Post views: counter

महाराष्ट्राचा समग्र भूगोल




                          सध्याच्या गुजरात व महाराष्ट्र राज्याचे मिळुन दि . १ नोव्हेंबर १९५६ रोजी द्विभाषिक मुंबई राज्य स्थापन झाले. मध्य प्रांतातून व हैद्राबाद राज्यातून मराठवाडा मुंबई राज्याला जोडले. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. व गुजरात मुंबई राज्यातून वेगळे केले गेले.
  • स्थान – १५.८ उत्तर ते २२.१ उत्तर अक्षांश , ७२.३६ पुर्व ते – ८०.९ पुर्व रेखांश दरम्यान.
  • क्षेत्रफळ – ३.०७,७१३ चौ.कि.मी.
  • क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा राजस्थान, मध्य प्रदेशानंतर देशात तिसरा क्रमांक लागतो.
    महाराष्ट्र देशाच्या ९.३६% क्षेत्रफळाने व्यापलेला आहे.
  • लांबी – पुर्व पश्चिम लांबी ८०० कि.मी.
  • रुंदी - उत्तर दक्षिण ७०० कि.मी. आहे.
  • किनारपट्टीची लांबी ७२० कि.मी.

  • सीमा

नैसर्गिक सीमा – 
  • वायव्येस सातमाळा डोंगररांगा, गाळण टेकड्या व सातपुडा पर्वतातील आक्रणी टेकड्या आहेत. 
  • उत्तेरस सातपुडा पर्वत, त्याच्या पूर्वेस गाविलगड टेकड्या आहेत.
  • ईशान्येस दरकेसा टेकड्या व पूर्वेस चिरोल टेकड्या आणि भामरागड डोंगर आहे. 
  • पश्चिमेस अरबी समुद्र असून राज्याची किनारपट्टी उत्तरेकडील दमण गंगा नदीपासून दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत पसरलेली आहे. 
राजकीय सीमा – 
महाराष्ट्राला एकूण ६ राज्यांच्या सीमा स्पर्श करतात. यापैकी सर्वाधिक लांब सीमा मध्य प्रदेशबरोबर असून सर्वात कमी सिमा गोवा या राज्याबरोबर आहे. तसेच दादरा नगर हवेली ह्या केंद्रशासित प्रदेशात सिमा लागते.
  • वायव्य गुजरात- ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार
  • उत्तर मध्यप्रदेश - नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा व गोंदिया
  • पुर्व छत्तीसगढ - गोंदिया व गढचिरोली
  • आग्नेय आंध्रप्रदेश - गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड
  • दक्षिण कर्नाटक - नांदेड, लातूर, उस्मानाबाद,सोलापूर, सांगली, कोल्हापूर,सिंधुदुर्ग
  • दक्षिण गोवा - सिंधुदुर्ग
  • जिल्हे
जिल्हा विभाजन –
  • १ मे १९८१ - रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग वेगळा केला
  • १ मे १९८१ - औरंगाबाद जिल्ह्यातून जालना जिल्ह्या वेगळा केला
  • १६ ऑगस्ट १९८२ - उस्मानाबाद मधुन लातूर वेगळा केला
  • २६ ऑगस्ट १९८२ - चंद्रपूर मधून गडचिरोली वेगळा केला
  • ४ ऑक्टोंबर १९९० - बृहमुंबई जिल्ह्यातून मुंबई उपनगर वेगळी केली 
  • १ जुलै १९९८ - अकोला जिल्ह्यातून वाशिम वेगळा केला
  • १ जुलै १९९८ - धुळे जिल्ह्यातुन नंदुरबार वेगळा केला
  • १ मे १९९९ - परभणी जिल्ह्यातुन हिंगोली निर्मिती केली 
  • १ मे १९९९ - भंडारा जिल्ह्यातून गोंदियाची निर्मिती कशी केली 
  • १ मे १९९९ - परभणी जिल्ह्यातुन हिंगोली निर्माण केला 
  • महाराष्ट्रातील जिल्हा विभाजन व प्रशासकीय विभाग
प्रशासकिय विभाग – राज्याचे मुख्य सहा प्रशासकिय विभाग असून १२ उपविभाग आहेत.
सर्वात मोठा प्रशासकीय विभाग – औरंगाबाद (८ जिल्हे)
 
  • कोकण - ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर
  • पुणे - पुणे, सातारा,सांगली, कोल्हापूर्,सोलापूर
  • नाशिक - अहमदनगर, नाशिक,धूळे, जळगाव, नंदुरबार
  • औरंगाबाद (मराठवाडा) - औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर
  • अमरावती (विदर्भ) - अमरावती, यवंतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम
  • नागपूर (विदर्भ) - नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया,वर्धा
विभागानुसार वाटून दिलेले कामे -पुणे - शिक्षण, फलोद्यान, समाजकल्याण, सामाजिक वनिकरण, क्रिडा, साखर, नगरचना सहकार, शेती पशुसंवर्धन
मुंबई - माहिती प्रसिध्दी, दुग्धविकास, आरोग्य, उद्योग, विक्रीकर
नाशिक - आदिवासी कल्याण
नागपूर - खाणकाम व हातमाग

राज्यातील काही भागांतील वैशिष्ट्य पुर्ण नावे –
  • सह्याद्रीच्या पश्चिमेकडचा सखल प्रदेश –कोकण
  • कोकणाचे प्राचीन नाव – अपरांत
  • सह्याद्रीच्या पायथ्यालगतचा कोकणाचा भाग – तळ 
  • कोकणसह्याद्री माथा तसेच त्याच्या लततचा पूर्वेकडील भाग – मावळ
  • सह्याद्रीच्या पुर्वेकडील पठाराचा पश्चिम भाग – देश
  • औरंगाबाद विभागातील आठ जिल्हे – विदर्भ
  • विदर्भाचा पुर्व भाग – झाडी
  • मध्य व पश्चिम भाग – व-हाड.
  • पुणे विभागातील जिल्हे व नाशिक आणि अहदनगर मुळे बनणारा भाग – पश्चिम महाराष्ट्र
  • जळगांव धुळे नंदुरबार मिळून बनणारा भाग – (तापी खोरे) – खानदेश

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना-
                                 महाराष्ट्राचा बहुतांशी भाग ज्वालामुखी निर्मित बेसॉल्ट या खडकाचा बनलेला आहे. राज्यात जुने अनावृत्त खडक वैनगंगेच्या खो-यात आहेत. त्यानंतर विदर्भ व शेवटी तापी खोरे असा क्रम लागतो.
१. कोकण किनारा –  
उत्तरेकडील दमणगंगेच्या खो-यातून दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंतचा ७२० कि.मी. लांबीचा प्रदेश म्हणजे कोकण किनारा होय. याची सरासरी रूंदी ४० ते ८० कि.मी. आहे.
  • अरबी समुद्रालगतच्या सखल भागास म्हणतात – खलाटी 
  • कोकणातील डोंगराळ व उंच भाग –वलाटी 
  • कोकण किना-यावर आसणारी एकूण बंदरे – ४९
  • रायगड जिल्यात त्यार करण्यात आलेले अत्याधुनिक बंदरे – जवाहरलाल नेहरु (न्हावाशेवा) सहाय्य – कॅनडा
  • कोकण किना-यावर सर्वाधिक किनापट्टी लाभलेला जिल्हा (२४०कि.मी.) रायगड असून मासेमारीत आघाडीवर जिल्हा –रायगड
  • महाराष्ट्राच्या मत्स्योत्पादनापैकी खा-या पाण्यातील मासे – मुंबई
  • राज्यातील पहिले मत्स्यालय –तारपोरवाला (मुंबई)
  • राज्यातील नवे प्रस्तावित मत्स्यालय – वार्सोवा
  • कोकण किना-याजवळील तेल क्षेत्रे –बॉम्बे हाय व वसई हाय
  • कोकणातील नैसर्गिक वायुवर आधारीत औष्णिक विद्युत प्रकल्प –उरण (रायगड)
  • कोकण किना-यावरील बेटे – मुंबई, साष्टी, खंदेरी-उंदेरी, धारापूरी व अंजदिव
  • दक्षिण कोकणाचे भूस्वरुप – सडा
  • कोकण किना-यावरील प्रमुख नद्या – वसई, धरमतर, महाड, चिपळूण, दाभोळ, जयगड, राजापूर व विजयदुर्ग, दातीवरा मनोरी, मालाज, माहिम, पनेवेल, बालकोट.
२. पश्चिम घाट (सह्याद्री) –
                         नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरपासून कोल्हापूरातील चंदगड पर्यंतचा ८०० कि.मी. चा पट्टा म्हणजे सह्याद्री होय. सह्याद्रीची निर्मिती प्रस्तर भंगामुळे झाली आहे. याची सरासरी उंची ९०० मि. इतकी आहे. सह्याद्रीचा पूर्व उतार मंद असून पश्चिम किनारपट्टी खचल्यामुळे पश्चिम उतार तीव्र आहे. सह्याद्री पर्वतरांग ही महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक असून त्यात अनेक नद्यांचा उगम झाला आहे. सह्याद्रीची महाराष्ट्रातील उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी होत जाते.
सह्याद्रीच्या उपरांगा –
गोदावरी व तापीचे खोरे वेगळी करणारी नाशिक जिल्ह्यातून पूर्वेकडे जाणारी डोंगररांग – सातमाळ डोंगर
सातमाळा डोंगराचे औरंगाबाद जिल्ह्यातील नाव (यात प्रसिध्द देवगिरी किल्ला व वेरूळ, अजिंठा लेण्या आहेत.) – अजिंठा डोंगर
पुणे व नगर जिल्ह्याच्या सीमेवरून पूर्वेकडे जाणारी गोदावरी व भिमा नदीचे खोरे वेगळे करणारी रांग –हरिश्चंद्र बालाघाट
शंभू महादेव डोंगर रांगेतील पोचगणीतील प्रसिध्द पठार – टेबल लँड पठारक्र.
शिखर उंची (मी.)जिल्हा व वैशिष्ट्य 
  1. कळसूबाई१६४६नाशिक व अहमदनगरच्या सीमेवर (अहमदनगर)
  2. साल्हेर१५६७नाशिक व महाराष्ट्रातील द्विपीय क्रमांकाचे
  3. महाबळेश्वर१४३८सातारा
  4. हरिश्चंद्र गड१४२४अहमदनगर
  5. सप्तश्रृंगी गड१४१६नाशिक
  6. त्रंबकेश्वर१३०४नाशिक
 
घाट (खिंड) –
उंच व लांबलचक पर्वतरांगात कमी उंचीच्या भागास खिंड म्हणतात. या खिंडीतून दळणवळणाचे मार्ग नेले जातात, यालाच घात म्हणतात.
दख्खनचे पठार –

                           हा प्रदेश सह्याद्री पासून पूर्वेकडे सुरजगड, भामरागड, व चिरोली टेकड्यांपर्यंत विस्तारलेला आहे. हा अतिशय  प्राचिन प्रदेश असून याची निर्निती ७ कोटी वर्षांपूर्वी झाली आहे. २९ वेळा भेगी उद्रेक होऊन लाव्हा रसाचे थरावर थर साचून याचि निर्मिती झाली. हे पठार मुख्यतः बेसॉल्ट क्डकापासून झाली आहे. पठाराची सरासरी पश्च्मिमेकडील उंची ६० मी. व पूर्वेकडील उंची ३०० मी. म्हणजेच एकूण सरासरी उंची ४५० मी. आहे.
पश्चिमेकडून पूर्वेकडे जातांना बेसॉल्टची जाडी – कमी होत जाते.दक्षिण कोकणात बेसॉल्टचे थर खनन क्रियेने निघून गेल्याने वालुकास्म व गारगोटी हाडक उघडे पडले आहे.गोंडवाना क्षितीज स्मांतर थर थिजून सपाट घाटमाथे व पाय-या पाय-यांची रचना असणारी भूरुपे निर्माण होतात.थंड हवेचे ठिकाणजिल्हाथंड हवेचे ठिकाणजिल्हातोरणमाळनंदुरबारपाचगणीसाताराखंडाळापुणेमाथेरानरायगडरामटेकनागपूरचिखलदरा (गाविलगड)अमरावतीमहाबळेश्वरसातारालोणावळा, भिमाशंकरपुणेजव्हारठाणेमोखाडा, सुर्यामाळठाणेआंबोलीसिंधुदुर्गयेड्शीउस्मानाबादपन्हाळाकोल्हापूरम्हैसमाळऔरंगाबाद

नदी प्रणाली-
                         महाराष्ट्रात प. घाट हा प्रमुख जलविभाजक असून त्यामुळे नद्यांचे पश्चिम वाहिनी असे प्रकार पडतात.

१) पश्चिम वाहिनी – या नद्या अरबी समुद्रास जाऊन मिळतात. नर्मदा, तापी-पूर्णानध्या खचदरीतून वाहत जातात.
अ) तापी –  
ही नदी सातपुडा पर्वातात मुलताई येथे उगम पवते. तापीस उजव्या किना-याने चंद्रभागा, भूलेश्वरी व नंद या नद्या तर डाव्या किना-याने काटेपूर्णा, मोर्णा, नळगंगा व सण या नद्या येऊन मिळतात. तापी-पुर्णेच्या प्रवाहास वाघूर, गिरना, मोरी, पांझरा व बुराई या नद्या मिळतात.
तापी व पूर्णा संगम – चंगदेव क्षेत्र (जळगाव), तापी व पांझरा यांचा संगम – मुडावद धुळे
ब) कोकणातील नद्या –
सह्याद्री प्रर्वतावर उगम पावना-या नद्यांची रुंदी – ४९ ते १५५ कि.मी.कोकणातील नद्यांची वैशिष्टये – वेगवान व हंगामी असतात. त्यांना त्रिभूज प्रदेश नसतो.कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी –उल्हास (१३० कि.मी.)कोकणातील दुस-या क्रमांकाची नदी –वैतरणा (१२४ कि.मी.)उत्तर कोकणातील नद्या – दमनगंगा, तणासा, सुर्या, भातसई, जगबुडी, मुरवाडी, वैतरणा, उल्हासमध्य कोकणातील नद्या – पाताळगगां, कुंडलिका, काळ, काळू, सावित्री, वशिष्ठी, शास्त्री.दक्षिण कोकणातील नद्या – कजवी, मुचकुंदी, शुक, गड, कर्लि, व तेरेखोल

२) पुर्व वाहिनी नद्या – या सह्याद्रीच्या पुर्व उतारावर उगम पावतात व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात.
 
अ) गोदावरी खोरे – 
गोदावरी खो-याने देशाचे १०% व राज्याचे ४९% क्षेत्र व्यापले आहे.
१) गोदावरी नदी – हिची एकूण लांबी १४५० कि.मि. असून महाराष्ट्रात किचा प्रवाह ६६८ कि.मी. लांबीचा आहे. गोदावरी खो-यास संत भूमी असे म्हणतात. गोदावरी राज्याचा ९ जिल्ह्यातून वाहत जाऊन नांदेड जिल्ह्यात धर्माबाद येथून प्रवेश करते. नंतर पुन्हा गडचिरोली जिल्ह्यातील सिंरोंचा येथे महाराष्ट्रात प्रवेश करते व ७ कि.मी. वाहत जाऊन परत आंध्रप्रदेशात जाते.
गोदावरी उपनदी-प्राणहिता पेनगंगा नदी वर्धा नदीस येऊन मिळाल्यानंतर वर्धा व वैनगंगेचा संगम होतो. या प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात. प्राणहिता नदी गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेस सिरोंचा जवळ गोदावरीला येऊन मिळते.

ब) भीमा खोरे –  
भीमा नदी पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे उगम पावते. महाराष्ट्रात किचा प्रवाह ४५१ कि.मी. असून ती कर्नाटकात रायचुरजवळ कुरुगुड्डी येथे कृष्णा नदीस मिळते. किची एकूण लांबी ८६७ कि.मी. आहे. पंढरपूरजवळ भीमा नदीला अर्धवर्तुळाकार प्राप्त झाल्यामुळे तिला चंद्रभागा असे म्हणतात. मुळा व मुठा या नद्यांचा संगम पुणे येथे होऊन त्यांचा संयुक्त प्रवाह रांजणगाव जवळ भीमा नदीला मिळतो. निरा नदी भोर जवळ उगम पावून भीमा नदीला येऊन मिळते. भीमेच्या प्रमुख उपनद्या उरवीकडून भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, निरा व माण तर डावीकडून वेळ, घोड व सीना या नद्या येऊन मिळतात.
 
क) कृष्णा नदी खोरे – 
 कृष्णा नदी सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे उगम पावते. महाराष्ट्रात २८२ कि.मी. चा प्रवास क्रुन ती आंध्रप्रदेशात जाते. तिची एकूण लांबी १२८० कि.मी. आहे.
कोयना – 
कोयाना खो-यात राज्यातील सर्वाधिक जविद्युत निर्मिती होते. त्यामुळे कोयना प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात.कोयना जलविद्युत प्रकल्पाचे पाणी व वशिष्ठी नदीत सोडतात.

  • महाराष्ट्रातील नद्यांची एकूण लांबी – ३२०० किमी.
  • महाराष्ट्रात नदी खोरे उतरता क्रम - १) गोदावरी २) भीमा ३) तापी ४) कृष्णा
  • महाराष्ट्रातील प्रवरा नदीतील धबधबा – रंध्रा फॉल्स ६० मी 
  • महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा – गोंदिया 
  • प्रमुख तलाव – ताडोबा, घोडझरी, असोलामेंढा (चंद्रपुर), नवेगांव, बोदलकसा, चोरखमारा (गोंदिया),रामसागर (नागपूर), लोणार (बुलढाणा), अंबाझरी (नागपूर), आंध्रलेक (पुणे), धामापूर (रत्नागिरी),कळवण (पुणे), लेक बिले (अहमदनगर), व्हिक्टोरीया लेक (पुणे), सेवनी भंडारा 
  • मुंबईस पाणीपुरवठा करणारे तलाव –भातसा, ताणसा, वैतरणा, पवई विहार (मुंबई)
  • नदी काठावरील शहरे नदीकाठावरील शहरे गोदावरीनाशिक, पैठण, नांदेड, गंगाखेड, कोपरगांव, राजमहेंद्रीपंचगंगाकोल्हापूरकृष्णावाई, सागली, मिरज, औदुंबर, कराड, नरसोबाची वाडी इंद्रायणी देहू व आळंदी (पुणे)पांझरा धुळे 
  • महाराष्ट्रातून दोनदा वाहणा-या नद्या – माजरा, तापी, गोदावरी​ नदी
महाराष्ट्राचे हवामान

  • महाराष्ट्राचा हवामान प्रकार – उष्ण कटिबंधीय मोसमी
  • महाराष्ट्रातील पर्जन्य – नैऋत्य मोसमी वा-यांपासून प्रतिरोध पर्जन्य पडतो.कोकणातील पर्जन्याची वार्षिक सरासरी –२५०० ते ३५०० मिमी.
  • महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण – ७२०० मिमी. अंबोली, सिंधुदुर्ग
  • कोकणात उन्हाळ्यात पडणारा पाऊस –आंबेसरी 
  • अवर्षण ग्रस्त भागात पर्जन्यमान – ५०० मिमीहून कमी
  • महाराष्ट्रातील ऋतु संक्रमणाचा महिना – ऑक्टोबर
  • महाराष्ट्रातील सर्वाधिक थंडीची नोंद झालेली ठिकाणे – ०.६ मालेगांव (१९०२), देवळाली (१९६०)
  • वर्षभर सम व दमट हवामान आढळणारा विभाग – कोकण
  • सर्वाधिक तापमान कक्षा – नागपूर (१९ )महाराष्ट्रात 
  • सर्वाधिक तापमानाची नोंद – १) चंद्रपूर - (१६ मे १९१२) ४८.३ २) नागपुर – ४७.८ ३) जळगांव – ४७.८

वनस्पती जीवन-

  1. महाराष्ट्रातील जंगलांचे प्रकार – पाच
  2. महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळापैकी वनांखालील क्षेत्र – २१.१०%
  3. उपग्रह सर्वेक्षणानुसार प्रत्यक्ष दाट वने – ११ %
  4. भारताच्या वनक्षेत्रांपैकी महाराष्ट्रात असणारी वने – ८.७%
  5. महाराष्ट्रातील सर्वात कमी जंगले – लातूर
  6. सर्वात कमी वनक्षेत्रांखालील असणारा विभाग – मराठवाडा (३०६%)
  7. सागाची उत्कृष्ट जंगले सापडतात – चंद्रपूर (बल्लारशा)
  8. महाराष्ट्र वनविकास मंडळाची स्थापना – १६ फेब्रुवारी १९७४ (नागपूर)
  9. महाराष्ट्रातील जंगलाबाबतचे महाविद्यालय –अकोला
  10. अमरावतीतील प्रसिध्द सागवनी लाकडाचा बाजार – परतवाडा
                           स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट २००३ नुसार महाराष्ट्रात ६०,९३९ चौ.कि.मी. क्षेत्र वनांखाली होते. त्यापैकी दाट वने १७.२%, विरळ वने ४३.४%,ओपन फॉरेस्ट होते.
  • महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान –चांदोली (३१७ चौ.कि.मी.)
  • सर्वाधिक क्षेत्र वनांखाली असणारा जिल्हा –गडचिरोली (७७%)
  • एकून जमिनीपैकी सर्वाधिक क्षेत्र विभाग – विदर्भ (३७%)
  • वनांचे प्रमाण वाढविण्यासाठी पुळणीवर लागवड केली जाणारी वनस्पती – खडशेरणी
  • देशावर पडीत व कमी प्रतीच्या जमिनीवर लागवड करतात – निलगिरी व सुबाभूळ
  • कोकण विकास महामंडळ मर्यादित रबर प्रकल्प – कळंबिस्त (सिंधुदुर्ग)
  • औषधे व सुगंधित तेल निर्मितीसाठी उपयुक्त – सोशा गवत (धुळे जळगांव), मुशी गवत (ठाणे)
  • संत तुकाराम वन ग्राम योजना शासनाने सुरु केली – २००६-०७
उद्योग -
  1. मधुमक्षिका पालन -महाबळेश्वर
  2. लाकडी खेळणी - पेण व सावंतवाडी
  3. लाख निर्मिती - गोंदिया
  4. सिट्रानेला तेल गाळणे - देवरुख (रत्नागिरी)टॅनिनआंबा (कोल्हापूर)
  5. कात निर्मिती - मुंडवा, डाहणू,चंद्र्पूर
  6. पामतेल - सिंधुदुर्ग  
  7. टेंभूर्णी व आपट्याच्या पानापासून विड्या वळणे – सिन्नर (नाशिक), गोंदिया, तिरांडा, देवरी, आमगांव व सालेकसा (गोंदिया), भंडारा, तुमसर, मोहाडी (भंडारा), ब्रम्हपुरी (चंद्रपूर) कामठी व नागरुर (नगपूर) व अहमदनगर
  8. महाराष्ट्रातील रेशिम उत्पादन –बापेवाडा, एकोडी (भंडारा), साबळी व नागभींड (चंद्रपूर), तसर (टनक – रेशिम – एनाची पाने खाऊन) अमरावती
 
संपत्ती/ अभयारण्ये/ राष्ट्रीय उद्याने-
  1. महाराष्ट्राचा राज्य प्राणी –शेकरु (खार – भीमाशंकर)
  2. महाराष्ट्राचे राज्य फुल – मोठा बोंडारा
  3. महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान – चांदोली ३१७ चौ.कि.मी.
  4. महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान – संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (बोरिवली) ९० चौ.कि.मी.
  5. महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य – माळढोक पक्षी अभयारण्य (अहमदनगर व सोलापूर) ८५०० चौ.कि.मी.
  6. राज्यातील सर्वात लहान अभायारण्य – देउळ गांव- रेहेकुरी (अहमदनगर) ३ चौ.कि.मी.
  7. राज्यातील १ ले पक्षी अभयारण्य – कर्नाळा (रायगड)
  8. महाराष्ट्रातुन नाहिसे झालेले प्राणी – चित्ता, चींकारे व काळविट
  9. महाराष्ट्रातील मगर प्रजनन केंद्र – ताडोबा
  10. राज्यातील १ ले व देशातील ३ रे सागरी राष्ट्रीय उद्यान –मालवण (सिंधुदुर्ग)
  11. भारतातील सर्वात मोठे स्थलांतरीत व स्थानिक पाणपक्ष्यांसाठी राखीव अभयारण्य –केवलादेव पाणपक्षी अभयारण्य
  12. भारतातील १ ले व एकमेव मोर अभयारण्य – नायगांव (बीड)
  13. राज्यातील सर्वात जुने अभयारण्य – राधानगरी (१९१८)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा