्वरूपाच्या प्रश्नांमध्ये संकल्पनांचा जास्तीत जास्त आधार घेतला जातो.
मागील चार वर्षांमध्ये परीक्षेत येणाऱ्या प्रश्नांचा कल पाहता भारतीय भूगोलावर सर्वाधिक प्रश्न, त्यापाठोपाठ प्राकृतिक भूगोलावर व सर्वात कमी प्रश्न जगाच्या भूगोलावर विचारण्यात आले आहेत. भूगोलावर दरवर्षी साधारण १० ते १५ प्रश्न येतात. २०१० पूर्वी हे प्रमाण इतर अभ्यासघटकाच्या तुलनेत अधिक होते. तरीसुद्धा नागरी सेवा परीक्षेतील भूगोलाचे महत्त्व अजिबात कमी होत नाही. भूगोलाचे स्वरूप व पेपरमध्ये येणाऱ्या प्रश्नांची संख्या लक्षात घेऊन भारताचा भूगोल, प्राकृतिक भूगोल इत्यादी घटकांचा प्राधान्यक्रमाने विचार केल्यास या विषयाला आपल्या आवाक्यात ठेवणे सोपे जाते.
भारताच्या भूगोल या अभ्यासघटकाची आíथक, सामाजिक, प्राकृतिक व पर्यावरणीय अंगाने तयारी करावी. यामध्ये कृषी, उद्योग वाहतूक, लोकसंख्या, नसíगक साधनसंपत्ती, पाणस्थळे (wetlands), खारफुटी वने (Mangroves), नसíगक आपत्ती इ. मुद्दय़ांची सखोल तयारी महत्त्वपूर्ण ठरते. याबरोबरच भारताचे प्राकृतिक स्थान, भू-आकृती प्रदेश (Physiographic Regions), पश्चिम व पूर्व वाहिनी नद्या, त्यांची उगमस्थाने, उपनद्या, हवामान आदी घटकांची माहिती असावी.
वनस्पती, वनांचे प्रकार, त्यांचे वितरण, जीवावरण राखीव क्षेत्रे, अभयारण्ये इत्यादींच्या माहितीबरोबरच तेथे आढळणारे दुर्मीळ व धोकादायक स्थितीत असणारे (Endangered) प्राणी व वनस्पती यांची नोंद ठेवावी, कारण परीक्षेमध्ये आतापर्यंत रानगाढव (wild ass), मॉनिटर लिझार्ड, लायन टेल्ड मॅकॉक (वानर), घरियाल इ. भारतात आढळणाऱ्या प्राण्यांवर प्रश्न आलेले आहेत. याबरोबर २०१३ मध्ये विषुववृत्तीय वनांची वैशिष्टय़े तर २०१४ मध्ये हिमालयात आढळणाऱ्या वनस्पती यावर प्रश्न विचारले होते.
भारताच्या विविध भागांतील पिके, त्यांचे खरीप, रब्बी आदी प्रकारानुसार वर्गीकरण यांची माहिती महत्त्वपूर्ण ठरते. याबरोबर भारतात आढळणारी खनिजे, नसíगक वायू, खनिज तेल आदी नसíगक संसाधने व ती आढळणारे प्रदेश, विशिष्ट ठिकाणी झालेले उद्योगधंद्यांचे केंद्रीकरण आदी बाबींची माहिती असावी.
जगाच्या भूगोल या अभ्यासघटकावर येणाऱ्या प्रश्नांची नगण्य संख्या पाहता यातील निवडक घटकांवर ध्यान देणे श्रेयस्कर ठरेल. यामध्ये भू-भागाचे वितरण (distribution of Land forms), वनस्पती, हवामानाचे प्रकार त्याचबरोबर, महासागरीय प्रवाह व त्याचा हवामानावर पडणारा प्रभाव याचे अध्ययन करावे. जागतिक भूगोलावरील प्रश्नांना शक्यतो चालू घडामोडींचा संदर्भ असतो. उदा. ऑस्ट्रेलिया येथे क्रिकेट विश्वचषक पार पडला. या वर्षीच्या पेपरमध्ये ऑस्ट्रेलियातील शहरे, नद्या, ग्रेटबॅरियर रीफ इत्यादींवर प्रश्न येण्याची शक्यता असते. याबरोबरच जगातील प्रमुख सरोवरे, समुद्र उदा. कॅस्पियन, काळा समुद्र, प्रमुख नद्या आणि त्यांचे खोरे, नसíगक संसाधनाचा आढळ, भूकंप, त्सुनामीसारख्या नसíगक आपत्ती यांची माहिती महत्त्वपूर्ण ठरू शकते.
भूगोलावर येणाऱ्या प्रश्नाचे साधारण तीन प्रकारांमध्ये वर्गीकरण होऊ शकते. यामध्ये वस्तुनिष्ठ बहुविधानी, जागरुकता आधारित व विश्लेषणात्मक वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे आपल्याला माहिती असणे आवश्यक असते. जागरुकता आधारित प्रश्नांची कोणतीही विशेष तयारी न करता केवळ सभोवतालच्या घडामोडी, वृत्तपत्रे, नकाशा वाचन यातील माहितीच्या आधारे उकल करता येऊ शकते. २०१४ च्या पेपरमध्ये चित्रित बलाक, कॉमन मना व सारस या तीन पक्ष्यांमधील कोणते पक्षी ग्रामीण भागामध्ये चरणाऱ्या गुरांसोबत पाहावयास मिळतात. त्याचबरोबर दुसऱ्या एका प्रश्नामध्ये भद्रचलम, चंदेरी, कांचीपूरम, कर्नाळ या चार शहरांची नावे दिली होती. यापकी कोणती शहरे साडी उत्पादनाशी निगडित आहेत अशा प्रकारचे प्रश्न विद्यार्थी केवळ 'जनरल अवेअरनेस'च्या आधारे सोडवू शकतात.
भूगोलाच्या तयारीमध्ये नकाशा वाचनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आधीच्या अभ्यासक्रमामध्ये नकाशावर आधारित थेट प्रश्न विचारले जायचे, पण गेल्या चार वर्षांपासून असे प्रश्न थेटपणे न येता अप्रत्यक्षपणे येतात. उदा. २०१४ मध्ये टेन डिग्री चॅनेल, अभयारण्याची नावे व संबंधित राज्ये, दक्षिण पूर्व आशियातील चार शहरांची दक्षिण-उत्तर स्थितीत क्रम व तुर्कस्थानचे स्थान कोणत्या दोन समुद्रांच्या मधोमध आहे अशा प्रकारे आलेले होते. यामुळे नकाशा वाचनाकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. परिणामी जगाचा, भारताचा भूगोल अभ्यासताना नकाशा सोबत ठेवल्यास या विषयातील सर्व घटक व संकल्पनांचे आकलन होण्यास व दीर्घकाळ स्मरणात राहण्यासाठी फायदेशीर ठरते.
भूगोलाच्या सर्वागीण तयारीमध्ये अभ्याससाहित्याची निवड निर्णायक ठरते. सर्वप्रथम 'एनसीईआरटी'च्या इयत्ता सहावी ते बारावीच्या क्रमिक पुस्तकांचे सखोल अध्ययन करावे. या पुस्तकामधून भूगोलासारख्या नीरस विषयाची सहज, सोप्या भाषेत मांडणी केली आहे. यामुळे भूगोलातील सर्व संकल्पना, संज्ञा यांचे आकलन होण्यास मदत होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे परीक्षेत येणाऱ्या प्रश्नांचा स्रोत बहुतांश वेळा ही पुस्तकेच असतात. यानंतर 'फिजिकल अँड इकॉनॉमिक जिओग्राफी'- जी.सी. लिओंग हे पुस्तक पुढील वाचनाकरता उपयुक्त ठरेल. यातून प्राकृतिक भूगोल व जगभरातील हवामानाचे प्रकार या घटकाविषयी सविस्तर माहिती मिळते. यासोबतच बाजारात मिळणारा 'ऑक्सफर्ड' किंवा 'ओरिएंट लॉगमन' या प्रकाशनाचा एक 'अॅटलास' घ्यावा.
भूगोलाची तयारी करताना प्राकृतिक भूगोलातील सर्व घटक पक्के केल्यास भूगोलातील इतर संकल्पनांचे आकलन करून घेण्यास साहाय्यभूत ठरते व परीक्षेत येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी तर्क लावण्यात उपयुक्त ठरते. भूगोल व पर्यावरण या दोन्ही घटकांचा निकटचा संबंध असल्याने त्यांची तयारी एकत्रितपणे केल्यास फायदेशीर ठरते. भूगोलाचे अध्ययन करताना या विषयातील सर्व उपघटकांमधील परस्परसंबंध समजून घेतल्यास आपली तयारी अधिक परिणामकारक होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा