Post views: counter

Current Affairs July 2015 Part - 3

अझीम प्रेमजी:

  • आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या विप्रो कंपनीचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी विप्रो सॉफ्टवेअर कंपनीतील सुमारे अर्धी संपत्ती समाजसेवी संस्थेच्या नावावर केली आहे.
  • विप्रो ही देशातील तिसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे.
  • अझीम प्रेमजी यांनी कंपनीतील आणखी 18 टक्के शेअर्स समाजसेवी संस्थेच्या नावावर केले आहे. अशाप्रकारे त्यांनी आता 39 टक्के शेअर्स समाजसेवी संस्थेच्या नावे केले आहेत.
  • या शेअर्सचे सध्याचे एकूण बाजार मूल्य 53 हजार 284 कोटी रुपये आहे. प्रेमजी यांच्या निर्णयामुळे अझीम प्रेमजी ट्रस्टला आता संपत्ती दान केल्याने या माध्यमातून यावर्षी 530 कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळणार आहे.
इरा सिंघल:
  • केंद्रीय सामाजिक न्याय विभागाने ब्रँड अॅम्बेसिडर पदी इरा सिंघलयाची निवड केली
  • इरा सिंघल २०१४ च्या यूपीएससी परीक्षेमध्ये प्रथम क्र्माकांने उत्तीर्ण झाली
  • इरा सिंघल ने सर्वप्रथम २०१० मध्ये परीक्षा दिली होती त्यामध्ये ८१५ व्या रँकने पास झाली होती. तीची त्यावेळी IRS पदी निवड झाली होती.परंतु उंची ४.५ फुट असल्याने तिला मेडीकल अनफीट घोषित केले
  • त्यानंतर तीने 2012, 2013 मध्ये परीक्षा दिली .त्यामध्ये ती उत्तीर्ण झाली
  • अपंगांसाठीच्या विविध योजना राबवण्यासाठी, व खचलेल्या अपंगांना नवी प्रेरणा देण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय विभागाने तीला ब्रँड अॅम्बेसिडर पदी नियुक्ती केली

सेरेनाची स्वप्नपूर्ती:

टेनिस कारकिर्दीत २० वा ग्रॅण्डस्लॅम पटकाविणे म्हणजे एक स्वप्नच. ही स्वप्नपूर्ती प्रत्यक्षात उतरविली ती अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने. महिला एकेरीत जगात पहिल्या क्रमांकावर असलेल्या या टेनिसपटूने चेक प्रजासत्ताकाच्या लुसी सफारोव्हाचा पराभव करीत फ्रेंच ओपनचा किताब पटकाविला. हा अंतिम सामना तिने ६-३, ६-७, ६-२ ने जिंकला. फ्रेंच ओपनचा एकेरीतील हा तिचा तिसरा किताब आहे. अव्वल मानांकित सेरेनाने पहिला सेट जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही आघाडी मिळवली होती. त्यानंतर पहिल्यादांच ग्रॅण्डस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या लुसीने शानदार पुनरागमन केले. सेरेनाची खराब सर्व्हिस आणि लुसीचा शानदार खेळ यांमुळे हा सामना तिसऱ्या सेटपर्यंत गेला. त्यानंतर सेरेना तिसऱ्या तसेच निर्णायक सेटमध्ये ०-२ अशी पिछाडीवर गेली होती. त्यानंतर तिने सलग सहा गेम जिंकत किताब आपल्या नावे केला. याबरोबरच अमेरिकेच्या सेरेनाने एका वर्षात चार ग्रॅँडस्लॅमची विजेतीपदे पटकाविण्याकडे वाटचाल केली आहे. याआधी, तीन महिला खेळाडू एका वर्षांत चार ग्रॅण्डस्लॅम जिंकण्यात यशस्वी ठरल्या आहेत. स्टेफी ग्राफने १९८८ मध्ये हा विक्रम साधला होता. या पराभवानंतर लुसीने महिला मानांकनात पहिल्या दहा खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे. ही तिच्यासाठी समाधानकारक बाब ठरली.दुसरीकडे, सेरेनाचे आता पुढील लक्ष्य विम्बल्डन स्पर्धा जिंकण्याचे असेल. एकाच वेळी चारही ग्रॅण्डस्लॅम आपल्याकडे राखण्याचा तिचा प्रयत्न असेल. याआधी, २००३ मध्ये आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकत तिने ही किमया केली होती.
विक्रमाकडे... -सेरेनाचे हे कारकिर्दीतील २० वे ग्रॅण्डस्लॅम. या जेतेपदानंतर ती आता स्टेफी ग्राफच्या दोन पावले मागे आहे. स्टेफीने २२ ग्रॅण्डस्लॅम पटकावली आहेत. सेरेनाची ही कारकिर्दीतील २४वी ग्रॅण्डस्लॅम फायनल होती. उल्लेखनीय म्हणजे, तिने केवळ चार वेळा अंतिम सामना गमावला आहे
भारत व कझाकस्तान :
  •  भारत व कझाकस्तान संरक्षण क्षेत्रामधील सामंजस्य करार :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कझाकस्तान दौऱ्यादरम्यान दोन देशांमध्ये पाच महत्त्वपूर्ण करार करण्यात आले. या करारांमध्ये युरेनियम पुरठ्यासंदर्भातील करारासहित लष्करी सहकार्य अधिक वाढविण्यासंदर्भातील कराराचाही समावेश आहे.तसेच मोदी यांची प्रादेशिक शांतता, दळणवळण, संयुक्त राष्ट्रसंघामधील सुधारणा, दहशतवाद यांसहित अनेक आंतरराष्ट्रीय विषयांवर आमची चर्चा झाली.
  •  कझाकिस्तान दौऱ्यात ऊर्जा क्षेत्राला प्राधान्य:मध्य आशियातील पाच देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उझबेकिस्तानचा दौरा आटोपून कझाकिस्तानमध्ये दाखल झाले आहेत. कझाकिस्तानबरोबर ऊर्जा, सुरक्षा आणि व्यापार या मुद्यांवरील चर्चेस पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राधान्य देणार आहेत. कझाकिस्तान हा मध्य आशियातील सर्वांत मोठा देश असून तेल, नैसर्गिक वायू आणि युरेनियमचे मोठे साठे या देशामध्ये आहे, तसेच पोटॅशिअम, मॅंगेनीज, बॉक्‍साईट, तांबे आणि झिंक या खनिजांनीही हा देश समृद्ध आहे.
फेसबुक आपले पाचवे डेटा सेंटर उभारणार :
लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने आपले पाचवे डेटा सेंटर उभारणार असल्याचे जाहीर केले आहे. फोर्ट वर्थ येथे हे पाचवे डेटा सेंटर उभारण्यात येणार असून हे अमेरिकेतील चौथे जर जगातील पाचवे डेटा सेंटर ठरणार आहे. या ग्लोबल डेटा सेंटरसाठी फेसबुक तब्बल 50 कोटी डॉलर्सचा खर्च येणार आहे. तसेच या डेटा सेंटरच्या देखभालीसाठी 40 कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती फेसबुकच्या उपाध्यक्ष (पायाभूत सुविध) टॉम फुरलॉंग यांनी एका ब्लॉगपोस्टद्वारे दिली आहे. विशेष म्हणजे या डेटा सेंटरसाठी संपूर्णपणे अपारंपारिक ऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे. तसेच फेसबुकचे पहिले डेटा सेंटर 2011 मध्ये प्रिंनेविलेमध्ये उभारण्यात आले होते. त्यानंतर अलटुना, लोवा, फॉरेस्ट सिटी, नॉर्थ कॅरोलिना आदी ठिकाणी सर्व्हर्स उभारण्यात आले होते.

देशातील पहिले वायफाय युक्त गाव :
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दत्तक घेतलेले पाचगाव हे देशातील पहिले वायफाय युक्त गाव घोषीत करण्यात आले आहे.
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक खासदाराला एक गाव दत्तक घेण्याचे आवाहन केले होते. यानुसार, गडकरी यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघाला लागून असलेल्या पाचगावची निवड केली होती.
 या गावातील विद्यार्थ्यांना इंटरनेटची सुविधा मिळावी, त्यातून रोजगाराच्या संधी युवकांना उपलब्ध व्हाव्यात, ग्रामपंचायतीसह शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा मिळावा यासाठी संपूर्ण गाव "वाय-फाय‘ करण्याची घोषणा त्यांनी केली होती.


केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी प्रसिद्ध यांनी जनगणना अहवाल :
  •  देशात पहिल्यांदाच सामाजिक, आर्थिक आणि जाती आधारित करण्यात आलेल्या जनगणनेचा अहवाल 3 जुलै 2015 रोजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी प्रसिद्ध केला.
  • देशभरातील 640 जिल्ह्यांत झालेल्या या जनगणनेसाठी कागदाचा वापर झालेला नाही.
  • तब्बल 6.4 लाख इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे ही जनगणना पूर्ण करण्यात आली आहे
  • या अहवालातील जाती आधारित आकडेवारी अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.
  • सध्या केवळ ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत येणारी आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. ब्रिटिशांची सत्ता असताना 1931 मध्ये अखेरची जातनिहाय जनगणना झाली होती.
  • केंद्र आणि राज्य सरकारांना पुढील धोरण ठरविण्यासाठी या जनगणनेतील निष्कर्षांचा मोठा उपयोग होणार आहे.
 मुख्यमंत्र्यांकडून ४,५०० कोटींचे करार:
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अमेरिका दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी ब्लॅकस्टोन उद्योग समुहाशी ४,५०० तर कोकाकोला कंपनीबरोबर ५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले. करारामुळे राज्यात ५० हजार तरुणांना रोजगार मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
  • ब्लॅकस्टोन उद्योग समुहासोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार देशभरात बुधवारपासून ‘डिजिटल इंडिया वीक’ अभियानास प्रारंभ होत आहे. ब्लॅकस्टोन उद्योग समूह पुण्यातील हिंजेवाडी येथे १,२०० कोटी, मध्य मुंबईतील आयटी पार्कमध्ये १,५०० कोटी, मुंबईतील इतर आयटी पार्कमध्ये १,०५० कोटी आणि ईआॅन फ्री झोन सेझमध्ये ७५० कोटी रुपये याप्रमाणे ४,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
  • कोकाकोला कंपनी महाराष्ट्रातील लोटे परशुराम (चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. सिटी बँकेचे प्रबंध संचालक (आॅपरेशन्स) जगदीश राव यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. सिटी बँक, मुंबई व पुण्यात कार्यविस्तार करणार असून त्यामुळे ४ हजार नवे रोजगार निर्माण होणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा