eMPSCkatta |
- स्पर्धचे ठिकाण: कॅनडा
- विजेता: अमेरिका
- उपविजेता: जपान
- सर्वोत्तम खेळाडू (गोल्डन बाँल): कार्ली लॉइड
सर्वाधिक तीन वेळा विश्वचषक उंचावणारा एकमेव संघाचा मान अमेरिकेला मिळाला आहे.
विश्वचषक
इतिहासात अंतिम फेरीत हॅट्ट्रिक नोंदविणारी कार्ली लॉइड ही पहिली महिला
खेळाडू ठरली.कार्ली ने पहिल्या १६ मिनीटातच ३ गोल केले.
अमेरिकेने १९९१ आणि १९९९ नंतर प्रथमच विश्वविजेतेपदाला गवसणी घातली.
याचबरोबरच सर्वाधिक तीन वेळा विश्वचषक उंचावणारा एकमेव संघाचा मान
अमेरिकेला मिळाला आहे. त्यापाठोपाठ दोन जेतेपदे पटकावणाऱ्या जर्मनी संघाचा
क्रमांक येतो.
गतविजेते:
अश्विनी-ज्वालाने पटकावले कॅनडा ओपनचे जेतेपद:
अश्विनी पोनप्पा व ज्वाला गुट्टा या दुहेरीतील भारताच्या आघाडीच्या जोडीने
कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले. ज्वाला व अश्विनीने
एफ.जे. मस्किन्स व सेलेने पिएक या अग्रमानांकित जोडीचा २१-१९, २१-१६ असा
पराभव करत या स्पर्धेच्या महिला दुहेरीचा खिताब पटकावला.पहिल्या सेटमध्ये
प्रतिस्पर्ध्यांनी अश्विनी व ज्वालाला कडवी लढत दिल्याने त्यांनी तो सेट
२१-१९ अशा अवघ्या दोन गुणांच्या फरकाने जिंकला. मात्र त्यानंतर अश्विनी व
ज्वालाने आपले वर्चस्व राखत दुसरा सेट २१-१६ अशा फरकाने जिंकून विजेतेपदावर
नाव कोरले.
- "डिजिटल इंडिया‘ अभियानाचा एक भाग म्हणून पेपरलेस तिकिटे काढता यावीत यासाठी रेल्वे मंत्रालयातर्फे लवकरच मोबाईल ऍप्लिकेशनही सुरू करण्यात येणार आहे.
- फ्लिपकार्ट सप्टेंबरपासून केवळ "मोबाईल ऍप" वर: ऑनलाईन खरेदी विश्वामधील भारतातील सर्वांत मोठी कंपनी असलेल्या "फ्लिपकार्ट" ने लवकरच आपले संकेतस्थळ बंद करुन केवळ "मोबाईल ऍप्लिकेशन" द्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत फ्लिपकार्टचे संकेतस्थळ पूर्णत: बंद केले जाणार आहे.
- फेसबुकसाठी नवे ऍप "हू डिलिटेड मी" दाखल: लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकवर लवकरच युजरला त्याच्या फ्रेंडने "अनफ्रेंड" केल्याची माहिती समजणार आहे व त्यासाठी नवे ऍप बाजारात दाखल झाले आहे. "हू डिलिटेड मी ऑन फेसबुक" हे "iOS" बेस्ड ऍप आपल्या फ्रेंड लिस्टवर नजर ठेवणार आहे. आतापर्यंत फेसबुकवरील एखाद्या युजरला त्याच्या फ्रेंडने "अन-फ्रेंड‘ केले तर त्याची माहिती समजत नव्हती किंवा त्याबाबतची सूचना मिळत नव्हती. पण यापुढे या ऍपद्वारे ती माहिती समजू शकणार आहे.
- सार्वजनिक शौचालयांची उभारणी या स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग असलेल्या उपक्रमात राजधानी दिल्ली सर्वांत पुढे असल्याची माहिती समोर आली आहे.
- घरोघरी शौचालये उभारणीमध्ये गुजरात सर्वांत पुढे आहे.
- दिल्लीमध्ये 5776, छत्तीसगढमध्ये 3,570, महाराष्ट्रामध्ये 2,520, कर्नाटकमध्ये 1680 शौचालये उभारली आहेत.
- देशात 2019 पर्यंत एक कोटी शौचालये उभारण्यासाठी देशभरातील केंद्रशासित प्रदेशांसह राज्यांकडून एकूण 30 लाख 41 हजार 97 खाजगी शौचालये उभारण्यासाठी अर्ज आले होते. त्यापैकी 13 लाख 64 हजार 814 शौचालयांच्या उभारणीसाठी नगर विकास मंत्रालयाने मान्यता दिली
देशातील १९ महाविद्यालयांना वारसा दर्जा:
राज्यात ०४ जुलै २०१५या एकाच दिवशी सर्व शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण होणार आहे. शाळेत न जाणारी बालके म्हणजे शाळाबाह्य मुले. ज्यांनी शाळेत प्रवेश घेतलेला नाही किंवा प्रवेश घेऊन प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले नाही, अशी ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुले. या व्याख्येत एक महिन्यापेक्षा अधिक काळ सतत अनुपस्थित राहणाऱ्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा समावेश होतो. शिक्षण हक्क कायद्यात ही व्याख्या आहे.
राज्य सरकारने ऑगस्ट २०१४ मध्ये शाळाबाह्य मुलांच्या समस्या आणि उपाय यांचा अभ्यास करून सरकारला शिफारशी देण्यासाठी राज्यस्तरीय कृतिगट नेमला होता.या समितीचे अध्यक्ष प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक महावीर माने आहेत
शाळाबाह्य मुलांना प्रवाहात आणण्यासाठी शांतिवन संस्थेच्या धर्तीवर पूर्णवेळ एक प्रकल्प तयार करावा अशी शिफारस महावीर माने समितीने केली होती. शांतिवन हा एक सेवाभावी शैक्षणिक प्रकल्प आहे. आर्वी ता. शिरूर जि. बीड येथील सामाजिक कार्यकर्ते श्री दीपक नागरगोजे हे शांतिवन चे संस्थापक आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील १९ महाविद्यालयांना वारसा दर्जा दिला आहे. त्याचा परिणाम म्हणून महाविद्यालयांना सुधारणांसाठी आता आर्थिक निधी दिला जाणार आहे. पुण्याचे फर्ग्युसन महाविद्यालय, मुंबईचे सेंट झेवियर्स महाविद्यालय, नागपूरचे हिस्लॉप महाविद्यालय यांचा यात समावेश आहे.आयोगाने महाविद्यालयांकडून वारसा महाविद्यालय योजनेत वारसा दर्जासाठी प्रस्ताव मागितले होते, या योजनेत साठ प्रस्ताव मिळाले होते; त्यात दिल्लीचा एकही प्रस्ताव नव्हता.साठ प्रस्तावात निवड समितीने १९ महाविद्यालयांची निवड केली असून आता त्यांना संवर्धनासाठी अनुदान दिले जाईल व विशेष वारसासंबंधित विशेष अभ्यासक्रम राबवता येतील.
विद्यापीठ अनुदान आयोगाने मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाला १.५३ कोटींचे अनुदान जाहीर केले असून त्यात संवर्धनाचे कामकेले जाईल. तसेच 'मेन्टेनिंग हेरिटेज इन इंडिया' हा पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमसुरू केला जाईल. २०१३ मध्ये केंद्र सरकारने ही योजना सुरू केली होती. या योजनेत संबंधित दर्जा मिळालेल्या शैक्षणिक संस्थांना सरकार
वार्षिक ८-१० कोटी रुपये अनुदान देते, त्यात परिसराचे संवर्धन आणि नवीन अभ्यासक्रम यांना मदत होते.
वारसा दर्जा मिळालेली महाविद्यालये:
- सेंट झेवियर्स महाविद्यालय : मुंबई
- फर्ग्युसन महाविद्यालय : पुणे
- हिस्लॉप महाविद्यालय : नागपूर
- सेंट झेवियर्स महाविद्यालय : कोलकत्ता
- सीएमएस महाविद्यालय : कोट्टायम
- सेंट जोसेफ महाविद्यालय : त्रिची
- खालसा महाविद्यालय : अमृतसर
- सेंट बेडेज महाविद्यालय : सिमला
- ख्राइस्ट चर्च महाविद्यालय : कानपूर
- ओल्ड आग्रा महाविद्यालय : आग्रा
- मीरत महाविद्यालय : मीरत
- कन्या महाविद्यालय : जालंधर
- गव्हर्नमेंट ब्रेनन महाविद्यालय : केरळ
- युनिव्हर्सिटी महाविद्यालय : मंगळुरू
- कॉटन महाविद्यालय : गुवाहाटी
- मिदनापूर महाविद्यालय : पश्चिम बंगाल
- गव्हर्नमेंट मेडिकल सायन्स महाविद्यालय : जबलपूर
- गव्हर्नमेंट गांधी मेमोरियल सायन्स महाविद्यालय : जम्मू
- लंगट मानसिंग महाविद्यालय : मुझफ्फरपूर
- डॉ. गणपती यादव समितीच्या शिफारशीनुसार राज्यासाठी एकच तंत्रशिक्षण विद्यापीठ निर्माण करण्याचा निर्णय घेतला.
- जपान संघाचा पराभव करून अमेरिका संघाने महिला फुटबॉल विश्वकरंडक पटकाविला.
- पाचगाव (उमरेड) हे देशातील पहिले वायफाय खेडे गाव ठरले .
- कोपा अमेरिका फुटबॉल कप चिली संघाने जिंकला .
राज्यात ०४ जुलै २०१५या एकाच दिवशी सर्व शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण होणार आहे. शाळेत न जाणारी बालके म्हणजे शाळाबाह्य मुले. ज्यांनी शाळेत प्रवेश घेतलेला नाही किंवा प्रवेश घेऊन प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले नाही, अशी ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुले. या व्याख्येत एक महिन्यापेक्षा अधिक काळ सतत अनुपस्थित राहणाऱ्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा समावेश होतो. शिक्षण हक्क कायद्यात ही व्याख्या आहे.
राज्य सरकारने ऑगस्ट २०१४ मध्ये शाळाबाह्य मुलांच्या समस्या आणि उपाय यांचा अभ्यास करून सरकारला शिफारशी देण्यासाठी राज्यस्तरीय कृतिगट नेमला होता.या समितीचे अध्यक्ष प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक महावीर माने आहेत
- ४ जुलैला सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत होणार सर्वेक्षण
- महापालिका, जिल्हा, तालुका, गाव स्तरांवर समन्वयासाठी समित्या
- सुमारे १०० घरांच्या सर्वेक्षणासाठी एक सर्वेक्षण अधिकारी
- २० सर्वेक्षण अधिकाऱ्यांवर एक झोनल, तर २० झोनल अधिकाऱ्यांवर एक नियंत्रक
- सर्वेक्षण झालेल्या बालकाच्या बोटावर, निवडणुकीत लावतात तशी, शाईची खूण
- वर्ष : २०१३—१४ शालाबाह्य मुले : ३७,८२४
शाळाबाह्य मुलांना प्रवाहात आणण्यासाठी शांतिवन संस्थेच्या धर्तीवर पूर्णवेळ एक प्रकल्प तयार करावा अशी शिफारस महावीर माने समितीने केली होती. शांतिवन हा एक सेवाभावी शैक्षणिक प्रकल्प आहे. आर्वी ता. शिरूर जि. बीड येथील सामाजिक कार्यकर्ते श्री दीपक नागरगोजे हे शांतिवन चे संस्थापक आहेत.
- चेन्नईकरांसाठी प्रथमच मेट्रो सेवा उपलब्ध झाली असून कोयंबेदू आणि आलंदूर या दोन स्थानकांदरम्यान दहा किलोमीटरच्या अंतरावर ही मेट्रो सेवा सुरू झाली आहे.या मेट्रो मार्गाचे ऑक्टोबर २०१४ मध्ये उद्घाटन होणार होते. त्यानंतर हे उद्घाटन मार्च २०१५ मध्ये लांबणीवर टाकण्यात आले होते.
पंतप्रधान कृषी सिंचन योजनेस मंजुरी :
देशातील
शेतकऱ्यांना वर्षभर सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी मोदी सरकारने
घोषणा केलेल्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान कृषी सिंचन योजनेस मंजुरी
देण्यात आली.
देशात लागवडीखाली असलेल्या 142 दशलक्ष हेक्टर क्षेत्रापैकी 65 टक्के क्षेत्रावर सिंचनाची व्यवस्था नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ मॉन्सूनवर अवलंबून राहावे लागते. परिणामी, क्षमता असूनही जलसिंचनाच्या सोयीअभावी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतात.
ही परिस्थिती बदलण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी कृषी सिंचन योजनेची घोषणा केली होती. बुधवारी झालेल्या निर्णयानंतर आता ही योजना राबविण्यास सुरवात होणार आहे. तसेच पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत विविध पद्धतींद्वारे सिंचन क्षमता वाढविली जाणार आहे.

gta 5 apk
उत्तर द्याहटवाWe Indians are unmatched at creating new ideas. We were the ones who solved many mysteries from Zero to Yog.