Post views: counter

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना



महाराष्ट्रातील इतर स्थानिक डोंगर :
  1. कोल्हापूर - पन्हाळा व ज्योतिबा डोंगर, चिकोरी डोंगर 
  2. नंदुरबार - सातपुडा पर्वताचा भाग, तोरणमाळ डोंगर 
  3. अमरावती - गविलगड टेकड्या व माळघाट डोंगर 
  4. नागपुर - गरमसुर, अंबागड, व मनसर टेकड्या 
  5. गडचिरोली - भामरागड, सुरजगड, चिरोली, चिमुर टेकड्या 
  6. भंडारा - दरेकसा, नावेगाव टेकड्या 
  7. गोंदिया - दरेकसा, नावेगाव टेकड्या
  8. चंद्रपूर - चांदूरगड, पेरजागड 
महाराष्ट्र पठार / दख्खन पठार / देश :
  • महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी 90% क्षेत्र महाराष्ट्र पठाराने व्यापला आहे.
  • लांबी-रुंदी : पूर्व-पश्चिम - 750km. उत्तर-दक्षिण - 700km 
  • ऊंची : 450 मीटर - या पठाराची ऊंची पश्चिमेस (600मी) जास्त व पूर्वेस (300मी) कमी आहे.
  • महाराष्ट्र पठार डोंगररांगा व नद्या खोर्‍यानी व्यापले आहे. 
महाराष्ट्र पठार हे विस्तृत पठार असले तरी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.
  1.  हरिश्चंद्र डोंगररांगेत - अहमदनगर पठार. 
  2.  बालाघाट डोंगर - मांजरा पठार.  
  3.  महादेव डोंगररांगेत : पाचगणी पठार, सासवड पठार, औध पठार, खानापुर पठार, जत पठार.  
  4. सातमाळा डोंगररांगेत - मालेगाव पठार, बुलढाणा पठार.  
  5. सातपुडा डोंगररांगेत - तोरणमाळ पठार, गविलगड.        
पठारांची निर्मिती :
  • महाराष्ट्र पाठाराची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली.
  • 70 दशलक्ष वर्षापूर्वी - भ्रंशमुलक उद्रेक झाला व लाव्हारसाचे संचयन झाले. अशा प्रकारच्या अनेक उद्रेकापासून महाराष्ट्र पठार तयार झाले.
  • या पठारावर अग्निजन्य खडक आढळतात.
  • भुपृष्टावर किंवा कमी खोलीवर आढळणारे 'असिताश्म व कृष्णप्रस्तर' हे दोन प्रकारचे खडक आढळतात.
महाराष्ट्र पठारावर उत्तरेकडून दक्षिणेकडे पुढील खोरी आढळतात.
  1. तापी-पूर्णा खोरे 
  2. गोदावरी खोरे 
  3. प्रणहिता खोरे 
  4. भीमा खोरे
  5. कृष्णा खोरे 
भूगर्भ रचना :
  1. आर्कियन खडक :हा अतिप्राचीन खडक पूर्व विदर्भा, चंद्रपुर, भंडारा, गडचिरोली, नांदेड जिल्ह्याचा पूर्वभाग आणि सिंधुदुर्गातील काही तालुक्यांमध्ये आढळतो. ग्रँनाईट, नीस व शिस्ट प्रकारच्या खडकांपासून बनलेल्या या भुस्तरात लोह खनिजांचे विपुल साठे आहेत.
  2. धारवाड खडक :या श्रेणीच्या खडकांमध्ये ग्रँन्जुलाईट्स, डोलोमाईट, अभ्रक, सिलीमनाईट, हॉर्नब्लेंड, शीष्ट, संगमरवर यांसारखी मौल्यवान खनिजे आढळतात.पूर्व नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातही धारवाड श्रेणीचे खडक आढळतात.पुणे, नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातही हा खडक आढळतो.
  3. कडप्पा श्रेणींचा खडक :महाराष्ट्रातील दक्षिण व पूर्व भागात हा खडक आढळतो.कोल्हापूर जिल्ह्यात या श्रेणीतील खडकात क्वार्टझाईट्स, शेल व चुनखडीचे खडक आहेत.
  4. विंध्ययन खडक :विंध्ययन श्रेणीतील खडक चंद्रपुर जिल्ह्यातच आढळतात.हा खडक सुबक बांधकामासाठी उपयुक्त असून दर्जेदार व टिकाऊ असतो.
  5. गोंडवना खडक :अप्पर पॉलिओझाईक नंतरच्या कालखंडात व्दीपखंडावर अनेक बदल होऊन दख्खनच्या पठारावर स्थानिक पातळीवर हालचाली निर्माण झाल्या. खोर्‍यांच्या आकाराचा खोलगट भाग निर्माण होऊन तेथे नद्यांनी आणलेल्या गाळाचे संचयन झाले.कालांतराने त्यात प्राणी, वनस्पतीचे अवशेष व जंगले गाडली गेली व त्याचे दगडी कोळशात रूपांतर झाले.त्याला 'गोंडवना खडक' असे म्हणतात. चंद्रपुर, यवतमाळ, गडचिरोली व अमरावती जिल्ह्यात अप्पर गोंडवना खडक आढळतात.

सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट 
  1. स्थान : महाराष्ट्राच्या पश्चिम भागातअरबी समुद्राला समांतर 40 ते 80 km. अंतरावर दक्षिनोत्तर सह्याद्रि पसरला आहे.यालाच पश्चिम घाट या नावाने ओळखले जाते.
  2. विस्तार : उत्तरेस तापी नदीच्या खोर्‍यापासुन दक्षिणेस कन्याकुमारीपर्यन्त 
  3. लांबी :दक्षिणोत्तर = 1600 km., महाराष्ट्रातील लांबी = 440 km.
  4. उंची : सरासरी उंची 900 ते 1200 मी.
  5. उतार : या पर्वताचा पश्चिम उतार अतिशय तीव्र व पूर्व उतार एकदम मंद स्वरूपाचा आहे.
  6. रुंदी : सह्याद्रीची रुंदी उत्तरेस जास्त व दक्षिणेस कमी आहे. तसेच उत्तरेस उंची जास्त व दक्षिणेस कमी आहे.     
सह्याद्रि पर्वत : सह्याद्रि पर्वताची निर्मिती 'प्रस्तरभंग' प्रक्रियेतून झाली. या प्रक्रियेत दख्खनच्या पठाराचा पश्चिमेकडील भाग मोठ्या प्रमाणात खचला. त्याचबरोबर पश्चिम किनारा व किनार्‍यालगतचा सागरतळ मोठ्या प्रमाणावर खचला.
  1. स्थान : दख्खनच्या पठाराचा पश्चिमेकडील न खचलेला भाग म्हणजेच सह्याद्रि.यामुळे सह्याद्रि पश्चिमेकडून अत्यंत उंच व सरल भिंतीसारखा दिसतो. पठाराकडून मात्र अत्यंत मंद उताराचा दिसतो.
  2. सह्याद्रि पर्वतावरील भुरुपे :सह्याद्रि पर्वत हा प्राचीन असून या पर्वताची बर्‍याच ठिकाणी झीज झाल्याने कमी - अधिक उंचीची ठिकाणे तयार झाली आहेत. उदा. शिखरे, घाट, डोंगर, उंचीवरील सपाट प्रदेश इ.
शिखरे (महाराष्ट्रातील) (उंचीनुसारक्रम) :

            शिखर               ऊंची             जिल्हा  
           कळसूबाई         1646मी.           अहमदनगर 
           साल्हेर               1567मी.           नाशिक 
           महाबळेश्वर        1438मी.            सातारा 
           हरिश्चंद्रगड         1424मी.             नगर 
           सप्तश्रुंगी            1416मी.           नाशिक 
           तोरणा               1404मी.             पुणे 
           अस्तंभा                   -                 नंदुरबार
           त्र्यमबकेश्वर       1304मी.           नाशिक 
           तौला                1231मी.            नाशिक 
           बैराट                1177मी.            गविलगड टेकड्या अमरावती 
           चिखलदरा        1115मी.            अमरावती 
           हनुमान             1063मी.            धुले 


पठारे (थंड हवेचे ठिकाण) :
सह्याद्रि पर्वताच्या व त्यांच्या शिखरांच्या काही भागात उंच ठिकाणी सपाट पठारी प्रदेश आहेत; त्यांनाच घाटमाथा असे म्हणतात.
    ठिकाण          जिल्हा          पर्वतप्रणाली
    आंबोळी          सिंधुदुर्ग          सह्याद्रि 
    महाबळेश्वर       सातारा         सह्याद्रि 
    पाचगणी          सातारा          सह्याद्रि 
    माथेरान          रायगड          सह्याद्रि 
    पन्हाळा          कोल्हापूर        पन्हाळा डोंगर
    तोरणमाळ      नंदुरबार         तोरणमळा डोंगर 
    चिखलदरा      अमरावती       गाविलगड टेकड्या 
    नर्नाळा          अकोला           गाविलगड टेकड्या 
    म्हैसमाळ      औरंगाबाद       वेरूळ डोंगर

२ टिप्पण्या: