Post views: counter

How To Train Your Mind For Mental Stress During Exam?

राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा पेपर कसा सोडवायचा?

                                    पूर्व परीक्षा ही बहूत्तरिय स्वरुपाची असते, म्हणजे एका प्रश्नाचे ४ उत्तर दिलेले असतात त्यापैकी सर्वात बरोबर उत्तर कोणत आहे ते अचूक निवडायचे असते. ह्यासाठी स्पीड आणि अचूकता ही महत्वाची असते. पेपर सोडवतांना प्रेझेन्स ऑफ माइंड असावे लागते म्हणजे उत्तर निवडताना कोणत उत्तर बरोबर नाही हे कळायला पाहिजे कारण त्यासाठी आपला कॉमन सेन्स वापरायचा असतो. हे ज्याला जमलं तोच जास्तीत जास्त गुण मिळवू शकतो पूर्वपरीक्षेत.
                                   सर्वात आधी मोडेल टेस्ट पेपर्स सोडवायची खूप प्रक्टिस करावी. त्यासाठी, १० ते ३० हजार प्रश्न असलेली पुस्तके घ्यावीत आणि त्यामधील प्रश्न पत्रिका २ तासात सोडवायची प्रक्टिस करावी. प्रक्टीसनेच परफेक्ट व्हाल आणि चुकीचे उत्तर देणे कमी होईल व निगेटिव्ह मार्किंग्च्या प्रश्नातून तुमची सुटका होईल. परीक्षेच्या वेळी एखादा प्रश्न कठीण वाटत असेल
तर तो सोडून द्यावा व पुढील प्रश्न सोडवायचा प्रयत्न करावा. नंतर त्या प्रश्नाकडे परत यावे.४ उत्तरांपैकी जर एकही उत्तर माहित नसेल तर त्यातील २ चुकीचे उत्तर सर्वात आधी काढुन टाकावेत आणि मग उरलेल्या २ उत्तरांपैकी कोणत उत्तर बरोबर आहे म्हणजे बेस्ट आहे ते शोधावे. प्रश्न अगोदर २ वेळा तरी वाचून घ्यावा म्हणजे त्याचा अर्थ तरी कळेल आणि मग त्याच उत्तर काय आहे ते नक्की करा कारण घाई गडबडीत उत्तर चुकण्याची भिती असते. काही वेळा असं होते कि शब्दांच्या अर्थामुळे उत्तर चुकतात. शब्दांचा अर्थ समजला कि मग उत्तर कोणत बरोबर आहे ते कळत. जर परत परत प्रयत्न करूनही उत्तर कोणतं बरोबर आहे ते कळत नसेल तर ते अनुत्तरीतच राहू द्यावे नाहीतर निगेटिव्ह मार्किंग्चा झटका बसेल. जोरका झटका धीरेसे लगे असं होईल.
                                पेपर लवकरात लवकर कम्प्लीट करावा आणि मग सुरवातीपासून चेक करावा कि कोणते प्रश्न अजून बाकी आहेत सोडवायचे. पेपर सोडवतांना मध्ये मध्ये थोडा ब्रेक घ्यावा, ४ ते ५ सेकंदाचा, आणि ह्या वेळेत मोठा श्वास घेवून हळूहळू सोडावा, ह्यामुळे तुम्हाला औक्शीजन मिळेल व थोडसं टेन्शन कमी होईल.
राज्यसेवा पूर्वपरीक्षा म्हणजे यशाची पहिली पायरी आहे आणि ती जर चढून पुढे जाता आल तर मात्र यश पण जर ह्या पायरी वरून चढता आल नाही तर मग अपयश पदरी पडते. खुपजण पूर्वपरीक्षा जस्ट ट्राय करून पाहू अश्यासाठी देतात आणि मग अपयश आल तर खचून जातात. मी म्हणतो, अरे जर तुम्ही हेच कराव म्हणता तर उगीच आपल्या आई-बापांचा पैसा का व्यर्थ घालवता?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा