जगाचा भूगोल : युरोप खंड
युरोपे |
राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा महिना जसाजसा जवळ येईल तसतसे राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी तयारी करणाऱ्या परीक्षार्थीच्या मनावर ताण वाढण्यास सुरुवात होते. जे विद्यार्थी सलग तीन ते चार वर्षांपासून या परीक्षांसाठी तयारी करत आहेत,मात्र कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यांना यश मिळाले नाही,अशा विद्यार्थ्यांच्या मनावर परीक्षेचे दडपण अधिक असते. पण हे लक्षात ठेवा की,तणावग्रस्त परिस्थितीत केलेले सोपे कामदेखील यशस्वी होत नाही. योग्य नियोजन,योग्य संदर्भसाहित्याचा वापर आणि वेळेचे काटेकोर नियोजन केल्यास या परीक्षेत यश मिळवणे शक्य आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे स्वरूप १८० अंशात बदलला आहे,याची दखल विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अभ्यास करताना लक्षात घ्यावी.या परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार भूगोल या घटकात जागतिक भूगोलाचा अभ्यास समाविष्ट केलेला आहे.
जगाचा भूगोल अभ्यासताना आपल्याकडे जगाचा नकाशा असणे आवश्यक आहे. वेळ मिळेल तेव्हा जगाच्या नकाशात महत्त्वाची शहरे,डोंगररांगा,नद्या तसेच वृत्तपत्रांत एखाद्या शहराचा उल्लेख आला असेल तर ते शहर न्याहाळावे,म्हणजे अभ्यास लक्षात ठेवणे सोपे होते तसेच अभ्यास रंजकही होतो. जगाचा अभ्यास खंडांनुसार केल्याने तो सोप्या पद्धतीने होतो. उदा. आशियाखंड अभ्यासताना आशिया खंडातील देश,तिथल्या डोंगररांगा,नद्या,हवामान,आढळणारी खनिज संपत्ती व वाहतूक प्रणाली याचा अभ्यास करावा. आज आपण युरोप खंड अभ्यासणार आहोत.
युरोप खंडयुरोप हा जगातील सर्वाधिक दाट लोकवस्तीचा,मोठय़ा प्रमाणावर औद्योगिकीकरण झालेला खंड आहे. त्याच्या उत्तरेला बेरेन्टस् समुद्र,पश्चिमेला अटलांटिक महासागर आणि दक्षिणेला भूमध्य समुद्र आहे. ग्रेट ब्रिटन,आर्यलड आणि आइसलंड ही युरोपातील प्रमुख बेटे आहेत. याशिवाय ओर्कने,शेटलँड,फेरोस,सिसिली,साíडना इ. अन्य लहान बेटे आहेत.
युरोप खंडातील महत्त्वाच्या नद्या:
- पो नदी - इटलीमधून वाहणाऱ्या या नदीच्या किनाऱ्यावर व्हेनिसशहर वसलेले आहे.
- तिबर नदी - ही नदी इटलीतून वाहते. रोम शहर या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे.
- होर्न नदी - ही नदी स्वित्र्झलडमधील जिनिव्हा सरोवरातून वाहत पुढे भूमध्य सागराला जाऊन मिळते.
- डॅन्युब नदी -ही जगातील एकमेव नदी अशी आहे,जी आठ देशांमधून वाहात,मध्य युरोपातून वाहतपुढे काळ्या समुद्राला जाऊन मिळते. या नदीच्या किनाऱ्याला व्हिएन्ना,बुडापेस्ट,बेल्ग्रेड इ. महत्त्वाची शहरे वसलेली आहेत.
- व्होल्गा नदी - ही युरोपातील सर्वात लांब नदी आहे. (३६९० कि.मी.)
स्कँडिनेव्हियन देश - युरोपातील आइसलँड,नॉर्वे,स्विडन,फिनलँड,डेन्मार्क या देशांना स्कँडिनेव्हियन देश असे म्हणतात.
- फिनलँड - फिनलँड हा (रशिया वगळून) युरोपातील पाचवा क्रमाकांचा देश आहे. इमारती लाकूड आणि कागदाच्या उत्पादनात फिनलँड हा आघाडीचा उत्पादक आहे. येथील अर्थव्यवस्था मोठय़ा प्रमाणावर वनोद्योगावर आधारित आहे. लाकडाची प्रक्रिया,लाकडाचा लगदा आणि कागद बनवणे हा येथील महत्त्वाचा उद्योग आहे. सरोवर आणि बेटांचा देश असे फिनलँडचे वर्णन केले जाते. फिनलँडची राजधानी हेलसिंकी आहे.
- आइसलँड - ग्रेट ब्रिटननंतर आइसलँड हे युरोपातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे बेट आहे. उत्तर अटलांटिक महासागरात आíक्टक वर्तुळाच्या दक्षिणेला लगेच असलेले हे बेट नॉर्वेच्या पश्चिमेलाआहे. राजधानी रेकजाविक (Reykjavik)ही राजधानी जगातील सर्वात उत्तरेकडील असलेली राजधानी आहे.
- नॉर्वे - या देशाचा उल्लेख'मध्यरात्रीच्या सूर्याचा देश'असा केला जातो. उत्तर समुद्रामुळे ब्रिटन आणि नॉर्वे एकमेकांपासून अलग झालेले आहेत. या देशात कोळसा व खनिज तेल फारच कमी प्रमाणात सापडत असल्याने या देशाने जलविद्युत शक्तीचा वापर योग्य पद्धतीने केलेला आहे. राजधानी ओस्लो हे नॉर्वेतील महत्त्वाचे बेट आहे. नॉर्वेच्या उत्तरेला लोफोटन द्विपसमूहअसून या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर कॉड माशांची शिकार होते.
- स्वीडन - स्वीडन हा सर्वात मोठा स्कॅन्डिनेव्हियन देश आहे. स्वीडनमधील प्रमुख नद्यांचा उगम वायव्येकडील पर्वतश्रेणीमध्ये होतो आणि त्या दक्षिणेला बोयानियाच्या आखाताला मिळतात. स्वीडनची ५५ टक्के भूमी वनाच्छादित असून दक्षिण स्वीडनमधील वनांत बीच,ओक आणि अन्य पानगळीचेवृक्ष आढळतात. स्वीडनमधील किरूना आणि गॅलिव्हरा या ठिकाणी उच्च प्रतीचे मॅग्नेटाइट याप्रकारचे लोखंडाचे साठे आढळतात. राजधानी स्टॉकहोम ही आहे.
- डेन्मार्क - डेन्मार्कच्या पश्चिमेला उत्तर समुद्र व आग्नेयला बाल्टिक समुद्र आहे. ग्रीनलंड हे जगातील सर्वात मोठे बेट व फेरो बेट (Faroe Islands)डेन्मार्कच्या ताब्यात आहे. डेन्मार्कचे हवामान समशीतोष्ण याप्रकारचे आहे. डेन्मार्कची अर्थव्यवस्था प्रामुख्याने दुग्धव्यवसाय,लोणी,चीज तसेच खारवलेले मांस यांच्या निर्यातीवर अवलंबून आहे. राजधानी कोपेनहेगन असून हे प्रमुख औद्योगिक केंद्र व मुख्य बंदर आहे.
- स्पेन - स्पेन हा युरोपातील दुसऱ्या क्रमांकाचा उंचवटय़ावरील देश आहे. (स्वित्र्झलड हा पहिल्या क्रमाकांचा उंचवटय़ावरील देश आहे.) तागुस आणि एब्रो या स्पेनमधील महत्त्वाच्या नद्याआहेत. तागुस ही नदी पोर्तुगालमधून पुढे अटलांटिक महासागराला तर एब्रो नदी भूमध्य समुद्राला जाऊन मिळते. स्पेन हा ऑलिव्ह आणि कॉर्कचा जगातील महत्त्वाचा उत्पादक आहे. स्पेनची राजधानी माद्रिद ही आहे.
- पोर्तुगाल - पोर्तुगालची राजधानी लिस्टबन असून येथील हवामान भूमध्य समुद्री प्रकारचे आहे. अटलांटिक महासागरावरून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे येथील वष्रेभरातील तापमान सौम्य असते. पोर्तुगाल हा युरोपातील टंगस्टनचा अग्रगण्य उत्पादक आहे. याशिवाय कोळसा व तांब्याचे साठेदेखील येथे आढळतात. येथील पोटरे वाइन ही जगप्रसिद्ध आहे.
- स्वित्र्झलड - स्वित्र्झलड हा पश्चिम-मध्य युरोपातील भूवेष्टित देश आहे. याच्या ३/५ भूमीवर आल्प्स पर्वताच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत. राजकीय व सामाजिक दृष्टीने स्वित्र्झलड हा जगातील अत्यंत स्थिर देशांपकी एक देश आहे. जगातील अतिप्रगत औद्योगिक देशांपकी हा देश असून उच्च प्रतींच्या घडय़ाळांसाठी हा देश प्रसिद्ध आहे. आल्प्स पर्वतांमुळेया देशाचे नसíगक सौंदर्य अधिक वाढले असून पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण देश आहे. या देशाची राजधानी बर्न आहे. झुरीक हे येथील मोठे शहर आहे.
- इटली - हा भूमध्यसागरातील सर्वात दाट लोकवस्तीचा देश आहे. इटलीच्या पूर्वेला एॅड्रियाटिकसमुद्र आहे. साíडनीया आणि सिसिली ही दोन मोठी बेटे तसेच अनेक लहान बेटांचा इटली या देशात समावेश आहे. इटलीची राजधानी रोम असून हे शहर तिबर नदीच्या किनारी आहे. ऐतिहासिक दृष्टय़ा हे महत्त्वाचे शहर आहे. पोही इटलीची सर्वात लांब नदी असून तिबर ही दुसरी महत्त्वाची नदी आहे. इटलीचा बराचसा भाग आल्प्स पर्वताने व्यापलेला आहे. इटलीत गंधक आणि पारा या खनिजांचे भरपूर साठे आहेत. साíडनीयात कोळशाचे साठे आहेत,तर सिसिलीमध्ये पेट्रोलियम व नसíगक वायूंचे मर्यादित साठे आढळतात. पो नदीच्या खोऱ्यात शेती केली जाते. इटलीतील मिलान हे शहर कापड उद्योगासाठी प्रसिद्ध असून याचा उल्लेख'इटलीचे मँचेस्टर'असा केला जातो.
- व्हॅटिकन सिटी - ४४ चौ. कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश आहे. व्हॅटिकन सिटी हा देश रोम शहरात तिबर नदीजवळ वसलेला आहे. व्हॅटिकनचे नागरिक हे पॅपल व कॅथोलिक चर्च प्रशासनाचे सदस्य आहेत. व्हॅटिकन सिटी हीच व्हॅटिकन सिटीची राजधानी आहे.
- फ्रान्स - फ्रान्स हा रशिया आणि युक्रेननंतर युरोपातील सर्वात मोठा देश आहे. फ्रान्स हा षटकोनी आकाराचा देश असून याच्या वायव्येला इंग्लिश खाडी,पश्चिमेला अटलांटिक व बिस्केचा उपसागर व आग्नेयला भूमध्य सागर आहे. फ्रान्स हा युरोपातील आघाडीचा शेतीप्रधान देश आहे. इतर विकसित देशांची तुलना करता शेती फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहे. फ्रान्समधील लॉरेन्स (Lorraine)या ठिकाणी लोखंडाचे मोठे साठे आहेत. देशाच्या विद्युत शक्तीच्या गरजेच्या ७७ टक्के भाग हा अणुऊर्जा प्रकल्पाव्दारे पूर्ण केला जातो. फ्रान्समधील धातू शुद्धीकरण यांत्रिकी आणि विद्युत अभियांत्रिकी हे प्रमुख उद्योग आहेत. फ्रेंच रेल्वे इंजिन,इलेक्ट्रॉनिक उपकरणे,अणुशक्तीची सयंत्रे,पाणबुडय़ा यांसाठी प्रसिद्ध आहे. मिराज हे फ्रेंच विमान प्रसिद्ध आहे.फ्रान्समधील महत्त्वाची शहरे -पॅरिस - फ्रान्सची राजधानी पॅरिस आहे. हे शहर सीन (Seine)नदीच्या किनाऱ्याला वसलेले आहे. हे शहर नागरी व औद्योगिक केंद्र आहे. पॅरिस हे जागतिक फॅशनच्या प्रमुख केंद्रांपकी एक आहे.मास्रेली - हे शहर भूमध्य समुद्राच्या किनाऱ्याला असलेले महत्त्वाचे बंदर आहे. या ठिकाणी तेलशुद्धकरण,जहाजबांधणी यांसारखे उद्योग चालतात.लियोन - फ्रान्समधील सिल्क उद्योगासाठी प्रसिद्ध शहर.फ्रान्समधील महत्त्वाच्या नद्या -सीन (Seine) ,लॉएर (Loire),गॅरॉन (Garrone)
- जर्मनी - जर्मनीची राजधानी बíलन आहे. जर्मनी हे जगातील महान औद्योगिक सत्तांपकी एक आहे.जर्मनीच्या उत्तरेला उत्तर समुद्र,डेन्मार्क आणि बाल्टिक समुद्र,पूर्वेला पोलंड आणि झेकोस्लोव्हीया,दक्षिणेला ऑस्ट्रिया व स्वित्र्झलड आणि पश्चिमेला फ्रान्स,लक्झेम्बर्ग,बेल्जियम व नेदरलँड्स हे देश आहेत. हा देश खनिजसंपत्तीने समृद्ध आहे. रूर ((Ruhr)येथीलकोळशाच्या खाणी युरोपातील सर्वात मोठय़ा खाणी म्हणून प्रसिद्ध आहेत. जर्मनीत कोळसा,लोखंड,पॉटेश,लिग्नाइट इ. खनिजे आढळतात. खनिज संपत्ती मुबलक असल्याने येथे पोलाद व रसायने यांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर होते. मोटारगाडय़ा वाहतुकीची साधनसामग्री,अवजड यंत्रे इ.चा प्रमुख उत्पादक जर्मनी आहे. जर्मनीतील रूर खोऱ्याजवळ पोलाद उद्योगाचे मोठय़ा प्रमाणावर केंद्रीकरण झाले आहे. जर्मनीत नद्यांचे विस्तुत जाळे आहे. बहुतेक नद्या या बाल्टिक व उत्तर समुद्रास मिळतात. डॅन्युब नदी याला अपवाद आहे,कारण ती काळ्या समुद्रास मिळते. हाईन नदी वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाची नदी आहे. याशिवाय एल्ब,ओडेर,वेसर या महत्त्वाच्या नद्या आहेत. हॅम्बर्ग हे शहर एल्ब नदीच्या मुखाजवळ वसलेले आहे.जर्मनीतील महत्त्वाची शहरे -फ्रँकफर्ट (Frankfurt) -हेशहर ऱ्हाईन नदीच्या किनारी वसलेले असून जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. या ठिकाणी अवजड यंत्र,मोटार गाडय़ा तयार करण्याचे कारखाने आहेत.म्युनिक (Munich) -फोटोग्राफी संबंधित महत्त्वाची उपकरणे,संगीत उपकरणे तयार करण्यासाठी हे शहर प्रसिद्ध आहे.ड्रेस्डेन - हे शहर जर्मनीतील प्राचीन शहर असून एल्ब नदीच्या किनाऱ्याला आहे.बॉन - १९४९ ते १९९० मध्ये जर्मनीचे एकीकरण होईपर्यंतच्या काळातील जर्मन संघराज्यीय गणराज्याची राजधानी हे शहर होते. सध्या जर्मनीतील हे शैक्षणिक केंद्र आहे.हॅम्बर्ग - उत्तर जर्मनीतील महत्त्वाचे औद्योगिक शहर आणि बंदर आहे. पेट्रोलियम उद्योग आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगासाठी हे शहर प्रसिद्ध आहे.
- ग्रीस - दुसऱ्या महायुद्धात ग्रीस जर्मनीच्या नियंत्रणाखाली होता. यानंतर ग्रीसचा तुर्कस्तान,अल्बानिया आणि मॅसिडोनियाशी संघर्ष झाला होता. हा जगाचा एक अस्थिर भाग होता. ग्रीसच्या सीमा तुर्कस्तान,बल्गेरिया,मॅसिडोनिया आणि अल्बानिया या देशांशी आहेत. ग्रीसचे हवामान भूमध्य समुद्रीय आहे. येथील उन्हाळा कोरडा तर हिवाळा सौम्य असतो. ग्रीसमध्ये गव्हाच्या पिकाएवजी सातूचे पीक घेतले जाते. कारण ग्रीसच्या हवामानाबरोबर जमवून घेण्याची क्षमता सातूमध्ये आहे. ऑलिव्ह,द्राक्ष,िलबू ही येथील महत्त्वाचे फळ,पिके आहेत. द्राक्षाचा मुख्य उपयोग वाइनसाठी होतो. ग्रीसची राजधानी अथेन्स आहे. २००४ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा येथे भरल्या होत्या. अथेन्स हे सांस्कृतिक केंद्र असून ते प्राचीन भव्य वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे.
- युनायटेड किंग्डम - ग्रेट ब्रिटन व उत्तर आर्यलड यांनी बनलेला युनायटेड किंग्डम,इंग्लिशखाडी व उत्तर समुद्राने युरोपच्या मुख्य भूमीपासून वेगळा झाला आहे. यामध्ये इंग्लंड,स्कॉटलंड यांचा समावेश होतो. या तीन भागांना'ग्रेट ब्रिटन'असे नाव आहे. ग्रेट ब्रिटन व उत्तर आर्यलड परगण्यांना मिळून युनायटेड किंग्डम असे नाव देण्यात येते. युनायटेड किंग्डमची प्राकृतिक व सांस्कृतिक भूरचना विविध प्रकारची आहे. युनायटेड किंग्डमचे अध्ययनाच्या दृष्टीने योग्य आकलन होण्यासाठी खालील तीन भागांचे स्वतंत्रपणे अध्ययन करणे आवश्यक आहे.१. इंग्लंडच्या उंचवटय़ांचा प्रदेश२. वेल्स व स्कॉटलंड३. उत्तर आर्यलड इंग्लंडच्या उंचवटय़ांचा प्रदेश -उत्तर आणि पश्चिम इंग्लंडमध्ये उंचवटय़ांचे प्रदेश आहेत. उत्तर इंग्लंडच्या लेक डिस्ट्रीक्टमधील पेनांइझ (ढील्लल्ली) पर्वत हा सर्वात विस्तीर्ण उंचवटय़ाचा प्रदेश आहे. पेनांइझ पर्वताच्या दोन्ही बाजूला कोळशाच्या खाणी आहेत. पेनाइंझ पर्वताच्या पश्चिमेला लँकेशायर याचा मदानी प्रदेश आहे.वेल्स व स्कॉटलंड - स्कॉटलंड व वेल्सची भूरचना पर्वत व उंचवटय़ाची आहे. स्नोडेन हे वेल्समधील सर्वोच्च शिखर आहे.उत्तर आर्यलडमधील कमी उंचीची रमणीय पर्वत आर्यलडच्या सभोवताली पसरलेली आहे.युनायटेड किंग्डममधील संसाधने - ऊर्जेच्या बाबतीत यू.के. हे समुद्ध आहे. उत्तर समुद्रातील पेट्रोलियम व नसíगक वायूचे मोठे साठे आहेत. अन्य खनिजांमध्ये लोह,चिनीमाती,मोठय़ा प्रमाणातआढळते.उद्योग - कोळशाच्या खाणी,लोखंड,पोलाद,सुतीकापड,लोकरी कापड आणि जहाजबांधणी हे यू.के.मधील पाच प्रमुख उद्योग आहेत.महत्त्वाची शहरे -लंडन - टेम्स नदीच्या किनारी वसलेले हे शहर राजधानीचे शहर आहे.ब्रिस्टल - नर्ऋत्य इंग्लंडमध्ये हे शहर कोळसा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.लीड्स (Leeds) -तयार कपडे व वस्त्रोद्यागासाठी प्रसिद्ध असलेले इंग्लंडमधील महत्त्वाचे औद्योगिक शहर.मँचेस्टर - इंग्लंडमधील कापड उद्योगासाठी जगप्रसिद्ध आहे.ऑक्सफर्ड लंडन व केंब्रिज ही शहरे जगप्रसिद्ध शैक्षणिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा