Post views: counter

Current Affairs June 2015

  • 'ब्लू मॉरमॉन'ला राज्य फुलपाखराचा  दर्जा

Blue Mormon

                        महाराष्ट्राचा पर्यावरणीय ठेवा अशी ओळख असलेल्या पश्चिम घाटाने आता राज्याला अजून एक अनोखी ओळख मिळवून दिलीय. पश्चिम घाटात आढळणा-या ब्लू मॉरमॉन या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देण्यात आलाय. ब्लू मॉरमॉन हे गडद निळ्या रंगाचं एक छानसं फुलपाखरू. पंखांवर खालच्या बाजून असलेल्या पांढ-या रंगामुळे आणि त्यावरच्या उठावदार काळ्या ठिपक्यांमुळे हे फुलपाखरू अतिशय गोंडस दिसतं.
                         राज्यात आढळणा-या या सुंदर फुलपाखराला आता राज्य सरकारने राज्य फुलपाखराचा दर्जा दिलाय. विशेष म्हणजे असा दर्जा देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलंच राज्य ठरलंय.  ब्लू मॉरमॉन ह्या फुलपांखराला राज्य फुलपांखरू म्हणून घोषित करण्याचा निर्णय सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 22 जून रोजी झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र शासनातर्फे राज्याचे मानचिन्ह म्हणून राज्य प्राणी शेंगरू, राज्य पक्षी हरियल, राज्य वृक्ष आंबा व राज्य फुले जारूल घोषित केलेले आहे.
 महाराष्ट्र हे राज्य फुलपांखरू घोषित करणारे पहिले राज्य आहे.
  • आकाशगंगेला ख्रिस्तीयानो रोनाल्डोचे नाव :

शास्त्रज्ञांनी अलीकडेच शोधलेल्या एका नवीन आकाशगंगेला पोर्तुगालचा फूटबॉलपट्टू ख्रिस्तीयानो रोंनाल्डोच्या सन्मानार्थ सीआर-7 (कॉसमॉस रेडशिफ्ट-7) असे नाव देण्यात आले आहे.
ख्रिस्तीयानो रोंनाल्डोला सीआर-7 या नावानेही ओळखले जाते.

आतापर्यंत ज्ञात असलेल्या हिमको या सर्वात दूरच्या आकाशगंगेपेक्षा सीआर-7 तीन पट तेजस्वी आहे.
कॉसमॉस रेडशिफ्ट-7 किंवा सीआर-7 विश्वातील सर्वात जुनी आकाशगंगा मानली जाते.

  • आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या चिन्हाचे नाणे सादर
                         पंतप्रधानांच्या हस्ते पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या पार्श्वभूमीवर १० आणि १०० रुपयाचे चलनी नाणे आणि विशेष टपाल तिकीट सादर करण्यात आले.१० आणि १०० रुपयाच्या नाण्यावर आंतरराष्ट्रीय
योग दिवसाचे प्रतीक चिन्ह तर दुसऱ्या बाजूला मूल्य दर्शविण्यात आले आहे.‘चांगल्या आरोग्यासाठी योग’ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा शुभारंभ केल्यानंतर अर्थ मंत्रालयाने तयार केलेल्या चलनी नाणे सादर करण्यात आले.त्यानंतर दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे पाच रुपयांचे टपाल तिकीट देखील सादर करण्यात आले.नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघासमोर ठेवलेल्या प्रस्तावाला १७७ देशांनी पाठिंबा दर्शविला होता आणि २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचे ठरले होते. यामध्ये ४७ मुस्लिम देशांचा समावेश होता.
  • झहीर अब्बास आयसीसीचे नवे अध्यक्ष

पाकिस्तानचे माजी कर्णधार झहीर अब्बास यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) नवे अध्यक्ष नेमण्यात आले आहे. आयसीसीच्या वार्षिक आमसभेत ही घोषणा करण्यात आली. वर्षभरासाठी त्यांची नेमणूक असेल. आपले नामांकन मंजूर केल्याबद्दल त्यांनी आयसीसीचे आभार मानले.
  • ज्येष्ठ पत्रकार प्रफुल बिडवई यांचं निधन
 
Praful Bedwai
                        ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रफुल बिडवई (वय ६६) यांचे २४ जून रोजी अॅमस्टरडॅम येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. बिडवई हे अॅमस्टरडॅम येथे एका परिषदेत सहभागी होण्यासाठी गेले होते. तिथंच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.  तब्बल चार दशके पत्रकारितेच्या क्षेत्रात असलेल्या बिडवई यांचा राजकीय, सामाजिक व आर्थिक प्रश्नांचा दांडगा अभ्यास होता.  बिडवई यांनी पर्यावरण संरक्षण, मानवी हक्क आणि वैश्विक न्याय आदी प्रश्नांवर कार्यकर्ते म्हणून मोलाचे काम केले होते. नर्मदा बचावसह देशातील अनेक महत्त्वाच्या आंदोलनात त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता.
१९७२मध्ये त्यांनी लिहिलेल्या ‘इकॉनॉमिक अॅण्ड पॉलिटिकल विकली’ या सदरामुळं पत्रकारितेत त्यांची ओळख निर्माण झाली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’, ‘बिझनेस इंडिया’सह विविध मासिकांत त्यांनी काम केले होते. राजकीय, आर्थिक, औद्योगिक धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध, अणुऊर्जा, पर्यावरण विकास, राष्ट्रवाद आणि साम्यवाद, सायन्स आणि तंत्रज्ञान आदी विषयांवर त्यांनी लिखाण केले होते.
  • ‘सेंड’ केलेला ‘जी-मेल’ करता येणार ‘अन-डू’

                      ‘जीमेल’ने पाठविलेली ई-मेल परत घेण्याची नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गुगलनं त्यासाठी जी मेलच्या इनबॉक्समध्ये ‘सेंड अन-डू’ हा पर्याय दिला आहे. त्याद्वारे तुम्ही कोणताही मेल ३० सेकंदाच्या आत अन-डू करता येईल. गुगलनं हा टूल सहा वर्षांपूर्वीच विकसित केला होता. मात्र त्याचा वापर जीमेलच्या पब्लिक बीटा आवृत्तीवर मर्यादित होता. मात्र जी-मेलने आता ही सुविधा सर्वांसाठी उपलब्ध करून दिली आहे.
                     ज्या युजर्सना यापूर्वीच अशी सुविधा उपलब्ध आहे, त्यांनाही ती पुढे अशीच सुरु राहणार आहे. तसेच ज्यांना ही सुविधा उपलब्ध नाही त्यांना ‘सेटिंग’ मधून ही सुविधा सुरु करणे आवश्यक आहे. ही सुविधा २००९ मध्ये सर्वप्रथम सुरु करण्यात आली होती. त्यावेळी केवळ ५ सेकंदांसाठी पाठविलेली ई-मेल थांबविण्याची सोय देण्यात आली होती. मात्र आता युजर्सना त्यासाठी ५, १०, २० किंवा ३० सेकंदांचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
  • महाराष्ट्रामध्ये १० स्मार्ट शहरे

                       केंद्र सरकारने राज्य, केंद्रशासित प्रदेशांना स्मार्ट शहरांसाठी आणि ‘अटल मिशन फॉर रिजुविनेशन अँड अर्बन ट्रान्स्फर्मेशन स्कीम’ (अमृत) योजनेंतर्गत तयार होणाऱ्या शहरांसाठी नामांकने देण्यासाठी शहरांची संख्या सांगितली आहे. त्यावरून उत्तर प्रदेशात सर्वाधिक स्मार्ट शहरे तयार होणार असल्याचे समोर आले आहे.
                       केंद्र सरकार २५ जून रोजी स्मार्ट शहरे आणि ‘अमृत’ या योजनांना सुरुवात करणार आहे.
याअंतर्गत उत्तर प्रदेशने मध्ये १३ शहरे विकसित होणार असून, ‘अमृत’ योजनेअंतर्गत ५४ शहरे निवडण्यात आली आहेत. तमिळनाडूमध्ये १२ स्मार्ट शहरे विकसित होणार असून, ३३ शहरे ‘अमृत’ योजनेंतर्गत निवडण्यात आली आहेत. महाराष्ट्रामध्ये १० स्मार्ट शहरे विकसित होण्यासाठी नामांकन करावे लागणार आहे. गुजरात आणि कर्नाटकमध्ये सहा शहरांचे नामांकन स्मार्ट शहरांसाठी करण्यास सांगितले आहे. ‘अमृत’ योजनेंतर्गत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकमध्ये अनुक्रमे ३७, ३१, २१ शहरांचा समावेश केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ जूनला १०० स्मार्ट शहरे, ‘अमृत’ योजनेंतर्गत ५०० शहरे आणि प्रधान मंत्री आवास योजना राबवण्याची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करणार आहेत.

  • क्रीडा घडामोडी
वेबर खिताब : रॉजर फेडरर ने आठव्यांदा गेरी वेबर ओपन खिताब जिंकला.याने इटली च्या आंद्रिआज सेप्पी ला नमवून हा खिताब जिंकला. यावर्षातील फेडरर चे हा चौथा खिताब होय.यापूर्वी त्याने ब्रिस्बेन,दुबई,इस्तंबुल येथीलही खिताब जिंकले.
निको रोसबर्ग : मर्सिडीज चा ड्रायव्हर निको रोसबर्ग याने ऑस्ट्रीयन ग्रांड प्रीक्स फार्म्युला १ चे जागतिक विजेतेपद मिळविले. रोसबर्ग चे हे कारकिर्दीतील ११ वे व यावर्षीचा तिसरा विजय होय.याने यापूर्वी २०१५ ची स्पेनिश फॉर्म्युला १ जागतिक जेतेपद व मोनाको ग्रांड प्रिक्स चे जेतेपद मिळविले.
  • चांद्रयान २ विशेष 

HAL ने चांद्रयान २ करिता लागणारे ऑरबीटर क्राफ्ट मोड्यूल स्ट्रक्चर इस्त्रो सेटेलाइट सेंटर ला दिले आहे.
हे मोड्यूल ३ टन वजनाचे असून,हे सिलिंडर ,शिअर वेब,व डेक पेनल यांचे बनले आहे.
चांद्रयान २ द्वारे चंद्रावर लेंडर व रोव्हर दोन्ही पाठविण्यात येणार आहे.
चांद्रयान २ हे जि.एस.एल.व्ही एम के २ या वाहकाने पाठविण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा