eMPSCktta |
इस्रो व ऍट्रिक्सने अवकाशात यशस्वीपणे सोडले पाच व्यापारी उपग्रह :
- भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) आणि तिचा व्यापारी विभाग असलेल्या ऍट्रिक्सने आज एकूण 1,440 किलो वजनाचे पाच व्यापारी उपग्रह अवकाशात यशस्वीपणे सोडले.
- पीएसएलव्ही या प्रक्षेपकाच्या साह्याने प्रथमच इतक्या मोठ्या वजनाचे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले.
- भारताची आतापर्यंतची ही सर्वांत अवजड व्यापारी मोहीम होती.
- तसेच या वर्षातील ही पहिलीच व्यापारी मोहीम असून या मोहिमेचा कार्यकाळ 7 वर्षे असेल.
- "पीएसएलव्ही"चे सुधारित व्हर्जन असलेल्या "पीएसएलव्ही-एक्सएल" या प्रक्षेपकाने आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून ब्रिटनच्या या पाचही उपग्रहांना त्यांच्या कक्षेत सोडले.
- "पीएसएलव्ही-एक्सएल" हे चार टप्पे असलेले रॉकेट असून, सुरवातीच्या टप्प्यांमध्ये वेग मिळविण्याकरत अतिरिक्त सहा मोटर्स बसविण्यात आल्या आहेत.
- पहिल्या आणि तिसऱ्या टप्प्यात घन इंधनाचा वापर केला असून, दुसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात द्रवरूप इंधनाचा वापर केला आहे.
- प्रक्षेपणापासून ते पाचवा उपग्रह अवकाशात सोडण्याचा कालावधी 19 मिनिटे 16 सेकंद इतका असणार आहे.
- डीएमसी-3 : ब्रिटनच्या पाचही उपग्रहांपैकी हे तीन उपग्रह एकसारखे आहेत. त्यांचे वजन प्रत्येकी 447 किलो आहे. पृथ्वीचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने सोडण्यात आलेले हे तीनही उपग्रह पृथ्वीपासून 647 किमी अंतरावर सूर्यकक्षेत सोडले जाणार आहेत. या तीनही उपग्रहांची उंची प्रत्येकी तीन मीटर आहे. छायाचित्रे काढणे, नैसर्गिक स्रोतांची आणि पर्यावरणाची माहिती घेणे आणि आपत्कालीन स्थितीत माहिती पुरविणे हे या उपग्रहांचे प्रमुख काम असणार आहे.
- सीबीएनटी-1 : हा उपग्रहही पृथ्वी निरीक्षणासाठी सोडला जाणार असून, त्याचे वजन 91 किलो आहे. हा प्रायोगिक तत्त्वावर सोडला जाणारा लघुउपग्रह असून याद्वारे नवीन तंत्रज्ञानाची चाचणी घेतली जाणार आहे.
- डी-आर्बिट सेल : हा नॅनो उपग्रह असून त्याचे वजन फक्त 7 किलो आहे. हा उपग्रहसुद्धा प्रायोगिक तत्त्वावर सोडला जाणार आहे.
- डीएमसी-3 आणि सीबीएनटी-1 हे उपग्रह सरे सॅटेलाइट टेक्नोलॉजीने तयार केले असून, डी-ऑब्रिट सेल हा उपग्रह सरे अवकाश संस्थेने तयार केला आहे.
पीएसएलव्ही-एक्सएलची वैशिष्ट्ये :
- पीएसएलव्ही-एक्सएलची उंची : 44.4 मीटर
- वजन : 320 टन
- किंमत : 140 कोटी
- 45 : 1999 पासून भारताने सोडलेले परदेशी उपग्रह
- 30 वी : पीएसएलव्हीची मोहीम
जागतिक स्तरावर गरिबी हटवण्यात ‘यूएन’ला यश:
जागतिक
स्तरावर गरिबीचे प्रमाण कमी करण्यात भारत आणि चीन यांची मध्यवर्ती भूमिका
असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाने (यूएन) प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले
आहे. १९९० पासून जगभरातील एक अब्जहून अधिक लोकांना अत्यंत गरिबीतून बाहेर
काढण्यात आले असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
अहवालातील ठळक बाबी
- दारिद्र्य रेषेखालील जगातील नागरिकांचे प्रमाण १९९० मधील ३६ टक्क्यांवरून २०१५ मध्ये१२ टक्क्यांवर आले आहे.
- आफ्रिकेतील काही देश वगळता इतर सर्व देशांना त्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात यश.
- १९९० नंतर भारताने प्रगती केल्याने दक्षिण आशियामधील अत्यंत गरिबीचे प्रमाण ५२ टक्क्यांवरून १७ टक्क्यांवर आले आहे.
- संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस : बान की मून
♻ जागतिक स्तरावर गरिबीचे प्रमाण कमी करण्यात भारत आणि चीन
यांची मध्यवर्ती भूमिका असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाने (यूएन) प्रसिद्ध
केलेल्या अहवालात म्हटले आहे.
♻ १९९० पासून जगभरातील एक अब्जहून अधिक लोकांना अत्यंत गरिबीतून बाहेर काढण्यात आले असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
♻ जगातील सर्वांत अधिक लोकसंख्या असलेले चीन आणि भारत यांची गरिबी कमी करण्यातील भूमिका मध्यवर्ती ठरल्याचेही यामध्ये म्हटले आहे.
♻
१९९० नंतर चीनने मोठी प्रगती केल्याने पूर्व आशियामधील अत्यंत गरिबीचे
प्रमाण ६१ टक्यांती वरून फक्त चार टक्यांय वर आले आहे. तसेच, भारतानेही
प्रगती केल्याने दक्षिण आशियामधील अत्यंत गरिबीचे प्रमाण ५२ टक्यांवरून १७
टक्यांमा वर आले असल्याचे अहवालात म्हटले आहे.डिजिटल इंडिया:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘डिजिटल इंडिया’चे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी यावेळी ‘ई-लॉकर’ सर्व्हिस सुरु करून ‘डिजिटल इंडिया वीक’ मासिकाचे प्रकाशनही मोदींच्या हस्ते करण्यात आले. डिजिटल मोहिमेचे खास वैशिष्ट्ये…
- 251 सेवा आणि प्रॉडक्ट लॉन्च करण्यात येतील.
- 600 पेक्षा जास्त शहरात डिजिटल इंडिया कॅम्पेन राबवले जाईल.
- एक लाख कोटी रुपये डिजिटल इंडिया मोहिमेवर खर्च करण्यात येत आहे.
- केंद्र सरकारने एक वर्षापूर्वीच या मोहिमेला मंजुरी दिली होती.
- सरकार-जनतेतीलअंतर कमी होईल.
- भ्रष्टाचाराचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटेल.
- वेळेवर काम होईल.
- नेटस्पीडमध्ये आपण 52 व्या क्रमांकावर : इंटरनेटवेगवान झाले तर ई-स्वप्न पूर्ण होईल. डाऊनलोड स्पीडमध्ये जगात आपला क्रमांक 52 वा आहे. येथे एमबीपीएस डाऊनलोड स्पीड आहे. गावात 12 ते 20 तास वीज नसते.
ऑनलाइन अपॉइंटमेंट मिळेल. संबंधित मंत्रालयाच्या पोर्टलवर जाऊन वेळ घेता येईल. ई-मेलवर माहिती मिळेल.
फायदा: अधिकाऱ्यांना सतत भेटण्यास नकार देता येणार नाही. किती वेळा भेटीची वेळ मागितली, याचा आपल्याकडे पुरावा असेल.
>डिजिटल लॉकर-
आपली शैक्षणिक कागदपत्रे ठेवता येतील. नोकरी आदीसाठी गरज भासल्यास त्या लॉकरची लिंक देऊन काम भागेल.
फायदा: फायली सांभाळण्याची कटकट संपुष्टात. वारंवार झेरॉक्स, त्याचे अॅटेस्टेशन, प्रमाणपत्रे हरवण्याची भीती नाही
>ई-बॅग-
विद्यार्थी शालेय पुस्तके थेट टॅब्लेट, लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवर डाऊनलोड करू शकतील. पहिल्या टप्प्यात सीबीएसई दहावी आणि बारावीला लागू होईल योजना.
फायदा: विद्यार्थ्यांना कुठेही अभ्यास करता येणार. दप्तराचे ओझे कमी होईल.
लँडलाइनवर व्हिडिओ कॉल-ईमेल : लँडलाइनवरूनव्हिडिओ कॉल- कॉन्फरन्सिंग, ईमेल शक्य. घरी-ऑफिसमध्ये जाताच मोबाइल लँडलाइनशी लिंक होईल.
>ई-हॉस्पिटल-
ओपीडीत डॉक्टरांची भेट सोपी. घर वा सायबर कॅफेतून डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळेल. एम्समध्ये चाचणी सुरू.
फायदा: लांब वरच्या रुग्णांना शहरात येणे, रांग लावण्यापासून मुक्ती.
>ई-हेल्थ-
तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे खेडोपाडी टेलिमेडिसिनद्वारे वैद्यकीय सुविधा. शुल्कही नाममात्र.
फायदा: रुग्णांना वारंवार शहरात येणे, मोठ्या डॉक्टरांची वेळ मिळणे आदींपासून सुटका होईल.
भारतातील अब्जाधीश नागरिकांची संख्या अडीच लाखांवर :
2014 मध्ये भारतातील अब्जाधीश नागरिकांच्या संख्येत 27% वाढ झाली असून, ही संख्या अडीच लाखांवर पोहोचली आहे. भारतात 2013 मध्ये 1.96 लाख नागरिक अब्जाधीश होते.
भारतातील अब्जाधीशांची हीच संख्या 2018 पर्यंत 4.37 लाखांवर पोहोचणार आहे. तर, 2023 पर्यंत त्याच्या दुप्पट होणार आहे, असे वेल्थ एक्स या संस्थेच्या अहवालानुसार समोर आले आहे. तसेच या अहवालानुसार पुढील दहा वर्षांचा कालावधी 'इंडियाज् डेकेड'(भारताचे दशक) ठरणार आहे, असे सांगण्यात आले आहे.
भारताच्या बरोबरीनेच दक्षिण अफ्रिकेतील कोट्याधीशांच्या संख्येत वाढ होत आहे. 2013-14 मध्ये कोट्याधीशांच्या बाबतीत भारत 14 व्या क्रमांकावर होता. तसेच यामध्ये अमेरिका, जपान, चीन व ग्रेट ब्रिटन हे देश आघाडीवर आहे. या अहवालानुसार 74.5 टक्क्यापेक्षा जास्त ग्रामीण कुटुंबांचे मासिक उत्पन्न 5,000 पेक्षा कमी आहे. जागतिक बँकेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार भारतातील दरडोई उत्पन्न 1.610 डॉलर(अंदाजे एक लाख) झाले आहे. 2013 मध्ये हे उत्पन्न 1,560 डॉलर आहे. परंतू ही वाढ काहीच लोकांच्या उत्पन्नात झालेल्या वाढीमुळे होती व सर्वसमावेशक नव्हती, असेही सांगण्यात आले आहे.
भारतातील अब्जाधीशांची हीच संख्या 2018 पर्यंत 4.37 लाखांवर पोहोचणार आहे. तर, 2023 पर्यंत त्याच्या दुप्पट होणार आहे, असे वेल्थ एक्स या संस्थेच्या अहवालानुसार समोर आले आहे. तसेच या अहवालानुसार पुढील दहा वर्षांचा कालावधी 'इंडियाज् डेकेड'(भारताचे दशक) ठरणार आहे, असे सांगण्यात आले आहे.
भारताच्या बरोबरीनेच दक्षिण अफ्रिकेतील कोट्याधीशांच्या संख्येत वाढ होत आहे. 2013-14 मध्ये कोट्याधीशांच्या बाबतीत भारत 14 व्या क्रमांकावर होता. तसेच यामध्ये अमेरिका, जपान, चीन व ग्रेट ब्रिटन हे देश आघाडीवर आहे. या अहवालानुसार 74.5 टक्क्यापेक्षा जास्त ग्रामीण कुटुंबांचे मासिक उत्पन्न 5,000 पेक्षा कमी आहे. जागतिक बँकेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार भारतातील दरडोई उत्पन्न 1.610 डॉलर(अंदाजे एक लाख) झाले आहे. 2013 मध्ये हे उत्पन्न 1,560 डॉलर आहे. परंतू ही वाढ काहीच लोकांच्या उत्पन्नात झालेल्या वाढीमुळे होती व सर्वसमावेशक नव्हती, असेही सांगण्यात आले आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या ‘डिजिटल इंडिया‘च्या ब्रँड ऍम्बेसिडरपदी कृती तिवारीची निवड करण्यात आली .
- राज्यातील सर्व अभियांत्रीकी तसेच फार्मसी महाविद्यालये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ(लोणार) विद्यापीठाच्या अखत्यारीत आणणार आहे .
- ‘मोदीज वर्ल्ड: एक्सपैंडिंग इंडियाज स्फीयर ऑफ़ इन्फ्लुएंस’ हे पुस्तक सी राजा मोहन यांनी लिहिले.
- केंद्र सरकार ने मजदूराना कमीत कमी 160 रूपये प्रति दिवस वेतन दररोज द्यावे असे ठरवले (National floor-level Minimum Wage) :- (याअगोदर रु 137 रुपए प्रति दिवस होते, १९९६ मध्ये हेच वेतन रु ३५होते )
"इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बंगळूर" आघाडीच्या स्थानी :
- जगभरातील शास्त्रज्ञ आणि अभ्यासकांचे आकर्षणबिंदू ठरलेल्या "इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बंगळूर" या संस्थेने "ब्रिक्स" राष्ट्रांमधील आघाडीच्या विद्यापीठांमध्ये जागा मिळवली आहे.
- आंतरराष्ट्रीय क्रमवारीचा विचार केला असता हे विद्यापीठ पाचव्या स्थानावर असल्याचे दिसून येते.
- "क्यूएस युनिव्हर्सिटी रॅंकिंग : ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) 2015" हा अहवाल आज प्रसिद्ध करण्यात आला.
- चिनी विद्यापीठांनी आघाडी घेतली असून तिसींगहुआ, पेकिंग आणि फुदान या तिन्ही विद्यापीठांनी आघाडीचे स्थान पटकावले आहे.
- तसेच बंगळूरमधील "इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स" ही संस्था पाचव्या स्थानावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चौथे विश्व साहित्यसंमेलन अंदमानमध्ये होणार:
- पहिल्या तीन विश्व मराठी साहित्यसंमेलनाने सातासमुद्रापार भरारी घेतल्यानंतर ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवनांच्या स्मृती त्यांच्याच सुवर्णमयी पुण्यतिथीनिमित्त जागृत झाल्याचे भासवित भारतातच हे संमेलन घेण्यावर मराठी साहित्य महामंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. पोर्टब्लेअर येथील महाराष्ट्र मंडळ आणि आॅफबीट डेस्टिनेशन या संस्थेच्या वतीने हे संमेलन आॅक्टोबरमध्ये अंदमान येथे आयोजित करण्याची घोषणा महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांनी पत्रकार परिषदेत केली.
एसएमएसचे जनक मॅट्टी मॅक्कोनेन कालवश:
सेलफोन जगतासाठी आजचा दिवस वाईट आहे. ‘मोबाईल नेटवर्क्स’द्वारे संदेश
पाठविण्याची पद्धत विकसित करण्यास हातभार लावणारे मॅट्टी मॅक्कोनेन यांचे
आजारामुळे निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. एसएमएसचे जनक म्हणून जगभर ओळखले
जात असूनही एसएमएस तंत्रज्ञान विकसित करण्याचे संपूर्ण श्रेय त्यांनी
कधीही स्वत:कडे घेतले नाही. एसएमएस तंत्रज्ञान विकासाचा विषय निघताच हे
तंत्रज्ञान आपण एकट्याने विकसित केले नसल्याचे ते त्वरित स्पष्ट करत.
मोबाईल फोनद्वारे लिखित संदेश पाठविण्याची कल्पना त्यांनी सर्वप्रथम १९८४
मध्ये मांडली होती. एखाद्या विशिष्ट प्रकारात संदेश पाठविण्याची पद्धत
नेहमीसाठी अस्तित्वात राहील, असे मला वाटते. एसएमएसचा विकास ही संयुक्त
प्रयत्नांची फलनिष्पत्ती आहे, असे आपण मानतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा