चालू घडामोडी एप्रिल २०१५
- ८८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन:-
- ३-५ एप्रिल २०१५,घुमान(पंजाब)
- ग्रंथदिंडी : विशेष सहभाग पद्मश्री सुरजितसिंग पातर
- ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन : उद्घाटक : फ.मुं. शिंदे (अध्यक्ष ८७ वे अ.मा. साहित्य संमेलन, सासवड)
- साहित्य संमेलनाचे उद्घाटन (श्री गुरूनानक देवजी सभामंडप) अध्यक्ष : प्रकाशसिंह बादल, मुख्यमंत्री,
- उद्घाटक : नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते पंजाबी लेखक गुरू दयालसिंग, फ.मुं. शिंदे, डॉ. सदानंद मोरे. प्रमुख उपस्थितीः शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, उद्धव ठाकरे.
- अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य
- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे
- घुमान येथील मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने संत नामदेवांची आठवण कायम रहावी, यासाठी पंजाब सरकारने त्यांच्या नावाने घुमानमध्ये कोणत्या नवीन कॉलेजची घोषणा केली आहे?
- घुमान येथील मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठीतील पहिल्या व एकमेव अशा कोणत्या मोबाइल विश्वकोशाचे प्रकाशन करण्यात येणार आहे?
- मार्च २०१५ पर्यंतच्या आकडेवारीच्या आधारावर अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणांसाठी काम करणा-या इंटेलसेंटर या कंपनीने जाहीर केलेल्या सामान्य नागरी जीवन जगण्यासाठी सर्वात धोकादायक असणा-या देशांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर असणारा देश कोणता?
>कंट्री थ्रेट इंडेक्सच्या (सीटीआय) आधारावर
- 'इंटरनॅशनल एअर ट्रान्स्पोर्ट असोसिएशन' चा अहवाल:-
- फेब्रुवारी २०१५अखेर जगभरातील प्रवासी विमान वाहतुकीमध्ये ६.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. .
- देशांतर्गत प्रवासी विमान वाहतुकीमध्ये १४.८ टक्क्यांची वाढ झाली असून भारतात झालेली वाढ जगभरातील अन्य देशांतील वाढीपेक्षा अधिक.
- वाढ झालेल्यांमध्ये भारतापाठोपाठ ब्राझील आणि चीनचा समावेश आहे.
- विदेश व्यापारनीती (२०१५-२०)
- २०१९-२० पर्यंत निर्यात ४६६ अब्ज डॉलरवरून ९०० अब्ज डॉलर नेण्याचे टार्गेट
- जागतिक निर्यातील भारताचा वाटा २ टक्क्यांवरून ३.५ टक्क्यांवर नेणे.
- व्यापारधारित निर्यात योजना आणि सेवाधारित निर्यात योजना सुरू
- स्थानिक कच्चा माल आणि श्रमाचा वापर करून मूल्यवर्धिकत उत्पादनांची निर्यात केल्यास बक्षीस
- एसईझेडसाठी अधिक विशिष्ट प्रोत्साहने
- देशांतर्गत भांडवली वस्तू उत्पादनांना प्रोत्साहन
- विदेश व्यापारनीती 'मेक इंडिया', डिजिटल इंडिया, स्किल इंडियाशी सलग्न करणार
- आयात शुल्क, उत्पादन शुल्क आणि सेवा कर भरण्यासाठी ड्युटी क्रेडिट स्क्रिप्सचा (आयात वस्तूंसाठी बँकेकडून दिले जाणारे विशिष्ट रकमेची पावतीपत्र) वापर सोपा करणार
- निर्यात प्रोत्साहन मोहिमेत राज्य सरकारांचाही समावेश होणार
- विदेश व्यापारनीतीचा आढावा दरवर्षी न घेता अडीच वर्षांनी घेतला जाणार
- संरक्षण, शेतीमाल आणि पर्यावरणस्नेही उत्पादनांच्या निर्यातीसाठी मोठ्या स्वरूपात साह्य
- संपूर्ण जगात तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या आजारांची दखल घेत जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ)१८० देशांशी करार केला आहे.तंबाखूबाबत जनजागृती करणाऱ्या देशांमध्ये भारताचा क्रमांक जगात १३६वा आहे तर जगात पहिल्या क्रमांकावर असणारा देश कोणता?
- डब्ल्यूएचओ मार्गदर्शक तत्त्वानुसार तंबाखूच्या पुडीवरील ८५ टक्के जागा वैधानिक इशाऱ्याने व्यापलेली असणे आवश्यक आहे. पण भारतात वैधानिक इशारा केवळ पुडीच्या एका बाजूला फक्त किती टक्के जागेत छापला जात आहे?
- तंबाखूच्या विरोधात जनजागृती करणार्या 'पेस' या संस्थेचा फुलफॉर्म काय आहे?
- भारतात पुरुषांमध्ये कॅन्सरने होणारे सर्वाधिक मृत्यू तोंडाच्या कॅन्सरने झाल्याचे निरीक्षण कोणत्या जगविख्यात वैद्यकीय नियतकलिकामध्ये नोंदवण्यात आले आहे.
- भारतीय डाक विभागाची 'मनी आॅर्डर' ही १३५ वर्षांची जुनी सेवा कधीपासून बंद करण्यात आली आहे?
- राज्यातील ६२ तालुक्यांमध्ये ०१ एप्रिल २०१५ पासून कम्प्युटराइज्ड सातबारा उपलब्ध होणार असून अन्य तीनशे तालुक्यांमध्ये या योजनेचा 'ट्रायल रन' सुरू होत आहे.संपूर्ण राज्यभरात ही योजना कधी सुरू होण्याची तयारी करण्यात आली आहे?
- भारतीय टपाल खात्याच्या 'माय स्टॅम्प' या योजनेंतर्गत ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विशेष टपाल तिकीट प्रसिद्ध करण्यात आले असून साहित्य संमेलनाच्या इतिहासात प्रथमच संमेलनाचे टपाल तिकीट प्रसिद्ध झाले आहे? पाच रुपयांच्या या तिकिटावर संमेलनाच्या बोधचिन्हासह कोणत्या फुलाचा समावेश करण्यात आला आहे?
- शालिनीदेवी चिंतामणी कापसे मानवधर्म सेवा प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा भगवान महावीर मानवधर्म अहिंसा गौरव पुरस्कार यावर्षी कोणास प्रदान करण्यात येणार आहे?
- दुचाकी वाहननिर्मितीतील आघाडीच्या हिरो इलेक्ट्रिकने तीनचाकी रिक्षा वाहन प्रकारात पदार्पण केले असून त्यांनी कोणत्या नावाने इलेक्ट्रिक रिक्षा तयार केली आहे?
- ई-कॉमर्स क्षेत्रातील कोणत्या बलाढय़ कंपनीने वस्तूंच्या वितरणासाठी ड्रोनचा वापर करण्याचे ठरवले आहे?
- सध्या इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रापेक्षा अधिक चांगल्या दर्जाची मतदान यंत्रे वापरण्याचा विचार निवडणूक आयोगाने चालवला असून देशात कोणती मशीन वापरण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाने कायदा खात्यााला दिला आहे?
- बिहारमधील गया येथील मंगलागौरा मंदिरात भिका-यांनी भिका-यांसाठी स्वत:ची एक सहकारी बँक काढली असून या बँकेचे नाव काय आहे?
- कोणत्या देशाने ‘झीरो फिगर’ मॉडेल्सना बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे?
- नुकत्याच संपलेल्या २०१४-१५ या आर्थिक वर्षात भांडवली बाजारात परदेशी गुंतवणुकीने विक्रमी स्तर गाठला असून ३१ मार्चअखेपर्यंत किती कोटी रुपयांचा ओघ राहिला आहे?
३६) कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) ऑफस्पिनर सुनील नारायणने बीसीसीआयच्या आदेशाप्रमाणे नुकतीच चेन्नईच्या कोणत्या वैद्यकीय महाविद्यालयात गोलंदाजी वैधतेची चाचणी दिली?
== सर रामचंद्र वैद्यकीय महाविद्यालय
- आयपीएल चे मागील विजेते:-(वर्ष-विजेते-उपविजेते)
- २००८-राजस्थान रॉयल्स-चेन्नई सुपर किंग्ज
- २००९-डेक्कन चार्जर्स-बंगलोर रॉयल चॅलेंजर्स
- २०१०-चेन्नई सुपर किंग्ज-मुंबई इंडियन्स
- २०११- चेन्नई सुपर किंग्ज-बंगलोर रॉयल चॅलेंजर्स
- २०१२ कोलकाता नाईट रायडर्स-चेन्नई सुपर किंग्ज
- २०१३-मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्ज
- २०१४-कोलकाता नाईट रायडर्स-किंग्ज इलेवन पंजाब
- देशभर थ्रीजी, फोरजी नेटवर्क आणि वायफाय हॉटस्पॉटची उभारणी करण्यासाठी आगामी दोन ते तीन वर्षांमध्ये कोणती कंपनी सात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे?
- एखाद्या कंपनीने केलेल्या विनंतीनुसार एखादी बँक संबंधित कर्मचाऱ्याचे खाते सील करू शकत नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कोणत्या कोर्टाने दिला आहे?
- ऑलिम्पिक स्पर्धा:= २०१६:-ब्राझिलच्या रिओ डी जानेरोमध्ये होत आहे तर २०२०चे ऑलिम्पिक टोकियो (जपान) मध्ये
- अंतराळातील ग्रहाचे नामकरण केलेला पहिला भारतीय खेळाडू कोण?
>ग्रहाचे नाव:-विशि-आनंद- ४५३८
>मंगळ आणि गुरू यांच्यामधील या लहान ग्रहाचा शोध १० ऑक्टोबर १९८८ ला लागला होता. जपानच्या आयची प्रांतातील टोयोटातील खगोल संशोधक केंजो सुझुकी यांनी तो शोधला
>रशियाचा अलेक्झांडर अलेखिन व अनातोली कार्पोव्ह,ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन, स्पेनचा राफेल नदाल व स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर या खेळाडूंच्या नावानेही ग्रहांचे नामकरण झाले आहे.
- अर्जेटिंना आणि चिली दरम्यान असलेल्या पर्वतरांगांमध्ये गिर्यारोहणावेळी बेपत्ता झालेल्या कोणत्या भारतीय गिर्यारोहकाचा मृतदेह नुकताच सापडला आहे?
>मुळचा आंध्र प्रदेशातील नेळ्ळोर येथील रहिवासी असलेला मल्ली बाबू याने आयआयटी खरगपूरमधून पदवी मिळविली होती. त्याने २००६ मध्ये १७२ दिवसांत सात शिखरे सर केली होती. त्यामुळे त्याची ओळख ‘७ समिटर‘ अशी झाली होती.
- सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) कृष्णा-गोदावरी (केजी) खोऱ्यातील केजी-डी-५ पट्ट्यात तेल व गॅसचे उत्पादन सुरू करण्यासाठी किती हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे?
- सोशल मीडिया गेल्या काही दिवसांपासून चर्चेत व वादग्रस्त असलेला दीपिका पादुकोणची शॉर्ट फिल्म ‘माय चॉईस’चे निर्माते कोण आहेत?
>'वो इंडिया'सोबत दीपिकाने हा व्हिडीओ शूट केला आहे,
Nice info... Thanks
उत्तर द्याहटवा