परीक्षेच्या या अंतिम
टप्प्यात प्रश्नपत्रिका सोडवण्याची रणनीती कशी असावी याविषयीचे कानमंत्र.
बहुतेक वेळा परीक्षा हॉलच्या बाहेर आल्यानंतर उमेदवारांच्या लक्षात येते की, आपण अभ्यासलेले, माहीत असलेले, सोपे प्रश्न सोडवण्यात चुका केल्या आहेत. साधे-सोपे प्रश्न निसटले कसे याचे उत्तर सापडत नाही आणि हात डोक्यावर मारून घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा चुका होतात प्रामुख्याने तीन कारणांनी. पहिले म्हणजे परीक्षा हॉलमध्ये वेळेच्या ताणाचे व्यवस्थापन करण्यात आपण कमी पडतो आणि वेळेच्या ताणामुळे उत्तर चुकतो. दुसरे कारण म्हणजे फाजील आत्मविश्वासामुळे पूर्वग्रहाला बळी पडतो आणि चुकतो आणि तिसरे कारण म्हणजे घाईघाईत प्रश्न वाचल्यामुळे चुकीचे उत्तर मार्क करतो. हे टाळण्यासाठी प्रत्येक प्रश्न गांभीर्यपूर्वक वाचावा. प्रश्न सोपा, माहीत असणारा असला, तरीही!

- प्रश्नांचे वाचन महत्त्वाचे
वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या
प्रश्नपद्धतीत प्रश्नासोबत उत्तरांचे चार पर्याय दिलेले असतात. चार
पर्यायांपकी एक अचूक आणि तीन चुकीचे पर्याय असतात. प्रश्न व्यवस्थित वाचला,
समजून घेतला, काय विचारले आहे हे लक्षात आले की बरोबर उत्तरापर्यंत
पोहोचणे सोपे जाते. पण बहुतांश उमेदवारांना लवकर प्रश्न वाचून उत्तरांचे
पर्याय पाहण्याची घाई झालेली असते. या घाईमुळे प्रश्न व्यवस्थित वाचला जात
नाही. प्रश्न वाचण्यातली अशी गडबड महागात पडू शकते. उत्तरांचे पर्याय
वारंवार वाचून, अचूक उत्तर देता येणार नसते, हेच मुळात उमेदवारांना उमजत
नाही. दोन-चार वेळा उत्तरे वाचून बरोबर-चूक उत्तर शोधणे अवघड असते.
त्याऐवजी प्रश्न जास्त वेळा वाचला की बरोबर उत्तर निवडणे सोपे होते हे
परीक्षार्थीनी लक्षात घ्यावे. अचूक उत्तर, हे पर्यायांमध्ये नाही तर
प्रश्नात दडलेले असते. यासाठी प्रश्न समजल्याशिवाय उत्तरांचे पर्याय पाहू
नयेत. प्रश्न वाचनातील घाई, अपघातास निमंत्रण देते म्हणून आपली योजना
'सुरक्षित' असायला हवी.
परीक्षा हॉलमधील पर्यवेक्षकाच्या सूचनांवर फारसे विसंबून राहू नका. अनेकदा पर्यवेक्षकांना प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकेवर नोंदवायच्या माहितीबद्दल पुरेशी माहिती नसते. यातून चुकीच्या सूचना दिल्या जातात आणि उमेदवारांचे नुकसान होते. गेल्या १५-२० वर्षांतील अनेक उमेदवारांच्या अनुभवाअंती ही सूचना देत आहोत. हॉलतिकीट आणि उत्तरपत्रिकेच्या मागे दिलेल्या सूचना ग्राह्य माना. ऐन वेळेच्या माहितीवर विसंबून गोंधळात पडण्यापेक्षा पूर्वतयारीनिशी परीक्षेला सामोरे जावे. परीक्षेसाठी शुभेच्छा ....!!

- परीक्षागृहातील वेळेचे नियोजन
परीक्षागृहामध्ये उत्तरपत्रिका मिळाल्यावर तुमचा क्रमांक, विषय, केंद्र इत्यादी माहिती खाडाखोड न करता काळजीपूर्वक भरून घ्यावी. बॉक्समध्ये लिहिलेले आकडे आणि अक्षरे व त्यांच्या खालील
माìकग यात फरक असू नये याची काळजी घ्यावी. लक्षात ठेवा, ही उत्तरपत्रिका ओएमआर शीट असल्याने त्यात खाडाखोड झाली, ती फाटली, चुरगळली तर ती तपासली जात नाही.
माìकग यात फरक असू नये याची काळजी घ्यावी. लक्षात ठेवा, ही उत्तरपत्रिका ओएमआर शीट असल्याने त्यात खाडाखोड झाली, ती फाटली, चुरगळली तर ती तपासली जात नाही.
- प्रश्नपत्रिका मिळाल्यावर तिचा कोड आधी उत्तरपत्रिकेत नोंदवा.
- संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचत बसू नका. हातात आल्यावर ती लगेचच सोडवायला सुरुवात करा. जे प्रश्न सोडवता येतात ते सोडवून पेन्सिलने त्याच्या पर्यायावर खूण करत पुढे जा.
- एखाद्या प्रश्नाबाबत संभ्रम असेल, अवघड वाटला असेल तर त्या प्रश्नक्रमांकावर खूण करून पुढच्या प्रश्नाकडे वळावे. असे करत प्रश्न सोडवण्याची पहिली फेरी संपवा. जेवढे प्रश्न सोडवले आहेत त्या पर्यायांचे उत्तरपत्रिकेत अचूक माìकग करून घ्या.
- आता दुसरी फेरी. अवघड वाटणारे प्रश्न सोडवायचा पुन्हा प्रयत्न करा. आधीच अशा प्रश्नांवर खुणा केल्याने हे प्रश्न शोधत बसण्यात वेळ वाया जात नाही.
- थोडासा गोंधळ असणारे ओळखीचे प्रश्न सोडवताना आपल्या अंत:प्रेरणांवर विश्वास ठेवावा. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून अशी बाब सामोरी आली आहे की विद्यार्थ्यांला सर्वात पहिल्यांदा जे उत्तर योग्य आहे असे वाटलेले असते, तेच बहुतेकदा बरोबर असते.
- अवघड वाटणारे प्रश्न सर्वात शेवटी सोडवायचा प्रयत्न करा. पण जोपर्यंत आपण 'शोधलेले' उत्तर बरोबर आहे याची खात्री वाटत नाही तोपर्यंत उत्तरपत्रिकेत माìकग करू नये.
- अजिबातच न येणाऱ्या प्रश्नांची काहीबाही उत्तरे देण्याची चूक करू नका. अन्यथा नकारात्मक गुणांची शिक्षा महागात पडू शकते.
- एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट- एमपीएससीच्या उत्तरपत्रिका या
- नॉन ओएमआर शीट स्वरूपाच्या असतात. त्यांचे माìकग बॉलपेनने करायचे असते. त्यामुळे काळजीपूर्वक माìकग करायला हवे.
- एकापेक्षा जास्त गोळे रंगवल्यास ते उत्तर तपासले जात नाही. त्यामुळे 'चुकून' तुम्ही चुकीचा गोळा रंगवला असेल तर लक्षात आल्याबरोबर त्याच्या शेजारचा गोळाही रंगवून टाका. जेणेकरून नकारात्मक गुणांचा फटका बसणार नाही.
- ओएमआर शीटची काळजी
पूर्वपरीक्षेत
तुम्ही उत्तीर्ण होणार की अनुत्तीर्ण हे ठरवते तुमची ओएमआर शीट. 'ओएमआर
शीट'वर तुम्ही रंगवलेले गोळे तुमचे भविष्य ठरवतात. म्हणूनच ही उत्तरपत्रिका
सावधपणे हाताळा. १२० मिनिटांच्या परीक्षेत १०० गोळे रंगवायला किमान २० मिनिटांचा वेळ लागतो. हा राखीव वेळ काळजीपूर्वक वापरायला हवा. कारण फक्त एका प्रश्नाचा क्रम चुकला की त्या पुढचा सगळाच क्रम चुकत
जातो. परिणामी, पूर्वपरीक्षेत यशस्वी होण्याचा प्रयत्न फसू शकतो. यासाठी
पूर्वतयारीचा उत्तम पर्याय म्हणजे सराव करताना ओएमआर शीटचा वापर करा!
Source : Loksatta.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा