Post views: counter

General MPSC Book List

मित्रांनो आपल्यापैकी बराच जन मला MPSC साठी उपयुक्त पुस्तकांची यादी माहिती विचारात असतो त्या सर्वांसाठी मी काही उपयुक्त पुस्तके सुचवत आहे. ... 
MPSC Book List


MPSC च्या परीक्षेंसाठी काही उपयुक्त संदर्भ ग्रंथे:

• पंचायत राज: K'सागर प्रकाशन (राज्य शासनाने पंचायत व्यवस्थेवरील उत्कृष्ट संदर्भ ग्रंथ असा मान दिलाये)
पंचायत राजसाठी नुसता ह्या एका पुस्तकाचा अभ्यासही पुरेसा ठरू
शकतो यात दुमत नाही.



• इतिहास: जयसिंगराव पवार लिखित 'भारतीय स्वातंत्र्य
चळवळीचा इतिहास', डॉ अनिल कटारे, श्रीनिवास सातभाई लिखित पुस्तके अतिशय उपयुक्त आहे. बिपीन चंद्र यांनी लिहिलेले ‘इंडिया सिन्स इंडिपेंडन्स, त्याशिवाय ग्रोवर व बेल्हेकर लिखित ‘आधुनिक भारत’ या ग्रंथातील निवडक प्रकरणे अभ्यासावीत. भिडे-पाटील यांनी लिहिलेले ‘महाराष्ट्रातील समाज सुधारणेचा इतिहास’, पाचवी ते बारावीची इतिहासाची क्रमिक पुस्तके यांचा पायाभूत संदर्भ म्हणून आधार घ्यावा. स्वातंत्र्योत्तर भारतीय इतिहासा साठी रामचंद्र गुहा यांचा ‘गांधींनंतरचा भारत’ हा ग्रंथही अत्यंत उपयुक्त आहे.

Source: www.eMPSCkatta. blogspot.in
• राज्यशास्त्र: राज्यशास्त्रा च्या अभ्यासा साठी बी. एल भोले तसेच घांगरेकर यांची पुस्तके उपयुक्त ठरतात, तसेच बी पी पाटील यांचे पुस्तक आकलनास सोपे आहे.

• भूगोल: NCERT ची ५ वी ते १२ वी पर्यंतची पुस्तके;
भूगोलाची मूलतत्त्वे खंड १, भारताचा भूगोल,
महाराष्ट्राचा भूगोल ही सवदी लिखित व संपादित पुस्तके.
भूगोलाचा अभ्यास हा नकाशा वाचनाद्वारे अधिक रसपूर्ण व सुलभ बनविता येतो. प्रा. कार्लेकर यांचे ‘दूरसंवेदन’ हे सुलभ भाषेतील पुस्तक.

• विज्ञान: रंजन कोळंबे, विशाल मने, चंद्रकांत gore
यांची विज्ञानाविषयी संदर्भ ग्रंथे.

• अर्थशास्त्र: BA ची Eco विषयाची पुस्तके, किरण देसले, रंजन कोळंबे यांच्या पुस्तकांचा अभ्यास केल्यास
अर्थशास्त्र सुलभ पणे समजण्यास मदत होते. काटे-भोसले यांचे पुस्तक ही उपयुक्त आहे. बँकिंग
क्षेत्राच्या अभ्यासा साठी BSC प्रकाशनाचे मासिक अतिशय उपयुक्त ठरेल.
Source: www.eMPSCkatta. blogspot.in

• गणित - बुद्धीमत्ता: BSC प्रकाशनाचे पुस्तके, study circle चे अंकगणित संपूर्ण मार्गदर्शक, प्रतियोगिता दर्पण चे numerical ability तसेच mental ability & reasoning.

• चालू घडामोडी:
सकाळ, मटा, लोकसत्ता हे दैनिक;
‘परिवर्तनाचा वाटसरू’ हे पाक्षिक; ‘लोकराज्य’ व ‘योजना’ ही मासिके, युनिक प्रकाशनाचे 'महाराष्ट्र वार्षिकी', Career academy चे चालू घडामोडी हे मासिक.

संदर्भाचे वाचन करताना सूक्ष्म स्वरूपातील नोट्सची तयारी, महत्त्वाची कात्रणे कापून ठेवणे आणि एकाच मुद्याच्या विविध आयामासह मांडलेल्या विविध मत- मतांतराच्या नोट्स तयार करणे, या बाबींवर भर द्यावा.
यशाला शोर्टकट नसतो, abhyasala पर्याय नाही. जितके जास्त वाचाल तितका स्वत:चा आत्मविश्वास वाढेल.

    Source: www.eMPSCkatta. blogspot.in

1 टिप्पणी: